चिन्यांचा उपद्व्याप (भाग दोन)
राम राम मंडळी. चिन्यांच्या उपद्याप या विषयावर मिपावर दोन हजार तेराला चर्चा सुरु होती. आताही तोच प्रश्न नव्याने समोर आला आहे. आपण अगोदरच कोरोनाने परेशान आहोत. रुग्ण वाढत आहेत बरे होत आहेत. आपण आपल्या जींदगीशी व्यक्तीगत पातळीवर समझोता करुन जरा हळुहळु आपलं मार्गक्रमण सुरु करत होतो की चिन्यांनी सीमेवर कुरापती सुरु केल्या. एलएसीवर चीनने जे कृत्य केलं त्यामुळे देशभर संताप उमटला आहे. अशा परिस्थितीत काल पंतप्रधानांची काल जी सर्वपक्षीय बैठक झाली त्यात चिन्यांनी घुसखोरी केलीच नाही अशी सर्वांना माहिती दिली आहे. (बातमी मटा) परंतु भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता यात भारताचे २० जवान शहीद झाले त्याच वेळी चिन्यांचेही ४३ पेक्षा अधिक सैन्य ठार झाल्याचे म्हटल्या जाते. खिळे असलेले दंडु़क्यांचे चित्र माध्यमात फिरत आहेत. अतिशय संताप यावा असे हे चिन्यांचे कृत्य आहे. मात्र ग्लोबल टाइम्समधे किंवा चिन्यांकडून अशी काही बातमी येत नाही, असे झाले असेल तर चीन्यांना धडा शिकवणे गरजेचेच आहे. चिन्यांना धडा शिकवलाच पाहिजे. काल सर्वपक्षीय बैठकीत अनेकांनी अनेक प्रश्न विचारले आणि मा. पंतप्रधानांनी ”भारताला मैत्री आणि शांतता हवी आहे. पण देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला ठेच पोहोचू देणार नाही. कुठल्याही परकीय दबावापुढे भारत झुकणार नाही. देशाच्या सुरक्षेसाठी जे काही आवश्यक असेल त्यासाठी वेगाने पावलं उचलली जातील”’ असे म्हटले आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने किंवा आणि अन्य काही कारणांमुळे असेल सर्वच गोष्टी जाहीर सांगता येत नसतील तरीही चिन्यांचा हा किडा ठेचला पाहिजे ही भारतीयांच्या मनातली इच्छा आहे, असे करतांना अनेक गोष्टी असतील येत्या काळात आपण कदाचित काही कार्यवाही करणारही असू पण चिन्यांचं आता पुरे झालं.
मंडळी, चिन्यांच्या एकूणच कोणत्याही गोष्टींवर आपण विश्वास ठेवणार नाही. चिन्यांच्या कुरापतीला वेगवेगळे कंगोरे असतील. गलवान क्षेत्रातील पुलाच्या कामामुळे चीनी भडकले असतील. गलवान खो-यातील काही वादग्रस्त क्षेत्र असेल ते आपल्या परत मिळालेच पाहिजेत असे एक भारतीय म्हणून वाटते. जगाचं लक्ष कोरोनावरुन हटवून अन्यत्र वळवणे असेल किंवा जे काही असेल त्या विषयांची चर्चा धाग्यात अपेक्षित आहेत. उत्तम संदर्भ, लिंका आणि व्हीडीयो टाळत असलेल्या व्हीडीयो-बातम्यांचा मजकूर टंकून एकूण्च चर्चा अपेक्षित आहे. देशातून चिन्यांचे विविध कामांचे कंत्राट, वस्तूंच्या ऑर्डर्स रद्द होत आहेत एका दृष्टीने आता चिन्यांची कोंडी करण्याचा थोडाफार प्रयत्नही होतांना दिसत आहे.
आत्ताच एक जूनला ग्लोबल टाइम्समधे चीनच्या वतीने म्हटलं गेलं होतं की अमेरिका आणि आमच्या वादापासून भारताने दूर राहावे. चीन अमेरिकावादात भारताने फायदा उठवू नये. आणि दोन राष्ट्राच्या (चीन-अमेरिका) वादात भारत पडल्यास भारताला मोठी किंमत मोजावी लागेल असे म्हटले होते त्याच बरोबर भारतात सध्या चीन विरोधात आवाज उठविण्यात येत आहे, मोदी सरकारने देशात चीन विरोधात उठवला जाणारा आवाज कमी करण्याकडे लक्ष द्यायला हवे असे चीनने म्हटले होते. (बातमी- ग्लोबल टाइम्स आणि सकाळ )आणि म्हणून त्यांनी कालचं कृत्य केलं असावं का ?
''भारताला शांतता हवी आहे. पण याचा अर्थ भारत दुबळा आहे असा होत नाही. चीनचा मूळ स्वभाव हा विश्वासघातचा आहे. भारत बलवान आहे आणि दुबळा नाही. शत्रूचे डोळे काढून हातात देण्याची सरकारमध्ये क्षमता आहे'' असे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले त्यात चुकीचं काही नाही. चिन्यांच्या या कृत्याला आता आपण देश एकत्र होऊन चिन्यांंचा योग्य बंदोबस्त झालाच पाहिजे या मतावर येऊन ठेपलो आहोत.
मंडळी, कोमल यांच्या पहिल्या धाग्यातील प्रतिसाद लांबत गेले, दुसर्या पानावार जातांना प्रतिसाद लिहितांना अडचणी येत होत होत्या, सर्वाअर्थाने चीन्यांच्या कुरापती, आपले सीमा प्रश्न आणि त्यांच्या बंदोबस्तावर चर्चा व्हावी यासाठी हा धाग्याचा प्रपंच. आपण योग्य अशी माहितीची देवान-घेवाण व्यक्तीगत पातळीवर न जाता तटस्थपणे चर्चा कराल अशी अपेक्षा.
सदरील धाग्यात बरीच प्रश्नांची चर्चा सुरु आहे, तरीही एक प्रयत्न करतो. मी काही या विषयाचा तज्ञ नाही. पण, एक भारतीय म्हणून देशाच्या सीमा अखंड राहाव्यात, त्यात कोणीही घुसखोरी करु नये.
चीन नी काय केले हे अजुन पर्यंत समजले नाही.
दिनांक १६ जून २०२० रोजी. चीनी सैनिकांनी एलएसीवर भारतीय सैन्याशी झटापट झाली. आपले भारतीय २० सैनिक शहीद झाले. चिन्यांचेही सैनिक मारले गेले. भारतीय सैनिकांवर खिळे असेलेल्या दंडु़क्यांनी ही मारहाण केली असे वृत्त तेव्हापासून ते आतापर्यंत अधून मधून येत असतात.
सीमेवर चीन नी भारताचे काय नुकसान केले आहे.
भारतीय सीमेवर पूर्वी चीन कधी तरी एखाद्या भागात घुसखोरी करायचा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषा बदलविण्याचा प्रयत्न करीत असायचा, आता चीनने कोणत्या एका जागी नव्हे तर संपूर्ण सीमारेषेवर चीन तणाव निर्माण करुन छोट्या छोट्या भागात घुसून आपली सिमा बदलण्याचा प्रयत्न करीत असतो. लडाखमधे घुसखोरी केली, लष्करातील निवृत्त जवानही सांगत आहेत की, एक नव्हे तर तीन ठिकाणचा भूभाग चिन्यांनी बळकावला आहे. २०१३ पासून भारताचा ६४० चौरस किलोमीटर भूभाग चीनने बळकावला असल्याचे सरकारनेच नेमलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अहवालात म्हटले होते, असा आरोप आज पक्षात असलेल्या तेव्हाच्या विरोधी पक्ष भाजप आणि यूपीएचा घटक असलेला समाजवादी पक्ष यांनी केला होता. आजही परिस्थितीत फ़ारसा फ़रक नाही. गलवान, पेंगाँग, या परिसरात चीन आजही ठाण मांडून बसला आहे.
सीमेवरचे कोणते राज्य बळकावले आहे
चीन अरुणाचल प्रदेशाला दक्षिण तिबेट समजतो आणि तो आमचा भाग आहे असे म्हणतो, अजून तरी त्यांचे सैन्य अरुणाचलप्रदेशात दिसत नाही, योग्य धडा दिला नाही तर चीनच्या कुरापती तिथे सुरुच राहतील. एकेक गाव आपलं म्हणत राहील. चीन अरुणाचलमधील सुंदर शहर तवांगवर आपला हक्क सांगतो त्याची कथा पुन्हा कधी तरी सांगेन. आज तरी चीनने कोणते राज्य बळकावले नाही. मात्र अरुणाचल प्रदेशापासून ते अक्साइ चीनच्या सीमेपर्यंत चीनी सैनिक आक्रमकपणे इंच इंच पुढे सरकतच आहेत.
युद्ध झाले तर भारताची काय अवस्था होईल.
भारताची काय अवस्था होईल माहिती नाही पण आपण चिन्यांच्या चिंध्या चिंध्या करुन टाकू यात मला काही शंका वाटत नाही. जागतिक घडामोडीत मजबूत देश भारताच्या बाजूने येतील. चीनची वाट लागेल.
का विनाकारण युद्ध ओढवून घेत आहात.
विस्तारवादी चीन सर्वच दृष्टीने कुरापतीखोर असून जगाला सर्वात अधिक धोका चीनकडून आहे, म्हणून चीन्यांची खुमखुमी एकदा जीरवली पाहिजे, डिझेल पेट्रोल दोनशे रुपये लिटर झाले तरी चालेल पण या चिन्यांचे नाक एकदा कापले पाहिजे असे मनापासून वाटते.
मी या विषयातला एक्सपर्ट नाही. काही चुकभूल होऊ शकते.
-दिलीप बिरुटे (भारतीय)सारांश काय, चीन्यांची सीमेजवळ मस्ती सुरु आहे-- मस्ती फार काळ सुरु राहिल असे वाटत नाही, लडाख भागात -३० अंश तापमानात राहायची सवय चीन्याना नाही (तिबेटी जनतेला ती आहे, मात्र पिएलए मधे तिबटी जनतेची भरती चीन करत नाही) तर भारतीय सैन्याला आहे. कडाक्याच्या थंडीत चीनी सैन्य मागे हटण्याची शक्यता जास्त आहे.गप्पूसेठ
केवळ मोदीद्वेषातुन तुम्ही स्वतःला हास्यास्पद ठरवत आहात एक तर त्यांना गप्पूशेठ म्हणण्यासाठी आपण असं काय महान काम केलंय?. पाच वर्षात एकदा एक मत दिलं कि कुणालाही काहीही म्हणण्याचा आपल्याला अधिकार प्राप्त होतो हे एखाद्या रस्त्यावरच्या पक्याला शोभून दिसेल पी एच डी झालेल्या मराठीच्या प्राध्यापकाला नाही. चीन भारत संबंधाबाबत कुठेही काहीही झालं कि त्याच्याबद्दलची बातमी येथे टाकून तुम्ही निदान ६० कोटी लोकांनी निर्विवाद बहुमत देऊन निवडून आणलेल्या भारताच्या पंतप्रधानांबद्दल येतेच गरळ ओकून लिहिणे आपल्याला शोभत नाही. बाकी वरील बातमी बद्दल-- आपल्या संभाजीनगरात १०० झोपड्या अर्ध्या रात्रीत उभ्या राहतात हे आपल्यालाही ठाऊक असणारच. मग सरकारचे पाठबळ असताना १०० घरे बांधली जातील यात मोठे असे काही हि नाही. याचा साधा उगम असा आहे. भारताने चीनची प्रचंड गुंतवणूक असलेल्या चीन पाकिस्तान आर्थिक मार्ग (CPEC) ला विरोध दर्शवला आहे आणि त्त्यासाठी जमेल त्या मार्गानी भारत प्रयत्न करत आहे. यात गाल्वन खोऱ्यात आणि दौलत बेग ओल्डी ( बवेल मिळाला तर याबद्दल वाचून पहा) येथे आपली फळी मजबूत केली आहे. याभागापासून सरकारचे लक्ष हटवण्यासाठी सिक्कीम अरुणाचलप्रदेश अशा ठिकाणी काही तरी कुरापत काढणे चालू ठेवणारच. https://maharashtratimes.com/international/international-news/baloch-rebels-attacks-on-chinese-in-pakistani-cities-opposing-cpec/articleshow/80011470.cms दुर्दैवाने श्री राहुल गांधी यांच्यासारखा अपरिपकव विरोधी नेता ( हि व्यक्ती चीनशी संधान बांधून आहे अशी शंका यावी इतपत काम करते आहे) कायम काही तरी कारण काढून सरकारच्या कामात खोडा घालण्याचे काम करीत आहे. आणि आपल्यासारखे लोक अपरिपक्वतेचे प्रदर्शन मांडून बसले आहेत.