Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चिन्यांचा उपद्व्याप (भाग दोन)

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 06/20/2020 - 14:06
🗣 190 प्रतिसाद

राम राम मंडळी. चिन्यांच्या उपद्याप या विषयावर मिपावर दोन हजार तेराला चर्चा सुरु होती. आताही तोच प्रश्न नव्याने समोर आला आहे. आपण अगोदरच कोरोनाने परेशान आहोत. रुग्ण वाढत आहेत बरे होत आहेत. आपण आपल्या जींदगीशी व्यक्तीगत पातळीवर समझोता करुन जरा हळुहळु आपलं मार्गक्रमण सुरु करत होतो की चिन्यांनी सीमेवर कुरापती सुरु केल्या. एलएसीवर चीनने जे कृत्य केलं त्यामुळे देशभर संताप उमटला आहे. अशा परिस्थितीत काल पंतप्रधानांची काल जी सर्वपक्षीय बैठक झाली त्यात चिन्यांनी घुसखोरी केलीच नाही अशी सर्वांना माहिती दिली आहे. (बातमी मटा) परंतु भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता यात भारताचे २० जवान शहीद झाले त्याच वेळी चिन्यांचेही ४३ पेक्षा अधिक सैन्य ठार झाल्याचे म्हटल्या जाते. खिळे असलेले दंडु़क्यांचे चित्र माध्यमात फिरत आहेत. अतिशय संताप यावा असे हे चिन्यांचे कृत्य आहे. मात्र ग्लोबल टाइम्समधे किंवा चिन्यांकडून अशी काही बातमी येत नाही, असे झाले असेल तर चीन्यांना धडा शिकवणे गरजेचेच आहे. चिन्यांना धडा शिकवलाच पाहिजे. काल सर्वपक्षीय बैठकीत अनेकांनी अनेक प्रश्न विचारले आणि मा. पंतप्रधानांनी ”भारताला मैत्री आणि शांतता हवी आहे. पण देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला ठेच पोहोचू देणार नाही. कुठल्याही परकीय दबावापुढे भारत झुकणार नाही. देशाच्या सुरक्षेसाठी जे काही आवश्यक असेल त्यासाठी वेगाने पावलं उचलली जातील”’ असे म्हटले आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने किंवा आणि अन्य काही कारणांमुळे असेल सर्वच गोष्टी जाहीर सांगता येत नसतील तरीही चिन्यांचा हा किडा ठेचला पाहिजे ही भारतीयांच्या मनातली इच्छा आहे, असे करतांना अनेक गोष्टी असतील येत्या काळात आपण कदाचित काही कार्यवाही करणारही असू पण चिन्यांचं आता पुरे झालं.

मंडळी, चिन्यांच्या एकूणच कोणत्याही गोष्टींवर आपण विश्वास ठेवणार नाही. चिन्यांच्या कुरापतीला वेगवेगळे कंगोरे असतील. गलवान क्षेत्रातील पुलाच्या कामामुळे चीनी भडकले असतील. गलवान खो-यातील काही वादग्रस्त क्षेत्र असेल ते आपल्या परत मिळालेच पाहिजेत असे एक भारतीय म्हणून वाटते. जगाचं लक्ष कोरोनावरुन हटवून अन्यत्र वळवणे असेल किंवा जे काही असेल त्या विषयांची चर्चा धाग्यात अपेक्षित आहेत. उत्तम संदर्भ, लिंका आणि व्हीडीयो टाळत असलेल्या व्हीडीयो-बातम्यांचा मजकूर टंकून एकूण्च चर्चा अपेक्षित आहे. देशातून चिन्यांचे विविध कामांचे कंत्राट, वस्तूंच्या ऑर्डर्स रद्द होत आहेत एका दृष्टीने आता चिन्यांची कोंडी करण्याचा थोडाफार प्रयत्नही होतांना दिसत आहे.

आत्ताच एक जूनला ग्लोबल टाइम्समधे चीनच्या वतीने म्हटलं गेलं होतं की अमेरिका आणि आमच्या वादापासून भारताने दूर राहावे. चीन अमेरिकावादात भारताने फायदा उठवू नये. आणि दोन राष्ट्राच्या (चीन-अमेरिका) वादात भारत पडल्यास भारताला मोठी किंमत मोजावी लागेल असे म्हटले होते त्याच बरोबर भारतात सध्या चीन विरोधात आवाज उठविण्यात येत आहे, मोदी सरकारने देशात चीन विरोधात उठवला जाणारा आवाज कमी करण्याकडे लक्ष द्यायला हवे असे चीनने म्हटले होते. (बातमी- ग्लोबल टाइम्स आणि सकाळ )आणि म्हणून त्यांनी कालचं कृत्य केलं असावं का ?

''भारताला शांतता हवी आहे. पण याचा अर्थ भारत दुबळा आहे असा होत नाही. चीनचा मूळ स्वभाव हा विश्वासघातचा आहे. भारत बलवान आहे आणि दुबळा नाही. शत्रूचे डोळे काढून हातात देण्याची सरकारमध्ये क्षमता आहे'' असे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले त्यात चुकीचं काही नाही. चिन्यांच्या या कृत्याला आता आपण देश एकत्र होऊन चिन्यांंचा योग्य बंदोबस्त झालाच पाहिजे या मतावर येऊन ठेपलो आहोत.

मंडळी, कोमल यांच्या पहिल्या धाग्यातील प्रतिसाद लांबत गेले, दुसर्‍या पानावार जातांना प्रतिसाद लिहितांना अडचणी येत होत होत्या, सर्वाअर्थाने चीन्यांच्या कुरापती, आपले सीमा प्रश्न आणि त्यांच्या बंदोबस्तावर चर्चा व्हावी यासाठी हा धाग्याचा प्रपंच. आपण योग्य अशी माहितीची देवान-घेवाण व्यक्तीगत पातळीवर न जाता तटस्थपणे चर्चा कराल अशी अपेक्षा.


वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 89655 views

🗣 चर्चा (190)
M
mrcoolguynice Mon, 06/22/2020 - 05:56 नवीन
भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही वा लष्करी तळही ताब्यात घेतलेले नाहीत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं. “अशा प्रकारची वक्तव्यं करुन लोकांच्या भावनांशी खेळलं जात आहे. माझी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समर्थकांना असं करणं बंद करा अशी विनंती करायची आहे,” असं कमल हासन यांनी म्हटलं आहे. “प्रश्न विचारणं देशविरोधी होत नाही. आपल्या घटनेने प्रश्न विचारण्याचा हक्क दिला आहे आणि जोपर्यंत सत्य ऐकायला मिळत नाही आम्ही प्रश्न विचारत राहणार,” असं कमल हासन यांनी सांगितलं आहे. शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करताना नियंत्रण रेषेवर नेमकं काय झालं याबद्दल योग्य माहिती दिली नसल्याची टीका केली होती. “संपूर्ण माहिती देऊ शकत नाही हे समजू शकतो, पण विरोधकांना आणि देशवासियांना अशा संवेदनशील घटनांची योग्य माहिती दिली पाहिजे,” असं मत कमल हासन यांनी व्यक्त केलं आहे. लोकसत्ता ऑनलाइन | June 21, 2020 06:06 pm
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Mon, 06/22/2020 - 15:39 नवीन
आलय. उगा ह्सन काका काय म्हणताय आम्हाला काय ऐकवता?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 06/21/2020 - 14:03 नवीन
रोचक चर्चा
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Sun, 06/21/2020 - 14:22 नवीन
हा आदरणीय पंतप्रधान यांचा दावा आणि वाचाळ माहिती आणि प्रसारण मंत्री यांच्याकडून झालेला खुलासा माझ्यासाठी असा आहे: एकूण चिनी सैन्याची मुसंडी २६ चौरस किमी इतकी. नंतर २.५ किमी माघार. उरलेल्या प्रदेशाचे आक्रमित क्षेत्र चीनने आतापर्यंत बळकावलेल्या तुलनेत नगण्य. म्हणून चीनने भारतीय भूमीवर आक्रमण केले नाही. जाता जाता: तेव्हडं चीनने काँग्रेसच्या चीन धार्जिणी कारकिर्दीत लाटलेल्या प्रदेशाचे क्षेत्रफळ भारताच्या एकूण क्षेत्रफळापेक्षा कमी राहील एव्हडं बघा.
  • Log in or register to post comments
अ
अर्जुन Sun, 06/21/2020 - 16:38 नवीन
भारत आणि चीन दरम्यान पारंपरिक युद्धाची शक्यता सध्या तरी नाही. पण गलवान व्हॅली सारख्या छोट्या चकमकी सुरू राहतील, ज्यात बंदुकीची गोळी किंवा तोफेचा गोळा पण न सुटता दोन्ही बाजूने सैन्याचे बळी जातील. पण सध्या तरी भारत आणि चीन गोळी चालवून युद्धाला सुरवात करणार नाही. याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे, एकदा गोळी चालवून युद्धाचा भडका उडाला तर या युद्धाला लवकरच जागतिक स्वरूप प्राप्त होईल आणि ते भयानक असेल. जगातील कोणत्याही मोठ्या देशाला आपल्यामुळे युद्ध सुरू झाल्याचा ठपका आपल्यावर येऊ द्यायचा नाही. या परिस्थितीत अजून एक होऊ शकते की चीन स्वतः काही न करता सध्या आपल्या कडेवर घेतलेल्या नेपाळ कडून भारताची आगळीक काढू शकतो, किंवा चीन मागे आहे या भरवशावर नेपाळ पण काही वेडेपणा करू शकतो. याची छोटी झलक नेपाळने बिहारला लागून असलेल्या सीमेवर सितामढी येथे दाखवली होती. मात्र नेपाळने आपल्या सुरक्षा जवानांवर हल्ला केला किंवा चिथावणी दिली तर भारत सरकार समोर गंभीर संकट तयार होईल. लक्षात घ्या भारताने या वर कारवाई करायची नाही असे ठरवले तर विरोधी पक्ष आणि भारतीय जनता पण सरकारला सुखाने बसू देणार नाही आणि केली तर चीन या संघर्षात नेपाळची बाजू उचलण्याच्या बहाण्याने उडी मारेल आणि त्याला व्यापक युद्धाचे स्वरूप देईल. पुन्हा युद्धखोर म्हणून भारताचे नाव समोर करेल, या बाबतीत आपल्याच देशातील डावे पत्रकार पण चिनचीच भाषा बोलतील. तसेच हीमालयातील लढाईसाठी भारताला गूरखा रेजिंमेन्ट अत्यंत महत्वाची आहे. कारण त्या वातावरणात ते सहज व दीर्घकाळ टिकाव धरु शकतात. त्यामूळे भारताला संयम बाळगणे व नेपाळशी संबंध सूधारणे किंवा टिकवणे आवश्यक आहे. जरी चूकीचे वाटत असले तरी नेपाळला सध्या व्यापारात काही सवलती, आर्थिक मदत देऊन तो कूरापती काढणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. तसेही ओली जास्त दिवस सत्तेत राहतील असे वाटत नाही. त्यांचा आरोग्याचा आधीच तक्रारी आहेत. देशात विरोध वाढत चालला आहे. आपण निदान नेपाळचे लोकमत भारताच्या बाजूने राहील याकडे लक्ष द्यावे. त्या प्र माणे अ मे रिका, सौदी अरेबियाशी अ स लेले आप ले चां ग ले संबंध वाप रुन पा कि स्तान व र द बाव आ णावा, जो प र्यत आप ले र स्ते सी मा भागात बां धून त या र होत ना ही तो प र्य त यू द्ध टा ळावेच लागेल. हिवाळात चीनही यूध्दास तयार होणार नाही. त्यामूळे सध्या आपल्या संयमाची परीक्षा आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 06/21/2020 - 16:45 नवीन
खरंय. संयम फारच महत्वाचा. मग ते क्षेत्र कोणतेही असो.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 06/21/2020 - 20:52 नवीन
चीन हा साम्राज्यवादी देश आहे.त्याचा इतिहास च तसा आहे. मला वाटतं तिबेट हा स्वतंत्र देश निर्माण झाला असता तर चीन ची सीमा भारताला मिळालीच नसती. चीन ला शह द्यायचा असेल तर तिबेट हा स्वतंत्र देश निर्माण करण्यासाठी जोरदार मोहीम भारताने आखावी. त्या साठी शस्त्र,प्रशिक्षण देण्याची तयारी पण ठेवावी. तिबेटी तरुणांना पैसे, शस्त्र पुरुवून अतिर्की कारवाया करण्यास प्रोत्साहन देण्याची गरज आहे. चीन भारताशी युद्ध करणार नाही कारण चीन ची गुर्मी उतरवण्याची जगातील खूप राष्ट्र ची इच्छा आहे . युद्ध झाले तर अनेक देश भारताच्या बाजू नी उभे राहतील . भारताच्या अरुणाचल वर त्याचा डोळा आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sun, 06/21/2020 - 21:22 नवीन
१९६२ नंतर चे सर्वात कमि % डिफेन्स बजेट असतना आपले सैन्य कसे लढणार ? ते अत्यंत शूर वीर आहेत पण त्यांना पुरेसे बजेट द्यायला हवे , युद्ध सुरु झल्यावर ५०० कोटि जाहीर केले आहेत , हे आग लागल्यावर विहिर खणण्यासारखे आहे
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sun, 06/21/2020 - 21:27 नवीन
भारतचा स्वातंत्र्यानंतरचा तिबेट सहीत नकाशा कोणा़कडे उपलब्ध आहे का ? जालीय दुवा असेल तर इथे डकवावा
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 06/27/2020 - 05:17 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 06/21/2020 - 21:33 नवीन
शेजारी शेजारी जमीन असेल तर काही नालायक शेजारी आपल्या शेत जमिनीत आक्रमण करतात .त्यांना प्रेमाने समजावून काही फरक पडत नाही तुम्ही संयम ठेवला तर ते अजुन तुम्हाला त्रास देतात अडवणूक करतात ह्याचा अनुभव नेहमी आपल्याला येतो. जेव्हा भर चोकात त्याला फोडून काढत नाही तो पर्यंत तो त्रास देतच राहतो. तसेच देशांचे आहे जो पर्यंत तुम्ही आक्रमक भूमिका घेत नाही तो पर्यंत बाजूचा देश त्रास देतच राहणार. नेपाल सारख्या किरकोळ देश पण आपल्या विरोधी जातो ह्या आपले शांती प्रिय धोरण कारणीभूत आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 06/21/2020 - 22:16 नवीन
चीनच्या बाॅर्डरवरील रस्त्यांबद्दल उल्लेख आलेला आहे म्हणून बाॅर्डर रोड सारखेच बाॅर्डर रेल्वे बद्दलही इथेच लिहीतो. यांत जम्मु व काश्मीर,लडाख,पंजाब,हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, अरूणाचल व आसामचा समावेश १. श्रीनगर - कारगील - लेह ४३० किमी, २०२६ ला पूर्ण करणार. २. जम्मू - पूँच्छ २३४ किमी. २०२५ ला पूर्ण करणार. ३. पठाणकोट - लेह ७२८ किमी २०२३ ला पूर्ण करणार. ४.पट्टी - फिरोजपूर २५ किमी २०२२ ला पूर्ण करणार. डबललाईन (पाकिस्तानी बाॅर्डरला खेटून) मुंबई -जम्मू अंतर २६७ किमीने व मुंबई - अमृतसर अंतर २४० किमीने कमी होणार. फिरोजपुर - अमृतसर अंतर ३२ किमी कमी होणार. भारत पाकिस्तान युध्दातली ही सगळी नेहमीची युध्दभूमी आहे. ५. डेहराडून - उत्तरकाशी ९० किमी २०२६ ला पूर्ण करणार ६. उत्तरकाशी - यमुनोत्री ७. उत्तरकाशी - गंगोत्री ८. ऋषीकेश चामोली १६० किमी २०२६ ला पूर्ण करणार ९. जोशीमठ, बद्रीनाथ १०. सोनप्रयाग - केदारनाथ ११. तनकपूर - बागेश्वर १५५ किमी. २०२६ ला पूर्ण करणार ( नेपाळ व चीन सरहद्द) १२. तनकपूर - जौलिजबी १०७ किमी २०२७ ला पूर्ण करणार (नेपाळ व चीन सरहद्द) १३. जोधपूर - जैसलमेर २९२ किमी २०२३ ला पूर्ण करणार (पाकीस्तान सरहद्द) १४. जोधपूर फलसुद ११६ किमी २०२३ ला पूर्ण करणार (पाकीस्तान सरहद्द) १५. अनुपगढ - बिकानेर १५५ किमी २०२३ ला पूर्ण करणार (पाकिस्तान सीमा) १६. मिसामरी - तवांग ३७८ किमी २०२६ ला पूर्ण करणार १७. मुरकोगसेलाक - रूपाई २५६ किमी २०२६ ला पूर्ण करणार १८. उत्तर लखीमपूर - सिलापथर २४७ किमी २०२६ ला पूर्ण करणार
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 06/21/2020 - 22:17 नवीन
काही गावांच्या नावांचा उच्चार चुकीचा केला गेला असणे शक्य आहे.
  • Log in or register to post comments
फ
फुकनी Mon, 06/22/2020 - 06:09 नवीन
कृपया सोशल मिडीया वर भारताचे संरषण धोरणावर चचाॆ करू नका.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 06/22/2020 - 06:19 नवीन
आता हा प्रतिसाद नक्की कोणत्या माहितीबद्दल आहे ते कळेना. त्या माहितीच्या खालीच प्रतिसाद चिकटवला असता तर बरे झाले असते. पण हा प्रतिसाद जर बाॅर्डर रेल्वे बद्दल असेल, तर त्यात गोपनीय काहीही नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/22/2020 - 10:19 नवीन
नेपाळी पण सध्या लैच ट्याव ट्याव करू लागलय. चीन-नेपाळ संबंध पाहताआणि सध्या नेपाळ सरकारचं चीन प्रेम, त्यांचा नवा नकाशा हे सर्व पाहता यांनाही खुमखुमी येतेय. च्यायला, रात्री गल्लीत ड्यूटीला येणारे गुरखे, कपड़े विकायला येणारे नेपाळी यांना आवरावे लागते. आम्हाला उगा तान देऊ नका. आमचं डोकं सध्या खराब आहे. शिस्तीत राहा म्हणा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
केदार-मिसळपाव Mon, 06/22/2020 - 13:50 नवीन
ते आपले बंधू आहेत. राज्यकर्ते आणी नागरीक , आपण गफलत करता कामा नये.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Mon, 06/22/2020 - 15:42 नवीन
कि विचारायच, की बाबारे, चीन नं तर तुमचेही ४ ५ गावं घशात घातले, म्हाइताय का ;)
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 06/22/2020 - 12:15 नवीन
तैवानच्या हद्दीत विमाने घुसवून: "...Normalized sorties will let the Taiwan secessionists understand the power gap between the Chinese mainland and the island, as they will find themselves struggling to deal with frequent PLA operations, and the US cannot come to their rescue, the expert said....." ग्लोबल टाईम्स * ...Normalized sorties... * ...they will find themselves struggling to deal with frequent PLA operations * and the US cannot come to their rescue, भारतीय हद्दीत पुढे सरकण्याचे प्रयत्न करुन * '...India knows ‘it can’t have a war with China’..' *'"It is normal to see heated nationalism in India, but we don't need to worry whether nationalism will hijack the policymaking of India to further provoke China. When India is in conflict with Pakistan or other neighbors, nationalism might drive New Delhi to take actual operations, but when it comes to China, it is a different story,"...So they might say some harsh words, but they dare not take the first shot against us." - ग्लोबल टाईम्स आता चिनी भाषेतला फरक बघा According to the report, the US has 375,000 enlisted members of its Indo-Pacific Command, including 60 percent of its Navy ships, 55 percent of its Army and two-thirds of its Marine Corps. In addition, with 85,000 forward-deployed soldiers and a large amount of high-tech and new weaponry, the US military has maintained its absolute supremacy in the Asia-Pacific over the years, while also keeping to seek new deployments, budgets and resources using China's and Russia's military development as excuses. In 2020, the US took a series of measures to contain China, on topics including COVID-19, Hong Kong, Taiwan, high-tech and the military. Recently, US warships have repeatedly trespassed into Chinese territorial waters around the Xisha and Nansha islands, conducted operations in the South China Sea and crossed the Taiwan Straits. In a rare move, it has deployed three aircraft carriers to the region. Chinese military experts told the Global Times that China has expelled the trespassing US warships and conducted exercises to boost its combat capability, showing its will and capability to safeguard its sovereignty and territorial integrity. "...Both countries (चीन व युएसए) should keep communication channels open, implement the military confidence building and crisis prevention agreements and create conditions for communication and dialogues on nuclear security, cyberspace, outer space and artificial intelligence to manage their differences and prevent conflicts, the report suggests...." ग्लोबल टाईम्स तेच भारताबाबतचा बढाईखोरपणा "....Indian forces use weapons bought from different countries which many not coordinate with each other well, not to mention their undisciplined troops who can blow up their own submarine in a dockyard and shoot down a friendly helicopter, observers noted...." "...Indian economist Swaminathan Aiyar said in a Saturday report by Indian media outlet the Economic Times that the gap between China and India militarily and economically is five times bigger than it was in 1962. Attempting military adventures in that area is asking to be thrashed again and humiliated on a scale five times bigger than in 1962. In a potential self-defense counterattack, China will secure its own territory and not likely claim Indian territory after emerging victorious, but the battle will deeply hurt India so much that global position and economy would go backwards to decades ago, Chinese analysts said...." -ग्लोबल टाईम्स बेसिकली आमेरीका इंडोपॅसिफीक मध्ये दबाव कायम ठेवेल पण आमेरीकन जनमत कोणतेही युद्ध अंगावर घेण्याच्या मनस्थितीत नाही याची कल्पना, स्वतःची सुधारलेली आर्थीक व सामरीक स्थिती त्याच वेळी भारतासहीत इतरदेशांच्या अर्थव्यवस्था करोनाने हवालदिल झालेल्या असताना पुर्ण युद्ध अंगावर घ्यायचे नाही पण युद्ध न करता पुशकरुन जेवढे पदरात पाडून घेता येईल तेवढे पदरात पाडून घेणे असा सर्वसाधारण पवित्रा असावा. अर्थात चिनला भाषा कोणती समजते ती आमेरीकेसारख्या बलाढ्य देशाच्या बलाढ्य आरमाराची
  • Log in or register to post comments
क
केदार-मिसळपाव Mon, 06/22/2020 - 13:12 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 06/22/2020 - 17:54 नवीन
१६ जून २०२० पासून चीनवर एक मोठीच आफत ओढवलेली आहे. २०१६ साली युरोपिय संघाने चीनविरूध्द दावा दाखल केला होता. संघाचे असे म्हणणे होते की, चीन त्यांच्या उत्पादकांना खूप मोठ्या प्रमाणात अनुदान देतो. त्यामुळे युरोपियन संघामधे किंमत पाडून माल विकणे चीनला जमते. त्यामुळे इथले उद्योग बंद पडत आहेत. बेरोजगारी वाढतीय. उद्योग बंद पडल्यावर चिन किंमती वाढवायला सुरवात करतो हेही तोपर्यंत लक्षात आलेले होते. खरेतर हे आरोप चीनवर गेली दोन दशके होत आहेत. पण योग्य व अधिकृत उपाय सापडत नव्हता. अमेरिकापण याच मुद्यावर भर देत होती. पण ट्रंप यांनी हाच मुद्दा यावेळेस जास्त लावून धरला. पण अमेरिकेची गोष्टच वेगळी आहे. ती जागतिक व्यापार संघटनेकडे दावे लावणे वगैरे करत बसली नाही. तिने थेट आयात कर लावायला सुरवात केली व जागतिक व्यापार संघटनेला दम भरला की, संघटनेने चीनवर योग्य कारवाई केली नाही तर अमेरिका जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर पडेल!!! अर्थात ट्रंपला आकस्त्राळे, स्वार्थी वगैरे विशेषणे देऊन चीन मात्र सर्व नैतीक बाबींचे पालन करणारा असं रंगवायला काहींनी कमी केले नाही. लोकांनाही त्यात चुकीचे वाटले नाही, की शंका आली नाही, कारण अमेरिकेचा इतिहास सगळ्यांनाच माहित्येय. आता चीन सरकार अनुदान देते हे सिध्द करता येत नाही हाच खरा प्राॅब्लेम आहे. कारण चीनमध्ये जाऊन आपण माहिती गोळा करू शकत नाही. उलट चीनी लोक इतर देशात मुक्तपणे फिरून पुरावे गोळा करू शकतात. यावर उपाय म्हणून एक नवीनच शक्कल लढवली गेली. जो देश मुक्त व्यापाराचे नियम पाळतो, अशा कोणत्यातरी तिसऱ्याच देशातील उत्पादन खर्चाशी चिनच्या उत्पादन खर्चाची तुलना करायची व त्यानुसार चीन सरकार अनुदान देते आहे हे सिध्द करणे. चीन युरोपिअन युनियनमधे अल्युमिनीयम व पोलाद इतक्या स्वस्तात विकत होते, की तिथले कारखाने बंद पडले. टाटांचा मोठा गाजावाजा झालेला, युरोपातील स्टील उद्योग विकत घेण्याचा प्रयत्नपण यामुळेच तोट्यात गेला होता. भारताचीही हीच अडचण आहे. भारत आपल्या उत्पादकांना मदत देऊ शकत नाही. मदत दिली तर चीन ती आरामात सिध्द करू शकतो. पण हेच चिनने केले तर मात्र आपण ते सिध्द करूच शकत नाही. त्यांच्या देशात जाऊन आपण माहिती मिळवणे सोडाच, आपण कुठे जायचे, रहावयाचे, कोणाला भेटायचे हे सगळे चीनचे सरकारच जणू काही ठरवते. आपल्या मनानुसार कुठेही जाऊन कोणालाही भेटता येत नाही. खरे तर अशा प्रकारच्या परिस्थितीत चीनला समान पातळीवर व्यवहार करणारा देश अशी मान्यता देणे हीच मोठी घोडचूक होती. पण चीनने आपली माणसे आंतराराष्ट्रीय संघटनांमधे पेरून ठेवली होती. त्यामुळे दाद मागणेही अवघड होऊन बसले होते. TheBL ने तर जाहीर करून टाकले आहे की, “अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की सीसीपीने यूएन आणि जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आंतर-अमेरिकन विकास बँक यासारख्या जगातील प्रमुख वित्तीय संस्थांसह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये घुसखोरी केली आहे.” तर सांगायचा मुद्दा असा की, चीन त्याच्या अनैतीक खेळींमुळे यशस्वी होत होता. चीनचे कौतूक भारतातलेपण करायला लागले होते. पण अनैतीक पध्दतीने चीन भारतीय बाजार ताब्यात घेत आहे, त्यामुळे भारतातील रोजंदारीवर परिणाम होत आहे वगैरेकडे कोणी भारतीय गांभिर्याने पहात नव्हता की बोलत नव्हता. कोणि बोलला तर त्याची टिंगल टवाळी होणार हे जणू काही ठरूनच गेले होते. भारत चीनला तोंड देऊच शकत नाही हा सिध्दांत पक्का करण्याचीच स्पर्धा चाललेली होती. याबाबतीत आपले समर्थक भारतात तयार करणे, ह्या चिनच्या कार्याला दाद द्यायला हवी. अर्थात आंतरराष्ट्रीय समुदायात चीन घुसखोरी करत असेल तर भारतात आपले हस्तक तयार करणे चीनला खूपच सोपे गेले असेल. भारतात असे कितीतरी लोक आहेत की, जे देशभक्त असून, निव्वळ हस्तकांच्या अपप्रचाराला बळी पडून चीनची बाजू घेत असतात. प्रत्यक्षात जर चीनला व्यापारात अनैतिक मार्ग अनुसरायला बंदी केली तर भारत चीनला आरामात टक्कर देऊ शकतो, ही वस्तूस्थिती आहे. ही भारताची क्षमता इतर देशही मान्य करताहेत. विश्वास टाकायला तयार होताहेत. भांडवल गुंतवायला तयार होताहेत. तंत्रज्ञान द्यायलाही तयार व्हायला लागलेत. चीनला भारत पर्याय होऊ शकतो हे मान्य केल्याचीच खरेतर ही लक्षणे आहेत. पण स्वत: भारतीयच भारताची खरी किंमत जोखू शकत नसतील तर काय उपयोग? तर सांगायचा मुद्दा असा की, हे सगळे १६ जून २०२० ला संपलेले आहे. २०१९ मधे जागतीक व्यापार संघटनेने अनुचीत प्रथांबद्दल चीनला जबाबदार धरलेले आहे. फक्त तो निर्णय अंतीम नव्हता तर अंतरिम होता. १५ जून २०२० पर्यंत त्यावर आपली बाजू मांडायची चीनला संधी होती. पण चीनने ती संधी घेतली नाही. त्यामुळे चीन सरकार उत्पादकांना अनुदान देते हा अंतरिम निर्णय आपोआप अंतीम झालेला आहे. चीनची फार मोठी कोंडी झालेली आहे. चीनच्या मालावर अँन्टी डंपिंग ड्युटी लावायला आता जगभर सुरवात होऊ शकते. चीनच्या वस्तुंचा उत्पादन खर्च काढायची नवीन पध्दत मंजूर झाली आहे. भारतही आता हे शस्त्र वापरू शकतो. म्हणजे भारत वापरत होताच. पण आता त्यात जोर येऊ शकेल. चीनचा कांगाव्याकडे गांभिर्याने अथवा पक्षपाती पध्दतीने लक्ष देणे आता सोपे जाणार नाही. भारतीय उत्पादकांच्या कच्च्या मालाच्या खरेदीच्या किमतीत, चीन भारतात तयार वस्तू कशा विकू शकतो याचे फारसे आश्चर्य भारतीयांना आता वाटणार नाही. त्यासाठी चीन म्हणजे कोणीतरी फारच भारी प्रकार आहे, किंवा त्यांचे बिझीनेस माॅडेल अफलातून आहे अशा प्रकारचे ढगात मारलेले बाण परिणामकारक होणार नाहीत. भारतीयांची अशी समजूत करून देण्यात आलीय की, कोरोना प्रकरणामुळे चीनने जगाचा विश्वास गमावला. प्रत्यक्षात वस्तुस्थिती उलटी आहे. चीनवरचा अविश्वास गेले दोन दशके वाढतच आहे. २०१६ पासून तर तो खूपच वेगाने वाढलाय. “कोरोना” ही उंटाच्या पाठीवर लादलेल्या सामानावरची शेवटची काडी आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 06/22/2020 - 18:42 नवीन
....चीन त्यांच्या उत्पादकांना खूप मोठ्या प्रमाणात अनुदान देतो. त्यामुळे युरोपियन संघामधे किंमत पाडून माल विकणे चीनला जमते. त्यामुळे इथले उद्योग बंद पडत आहेत. बेरोजगारी वाढतीय. उद्योग बंद पडल्यावर चिन किंमती वाढवायला सुरवात करतो हेही तोपर्यंत लक्षात आलेले होते....
मी हे परदेशात असताना चिनी लोकांना मार्केट सर्वे करताना जवळून बघीतले. बाजारातील प्रत्येक उपलब्ध वस्तू, बाजारातील वस्तुंचे किरकोळ व्यापारी मुल्य ते व्यापार्‍यांना अपेक्षीत कमिशनचे दर यांचा अत्यंत पद्धतशीर अभ्यास करून त्यापेक्षा आकर्षक किमतीत चीन उत्पादन उपलब्ध करते. आपण म्हणता तसे स्थानिक उत्पादन बंद पडले की किमती वाढवणे शक्य होत असावे. पर्यावरण व कामगार कायदे विषयक अटी कमी ठेवल्यामुळे युरोमेरीकन गुंतवणूकदार कंपन्या खुश होत्या त्यांनी चीनमध्ये गुंतवणूक केल्यामुळे तेरीभी चुप मेरी भी चुप चालू असावे. व्याजाचे दर कमी ठेवणे हे बँक सरकारी असेल तर अश्यक्य नसते. युरोमेरीकन पैसावापरून त्यांनाच कर्जात टाकण्यात चीनला बर्‍यापैकी यश आले.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 06/22/2020 - 18:47 नवीन
The Great Game in the Buddhist Himalayas: India and China’s Quest for ... By Phunchok Stobdan तिबेटन आणि चिनी राजकारणावरच्या इतिहासाची एक बाजू दर्शवू इच्छित हे एक रोचक पुस्तक वाचनात आले, -अर्थात भारतीय अधिकृत भूमिका यातील सर्वच बाजूंचे समर्थन करेल असे नक्की सांगता येणार नाही पण जिज्ञासूंनी अवश्य वाचावे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 06/22/2020 - 19:07 नवीन
गूगल बुक्सवर पूर्ण पुस्तक वाचता येईलच असे नाही, या वृत्तांकनात आढावा आला आहे. पुस्तक जरा चिनी अध्यक्षाची बाजूस मदत करणारे ठरु शकते हे, त्यामुळे सर्व मुद्यांशि सहमत होणे कठीण असावे, लक्षात घेऊनच वाचले पाहीजे.
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Mon, 06/22/2020 - 18:53 नवीन
चर्चा छान चाललीये. शेखर गुप्ता (यूट्यूब चॅनेल "The Print ") हे दररोज एक "cut the clutter " नावाचे एपिसोड करतात. ते राजकारण, करोना, अमेरिका, चीन बरोबर चाललेला वाद या सगळ्या बद्दल चांगली माहिती देतात, त्यांच्या कडचे रिपोर्टर्स सुद्धा वेग वेगळ्या विषयांवर अभ्यास करून माहिती देतात (असं वाटतं तरी).
  • Log in or register to post comments
श
शकु गोवेकर Mon, 06/22/2020 - 20:28 नवीन
महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री यांनी तळेगाव पुने जवळ ग्रेट वॉल मार्ट या चिनी कंपनीला १५००० कोटी रुपयांची गुंतवणूक परवानगी दिली आहे कारण एकच असावे आपला चीन भाऊ चांगला होवो व भारतात येवो हि कालची बातमी
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 06/23/2020 - 18:44 नवीन
गलवान खोऱ्यातील चकमकी नंतर चिनी कंपनी ग्रेट वॉल मोटर्स आणि इतर दोन कंपन्यांच्या गुंतवणुकीवर स्थागिती देण्यात आलेली आहे. - उद्योगमंत्री सुभाष देसाई https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/maha-freezes-3-chinese-projects-worth-rs-5000cr/articleshow/76500474.cms
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Tue, 06/23/2020 - 06:36 नवीन
‘चीनच्या तुष्टीकरणाचे भारताचे धोरण विस्कळीत’ अशा शीर्षकाचा लेख ‘जपान टाइम्स’ने प्रसिद्ध केला आहे. त्यात नवी दिल्लीतील ‘सेंटर फॉर पॉलिसी रीसर्च’मधील प्रा. ब्रह्मा चेलानी यांनी, गलवानमधील चीनचे कथित ‘अनपेक्षित’ डावपेच हे अनपेक्षित नसावेत, असे निरीक्षण नोंदवले आहे. मोदींना चीनच्या आकस्मिक हल्ल्यांचा अनुभव नाही. चीनचे मन वळवून आपण पुन्हा द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करू आणि त्याच्या पाकिस्तानशी असलेल्या संबंधात बाधा आणू, अशी त्यांची भाबडी समजूत असावी. परंतु सद्य:परिस्थितीबाबत त्यांनी स्वत:लाच दोष दिला पाहिजे. धोरणांचे अतिवैयक्तिकरण आणि रणनीतीतील हटवादी भाबडेपणा यामुळे राजनैतिकदृष्टय़ा कुशल-कणखर नेता म्हणून नव्हे, तर ब्रिटनचे माजी पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचा ‘भारतीय अवतार’ म्हणून मोदींनी स्वत:ला सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. ते त्यांच्या चुकांमधून शिकत नाहीत आणि चीनबाबतचे धोरण बदलत नाहीत तोपर्यंत भारतीय नागरिक आणि प्रादेशिक सार्वभौमत्वाला किंमत मोजावी लागेल, असा इशाराही प्रा. चेलानी यांनी दिला आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 06/23/2020 - 06:45 नवीन
एकच नंबर.. कसला सॉल्लिड मारलाय!!
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Tue, 06/23/2020 - 07:40 नवीन
बरोबरे .. आता खरं ५६ इंच छातीच्या निधडेपणाची गरज आहे. दरम्यान ... पाकिस्तानी वृत्तपत्रे काय चुना लावतायेत पहा ...
पाकिस्तानातील ‘डॉन’ने भारत-चीन तणावाबद्दलच्या अग्रलेखातही काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. शेजाऱ्यांशी दादागिरी करून आपण या प्रदेशात सर्वश्रेष्ठ आहोत, असे दर्शवण्याचा भारताचा आजपर्यंतचा इतिहास आहे. पाकिस्तान सात दशकांपासून भारताची चिथावणी सहन करीत आहे. पाकिस्तानशी वैमनस्य वाढवून अन्य छोटय़ा देशांना दबावाखाली आणण्याचा भारताचा कदाचित प्रयत्न असेल. परंतु भारत-चीनमध्ये आर्थिक आणि लष्करीबाबतीत फारशी तुलना होऊ शकत नाही. म्हणून भारताने या आघाडीवर अतिसावधगिरीने पावले टाकावीत, असा अनाहूत सल्ला ‘डॉन’ने दिला आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 06/23/2020 - 07:38 नवीन
चीनचे मन वळवून आपण पुन्हा द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करू आणि त्याच्या पाकिस्तानशी असलेल्या संबंधात बाधा आणू, अशी त्यांची (मोदींची) भाबडी समजूत असावी
. देव करो, आणि २०२२ ला रस्ते पूर्ण होईपर्यंत, प्रा. ब्रह्मा चेलानी व चीन ह्याच गोड गैरसमजात राहो हीच इच्छा. मी फक्त सरकारच्या सीमेलगत रस्ते बांधणी शिथील होत नाहीये ना? इकडेत लक्ष पुरवणार. :)
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 06/24/2020 - 09:16 नवीन
तुम्ही तिथे लक्ष ठेवुन आहात म्हणून आम्ही पुण्यात शांत झोपू शक्तो . धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 06/23/2020 - 07:48 नवीन
आज दैनिकं वाचून काढल्यावर निदर्शनास आले की, चीन सीमेवर तणाव असून भारताने लडाख पासून सीमेवर सैन्य तैनाती आणि लष्करी हालचाली वाढविल्या आहेत, चीननेही सीमेवर तसेच केले आहे. एकीकडे सीमेवर तणावर तर दुसरीकडे चर्चेच्या फेर्‍या सुरु आहेत. आणि ''भारतही चर्चेसाठी तयार असून चीनने घुसखोरी मागे घ्यावी ही भारताची अट आहे'' यातून चीनने घुसखोरी केली आहे हे नक्की आहे. अशावेळी पंतप्रधान चीनने घुसखोरी केली नाही असे का म्हणत आहेत माहिती नाही. असो. तो धाग्याचा विषय नाही. रशियाच्या मध्यस्थीतीमुळे व्हर्च्युअल कॉन्फरन्स होणार आहे, अशाही बातम्या आहेत. दुसरी बातमी अशी की चीनने त्यांच्या एका कमांडरसह सोळा चीनी सैन्य मेले असल्याची कबूली दिली आहे. आपल्याकडे भारतात आपण जीतके चीनबद्दल सीमावादावर चर्चा करतो किंवा जितके पेटून उठतो तितकी चर्चा चीनमधे जाणीवपूर्वक केली जात नाही असे दिसते. राज्यकर्त्ये त्यांचं काम करतील नागरिकांनी त्यांचं काम करीत राहावे असे किंवा जाणीवपूर्वक चीन तेथील जनतेला अशा घडामोडींपासून दूर ठेवते. माध्यमांवरही बंदी आणून ते विषय दूर ठेवते. आपली प्रसारमाध्यमे म्हणत आहेत की चीनला बाजारपेठेची भिती वाटत असल्यामुळे तो नमला आहे, यात मला काही तथ्य वाटत नाही. चीनची भारतात गुंतवणूक असली तरी जगभर चीन्यांच्या गुंतवणूकीचा सुळसुळाट झाला आहे, त्यामुळे तो नमला असे काही वाटत नाही. दुसरं असं की चीन सीमेवर जी काही शस्त्रसंबंदीचा करार होता त्यात आता सैनिकांना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्याचे अधिकार दिले आहेत आणि त्यामुळे दुसर्‍या बाजूने चीनही आता गोळीबाराला प्रत्युत्तरास तयार आहे असे म्हटले आहे. इतक्या दिवस पाकड्यांच्या बाजूने सतत विनाकारण गोळीबार चालू असतो तसे आता चीन्यांच्या बाजूनेही सुरु राहील असे वाटते. काहीही घडामोडी होवोत, चिन्यांनी घुसखोरी केली असेल तर त्यांना परत फिरायला मजबूर केलं पाहिजे आणि आपण आपल्या भाग मिळविला पाहिजे तरच आपण आपला दबदबा निर्माण करु. नाही तर,अक्साइ चीनच्या वेळी तेव्हाच्या पंतप्रधानांनी काढलेल्या ” एक घास का तिनकाही नही उगता” अशा बेफ़िकीरीच्या या उद्गारावर मंत्रीमंडळातील महावीर त्यागी यांनी ”पंडित जी, आपके सिर पर भी बाल नहीं उगते, वह भी बंजर ही है, तो क्या उसे भी चीन को भेंट कर देंगे? काढलेले उद्गार सर्वांना माहिती आहे. इतिहासातल्या काही मोठ्या चुका आहेतच, पण आता वर्तमानात पुढे जाऊ. बाकी, आता तशी परिस्थिती नाही. ”घुसखोरी झाली नाही” असे म्हणायचे आणि चीनी सैन्याने आपल्या काही भूभाग बळकून टाकावा, असे होऊ नये असे एक भारतीय म्हणून वाट्ते. आम्हाला आमच्या भूमीचा एक इंचही भाग गमवायचा नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 06/23/2020 - 07:58 नवीन
. ”घुसखोरी झाली नाही” असे म्हणायचे आणि चीनी सैन्याने आपल्या काही भूभाग बळकून टाकावा, असे होऊ नये असे एक भारतीय म्हणून वाट्ते. आम्हाला आमच्या भूमीचा एक इंचही भाग गमवायचा नाही. नाही नाही, असे काही होणार नाही. आपल्यातलेच काहीजण डोळ्यात तेल घालून लक्ष पुरवत आहेत. ;)
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 06/23/2020 - 08:03 नवीन
:)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 06/23/2020 - 18:34 नवीन
:-)))
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Tue, 06/23/2020 - 12:07 नवीन
''भारतही चर्चेसाठी तयार असून चीनने घुसखोरी मागे घ्यावी ही भारताची अट आहे'' यातून चीनने घुसखोरी केली आहे हे नक्की आहे.<<<<<<<<<<< शेखर गुप्तांच्या cut the cutter बघून मला मिळालेली माहिती अशी कि १) फिंगर ४ च्या आपल्या कडील बाजू पर्यंत आपला ताबा आहे तर फिंगर ४ च्या चीन कडील बाजूला चीन चा ताबा आहे २) आपला दावा आसा आहे कि फिंगर ८ पर्यंत चा प्रदेश हा भारतीय आहे तर चीन चा दावा फिंगर २पर्यंत आहे. ३) पण फिंगर ३ जवळ आपला एक लहानसा सैनिकी base आहे तर फिंगर ४ जवळ एक आणखीन एक निरीक्षण चौकी आहे . मग आत्ता भारत आणि चीन मध्येवाद ह्या प्रदेशात का चालू झाला? ४) तर चीन ने फिंगर ४ कडील त्यांच्या कडील त्यांच्या बाजुला म्हणजेच P -१४ पॉईंट जवळ १-५ मे दरम्यान एक सैनिकी चौकी उभारली आहे , भारताची भूमिका अशी आहे कि चीन ने status quo बदलला आहे आणि त्यालाच भारताचा विरोध आहे, आणि ह्या चौकी जवळच १६ तारखेची चकमक झालेली आहे ५) म्हणजे आपला दावा जरी फिंगर ८ पर्यंत असला तरी आपला प्रत्यक्ष ताबा हा फिंगर ४पर्यंतच आहे तरी पण चीनने फिंगर ४जवळ चौकी उभारून जैसे थे स्थिती मध्ये बदल केला आहे ६) आणखीन महत्वाची बाब म्हणजे चीनने उभारलेली चौकी हि आपल्या फिंगर ३ आणि ४च्या चौक्या पेक्षा उंचावर आहे म्हणजेच उद्या समजा चकमक झालीच तर चीन ला उंचीचा थोडा फायदाच होणार आहे त्यामुळेच भारताची मागणी अशी आहे कि एप्रिल मध्ये जशी परिस्तिथी आहे तशीच ठेवा म्हणजेच फिंगर ४ च्या चीन च्या बाजू कडील सैनिकी चौकी ला आपला विरोध आहे पण जस वरती लिहिल्या प्रमाणे आपला प्रत्यक्ष ताबा हा फिंगर ४पर्यंतच आहे तर चीन चा ताबा हि फिंगर ४पर्यंतच आहे म्हणूनच भारताची मागणी हि जैसे थे परिस्तिथी ठेवा अशी आहे आणि पंतप्रधानांनी भारताच्या भूमीवर आक्रमण झाले नाही आहे म्हटले असावे कारण ज्या भूमी वर प्रत्यक्ष ताबाच नाही तर घुसकोरी झाली असं म्हणण्यात काही अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 06/23/2020 - 12:41 नवीन
“वर्षांनुवर्षानुसार पडलेले पायंडे आणि त्याची कोणीतरी केलेले उल्लंघन” यापलिकडे काहीही नाही. पण चीनला ती नवीन चौकी फायद्याची वाटत असणार. ती टिकवायची असेल, तर प्रथम अव्वाच्या सव्वा दावे करायचे. मग ते सोडून द्यायचे बतावणी करायची. मग त्याबदल्यात चौकी राहू दे म्हणायचे. “बळी तो काळ पिळी” यापध्दतीने हे सगळे चाललंय. मला तर शेतावरचे बांध हळूच पुढे ठकलायची पध्दतच आठवतीय. :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 06/23/2020 - 13:12 नवीन
चीनची घुसखोरी कुठे कुठे ? चीनने जवळ जवळ पाच ठिकाणी अशी एलएसीवर अशी घुसखोरी केली आहे, करत असतो. सध्या ज्यात प्रामुख्याने चर्चा आहे गलवान खोरे, पॅगॉग त्सोवर, वर एक प्रतिसादात उल्लेख केला आहे त्यात पॅगॉग त्सोवरनदीच्या काठावर आपला बेस कँप हा फिंगर चारवर आहे आणि चीनचा बेस कँप हा फिंगर आठच्या नंतर किंवा खाली आहे. आपण बोटीने फिंगर आठपर्यंत पेट्रोलिंग करतो तर चीन जमीनीमार्गे पाचच्या पुढे येऊन ठेपला आहे आणि इथेच वाद आहे. आपण म्हणता तसे ते आपल्या फिंगर पाच पर्यंत एलएसी मानत असतील तर ते आपल्या हद्दीत आलेच नाही, आणि त्यांची हद्द ही फिंगर पाचपर्यंत आहे असे म्हणायचे असेल तर मग मुद्देच संपले. (चित्र पाहा) फिंगर क्षेत्रातल्या पॉइंटवरच एकमत होत नसल्यामुळे अजूनही सहमती झाली नाही, केवळ माहितीस्तव. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 06/23/2020 - 13:37 नवीन
आंतरराष्ट्रीय मुद्द्यांच्या मांडणीत प्रत्येक शब्द जपून वापरावा लागतो, (ट्रंप प्रमाणे महासत्तेचे सत्ताधिश असाल तर जरासा वेळपाहुन कानाडोळा करणे छोट्या सत्तांना भाग पडते) भाजपाई (तसे एकुणच भारतीय) आंतरराष्ट्रीय मुद्द्यांच्या नेमक्या शब्द योजनात क्च्चे पडतात ह्या बद्दल मी एक मिपा लेखही लिहिला. शत्रुपक्ष आपल्या सिमेत आलाच कसा मग तुम्ही कडक प्रत्त्युत्तर का नाही दिले यावरुन विरोधीपक्ष कोंडीत पकडतील त्या कोंडीतून सुटण्यासाठी मोदी बहुधा बोलून मोकळे झाले. एकदा राजा बोलला की मंत्रीगणाला सांभाळून घेण्या शिवाय भाग नसतो अशी भाजपाची गत झाली हे खरे आहे. इतर देशियांशी कळणार असेल असे बोलणार असाल तर एस. जयशंकर यांच्या मुलाखती ऐकुन त्यांच्या वाक्य रचनांचा वापर करत बोलावे किंवा प्रराष्ट्र सचिवांना आधी बोलू द्यावे मग आपण बोलावे हे श्रेयस्कर असावे. खरे म्हणजे हे केवळ नेत्यांनीच नाही सर्वसामान्यांनीही केले पाहीजे समाज माध्यमांच्या काळात प्रत्येक व्यक्ती प्रचारतंत्राचा भाग आहे किंवा टार्गेट तरी आहे, दुसर्‍या देशातील व्यक्तींना प्रत्युत्तरे नेमकी काय द्यायची हे (स्थानिक पक्षीय राजकारणापलिकडे जाऊन) माहित हवे कारण उद्याचे नेते आपल्यातूनच पुढे जाणार असतात.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 06/23/2020 - 13:11 नवीन
शेतावरचे बांध संधीसाधूपणे पुढे ढकलणे + बळी तो कानपिळी + दुसर्‍याला त्रास देऊन स्वतःच आरडाओरडा करणे प्रसंगी दम भरणे अगदी, चीनची निती अशीच आहे.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Wed, 06/24/2020 - 07:18 नवीन
एक बातमी ...
गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षानंतर एबीपी-सी व्होटरनं एक सर्व्हे केला. ज्यात चीन सीमा व मोदी सरकारविषयी प्रश्न विचारण्यात आले. या सर्व्हेमध्ये मोदी सरकारनं चीनला चोख प्रत्युत्तर दिलं का या प्रश्नावर ६० टक्के लोकांनी नकार दर्शवला आहे.
. त्यामुळे कदाचित, आता पुढच्या भारतीय लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या की , तर पाकिस्तानला , "चिन्यांचे तेल पाकिस्तानवर निघेल अशी भीती वाटेल".
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 06/24/2020 - 11:45 नवीन
राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणामधे ७०% अधिक नागरिकांनी देशाच्या सुरक्षेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. “आयएएनएस” व “सी-व्होटर“ याच्याकडून हे सर्वेक्षण करण्यात आले. “पंतप्रधान मोदी चीनसोबतची तणावाची स्थिती हाताळण्यास सक्षम आहेत“ असे मत नागरिकांनी व्यक्त केले. महाराष्ट्र टाईम्स २४ जून २०२० :) पेपरातल्या बातमी देत चर्चा करायचा मला खूप कंटाळा आहे. कारण त्यामधे मिडियावाले लोकांना खूप वापरून घेतात. काही अभ्यास करून मते मांडण्यांऐवजी आयते तयार मटेरिअलवर अवलंबून राहून चर्चा व्हायला लागते व तीच सवय लागते. त्यामुळेच इथेच थांबणार आहे. पण बातमीतला सोयीस्कर भाग तेवढा देऊन मेसेज टाकायला मात्र मी तुम्हाला प्रोत्साहनच देईन. :)
  • Log in or register to post comments
व
विनोद१८ Wed, 06/24/2020 - 23:22 नवीन
...देताना तुम्हाला खुप काही आनंद झाला काय, प्रतिक्रिया आणि त्याखालची ओळ वाचुन तसेच वाटले. मुळात विचारलेला प्रश्न चुकीचाच आहे 'मोदी सरकारने चीनला चोख उत्तर दिले का' असा बुद्धीभ्रम निर्माण करणारा न प्रश्न विचारता 'भारतीय सैन्याने चीनी सैन्याला चोख उत्तर दिले का' असा हवा होता ?? असा चुकिचा प्रश्न विचारुन त्याचे उत्तर प्रसिद्ध करुन भारतीय जनमानसाचे व भारतीय सैन्याचे मनोधैय प्रचंड उंचावले काय ? ह्या बातमीत म्हटल्याप्रमाणे हा सर्व्हे कधी कुठे झाला, त्याचा Sample Size किती ? हा सर्व्हे घेणार्‍या "एबीपी-सी व्होटर"ची विश्वासार्हता काय ?? त्यानी ज्या ज्या लोकाना याबद्दल प्रश्न विचारले त्या त्या लोकाना तिकडची Ground Reality / खरी वस्तुस्थिती कितपत् माहित होती, ते ६० टक्के लोक नक्की कोण होते ?? 'मोदी सरकारनं चीनला चोख प्रत्युत्तर दिलं नाही' या त्यान्च्या आणि तुमच्या समजाला वस्तुनिस्ठ आधार काय ?? याचा अर्थ असा ध्वनित होतो की भारतिय सैन्य फक्त आणि फक्त मार खाऊन आणि २० जणांचे बलिदान देऊन परत आले. त्यामुळे कदाचित, आता पुढच्या भारतीय लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या की , तर पाकिस्तानला , "चिन्यांचे तेल पाकिस्तानवर निघेल अशी भीती वाटेल". असे लिहुन तुम्ही नक्की कोणता Message वाचकाना देत अहात ?? तुम्हाला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट्पणे लिहा आडवळणाने नको.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice गुरुवार, 06/25/2020 - 06:15 नवीन
त्यामुळे कदाचित, आता पुढच्या भारतीय लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या की , तर पाकिस्तानला , "चिन्यांचे तेल पाकिस्तानवर निघेल अशी भीती वाटेल".
असे लिहुन तुम्ही नक्की कोणता Message वाचकाना देत अहात ?? तुम्हाला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट्पणे लिहा आडवळणाने नको.
ते तुम्ही सुरेंदर मोदींना विचारा. एक म्हण : "वड्याचे तेल वांग्यावर काढणे"
  • Log in or register to post comments
व
विनोद१८ गुरुवार, 06/25/2020 - 21:34 नवीन
वांगे सडके असेल तर वड्याचे तेल नक्कीच पडेल यात शंका नाहीच, मी विचारलेल्या प्रश्नांवर बोला. तुमचा अजेन्डा पुढे रेटु नका, हे मिसळपाव आहे मोदीविरोधकांचे व्यासपीठ किंवा चेपु नाही याचे भान असावे. 'भारतिय सैन्याने जवळ जवळ ३५ ते ४० चीनी लाल माकडे मारली ( याचेसुद्धा काहीना अतीव दुखः झाले असे एकुन दिसते ) हे सोयिस्करपणे विसरुन भारतीय सैन्य मार खाउन हात बांधुन परत माघारी आले' असा त्या सर्व्हेमध्ये विचारलेल्या प्रश्नाचा रोख आहे हे तर सरळ सरळ दिसते आहे. इतका अपमान अणि अविश्वास आपल्याच सैन्यावर अप्रत्यक्षपणे दाखविण्याचा प्रयत्न करणे आणि त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण होईल असा प्रयत्न करणे याला काय म्हणायचे ?? हे कधीच सहन केले जाणार नाही. यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे ते लिहा अवांतर नको. ते तुम्ही सुरेंदर मोदींना विचारा. हे कोण सुरेंदर मोदी ?? सरळ सरळ नाव घ्यायला कशाला घाबरता, आपल्या घटनेने तसा अधिकारच दिला आहे ना तेव्हा बिन्धास्तपणे त्यांचे नाव घ्या. मला वैयक्तिक त्यांना काही विचारायचे नाही, मला तशी गरज नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/24/2020 - 07:56 नवीन
चीन नरमला, तणाव निवळला अशा बातम्यात तथ्य नाही. सरकार अगा जे घडलेच नाही म्हणते. असे असले तरी घुसलेले चीनी सैन्य या क्षणापर्यन्त परत फिरलेले नाही. एएलसीवर पलिकडून काही पॉइंटवर दोनहजार सैन्य येऊन आहे. गलवानखो-यातील पेट्रोलिंग पॉइंट १४,१५, गोगराच्या पेट्रोलिंग पॉइंट १७ ए, हॉटस्र्पिंग फिंगर चार, पॅनगॉंग त्सो सरोवर वरील फिंगर ५ ते ८ या सर्व पॉइंटवरच्या घुसखोरी (संदर्भ-बातम्या) माघारी यावर अजुनही एकमत झालेलं नाही. गलवान खो-यातून जो रस्ता पुढे ओल्डीतळावर जातो, त्या रस्त्याच्या उंच शिखरावर चीन्यांनी पेट्रोलिंग पॉइंट केला आहे, वरच्या बाजूने भारतीय हालचालींवर चिन्यांना मारा करायला अथवा लक्ष ठेवायला सोपे आहे म्हणून तेथून चिन्यांनी मागे सरकावे ही आपली मागणी आहे. अधिक गोष्टी समजून घेण्यासाठी हा यूट्यूबवरचा व्हीडीयो बघावा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 06/24/2020 - 13:29 नवीन
पंतप्रधान म्हणतात घुसखोरीच झाली नाही. तर मग चकमक का व कशी झाली ? संरक्षण खात्याकडून काय अधिकृत माहिती दिली गेली आहे कुणी लिंक देवू शकेल का ?
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 06/25/2020 - 03:30 नवीन
जिथे चकमक झाली तिथे चीन ने रात्रीतून कॅम्पस उभे केलेत. बंकर्ससारखे पर्मनंट स्ट्रक्चर उभे केलेत. गलवान नदीचा प्रवाहच बदलला! रिंईफोर्स बरच झालंय. भारतीय रणगाडे तिकडे लडाखमध्ये पोचलेत. डीओबी, देसपांग आदी ठिकाणी सैन्याची जमवाजमव चीन करत आहे. सोक्षमोक्ष लावावा लागणार अस वाटायला लागलाय. चर्चा व्यर्थ होत आहेत!!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/25/2020 - 08:28 नवीन
चीनने चर्चेच्या नावाखाली ''गलवान खोरे'' आमचेच असून आमच्याच भूभागात भारतीय सैन्याने प्रवेश केल्याच्या बोंबा मारायला सुरुवात केली आहे. म्हणूनच माजी पंतप्रधान म्हणाले होते की विद्यमान पंतप्रधानांनी जवाबदारीने बोलायला हवे होते. ”आमच्याकडे घुसखोरी झालीच नाही” हाच आधार चीनने पकडला आहे. कोण बरोबर कोण चूक पुन्हा राजकीय आखाडा सुरु होईल तुर्तास तोही मुद्दा बाजूला ठेवू. वादग्रस्त स्थानावरुन दोन्ही सैनिकांनी माघार घ्यावी यावर सहमती झाली असे दाखवूनही चीन्यांनी पक्कं बांधकाम गलवान खो-यात सुरु केल्याचे दिसते. भारताकडे युद्धनिती आणि संबंधित प्रश्न कसा हाताळावा याची ठरविणारी फौज असेलही पण आता चीन्यांना आक्रमक पद्धतीने बॅकफूटवर जावं लागेल अशी कृती सरकारकडून भारतीयांना अपेक्षित आहे. एकीकडे गलवान खो-यावर चर्चा करायची, आणि तिथे पक्के बांधकाम करायचे त्याचवेळी ओल्डीबग हे एअरबेस आहे त्या अक्साइनचीन सीमेवर चीन्यांनी आपलं सैन्य संख्या वाढवली आहे. भारताच्या परराष्ट्रखात्यातील पूर्व आशिया विभागाचे सहसचिव नवीन श्रीवास्तव व चीन्यांचे परराष्ट्र महासंचालक वू जियांघाव यांच्याबरोबरच्या चर्चेत तरी चीन्यांनी गलवान आमचंच आहे असे म्हटले आहे. एकून परिस्थिती पाहता एवढ्यात परिस्थिती निवळणार नाही असे दिसते. चिन्यांना योग्य धडा देण्याची यापेक्षा दुसरी कोणती उत्तम वेळ असू शकत नाही असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 22 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 23 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 23 hours ago
  • सुंदर !!
    1 day 23 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 23 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा