Coronaचे साईड इफेक्ट्स
असंघटित कामगारक्षेत्र हा भारतातील खरा मागास वर्ग आहे . मी स्वतः अभियांत्रिकी आणि बांधकाम उद्योगात काम केलेले असल्याने स्वानुभवाने सांगू शकतो की खरोखर या लोकांना कोणीच वाली नाही . Contract Employment चे युग सुरू झाल्यापासून अक्षरश: कंत्राटदाराच्या मर्जीवर या लोकांचे जीवन अवलंबून असतें . कोणत्याही कंपनीत चतुर्थ आणि तृतीय श्रेणी कामगार वर्ग हा Backbone असतो . Welders, Electricians, Fitters, Technicians ,Helpers आणि अशी अनेक अन्य कामे करणारे हे लोक खऱ्या अर्थाने मशिन्स सुरू ठेवण्यासाठी अखंड कार्यरत असतात , पण त्याचवेळी हेच कर्मचारी सर्वाधिक दुर्लक्षित देखील असतात . कंपनी जर त्यांच्यासाठी 15000/- रुपये वेतन निश्चित करत असेल तर कंत्राटदार फक्त जेमतेम 8000/ ते 10000/- रुपये हातावर टेकवतात . त्यात राहणे खाणे याची व्यवस्था कामगारांनी स्वतः च करायची . मग मोठमोठ्या कंपन्यांच्या जवळ अगदी हलाखीच्या परिस्थितीत भाड्याने किंवा झोपड्या बांधून हे लोक राहतात . फॅमिली आणणे परवडत नाही मग ग्रुपने जेवण करून पोटाची खळगी भरत असतात ...
आज करोना मुळे स्थलांतर करणाऱ्या migrant workers मध्ये हे लोक बहुसंख्य असणार ... आधीच तुटपुंज्या उत्पन्नावर जगणारे आणि हातावर पोट असणारे हे लोक पुढे काय करणार हा गहन प्रश्न असणार आहे कारण गावाकडे कुटुंब देखील यांच्यावरच अवलंबून असणार ..गावाकडे असलीच तर थोडीफार शेती आणि जमीन यांच्या आधारे भविष्याची आस लावून हजारो किलोमीटर चालत जाण्यासाठी निघालेले हे लोक पाहून खूप वाईट वाटतंय ...
आपण एकविसाव्या शतकात वैज्ञानिक प्रगती आणि औद्योगिक प्रगती , प्रगत इकॉनॉमी च्या ज्या गप्पा मारत होतो त्या विरून गेल्यात ... उरले आहे भयाण वास्तव ... !!
''उत्तम चर्चा झाली आहे. चर्चेचा रोख पाहता आता धागा वाचनमात्र करणे आवश्यक . सर्व सदस्यांचे सहकार्याबद्दल मन:पूर्वक आभार''
संपादक मंडळ
🗣 चर्चा
(211)
P
Prajakta२१
Tue, 05/19/2020 - 19:31
नवीन
चांगली चर्चा चालू आहे दोन्ही बाजूंची मते समसमान वाटत आहेत पण भारतासारख्या देशात लॉक डाऊनला पर्याय नाही असेच वाटते
फक्त लॉक डाऊन करताना थोडे नियोजन आवश्यक
कालच ठरलेल्या वेळेत दूध घेतले कुठे किराणा मिळतोय का ते बघायला दुसऱ्या बाजूला गेले तर त्या रोड वर पिकनिक असल्यासारखे लोक हातात पिशव्या घेऊन हिंडत होते कारण ५-६ दिवस सगळी दुकाने बंद होती त्यांचा पण इतका दोष नाही म्हणता येणार तरी लोक मास्क वापरात होते म्हणून जरा हुश्श करून चालले होते तर बाजूच्याच एका बिल्डिंग मध्ये घरात बसलेल्या एका माणसाने इतक्या जोरात थुंकीची पिचकारी टाकली कि मी फ्रीझच झाले (थोडी बाजूला होती पण जवळच )त्याच्याकडे रागाने बघितले तर तो विजयि मुद्रेने माझ्याकडे बघत होता निर्लज्जासारखा .लिहिताना पण किळस वाटतीये पण जाऊदे )
ह्या प्रसंगावरून भारतात लॉक डाऊनचीच गरज आहे फक्त
तसेच किराणा ,मेडिकल मध्ये कधी कधी वस्तूंची देवाणघेवाण करताना नोटांना थुंकी लावण्याचे प्रकार (हे बँकेत पण घडतात आजकाल कमी झालेत ),खोकताना,शिंकताना हात न ठेवणे हीच जिथे स्टॅंडर्ड प्रॅक्टिस आहे त्या देशात लॉक डाऊन ला पर्याय नाही असेच खेदाने म्हणावेसे वाटते
देशातील लोक बदलणार नसतील तर लॉक डाऊन हाच पर्याय राहतो
सध्या लॉक डाऊन जिथे शिथिल होतेय तिथे लगेच पुढच्या दिवसात रुग्ण सापडत आहेत त्यामुळे परत तिथे लॉक डाऊन अशी परिस्थिती आहे
स
संजय क्षीरसागर
Tue, 05/19/2020 - 19:44
नवीन
> फक्त लॉक डाऊन करताना थोडे नियोजन आवश्यक होते
हाच तर मुद्दाये !
म
मराठी कथालेखक
Tue, 05/19/2020 - 19:57
नवीन
हरकत नाही.. पण
१) लॉक डाऊन किती काळ किंवा कोणत्या निकषांची पुर्तता होईपर्यंत चालू ठेवायचे हे स्पष्ट असायला हवे. हे निकष काहीही असू शकते पण ते स्पष्टपणे मांडायला हवे. (उदा एकूण कोरोना रुग्ण वा दिवसाला सापडणारे नवीन रुग्ण वा अमूक इतक्या लोकांची टेस्टिंग , अमूक इतके हॉस्पिटल्स वा इतर मेडिकल सुविधा तयार होणे, किंवा यातल्या वेगवेगळ्या गोष्टींचं गुणोत्तरही असू शकतं) आणि मग ह्य निकषांची पुर्तता होईपर्यंत लॉकडाऊन चालू ठेवायची सरकारची नक्की तयारी आहे का ? मग भले तीन , चार वा सहा महिने लागोत. .. आणि लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर कोरोनाचा धोका नाहीसा वा अगदी नगण्य असेल याची शाश्वती सरकार देवू शकेल का ? नाहीतर अर्थव्यवस्थेचे तूप गेले आणि कोरोनावर मात करण्याचे तेलही गेले अशी स्थिती व्हायची (तूप म्हणजे फक्त म्हणीपुरतं.. सध्याची अर्थव्यवस्था 'तूप' म्हणण्यासारखी नक्कीच नव्हती.. पण ते असो). लॉकडाउनने कोरोनाचा धोका केवळ काहीसा लांबणीवर पडणार असेल आणि ते ही मोठी किंमत चुकवून तर मग असे लॉकडाउन खरेच योग्य का ?
२) लॉक डाऊन काळात जर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने काही भागात बंद राहणार असतील (तुम्ही वरच्या प्रतिसादात लिहिलं आहे की ५-६ दिवस दुकानं बंद होती) तर पर्यायी आणि प्रभावी वितरण व्यवस्था असायला हवी. 'मिळेल ते खा' अशी भूमिका प्रशासनाने घेणे अयोग्य आहे.
३) गरीब कामगार, व्यावसायिक ज्यांचे उत्पन्न बंद झाले आहे त्यांच्या उदरनिर्वाहाची योग्य व्यवस्था आणि प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी. लक्षात घ्या की हे लोक गरीब आहेत पण भिकारी नाहीत, लॉकडऊनपुर्वी हे लोक आत्मनिर्भरच होते. लॉकडाऊनने त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतले आहे.
आणखीही मुद्दे असू शकतील पण काही मुद्दे आता मांडलेत.
स
सुबोध खरे
Tue, 05/19/2020 - 19:58
नवीन
अशा तुरळक केसेस सर्वत्र होतात परंतु 1980 ते 90 च्या दशकात रोज 500 ते 1000 बालकांना होणाऱ्या पोलिओ ची आता भारतात एकही केस नाही हे कोणत्या स्वच्छतेमुळे झालं?
Until early 1990s India was hyperendemic for polio, with an average of 500 to 1000 children getting paralysed daily
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3734678/

Tue, 05/19/2020 - 20:05
नवीन
कोणत्या पक्षाच्या सरकारने आम्ही लॉक डाऊन करणार नाही असे सांगितले आहे?
सर्व पक्षीय सरकारे लॉकडाऊन पाळत आहेतच ना आणि केरळ आणि गोवा या राज्यांमध्ये रुग्ण संख्या केवळ लॉक डाऊन मुळे आटोक्यात आली आहे असे असताना केवळ श्री मोदींवर टीका करण्यासाठी वाटेल ते आरोप करताना राज्य शकट कसे चालते याची निदान किमान माहिती तरी मिळवायला हवी होती.
आराम खुर्चीत बसून यंव करायला हवं होतं त्यांव करायला हवं होतं म्हणून भाषणे देणारे लोक आता लॉक डाऊन मधून बाहेर कसं पडायचं याचा सज्जड प्लॅन आम्हाला सांगा म्हणून मागणी करतात हे पाहून त्यांची कीव करावीशी वाटते.
स्वतः फक्त उंटावरून शेळ्या हाकत टीका करत आहेत.
ज्यांना हा प्लॅन पाहिजे त्यांनी तो स्वतः शोधा.

जालावर सगळं उपलब्ध आहे.

च
चौकस२१२
Wed, 05/20/2020 - 02:38
नवीन
डॉक्टर साहेब आपण अगदी अचूक निदान केलात या मनोवृत्तीचा.. पण काय लोकशाही आहे ना त्यामुळे तुमचं या विधानावर एक तर लोक तुटून पडणार किंवा भलतेच tangent काही तरी बोलणार
ह्यानं ना चीन सारखी एकाधकाऱषीः किंवा गेला बाजार निदान सिंगापुर सारखी खमके सरकार पाहिजे मग बसतील "भरलेल्या" बांबूचे फटके
आ
आयर्नमॅन
Tue, 05/19/2020 - 22:39
नवीन
मोदींजींबाबतच्या तुमच्या मताशी मला सहमत व्हावेत लागेल कारण तुम्ही Avenger's चे तुमचे वर्षन इथे सांगत आहात ज्यात आऊट ऑफ 14 मिलियन 506 शक्यतांमधून नेमकं एकदाच आपण मोदींजींना अचूकपणे दोषी सिद्ध केलेत. आपल्या कौशल्याला सलाम.
ग
गामा पैलवान
Tue, 05/19/2020 - 23:58
नवीन
खरे डॉक्टर,
स्कार्लेट फीव्हर नावाचा एक आजार आठवला. त्यावर लस विकसित केली होती. मात्र ही लस फारशी गुणकारी नव्हती. तरीपण हा आजार अपोआप नामशेष झाला (किंवा आटोक्यात आला म्हणू. चूभूदेघे). हल्ली यावर प्रतिजैविके वापरतात असं ऐकून आहे.
पोलियोचं तसंच झालं नसेल हे कशावरून? प्रभावी लशीच्या दाव्यास काही सांख्यिकीय आधार आहे का?
आ.न.,
-गा.पै.
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5