Coronaचे साईड इफेक्ट्स
असंघटित कामगारक्षेत्र हा भारतातील खरा मागास वर्ग आहे . मी स्वतः अभियांत्रिकी आणि बांधकाम उद्योगात काम केलेले असल्याने स्वानुभवाने सांगू शकतो की खरोखर या लोकांना कोणीच वाली नाही . Contract Employment चे युग सुरू झाल्यापासून अक्षरश: कंत्राटदाराच्या मर्जीवर या लोकांचे जीवन अवलंबून असतें . कोणत्याही कंपनीत चतुर्थ आणि तृतीय श्रेणी कामगार वर्ग हा Backbone असतो . Welders, Electricians, Fitters, Technicians ,Helpers आणि अशी अनेक अन्य कामे करणारे हे लोक खऱ्या अर्थाने मशिन्स सुरू ठेवण्यासाठी अखंड कार्यरत असतात , पण त्याचवेळी हेच कर्मचारी सर्वाधिक दुर्लक्षित देखील असतात . कंपनी जर त्यांच्यासाठी 15000/- रुपये वेतन निश्चित करत असेल तर कंत्राटदार फक्त जेमतेम 8000/ ते 10000/- रुपये हातावर टेकवतात . त्यात राहणे खाणे याची व्यवस्था कामगारांनी स्वतः च करायची . मग मोठमोठ्या कंपन्यांच्या जवळ अगदी हलाखीच्या परिस्थितीत भाड्याने किंवा झोपड्या बांधून हे लोक राहतात . फॅमिली आणणे परवडत नाही मग ग्रुपने जेवण करून पोटाची खळगी भरत असतात ...
आज करोना मुळे स्थलांतर करणाऱ्या migrant workers मध्ये हे लोक बहुसंख्य असणार ... आधीच तुटपुंज्या उत्पन्नावर जगणारे आणि हातावर पोट असणारे हे लोक पुढे काय करणार हा गहन प्रश्न असणार आहे कारण गावाकडे कुटुंब देखील यांच्यावरच अवलंबून असणार ..गावाकडे असलीच तर थोडीफार शेती आणि जमीन यांच्या आधारे भविष्याची आस लावून हजारो किलोमीटर चालत जाण्यासाठी निघालेले हे लोक पाहून खूप वाईट वाटतंय ...
आपण एकविसाव्या शतकात वैज्ञानिक प्रगती आणि औद्योगिक प्रगती , प्रगत इकॉनॉमी च्या ज्या गप्पा मारत होतो त्या विरून गेल्यात ... उरले आहे भयाण वास्तव ... !!
''उत्तम चर्चा झाली आहे. चर्चेचा रोख पाहता आता धागा वाचनमात्र करणे आवश्यक . सर्व सदस्यांचे सहकार्याबद्दल मन:पूर्वक आभार''
संपादक मंडळ
आली संक्षींची प्युबीक रिंग
किती लोकांना ३ दिवसात घरी पाठवत आलं असतं? गाडीच्या स्लीपरच्या एका डब्यात ८ प्रवासी जातील असे ९ कप्पे असतात ( ७२ प्रवासी) या ऐवजी प्रत्येक कप्प्यात २० प्रवासी ( सीट वर ४+४ बर्थ वर ४+४ आणि बाजूच्या सीट आणि बर्थ बावर २ + २ म्हणजे एकूण १८० प्रवासी. शिवाय मधल्या जागेत १०० प्रवासी म्हणजे एका डब्यात ७२ ऐवजी २८० प्रवासी( साधारण चौपट) प्रवास करत आहेत हे गृहीत धरा.असे २३ डबे (अर्धा गार्डचा अन अर्धा ब्रेक व्हॅनचा सोडून द्या)म्हणजे एक गाडीत ६४४० प्रवासी जातील त्यात अधिक लटकत जाणारे ६०० वाढवा म्हणजे ७००० प्रवासी झाले. आता मुंबई सी एस टी हुन २२ मार्च ला दर १० मिनिटांनी एक गाडी सोडली असे गृहीत धरल्यास एक दिवसात १४४ गाड्या सोडता येतील. म्हणजेच एक दिवसात १० लाख प्रवासी गेले. म्हणजेच एकंदर तीन दिवसात ३० लाख प्रवासी जाऊ शकतील.कोट्यवधी प्रवासी कसे जाणार हो?
बरं मुंबई ते लखनौ हा प्रवास कमीत कमी २४ तास आहेच. त्याच्या पुढे गोरखपूर दरभंगा कटिहार पूर्णिया पाटणा भागलपूर येथे जायला अजून कमीत कमी १२ तास लागतात. त्यातून अख्ख्या गाडीत ७००० पैकी फक्त एक कोव्हीड चा रुग्ण असेल आणि तो गर्दी झालेल्या डब्यात २८० पैकी फक्त २० लोंकाना संसर्ग करेल एवढे गृहीत धरले तरी २८८० रुग्ण २४ तासात लखनौला पोहोचतील. म्हणजेच काही न करता तीन दिवसात लखनौ मध्ये ८७०० कोविडचे रुग्ण या प्रत्येक रेल्वे गाडीला लागणारे २ लोको पायलट एक गार्ड असंख्य इतर कर्मचारी त्या गाडयांना घाट चढवण्यासाठी लागणारी बँकर इंजिने त्यांचे लोको पायलट हे सर्व दर १५ मिनिटाने कर्जत लोणावळा किंवा कसारा इगतपुरी इ मध्ये यांची सोय करावी लागेल. या कर्मचाऱ्यांना आपल्या डिव्हिजन मधून परत आणण्यासाठी गाड्या उलट्या आणाव्या लागतील. म्हणजे मुंबई तुन पुण्याला पोचलेले लोको पायलट गार्ड तिकीट तपासनीस खानपान व्यवस्थेचे कर्मचारी इ. हि सगळी जगड्व्याळ प्रणाली संक्षी म्हणाले म्हणून एका रात्रीत इकडची तिकडे होईल का? पुढे हे १० लाख प्रवासी लखनौहून पुढे कसे जाणार? चालत? एका बस मध्ये १०० प्रवासी कोंबले तरी १००० बस मध्ये १ लाख प्रवासी जातील. त्यात परत कोव्हिडचा रुग्ण असला तर सगळे १०० जण लटकतील. तसेच दहा हजार बसेस केवळ मुंबईतून लखनौ साठी सोडणे हि अतिशयोक्ती होईल. ते काही बसने २४ तासात पोचणार नाहीत. पण एकदा मोदीद्वेषाचा चष्मा कळवलं कि दुसरा काही दिसेनासं होतं आणि सारासार विचार बंद होतो. बरं हे नजरचूकीने झालं असं ही म्हणता येत नाही. कारण तोच प्रतिसाद तीन तीन वेळेस येतो आहे. म्हणजे द्वेषाची पातळी किती खाली गेली आहे ते पाहून घ्या. इतका टोकाचा द्वेष प्रकृतीला बरा नाही. कारण ज्याचा द्वेष करता आहात त्याला शष्प फरक पडत नाही. (त्याच्या पर्यंत ते पोचतच नाही) तुम्ही उगाचच आपला रक्त तापवून घेता.