Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

Coronaचे साईड इफेक्ट्स

म
मंदार कात्रे
Tue, 05/12/2020 - 08:29
🗣 211 प्रतिसाद
असंघटित कामगारक्षेत्र हा भारतातील खरा मागास वर्ग आहे . मी स्वतः अभियांत्रिकी आणि बांधकाम उद्योगात काम केलेले असल्याने स्वानुभवाने सांगू शकतो की खरोखर या लोकांना कोणीच वाली नाही . Contract Employment चे युग सुरू झाल्यापासून अक्षरश: कंत्राटदाराच्या मर्जीवर या लोकांचे जीवन अवलंबून असतें . कोणत्याही कंपनीत चतुर्थ आणि तृतीय श्रेणी कामगार वर्ग हा Backbone असतो . Welders, Electricians, Fitters, Technicians ,Helpers आणि अशी अनेक अन्य कामे करणारे हे लोक खऱ्या अर्थाने मशिन्स सुरू ठेवण्यासाठी अखंड कार्यरत असतात , पण त्याचवेळी हेच कर्मचारी सर्वाधिक दुर्लक्षित देखील असतात . कंपनी जर त्यांच्यासाठी 15000/- रुपये वेतन निश्चित करत असेल तर कंत्राटदार फक्त जेमतेम 8000/ ते 10000/- रुपये हातावर टेकवतात . त्यात राहणे खाणे याची व्यवस्था कामगारांनी स्वतः च करायची . मग मोठमोठ्या कंपन्यांच्या जवळ अगदी हलाखीच्या परिस्थितीत भाड्याने किंवा झोपड्या बांधून हे लोक राहतात . फॅमिली आणणे परवडत नाही मग ग्रुपने जेवण करून पोटाची खळगी भरत असतात ... आज करोना मुळे स्थलांतर करणाऱ्या migrant workers मध्ये हे लोक बहुसंख्य असणार ... आधीच तुटपुंज्या उत्पन्नावर जगणारे आणि हातावर पोट असणारे हे लोक पुढे काय करणार हा गहन प्रश्न असणार आहे कारण गावाकडे कुटुंब देखील यांच्यावरच अवलंबून असणार ..गावाकडे असलीच तर थोडीफार शेती आणि जमीन यांच्या आधारे भविष्याची आस लावून हजारो किलोमीटर चालत जाण्यासाठी निघालेले हे लोक पाहून खूप वाईट वाटतंय ... आपण एकविसाव्या शतकात वैज्ञानिक प्रगती आणि औद्योगिक प्रगती , प्रगत इकॉनॉमी च्या ज्या गप्पा मारत होतो त्या विरून गेल्यात ... उरले आहे भयाण वास्तव ... !! ''उत्तम चर्चा झाली आहे. चर्चेचा रोख पाहता आता धागा वाचनमात्र करणे आवश्यक . सर्व सदस्यांचे सहकार्याबद्दल मन:पूर्वक आभार'' संपादक मंडळ

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • 102980 views

🗣 चर्चा (211)
P
Prajakta२१ Sat, 05/16/2020 - 17:08 नवीन
आपल्या मार्गदर्शनाबद्दल खूप धन्यवाद खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
P
Prajakta२१ Sat, 05/16/2020 - 17:09 नवीन
आपल्या मार्गदर्शनाबद्दल खूप धन्यवाद खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
न
नेत्रेश गुरुवार, 05/14/2020 - 23:07 नवीन
> "सुरक्षित अंतराची धडधाकट माणसाला जरुरी नाही." प्रॉब्लेम असा आहे की धडधाकट माणुस हा कॅरीयर असु शकतो, व तो हा विषाणु शेकडो माणसांपर्यंत पसरउ शकतो. असा कॅरीयर सहजा सहजी ओळखु येत नसल्यामुळे सर्वांनीच सुरक्षित अंतर पाळण्याची गरज निर्माण झाली आहे. अमेरीकेत सुरवातीपासुन सोशल डीस्टंसींग कंपल्सरी नसल्यामुळे आहे ८५ हजार लोक करोना होउन मेले आहेत. (यात ईतर कारणांमुळे मेलेल्या लोकांचा सामावेश नाही). अजुनही इकडे सोशल डीस्टंसींग न पाळणार्‍याला काही शिक्षा वगैरे नाही, त्या मुळे हा आकडा वाढतच जाणार. सप्टेंबर पर्यंत ईकडे साधारण दीड ते दोन लाख लोक करोनाने मरायची शक्यता आहे. त्यामानाने भारतात बरीच चांगली परीस्थिती दीसते.
च
चौकस२१२ Fri, 05/15/2020 - 13:37 नवीन
नेत्रेश.. सहम्त
य
यश राज Fri, 05/15/2020 - 15:33 नवीन
नेत्रेश सहमत ... सो.डि महत्वाचे आहेच. आदयावत सुविधा आणि कमी लोकसंख्या असुनही इकडे ईंग्लंडात ज्या तर्हेने कोरोना फैलावलाय त्या द्रुष्टीने भारतात सरकारने खुप अगोदर काळजी घ्यायला सुरुवात केली. विचार करा जर भारताने लॉकडाऊन उशीरा जाहीर केला असता तर सध्या जी लोकं सरकारच्या नावाने आता ठणाठणा करत आहेत त्याच लोकांनी परत सरकारला उशीरा लॉकडाऊन जाहीर करण्याबद्द्ल शिव्या घालायला कमी जास्त केले नसते.
ग
गामा पैलवान Fri, 05/15/2020 - 14:09 नवीन
नेत्रेश, ते ८५००० करोनामुळे मेलेले आहेत हे कशावरून? ते करोना अंगात असतांना मेले आहेत. करोनामुळेच मेलेत हे कोणी ठरवलं? उगीच कोणीही मेला तर तो करोनामुळे असे छाप मारले गेले आहेत. या मृत्यूंत करोनाचं योगदान नगण्य आहे. आ.न., -गा.पै.
न
नेत्रेश Sat, 05/16/2020 - 03:42 नवीन
ते मेलेले सर्वच्या सर्व करोना पॉझिटीव्ह होते. मी काही डॉक्टर नाही, पण मला समजलेले ईथे मांडतो: प्रत्येक माणुस वेगळा, त्याची प्रतिकारशक्ती वेगळी, शरीराची बाह्य गोष्टींना प्रतीकार करण्याची पद्धत वेगळी - त्यामुळे एखाद्याला काही गोष्टींची अ‍ॅलर्जी असते, काहींना नसते. करोनाला प्रत्येकाचे शरीर थोडा वेगळा प्रतिसाद देते. साधारण ५०% लोकांना फारसा त्रास होत नाही, ४०% लोकांना जाणवण्या ईतपत त्रास होतो, पण १०% लोकांना टोकाचा त्रास होतो. त्यांचे शरीर खुप ऑव्हर रीआक्ट करते. आणी शरीराची प्रतिकारशक्तीच शरीरातील पेशींचा नाश करते. अशा प्रकारामुळे हॉस्पिटलमध्ये मेलेले लोक ओळखणे सहज शक्य आहे. आणी ते मृत्यु करोनामुळे झाले असे गणले जाते. करोनामुळे मेलेल्या लोकांमध्ये बाकी काही त्रास नसलेल्या निरोगी व्यक्ती, बालके, आणी व्याधीग्रस्त असे सर्व लोक येतात. करोना होउन विशेष त्रास न होता बरे झालेल्या बालकांमध्ये नंतर दुसर्‍या प्रकारचे (आधी न आढळलेले) रोगही दीसु लागले आहेत. त्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे सर्वांच्या सुरक्षेसाठी करोनाला दुर ठेवणे चांगले - अगदी आपले स्वतःचे शरीर करोनाला सहज हरऊ शकेल असा आत्मविश्वास असला तरीही! टिपः अत्ताचा अमेरीकेतला करोनाने झालेल्या मृत्युचा आकडा 88,507 असुन जगभरात 3,08,610 लोक करोनाने मेले आहेत.
च
चौकटराजा Sat, 05/16/2020 - 06:12 नवीन
पण १०% लोकांना टोकाचा त्रास होतो. त्यांचे शरीर खुप ऑव्हर रीआक्ट करते. आणी शरीराची प्रतिकारशक्तीच शरीरातील पेशींचा नाश करते. आटो इम्युनिटी व बाह्य लागण या दोन्ही गोष्टी माझ्या वाचनानुसार एकमेकाशी सम्बन्धित नाहीत. अक्वायर्ड व कॉन्स्टीटुशनल असे आघाताचे दोन प्रकार असतात असे मी वाचलेय .तुम्ही हे विधान कसे केले ? त्याचा एखादा सन्दर्भ दिला तर बरे होईल. एरवी मिपावर चे डॉ मन्डळी यावर अधिक प्रकाश टाकू शकतीलच !
न
नेत्रेश Sat, 05/16/2020 - 08:55 नवीन
https://www.bbc.com/news/health-51214864 थोडे स्क्रोल डाउन करा - Severe disease If the disease progresses it will be due to the immune system overreacting to the virus. Those chemical signals to the rest of the body cause inflammation, but this needs to be delicately balanced. Too much inflammation can cause collateral damage throughout the body. "The virus is triggering an imbalance in the immune response, there's too much inflammation, how it is doing this we don't know," said Dr Nathalie MacDermott, from King's College London.
न
नेत्रेश Sat, 05/16/2020 - 09:50 नवीन
आमचा डॉक्टर म्हणतो की तु लो रीस्क आहे, कदाचित करोना झाला तरी फार त्रास होणार नाही. पण तो पसरवण्याला नक्की हातभार लावशील. तेव्हा गप्प घरी बस.
च
चौकटराजा Sat, 05/16/2020 - 10:58 नवीन
धन्यवाद ! बघतो वाचून !
च
चौकस२१२ Sat, 05/16/2020 - 08:02 नवीन
ओहोहो ट्रम्प तात्या नंतर असले शोध लावणारे आपणच
च
चौकस२१२ Sat, 05/16/2020 - 09:48 नवीन
माझे वरील विधान जी लोक "या मृत्यूंत करोनाचं योगदान नगण्य आहे" अशी उचलली जीभ लावली टाळ्याला करीत आहेत त्यानं उद्देशून होते . नेत्रेश यांनी उद्देशून नाही ( खुलासा )
ग
गामा पैलवान Fri, 05/15/2020 - 14:47 नवीन
लोकहो, मोदींची बिल गेट्स सोबत चर्चा : https://www.loksatta.com/desh-videsh-news/pm-narendra-modi-video-conference-with-microsoft-co-founder-bill-gates-coronavirus-jud-87-2162326/ चर्चा करायला बिल गेट्स काय थोर माणूस लागून गेलाय? हा फ्लंकी इसम आहे. पोलीयोच्या लशीकरणाच्या कार्यक्रमातनं अनुचित प्रभावाच्या शंकेपायी याच्या विश्वस्तनिधीस बाहेर काढलेलं ना मोदी सरकारने? मग आता नेमकी काय जादू झाली की मोदींना याच्याशी परत चर्चा करावीशी वाटते? गेट्स फाऊंडेशनचे व्यवहार भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. हा करोनाचा भारतावर झालेला एक महाभयंकर साईड इफेक्ट आहे. आ.न., -गा.पै.
स
सुबोध खरे Fri, 05/15/2020 - 15:25 नवीन
हि १५ एप्रिलची स्थिती होती. https://www.thehindu.com/news/national/coronavirus-without-lockdown-india-would-have-seen-over-8-lakh-cases-by-april-15-says-health-ministry/article31319364.ece Where India stands (१ मे) India has a population of 1.3 billion and a death rate of about 7 per thousand per year, as of 2019. This means that each day, on average, about 26,000 people die in India. As of last week, roughly 60 people a day are believed to be dying of Covid-19. Unless this number is off by two orders of magnitude, the new virus has not yet significantly altered mortality in India. Indeed, during the lockdown, net mortality appears to have gone down due to the decline in accidents. https://theprint.in/opinion/can-india-risk-a-controlled-epidemic-after-lockdown-ends/412030/ retrospectively every one is wise and right
स
स्मिता. Fri, 05/15/2020 - 17:31 नवीन
संचारबंदी आणि टाळेबंदीमुळे अनेकांचे दैनंदिन व्यवहार, रोजगार बंद पडले आहेत. हातावर पोट असणार्‍यांना हालाखीचे दिवस आले आहेत. हे पाहून हळहळ वाटतेच. काही देशांत सरकारतर्फे मासिक पगाराच्या ८०% भत्ता मिळतोय तसं त्यांनाही मिळावं असं एक वाटतं पण लगेच जाणीव होते की सरकारने मदत दिली तरी आपल्याकडचे 'बाबू' लोकच त्यांच्या घशात घालतील. गरीब बिचारा भुकेलाच राहील. हे सगळं खरं असलं तरी सुस्थितीतल्या मध्यमवर्गीय आणि घरून काम चालू असणार्‍या लोकांना घरात अडकून रहायला लागल्याने ते वैतागले आहेत. दर आठवड्याला कुटुंब/मित्रमैत्रिणींसोबत भेटणे, फिरणे बंद झाल्याने लोक उदास झाले आहेत. तसेच संचारबंदी कधी संपणार या बद्दलच्या अनिश्चिततेमुळे त्यांचे मन भरकटलेले आहे. शिवाय प्रसारमाध्यमांनी घातलेली करोनाची 'अतिरिक्त' भीती आहेच. या सगळ्याचा परिणाम म्हणून लोकांना सगळंच थोतांड वाटायला लागलंय आणि हा त्रागा समजण्यासारखा आहे. थोडा जरी भारताबाहेरच्या आणि नेहमी म्हणावल्या जाणार्‍या 'विकसित' देशातल्या घडामोडींचा आढावा घेतला तरी लक्षात येईल की करोना आणि त्याच्या अनुशंगाने आलेल्या संचारबंदीने गांजलेला भारत हा एकमेव देश नाही. मार्चच्या सुरुवातीला अनेक देशांत पहिले 'हर्ड इम्युनिटी' वाढवून संचारबंदी टाळण्याचा प्रयत्न झाला पण ते फार काळ जमलं नाही. जे देश अर्थव्यवस्थेकरता संचारबंदी टाळत होते त्यांनी काही दिवसांत 'बेमुदत' संचारबंदी लागू केली. त्याने करोनाचा संपूर्ण नायनाट होणार नाही हे तर सगळ्यांनाच माहिती होतं, फक्त आलेख सपाट करणं हाच एक उद्देश होता. तसे केले नसते तर 'महामारी'सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असती. शिंक/खोकल्यातून उडणार्‍या तुषारांतून पसरणारा आजार भारतासारख्या दाट लोकसंख्या असलेल्या देशात किती वेगात आणि किती प्रमाणात पसरला असता याची आपण कल्पना करू शकतो. आपापल्या देशातल्या लोकांचे मनोबल कायम राखण्याचा आणि टप्प्या-टप्प्याने का होईना पण व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न प्रत्येक राष्ट्रप्रमुख करतोय. सगळ्यांना जनतेचा रोष सहन करावा लागतोय कारण नक्की काय करावं हे कोणालाच माहिती नाही. कमीतकमी जिवीतहानी होवू देवून व्यवहार सुरळीत करणे ही तारेवरची कसरत आहे, इकडे आड तर तिकडे विहीर आहे. अजूनपर्यंत तरी कोणत्याही देशाला यात मार्ग सापडल्याचं वाचलं/पाहिलं नाही. एवढं सगळं लिहिण्याचं कारण एवढंच की भारतात आपण फार चुकीच्या निर्णयांचे बळी आहोत आणि बाहेरच्या जगात नंदनवन आहे असं अजिबात नाही. जे निर्णय जगभरात राबवले जात आहेत तेच भारतातही आहेत. सध्यातरी आशावादी राहून सरकारच्या सूचना पाळणे आणि आपापले कर्म करत राहणे हेच आपल्या हातात आहे.
ध
धर्मराजमुटके Fri, 05/15/2020 - 19:06 नवीन
संयमित आणि सुंदर प्रतिसाद ! मनाला दिलासा देणारा प्रतिसाद.
म
मराठी कथालेखक Fri, 05/15/2020 - 19:38 नवीन
अजूनपर्यंत तरी कोणत्याही देशाला यात मार्ग सापडल्याचं वाचलं/पाहिलं नाही.
तुम्ही द. कोरिया आणि तैवानबद्दल वाचलं नाही असंच दिसतंय.
न
नेत्रेश Sat, 05/16/2020 - 03:47 नवीन
भारतासारख्या खंडप्राय देशाची आणी बाकी लहान देशांची तुलना होउ शकत नाही. तुलना कराचीच तर चीनशी करावी लागेल. त्यांनी तेथे जे उपाय केले, आणी ज्या प्रकारे राबवले, ते भारतात करता येणार आहेत का?
म
मराठी कथालेखक Mon, 05/18/2020 - 14:26 नवीन
देश लहान की मोठा त्याने काय फरक पडतो ? तुलना होवू शकत नाहिच असं ठरवूनच ठेवलं तर मग काय बोलणार ? आणि चीनशी तुलना करायला हरकत नाही. पण चीनने सगळं सत्य समोर आणलं आहे याची खात्री आहे का तुम्हाला ? चीनमध्ये फ्क्त वुहान प्रांतातच विषाणू जास्त पसरला, बाकी प्रातांत फारसा नाहिच , हे कसे ? लॉकडाऊनही बहुतांशी वुहानमध्येच झाले. उर्वरित देश विषाणू पासून आलिप्त कसा राहिला ? की कोणती एखादी लस होती जी देशाच्या इतर भागात दिली गेली. दीड दोन महिन्यापुर्वी पुतिनने रशियात कसे कडकपणे लॉकडाऊन केले याच्या पोस्ट आणि पुतीनचे कौतुक व्हॉटस अ‍ॅपवर फिरत होते. इतके कडक लॉकडाऊन होते तरी तिथला कोरोना रुग्णांचा आकडा तीन लाखांच्या जवळ गेलाय. इटलीने ९ हजार रुग्ण असताना लॉकडाऊन केले तरी तिथली रुग्णसंख्या आता सव्वा दोन लाखांवर पोहोचली आहे. खुद्द भारतातही सहाशेच्या आत रुग्ण असताना लॉकडाऊन केले आणि तरीही आतापर्यंत एक लाखांवर रुग्णांची संख्या वाढली आहे. मग लॉकडाउनचे यश ते काय ? न्यूझीलंड ,ऑस्ट्रेलिया वगळता कोणत्या देशाला (चीनबद्दल अनेक संभ्रम आहेत म्हणून त्याला गणत नाही)लॉकडाऊन करुन कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणता आला ? बाकी वाटल्यास हा लेख वाचू शकता. (अनेकांच्या नावडत्या) कुबेरांनी लिहला असला तरी त्यात स्वीडनचे वैद्यकतज्ज्ञ जोहान गिसेक यांनी ऑस्ट्रेलियाच्या स्काय न्यूजला दिलेली मुलाखतीत मांडलेली मते आहेत. (मूळ मुलाखत मी पाहिलेली नाही). काही वाक्ये खाली देत आहे.
‘या विषाणूची खरी साथ अदृश्यच आहे. तुम्ही काहीही उपाय करा, ती पसरणारच. हे असे उपाय केलेल्या आणि न केलेल्या देशांतील परिणाम त्यामुळे एकसारखेच असतील.’’ त्यांच्या प्रतिपादनातला खरा बॉम्ब पुढे आहे. ‘‘टाळेबंदी यशस्वी करून दाखवली म्हणून अभिमान बाळगणारे जेव्हा केव्हा टाळेबंदी उठवतील तेव्हा या साथीचे थैमान वाढेल आणि त्यामुळे मृत्यूंची संख्याही वाढेल.’’
म
मोदक Mon, 05/18/2020 - 15:11 नवीन
टाळेबंदी यशस्वी करून दाखवली म्हणून नक्की कोण अभिमान बाळगत आहे..?
म
मोदक Mon, 05/18/2020 - 15:29 नवीन
देश लहान की मोठा त्याने काय फरक पडतो ? मग एक सांगा.. सिंगापूरसारखी भारताची प्रगती का झाली नाही गेल्या ६० वर्षात..?
च
चौकस२१२ Mon, 05/18/2020 - 15:32 नवीन
मराठी कथालेखक आपल्या माहिती साठी : जरी ऑस्ट्रेलिया मध्ये हे खूप चांगलंय प्रकारे आटोक्यात आणलं एअसले तरी येथे कोणी ना बढाया मारताय ना घरबंदी ला दोष देताय टप्पय टप्पय ने चालू आहेत प्र्यत्न ..देशबंदी चा फायदा निशिचत झाला आहे पण सरकारला आणि लोकांना हे हि माहित आहे कि आता बंधन शिथिल केल्यावर आणि त्यात थंडी सूर झाली आहे तेव्हा हे चित्र उलटू शकते, त्याची भीती आहेच भारतात एकतर हि बंदी एकतर १००% चुकीची किंवा १०० % यौग्य अशी टोकाची भूमिका का घेतात लोक हेच समजत नाही ( निदान मिपावरील काही अगम्य प्रतीक्रिया वाचल्या तर तसे वाटते ) एकदम हिरो नाही तर झिरो का करता ? कोणाला हे थोतांड वाटतं तर कोणाला यच्ययात फकिरी वृत्तीचा बेजवाबदार पणा दिसतो.. कोणाला सरकार पुरेसे समाजवादी का नाही याची पडलीय ..
च
चौकस२१२ Sat, 05/16/2020 - 08:00 नवीन
१००% अगदी योग्य शब्दात आपण मांडले आहेत . जी लोक येथे "हे थोडात" आहे हे असे म्हणत आहेत त्यांनी जरूर वाचावे
ग
गामा पैलवान Fri, 05/15/2020 - 22:42 नवीन
स्मिता.,
या सगळ्याचा परिणाम म्हणून लोकांना सगळंच थोतांड वाटायला लागलंय आणि हा त्रागा समजण्यासारखा आहे.
लोकांना सगळंच थोतांड वाटायला लागलंय कारण हे थोतांडच आहे. आज कष्टकरी कामगार जात्यात आहे आणि आपण सुखवस्तू लोकं सुपात आहोत. तुमच्याकडे वर्षभर पुरेल इतका पैसा असला तरी नंतर काय, हा प्रश्न आहेच. हे थोतांड जर वेळच्या वेळीच निपटलं नाही तर उत्तरोत्तर हालत खराब होत जाणार ना? शिवाय सरकारने संचारबंदी व टाळेबंदी घातल्या आहेत त्या नक्की कोणत्या तरतुदीखाली आहेत? यांना काही घटनात्मक आधार आहे का? इतर वेळेस सदैव घटनेच्या नावाने टाहो फोडणारे रामदास आठवले, जितेंद्र आव्हाड, प्रकाश आंबेडकर ऐन वेळेस तोंडं बंद करून का बरं बसले आहेत? कुठे गेले सगळे स्वयंघोषित घटनातत्ज्ञ? हा एक राजकीय घोटाळा वाटंत नाही का? आ.न., -गा.पै.
न
नेत्रेश Sat, 05/16/2020 - 03:58 नवीन
कुणाची तयारी असो वा नसो या व्हायरसवर व्हॅक्सिन तयारहोउन ते सर्व सामन्य लोकांपर्यंत पोहोचेपर्यंत परीस्थीती फारशी बदलणार नाही. हा राजकीय घोटाळा असेल तर रामदास आठवले, जितेंद्र आव्हाड, प्रकाश आंबेडकर यांचा नक्की काय फायदा होत आहे? आर्थिक फटका लहान थोर, कॉर्पोरेट, गव्हर्नमेंट, सर्वांनाच बसत आहे, केवळ भारतात नव्हे, तर जगभरात. सर्वचजण परत नॉर्मल लाईफ साठी अत्यंत अधीर आहेत. पण महामारीच्या भीतीने सर्वजण सोशल डीस्टंसिंग पाळुन सहकार्य करत आहेत. सरसकट निर्बंध उठवणे हा पर्याय नाही.
स
स्मिता. Sat, 05/16/2020 - 13:00 नवीन
जगभरातल्या सर्व (मित्र आणि शत्रू) राष्ट्रप्रमुखांनी ठरवून केलेला हा घोटाळा नक्कीच सगळ्यात मोठ्ठा राजकीय घोटाळा म्हणायला हवा.
श
शकु गोवेकर Fri, 05/15/2020 - 23:49 नवीन
नोबेल पारितोषिक प्राप्त डॉक्टर बॅनर्जी यांनी सुचविल्याप्रमाणे भारतात गरीब कोण आहे याची व्याख्या काय हे कदाचित मंत्री मग तो प्रधान असो वा वित्त असो माहित नसावी कारण भारतात तसे पहिले तर ९६ टक्के जनता गरीब आहे व त्यांना प्रत्येकी सरसकट ५०० किंवा ५००० रुपये द्यावेत व लाल किंवा पिवळी शिधा पत्रिका याचा विचार करू नये
ग
गामा पैलवान Sat, 05/16/2020 - 11:44 नवीन
चौकस२१२,
माझे वरील विधान जी लोक "या मृत्यूंत करोनाचं योगदान नगण्य आहे" अशी उचलली जीभ लावली टाळ्याला करीत आहेत त्यानं उद्देशून होते . नेत्रेश यांनी उद्देशून नाही ( खुलासा )
नगण्य योगदान हे माझं विधान आहे. या मृत्यूत करोनाचं योगदान नगण्य आहे याचा अर्थ इतर घटकांचं ( = वय + आरोग्य + सवयी) योगदान जास्त आहे. अमेरिकेतले हे जे ८८०००+ लोकं मेलेत ते सगळे वयस्कर आहेत. त्यांच्या अंगात करोनाखेरीज इतर अनेक व्याधी होत्या. इथे इंग्लंडमध्येही साधारणत: तशीच परिस्थिती आहे. करोना अंगात असतांना मृत झालेले बरेचसे लोकं वृद्धाश्रमातले होते. इथे त्यावर ताजी (१५ मे रोजीची) माहिती आहे : https://www.bbc.co.uk/news/health-52284281 करोना अंगात असतांना मृत झालेल्यांपैकी २५% वृद्धाश्रमातले मृत आहेत. बाकीचे बाहेर मृत झालेले आहेत. करोना स्वत:हून ठार मारंत नाही. त्याच्यामुळे शरीराची अनावश्यक प्रतिक्रीया (अॅलर्जी) होते आणि तिला माणूस बळी पडतो. माझा प्रश्न साधासोपा व सरळ आहे. जर हा वयस्करांचा आजार आहे तर धडधाकट लोकांवर टाळेबंदीची सक्ती का? असे किती धडधाकट लोकं मेलेत? आ.न., -गा.पै.
म
मोदक Sat, 05/16/2020 - 11:52 नवीन
वयस्करपणाची तुमची नक्की व्याख्या काय आहे..? ५८ / ६० च्या पुढचे..?
ग
गामा पैलवान Sun, 05/17/2020 - 08:50 नवीन
मोदक, करोनाच्या संदर्भात वृद्ध कोण हे करोनामुळे गतप्राण झालेल्यांचं सरासरी ( = अॅव्हरेज) अथवा मध्यममान ( = मेडियन ) काढून ठरवता येईल. कोणत्या वयोगटाला किती धोका आहे ते आपसूक समजेल. आ.न., -गा.पै.
स
सुबोध खरे Sat, 05/16/2020 - 15:54 नवीन
जर हा वयस्करांचा आजार आहे तर धडधाकट लोकांवर टाळेबंदीची सक्ती का? भारतात आणि पाश्चात्य देशात खूप फरक आहे. भारतात बहुसंख्य वृद्ध लोक हे आपल्या मुलांबरोबरच राहतात याशिवाय भारतात अफाट लोकसंख्येमुळे मर्यादित जागेत जास्त लोक गर्दी करून असतात. आपल्याकडे मुलांची आपल्या आईवडिलांबद्दल भावनिक गुंतवणूक कितीतरी जास्त असल्यामुळे पाश्चात्य देशासारखे आईबाप वृद्धाश्रमातच मृत झाले हे फारच कमी आहे. आपल्याकडे मुलगा महिनोन्महिने आई बापाशी बोलत नाही असे होतच नाही. आजही रोजगार नाही खिशात पैसे नाहीत आणि गावी रोजगार मिळण्याची शक्यता शून्य टक्के असूनही स्थलांतरित मजूर आईबापाकडे गावाला मैलोगणती चालत का जात आहेत? यामुळेच तरुण लोकांना बाहेर फिरण्यासाठी मुभा दिली असती तर त्यांच्या मुळे वृद्ध लोकांना मोठ्या प्रमाणावर आजार होऊन आपल्याकडे एकत्र इतकी मोठी रुग्ण संख्या झाली असती कि आपली फारशी चांगली नसलेली आरोग्य यंत्रणा मोडून पडली असती. यासाठीच हा लॉक डाऊन आवश्यक होता
ग
गामा पैलवान Sun, 05/17/2020 - 08:46 नवीन
खरे डॉक्टर, वाहक म्हणून छाप मारून कोणावरही टाळेबंदीची सक्ती करणं कितपत योग्य? वृद्ध लोकांना कसले ना कसले आजार होणारंच हे गृहीत असतं ना? उलट टाळेबंदीमुळे जे परिचयकाठीण्य उत्पन्न होतं ते न झाल्याने रोगापेक्ष उपचार भयंकर अशी अवस्था नाही होणार का? एड्स झालेला माणूस साध्या सर्दीने मरायचा. मग सर्दीचे विषाणू फैलावणारे सगळे लोकं वाहक झाले ना? सर्दी तर कोणलाही होऊ शकते. करोना फ्लूसारखा आहे. सर्दीपेक्षा फारसा वेगळा नाही. टाळेबंदी आणि अल्पसंपर्क ( मायनर एक्स्पोजर ) या दोन परस्परविरोधी उपाययोजना आहेत. त्यांच्यात समन्वय न साधता केवळ सरसकट टाळेबंदी हा एकांगी उपाय राबवला जातोय. हे कितपत उचित धरायचं? शासनाला करोना संपवण्यापेक्षा टाळेबंदी वाढवण्यामागे जास्त रस आहे. आ.न., -गा.पै.
न
नेत्रेश Sat, 05/16/2020 - 20:15 नवीन
१. या आजारावे सर्व वयोगटातील व्यक्ती ICU मध्ये पोहोचतात. पण तरुण लोकं बरी होउन ५ ते १० दीवसांनी घरी परतण्याचे प्रमाण वृद्ध लोकांपेक्षा बरेच जास्त आहे. पण प्रचंड प्रमाणात तरुण लोक ICU मध्ये भरती झाले तर सर्वांना अ‍ॅडमिट करुन उपचार करणे शक्य होणार नाही. तेव्हा तरुणांनी आजारी न पडणे हा एकच उपाय आहे. २. वृद्धाश्रमातले लोक बाहेर जात नाहीत, मग त्यांना करोना कसा झाला? तर काही लोकांचे तरुण नातेवाईक जे करोनाचे वाहक होते, ते भेटायला आले व करोना संक्रमीत करुन गेले. एकदा एकाला करोना झाल्यावर तो अत्यंत जलदगतीने सर्व वृद्ध लोकांमध्ये पसरला व दुर्दैवाने बरेच लोक मेले. ३. काही वृद्धाश्रमात बाहेरील व्हीजीटरना मनाई केली, तरीही तीथे सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांकडुन करोना पसरला. करोना कॅरीयर ओळखणे खुप कठीण आहे. तो कॅरीयर आहे हे समजेपर्यंत त्याने बर्‍याचजणींपर्यंत करोना पोहोचवलेला असतो. ४, मरणार्‍या लोकांमध्ये तरुण घडधाकट लोकही आहेत. प्रमाण कमी आहे कारण त्यांना वैद्यकीय उपचार वेळेवर मिळत आहेत. पण रुग्णांचे प्रमाण अती वाढले तर वैद्यकीय व्यवस्था अपुरी पडुन तरुण लोकही जास्त प्रमाणात बळी पडतील. तर"जर हा वयस्करांचा आजार आहे तर धडधाकट लोकांवर टाळेबंदीची सक्ती का? असे किती धडधाकट लोकं मेलेत?" याचे उत्तर असे आहे की १. वैद्यकीय व्यवस्थेवर ताण येउन ती कोलमडु नये म्हणुन २. तरुण धडधाकट लोकांकडुन तो बाकी म्हतर्‍या माणसांपर्यंत पसरु नये. आपल्या वृद्ध नातेवाईकांचे संरक्षण व्हावे म्हणुन. "अमेरिकेतले हे जे ८८०००+ लोकं मेलेत ते सगळे वयस्कर आहेत. त्यांच्या अंगात करोनाखेरीज इतर अनेक व्याधी होत्या." ही चुकीची माहीती आहे. यात सर्व वयोगटातील व्यक्ती आहेत. आणी बर्‍याचजणांना फारशा गंभीर व्याधी नव्हत्या. जेव्हा आपल्या आजुबाजुचे / आपल्याला माहीती असलेले लोक मरु लागतात तेव्हा वास्तवाची दाहकता जाणवते. तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. न्युयॉर्क, लॉस एंजेलीस सारख्या शहरात रहाणार्‍या लोकांना विचारा. थोडी अजुन माहीती - लॉस एंजेलीसमध्ये रस्त्यावर रहाणार्‍या १०,००० पेक्षा जास्त होमलेस लोकांना पालिकेने स्वतःच्या (लोकांच्या टॅक्सच्या) पैशांने गेल्या महीन्याभरापेक्षा जास्त दीवस चांगल्या हॉटेल्समध्ये ठेवले आहे. त्यांना रोज ३ वेळा जेवण, औषधे, मनोरंजन, ईत्यादी सर्व दीले आहे. कारण या लोकांना करोना होउन तो सर्वत्र पसरु नये म्हणुन. या साठी शेकडो खोल्या असतेली कीतीतरी हॉटेल्स भाड्याने घेतली आहेत.
च
चौकटराजा Sun, 05/17/2020 - 03:13 नवीन
बर्‍याचजणांना फारशा गंभीर व्याधी नव्हत्या. जेव्हा आपल्या आजुबाजुचे / आपल्याला माहीती असलेले लोक मरु लागतात तेव्हा वास्तवाची दाहकता जाणवते हे विशेष करून मिपाकरांनी हे जाणून घेणे महत्वाचे आहे.फक्त पाककृती ,भटकंती,, कविता यांच्या धाग्यावर गर्दी नको ती अशा ज्ञानवर्धक धाग्यावर ही असावी. ही " कॅरियर " ची भानगड लोकांनी नीट समाजवुन घेणे गरजेचे आहे कारण जिथे जास्तीत जास्त टेस्ट करण्याची सोय नाही होणे शक्य नाही त्या भारतासारख्या देशात आपण " कॅरियर " देखील असू शकतो असे गृहित धरून घरीच थांबणे हे माझ्यासाठी तरी आता सक्तीचे व हिताचे झाले आहे. कारण मला धोका रोगी म्हणूनही आहे व माझी प्रतिकारशक्ती चांगली असेल तर " कॅरियर " म्हणूनही आहे !
ग
गामा पैलवान Sun, 05/17/2020 - 08:48 नवीन
चौकटराजा,
जेव्हा आपल्या आजुबाजुचे / आपल्याला माहीती असलेले लोक मरु लागतात तेव्हा वास्तवाची दाहकता जाणवते
हा प्रश्न विचारायची वेळ येऊ नये. पण प्रश्न विचारायला हरकत नाही. तुमच्या माहितीतला कोणी धडधाकट मनुष्य परलोकवासी झालाय का करोनामुळे प्रतिक्रिया येऊन? आ.न., -गा.पै.
च
चौकटराजा Sun, 05/17/2020 - 15:03 नवीन
माझ्या नातेवईकात मित्रात कोणी नाही. त्याचे कारण बरेचसे सुखवस्तू आहेत. पैसे वाळगून आहेत निव्रुत्त आहेत. एक दोन बंकेत नोकरीस आहेत तरीही त्याना लागण वा मृत्यु नाही. सोसायटीत 50 दिवसानंतर ही केस नाही . कारण अर्थिक स्थिती चांगली असल्याने सर्व घरी थाम्बू शकतात. आता काहीचे हप्ते वगैरे कथा व्यथा असल्याने काही धोका पत्करून कामाला जाउ लागले आहेत. त्यात कोणाला लागण झाली तर सोशल डिस्टंसिंग हा भाग महत्वाचा म्हणून अधोरेखित होईल .आमच्या सोसाय्टीत एक पस्तीशीतील पी एस आय देखील आहे पण तो ही अजून ओके आहे. अजूनही ही परिस्थीती असण्याचे कारण एक असेही असू शकते की माणसे दोन विभागात विभागली गेली आहेत. पुण्यात भवानी पेठ हा हॉटस्पॉट आहे कारण तिथे झोपडपट्टी आहे व लोकसंख्या दाट आहे. आम्ही जिथे रहातो तिथे लोकवस्तीच्या आयसोलेशन साठी आदर्श अरिया आहे. त्यामुळे दाट वस्ती अधिक मजबुरी अधिक अशिक्षित पणा याचे कोम्बिनेशन झाले की केसेस वाढत असाव्यात. एका अर्थाने पैशाचा हव्यास असलेल्यानी रोग भारतात आणला पण बळी ठरतोय तो ज्याकडे पैसा नाही.
म
मोदक Sun, 05/17/2020 - 15:22 नवीन
पैशाचा हव्यास असलेल्यानी रोग भारतात आणला पण बळी ठरतोय तो ज्याकडे पैसा नाही. "पासपोर्ट विरूद्ध रेशन कार्ड" असे कांही..?
ग
गामा पैलवान Sun, 05/17/2020 - 09:03 नवीन
नेत्रेश, तुमचा इथला संदेश वाचला. माझी मतं मांडेन म्हणतो. १.
१. या आजारावे सर्व वयोगटातील व्यक्ती ICU मध्ये पोहोचतात. पण तरुण लोकं बरी होउन ५ ते १० दीवसांनी घरी परतण्याचे प्रमाण वृद्ध लोकांपेक्षा बरेच जास्त आहे. पण प्रचंड प्रमाणात तरुण लोक ICU मध्ये भरती झाले तर सर्वांना अ‍ॅडमिट करुन उपचार करणे शक्य होणार नाही. तेव्हा तरुणांनी आजारी न पडणे हा एकच उपाय आहे.
करोनाचे रुग्ण आपोआप बरे होतात. रुग्णालयात केवळ श्वासोत्तेजक ( = व्हेन्टिलेटर) लावला जातो. तो सुद्धा श्वास घ्यायला अडथळा होऊ लागला तरंच लावला जातो. अशा रुग्णांचं प्रमाण माझ्या मते बरंच कमी आहे. इतकं कमी की सरसकट टाळेबंदीची गरज नाही. २.
२. वृद्धाश्रमातले लोक बाहेर जात नाहीत, मग त्यांना करोना कसा झाला? तर काही लोकांचे तरुण नातेवाईक जे करोनाचे वाहक होते, ते भेटायला आले व करोना संक्रमीत करुन गेले. एकदा एकाला करोना झाल्यावर तो अत्यंत जलदगतीने सर्व वृद्ध लोकांमध्ये पसरला व दुर्दैवाने बरेच लोक मेले.
करोना हा विषाणू हवा, पाणी सर्वत्र असतो. तो अंगात सापडणं हे नैसर्गिक आहे. करोनाखेरीज इतर अनेक प्रकारचे विषाणू सर्वांच्या शरीरात सुखेनैव नांदत असतात. करोना काही एकमेव विषाणू नाही. ३.
३. काही वृद्धाश्रमात बाहेरील व्हीजीटरना मनाई केली, तरीही तीथे सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांकडुन करोना पसरला. करोना कॅरीयर ओळखणे खुप कठीण आहे. तो कॅरीयर आहे हे समजेपर्यंत त्याने बर्‍याचजणींपर्यंत करोना पोहोचवलेला असतो.
करोना असाच सर्वत्र पोहोचायला हवा. जेणेकरून शरीराच्या संरक्षणप्रणालीस त्याची ओळख होऊन परिचयकाठीण्य उत्पन्न होईल. यालाच शरीराची प्रतिकारशक्ती वाढणे असंही म्हणतात. आपल्याला रोगाची लस टोचतात तेव्हा अशीच विषाणूची ओळख ( = इंट्रोडक्शन ) करवून दिली जाते. ४.
४, मरणार्‍या लोकांमध्ये तरुण घडधाकट लोकही आहेत. प्रमाण कमी आहे कारण त्यांना वैद्यकीय उपचार वेळेवर मिळत आहेत. पण रुग्णांचे प्रमाण अती वाढले तर वैद्यकीय व्यवस्था अपुरी पडुन तरुण लोकही जास्त प्रमाणात बळी पडतील.
सरसकट टाळेबंदी लादण्याइतकं प्रमाण आजिबात नाही. ५.
"अमेरिकेतले हे जे ८८०००+ लोकं मेलेत ते सगळे वयस्कर आहेत. त्यांच्या अंगात करोनाखेरीज इतर अनेक व्याधी होत्या." ही चुकीची माहीती आहे. यात सर्व वयोगटातील व्यक्ती आहेत.
mean, mode median विदा उपलब्ध आहे, त्याची माध्यमांनी कधी चर्चा केलीये का? नुसतं भयावडंबर माजवायचं. कळू द्या ना लोकांना करोनामुळे मृत झालेल्यांचं सरासरी आयुर्मान काय आहे ते. इथे करोना अंगात असतांना मृत झालेले नव्हे, तर करोनामुळे शरीराची अनावश्यक प्रतिक्रिया येऊन श्वास घुसमटून गतप्राण झालेले लोकंच अभिप्रेत आहेत. याव्यतिरिक्त झालेले इतर मृत्यू हे करोनामुळे झालेले मृत्यू नाहीत. आ.न., -गा.पै.
म
मदनबाण Sun, 05/17/2020 - 15:33 नवीन
करोना हा विषाणू हवा, पाणी सर्वत्र असतो. तो अंगात सापडणं हे नैसर्गिक आहे. करोनाखेरीज इतर अनेक प्रकारचे विषाणू सर्वांच्या शरीरात सुखेनैव नांदत असतात. करोना काही एकमेव विषाणू नाही. गापै, करोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत, ज्यातील सध्याच्या विषाणूचे नामकरण कोव्हीड-१९ [ SARS-CoV-2 ]आहे. या विषाणूवर सर्वांनाच अधिक माहिती मिळावी म्हणुन २ व्हिडियो देउन ठेवतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tu Hi Haqeeqat... :- Tum Mile
न
नेत्रेश Sun, 05/17/2020 - 23:08 नवीन
गा.मा भाउ, तुम्ही म्हणता "करोना असाच सर्वत्र पोहोचायला हवा. जेणेकरून शरीराच्या संरक्षणप्रणालीस त्याची ओळख होऊन परिचयकाठीण्य उत्पन्न होईल. यालाच शरीराची प्रतिकारशक्ती वाढणे असंही म्हणतात. आपल्याला रोगाची लस टोचतात तेव्हा अशीच विषाणूची ओळख ( = इंट्रोडक्शन ) करवून दिली जाते." HIV च्या विषाणुबाबत सुद्धा आपले हेच मत आहे का? जो पर्यंत लस टोचत नाही तोपर्यंत आपले शरीर त्या विषाणुला प्रतिकार करण्यास तयार नसते. देवी, पोलिओ सारख्या विषाणुमुळे फैलावणार्‍या साथी लस सापडल्यावाच आटोक्यात आल्या. लस तयार नसताना, व या विषाणुबाधेवर कसे व काय उपचार करायचे हे नक्की माहीत नसताना त्याचा फैलाव करणे / करायला मदत करणे म्हणजे १०% लोकसंखेचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. हे जगभरातल्या तज्ञ लोकांना समजले आहे, म्हणुनच बहुतेक सर्व देश सोशलडीस्टंसींग सारख्या उपायांनी करोनाचा फैलाव आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमची मते व पॅशन यांचा संपुर्ण आदर करुन सांगावेसे वाटते की वेळ असेल तर तुम्ही अजुन थोडा रीसर्च करा, केवळ बायास्ड, राजकीय अजेंडा असलेल्या मीडीयावर माहीतीसाठी अवलंबुन राहु नका. करोनावरचे रीसर्चपेपर्स व वेगवेळ्या युनिव्हरसीटीनी प्रकाशीत केलेले संशोधन व शास्त्रिय माहीती वाचा. केवळ आपल्या (कदाचित अपुर्ण) माहीतीवर अवलंबुन सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा अनादर करु नका. बाकी आपली मर्जी. बाकी अवांतर पण या संदर्भातले: १. मी रहात असलेल्या शहरात (लॉस एंजेलीस काउंटी) मध्ये अमेरीकेतल्या पश्चिम भागात सर्वाधीक मृत्यु करोनाने झाले आहेत. करोनाने मरणार्‍या लोकांमध्ये आता डॉक्टर्स, नर्स, हॉस्पिटल कर्मचारी, पोलीस, फायर फायटर्स, अत्यावश्यक सेवा पुरवणारे, व ईतर फर्स्ट रीस्पाँडर्सही आहेत, जे बहुतेक तरुण, घडधाकट व मेडीकली फीट असतात. टीव्हीवर त्यांची संपुर्ण माहीती समजते. बहुतेकांवर सरकारी ईतमामात अंत्यसंस्कारही होतात. पण ईकडे मेडीकल कंडीशन ही कायद्याने गोपनीय असल्यामुळे दगावलेल्या लोकांना काही कंडीशन होती की नाही हे समजत नाही. दुर्दैवाने एका भारतीय कुटुंबातील कर्ता व्यक्ती आणी त्याचे वडील दोघेही करोनाने दगावलेले माहीती आहेत. त्या भारतीय व्यक्तीविषयी समजलेल्या माहीतीनुसार त्यांना काही मे़जर मेडीकल कंडीशन नव्हती. २. करोनाबाधीत व्यक्तीच्या उपचारासाठी वापरलेली मेडीकल ईक्विपमेंटस लगेच दुसर्‍या रुग्णाच्या उपचारासाठी वापरता येत नाहीत. व्हेंटीलेटरसारखी ईक्विपमेंटस संपुर्ण निर्जंतुक करणे क्लीष्ट व वेळखाऊ काम आहे. त्यामुळॅ हॉस्पीटलसना जवळजवळ १० ते १०० पट जास्त मेडीकल ईक्विपमेंटसची गरज पडत आहे. (जीथे २० व्हेंटीलेटर्स होते अशी हॉस्पिटल्स आता २०० ते २००० व्हेंटीलेटर्स वापरत आहेत). म्हणुन सरकारी आदेशानुसार नासा व फोर्ड सारख्या कंपन्या मेडीकल ईक्विपमेंट डीझाईन व मॅन्युफॅक्चरींग करत आहेत. आणखीही बर्‍याच कंपन्या हे करत आहेत. माझ्या टीमचा सहभाग असलेले नासाचे व्हेंटीलेटर डीझाईनः https://www.nasa.gov/press-release/nasa-developed-ventilator-authorized-by-fda-for-emergency-use फोर्ड तयार करत असलेले व्हेंटीलेटर्सः https://media.ford.com/content/fordmedia/fna/us/en/news/2020/03/30/ford-to-produce-50-000-ventilators-in-michigan-in-next-100-days.html ३. खरे खोटे माहीत नाही, पण परवा भारतातल्या नातेवाईकाने सांगीतले की भारतात काही धनवान व्यक्ती, विशेषतः दिल्लीकडे, व्हेंटीलेटर्स सारखी महागडी व आता दुर्मीळ होत जाणारी उपकरणे आपल्या कुटुंबाच्या वापरासाठी (वेळ पडली तर म्हणुन) विकत घेउन ठेवत आहेत. सर्वांना हे शक्य नाही, पण सोशल डीस्टंसीग पाळणे, आणी सोशल डीस्टंसीग मुळे हालाखीची वेळ आलेल्यां गोरगरीब लोकांना शक्य ती मदत कारणे एवढे आपण करु शकतो. अन्यथा या विषाणूचा अती फैलाव होउन लोक उपचारावीना मरु शकतात.
ग
गामा पैलवान Mon, 05/18/2020 - 13:40 नवीन
नेत्रेश, माझी मतं मांडतो. १.
HIV च्या विषाणुबाबत सुद्धा आपले हेच मत आहे का?
HIV च्या विषाणूची सर्दीच्या विषाणूसोबत तुलना होत नसते. करोना व सर्दीचा विषाणू हे सजातीय आहेत. हे दोघे मानवी शरीराबाहेर चारसहा तास 'जिवंत' असतात. उलट HIV मानवी शरीराबाहेर आल्यास दोनतीन मिनिटांत मरतो. तसंच HIV रक्तात पोहोचावा लागतो. एड्सच्या रोग्याशी हस्तांदोलन करून काहीही होत नसतं. याउलट सर्दी थेट संपर्क नसतांना नुसत्या हवेतनंही पसरते. २.
लस तयार नसताना, व या विषाणुबाधेवर कसे व काय उपचार करायचे हे नक्की माहीत नसताना त्याचा फैलाव करणे / करायला मदत करणे म्हणजे १०% लोकसंखेचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे.
सर्दीने जीव जातो का? तसा जात असेल तर त्यासाठी इतर घटक जबाबदार आहेत. सर्दी हा रोग नव्हे. ३.
तुम्ही अजुन थोडा रीसर्च करा, केवळ बायास्ड, राजकीय अजेंडा असलेल्या मीडीयावर माहीतीसाठी अवलंबुन राहु नका.
करोनाची नेमकी आकडेवारी कोणी द्यायची? मी की मीडियाने? आजपावेतो करोनामुळे जीव घुसमटून किती जण मेले आहेत? त्याप्रमाणे श्वासोत्तेजना लावावी लागलेल्यांची काही आकडेवारी मिळेल काय? ही आकडेवारी का उघड करण्यात येत नाहीये? सरसकट सगळ्यांना करोनाचे रुग्ण म्हणवून भयावडंबर कोण माजवतंय? ४.
सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा अनादर करु नका.
करेक्ट. टाळेबंदी कधी उठवणार? आणि जर सरकारला जर करोनावर आटोक्यात आणण्यापेक्षा टाळेबंदी वाढवण्यात रस असेल तर मी काय करावं? ५.
भारतातल्या नातेवाईकाने सांगीतले की भारतात काही धनवान व्यक्ती, विशेषतः दिल्लीकडे, व्हेंटीलेटर्स सारखी महागडी व आता दुर्मीळ होत जाणारी उपकरणे आपल्या कुटुंबाच्या वापरासाठी (वेळ पडली तर म्हणुन) विकत घेउन ठेवत आहेत.
फाटलीये त्यांची. जे किरकोळ सुरक्षेसाठी आपलं स्वातंत्र्य गहाण ठेवायला तयार होतात त्यांच्या सुरक्षा व स्वातंत्र्य दोघांचीही वाट लागते. ६.
१. मी रहात असलेल्या शहरात (लॉस एंजेलीस काउंटी) मध्ये अमेरीकेतल्या पश्चिम भागात सर्वाधीक मृत्यु करोनाने झाले आहेत. करोनाने मरणार्‍या लोकांमध्ये आता डॉक्टर्स, नर्स, हॉस्पिटल कर्मचारी, पोलीस, फायर फायटर्स, अत्यावश्यक सेवा पुरवणारे, व ईतर फर्स्ट रीस्पाँडर्सही आहेत, जे बहुतेक तरुण, घडधाकट व मेडीकली फीट असतात.
जरा शोधल्यावर सोकॅल नर्सिंग होमातले ११ पैकी ८ नर्स मरण पावल्याचं आढळून आलं. याला वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणतात. जर हा वृद्धाश्रम धोकादायक वास्तू आहे तर योग्य काळजी का घेतली नाही? वृद्धाश्रमत साथीच्या रोगांच्या लागणीचं प्रमाण सर्वाधिक असतं, हे माहीत असूनही ? याव्यतिरिक्त फार काही सापडलं नाही. आ.न., -गा.पै.
ग
गामा पैलवान Sun, 05/17/2020 - 09:44 नवीन
लोकहो, जनतेचा संयम संपुष्टात येण्याची चिन्हे दिसंत आहेत. काल मुंबईत अँटॉप हिल परिसरात पोलिसांवर कोयत्याने वार केले गेले : https://lokmat.news18.com/mumbai/attack-with-sharp-object-on-police-at-mumbai-4-policemen-injured-mhsp-453313.html पुण्यात खबरदारीसाठी सशस्त्र दलास पाचारण : https://www.esakal.com/pune/coronavirus-crpf-battalion-deployed-pune-city-police-help-292718 करोनाचं थोतांड व टाळेबंदीचं महाथोतांड सर्वसामान्य लोकांना छानपैकी कळू लागलंय. जनतेच्या संयमाची इतकी परीक्षा पाहू नये. आ.न., -गा.पै.
च
चौकस२१२ Sun, 05/17/2020 - 09:46 नवीन
-गा.पै. चला मग दोन तीन गोष्टी सांगा ..होऊनच जाऊदे 1) आपण जे म्हणताय ते भारताबद्दल फक्त कि जगाबद्दल? २) आपलं अनुभव कोणता आहे? इंग्लड मधील असावा असे दिसतंय लिखाणावरून 3) हा रोग पसरू नये म्हणून अति वयस्कर सोडले तर इतर कोणावर हि घरबंदी नको करायला असे तुमचे मत दिसत आहे .. तसे केले असते तर या रोगाचं जो प्रसार झालाय कि ज्याचे काही देशात प्रमाण भीतीदायक आहे ( कारण उपाय अजून नाही म्हणून) ते कसे थांबवता आले असते कि आपण म्हणताय ३०० मिलियन चाय अमेरिकेत ८५ मेल हे काही विशेष नाही? ४) याशिव्या काही इतर "कॉन्स्पिरसी थेअरी " तर आपल्या मनात नाही ना? असेल तर स्पष्ट मांडावी ५) येथे मान्यवर डॉक्टर लोक याला प्रतिसाद देत आहेत हे नुसतेच द्विपदवीधर डॉक्टर नाहीत तर या समूहावर एक संयमित चर्चच करणारे म्हणून त्यांना मन आहे आणि त्यांनी तो गन अनेक वेळा दाखवून दिला आहे मग ते हि आपली विधाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष खोडून काढीत आहेत ते १००% चुकीचे का हो? या क्षेत्रात आपण त्यांच्यापेक्षा जास्त अनुभवी आहेत काय? ६) आपण म्हणता कि "करोना असाच सर्वत्र पोहोचायला हवा "कारण परिचयकाठीण्य उत्पन्न होईल आणि मग रोग पसरणार नाही..ह...म बर, समजा हा एक उपाय आहे असे धरून चालू ( यावर खरे तर वैद्य आणि संसर्गजन्य रोग तसाच सांगू शकतील ) परंतु ते "परिचयकाठीण्य " उत्पन्न होते पर्यंत किती लोक बळी पडतील? चालेले? सान्गा आपलं थ्रेशहोल्ड! .. ह...म.. जगातील इतक्या देशाचे वैद्यकीय अधिकारी , नेते अगदी मुर्ख आहेत का? कि ज्यांनी तो असा पसरू नये म्हणून धडपड चालवली आहे .. म्हणा ना स्पष्ट कि हो ते मूर्ख आहेत म्हणून
च
चौकस२१२ Sun, 05/17/2020 - 14:55 नवीन
८५०००+ म्रुत्यु असे वाचावे
म
मराठी_माणूस Sun, 05/17/2020 - 13:26 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/amitabh-gupta-who-handed-over-the-letter-to-wadhwan-rejoins-abn-97-2163917/ "मानवतेच्या दृष्टिकोनातून" पत्र दिल्याचे म्हटले आहे.
ग
गामा पैलवान Sun, 05/17/2020 - 15:33 नवीन
चौकस२१२, माझी मतं सांगतो. १.
1) आपण जे म्हणताय ते भारताबद्दल फक्त कि जगाबद्दल?
प्रामुख्याने भारताबद्दल. करोनामुळे मोदी हा नेता मोडीत निघू नये म्हणून. माझा प्रमुख आक्षेप टाळेबंदी व तज्जन्य नागरीस्वातंत्र्यसंकोचास आहे. २.
२) आपलं अनुभव कोणता आहे? इंग्लड मधील असावा असे दिसतंय लिखाणावरून
हो. पण भारतालाही लागू पडणारा आहे. शिवाय भारतीयांची प्रतिकारशक्ती जास्त असल्याने इंग्लंडइतकी भारताला टाळेबंदीची गरज नाही. मात्र प्रत्यक्षात इंग्लंडमध्ये टाळेबंदी सौम्य आहे, तर भारतात कडक. ३.
3) हा रोग पसरू नये म्हणून अति वयस्कर सोडले तर इतर कोणावर हि घरबंदी नको करायला असे तुमचे मत दिसत आहे .. तसे केले असते तर या रोगाचं जो प्रसार झालाय कि ज्याचे काही देशात प्रमाण भीतीदायक आहे ( कारण उपाय अजून नाही म्हणून) ते कसे थांबवता आले असते कि आपण म्हणताय ३०० मिलियन चाय अमेरिकेत ८५ मेल हे काही विशेष नाही?
करोना हा सर्दीप्रमाणे एक विषाणू आहे. त्याचा प्रसार नैसर्गिकतीत्या होतोच. तो कोणीही थांबवू शकंत नाही. तो अंगात असला की रोगाची लागण होतेच असंही नाही. करोना अंगात असणे, त्यामुळे बाधित असणे, त्याची सौम्य लक्षणं दिसणे, ती लक्षणं तीव्र बनणे आणि त्यांच्यापायी मृत्यू होणे या पाच स्वतंत्र बाबी आहेत. मृताच्या शरीरात करोना सापडणे म्हणजे करोनापायी मरणे नव्हे. ४.
४) याशिव्या काही इतर "कॉन्स्पिरसी थेअरी " तर आपल्या मनात नाही ना? असेल तर स्पष्ट मांडावी
अँथनी फौसी (की फॉसी) हा माणूस आपल्याला करोनावर लस सापडवून देणार आहे म्हणे. या माणसाने एड्सच्या लशीच्या नावाखाली गेली ३६ वर्षं अमेरिकेचा अमाप पैसा ओरबाडला आणि आता हा माणूस व्हाईट हाऊसला करोनाची अक्कल शिकवणार आहे. बिल गेट्स या माणसाशी मोदी करोनाविषयी कसली चर्चा करतात? याच्या पोलियो न्यासाला भारतातनं हाकून लावलं होतं ना २०१७ साली? साथीच्या रोगांना बळी पडलेल्यांसाठी कायदा अमेरिकी सभागृहांत सुमारे १ वर्षाआधी कार्यरत झाला आहोत : https://www.congress.gov/bill/116th-congress/house-bill/748/all-actions?overview=closed&KWICView=false उपरोक्त तथ्यांना "कॉन्स्पिरसी थेअरी" म्हणावं का ? ५.
मग ते हि आपली विधाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष खोडून काढीत आहेत ते १००% चुकीचे का हो? या क्षेत्रात आपण त्यांच्यापेक्षा जास्त अनुभवी आहेत काय?
मी डॉक्टरांच्या सल्ल्याला आजिबात गौण ठरवंत नाहीये. माझा आक्षेप सरसकट टाळेबंदीस आहे. तिचं समर्थन करण्यासाठी करोना हा गंभीर रोग म्हणून दाखण्यात येत आहे. ६.
परंतु ते "परिचयकाठीण्य " उत्पन्न होते पर्यंत किती लोक बळी पडतील? सान्गा आपलं थ्रेशहोल्ड!
० ७.
जगातील इतक्या देशाचे वैद्यकीय अधिकारी , नेते अगदी मुर्ख आहेत का?
माहीत नाही. पण जनतेला मूर्ख बनवायचं कार्य जोरदारपणे चाललंय. ८.
म्हणा ना स्पष्ट कि हो ते मूर्ख आहेत म्हणून
ते मूर्ख असते तर किती बरं झालं असतं. ते मूर्ख आजिबात नाहीत. मूर्ख आपण जनता बनतो आहोत. आ.न., -गा.पै.
च
चौकस२१२ Mon, 05/18/2020 - 01:08 नवीन
इंग्लंड मधील परिस्थिती आणि युरोप च्या जवळ आपण राहता ते बघून पण जर आपल्याला हे थोतांड आहे आणि जगभरचे नेते काही तरी स्वार्थसाठी जगाला मूर्ख बनवीत आहेत असे आपले ठाम मत दिसतंय... त्यामुळे यावर अजून चर्चा तुमच्याशी करण्यात काही अर्थ नाही नेत्रेश आणि डॉक्टर खरे यांनी आपले बरेच मुद्दे खोदून काढले आहेत... मी अशी आशा करतो कि केवळ कोणत्यातरी पूर्वग्रहामुळे हे जे काय आपण मांडतंय त्व्यावर कोणाचा विश्वास बसू नये . इति
आ
आंबट चिंच Tue, 05/19/2020 - 15:48 नवीन
गा. मा. एक आवाहन आणि आव्हान… तुम्ही जर इंग्लंड मध्ये असलात तर तिथेच अथवा भारतात असलात तर इकडे ते सुध्दा धारावी सारख्या भागात. स्वतः हुन जसे विटेकर काकांनी आपल्या मुला विषयी लिहले आणि तो सेवा करायला गेला तसे कराल काय आणि ते सुध्दा मास्क न लावता. ना रहेगा बास ना रहेगी बासुरी, कशाला उगाच कळ्फलक बदडवायचा म्हणतो मी. बरोबर? आणि मग १४ दिवसांनी पुन्हा आपला अनुभव लिहायला या इकडे. काय म्हणताय?
च
चौकटराजा Sun, 05/17/2020 - 16:19 नवीन
केदारनाथ यात्रेतील एक प्रसंग एका जीव वाचलेल्याने सांगितला .... केदारनाथ होऊन परत येताना एका ठिकाणी पाणी वाढत होते. व रस्ता मधेच तुटलेला होता. बसमधील प्रवाशामध्ये दोन तट पडले .काही म्हणाले बसमध्येच थांबू काही म्हणाले नको धोका नको ,आपण टेकडी चढायला लागू . बसमध्ये बसू वाल्यांनी त्यांचे ऐकले नाही. ते बर्यापैकी वर गेले असावेत तो त्यांना बस उभी असलेला भराव बससकट पाण्यात पडल्याचे वरून दिसले .लोंढ्यात त्यांच्या देखत बस वाहून गेली .नंतर हेलिकॉप्टर ने त्यांना मानवी वस्तीत नेण्यात येऊन घरोघरी पोहोचते करण्यात आले.याउलट असेही झाले असते की ती माणसे एकटी पडली वाट चुकली असती व संपर्काचे अभावी मेली असती व बसवाल्याना घेऊन जाणारी दुसरी एक बस पलीकडून आली असती व एकेकाला त्या रेस्क्यू बसमधून मानवी वस्तीत आणण्यात आले असते . वरील प्रकारची सिच्युएशन तुम्ही खास करून ऍडव्हेंचर वा डिझास्टर फिल्म मध्ये पाहिली असेल .काही वाचतात काही मरतात .कोणाचे जजमेंट कसे जिंकेल वा फोल होईल याला काही नियम नाही ! आलेल्या संकटाबद्दल जिथे मेडिकल प्रोफेशन मधील माणसे दिशाभूल करीत आहेत तिथे सामान्य माणसाचे काय ?
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा