Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

शिवसेनेची झोप की जाणिवपुर्वक राजकीय गोगपिद?

म
माहितगार
Wed, 11/13/2019 - 05:23
🗣 204 प्रतिसाद
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान २१ ऑक्टोबर २०१९ निकाल २४ ऑक्टोबर २०१९ . २४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत भाजपा आणि शिवसेना युतीस मतदान करणारी जनता दोहोत अगदीच सरकार बनु न शकण्या इतपत काही बिनसण्याची शक्यता आहे याबद्दल महाराष्ट्रीय सर्वसामान्य जनता अनभिज्ञ होती की मतदार बावळट होता ? २४ ऑक्टोबर नंतर शिवसेना नेते ५०:५० फॉर्म्युलॅच्या गोष्टी करतात भाजपा अध्यक्ष अमित शहांनी आश्वासन दिल्याचे म्हणतात. पण एकुण वाक्य रचनेवरुन मुख्यमंत्रीपद्दवर ५०:५० टक्के करण्याचे आश्वासन न देता अस्पष्टता ठेवली असण्याची शक्यता असू शकते. एखादी गोष्ट स्पष्ट न करणे यास मराठीत गोगपिद (गोमा गणेश पितळी दरवाजा) असा वाक्प्रचार आहे. शिवसेना नेतृत्वासोबत बोलताना अमित शहांनी गोगपिद केले असेल किंवा नसेल पण त्यानंतर म्हणजे १३ ऑक्टोबर २०१९ चा टाईम्स नाऊ या इंग्रजी टिव्ही चॅनलवरची अमित शहांची मुलाखत व्हिडीओ पुढे आला आहे ज्यात ३८मिनीटे ३८ सेकंदपासून पत्रकार नाविका कुमार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण असतील तर अमित शहा केवळ देवेंद्र फडणविसच असतील हे अत्यंत सुस्पष्टपणे सांगताना दिसतात. सर्वसामान्य मतदाराने दोघांचेही मुख्यमंत्रीपदी दावे ऐकले तरी गोष्टी न ताणता तोडगे निघतील कुणितरी नमते घेईल असाच सर्वसामान्य मतदार विचार करेल. पण ज्यांना आपल्या भूमिका टोकाच्या आहेत हे माहित असते त्यांना १३ ऑक्टोबर पर्यंत परस्परांच्या भुमिका जुळत नाहीत आणि टोकाच्या आहेत त्यांनी त्या टोकाच्या आहेत हे जनतेस / मतदारांना सुस्प्ष्टपणे का नाही सांगितले असा प्रश्न आहेच. अमित शहांना आधी माहित नसेल तरी १३ ऑक्टोबरला टाईम्स नाऊ पत्रकाराकडून आदीत्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावरील दाव्या बाबत समजलेले होते. आणि अमित शहांच्या मुलाखतीची वार्ता शिवसेना प्रमुखांच्या कानावर गेली असणार त्यांनी मतदारांना तोंडघशी घालण्यापुर्वी आपापसात चर्चा का केली नाही ? हा प्रश्न व्हॅलिड रहातोच पण.. शिवसेना प्रमुख निकाला नंतर ज्या पत्रकार परिषदा घेत फिरत आहेत त्या एकाही पत्रकार परिषदेत १३ ऑक्टोबरच्या अमितशहांच्या मुलाखतीतील भूमिकेचा उल्लेख का करत नाहीत ? सर्वसामान्य जनतेचे सर्वच राजकीय भाष्यांवर लक्ष नसेल पण शिवसेनेच्या राजकीय नेतृत्वापैकी कुणाचेच लक्ष नसेल तर १३ ऑक्टोबर पासून झोपले होते किंवा १३ ऑक्टोबरची मुलाखत जनतेपासून सोईस्कर लपवत आहेत ? महाराष्ट्रीय जनतेशी हि फसवा फसवी का चालू आहे ? ३८ व्या मिनीटापासून पुढे पहावे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 85602 views

🗣 चर्चा (204)
स
सुबोध खरे Wed, 11/13/2019 - 05:35 नवीन
५० :५० चे सूत्र आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री असे जर अगोदरच ठरले असेल तर शिवसेनेने १२४ (आणि भाजपने १६४) जागांवर निवडणूक लढवण्याचे कसे मान्य केले? तब्बल ४० जागा कमी लढवून शिवसेनेस अर्धा वाटा देण्याचे भाजपने अगोदरच ठरवले असेल असे अजिबात वाटत नाही. (त्यातून लढवलेल्या जागांपैकी ४५ % जागीच (५६/१२४) त्यांचे उमेदवार निवडून आले याउलट भाजपचे (१०५/१६४) ६५ % जागी उमेदवार निवडून आले आहेत.) आणि असे झाल्यानंतरसुद्धा १०५ : ५६ हि टक्केवारी ६५ :३५ येते. मग जवळ जवळ दुप्पट जागा निवडून आणल्यावर शिवसेनेचाच मुख्यमंत्री असला पाहिजे हि मागणी सुद्धा अनाकलनीय आहे. जर श्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वडिलांना वचन दिले होते कि मी एक ना एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री आणेनच तर त्यांनी १४४ जागा निवडून आणायला हव्या होत्या १२४ जागा लढवल्या तर १४४ येणे शक्य नाहीच. बरं एक ना एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री आणेनच असे वाचन दिले होते तर तो दिवस आजच आणि आत्ताच असा दुराग्रह कशासाठी? हा केवळ "अहंगंड" आहे असे स्पष्ट दिसते आहे.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क गुरुवार, 11/14/2019 - 08:32 नवीन
जेव्हां जेंव्हा निकालात स्पष्टबहुमत नसते व स्पष्ट पराजयही नसतो तेंव्हा कोण चूक कोण बरोबर हा विषयच अस्थानी होतो. तार्किक मुद्देसूदता आकडेमोड याची राजकीय उपयुक्तता संपुष्टात येते. मागील निवडणुकीत युती तोडून शिवसेनेला दुखावले, मेगा भरती करून काँग्रेस व रा काँग्रेसला डिवचले पण उघड पाठिंबा देणाऱ्या(व छुपा विरोध करणाऱ्या) शरदपवारांना ED तर्फे हात लावायचे धाडस करून भाजपने घोडचूक केली व तीन कट्टर विरोधक तयार केले ज्यातील एकालाही भाजपा नको आहे आणी हेच समान सूत्र आहे. त्यामुळे विरोधक एकत्र येणार हे जर कोणी समजून घ्यायला तयार नसेल तर त्यास कमालीची राजकीय अपरिपक्वता म्हटले जाईल. आता फक्त विरोधकांची मोट बांधली कशी जाईल याचेच कुतूहल आहे. भाजपाने परतीचे दोर जवळपास कापूनच टाकले आहेत असे समजू शकतो (समजणे योग्य कारण हे राजकीय प्रकरण आहे व भाजपाही पलटी मारू शकतो पण त्याचे स्वागत कोण करणार हा विषय उरतोच ) .काही लोकं खासगीत असेही म्हणतात की भाजपाला 80 पर्यंत रोखायचेच डावपेच खेळले गेलेत पण भाजपाने तरीही 100 पार केली ही फार मोठी गोष्ट आहे. भाजपा हाय कमांडला याचा अंदाज आधीच आला असल्याने, सुरुवातीलाच सेनेसोबत युती, व निकाला नंतर राममंदिर निकालाची वाट व नंतर राज्यपालांतर्फे भाजपा सोडून इतरांना जुळवाजुळव करायची संधी न देता त्वरित राष्ट्रपती राजवट लागू करणे या खेळया केल्या, मोदी पहिल्यांदा निवडून आले असताना त्या लाटेवर शिवसेनेला लाथाडणारा भाजपा दुसर्यावेळीही मोदी निर्विवादपणे निवडून आल्यावरही सेनेशी अधिकृत निवडणूकपूर्व युती करतो ही गोष्ट पुरेशी बोलकी आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 11/15/2019 - 05:49 नवीन
>निकाला नंतर राममंदिर निकालाची वाट इतका पूर्वग्रह असेल असे वाटले नव्हते मुळात हा निकाल भाजपाला "लोकसभा निवडणुकी पूर्वी हवा होता" त्यावर श्री कपिल सिब्बल यांनी गदारोळ केला त्यानंतर हा निकाल भाजपाला "विधानसभा निवडणुकीपूर्वी हवा होता" तसेही झाले नाही आणि तुम्ही हा निकाल निवडणुकीच्या निकालानंतर म्हणताय? सर्वोच्च न्यायालय हे कुणाच्याही राजकीय फायद्यानुसार चालत नाही हे अनेक वेळेस सिद्ध होऊनहि त्यांचा निवाडा एका य:कश्चित राज्याच्या विधानसभेच्या निकाला नंतर भाजपाला "आणता येतो" असे आपल्याला वाटत असेल तर धन्य आहे.
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Fri, 11/15/2019 - 09:06 नवीन
सर्वोच्च न्यायालय हे कुणाच्याही राजकीय फायद्यानुसार चालत नाही हे अनेक वेळेस सिद्ध होऊनहि माझी नाही पण काही लोकांची अशी चर्चा आहे १४ नवं लाच कसा राहुल गांधी डोस मिळाला ? शिव सेनेच्या अपील ला कोर्टाने लांबणीवर कसे टाकले ? सलमान च्या गाडीचा ड्राइवर कोण ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 11/15/2019 - 14:09 नवीन
१४ नवं लाच कसा राहुल गांधी डोस मिळाला ? १७ नोव्हेंबर ला सरन्यायाधीश श्री रंजन गोगोई निवृत्त होत आहेत यामुळेच १)अयोध्या २) राहुल यांच्या विरुद्धची अवमानना याचिका ३)शबरीमाला, ४) माहिती अधिकार व सरन्यायाधीश कार्यालय आणि ५) राफेल अशा निकाल राखून ठेवलेल्या याचिकांचा निकाल त्या अगोदर दिला गेला आहे. हे सर्वत्र वृत्तपत्रात मोठ्या ठळक बातम्यात येत असताना आपल्याला माहिती नसावे? https://www.indiatoday.in/india/story/action-packed-week-at-sc-with-more-big-verdicts-before-cji-ranjan-gogoi-retires-1618049-2019-11-12 राहिली गोष्ट --शिवसेनेची याचिका --ती जर न्यायालयापुढे सादर केली तरच त्यावर न्यायालय निकाल देईल ना? https://www.indiatoday.in/india/story/shiv-sena-supreme-court-plea-maharashtra-governor-government-formation-1618377-2019-11-13 अभ्यास वाढवा एवढेच मी म्हणेन
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Fri, 11/15/2019 - 14:22 नवीन
१४ नवं लाच कसा राहुल गांधी डोस मिळाला ? आधी वा नन्तर का नाही ? ट्रोल्लिन्ग साठी
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 11/15/2019 - 14:34 नवीन
आपल्याला समजून घ्यायचेच नसेल तर न्यायालयीन प्रक्रियेबद्दल आपल्याला घोर अज्ञान आहे एवढे बोलून मी खाली बसतो.
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Fri, 11/15/2019 - 19:54 नवीन
राहुल गांधी हे 'प्रौढत्वे निज शैशवास जपणे ' या बाण्याचे आहेत. तसे त्यांनी आपल्या बोलण्याने आणि वागण्याने वारंवार सिद्ध केले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ठोठावण्यासाठी बाल दिनाची निवड केली.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 11/16/2019 - 05:23 नवीन
१४ नवं लाच कसा राहुल गांधी डोस मिळाला ? सरन्यायाधीश श्री रंजन गोगोई यांचा काळ आपल्या पदावर राहण्याचा शेवटचा कामाचा दिवस होता. ( अर्थात त्यात त्यांनी कोणताही खटला सुनावणीस घेतला नाही). परंतु ९ तारखेला अयोध्या खटल्याचा निकाल दिल्यानंतर ११ १३ आणि १४ असे फक्त तीन कामाचे दिवस शिल्लक होते त्यात त्यांनी बाकी चार फार महत्त्वाचे खटल्यांचे निकाल दिले. यात राहुल गांधींचा निकाल आणि राफेल चा निकाल हे एकमेकांशी संबंधित होते म्हणून १४ लाच दिला गेला. बाकी एकंदर त्यांची उच्च दर्जाची बुद्धिमत्ता पाहिली तर बाल दिनाच्या दिवशीच त्यांना "ताकीद देऊन" माफी दिली हा काव्यात्मक न्यायच म्हणावा लागेल. कारण एवढं सगळं नाटक होऊनही अजून ते न्या जोसेफ यांच्या निकालपत्रात एक खुसपट काढून राफेल साठी "संयुक्त खासदार समिती" JPC बसवा असेच म्हणत आहेत. काही लोक सुधारणार नाहीत हेच खरं. सुदैवाने भारतीय जनतेने त्यांना आपले पंतप्रधान म्हणून निवडले नाही हि जनतेच्या सुज्ञपणाची ग्वाहीच आहे
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Fri, 11/15/2019 - 11:58 नवीन
की आमचा एक आपण मानलेला पूर्वग्रह सोडून इतर काहीही मतव्यक्त करण्याजोगे सापडू नये. राहिले भाष्य आमच्या (तुम्ही मानलेल्या) पूर्वग्रहाचे, तर इतकेच म्हणेन पूर्वग्रह सोडा आणी अभ्यास वाढवा, म्हणजे वाहत्या गँगेत हात धुणे कशाला म्हणतात हे आपणास आपोआप उमजुन येईल.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 11/15/2019 - 14:15 नवीन
राम मंदिर निकालाची सुनावणी १६ ऑक्टोबर ला पूर्ण झाली आणि यानंतर अभ्यास करून निकाल लिहिण्यासाठी न्यायालयाने निकाल राखून ठेवला. १०४५ पानी निकाल लिहिण्यासाठी हा कालावधी घेतला गेला. त्याचा आणि महाराष्ट्राच्या निवडणूक आणि तिच्या निकालाचा काहीही संबंध नाही. केवळ जोडायचा म्हणून बादरायण संबंध जोडणे हा पूर्वग्रह सोडून दुसरे काहीही नाही. याउपर आपल्याला समजून घ्यायचेच नसेल तर न्यायालयीन प्रक्रियेबद्दल आपल्याला घोर अज्ञान आहे एवढे बोलून मी खाली बसतो.
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Fri, 11/15/2019 - 14:21 नवीन
मान्य ,हि तारीख आधीच ठरली होती
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Fri, 11/15/2019 - 15:12 नवीन
पण ठरलेले न्हवते ते सरकार स्थापन करायचे की नाही याबाबत अधिकृत जाहीर धोरण. आणि त्याअनुषंगाने भाजपाने निकालानंतर काही चाली खेळल्या असतील नसतील हा ही वेगळा मुद्दा पण कोवळ्या बालगोपालासारखे समोरच्याला तुम्हला कोर्टाचे कामकाज समजत नाही म्हणायला उभे राहणे ही गोष्ट हास्यास्पद मानायलाही मी फारच म्हातारा आहे विनोदाच करायचे आहेत तर वेगळा धागा काढाना आम्ही काय तो अपरिशीट केला नाय का कधी ? उगा भाजपाच्या गाढवपणावर तुलनेत कमालीचे मौन आणी शिवसेनेवर उठसूट आसूड, आणि शरद पवार सारख्या मॅच विनर दुर्लक्षित करणे हे सामान्य मतदारांच्या कौलाचा मान राखणे नक्कीच न्हवे
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Fri, 11/15/2019 - 15:15 नवीन
आणि त्याअनुषंगाने भाजपाने निकालानंतर
निकालानंतर च्या जागी 2019 निवडणूक निकालानंतर असे वाचावे
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Fri, 11/15/2019 - 14:47 नवीन
वाहत्या गँगेत हात धुणे म्हणजे काय हे माझे विधान हे दुर्लक्षित करून आपणास लिखाण करत सुटायचे असेल तर याला अज्ञान न्हवे दांभिकता म्हणतात एव्हडे बोलून आशा अर्धवट सिलेक्टिव्ह रीडिंग मतांवर मला उभे राहूनही उत्तर द्यायची गरज भासत भासली नाही हे नमूद करून आता आपण खाली बसावे हेच नम्रपणे सुचवू इच्छितो.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 11/15/2019 - 15:18 नवीन
कहीं कुछ जलने कि बू आ राही है
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sat, 11/16/2019 - 09:05 नवीन
पण ते तर उभ्याउभ्याही होउ शकते हे ही तितकेच खरे.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 11/13/2019 - 06:36 नवीन
एक ना एक दिवस सेनेचा मुख्यमंत्री आणेनच असे म्हणणारे उद्धव बाळासाहेबांचे " कोम्ग्रेसशी कधीच तडजोड करणार नाही " हे वाक्य सोयीस्करपणे विसरतात
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 11/13/2019 - 07:25 नवीन
१. मला तरी असेच वाटतेय की, राकाँ व काँग्रेसच्या सहाय्याने मुख्यमंत्री पद मिळवायचे शिवसेनेने अगोदरच ठरवलेले असावे. अन्यथा निवडणूक निकाल लागण्याची प्रक्रिया चालू असतानाच, सर्व पर्याय खुले असण्याची घोषणा झाली नसती. ती घोषणा, एका प्रदीर्घ घटनेतील एक टप्पा असावी असेच माझे मत बनले. शिवसेनेच्या हातात कोणतीच हुकमाची पाने नव्हती हे आता कळल्यावर, शिवसेनेचा आक्रमकपणा पाहून माझे हे मत जास्त पक्क झालंय. मनसे शिवसेनेचा कट्टर शत्रू. त्यालापण शिवसेनेची मते जाताहेत हे जाणवल्यावर माझा हा संशय जास्तच बळावला. हे तपासायला पुण्याचे उदाहरण पुरेसे आहे. अजून लढवलेल्या जागांवरची टक्केवारी जाहीर झाली नाहीये. ती मिळाली असती तर जास्त पुराव्यानिशी माझे मत मांडता आले असते. असो. २. त्यामुळे जिथे भाजपाचा उमेदवार उभा होता तिथे शिवसेनेची बरीच मते राकाँ व काँग्रेसला गेली आहेत. कारण या दोघांचा निवडणूक निकालानंतर पाठिंबा मिळवायचा असेल तर त्यांचे आमदार निवडून आले पाहिजेत ही तर शिवसेनेचीच गरज बनते व भाजपाचे १४४ आमदार होऊ नयेत ही जबाबदारी ठरते. ह्या दोन्ही गोष्टी पवारसाहेबांच्या फायद्याच्या असल्याने त्यांनीही तोंडभरून आश्वासने दिली असणे शक्य आहे. ३. १९६७ पर्यंत काँग्रेसला विरोधकांची भिती वाटत नव्हती. पण लोहियांची विरोधी पक्षांची युती बनवून काँग्रेस विरोधात एकास एक उमेदवार देण्याची निती यशस्वी होते म्हणल्यावर, विरोधकांची एकजूट होऊ नये यासाठी डावपेच आखणे हे काँग्रेसचे मुख्य धोरण बनले.  त्यानुसारच पवारसाहेब राजकारण करतात व त्यात ते सद्या तरी सर्वात प्रविण आहेत असे वाटते. यावरून महाराष्ट्रात युती भारी पडतेय म्हणल्यावर त्यात फूट पाडणे हेच महाआघाडीचे दिर्घकालीनधोरण असणार यात काही संशय नाही.  थोडक्यात महाराष्ट्रातील निवडणूकांत काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रीत लढणे व शिवसेना व भाजपाने वेगवेगळे लढणे हा एक मार्ग आहे जो महाआघाडीला सत्तेपर्यंत नेऊ शकतो.  जर युती तुटली असेल तर ती फक्त ताणली जात राहील एवढेच फक्त पहावयाचे आहे व परत जोडली जाऊ नये यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. त्यासाठी शिवसेनेचे सरकार यावयाची जरूरी नाही. ४. परत निवडणुका झाल्या तर त्या शिवसेना व भाजपाने एकत्रीत लढवू नयेत एवढीच महाआघाडीची इच्छा किंवा धेय्य असावे असे वाटतेय. यासाठी प्रथम राज यांना बाजूला केले. या राजच्या त्रासातून शिवसेना खूप मागे खेचली गेली. बाळासाहेबांची पुण्याईही कामी येऊ शकली नाही. त्याचा फायदा त्यांना २०१४ पर्यंत झाला. फोडा व झोडा पध्दतीत नेहमी रागीट माणसाला हाताशी धरले जाते. कारण रागाच्या भरात त्याच्यावर कबजा मिळवणे सोपे असते. त्यामुळे यावेळी राऊतांद्वारे शिवसेनेला जाळ्यात पकडण्यात आलेय. राऊतांवरचा ऊध्वजींचा विश्वास हे हत्यार वापरले गेलंय. ५. पण मोदी उदयानंतर सगळंच गणित फिसकटायला लागलेय. शिवसेनेच्या बळावर मोठे होण्याची अगतिकता भाजपाची राहिलेली नाही. भाजपचे वाढते बळ त्याचा पुरावा आहे. त्यामुळे परत निवडणुका झाल्या व शिवसेना वेगळी लढली तर त्यांची आघाडीला गेलेली मते परत फिरतील.  भाजपकडे यावेळेस इच्छूक जास्त झाले होते व जागा २०१४ पेक्षा कमी झाल्या होत्या. पण परत निवडणुका झाल्यास, लढायच्या जागा १५६ वरून २८८ झाल्यामुळे बंडखोरांचा प्रश्न सुटेल. भाजपातील लाॅयल कार्यकर्ते त्यामुळे खुष झाल्याने पुढच्या निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढेल, जी शहांची नेहमीचीच रणनिती आहे. ६. जर शिवसेनेने पुढील निवडणुकीत महाआघाडीशी हात मिळवणी केली तर भाजपाला ते हवेच असेल. ध्रुविकरण भाजपाला नेहमीच फायद्याचे ठरत आले आहे.  काँग्रेस विरोधातील आपला अवकाश शिवसेना आपणहून सोडून देत असेल तर भाजपा नक्कीच खूष होईल. भाजपा यापध्दतीनेच मोठी होत आली आहे. मात्र यासाठी संधीची वाट बघत बसायला लागते व त्यासाठी खूप पेशन्स लागतो. तो मोदी शहांकडे नक्कीच आहे असे वाटते. ७. थोडक्यात, भाजपा, काँग्रेस व राकाँ यांचे पुढील धोरण निव्वळ वेळकाढूपणाचे असेल असे वाटते. यासाठी एखादी कोर्टकेस वगैरे सारखा उपाय योजणे हा मार्ग मस्त. जो काँग्रेस नेहमीच अवलंबते. फक्त कोणाकडे तरी बोट दाखवता आले की झाले. राऊतांनी बोलणी पवारांशी केली. ते आता पवारांकडे बोट दाखवत असतील. पवार बोट दाखवताहेत काँग्रेसकडे. काँग्रेस बोट दाखवतीय केरळ काँग्रेसकडे. ८. पण जास्तीचं काहीही न देता शिवसेना जवळ येत असेल तर भाजपा ही संधी साधेल असं वाटते. दीड दोन महिने फडवणीस संपले संपले असं वाटत असताना परत उभे राहतात, असं बऱ्याच वेळेस झालंय. यावेळेसही हे होऊशकते. यावेळेसही फडणवीस यांनी समारोपाच्या वेळी युतीच सरकार बनवेल असं म्हणूनच ते थांबले आहेत. ९. असंच होणं योग्य असेल. कारण राजकारणात डाव ओळखून प्रतिडाव टाकावा लागतो. बाकी सगळे गौण याचे भान राखावे लागते. जर युती तुटावी हा डाव असेल तर युती टिकवनणे हाच प्रतिडाव असतो. शिवसेना कशी वागली याबाबत सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांना येणारा राग नेत्यांना पोटात ठेवावा लागतो. भाजप पुढेमागे युती तोडेलही. पण ती सोयीची वेळ ते ठरवतील. पवार साहेबांनी त्यांच्या सोयीने निवडलेली वेळ भाजपाने साधणे शहाणपणाचे ठरणार नाही. अर्थात हे सर्व राजकारणी माझ्यापेक्षा नक्कीच हुषार असणार म्हणा. :)
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे Wed, 11/13/2019 - 07:55 नवीन
मस्त आवडले पटले
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 11/13/2019 - 08:16 नवीन
चांगल्या पद्धतीनं मांडलेला अन्वयार्थ! पटतोय! :-) अडचण अशी आहे की साहेबांनी आपली वाक्यं फिरवली तर नवल वाटणार नाही. ते नेहमीच एखादी पळवाट बाळगतात परत फिरण्यासाठी. राजकीय कोलांटउड्या त्यांच्यासाठी नव्या नाहीत. सेनेचे तसे नाही. त्यांनी आक्रमकता एवढी दाखवली आणि त्यात इतकं बोलून गेलेत, की त्यातून परत मागे फिरणे म्हणजे सपशेल हार मानणे यावर शिक्कामोर्तब होईल. परत फिरायला वाट न ठेवल्यामुळे सेनेची स्थिती अडचणीची झालीये. सेनेला परत भाजपाकडे जायचं असेल तर आता त्यांना भाजपाच्या अटी मान्य कराव्या लागतील, जे काही फार सुखावह नसणार. अर्थात् तुम्ही म्हणता तसा, सेनेनं ठरवून असा प्रयत्न केलेला असेल तर ते ठीकच आहे. पण मग या पेक्षा ते एकला चलो रे मधे असते तर जास्त बरे झाले असते. कॉ/राकॉ सोबत जाऊन त्यांनी भाजपाला रान मोकळं दिल्यासारखं होईल. एकुणात सेनेला आणि भाजपला जास्त वाढू न देण्याचे साहेबांचे डावपेच यशस्वी ठरतांना दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
ओ
ओम शतानन्द Mon, 11/18/2019 - 16:47 नवीन
शरद पवारान्चे आजचे बोलणे ऐकुन शिव्सेना नक्की हताश झाली अस्णार
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 11/19/2019 - 07:05 नवीन
श्री शरद पवार यानी पत्रकारांना खूष ठेवून( कोट्यातून घरे देणे सारख्या अनेक गोष्टी करून) प्रकाशझोतात राहण्याची कला चांगली साधली आहे. अन्यथा त्यांच्या इतका overrated (अवाजवी महत्त्व दिला गेलेला) राजकारणी देशात दुसरा नसेल. साहेब काहीही करू शकतात इतके भंपक वाक्य दुसरे नसेल. स्वतः तीन वेळेस मुख्यमंत्री झाले पण एकंदर कारकीर्द ६ वर्षेच होती. एकाही कारकिर्दीत सलग पाच वर्षे काही त्यांना पूर्ण करता आलेली नाहीत एवढेच नव्हे तर आयुष्यात एकदाही त्यांना स्वबळावर बहुमत मिळेल एवढे आमदार काही निवडून आणता आलेले नाही. इतक्या वेळेस त्यांनी दिल्लीत वाऱ्या केल्या आणि श्रीमती सोनिया गांधी यांच्या भेटी घेतल्या पण सोनिया गांधीनी काही त्यांना भीक घातलेली नाही. त्यामुळे संदिग्ध वाक्ये बोलून मीडिया तर्फे आपला उदो उदो त्यांनी चालवला आहे. त्यां च्याकडून काहीही ठोस येत नाही हे पाहून शिवसेनेला तोंडघशी पडल्याची भावना आलेली आहे आणि त्यांचे अनेक आमदार अस्वस्थ झालेले आहेत.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Tue, 11/19/2019 - 07:32 नवीन
साहेब काहीही करू शकतात इतके भंपक वाक्य दुसरे नसेल. सहमत.
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Tue, 11/19/2019 - 08:35 नवीन
मुख्य मंत्री पदाची टर्म बाकी लोकांना पण करता नव्हती आली त्यात मनोहर जोशी ,अशोक चव्हाण व बाकी दिग्गज होते स्वबळावर आमदार निवडून आणणे फडणवीस ह्यांना पण एकदपण जमले नाही ते पण मोदींचा पाठिंबा असताना दर वेळी टेकू लागला
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 11/19/2019 - 15:14 नवीन
हो पण मनोहर जोशी, अशोक चव्हाण किंवा फडणवीस काहीहि करू शकतात असा त्यांच्या कट्टर समर्थकांचाही दावा नव्हता किंवा त्यांचा असा उदो उदो झालेला नाही.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Tue, 11/19/2019 - 19:09 नवीन
He will be back, no worries!
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Wed, 11/20/2019 - 10:32 नवीन
आज पण लोकमत ला साहेबांचाच उदो उदो
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 11/13/2019 - 10:13 नवीन
8 आणि 9 क्रमांक सोडून बाकी मुद्द्यांशी सहमत
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 11/13/2019 - 10:18 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 11/13/2019 - 10:27 नवीन
मध्यंतरी मिपा वर नव्हतो .. पण आपल्या प्रतिक्रिया संयमित वाटतात ... बाकी कोणी कोणत्याही पक्षाला समर्थन करत असेल , कोणत्या हि नेत्याला समर्थन करीत असेल तरी आपण संतुलित बोलले पाहिजे हे यातून दिसतेच. Mate भिन्न असणे म्हणजे वाईट नक्कीच नाही .. त्यामुळे संतुलित प्रतिक्रिया , टोकाची भांडणे नसणे, हि चर्चे ची चांगली लक्षणे आहेत
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 11/13/2019 - 11:38 नवीन
खर आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 11/13/2019 - 10:22 नवीन
आणि मुद्दा क्रमांक 4 मध्ये वंचित चा मुद्दा राहिला . जसे राज che उदा , फोडा फोडी तडजोडी ची उदा आहेत .. जसा डाव आघाडी खेळली , तसाच डाव भाजपा वंचित च्या माध्यमातून खेळली असे पण नमूद करतो ...नाहीतर भाजपा चे आणखीन नुकसान हे नक्की झाले असते ..
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 11/13/2019 - 11:43 नवीन
लढवलेल्या जागांनुसार पक्षांची टक्केवारीची वाट बघतोय. मग नक्की सांगता येईल. वंचितचा फायदा झाला असू शकेल पण बंडखोरीचे नुकसान त्यापेक्षा जास्त असावे हा एक अंदाज आहे. मला अभ्यास करायला लागेल. :)
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 11/19/2019 - 11:04 नवीन
वेगळाच धागा काढतोय. २०१९ ची विधानसभा निवडणूक, मतदान टक्केवारी. तिथेच चर्चा करूयांत.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 11/14/2019 - 04:47 नवीन
१. मला तरी असेच वाटतेय की, राकाँ व काँग्रेसच्या सहाय्याने मुख्यमंत्री पद मिळवायचे शिवसेनेने अगोदरच ठरवलेले असावे.
असे काही नसावे. सत्तासुंदरी प्राप्त करण्यासाठी वेळ येईल तसे राजकारणी बदलतात. ठरवून असेच होईल मग मी तसेच करेन असे कधी होत नाही. त्यातही शक्यत इतक्या असतात अन इतक्या लवकर बदलतात की ते काय करत आहेत हे त्यांनाही समजत नाही. ( आकाशातला बाप त्यांना क्षमा करो.)
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 11/19/2019 - 11:05 नवीन
वेगळाच धागा काढतोय. २०१९ ची विधानसभा निवडणूक, मतदान टक्केवारी. तिथेच चर्चा करूयांत.
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Wed, 11/13/2019 - 08:18 नवीन
हा विडिओ निवडणुकीच्या धामधुकीत शिव सेनेने ने पाहणे शक्य नाही ,हा विडिओ मागचे १५ दिवस पण कोणाला सापडला नव्हता
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 11/13/2019 - 08:31 नवीन
अजून कोणाला पण सापडला नव्हता, म्हंजे नक्की कोणाला? जर माझ्यासारख्या सामान्य माणसाला लक्षात राहू शकतो, तर एवढ्या मोठ्या राजकीय पक्षाला, त्यांच्या थिंक टँकला, कार्यकर्त्यांना लक्षात राहणार नाही असं तुम्हाला म्हणायचंय काय?
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे गुरुवार, 11/14/2019 - 04:19 नवीन
राजकिय पक्षाला हजार डोळे हजार कान असतात. त्यामुळे शिवसेनेला हा विडीओ माहित होता तो सुद्धा भाजप अध्यक्षाचा होता कोणा ऐ-यागै-याचा नव्हता
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Wed, 11/13/2019 - 08:37 नवीन
तुमच्या केव्हा लक्षात राहिला ? मागचे १५ दिवस दिसला कोणाला हा विडिओ ? काल viral झालाय ,त्याच्या आधी दाखवा मागच्या १५ दिवसात
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 11/13/2019 - 10:18 नवीन
हाहा.. हे चांगले आहे. मुलाखत कधीही दिलेली असो, वायरल कधी झाले ते महत्त्वाचे. शाह तर वर्षभरा पूर्वीच म्हणाले होते की निवडणूक एकट्याने लढवावी. मग तरीही सेना विश्वास का ठेवते त्यांच्यावर? दबावाचा वापर करून या ना त्या प्रकारे फायदा लाटण्याचा हा प्रकार आहे. असो. आता घोडेबाजार जवळच आहे. बघूयात.
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Wed, 11/13/2019 - 11:09 नवीन
मुद्दा हा आहे कि हा विडिओ एवढ्या दिवसात कोणाला माहीत पण नव्हता ,भांडण झाले तेव्हा पण नाही ,मग शिव सेनेला कुठून दिसणार जर तुम्हाला एवढे दिवस दिसला नाही व काल अचानक दिसला
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 11/13/2019 - 17:49 नवीन
आज संध्याकाळी ए एन आय ला अमित शहांनी दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक प्रचारसभेत देवेंद्र फडणविसच मुख्यमंत्री असतील याची वाच्यता केली असताना शिवसेनेने एकदाही हरकत का घेतली नाही असा प्रश्न उपस्थित केला आणि आत्ता थोड्या वेळा पुर्वी उद्धव ठाकरे उपस्थित असलेल्या जाहिर सभेत देवेंंद्र फडणविस मुख्यमंत्री असतील हे सांगणारे मोदींच्या भाषणाची ऑडीओ भाजपा प्रवक्ते संबित पात्रांनी रिपब्लिक टिव्हीवर वाजवून दाखवली. त्या शिवाय आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्याची पोस्टर्स निवडणूक निकालानंतरच कशी काय लावली गेली हा देखिल प्रश्न उपस्थित केला.
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Wed, 11/13/2019 - 09:05 नवीन
https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE/word गोमा गणेश पितळी दरवाजा
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 11/13/2019 - 18:07 नवीन
अनेक आभार
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 11/13/2019 - 16:40 नवीन
महाराष्ट्रीय जनतेशी हि फसवा फसवी का चालू आहे ? अहो हे सगळं जनतेच्या भल्यासाठी आणि शेतकर्‍यांच्या हितासाठी चालु आहे, इतकी साधी गोष्ट कळतं नाही ? :))) ५ वर्ष युतीत सडुन दाखवले, मग राजिनामे खिशातच ठेवुन दाखवले, अफजखानाची फौज असे कोणी तरी कोणाला तरी म्हणुन दाखवले इ.इ.इ आणि अनेक ! आता फक्त कुंथुन दाखवले हेच म्हणायचे बाकी ठेवले आहे ! :))) बादवे... वाचाळवीरता करायला मेंदु वापरावा लागतच नाही, हे अनेक { सर्व पक्षिय बरे का ! ] नेत्यांना २०२० समोर येउन ठेकले आहे तरी अजुन समजत नाहीये... :))) असो... भाजपा आयटीसेल काम करतोय हे असे व्हिडियो "वेळेवर" पसरले की लगेच समजते ! हा गुण त्यांच्याकडुन घेण्यासारखा आहे. हे बघा मंडळी कोण खरं आणि कोण खोटं ते मला काय बी समजत नाय बघा, म्या पडलो अडाणी माणुस... हल्लीच मी खोट बोलणारी अवलाद नाही अशी कोणी तरी स्वत: बद्धल बतावणी केल्याची अफवा माझ्या कानावर पडली होती ! अजुनही मला कळतं नाही की वरचं खरं की सध्या चाललयं ते खरं ? :))) जाता जाता :- अजित पवार पहिले अडीच वर्ष मुख्यमंत्री होतील आणि नंतरच्या अडीच वर्षाचे गाजर कोणाला तरी देण्यात येइल, शिवाय गॄहमंत्री पद आणि महसुल मंत्री पद देखिल कॉग्रेस आणि राष्ट्रवादीकडे जाईल असे होउ शकेल का ? तुम्ही विचार करुन बघा ! ;) { टिपी म्हणुन हो... }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hara Hara Hara Hara Mahadev | Naan Kadavul | Ilaiyaraaja Live In Concert Singapore
  • Log in or register to post comments
ढ
ढब्ब्या Wed, 11/13/2019 - 16:45 नवीन
माझ्या मते युती तोडणे हि शिवसेनेची गरज आहे. मुळात त्यांन्नी ती निवडणूकीच्या आधीच तोडणे अपेक्शीत होते, पण आघाडी बनल्यामुळे त्यांच्यासमोर युती करण्याशिवाय पर्याय ऊरला नाही. शिवसेना हा प्रादेशीक पक्ष आहे, त्यात आता छोटा भाऊ बनल्याने युतीत राहून हळूहळू पक्ष अस्ताला जाण्याची शक्यता जास्त. त्यापेक्षा एकदाच फारकत घेऊन आणी त्याची पुढच्या निवडणूकीत किंमत मोजून पुढे सरकणे ठाकरेंना जास्त सोयीचे वाटले असेल. ह्या सगळ्या खेळात रा.कॉ. आणी काँ. मात्र खुष असतील, पुन्हा निवडणूका झाल्यास आणी सेना भाजप वेगळे लढलयास आघाडीला पेपर सोपा जाईल.
  • Log in or register to post comments
म
मनो Wed, 11/13/2019 - 16:59 नवीन
एक गोष्ट आज दिसते आहे की छगन भुजबळ राष्ट्रवादीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. अजितदादा पवार यांचा राग त्यामुळेच आहे. शरद पवार एक दगडात अनेक पक्षी त्यातून मारणार आहेत. सेना हा अपमान सत्तेसाठी कसा मुकाट्याने झेलते अथवा नाही हे पाहण्यासारखे असेल. या सरकारचा रिमोट कुणाच्या हातात असेल आणि त्या तालावर कुणाला नाचावे लागेल याबद्दल कोणतीही शंका आता राहणार नाही.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 11/13/2019 - 17:56 नवीन
हा व्हिडीओ 13 व्या मिनिटाला मराठी मधून नंतर 16 व्या मिनिटापासून 2 मिनिटे हिंदीतून फडणवीसचे ऐका, 27 व्या मिनिटाला उध्दवच्या तोंडून ऐका. हे लोकसभा इलेक्शनच्या वेळी युती झाली तेव्हा आहे. त्यावेळी कोणी ऑब्जेक्शन घेतले नाही कारण भाजप ला गरज होती. गरज सरो वैद्य मरो या उक्ती नुसार लोकसभेची गरज संपल्यावर सेनेला बाजू केले.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा