शिवसेनेची झोप की जाणिवपुर्वक राजकीय गोगपिद?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान २१ ऑक्टोबर २०१९ निकाल २४ ऑक्टोबर २०१९ . २४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत भाजपा आणि शिवसेना युतीस मतदान करणारी जनता दोहोत अगदीच सरकार बनु न शकण्या इतपत काही बिनसण्याची शक्यता आहे याबद्दल महाराष्ट्रीय सर्वसामान्य जनता अनभिज्ञ होती की मतदार बावळट होता ?
२४ ऑक्टोबर नंतर शिवसेना नेते ५०:५० फॉर्म्युलॅच्या गोष्टी करतात भाजपा अध्यक्ष अमित शहांनी आश्वासन दिल्याचे म्हणतात. पण एकुण वाक्य रचनेवरुन मुख्यमंत्रीपद्दवर ५०:५० टक्के करण्याचे आश्वासन न देता अस्पष्टता ठेवली असण्याची शक्यता असू शकते. एखादी गोष्ट स्पष्ट न करणे यास मराठीत गोगपिद (गोमा गणेश पितळी दरवाजा) असा वाक्प्रचार आहे. शिवसेना नेतृत्वासोबत बोलताना अमित शहांनी गोगपिद केले असेल किंवा नसेल पण त्यानंतर म्हणजे १३ ऑक्टोबर २०१९ चा टाईम्स नाऊ या इंग्रजी टिव्ही चॅनलवरची अमित शहांची मुलाखत व्हिडीओ पुढे आला आहे ज्यात ३८मिनीटे ३८ सेकंदपासून पत्रकार नाविका कुमार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण असतील तर अमित शहा केवळ देवेंद्र फडणविसच असतील हे अत्यंत सुस्पष्टपणे सांगताना दिसतात.
सर्वसामान्य मतदाराने दोघांचेही मुख्यमंत्रीपदी दावे ऐकले तरी गोष्टी न ताणता तोडगे निघतील कुणितरी नमते घेईल असाच सर्वसामान्य मतदार विचार करेल. पण ज्यांना आपल्या भूमिका टोकाच्या आहेत हे माहित असते त्यांना १३ ऑक्टोबर पर्यंत परस्परांच्या भुमिका जुळत नाहीत आणि टोकाच्या आहेत त्यांनी त्या टोकाच्या आहेत हे जनतेस / मतदारांना सुस्प्ष्टपणे का नाही सांगितले असा प्रश्न आहेच. अमित शहांना आधी माहित नसेल तरी १३ ऑक्टोबरला टाईम्स नाऊ पत्रकाराकडून आदीत्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावरील दाव्या बाबत समजलेले होते. आणि अमित शहांच्या मुलाखतीची वार्ता शिवसेना प्रमुखांच्या कानावर गेली असणार त्यांनी मतदारांना तोंडघशी घालण्यापुर्वी आपापसात चर्चा का केली नाही ? हा प्रश्न व्हॅलिड रहातोच पण..
शिवसेना प्रमुख निकाला नंतर ज्या पत्रकार परिषदा घेत फिरत आहेत त्या एकाही पत्रकार परिषदेत १३ ऑक्टोबरच्या अमितशहांच्या मुलाखतीतील भूमिकेचा उल्लेख का करत नाहीत ?
सर्वसामान्य जनतेचे सर्वच राजकीय भाष्यांवर लक्ष नसेल पण शिवसेनेच्या राजकीय नेतृत्वापैकी कुणाचेच लक्ष नसेल तर १३ ऑक्टोबर पासून झोपले होते किंवा १३ ऑक्टोबरची मुलाखत जनतेपासून सोईस्कर लपवत आहेत ? महाराष्ट्रीय जनतेशी हि फसवा फसवी का चालू आहे ?
३८ व्या मिनीटापासून पुढे पहावे
🗣 चर्चा
(204)
म
माहितगार
Wed, 11/13/2019 - 18:25
नवीन
गूड , आता या परस्पर विरोधी दाव्यांची गोळा बेरीज मतदारांनी आणि महाराष्ट्रीय जनतेने कशी करावी
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 11/14/2019 - 08:24
नवीन
हा vedio येथे दिल्याने धन्यवाद .
खरे तर हा vedio पण मुळ धाग्या ला वरती चिकटवला पाहिजे .
आता पर्यंत मला वयक्तिक शिवसेना कदाचीत खोटे बोलते आहे अशी शंका येतो होती ..
भाजपा पेक्षा शिवसेना च जास्त चुकीची वाटत होती .
ह्या vedio नंतर माझे मत पुर्ण वेगळे झालेले आहे
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 11/14/2019 - 09:24
नवीन
उद्धव ठाकरे = पुरुषोत्तम राम आणि अमित शहा = चाणक्य कृष्ण ?
असे कूणा कुणाला वाटतय ?
ज्यांना असे वाटते त्यांच्यासाठी प्रश्न
पुरुषोत्तम राम आणि चाणक्य कृष्ण समोरासमोर आल्यास बरोबर कोण या यक्ष प्रश्नाचे हिंदूत्वीय उत्तर काय ?
- Log in or register to post comments
ज
जॉनविक्क
गुरुवार, 11/14/2019 - 09:30
नवीन
मार्ग तुलनेने गौण बाब.
- Log in or register to post comments
ज
जॉनविक्क
गुरुवार, 11/14/2019 - 09:39
नवीन
तुम्ही तितके महापराक्रमी नसाल कृष्णनीती वापरावी लागेल.
बाकी रामावर द्यूत खेळात अन्याय झालाअसता हे सत्य पण त्याने पत्नीस पणाला कधीही लावले नसते हे ही तितकेच सत्य कारण त्याने प्रसंगी चुकीचे असूनही विवेकपूर्ण निर्णयच घेतले, उदा. एकपत्नीव्रत , धोब्यामुळे सीतेला पुन्हा वनात सोडणे, वनवासात जायचा निर्णय घेणे, वालीचा वध करणे वगैरे वगैरे वगैरे...
थोडक्यात **मधे लिटरली दम नसेल तर रामासारखे आचरण ठेवायचा सामान्य व्यक्तीने प्रयत्न करू नये, असेल तर कृष्णासारखा कपटीपणा दाखवू नये इतके साधे सोपे उत्तर आपल्या यक्षप्रश्नाचे आहे.
- Log in or register to post comments
ह
हस्तर
गुरुवार, 11/14/2019 - 09:30
नवीन
रामकृष्ण परमहंस
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 11/14/2019 - 09:47
नवीन
तुम्ही हे का बोलता आहात तेच कळाले नाही ..
Vedio मुळे कोण खरे खोटे बोलते ते कळाले .
खरे बोलणारा राम च असतो असे काही नाही
आणि राजकारण करणारा कृष्ण असतो असे हि काही नाही ...
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 11/14/2019 - 10:15
नवीन
:) तुमची आणि जॉन विक्कंची उत्तरे आवडली
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 11/13/2019 - 18:29
नवीन
सुबोध खरे, शाम भागवत आणि मदनबाण या तिघांचेही प्रतिसाद आवडले
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
गुरुवार, 11/14/2019 - 05:07
नवीन
दैनिक सकाळमधली ही ९ नोव्हेंबरची बातमी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा डाव: उद्धव ठाकरे
लोकसभेच्यावेळी मी युतीसाठी दिल्लीला गेलो नव्हतो, ते मुंबईत आले होते. चर्चेत आम्हाला उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला होता. मात्र मी त्यास नकार दिला. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे मी बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिले होते. याची आठवण शहा यांना करून दिली असता त्यांनी ते मान्य केले. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत बसून ही चर्चा झाली होती. नंतर अमित शहांनी फडणवीसांना याबाबत माहिती दिली. भाजपत याबाबत नाराजी पसरू नये यासाठी आत्ता ही माहिती जाहीर करू नका. वेळ आली की मी माझ्या पक्षाला सांगेन, असे फडणवीस म्हणाले. आता ते शब्दखेळ करण्यात हुशार आहेत. त्याचा अनुभव मी आत्ता घेतला. हे आम्हाला गोड बोलून संपवण्याचा प्रयत्न करत होते. देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र होते. त्यांच्याकडून मला हे अपेक्षित नव्हते."
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
उद्धव यांच्या सदर दाव्याचे खंडन देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे अजुन वाचायला मिळाले नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
गुरुवार, 11/14/2019 - 05:07
नवीन
दैनिक सकाळमधली ही ९ नोव्हेंबरची बातमी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा डाव: उद्धव ठाकरे
लोकसभेच्यावेळी मी युतीसाठी दिल्लीला गेलो नव्हतो, ते मुंबईत आले होते. चर्चेत आम्हाला उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला होता. मात्र मी त्यास नकार दिला. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे मी बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिले होते. याची आठवण शहा यांना करून दिली असता त्यांनी ते मान्य केले. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत बसून ही चर्चा झाली होती. नंतर अमित शहांनी फडणवीसांना याबाबत माहिती दिली. भाजपत याबाबत नाराजी पसरू नये यासाठी आत्ता ही माहिती जाहीर करू नका. वेळ आली की मी माझ्या पक्षाला सांगेन, असे फडणवीस म्हणाले. आता ते शब्दखेळ करण्यात हुशार आहेत. त्याचा अनुभव मी आत्ता घेतला. हे आम्हाला गोड बोलून संपवण्याचा प्रयत्न करत होते. देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र होते. त्यांच्याकडून मला हे अपेक्षित नव्हते."
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
उद्धव यांच्या सदर दाव्याचे खंडन देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे अजुन वाचायला मिळाले नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
गुरुवार, 11/14/2019 - 05:07
नवीन
दैनिक सकाळमधली ही ९ नोव्हेंबरची बातमी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा डाव: उद्धव ठाकरे
लोकसभेच्यावेळी मी युतीसाठी दिल्लीला गेलो नव्हतो, ते मुंबईत आले होते. चर्चेत आम्हाला उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला होता. मात्र मी त्यास नकार दिला. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे मी बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिले होते. याची आठवण शहा यांना करून दिली असता त्यांनी ते मान्य केले. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत बसून ही चर्चा झाली होती. नंतर अमित शहांनी फडणवीसांना याबाबत माहिती दिली. भाजपत याबाबत नाराजी पसरू नये यासाठी आत्ता ही माहिती जाहीर करू नका. वेळ आली की मी माझ्या पक्षाला सांगेन, असे फडणवीस म्हणाले. आता ते शब्दखेळ करण्यात हुशार आहेत. त्याचा अनुभव मी आत्ता घेतला. हे आम्हाला गोड बोलून संपवण्याचा प्रयत्न करत होते. देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र होते. त्यांच्याकडून मला हे अपेक्षित नव्हते."
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
उद्धव यांच्या सदर दाव्याचे खंडन देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे अजुन वाचायला मिळाले नाही.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 11/14/2019 - 08:13
नवीन
उद्धव यांच्या सदर दाव्याचे खंडन देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे अजुन वाचायला मिळाले नाही.
संजय राऊत सामन्यातून ( जे शिवसेनेचे अधिकृत मुखपत्र आहे) गेली पाच वर्षे दर एक दिवसाआड भंपक दावे करत आले आहेत .
त्याचे खंडन करत बसले तर राज्य कसं चालवायचं.
तिथे केंद्रात श्री राहुल गांधी राफेल मध्ये घोटाळा झाला म्हणून दोन वर्षे कंठशोष करत आले.
त्यांचा प्रत्येक दावा फेटाळत बसले असते तर आतापर्यंत राफेल कागदावरच राहिले असते.
शेवटी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सज्जड दम देऊन गप्प बसवले आहे.
SC lets off Rahul Gandhi in contempt case, but makes serious comments against former Congress chief
https://www.firstpost.com/india/supreme-court-verdict-live-updates-cji-ranjan-gogoi-rafale-sabarimala-case-review-petitions-today-latest-news-7644551.html
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
गुरुवार, 11/14/2019 - 05:58
नवीन
जनता जनार्दन ने डिंग्या मारणाऱ्या भापा आणि सेनेला एका फटक्यात भुतलावर उतरवले आणि आयुष्यात पुन्हा महाराष्ट्राचे एग्जिट पोल करणार नाहीत इतपत चॅनेल वाल्यांचे डोळे पांढरे केले .
भापा आणि सेना आता पर्यंत स्वबळा वर कधीच सत्ता स्थापन करू शकली नाही व त्यांना युती करण्याशिवाय पर्याय नाही तरी ते पाया ची नखे जमीन वर खरडून एकमेंकावर भूंकत आहे आणि त्यांचे तमाम समर्थक सोशल मिडियावर आपलाच पक्ष कसा योग्य आहे हे दुसऱ्याला शब्दलांछन करुन पटवून देत आहे .
30 वर्ष एकत्र राहून एकमेंकाना संपविन्यासाठी अनैसर्गिक युती करण्याचा प्रयत्न दोघांनी केला , तरी 'आमचाच पक्ष खरा !!! ' यावरून वाद .
मी तर या दोन्ही पक्षाला वठणी वर आणण्यासाठी यांच्या विरोधातच मतदान करणार .
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
गुरुवार, 11/14/2019 - 06:02
नवीन
मस्त ध्रुविकरण सुरू झालय.
:)
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
गुरुवार, 11/14/2019 - 07:55
नवीन
होणारच !!!
भापा सेने ने क़ाय दिवे लावले आहेत ते आपण पाहतोय , मग मतदारांनीं समंजसपणा का दाखवावा ???
घरकाम करणारे , रिक्शावाला , दूकानदार अशा ज्या लोकांशी आपला दैनंदिन संपर्क येतो त्यांच्या समोर भापा सेने चा विषय काढला की बघा कसे ते दोन्ही पक्षानां कचा कच शिव्या घालतात !!!!!
आणि मला तर वाटतंय एग्जिट पोल वाल्यांनीं मिपावरील भाजप समर्थकांचे प्रतिसाद वाचून सर्वे केला असेल म्हणून तोंडावर पडले असतील :) :) :)
कट्टर मुस्लिम देशानीं वेढलेल्या ईसरायल मध्ये सुद्धा खुप मुश्किल ने एखादी पार्टी बहुमत ने सरकार स्थापन करण्यात यशश्वी होते .
आताचे पंतप्रधान सुद्धा बहुमत सिद्ध करण्यात सिद्ध करू शकले नाही .
थोडक्यात सोशल मीडियाने फक्त मोदीजीनां पुन्हा संधी दिली पण फर्नांडिस आणि आठा / उठा ला ग्राउडं रियालीटी ओळखूनच घटस्फोट घ्यावा !!!
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 11/14/2019 - 09:17
नवीन
:)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 11/14/2019 - 07:04
नवीन
वाचतोय.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 11/14/2019 - 10:41
नवीन
प्रा.डॉ. सरांनी म्हटल्याप्रमाणे उत्तम चर्चा झाली आहे. खरे तर हा धागा काढण्या आधी काही पुढचे प्रश्न मला पडले होते. इतर धाग्यांवर चर्चा झाली आहे का माहीत नाही. झाली असल्यास दुवे द्यावेत नसल्यास उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा.
* असे गृहीत धरा की शिवसेना + राष्ट्रवादी + काँग्रेस आघाडी बनवून सत्तेत येण्यास यशस्वी होतात
१) पण धर्मनिरपेक्षता वाद आणि हिंदूत्व विषयक भूमिका संसदेत परस्पर विरोधी मतदान आणि भुमिका घेतात असे झाल्यास काँग्रेसच्या पुढच्या लोकसभेतील निवडणूकीत -आणि ज्या राज्यांमध्ये अद्याप काँग्रेस सरकारे निवडून येतात- त्यांचा हक्काचा अल्पसंख्यांक मतदार वर्ग काँग्रेस सोबत राहील की काँग्रेसची साथ सोडण्याची शक्यता वाढेल
२) समजा काँग्रेसने राष्ट्रीयस्तरावर शिवसेनेस वेगळी हिंदूत्ववादी भूमिका घेण्यास प्रोत्साहन देऊन लोकसभेत भाजपा विरुद्ध शिवसेनेचे उमेदवारही उभे केले तर (महाराष्ट्रा व्यतरीक्त ) इतर राज्यातील किती हिंदूत्ववादी मतदार वर्ग उद्धव ठाकरेंच्या बळावर काँग्रेस फोडू शकेल.
३) जर शिवसेनेचा हिंदूत्ववाद चुकीचा नाही तर संघ आणि भाजपाचा हिंदूत्ववाद चुकीचा कसा याचे कोणते उत्तर काँग्रेस पुढील काळात पुढे करेल - या मुद्द्यावर शिवसेना काँग्रेस सोबत जाऊनही काँग्रेसचा प्रचार खोडण्यात भाजपाला मदत होईल का ?
४) दुसर्या बाजूस शिवसेनेच्या हिंदूत्ववादाशी काँग्रेससाठी तडजोड केल्यास महाराष्ट्रात शिवसेनेचा किती हिंदूत्ववादी मतदार तरी सुद्धा शिवसेने सोबत राहील किती भाजपाकडे वळेल ?
५) धर्मनिरपेक्ष असलेले इतर दोन पक्ष पर्याय उपलब्ध असताना नव्याने अंशतः धर्मनिरपेक्ष होऊ घातलेल्या शिवसेनेच्या वेगळ्या अवताराची / पर्यायाची महाराष्ट्रार राकॉ आणि काँग्रेसला स्पर्धा होईल की शिवसेनाच मागे पडेल
बेसिकली या नव्या होऊ घातलेल्या राजकीय समिकरणाने कुणाची कोणती घरे आणि कोणते घाट बदलतील
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Fri, 11/15/2019 - 03:31
नवीन
शिवसेनेने किंवा कोणत्याही पक्षाने येथली चर्चा तिर्हाईत दृष्टीने वाचायला हवी. योग्य अंजन डोळ्यात जाईल.
(बाकी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाला कोणीही वाली राहिला नाही याची खंत आहे)
- Log in or register to post comments
P
prahappy
Fri, 11/15/2019 - 03:50
नवीन
काही अनुत्तरीत प्रश्न आणि मुद्दे :
भाजप :
महाराष्ट्रसारखं राज्य अमित शहा कसं काय जाऊन देतोय कि त्या मागे 'मोठ्ठ' राजकारण आहे ?
कालच्या मुलाखतीत जोर देऊन म्हणाला "तुमच्या कडे नंबर नाहीत , असतील तर आत्ता जा सत्ता क्लेम करायला " मला तर ती गडकरी आणि अहमद पटेलची भेटच आठवते सारखी
बंद दाराआडची चर्चा आम्ही बाहेर सांगत नाही ह्याचा मी लावलेला अर्थ - सेना म्हणते तसंच घडलं असावं पण सेनेनी जी घिसडघाई केली ( राऊत मेनिया ) त्या मुळेच भाजप चा हा स्टान्स ठरला असावा - देवेंद्रनी पण प्रेस वार्तेत तेच सांगितलं आहे एका अर्थानी , कुणी सांगावं ५०-५० मध्ये सेनेची मुजोरगिरी सहन नसती झाली - १०५ जणांना न्याय नसता देता आला,आणि सेनेनी अडीच वर्षानंतर पाठिंबा काढला असता तर अजून फटका बसला असता - ज्याची शक्यता मला तरी फार वाटते
कित्येक महत्वाची राज्यं आता भाजप कडे उरली नाहीत - जी आधी होती - महाराष्ट्र , मध्य प्रदेश , राजस्थान , छत्तीसगढ , पंजाब
आणि राज्य नसलं कि भरपूर फरक पडतो
महाशिवआघाडी :
उद्धव ठाकरे च्या हाताखालती माजी मुख्यमंत्री आणि अजित दादांसारखी लोक - अडीच वर्ष तरी काम कसे करणार ?
भाजप हे हाडाचे विरोधी पक्ष असल्याने आणि आकडा त्यांच्या बाजूने असल्याने हि फरफट ५ वर्ष नक्की टिकत नाही
माझं प्रामाणिक मत असं आहे कि भाजप पाकीटमार आहेत आणि आघाडी दरोडेखोर, सेनेला म्हणावं तितकं खाता आला नाही म्हणूनच हा उपद्व्याप केला असावा आणि त्या मुळेच येणारी ५ वर्ष ( एवढी वर्ष नाही टिकत सरकार पण जी काही असतील ती ) न भूतो न भविष्यती तुंबड्या भरून घेणे हा एकच कार्यक्रम असणारे - मेट्रो स्कॅम , वॉटर ग्रीड स्कॅम , महाराष्ट्र समृद्धी महामार्ग स्कॅम , संपूर्ण कर्जमाफी वेगैरे वेगैरे , शिवाय राज्य आलं कि महत्वाच्या महानगरपालिका येणारच .
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 11/15/2019 - 12:55
नवीन
अवांतर :
माहितगार,
मला वाटतं की अधिकार नसतांना अधिकारपदाचं सोंग आणणे याला गो.ग.पि.द. म्हणावं. प्रस्तुत प्रसंगी अमित शहांनी मुद्दाम संदिग्धता ठेवलेली असू शकते. पण हिला गो.ग.पि.द. म्हणता येणार नाही कारण की अमित शहांना पुरेपूर अधिकार आहेत.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
ह
हस्तर
Fri, 11/15/2019 - 13:16
नवीन
माहितगार ह्यांनी पोस्ट कशी एडिट केली ?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 11/16/2019 - 14:41
नवीन
शिवसेनेला राष्ट्रवादीने खुंटीवर टांगून ठेवले आहे आणि राष्ट्रवादीला काँग्रेसने लटकावून ठेवले आहे.
बसा बोंबलत.
नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीला सरकार स्थापन करण्याची घाई नाही त्याला अजून २० दिवस लागतील असे कथन केले आहे
Maharashtra Govt Formation Updates: NCP in no hurry to form govt; expect new dispensation in 20 days, says Nawab Malik
https://www.firstpost.com/politics/maharashtra-government-formation-live-updates-latest-news-uddhav-thackeray-sharad-pawar-ncp-congress-bjp-shiv-sena-gets-chief-minister-of-maharashtra-7630851.html
श्रीमती सोनिया गांधी यांची अजूनही शिवसेनेबरोबर युती करण्याची तयारी नाही. आता त्या आणि श्री शरद पवार रविवार १७ नोव्हेंबर रोजी चर्चेस बसणार आणि मग ठरवणार. https://twitter.com/ANI/status/1195368278807367680?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1195368422818770949%7Ctwgr%5E363937393b70726f64756374696f6e&ref_url=https%3A%2F%2Fwww.indiatoday.in%2Findia%2Fstory%2Fmaharashtra-political-crisis-live-updates-news-shiv-sena-congress-bjp-thackeray-1619167-2019-11-15
हे गुऱ्हाळ किती दिवस चालतंय ते पाहू या.
बाकी श्री उद्धव ठाकरे यांची फरफट काही संपताना दिसत नाही हे खरं
- Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर
Sat, 11/16/2019 - 17:13
नवीन
जर हे तिन पक्ष सरकार स्थापन करणार आहेत आणि त्यांच्या मते जर ते सरकार स्थीर सरकार असणार आहे तर मग ह्यांनी राज्यभर दौरे करण्यास का सुरुवात केलि आहे?
मला घंटा घेणदेण नाहिये कुठल्याही पक्षाशी... पण एक गोष्ट निश्चित आहे आणि ति म्हणजे भविष्यात महाराष्ट्रात दोनच प्रमुख पक्ष असतिल भाजपा आणि राष्ट्रवादी. खेल खिलाने वाला बहुत फुर्सत मे है और लंबा खेल खेल रहा है कभी काका को वापरा जा रहा है और लास्ट मोमेंट पर कांग्रेस को प्रेशराइज करके वो किया जायेगा.. . हां वोही ;)
- Log in or register to post comments
ज
जॉनविक्क
Sat, 11/16/2019 - 19:58
नवीन
भाजपाने शेपूट घालून वेळीच (स्वतः ची, महाराष्ट्राची न्हवे) फरफट वाचवली यासाठी त्यांचे कौतुकही केलेच पाहिजे, ते कुठे दिसत नाही. उदोजींनी आधीच कसलीच घाई नसल्याचे स्पष्ट केले आहे, व तसेही राजवट लागू असल्याने आता तर 20-20 च्या जागी कसोटी स
सामनाही रंगू शकतो... फक्त डकवर्ड लुईस नियम लागू करायची वेळ आली की बाजी कोण मारतो हा ताजा इतिहास आहे
- Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर
Sat, 11/16/2019 - 20:39
नवीन
भाउ हे राजकारण आहे आणि ते डोक्याने आणि आपल्या कडे असलेल्या रिसोर्सेस चा योग्य वापर करुनच खेलायचे असते. आता तुम्हि शेपुट घालणे म्हणा किंवा दहाड मारणे म्हणा.
ईथे भाबडा आशावाद आणि मुर्ख सल्लागार नेहमी गोत्यात आणत असतो.
तुम्हाला महाराष्ट्र राज्यात भविष्यात फक्त दोनच मुख्य राजकिय पक्ष दिसतिल. भाजपा आणि राष्ट्रवादी कारण तेच दोन "राजकिय" पक्ष आहेत बाकी सब मुर्खो का बजार है and hence they don't deserve.
- Log in or register to post comments
ज
जॉनविक्क
Sun, 11/17/2019 - 05:45
नवीन
पाऊस पवारांना आपण धोनी न्हवे तर कोहली समजायची चूक तर करत नाही ना ? मला तरी ते राष्ट्रवादीचे धोनी वाटतात, त्यांना कोहली अजून मिळायचाय.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 11/18/2019 - 15:05
नवीन
साहेब दिल्लीला श्रीमती सोनियांना भेटून आले पण महाराष्टाच्या सत्ता स्थापनेबद्दल काहीच बोलणी झाली नाहीत.
https://timesofindia.indiatimes.com/india/sharad-pawar-meets-sonia-gandhi-to-discuss-government-formation-in-maharashtra/articleshow/72110350.cms
मग साहेब काय दिल्लीच्या प्रदूषणाबद्दल गप्पा मारायला गेल्या होत्या?
का सुप्रिया ताईंच्या शेतीबद्दल त्यांना पण सल्ला द्यायला?
सोनिया बाई आता त्यांना चकरा मारायला लावत आहेत का? जुनं उट्ट काढण्यासाठी?
- Log in or register to post comments
ज
जानु
Sat, 11/16/2019 - 18:11
नवीन
ये जो आखरी वाला लिखा है ना वह बहुत दिन से विचार कर रहा हु, मोटा भाई गुपचाप .....
- Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर
Sat, 11/16/2019 - 19:44
नवीन
बावा बोत बडा झोल है ये और ये 24 को ही चालू हो गया था.
बारीश वाले चिच्चा पहले दिन से इस खेल मे खेल रहे है. किसकी तरफ से ;) वो अप्पन को नहीं पता :)
चिच्चा का ऐसा है पडोसी का बेटा पेड पर चढा उतरा तो आम मिलेंगे और गिर गया तो खाना.
फिलहाल कांग्रेस का कुछ भी स्टेक पर नहीं है.
शिवसेना की वो हालत होने वाली है भंडारे में गये तो खाना खतम बाहर आये तो चप्पल गायब.
भाजपा अपने रीसोर्सेस का फुल गैर फायदा लेकर और चिच्चा के मदत से पहले सेना को बेहद कमजोर कर देगी और चिच्चा कांग्रेस को.
- Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर
Sat, 11/16/2019 - 20:14
नवीन
त्यानंतर म्हणजे उपरोल्लेखित घडल्यावर (किमान चार महीने) ऐक तर सेना फोडण्यात येईल नाही तर काकाच आपला एखाद्या गट सोइस्कर रित्या पुरवतिल.
तोंडाचि वाफ गमावुन आणि अत्यंत मुर्ख लोकांना PR बनवुन
फक्त Embarrassment नशिबात येते. ह्याला राजकारण नाही शुध्द मुर्ख पणा म्हणतात. तुमच्या कडे दोन पैकिं एका ही कांग्रेस चे लेखि पत्र नांहि कि ज्यात त्यांच्या सपोर्ट चा उल्लेख असेल माध्यमात येणाऱ्या बातम्यांच्या आधारावर दिले लेकरा ला राजभवन वर पाठवुन व्वा रे बाजिराव . मुंह करे बाता अन ××××× लाता.
खरे राजकारण आत्ताशा आत्ताशा सुरु झालेत.
वाघांना फक्त येवढेच विचारु ईच्छितो काव्व्ं खेयशील का पोराईंत?
देखतें रहो हंसते रहो :)
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 11/18/2019 - 08:42
नवीन
हे लाखात एक बोललात.. लोकांना सरकार स्थापन होणे म्हणजे विजय वाटतोय..
पण आत्ता महाराष्ट्रात ४ पक्ष त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढतायत..
त्यापैकी २नच भविष्यात सशक्त पक्ष म्हणून टिकतील, आणि ते भाजपा आणि राष्ट्रवादी असतील असे मलापण वाटतय. (तुम्चे नि माझेपन घोडे विनी त)
बाकी या सगळ्याकडे भावनात्मक बाजूने पाहण्यापेक्षा राजकारण म्हणून पाहिलं तर अक्षरशः माहितीचा महापूर येतोय आणि अफात शिकायला मिळतंय.. कदाचित आयुष्यभराचं राजकारण येत्या ६ महिन्यात शिकायला मिळेल.
- Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर
Mon, 05/25/2020 - 13:18
नवीन
वाघांना फक्त येवढेच विचारु ईच्छितो काव्व्ं बोने खेयशील का पोराईंत?
दिनांक 17 नोव्हेंबर ची प्रतिक्रिया
बावा बोत बडा झोल है ये और ये 24 को ही चालू हो गया था.
बारीश वाले चिच्चा पहले दिन से इस खेल मे खेल रहे है. किसकी तरफ से ;) वो अप्पन को नहीं पता :)
चिच्चा का ऐसा है पडोसी का बेटा पेड पर चढा उतरा तो आम मिलेंगे और गिर गया तो खाना.
फिलहाल कांग्रेस का कुछ भी स्टेक पर नहीं है.
शिवसेना की वो हालत होने वाली है भंडारे में गये तो खाना खतम बाहर आये तो चप्पल गायब.
भाजपा अपने रीसोर्सेस का फुल गैर फायदा लेकर और चिच्चा के मदत से पहले सेना को बेहद कमजोर कर देगी और चिच्चा कांग्रेस को.
आणि कांग्रेस ने हा खेळ ओळखलाय Have popcorn and let's wait and watch.
http://misalpav.com/comment/1053683#comment-1053683
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Sun, 11/17/2019 - 01:54
नवीन
काय रंगत आणली चर्चे मध्ये हैदराबादी लहजा वापरून !!
मस्त /\
- Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर
Sat, 11/16/2019 - 20:27
नवीन
ऐ कांचा सेठ साला बंदुक भी दिखाता है और पिछे भी हटता है हांय, पिछे नंही हटने का क्यों की पिछे हटने से पुराना वक्त वापिस नहीं आने वाला. तुम फंस गये मेरी चाल मे ऐक मामुली मोहरे की तरह. हांय.
यंहा भी शतरंज की चाल वोही है विजय दिनानाथ वाली.
येन्जाय माडि ;)
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Sun, 11/17/2019 - 01:58
नवीन
मस्त रंगत आणली हैदराबादी लहजा वापरून .
पण ते "काव्व्ं खेयशील का पोराईंत आणि एन्जाय माड़ी " नाही समजले हो .
- Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर
Mon, 05/25/2020 - 13:40
नवीन
काव्व्ं खेयशील का पोराईंत (1००% वर्हाडी)
कसय ट्रंप तात्या आम्ही लहान असताना अस्सल रांगडे खेळ खेळायचो मग काय कधी वर्ग मैत्रीणी तर कधी बहिणी अडुन बसायच्या हट्ट करायच्या आम्हाला पण खेळायचय नाही सामिल केल की कंप्लेंट करायच्या मग काय पर्याय नसायचा... ह्यांना सामिल करुन मग आम्ही त्यांच्यावर राज्य आले की त्यांचा अक्षरश: अंत पहायचो.. मेटाकुटिला यायच्या अक्षरश: रडकुंडिला येवुन चिडचिड करायच्या.. कधी कधी रडायच्या सुद्धा... आणि त्यावेळी आम्ही ओरडायचो "काव्व्ं बोने खेयशील का पोराईंत"
खेयशील का पोराईंत = पुन्हा हट्ट करशील मर्दानी खेळ खेळायचा
एन्जॉय माडी = एन्जॉय करा
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Sat, 11/16/2019 - 20:29
नवीन
आतली गोष्ट.
टीपः ऐकीव माहितीवर आधारीत.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 11/18/2019 - 05:53
नवीन
"आम्ही तुमचा चिदंबरम करू" हे एवढे सोपे नसते. काळे उद्योग झाले,सत्तेतुन पायउतार व्हायची शक्यता दिसली की पुढारी पुरावे मिटवायच्या मार्गाला लागतात. किंबहुना काळे धण्दे हे पुरावे ठेउन कधीच केले जात नाहीत. म्हणूनच हरेन पण्ड्याना कोणी मारले, सोहराबुद्दिनला कोणी मारले, त्याच्या पत्निवर बलात्कार करुन जाळून टाकण्याचे आदेश कोणी दिले हे सर्वाना माहित असते पण पुरावे नसतात.
पोस्टमधील संबंधित पुढारी पवारांचे जवळचे समजले जातात. सत्तेतून पायउतार होऊन पाच वर्षे झाली आहेत तेव्हा संबंधित अधिकार्याण्करवी पुरावे नष्ट केले नसतील ह्याची शक्यता कमी.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 11/18/2019 - 06:17
नवीन
अशा अनेक वावड्या उठवणे हा अनेक लोकांचं फावल्या वेळात व्यवसाय झाला आहे.
प्रफुल्ल पटेल यांचे इकबाल मिरची बरोबर साटे लोटे दिसत आहेत परंतु सज्जड पुरावा नाही म्हणून इ डी त्यांना अटक करत नाहीये. परंतु त्यांची मालमत्ता जप्त होत आहे असे दिसते.( मालमत्ता करार बेनामी / बेकायदेशीर सिद्ध होण्याईतका पुरावा आहे बहुधा)
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/mirchi-files-after-praful-patels-submission-of-deal-ed-to-attach-ceejay-house/articleshow/71685370.cms?from=mdr
ईडी आणि गुन्हे अन्वेषण खात्याना मोदी -२ मध्ये ढिलाई बद्दल सक्त ताकीद दिली गेली आहे. यामुळेच शिवसेना "नाराज" झाली आहे . म्हणून तर निकालाच्या दुसऱ्या दिवशी पण आम्ही दुसरा मार्ग पाहू शकतो अशी गर्भित धमकी दिली गेली.
याबद्दल श्री फडणवीस हे केंद्राला( पक्षी श्री मोदी) "आस्ते कदम जा" हे पटवून देण्यास अपयशी ठरले (श्री मोदी यांनी ऐकण्यास नकार दिला) असे पण ऐकिवात आले आहे.
- Log in or register to post comments
ह
हस्तर
Mon, 11/18/2019 - 07:56
नवीन
सेक्रेड गेम्स महाराषट्रा पोलिटिक्स https://www.youtube.com/watch?v=jNzf9kSCKWk
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Mon, 11/18/2019 - 10:08
नवीन
ते महाराष्ट्र असं असत.
- Log in or register to post comments
ह
हस्तर
Mon, 11/18/2019 - 10:15
नवीन
सध्या रस्त्र पति राजवट अस्ल्याने नाहि
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 11/18/2019 - 11:30
नवीन
हस्तर यांना शुद्धलेखन शिकवण्याचा प्रयत्न करु नये.. ते सर्व काही कोळून प्यायलेले आहेत.. त्यांचा हा स्तर वेगळा आहे..
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 11/18/2019 - 14:21
नवीन
सार्वजणिक जिवणात असं व्हयाचच.
शेवटि माणव हा अपुर्नच
- Log in or register to post comments
P
prahappy
Tue, 11/19/2019 - 06:01
नवीन
मध्ये पुतण्यांनी मीडियाची मज्जा केली काल काकांनी केली , सगळं ठरलेलं आहे फक्त हळू हळू खात आहेत , नाही तर मग जल्लोष करायला मजा कशी येणार ?
- Log in or register to post comments
ज
जॉनविक्क
Wed, 11/20/2019 - 10:41
नवीन
ओके शरद पवार मोदी शहांना भेटले (शेतकऱ्यासंदर्भात प्रश्न घेऊन) ज्यातून त्यांनी पुन्हा सूत्रधार, व शेतकऱ्यांचा कळवळा असलेला कोण हे अप्रत्यक्ष अधोरेखित केलेच, सोबत साहेब कोणालाच सिंगलआउट कोणत्याही परिस्थितीत करत नाहीत हे ही त्यांनी पुन्हा अधोरेखित केले, हे राजकीय मुत्सद्दीकारक दबावतंत्र थोडेफार उद्धव ठाकरे सोडून कोणत्याच पक्षाच्या कोणत्याही नेत्याकडे नाही :(
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 11/20/2019 - 15:21
नवीन
शेतकऱ्यांचा कळवळा सगळ्यांनाच का येतो ते स्पष्ट आहे. फेर निवडणूका झाल्या तर एकगठ्ठा मते आपल्याच पारड्यात पडावी हीच इच्छा.
आपल्या चेल्या चमच्यांना निश्चलनीकरणानंतर पैशाची तंगी झालेली शासकीय रमण्यातून भरून काढता येईल यासाठीच हि नाटकं चालू आहेत.
जेथे जेथे पूर आले तेथे असलेल्या दुकानांचे छोट्या उद्योगधंद्यांचे अपरिमित नुकसान झालेच आहे. त्यांचे अश्रू पुसायला कोणीही तयार नाही. कारण त्यांची एकगठ्ठा मते नाहीत.
छोट्या छोट्या गावात असलेले वाणी, इलेक्ट्रिशियन आणि लघुउद्योजक इ लोकांचे पण भरपूर नुकसान झालेले आहे.
माझ्याकडे आलेल्या रुग्णाचा भाऊ सांगत होता. त्याचे कॉम्प्युटर दुरुस्तीचे दुकान आहे त्यात असलेल्या लोकांच्या संगणक हार्ड डिस्क रॅम इ पाणी गेल्याने निकामी झाल्या आहेत याची नुकसान भरपाई कशी करणार या चिंतेत तो होता. त्यातून ग्राहकांचे नुकसान भरून न दिल्यास धंद्यातूनच उठावे लागेल.
त्याच्या शेजारी असलेल्या शिंप्याकडे लोकांनी दिवाळी साठी शिवायला टाकलेले कपडे चिखलाच्या पाण्याने भरले आहेत. ते कपडे काही केल्या नवीन करणे शक्य नाही. नुकसान स्वतः भरणे शक्य नाही. काय करायचे या चिंतेत तोही आहे.
हीच स्थिती सांगली कोल्हापूर कागल इ भागात असलेल्या अनेक किराणा मालाचे दुकानदार, कागद, कापड तयार कपडे इ. चे व्यवसाय करणारे असेच हवालदिल झालेले आहेत.
त्यांना विचारणारे कोणीही नाही.
असंख्य शेतमजूर आहेत. त्यांची घरे वाहून गेली घरात असलेले किडूकमिडूक नष्ट झाले त्यांनासुद्धा कोणीही काहीही द्यायला तयार नाही. खरं तर या सर्वांची संख्या शेतकरूयांपेक्षा जास्त आहे. पण असंघटित असल्याने त्यांचा कोणीही वाली नाही.
शेताच्या बांधावर जाऊन टीव्ही समोर नाटकं करणारे राजकारणी पाहून उबग आला आहे.
- Log in or register to post comments
ज
जॉनविक्क
गुरुवार, 11/21/2019 - 00:19
नवीन
पण धागा निव्वळ राजकारणाविषयी असल्याने, समाजकारणाकडे इथे फोकस अप्रस्तुत आहे.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »