Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

शिवसेनेची झोप की जाणिवपुर्वक राजकीय गोगपिद?

म
माहितगार
Wed, 11/13/2019 - 05:23
🗣 204 प्रतिसाद
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान २१ ऑक्टोबर २०१९ निकाल २४ ऑक्टोबर २०१९ . २४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत भाजपा आणि शिवसेना युतीस मतदान करणारी जनता दोहोत अगदीच सरकार बनु न शकण्या इतपत काही बिनसण्याची शक्यता आहे याबद्दल महाराष्ट्रीय सर्वसामान्य जनता अनभिज्ञ होती की मतदार बावळट होता ? २४ ऑक्टोबर नंतर शिवसेना नेते ५०:५० फॉर्म्युलॅच्या गोष्टी करतात भाजपा अध्यक्ष अमित शहांनी आश्वासन दिल्याचे म्हणतात. पण एकुण वाक्य रचनेवरुन मुख्यमंत्रीपद्दवर ५०:५० टक्के करण्याचे आश्वासन न देता अस्पष्टता ठेवली असण्याची शक्यता असू शकते. एखादी गोष्ट स्पष्ट न करणे यास मराठीत गोगपिद (गोमा गणेश पितळी दरवाजा) असा वाक्प्रचार आहे. शिवसेना नेतृत्वासोबत बोलताना अमित शहांनी गोगपिद केले असेल किंवा नसेल पण त्यानंतर म्हणजे १३ ऑक्टोबर २०१९ चा टाईम्स नाऊ या इंग्रजी टिव्ही चॅनलवरची अमित शहांची मुलाखत व्हिडीओ पुढे आला आहे ज्यात ३८मिनीटे ३८ सेकंदपासून पत्रकार नाविका कुमार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण असतील तर अमित शहा केवळ देवेंद्र फडणविसच असतील हे अत्यंत सुस्पष्टपणे सांगताना दिसतात. सर्वसामान्य मतदाराने दोघांचेही मुख्यमंत्रीपदी दावे ऐकले तरी गोष्टी न ताणता तोडगे निघतील कुणितरी नमते घेईल असाच सर्वसामान्य मतदार विचार करेल. पण ज्यांना आपल्या भूमिका टोकाच्या आहेत हे माहित असते त्यांना १३ ऑक्टोबर पर्यंत परस्परांच्या भुमिका जुळत नाहीत आणि टोकाच्या आहेत त्यांनी त्या टोकाच्या आहेत हे जनतेस / मतदारांना सुस्प्ष्टपणे का नाही सांगितले असा प्रश्न आहेच. अमित शहांना आधी माहित नसेल तरी १३ ऑक्टोबरला टाईम्स नाऊ पत्रकाराकडून आदीत्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावरील दाव्या बाबत समजलेले होते. आणि अमित शहांच्या मुलाखतीची वार्ता शिवसेना प्रमुखांच्या कानावर गेली असणार त्यांनी मतदारांना तोंडघशी घालण्यापुर्वी आपापसात चर्चा का केली नाही ? हा प्रश्न व्हॅलिड रहातोच पण.. शिवसेना प्रमुख निकाला नंतर ज्या पत्रकार परिषदा घेत फिरत आहेत त्या एकाही पत्रकार परिषदेत १३ ऑक्टोबरच्या अमितशहांच्या मुलाखतीतील भूमिकेचा उल्लेख का करत नाहीत ? सर्वसामान्य जनतेचे सर्वच राजकीय भाष्यांवर लक्ष नसेल पण शिवसेनेच्या राजकीय नेतृत्वापैकी कुणाचेच लक्ष नसेल तर १३ ऑक्टोबर पासून झोपले होते किंवा १३ ऑक्टोबरची मुलाखत जनतेपासून सोईस्कर लपवत आहेत ? महाराष्ट्रीय जनतेशी हि फसवा फसवी का चालू आहे ? ३८ व्या मिनीटापासून पुढे पहावे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 85602 views

🗣 चर्चा (204)
क
कपिलमुनी Wed, 11/20/2019 - 19:44 नवीन
वरती दिलेल्या व्हिडीओमध्ये फडणवीस स्पष्ट बोलत आहेत , उध्दव रिपीट करत आहे , त्याबाबत कोणी खंडन करायला अजून कसे आले नाही याचे आश्चर्य आहे ? त्यातही ध चा मा कसा करायचा सापडले नाही वाटतं
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 11/22/2019 - 02:24 नवीन
आता इथली चर्चा वाचूनच राजकीय नेते योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे....
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 11/22/2019 - 04:23 नवीन
योग्य तो या शब्दाला खूप महत्व आहे.. कारण आपण ज्या गोष्टींना महत्व देतो त्याला बहुतांशी राजकीय पक्षांचा मतदार अजिबात महत्व देत नाही हा इतिहास आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 11/22/2019 - 05:39 नवीन
है शाबास शिवसेनेनेने हिन्दुत्वाची गाय सोडून धर्मनिरपेक्षतेची बकरी पिळायला घेतली. आपला देश आणि देशाची घटना सेक्युलर या संकल्पनेवर आधारित आहे https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/shiv-sena-leader-sanjay-raut-on-secularism-no-need-to-discuss-maharashtra-vidhan-sabha-election-2019-jud-87-2019467/
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 11/22/2019 - 05:43 नवीन
Shiv Sena demands deletion of 'secular' and 'socialist' words from Constitution Read more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/46041493.cms?from=mdr&utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst “From the time they (the words) were included in the Constitution, it is being said that this country can never be secular. Balasaheb Thackeray and, before him, Veer Savarkar had been saying that India was divided on the lines of religion. Pakistan was created for Muslims, thus, what remains is a Hindu rashtra,” said Raut, adding that India was never secular. 'The country belongs to Hindus': Shiv Sena wants the words 'secular' and 'socialist' REMOVED from India's constitution https://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2930422/The-country-belongs-Hindus-Shiv-Sena-wants-words-secular-socialist-REMOVED-India-s-constitution.html
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 11/22/2019 - 14:24 नवीन
यापुढे कधीही शिवसेना नावाच्या ओप्पोर्चुनिस्ट पक्षाला मतदान करणार नाही. भले उद्या त्यांनी BJP शी पुन्हा युती केली तरीही.. ज्या तत्वावर पक्ष उभा केला त्यालाच लाथ मारून फक्त CM पदासाठी पूर्ण 180 डिग्री चेंज.. अरे पब्लिक ला काय चूxxx समजता का?? ज्यांनी त्यांचे मत शिवसेनेला फक्त युती होती म्हणून दिले अन्यथा BJP ला दिले असते अश्या सर्व लोकांची हि फसवणूक नाही काय..
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Fri, 11/22/2019 - 18:28 नवीन
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा आग्रह स्वीकारला असे कानावर आले आहे. हा माणूस अतिशय हुशार आहे हे नक्की. खरे नाट्य मात्र आता रंगणार.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Fri, 11/22/2019 - 18:35 नवीन
हया व्यक्तीमधे राजकीय चाली थंड डोक्याने खेळण्यात माजी पंतप्रधान नरसिंहराव यांची गुणवत्ता आहे असा कयास होता, आता मात्र चाचणी कार्यक्षमता कितपत आहे याची होईल.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 11/23/2019 - 04:10 नवीन
!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 11/23/2019 - 04:12 नवीन
मी परत येईन ... नाही नाही... मी परत आलो सुध्दा पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 11/23/2019 - 04:21 नवीन
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राजकारणात जे समोर दिसत असते ते तसे कधीच होत नसते याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला ! :) हम को मिटा सके ये ज़माने में दम नहीं हम से ज़माना ख़ुद है ज़माने से हम नहीं :- जिगर मुरादाबादी भाजप ला शरद पवार समजायला १०० जन्म घ्यावे लागतील ! :- इति संजय राउत आता इंद्राचं आसन दिलं तरी नको :- इति संजय राउत सार्वजनिक वस्त्रहरणाच्या पहिल्या अंकातुन बोध न घेतल्याने आज महा उघड वस्त्रहरण झाले ! :))) भलतीच गोष्‍ट करूं गेले असतां धड स्‍वार्थ ना परमार्थ अशी स्‍थिति होऊन फजिती मात्र पदरांत पउते. पुढील अभंग पहा एक ब्रह्मचारी गाढव झोंबतां। ह्मणोनिया लाता पळालें तें।। गाढवहि गेले ब्रह्मचर्य गेलें। तोंड काळे झाले जगामाजी।। हे ना तैसे झाले हे ना तैसे झाले। तुका म्‍हणे गेले वायाचि तें।। -तुगा २९८५.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मैं किसी और का हूँ फिलहाल के तेरा हो जाऊं :- FILHALL
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Sat, 11/23/2019 - 04:24 नवीन
सिंहासन चित्रपटातील अखेरच्या प्रसंगातील निळू फुले सारखी अवस्था झाली जनतेची.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 11/23/2019 - 04:34 नवीन
बहुतेक पुतण्याने काकांचा गेम केला असावा पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 11/23/2019 - 05:23 नवीन
मला तर वाटते, काका आतून सामील असावेत. मिश्किल हास्य विसरू नका!
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 11/23/2019 - 12:15 नवीन
यशोधरा, मलाही हीच शंका आली. अजित पवारांत इतका दम कुठून आला. राष्ट्रवादीच्या ५४ च्या ५४ आमदारांच्या सह्यांचं पाठिंबापत्र दिलं म्हणे. आणि थोरल्या पवारांना आजिबात सुगावा लागला नाही? अशक्य! सर्वथैव अशक्य!! त्रिवार अशक्य!! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sat, 11/23/2019 - 13:38 नवीन
राजकीय पलटी मारायची नसल्याने त्यांचे कडून तरी दग्याफटाक्याची तूर्तास अपेक्षा नाही. हे अजितदादा प्रकरण आठवडाभर मस्त रंगणार. बीजेपीला आता अभद्र युती केल्याबद्दल आधी शिवसेनेला शिव्या घालणाऱ्या मतदारांनी आता मात्र तोंड न उघडल्यास ती मिपाकर नसण्यापेक्षाही लांच्छनाची बाब असेल हे नक्की
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 11/23/2019 - 05:16 नवीन
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 11/23/2019 - 05:16 नवीन
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 11/23/2019 - 05:21 नवीन
आई भवानीच्या आशीर्वादाने आणि हिंदुहृदय सम्राट मा. श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यशिर्वादाने गद्दार लोकांचा कोथळा बाहेर काढून आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्टात आणूच. कोण आहे रे तिकडे ? आं फडणवीस मुखमंत्री झाले सुद्धा? हा उभ्या महाराष्ट्राच्या पाठीत खुपसलेल्या खंजीर आहे उभ्या महाराष्ट्राची जनता याचा सूड घेतल्या शिवाय राहणार नाही जय भवानी जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sat, 11/23/2019 - 05:22 नवीन
थांबा.... हे काहीतरी विचित्र वाटतंय....मला तर भीती वाटतीय कि हे फार वाईट पद्धतीने कोसळणार आहे आणि भाजपची फजिती होणार जश्या प्रमाणे शपथविधी झाला त्यात असे दिसले कि भाजप पक्ष म्हणून हजार असला तरी राष्टवादी पक्ष म्हणून दिसला नाही जणू अजित पवार यांनी पक्षाला ना विचारता वैयक्तिक निर्णय घेतला ... तसे नसेल तर राष्ट्रीय चे इतर नेते ( जयंत पाटील वैगरे) हि हजार असते.. शरद पवारांचे तर नाव हि नाही ... पण मग हा हि प्रश्न पडतो कि राज्यपालानी राष्ठ्रवादी चा पाठिंबा कसा काय पडताळून पहिला? समजा शरद पवारांना हे मान्य नसेल तर मग घटनेप्रमाणे अजित पवार आणि त्यांचे पाठीराखे राष्ट्रवादी पासून फुटणार का ? आणि फुटले तर त्यांना परत निवडणुकीला सामोरे जावे लागते का? ( हा झाला कायद्याचा प्रश्न) काही तरी गडबड आहे आणि यात लोकशाही चा खून झालं हेच खरा मुळात ज्यांना निवडून दिला जनतेने १०५ +५६ यांनीच सरकार स्थापन कार्याला पाहिजे होता...
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sat, 11/23/2019 - 06:55 नवीन
महाभूकंप.. आता प्रत्येकानेच सत्तेसाठी आपले खरे रूप प्रकट केलेले असल्याने रोचक प्रकरणाची सुरुवात झाली आहे. आता प्रश्न हा आहे की जनतेचे काय होणार
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sat, 11/23/2019 - 07:13 नवीन
सत्ता स्थापन होणार असताना आपल्याच पक्षाशी प्रतारणा करून अजितदादानी नेमक्या कोणत्या नाराजीला वाट करून दिली आहे हे जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Sat, 11/23/2019 - 07:19 नवीन
पुतण्याला पुढे करून काकांनी चाल खेळलेली दिसतेय. पुतण्यात दम असता तर हे अगोदरच झाले असते. ३० तारखेला पुतण्या संपलेला असेल.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Sat, 11/23/2019 - 07:24 नवीन
किंवा पुतण्या फुटून सरकार मध्ये सुरक्षित राहून राष्ट्रवादी जनतेचा कौल मान्य करून विरोधी पक्षात राहू शकेल.
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू Sat, 11/23/2019 - 09:51 नवीन
३० तारखेला काय व्हायचे ते होवो पण आज मात्र मजा आली! खासकरून संजय राउत चे थोबाड बघून :-) :-) :-)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 11/23/2019 - 14:16 नवीन
सेल्फ गोल? का दगाफटका?
  • Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर Sat, 11/23/2019 - 17:56 नवीन
क्या मिंया क्या तो बि समझा रे मेरे कु.. इत्ते साल से मिस्सलपाव पे बैठा हुं..कुछ इज्जत हय यारों मेरी..अब जो आज हुवा है यईच मै १७ को बोला था मिंया. लेकिन ये लोकल बस्ति के चिप कॅटेगरि के लोंगा जो मिटिंगा मिटिंगा खेल रहे थे अगर ईस्माइल भाई क्या बोल रे जर्रा सुन लेते बोले तु आज ऐसा चिक्कड मे नय फंसते रे. राउत हौला किदर कु गंया रे जो अबरा कु उप्पर निच्चु कर कर के दिन रात बांता खोदता था...ऐसे बैगना को खडा कर दिंये रे तुम गुरुघंटाल लोगा के सामने, दो गुजराति, बारिश वाले चिच्चा और कांग्रेस के बुढे बंगारु लोंगा मजाका लगे रे तुमकु ;) चिंदिचोरो कि पार्टि हो गयि है पिंडे कि मेरी. काव्व बोने खेयशिल का पोराईत :) बावा बोत बडा झोल है ये और ये 24 को ही चालू हो गया था. बारीश वाले चिच्चा पहले दिन से इस खेल मे खेल रहे है. किसकी तरफ से ;) वो अप्पन को नहीं पता :) चिच्चा का ऐसा है पडोसी का बेटा पेड पर चढा उतरा तो आम मिलेंगे और गिर गया तो खाना. फिलहाल कांग्रेस का कुछ भी स्टेक पर नहीं है. शिवसेना की वो हालत होने वाली है भंडारे में गये तो खाना खतम बाहर आये तो चप्पल गायब. भाजपा अपने रीसोर्सेस का फुल गैर फायदा लेकर और चिच्चा के मदत से पहले सेना को बेहद कमजोर कर देगी और चिच्चा कांग्रेस को. त्यानंतर म्हणजे उपरोल्लेखित घडल्यावर (किमान चार महीने) ऐक तर सेना फोडण्यात येईल नाही तर काकाच आपला एखाद्या गट सोइस्कर रित्या पुरवतिल. तोंडाचि वाफ गमावुन आणि अत्यंत मुर्ख लोकांना PR बनवुन फक्त Embarrassment नशिबात येते. ह्याला राजकारण नाही शुध्द मुर्ख पणा म्हणतात. तुमच्या कडे दोन पैकिं एका ही कांग्रेस चे लेखि पत्र नांहि कि ज्यात त्यांच्या सपोर्ट चा उल्लेख असेल माध्यमात येणाऱ्या बातम्यांच्या आधारावर दिले लेकरा ला राजभवन वर पाठवुन व्वा रे बाजिराव . मुंह करे बाता अन ××××× लाता. खरे राजकारण आत्ताशा आत्ताशा सुरु झालेत. वाघांना फक्त येवढेच विचारु ईच्छितो काव्व्ं खेयशील का पोराईंत? देखतें रहो हंसते रहो :)
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Sun, 11/24/2019 - 05:42 नवीन
हायला इस्माईल किधर था इत्ते दिनोसे. गुल्लू भाई की याद नहीं आई क्या रे तुमको. की साला तुम भी सियासत के पिच्चू भागरा हौरे ! छिछोरे कामा कब छोडेंगे रे तुम. छोछोरे रे याद आया सलीम फेकू किधर है रे मियाँ !
  • Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर Sun, 11/24/2019 - 09:10 नवीन
मां कि किरी किरी ये अंग्रेजा के साथ कामा कर कर के भेजे का कुकटपल्लि फ्राय हुवा है मिंया. अबी देख मेरे कु यादिच नय आरेला हय के अपन इदरकु मिस्सलपाव पे गुल्लू दादा से कब आंख्या मिलाया था. छिछोरेपन का ऐसा है गुल्लू के खरबुजे को देखकर खरबुजा रंग बदलताय बावा :) बंदर कित्ता बी बुढा हो जाये गुलाटी मारना नही छोडता. अरे किराक किदर कू गयां रे ढिले देख गुल्लू आया है अपना बोत जिगरी है जरा दो पिलेट अंडाबोंडा चार समोसा और तिन ईरानी चाय लगा रे टेबल पे.
  • Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर Sun, 11/24/2019 - 03:48 नवीन
वाचा लेको लय कष्टाने टाईप केलय ;) स्थळ- हिंजवडि पुणे-सुपे प्रांत हिरडस का कुठलेसे मावळ. वेळ- अत्यंत चुकीचि काल बरोबर ह्याच वेळी हापिसातुन घरी यायला निघालो होतो तब्बल सोळा प्रहर निकराने खिंड लढवोन गड (Production Server) सर करोनी त्यावर तिरंगा अंमळ उंच फडकावोन आपल्या शिलेदारांसह टोपीकंरास वर्हाडि शिव्यांच्या लाखोलिसह मुळा मुठे चे पाणि पाजीले. घरी आलेयांसी फर्जंद सोळा प्रहराची रणगाथा शौर्यगाथा मातेस ह्याच बखरकारी भाषेत सांगित होता ... तेजायला कसले काय पुन्हा फोन वाजला पाहतो तर टोपीकरांचा नंबर बायको लागली ना टण टण करुन भांडायला... तब्बल 48 तास तु घरी नव्हता... चुलित गेला असला जॉब म्हणुन तिने माझा फोन स्विच आफ केला आणि माझे हापिसात परतीचे दोर कापियेले... "करमणुकि साठी सुद्धा नको बघत जाउ रे त्या गरीबो के गालिब ला " हे तिने माझ्या बखरकारी वर भाष्य करोन संजयास वेडे ठरविले. झोपलो ते संध्याकाळीच उठलो टिव्हि बघतो तर अपेक्षित खेळ सुरु झालेला होता अपेक्षेपेक्षा बराच आधी ऐव्हढाच काय तो धक्का. आता मला सांगा वर्गात किति होतकरु असे आहेत ज्यांना अजुनहि असे वाटतेय कि काकांच्या मर्जी विना हे झालय आणि काका काहितरी चमत्कार करतिल आणि "हे" पुन्हा 360° फिरेल.... हात वर करा बे पोट्टेहो ;) आता मोदी-शहा ह्यांनी हा खेळ सगळे खेळाडू आणि पक्ष त्यांच्या आवडत्या पिच वर आणलेयत "कायद्याचा किस आणि तांत्रिक घटनात्मक बाबी" अब खेलो. राज्यपालांचे सरकार स्थापनेबाबत चे अधिकार घटने ने त्यांच्या विवेका वर सोडलेयत. त्यानुसार सगळयात मोठा पक्ष भाजपा स त्यांनी पाचारण केले भाजपाला शक्य नसल्याने....मग राजियांसी बोलाविणे जाहले पण बारामती कर मिर्झाराजियांनि राजियांस तहाच्या बोलणीत ऐसे गुंतियले कि राजियांने तहाच्या खलित्या विनाच बाळ राजियांस दिल्ली चा गनिम बघतसिंहाच्या महालि पाठवोन आपले मागल्या सात पिढ्यांचे हसे करोन घेतले. नंतर राष्ट्रवादी ला बोलावणे आले पण त्यांना दिल्या गेलेल्या वेळेच्या बरेच तास आधी त्यांनी राज्यपाल महोदयांना लेखी स्वरुपात कळविले की त्यांना सुद्धा सरकार स्थापणे शक्य नाहि मग रीतसर राष्ट्रपति राजवट लावण्यात आलि. आता मला सांगा इतकी प्रचंड उठापटक आलरेडी झालेलि असतांना मोदी-शहा असा खेळ खेळतिल का कि जो हेडकाउंट, घटनात्मक, तांत्रिक किंवा कायदेशीर रीत्या अव्यवहार्य असेल आणि ते तोंडघशि पडतिल. ज्यावेळेस अजित पवारांनी शपथ घेतली त्यावेळेस राष्ट्रवादी चा विधीमंडळ / गटनेता कोण होता? राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या सह्यांचे पत्र अजित पवारांनी विधीमंडळ/गटनेता ह्याच नात्याने राज्यपाल ह्यांच्या कडे सुपुर्द केले. आता जरी काकांनी पक्षाचि बैठक बोलावलि तर ती पक्षाध्यक्ष ह्या नात्याने फक्त पक्षाचि बैठक असेल "विधिमंडळा" ची नाही. दिलीप वळसे पाटलांचि विधीमंडळ नेता म्हणुन नेमणुक कायदा व घटने ने होणार्या विधान सभा अध्यक्षांच्या विवेकावर सोडलीय त्यामुळे ती टिकणार नाहि आणि हे काकांना आणि दिलीप वळसे पाटलांना दोघांनाहि माहित आहे. दिलीप वळसे पाटिल माजी विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी अजित पवार व्हिप बजावून भाजपा ला मतदान करण्याचे आदेश देऊ शकतात. जो आदेश राष्ट्रवादीचे आमदार डावलु शकत नाहीत. जर विरोधात मतदान केले तर मत बाद होईल. राहता राहिला सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा प्रश्न तर माझ्या मते कोर्ट फार फार तर दिलेली मुदत थोड़ी कमी करेल. बघा कोर्टात सुद्धा राजियांस समोर केले गेलेय. काहि लोकांना ऐका नेत्रुत्वात सौम्य असोन पण मुत्सद्दि गुण दिसोन आले माझ्या मते हे नेत्रुत्व भोळसट आणि बावळट पणाची जी सिमारेषा असते ऐक्झाक्ट त्यावर उभे होते / आहे ज्याच्या चाव्या नार्वेकर नावाचा ऐत्तदेशिय फिरवितो. अभी कुछ नंही होनेवाला. आता आज हे मिडिया वाले भामटे भणंग कायद्याचा भयंकर किस पाडतील. सो ऐन्जाय माडि ;)
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sun, 11/24/2019 - 04:24 नवीन
घडले नाही तर तर माझा अभ्यास कमी पडला म्हणेन. विधिमंडळ नेता म्हणून अजितदादाकडेच सह्याचे पत्र असणे बंधनकारक होते त्यामुळे ते त्यांचेकडे होते यात आश्चर्य नाही. राष्ट्रवादीची मते बाद ठरली तर भाजपा बहुमत सिद्ध करणार कसे बरे ? यात एकच शक्यता आहे ती म्हणजे काँग्रेसही फुटणे पण भाजपा काँग्रेस व रा काँग्रेस एकाच वेळी फोडू शकत असेल तर विषयच संपला, पण शिवसेना विनाकारण सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होणार व तगडे विरोधक बनणार, गंमत इतकीच वाटते ज्या चुका काँग्रेसने मोदींना सत्ताबाहेर ठेवण्याचा प्रयत्न म्हणून केल्या नेमक्या त्याच चुका भाजपा सेनेबाबत का करत आहे ?
  • Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर Sun, 11/24/2019 - 04:42 नवीन
राष्ट्रवादीची मते बाद ठरली तर भाजपा बहुमत सिद्ध करणार कसे बरे ? वाह भाउ वाह आशावादी असणे वाईट कधीच नसते फक्त तेव्हढे विश्वास दर्शक मताबद्दल पुन्हा ऐकदा बघता का, नाही म्हणजे सदस्य अनुपस्थित राहिले किंवा व्हिप मोडुन केलेले बाद झालेले मते मग त्यानंतर कशाच्या दोन तृतीयांश किती लागतील वगैरे वगैरे.
  • Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर Sun, 11/24/2019 - 04:43 नवीन
राष्ट्रवादीची मते बाद ठरली तर भाजपा बहुमत सिद्ध करणार कसे बरे ? वाह भाउ वाह आशावादी असणे वाईट कधीच नसते फक्त तेव्हढे विश्वास दर्शक मताबद्दल पुन्हा ऐकदा बघता का, नाही म्हणजे सदस्य अनुपस्थित राहिले किंवा व्हिप मोडुन केलेले बाद झालेले मते मग त्यानंतर कशाच्या दोन तृतीयांश किती लागतील वगैरे वगैरे.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sun, 11/24/2019 - 06:17 नवीन
विस्तारून सांगता काय _/\_
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 11/24/2019 - 07:06 नवीन
अगदी ऑलमोस्ट हेच आहे. इथलेच वाचून म्हणता आहात का? अगदी साधा प्रश्न आहे, आरोप वगैरे नाही, ह्याची नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर Sun, 11/24/2019 - 08:28 नवीन
ताई मि भाउ तोरसेकर, निखिल वागले, सुमार केतकर, सामना, अर्णब गोस्वामी, झी न्यूज़ इति. ह्या सारख्या विद्वानांच्या वाट्याला नाहि जात हो. त्यांची त्यांच्या पक्षाशी बांधिलकी आहे आणि ते प्रत्येक अगदी प्रत्येक गोष्ट त्यानुसारच जस्टिफाय करतात. असो बापडे. आता तुम्हाला असे का वाटले असावे की मि हे कुठेतरी वाचुन इथे आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करतोय? Just because of the Content, Right? तर तुम्हाला थोड्याफार फरकाने जालावर इतरत्र अनेक जागी अशीच माहिती मिळेल जी माझ्या प्रतिसादात आहे कारण त्या प्रश्नाचे उत्तर तेच आहे. ह्याच धाग्यावर तुम्हि माझे 17 तारखेचे प्रतिसाद बघितलेत तर तुमच्या लक्षात येईल कि मि हे तेव्हाच सांगितले होते कि काका शिवसेनेला फक्त खेळवतायत आणि नंतर हे कांग्रेस ला कमजोर करतील, शिवसेना फोडायला मदत करतिल किंवा स्वयं:चाच एखादा गट भाजपा ला देतिल. अहो ताई आमच्या पिढीने बाल्यावस्थेत व्हि.पि. सिंग, चंद्रशेखर ह्यांचा खेळखंडोबा, शरद पवारांनी फोडलेलि शिवसेना, नरसिंहरावांची तारेवरची कसरत, आमच्या तारुण्यावस्थेत देवेगौड़ा, गुजराल ह्यांची कांग्रेस ने केलेली फटफजिति, सोनियांच्या समर्थकांनी संडासात कोंडलेले केसरी, राज्यपाल रोमेश भंडारी ह्यांची विवादास्पद कारकिर्द तर वाजपेयी ह्यांनी 13 दिवस मग 13 महिने नंतर पाच वर्ष चालवलेले सरकार, जयललिता आणि आता चे हिंदू सम्राट सुब्रमण्यम स्वामी ह्यांनी रडकोंडीला आणलेले वाजपेयी, अडवाणी. त्यासुमारास संसदेत झालेलि ओजस्वी भाषणे जार्ज फर्नांडीस, वाजपेयी, अडवाणी, स्वराज, कम्युनिस्ट नेते इत्यादि इत्यादि. हुश्श ;) आता मला सांगा मि किती अविश्वास प्रस्ताव पाहिलेत?
  • Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर Sun, 11/24/2019 - 08:52 नवीन
एक शक्यता आणखी सांगतो मि किंवा जालावर इतरांनी वर्तवलेले अंदाज खोटे ठरले आणि कसेही करुन जर हे सरकार विश्वास मत नाही संपादन करु शकले तर फडणवीस (शहा) हे राज्यपालांना विधानसभा बरखास्त करुन पुनः निवडणूकीचा सल्ला देतिल आणि राज्यपाल तो मानतील. कारण तोपर्यंत सर्व पक्षांचा खेळखंडोबा खेळन झाला असेल, राज्यपालांचे "तो विवेकी" निर्णय कोर्टात सुध्दा टिकेल. अहो हे राजकारण आहे कुठलेहि विधिनिवेश न ठेवता खेळायचा खेळ आहे. ईथे गितकार पहिले आपल्याला साजेसे गीत लिहितो मग त्याला साजेसी अशी "घटनेची" चाल शोधतो. हा खेळ कांग्रेस, काका, मोदी शहा ह्यांनी खेळावा. बखरकारी भाषा बोलणारे येरगबाळ ईथ फक्त तोंडघशि पडतात.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 11/24/2019 - 09:18 नवीन
म्हणून आधीच सांगितले की कुतूहल म्हणून विचारले, अधिक काही नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर Sun, 11/24/2019 - 03:54 नवीन
ईडी और मिर्ची का चक्कर बाबु भाई बहोत बुरा होता है.
  • Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर Sun, 11/24/2019 - 05:35 नवीन
ये अमित शाह इंसान नहीं रहने का.. अबे ये जिन्न है जिन्न देख तो चंद्रागारु जैसा हौला जो हिल गया था अब्बी हल्लु हल्लु वापिस आने के मुड मे होना बावा. और किसकु मंगताय आजादी? N Chandrababu Naidu @ncbn Dear Sri @AmitShah Ji, truly appreciate your esteemed office’s quick redressal of the issue related to Amaravati not being mentioned on India’s map. You have endeared yourself to Telugu people by taking this step.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 11/24/2019 - 12:19 नवीन
बॉस, अमित शहा जर माझ्या भाग्याने तिथे समोरासमोर भेटले तर त्या माणसाला मी अक्षरशः लोटांगण नमस्कार घालेन... मराठी मिळत नाही, तेव्हा हे इंग्रजी घ्या.. नरहर कुरुंदकर शिवाजी महाराजांबद्दल A Hindu Power has certain distinguishing traits. It is not as if they do not emerge victorious in a war. Victories – there have been many. But their victory does not destroy their opponent. The latter’s territory doesn’t diminish, his might is not erased. The victor’s territory doesn’t expand. Even though victorious, he becomes weaker and stays so. In short, it is plain that they faced total destruction in defeat and weakening in victory. A new chapter in Hindu history is begun with Shivaji wherein battles are won to expand the empire while strength and will power is preserved in a defeat. Secondly, the Hindu Rulers used to be astonishingly ignorant of the border situation. Their enemy would catch them unawares, often marching in over 200 miles in their territory and only then would they wake up to the situation. Whatever may be the outcome of the battle, only theirs would be the land to be defiled. The arrival of Shivaji radically changes this and heralds the beginning of an era of staying alert before a war and unexpected raids on the enemy. Thirdly, the Hindu kings habitually placed blind faith in their adversaries. This saga terminates with Shivaji performing the treacherous tricks. It was the turn of the opponents to get stunned. In the ranks of Hindu kings, the search still going on for somebody to compare with Shivaji on this point.
  • Log in or register to post comments
P
prahappy Mon, 11/25/2019 - 04:16 नवीन
"काका" नाही ह्या कटात सामील असा मानणारा मी एकटाच आहे कि काय इकडे ?
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Mon, 11/25/2019 - 10:06 नवीन
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Mon, 11/25/2019 - 12:56 नवीन
काका कटात नसतील पण पूर्व कल्पना असणारच
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Mon, 11/25/2019 - 17:00 नवीन
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 11/25/2019 - 05:01 नवीन
मिपा वर याबद्दल खूप मोठी चर्चा होईल असे वाटले होते पण तसं काही दिसत नाहीये ! आस्चर्य... मी तर t20 बघावी तस बघत बसलो होतो बघत भूकंपाच्या दिवशी! असो काही मुद्दे आणि प्रश्न - अजित पवारच्या शपथविधी ज्या प्रकारे झालं त्यात काही तरी गडबड आहे हे मी म्हणले होते ते खरेच दिसते, शपथविधीत ते "पक्षाचा चा निर्णय" असे म्हणले नाहीत तर " माझा निर्णय" असे म्हणाले .. आठवा - ज्याअर्थी शरद पवार आणि ठाकरे यांनी उघड एकत्र पत्रकार परिषद घेतली त्याअर्थी खरंच याला राष्ट्रवादी चा पाठिंबा नाही आणि अजित पवरांकडे त्यांनी जेव्हा हि पावलं उचलावी तेव्हा पुरेशे सभासद नवहते ३६/54. - त्यांनी खरंच जर अवैध मार्गे त्या ५४ च्या यादीचा उपयोग केला असेल तर ते आणि भाजप दोन्ही तोंडावर अपाटणर.. त्यांचा काय ते महिन्यात अन्यातवासात जाऊन परत काकांकडे आरामात जाऊ शकतील, भाजपाची वाट लावून - काल पर्वा पर्यंत लोकांच्या मनातून शिवोवसेना उतरली होती आत भाजप हि उतरणार,, मिळविलेला पुण्य असले धेंडंडगुजरी काम करून घालवणार असे दिसतंय ! - सर्वात आस्चर्य याचा वाटतंय कि एवढा मोठा निर्णय घेताना अजित पवरांच्या म्हणण्याला ८-१० आमदार भुलले हे समजू शकतो.. पण पूर्ण भाजप कसे गंडले? त्यांनी शरद पवर्णकडून खात्री कशी नाही करून घेतली? असं कसा? - शरद पवारांचाच हा खेळ वैगरे हे वाचतोय पण १००% खरं वाटत नाही... त्यांना जर भाजपाला मूक पाठिंबा द्यायचाच होता किंवा उघड देऊन सेनेला त्रास द्यायचा होता तर त्यांनी मागील ५ वर्षाप्रमाणे बहरून मूक पाठिंबा देऊ केला असता! - विधिमंडळ नेत्याला काढण्याचाच अधिकार विधिमंडळ पक्षाला ( ५४ ) असतो ना? कि राजकीय पक्षाला? उदाहरणार्थ इंग्लड मध्ये किंवा ऑस्ट्रेलियात काही वेळा चक्क पंतप्रधानाला काढण्यात आले ते स्वतच्यात पक्षाच्या संसदीय सभासदांनी, त्यात त्या पक्षाच्या निवडून ना आलेल्या किंवा पक्ष अध्यक्ष वैगरेनं प्रत्यक्ष मतदान करा येत नाही , संसदीय सभासदांची बैठक होते त्यात कोणीतरी आहे त्या मुख्याला "च्यालेंज " करतो , मतदान होते .. तिथे पक्षाचा अध्यक्ष सुद्धा उपस्थित नसतो ! मग हे भारतात हि लागू नाही का ? तिन्ही ठिकाणी वेस्टमिनिस्टर पद्धतच आहे जवळ जवळ! म्हणजे अजित पवारानं काढण्याचा अधिकार ( फक्त संसदीय नेतेपदाच्या जगेवरून , पक्षातून नव्हे) फक्त त्या ५३ सभासदांना आहे .. एकूण काय हा राडा सेनेनेच घातला आणि भाजप आता त्याच ठरलं जातंय ... मुळात दोनचाच वैचारिक युत्या यौग्य होत्या सेने भाजप आणि २ कांग्रेस ,, आता दुसरे काहीही घडले तरी ते अनैसर्गिकच असणार ... ते योग्य नाही आणि टिकणार नाही .. जनतेची दिशाभूल सेनेने, पवारांनी आणि आता भाजप ने केली असेच म्हणावे लागेल ( काँग्रेस काय काठावर )
  • Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर Mon, 11/25/2019 - 23:58 नवीन
मिपा वर याबद्दल खूप मोठी चर्चा होईल असे वाटले होते चौकस साहेब गेले ते दिवस ;) काय जबरदस्त चर्चा व्हायच्या इथे पण आता नाहि होत त्याचे कारण म्हणजे... असो. मि सुध्दा आपला फावला वेळ व्टीटर वर घालवतो खुप सारे फालोवर्स जमवलेयत आणि आवडता विषय आहे संरक्षण आणि त्यासंदर्भात घड़णार्या घडामोडी आणि अनुषंगाने पाकिस्तान. साहजिकच केवळ त्यामुळेच दुसर्यांदा मागच्या आठवड्यात माझे अकाउंट ISPR Interns च्या Mass Reporting मुळे Block करण्यात आले आणि ते परत मिळेपर्यंत ईथेच मिसळपाव वर. बारा तारखेला दुपारी हापिसात मिटिंग मिटिंग खेळत असताना मि हे व्टीट काहि लोकांना टॅग करुन टाकले होते Where the Shiv Sena is screaming that the Governor did not give them more time then why did the NCP raised their hands eight hours before the time given to them ? What's Going On? ह्या व्टीट ला काहि मिनिटातच टॅग केलेल्या एका व्यक्ति ने जी बंगाली असुन राईट विंग आणि व्टीटर वर मोठ नाव आहे खालील रीप्लाय खुप सार्या इमोजी सहित गम्मत म्हणुन दिला. Maybe they don't want the Prime Minister to leave for Brazil late at night. हा विषय इथेच संपला पण हा किडा काहि डोक्यातुन जाईना नंतर विचार केल्यावर लक्षात आले कि अजित पवारांनी राज्यपालांना जे मुदतवाढि संदर्भात आठ तास अगोदर पत्र लिहिले साहाजिकच ते शरद पवारांच्या संमति ने लिहिले त्यामुळेच माझा असा विश्वास आहे कि काका फक्त शिवसेनेला खेळवतायत आणि तेच मि माझ्या प्रतिसादात 17 तारखेला ह्या धाग्यावर लिहिले. भाषा थोड़ी हैद्राबादि आणि विनोदी अंगाचि होती पण त्यातिल एक वाक्य पुन्हा लिहितोच. चिच्चा का ऐसा है पडोसी का बेटा पेड पर चढा उतरा तो आम मिलेंगे और गिर गया तो खाना और शिवसेना की वो हालत होने वाली है भंडारे में गये तो खाना खतम बाहर आये तो चप्पल गायब.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Tue, 11/26/2019 - 01:16 नवीन
being so intellectually HIGH. पत्ता द्या फोल्लोव करतो ट्वीटरवर.
  • Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर Tue, 11/26/2019 - 01:37 नवीन
आमच्या intellectually HIGH पणाचे उदाहरणे इथलेच खुप सारे जुने जाणते मिपाकर देतील माझे व्टिटर हॅंडल चे नाव वाचुन जे कि माझे खरे नाव आहे पण त्यानंतर माझा हा मिपा आयडी ब्लॉक होईल ;) आणि तसेहि अजुन व्टिटर सोबत पत्रव्यवहार सुरु आहे अकाउंट वापस मिळेल तेंव्हा बघु.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 11/25/2019 - 06:33 नवीन
काल पर्वा पर्यंत लोकांच्या मनातून शिवोवसेना उतरली होती आत भाजप हि उतरणार,, मिळविलेला पुण्य असले धेंडंडगुजरी काम करून घालवणार असे दिसतंय ! बाडीस महा शिव आघाडीला आपले "संकरित" सरकार स्थापन करू द्यायचे होते ते आपल्याच मरणाने मेले असते. यानंतर एकतर फेर निवडणूक झाल्या असत्या किंवा निम्मे शिवसेनेचे आमदार भाजपाला पाठिंबा देते झाले असते. आता सरकार तरले तरी राष्ट्रवादीच्या भ्रष्ट लोकांना पावन करून घ्यावे लागेलं आणि नाही तरले तर जनतेची सहानुभूती घालवून बसल्यामुळे फेरनिवडणूक एकहाती जिंकणे कठीण होईल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा