Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • जागतिक महिला दिन विशेष कविता: 'अक्षरांचे पंख'
  • खेळ मांडला...
  • भाग ३ - !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ७: नितांत सुंदर ध्वज मंदिर ट्रेक
  • गालावरी लाली नभाची.
  • वेताळ कथा - कोबी सिंह आणि विश्वगुरू प्रदेश
  • राजस्थानची रोजनिशी : ६ : हल्दी घाटी, नाथद्वारा
  • इजराईल इराण युद्ध : स्वतंत्र धागा
  • पाताळयंत्री चर्चा
  • राजस्थानची रोजनिशी : ५ : चित्तोडगड, उदयपूर सिटी पॅलेस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

भामरागड

दिवाळी अंक Fri, 10/25/2019 - 02:30

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

भामरागड

भामरागड...! गडचिरोली जिल्ह्यातील अतिशय दुर्गम समजल्या जाणार्‍या या भागाबद्दल इतकी भीती आहे की कुणीही नवीन व्यक्ती तिथे जायला आधीच घाबरते. मी मे २०१७मध्ये भामरागड येथील लोक बिरादरी संस्थेत कामावर रुजू झालो आणि हळूहळू या जागेच्या प्रेमातच पडलो. मग काय तर...!! ही जागा आहेच मुळी तशी.

इथलं निसर्गसौंदर्य, हिरवंगार जंगल, सकाळ-संध्याकाळ पक्ष्यांचा किलबिलाट, सुंदर आणि स्वच्छ नदीकिनारा, नदीकाठची गुळगुळीत रेती, भिन्न-भिन्न जातींचे पक्षी आणि त्यांचे सुमधुर आवाज, पौर्णिमेचा चंद्र आणि अमावस्येच्या रात्री दिसणाऱ्या अगणित चांदण्या, नयनरम्य सूर्योदय आणि सूर्यास्त, लाकडी डोंग्याची सैर, विहंगम त्रिवेणी संगम, प्रेमळ आणि आपलंसं करून घेणारे माडिया-गोंड आदिवासी, आल्हाददायक पावसाळा आणि तुडुंब भरून वाहणार्‍या नद्या, पहाटेची थंडी या सगळ्याच गोष्टी मनाला भुरळ पाडणार्‍या आहेत.

दोन वर्षांत भामरागडमध्ये खूप फिरलो. बर्‍याच जंगलवाटांची सायकलवरून भ्रमंती केली. माझी सावलीही ऋतूनुसार साथ सोडायची, पण माझ्या कॅमेऱ्याने मात्र कधीच दगा दिला नाही. तो सदैव सोबतच असायचा. मग काय...? बरेच फोटो, व्हिडिओ कॅमेर्‍यात कैद केले. डेव्हलपमेंटच्या नावाखाली पुढे कधीतरी हा भाग 'सो कॉल्ड स्मार्ट' होईल आणि इथल्या निसर्गसौंदर्याचा नाश होईल या भीतीने मी काही आठवणी डिजिटली जपून ठेवल्या. एक आठवण म्हणून काही निवडक क्लिप्स आणि फोटोज एकत्र करून हा व्हिडिओ बनवला आहे. खरं पाहता काही मिनिटांच्या व्हिडिओमध्ये भामरागडचं आख्खं सौंदर्य सामावणं अशक्यच आहे. मी काही प्रोफेशनल फोटोग्राफर नाही, त्यामुळे सिनेमॅटोग्राफीच्या दृष्टीने व्हिडिओ त्या स्तराचा निश्चितच नाही. पण व्हिडिओ आपणा सर्वांना नक्कीच आवडेल आणि भामरागडची ओढ निर्माण करेल अशी आशा आहे.

लोकेश तमगीरे ह्यांचे यू ट्यूब चॅनेल

20191016-122815

अनुक्रमणिका

य
यशोधरा Sat, 10/26/2019 - 09:47 नवीन
सुंदर आहे भामरागड. ही चित्रफीत पाहून एकदा तरी जावेसे वाटतेय.
  • Log in or register to post comments
ल
लोकेश तमगीरे Fri, 11/01/2019 - 17:08 नवीन
धन्यवाद ताई ..! अवश्य भेट द्या.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 10/26/2019 - 16:09 नवीन
याचे पार्श्वसन्गीत तर फारच मन:शान्ती देणारे आहे पण प्रत्येक फ्रेम इतकी सच्ची आहे की काय बोलू ? तिला " सच्ची " हेच विशेषण योग्य ! इतर कोठे तुम्ही व्यक्त झाले आहात का ही उत्सुकता आता आहे !
  • Log in or register to post comments
ल
लोकेश तमगीरे Fri, 11/01/2019 - 17:11 नवीन
धन्यवाद ..! संधी मिळाल्यास एकदा तरी नक्की भेट द्या भामरागडला.
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य गुरुवार, 10/31/2019 - 08:50 नवीन
दिल बाग बाग हो गया ! काही दिवस/महिने अशा निवांत जागी जाऊन राहावेसे वाटायला लागले आहे.
  • Log in or register to post comments
ल
लोकेश तमगीरे Fri, 11/01/2019 - 17:11 नवीन
नक्की भेट द्या भामरागडला.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति गुरुवार, 10/31/2019 - 08:54 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments
ल
लोकेश तमगीरे Fri, 11/01/2019 - 17:12 नवीन
मनःपूर्वक धन्यवाद ..!
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Sat, 11/02/2019 - 03:41 नवीन
सुंदर फोटो आहेत. भामरागडला एकदा जायचे आहे. आनंदवनमधे बऱ्याचदा गेलो आहे पण भामरागडला जाणे कधी झाले नाही. खूप दिवसानंतर डोंगा हा शब्द वाचला.
  • Log in or register to post comments
ल
लोकेश तमगीरे Sun, 11/03/2019 - 08:17 नवीन
एकदा तरी भामरागडला जाऊन या. डोंग्यातुन सैर करून या. भामरागडला जाण्यासाठी हिवाळा हा योग्य ऋतू आहे. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
न
नरेश माने Mon, 11/04/2019 - 07:14 नवीन
खुप सुंदर आहे चित्रफित! नक्षलग्रस्त आणि खुप दुर्गम भाग असल्यामुळेच ही निसर्गसंपन्नता अजून टिकून आहे असे राहून राहून वाटते. या भागाला भेट द्यायला नक्कीच आवडेल. विदर्भातील गडचिरोली हाच एक जिल्हा आहे जिथे कधी जाता आले नाही.
  • Log in or register to post comments
ल
लोकेश तमगीरे Wed, 11/13/2019 - 05:37 नवीन
@नरेश माने: निसर्ग संपन्नतेचं आपण जे बोलले ते पण कारण असू शकते. गडचिरोली हा जिल्हा ७५% वन प्रदेश आहे. येथील निसर्ग निश्चितच आल्हाददायक आहे. नक्की जाऊन या.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 11/05/2019 - 08:42 नवीन
निसर्गरम्य भामरागड आवडले! तुम्ही वर सांगितले आहे कि भामरागडला जाण्यासाठी हिवाळा हा योग्य ऋतू आहे. आता हिवाळा सुरु होईल, तिथे यायचे झाले तर किमान किती दिवसांसाठी यावे आणि निवास / भोजनाची व्यवस्था कशी आहे ह्याबद्दलही माहिती दिलीत तर ती उपयुक्त ठरेल. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ल
लोकेश तमगीरे Wed, 11/13/2019 - 05:42 नवीन
@टर्मिनेटर: धन्यवाद ...! या लिंकवर दिलेल्या व्यक्तींशी संपर्क करा. ते तुम्हाला मदत करतील http://www.lokbiradariprakalp.org/#contact
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Tue, 11/12/2019 - 15:37 नवीन
चित्र आवडले पण निसर्गावर आक्रमण करणारे संगीत मला अजिबात आवडले नाही. लाटांचे आणि वल्ह्यांचे चुबुक चुबुक आवाज, पक्ष्यांचे आवाज इ. नैसर्गिक आवाजच ठेवले असते तर जास्त चांगले झाले असते. अर्थात हे माझे वैयक्तिक मत. नदी, तलाव इ. विविध जलाविष्कार छान टिपले आहेत. लांब शेपटीचा उडता पक्षी फारच आवडला. अनेक अनेक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ल
लोकेश तमगीरे Wed, 11/13/2019 - 05:49 नवीन
मनःपूर्वक धन्यवाद ! आपल्या मताशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
स
सुमो Tue, 11/12/2019 - 17:06 नवीन
बकेट लिस्टमध्ये घातल्या गेले आहे.
  • Log in or register to post comments
ल
लोकेश तमगीरे Wed, 11/13/2019 - 05:51 नवीन
वाह ...! तुमची इच्छा लवकरच पूर्ण होवो.
  • Log in or register to post comments
व
विनिता००२ गुरुवार, 11/14/2019 - 11:23 नवीन
खूप सुरेख चित्रफीत! डोळे निवले पाहून. मध्यंतरी वरोर्याला येणे झाले, पण भामरागढला यायला पुरेसा वेळ नव्हता. नक्की येईन. :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 11/23/2019 - 05:19 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 16113 views
  • Log in or register to post comments
  • 16113 views

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 41 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 53 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 54 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 57 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours ago

नवीन सदस्य

  • सदस्य: सरगर
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:42
  • सदस्य: yummmtummm
    नोंदणी: Mon, 04/14/2025 - 17:21
  • सदस्य: SavitaGovilkar
    नोंदणी: Mon, 01/06/2025 - 15:44
  • सदस्य: रमेश माने
    नोंदणी: Mon, 01/06/2025 - 14:24
  • सदस्य: भूषण सहदेव तांबे
    नोंदणी: Mon, 10/28/2024 - 09:07
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा