Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी : ऑगस्ट २०१९

ध
धर्मराजमुटके
गुरुवार, 08/01/2019 - 19:21
🗣 125 प्रतिसाद
राजकीय वार्ता : राष्ट्रवादीतून भाजपात इनकमिंग मोठ्या प्रमाणवर सुरु झाल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष काही जिल्ह्यांपुरताच मर्यादित राहिल की काय असे वाटू लागले आहे. या निवडणूकीचे निकाल लागल्यावर राष्ट्रवादी, मनसे या पक्षांचे भवितव्य काय असेल याची स्थिती स्पष्ट होईल. भाजपात आता आनंदाचे वातावरण असले तरी एव्हढ्या मोठ्या लोकसंख्येला खायला काय घालायचे यावरुन भविष्यात संकटे उभी राहू शकतील असे वाटते. शिवाय पोटच्या पोरांच्या तोंडचा घास काढून घेऊन दत्तक घेतलेल्या पोरांचे पोट भरावे लागणार आहे की देवाने चोच दिली आहे तर चाराही तोच देईल याचाही निकाल काय लागतो ते बघणे रोचक ठरेल. भाजप मधे आता जागा फुल झाली आहे, आता भरती नाही असे मुख्यमंत्री म्हणाले तरी माझी त्यांना विनंती आहे की थोडं थोडं सरकून घ्यायला सांगा नेत्यांना. अजून थोडी जागा होऊ शकते गाडीत. फक्त येणार्‍या काळात कार्यकर्ते व्यासपीठावर बसतील आणि नेते समोरच्या खुर्च्यांवर बसतील एवढे होणार नाही याची काळजी घ्या. शिवसेनेचे आदित्य ठाकरे सक्रीय राजकारणात उतरले आहेत, बहुतेक वरळी मधून निवडणूक लढवतील अशी चिन्हे आहेत. तसे झाले तर ठाकरे घराण्यात निवडणूक लढविणारा पहिली व्यक्ती म्हणून त्यांची इतिहासात नोंद होईल. किंगमेकर ते किंग असा प्रवास होणार काय हे तर आनेवाला वक्त ही बतायेगा ! भाजपाच्या वाढीचा शिवसेनेवर काय परिणाम होईल हे पाहणे देखील रोचक ठरेल. साहेबांच्या आवाजसरशी रस्त्यावर उतरणार्‍या कार्यकर्त्यांची पिढी आता अस्तंगत होत चालली आहे. आदित्य ठाकरेंच्या काळात बहुतेक अफजलखानाचा कोथळा, पाठीत खंजीर खुपसणे, लखोबा लोखंडे सारखे वाक्प्रचार अस्तंगत होतील अशी चिन्हे आहे. दलित मंडळींच्या वेगळ्या चुली एकत्र येऊन काही चमत्कार घडेल हे बहुधा येत्या ५० वर्षात तरी शक्य दिसत नाही. काँग्रेस मधे आता महाराष्ट्रात कोणता मोठा नेता राहिला आहे काय हे आठवून पाहण्यासाठी मेंदूला खुप चालना द्यावी लागेल. तीन तलाक कायद्यामुळे मुस्लीम मते कशी व्यक्त होतात हे देखील या निवडणूकीत पहायला मिळेल. भाजपा वाढली तर शिवसेना या निवडणूकीत तर बरोबर राहिल मात्र भविष्यात हेच दोन एकमेकांचे विरोधी पक्ष म्हणून समोर येतील काय ? अर्थात राजकारणात काहीही शक्य असते, एखादी मोठी घटना होत्याचे नव्हते करते आणि कोणाच्या खिजगणतीत नसलेला पक्ष पुन्हा वर चढू लागतो असेही अनुभवास येऊ शकते. पिढ्यान पिढ्या जनतेची सेवा करणार्‍या घराण्यांना रिकाम्या हाताने बसणे शक्य होत नाही त्यामुळे ते एका पक्षातून दुसर्‍या पक्षात जातच राहणार. नोकरी मधे जसे आजकाल लोक २-३ वर्षात नोकरी बदलतात तसेच समजायचे हे ! दिल्ली मधे महिलांना मेट्रोत फुकट प्रवास या घोषणेनंतर (ही योजना प्रत्यक्षात आली की अजून अभ्यास चालू आहे ?) आज केजरीवाल सरांनी २०० युनिट पर्यंत वीजबिल नाही अशी एक अफलातून योजना काढली आहे. आता महाराष्ट्र सोडून दिल्लीत राहयला गेले तर बरे पडेल की काय याचा विचार करतोय :) फक्त भविष्यात रोज ऑक्सीजनचा सिलींडर विकत घ्यावा लागेल श्वसनासाठी. तोही बहुतेक सरकार फुकट देऊ शकेल. धाग्याचे नाव चालू घडामोडी आहे आणि मजकूर सगळा राजकारणाविषयी आहे त्याबद्द्ल माफी मागतो. वाचक / प्रतिसादक हळूहळू इतर गोष्टींची भर घालतीलच.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 58791 views

🗣 चर्चा (125)
न
नंदन Fri, 08/23/2019 - 01:18 नवीन
१. ट्रम्पतात्यांचंं निवडून आल्यावर दिलेलं आश्वासन ('ओबामाकेअर' रद्द करून त्याजागी असला महत्त्वाकांक्षी प्लॅन) “We’re going to have insurance for everybody,” Trump said. “There was a philosophy in some circles that if you can’t pay for it, you don’t get it. That’s not going to happen with us.” People covered under the law “can expect to have great health care. It will be in a much simplified form. Much less expensive and much better.” २. त्यानंतर दोन महिन्यांनी दिलेली अजून एक ग्वाही: Despite what you hear in the press, healthcare is coming along great. We are talking to many groups and it will end in a beautiful picture! हे जे काही सगळ्या-सगळ्यांना इन्शुरन्स देणारं "beautiful picture" म्हणजे काय, याचे काहीही डिटेल्स ट्रम्प प्रशासनाने दिले नाहीत. उलट 'ओबामाकेअर इज डेड!' असा जल्लोष करण्यात ट्रम्पतात्या आणि त्यांचे भक्तगण मग्न होते. 'बरं, ओबामाकेअर नाही आवडत तुम्हांला. ठीक आहे. तुमचा पर्याय काय?' ह्या साध्या प्रश्नाचं उत्तर न मिळाल्याने रिपब्लिकन बहुसंख्या असलेल्या सिनेटकडून ओबामाकेअर रद्द करण्याचा प्रस्ताव पराभूत होण्याची नामुष्की ट्रम्पतात्यांवर आली (आणि मग नेमेप्रमाणे जॉन मकेनशी भांडणं - अगदी त्यांच्या मृत्यूपश्चातही उलटसुलट विधानं करून आपली पातळी दाखवून देणं इ. नेमेच्या लीळा झाल्या). ३. २०१८ च्या निवडणुकीत 'डेमोक्रॅट्सच pre-existing conditions कव्हर करायच्या विरुद्ध आहेत' असल्या लोणकढ्या अ‍ॅब्सर्ड थापा मारून झाल्या!!! ४. ही आजच्या वॉल स्ट्रीट जर्नलमधली बातमी: (ACA = ओबामाकेअर) Health Insurers Set to Expand Offerings Under the ACA Oscar, Cigna, Centene plan larger footprints
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 08/23/2019 - 08:47 नवीन
काॅंग्रेस नेता जयराम रमेश गुरुवारच्या पुस्तक उद्घाटनाच्यावेळी बोलले की पंतप्रधान मंत्र्याच्या चांगल्या कामाची दखल न घेता त्यांना दानव ठरवण चुकीच आहे. पंतप्रधानांची टिका त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यावर करण चुकीच आहे . असे करुन विरोधी पक्ष आपली हानीच करत आहे !! काॅंग्रेस नेता अभिषेक सांघवीने जयराम रमेशच्या गुरुवारच्या वक्तव्याला पाठींबा दिलेला आहे. Not recognizing PM Modi's work and demonizing him all the time is not good. Senior Congress Leader Jayram Ramesh Read more at: http://m.timesofindia.com/articleshow/70799583.cms?utm_source=contentofi... काॅंग्रेसच्या अंध भक्तांनी यातुन शिकण्यासारख आहे !!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/23/2019 - 08:54 नवीन
Now, Abhishek Singhvi backs Jairam Ramesh: 'Demonising PM Modi wrong' ३७० कलम रद्दबातल करण्याच्या वेळेस अनेक वरिष्ठ कॉन्ग्रेसी नेत्यांनी, "गांधी-वद्रा घराणे आणि त्याचे पाईक" यांच्या विरोधाला न जुमानता, सरकारच्या कृतीला पाठींबा दर्शविला होता. त्यानंतर आता, एक पाऊल पुढे टाकत, वरिष्ठ कॉन्ग्रेसी, "मोदींचा आंधळा विरोध न करता, त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेणे आवश्यक आहे", अशा अर्थाची विधाने करायला सुरुवात केली आहे. अच्छे दिन आ गये है । ;) =)) गांधी-वद्रा घराण्याच्या अंध पाईकांनी यावरून थोडासा बोध घ्यायला हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 08/23/2019 - 09:28 नवीन
गुजरात दंगलींचा तपास करताना मोदी शहा जोडीचा एंनकाॅंउटर का केला नाही ह्याची खंत वाटत आहे का ?? स्वःताची तुंबडी भरण्याशिवाय कोणती गोष्ट चिदंबरमने प्रामाणिकपणे केली ?? चिदंबरमवरच्या केस मध्ये CBI करत असलेल्या तपासाची माहीती चिदंबरमपर्यंत पोहोचवण्याचे काम दोन स्त्री पत्रकार करत होत्या !! कोर्टाने बंद लिफाफ्यात मागीतलेली माहीती सुद्धा चिदंबरमच्या दिल्लीतील जोरहाट बंगल्यात पोहोचवलेली होती. ती कागदपत्रे नंतरच्या CBI च्या धाडीत सापडली !! ह्या पत्रकारांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ! CBI अधिकार्यांना Honey trap करायच काम ही महीला पत्रकार करत होती !! तिच्या लॅपटाॅप मध्ये महत्वाची माहीती मिळालेली आहे !!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/23/2019 - 18:08 नवीन
As Pakistan cries foul over Kashmir, UAE to honour PM Narendra Modi काश्मिरबाबत पाकिस्तान जगभर आकांडतांडव करत फिरत असला तरी, त्याच्याकडे चीन सोडून इतर कोणी लक्ष द्यावेसे वाटत नाही. इतकेच नव्हे तर, Organisation of Islamic Cooperation (OIC) चे सभासद असलेल्या ५७ अधिकृतरित्या मुस्लिम असलेल्या देशांनीही पाकिस्तानकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे. OIC चा संस्थापक-सभासद असलेल्या पाकिस्तानचा कट्टर विरोध मोडीत काढून, फेब्रुवारी २०१९ मध्ये, भारताच्या तात्कालिन परराष्ट्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांना, OIC च्या सभेत महत्वाचे भाषण करण्यास आमंत्रित केले होते, हे आठवत असेलच. आता त्यापुढे एक पाऊल टाकून संयुक्त अरब अमिरातींनी (युएई), कश्मिर प्रकरणात भारताला उघड पाठिंबा दिला इतकेच नव्हे तर, मोदींना 'Order of Zayed' युएईचा सर्वोच्च किताब जाहीर केला आहे. हा बहुमान मोदी यांना त्यांच्या २३-२४ ऑगस्ट या दोन दिवसांच्या युएई भेटीदरम्यान देण्यात येईल. युएची ही कृती पाकिस्तानला एक भली मोठी राजकिय चपराक समजली जात आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 08/24/2019 - 09:12 नवीन
'तू तेरा देख'
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 08/24/2019 - 09:12 नवीन
अरुण जेटली ह्यांचे दुखःद निधन !! भावपुर्ण श्रद्धांजली !!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 08/24/2019 - 14:17 नवीन
भारताने एका विद्वान, सत्च्छिल, सुसंस्कृत नेत्याला गमावले ! :( भावपुर्ण श्रद्धांजली !!!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 08/24/2019 - 09:39 नवीन
मास्टर व्हिसा कार्डच्या स्पर्धेत रुपे कार्ड !! मा पंत प्रधान मोदीजींच्या शुभ हस्ते रुपे कार्ड UAE त लाॅंच. UAE तल्या मोठ्या बॅंका हे कार्ड भारतीय NRI ना वितरण करतील. UAE गेलेले भारतीय पर्यटक भारतातले रूपे कार्ड UAE त वापरु शकतील. तिथले सामान सर्विसेस व सुविधा विकत घेउ शकतील. ह्या पुर्वी रुपे कार्ड सिंगापुर मध्ये चालु झालेल आहे. आता अन्य आखाती देशात लवकरच सुरु होईल !!
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 08/24/2019 - 19:45 नवीन
आठ-नऊ वर्षांपूर्वी, डीपवॉटर होरायझन ऑईल रिगचा स्फोट झाला. अकरा कामगार त्यात मारले गेले आणि प्रचंड प्रमाणात तेलगळती झाली. सुमारे २१ कोटी गॅलन तेल सतत तीन महिने समुद्रात गळत होतं. लुईझियाना, अलाबामा आणि मिसिसिपी राज्यांना याची सर्वाधिक झळ पोचली. इतकी वर्षं उलटली तरी आजही याचे परिणाम दिसून येतात. ही दुर्घटना घडल्यावर, ओबामा प्रशासनाने साहजिकच ब्रिटिश पेट्रोलियमला जबाबदार धरलं. (वेडाच्चै! ही सगळी रिपब्लिकन राज्यं आहेत. ट्रम्पतात्या जसे कॅलिफोर्नियात आगी लागल्यावर मदत करण्याऐवजी अ‍ॅब्सर्ड वक्तव्यं करत बसतात, तसं कायतरी करायला हवं होतं!!!). प्लीज नोटः अमेरिकन प्रशासनाने, अमेरिकन साधनसंपत्तीची अपरिमित हानी केल्याबद्दल ब्रिटिश कंपनीला जबाबदार धरलं. यावर धनाढ्य कंपन्यांची हांजी-हांजी करत फिरणार्‍या तथाकथित 'राष्ट्रवादी' रिपब्लिकन राजकारण्यांचा, फॉक्स न्यूजवरच्या चाटूगणांचा आणि बुद्धिभेद झालेल्या भक्तांचा प्रतिसाद काय होता? १. ओबामा खाजगी बिझनेस-विरोधी आहे. २. ओबामा अन-अमेरिकन आहे. ३. ओबामा कम्युनिस्ट आहे. फास्ट फॉरवर्ड टू २३ ऑगस्ट, २०१९: चक्रवर्ती सम्राट ट्रम्पतात्यांचे ट्विटः Our great American companies are hereby ordered to immediately start looking for an alternative to China, including bringing.. अमेरिकेचा अध्यक्ष (ऊर्फ महासत्तेचा प्रमुख) खाजगी कंपन्यांना त्यांनी कारभार कसा करावा, याबद्दल हुकूम सोडतो???? तेही ट्विट करून??? आता कुठे गेले तथाकथित बिझनेस-फ्रेंडली रिपब्लिकन्स आणि फॉक्सन्यूजी चाटूगण? असलं काही ओबामाने म्हटलं असतं तर त्याची थेट स्टॅलिनशी तुलना झाली असती. ट्रम्पतात्यांनी म्हटल्यावर बघा कसे सगळे बसले मूग गिळून!!! - or worse, काही भक्तगण तर पूर्ण घूमजाव करून तळी उचलायलाही तयार असतील. [ट्रम्पसमर्थक 'चीनबद्दल धोरण काय असावं, हे ठरवण्याचा अधिकार ट्रम्प प्रशासनाला नाही काय?' सारखे मूळ मुद्द्याला बगल देणारे दूधखुळे प्रश्न घेऊन धावत येण्यापूर्वी सांगायला हवं! - अवश्य आहे; पण तो खाजगी कंपन्यांना ऑर्डरी सोडण्याइतपत नाही. अर्थात, त्यावरही 'हे लिटरली घेऊ नका, भावनाओं को समझो' किंवा 'नया है वह!' सारखं समर्थनही येईलच!!!]
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 08/28/2019 - 06:45 नवीन
हेच भारतीय एंजिअनिअरांनी करायचं. आपलं तंत्रज्ञान शोधायचं
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 08/29/2019 - 09:16 नवीन
FIT INDIA MOVEMENT मा मोदीजींनी FIT INDIA MOVEMENT चे आज लाँच केले आहे. ह्या समारंभात मोदीजींचे अभुतपुर्व भाषण झाले , ह्या भाषणात समजुन येत होते की ही चळवळ मोदींजींना ईतकी प्रिय का आहे ते !! देशभर FIT INDIA MOVEMENT ह्या चळवळीला एक व्यापक रुप देण्यात येणार आहे !! ह्या साठी "शिल्पा शेट्टी" ला ब्रँड अँबेसेडर नियुक्त केलेले आहे. दर पंचायतीत, शाळेत, ह्या चळवळीला नेण्यात येणार आहे. मा मोदीजींची अजुन एक वेडसर कल्पना म्हणुन बाजुला सारण्यापुर्वी तुम्हाला विचार करायला लावणारी उदाहरणे स्वःता मोदीजींनी आपल्या भाषणात दिलेली आहेत. FIT MOVEMENT जगभरात जोरदार चालु आहे. चीन पासुन ते कोरीया जापान ऑस्ट्रेलीया व युरोप ह्या देशांनी स्वःताला २०२० ते २०३० अशी वेळ घालुन दिलेली आहे. ह्या वेळेत आपल्या देशाच्या जनतेच्या २५ ते ५० % लोकांना पुर्णपणे आळशीपणातुन बाहेर काढुन फीटनेस मध्ये भाग घेण्यास उद्युक्त करण्याचे लक्ष ठेवलेले आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 08/29/2019 - 12:13 नवीन
मी देखील आजच बायकोला चालती हो म्हणून सांगितले!
  • Log in or register to post comments
L
lakhu risbud गुरुवार, 08/29/2019 - 16:44 नवीन
या अतुलनीय धैर्या बद्दल अभिनंदन. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा झाली असणारच !
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 08/29/2019 - 16:45 नवीन
बायकांना व्यायामाची गरज नाही. दिवसभरात तोंडाचा किती तरी व्यायाम करतात बिच्चार्‍या :)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 08/30/2019 - 10:19 नवीन
याच न्यायाने पुरुषांनाही व्यायामाचा आग्रह करु नये त्यांचाही डोळ्यांचा व्यायाम चालू असतो दिवसभर. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 08/29/2019 - 10:04 नवीन
'अमेरिकेचा अध्यक्ष आपल्या तुंबड्या भरण्यासाठी जागतिक महत्त्वाची परिषद आपल्या मालकीच्या हाटिलात भरवा, अशी मागणी करतो - माझंच्च हाटिल कित्ती मस्त अशी जाहिरात करतो - मग दोनेक वर्षांपूर्वी त्या हाटिलात राहिलेल्या एका माणसाला ढेकूण चावले, म्हणून दिलेल्या भरपाईची केस पुन्हा प्रसिद्धीस आल्यावर, हे सगळं रॅडिकल लेफ्ट डेमोक्रॅट्सचं कारस्थान आहे असा बिनडोक थयथयाट करतो' - असं कधी घडेलसंं वाटलं नव्हतं हो!!! पण चालायचंच - एका महासत्तेचा प्रमुख म्हणून या गोष्टी अपेक्षितच आहेत. तो घटनेतला इमॉल्युमेन्ट क्लॉज वगैरे तेवढा विसरायचा!! बाकी आज ट्रम्पतात्यांनी फॉक्स न्यूजची चाटूपणात कमी पडल्याबद्दल कानउघडणी केली म्हणे!!! - Fox isn’t working for us anymore! म्हणजे हे तथाकथित 'फेअर अँड बॅलन्स्ड' नेटवर्क तात्यांकरता काम करत होतं? ऐकावं ते नवलच की हो!!! आता फॉक्स न्यूजवरच्या बातम्या वाचून अद्वातद्वा तंडत येणार्‍या विद्वान भक्तांचं काय होणार?!!!! :) :) :) :)
  • Log in or register to post comments
M
mayu4u Fri, 08/30/2019 - 07:01 नवीन
ट्रम्पतात्यांच्या चाळ्यांची चिरफाड करण्याकरता एक नवीन धागा सुरु करावा.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Fri, 08/30/2019 - 07:18 नवीन
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 08/30/2019 - 10:43 नवीन
ट्रम्पतात्यांच्या चाळ्यांची चिरफाड करण्याकरता एक नवीन धागा सुरु करावा.
कच्चा माल बराच आहे - आणि ट्रम्पतात्या त्याचा अखंड पुरवठा करत राहणार हे नक्की! तेव्हा धागा निघायचा तेव्हा यथावकाश निघेल. मात्र सध्या बाप्पांच्या आगमनाची चाहूल लागलेली असताना, ही गटारगंगा मिपावर न आलेलीच बरी. शिवाय, चाळ्यांची चिरफाड एका मर्यादेपलीकडे 'जाने दो, आदमी पिएला है!' वर येऊन विसावते. त्यापेक्षा, ट्रम्पतात्यांच्या धोरणांचे होणारे परिणाम अधिक दूरगामी आहेत. आता आजचीच ही बातमी बघा:
The national debt is now 110 percent of the USA’s GDP — the largest ratio since World War II
स्रोत? - कन्झर्व्हेटिव्ह रिव्ह्यू! - https://www.conservativereview.com/news/national-debt-now-110-percent-usas-gdp-largest-ratio-since-world-war-ii/ दहा वर्षांपूर्वी, बुशने खड्ड्यात घातलेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न चालू असताना, कंठ फुटलेले तथाकथित "फिस्क्ल कन्झर्व्हेटिव्ह" आता पहा कसे तोंडात मारल्यासारखे मूग गिळून बसलेत! आणि ती बॅलन्स्ड बजेटच्या नावाने बोंबाबोंब करणारी टी-पार्टीची 'klan'त (क्लांत!) टाळकीही दिसेनाशी झालीत!!! :) :) :) [कुंभार मडकी घेऊन चाललाय मार-आ-लागोला, तुम्ही फुंका उकिरडे!!!]
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/30/2019 - 09:35 नवीन
ADB President Nakao calls on PM Modi, pledges USD 12 billion support to govt’s initiatives या भेटीत ADBच्या अध्यक्षांनी (अ) भारताला US$५ बिलियन अर्थव्यवस्था बनवण्याची महत्वाकांक्षा, (आ) सर्वसामावेशी विकासाच्या योजना आणि (इ) जलद आर्थिक परिवर्तन करण्याच्या योजनांची प्रशंसा केली. एकीकडे पाकिस्तान कटोरा घेऊन जगातल्या शक्य त्या सर्व देशांच्या दारी भीक मागत हिंडत आहे आणि सगळीकडे त्याला केवळ ठेंगाच मिळत आहे. त्याविरुद्ध, आशियायी विकास बँकेच्या (Asian Development Bank उर्फ ADB) अध्यक्षाने पंतप्रधानांची भारतात प्रत्यक्ष भेट घेऊन भारतिय विकास कामांसाठी US$१२ बिलियनचा (रू८४,००० कोटी) वित्तपुरवठा करण्याचे वचन दिले आहे. हे जसे भारताच्या वाढलेल्या जागतिक महत्वाचे निदर्शक आहे, तेवढेच ते जागतिक अर्थसंस्थांना भारतिय अर्थव्यवस्थेबद्दल वाटणार्‍या समाधानाचे निदर्शक आहे. एक वेळ, पुरस्कार आणि प्रशंसेचे सोंग आणता येते, हे वादासाठी मानले तरी पैशांचे सोंग आणता येत नाही, हेवेसांन. पण तरीही, काही हुशार मंडळींना यातही "पुरस्कारासारखे हे पण मॅनेज केले आहे" असे वाटू नये म्हणजे झाले. ;) :)
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 08/30/2019 - 09:57 नवीन
चिंताजनक परीस्थीती https://www.loksatta.com/aurangabad-news/recession-creates-a-load-of-problems-for-truckers-zws-70-1960351/ https://www.loksatta.com/nashik-news/workers-will-transfer-to-other-projects-due-to-recession-zws-70-1960470/
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 08/31/2019 - 07:29 नवीन
मा नितीन गडकरीजींची मुलाखत !! भारतात चर्चेत असणारी आर्थिक मंदी , खरी परीस्थिती, त्याची कारणे, त्यावरचे सरकारच्या वतीने होणारे उपाय व ह्या उपायाचे दुरागामी परीणाम !! भारत सरकार एकीकडे MSME & SME ना बळकट करण्यासाठी काम करत आहे तर दुसरी कडे ह्या SME & MSMSE ना आर्थिक मदत बॅंकेकडुन मिळावी ह्यासाठी सध्या डबघईला आलेल्या बॅंकांना सक्षम करण्याचे काम चालु आहे !! World Bank , ADB सारख्या कडुन त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात पैसे गुंतवणुक होणार आहे !! मंदी वर फक्त दुसर्यावर दोषारोप व काथ्याकुट न करता अचुक उपाय हे सरकार योजत आहे ह्याची ग्वाही गडकरींनी दिली !! आवर्जुन हा व्हिडीयो बघा !! https://youtu.be/OoM78JyScQE
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 08/31/2019 - 09:27 नवीन
strong>मेक ईन ईंडीया ईफेक्ट : HAL-made Dornier 228 aircraft can now be used in Europe Read more at: https://m.timesofindia.com/business/india-business/european-aviation-regulator-accepts-dgca-nod-for-civilian-use-of-hal-made-dornier-228/articleshow/70914636.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 08/31/2019 - 10:15 नवीन
https://youtu.be/9TcC2WVGSpE हे आहेत लिबरल्सच्या गळ्यातील ताईत. देशाच्या विरोधात कसे काम करता येईल याचे मुर्तीमंत ऊदाहरण. आणि यांची तळी उचलून नाचणारे ईथे सुध्दा आहेत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा