Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी : ऑगस्ट २०१९

ध
धर्मराजमुटके
गुरुवार, 08/01/2019 - 19:21
🗣 125 प्रतिसाद
राजकीय वार्ता : राष्ट्रवादीतून भाजपात इनकमिंग मोठ्या प्रमाणवर सुरु झाल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष काही जिल्ह्यांपुरताच मर्यादित राहिल की काय असे वाटू लागले आहे. या निवडणूकीचे निकाल लागल्यावर राष्ट्रवादी, मनसे या पक्षांचे भवितव्य काय असेल याची स्थिती स्पष्ट होईल. भाजपात आता आनंदाचे वातावरण असले तरी एव्हढ्या मोठ्या लोकसंख्येला खायला काय घालायचे यावरुन भविष्यात संकटे उभी राहू शकतील असे वाटते. शिवाय पोटच्या पोरांच्या तोंडचा घास काढून घेऊन दत्तक घेतलेल्या पोरांचे पोट भरावे लागणार आहे की देवाने चोच दिली आहे तर चाराही तोच देईल याचाही निकाल काय लागतो ते बघणे रोचक ठरेल. भाजप मधे आता जागा फुल झाली आहे, आता भरती नाही असे मुख्यमंत्री म्हणाले तरी माझी त्यांना विनंती आहे की थोडं थोडं सरकून घ्यायला सांगा नेत्यांना. अजून थोडी जागा होऊ शकते गाडीत. फक्त येणार्‍या काळात कार्यकर्ते व्यासपीठावर बसतील आणि नेते समोरच्या खुर्च्यांवर बसतील एवढे होणार नाही याची काळजी घ्या. शिवसेनेचे आदित्य ठाकरे सक्रीय राजकारणात उतरले आहेत, बहुतेक वरळी मधून निवडणूक लढवतील अशी चिन्हे आहेत. तसे झाले तर ठाकरे घराण्यात निवडणूक लढविणारा पहिली व्यक्ती म्हणून त्यांची इतिहासात नोंद होईल. किंगमेकर ते किंग असा प्रवास होणार काय हे तर आनेवाला वक्त ही बतायेगा ! भाजपाच्या वाढीचा शिवसेनेवर काय परिणाम होईल हे पाहणे देखील रोचक ठरेल. साहेबांच्या आवाजसरशी रस्त्यावर उतरणार्‍या कार्यकर्त्यांची पिढी आता अस्तंगत होत चालली आहे. आदित्य ठाकरेंच्या काळात बहुतेक अफजलखानाचा कोथळा, पाठीत खंजीर खुपसणे, लखोबा लोखंडे सारखे वाक्प्रचार अस्तंगत होतील अशी चिन्हे आहे. दलित मंडळींच्या वेगळ्या चुली एकत्र येऊन काही चमत्कार घडेल हे बहुधा येत्या ५० वर्षात तरी शक्य दिसत नाही. काँग्रेस मधे आता महाराष्ट्रात कोणता मोठा नेता राहिला आहे काय हे आठवून पाहण्यासाठी मेंदूला खुप चालना द्यावी लागेल. तीन तलाक कायद्यामुळे मुस्लीम मते कशी व्यक्त होतात हे देखील या निवडणूकीत पहायला मिळेल. भाजपा वाढली तर शिवसेना या निवडणूकीत तर बरोबर राहिल मात्र भविष्यात हेच दोन एकमेकांचे विरोधी पक्ष म्हणून समोर येतील काय ? अर्थात राजकारणात काहीही शक्य असते, एखादी मोठी घटना होत्याचे नव्हते करते आणि कोणाच्या खिजगणतीत नसलेला पक्ष पुन्हा वर चढू लागतो असेही अनुभवास येऊ शकते. पिढ्यान पिढ्या जनतेची सेवा करणार्‍या घराण्यांना रिकाम्या हाताने बसणे शक्य होत नाही त्यामुळे ते एका पक्षातून दुसर्‍या पक्षात जातच राहणार. नोकरी मधे जसे आजकाल लोक २-३ वर्षात नोकरी बदलतात तसेच समजायचे हे ! दिल्ली मधे महिलांना मेट्रोत फुकट प्रवास या घोषणेनंतर (ही योजना प्रत्यक्षात आली की अजून अभ्यास चालू आहे ?) आज केजरीवाल सरांनी २०० युनिट पर्यंत वीजबिल नाही अशी एक अफलातून योजना काढली आहे. आता महाराष्ट्र सोडून दिल्लीत राहयला गेले तर बरे पडेल की काय याचा विचार करतोय :) फक्त भविष्यात रोज ऑक्सीजनचा सिलींडर विकत घ्यावा लागेल श्वसनासाठी. तोही बहुतेक सरकार फुकट देऊ शकेल. धाग्याचे नाव चालू घडामोडी आहे आणि मजकूर सगळा राजकारणाविषयी आहे त्याबद्द्ल माफी मागतो. वाचक / प्रतिसादक हळूहळू इतर गोष्टींची भर घालतीलच.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 58791 views

🗣 चर्चा (125)
म
महासंग्राम Fri, 08/02/2019 - 06:53 नवीन
CCD चे मुख्य व्ही जी सिद्धार्थ यांची आत्महत्या हि एक दुःखदायक घटना घडली, उद्योग क्षेत्राला हा एक मोठा सेटबॅक मानला जातो.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 08/02/2019 - 09:09 नवीन
आजच्या लोकसत्तात अग्रलेख आला आहे. एकंदरीतच भारतात व्यवसायाला पोषक वातावरण नाही असा सुर जाणवतो.
  • Log in or register to post comments
म
माकडतोंड्या Fri, 08/02/2019 - 12:45 नवीन
काय संबंध? भरमसाठ कर्जे काढायची. नवश्रीमंतांसाठी चोचले पुरवायचे धंदे उभारायचे नवश्रीमंत लल्ल झाले की गाळात जायचे बिजनेस मॉडेलच भंकस ! आमच्या समोरचा चहावाला तीस वर्षांत फक्त चहा विकून (सामान्य जनतेला ) दोन फ्लॅट घेऊन आरामात जगतोय आणि म्हणे भारतात धंदे करता येत नाहीत.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 08/02/2019 - 10:07 नवीन
१ राज ठाकरे याम्च्यावर ई डी ची नजर आहे अशी बातमी येतेय. हे खरे तर उद्धव थाकर्‍यांच्यासोबत व्हायल अहवे. पण ते केवळ भाजप सोबत आहेत म्हणून वाचलेत मनसे फॅक्टर राष्ट्रवादीबरोबरच बुडणार असे वाटतेय. २ राष्ट्रवादी येत्या निवडणुकीत नव्उमेदवारां ना घेवून उतरणार असे दिसतेय. हे एक प्रकारे त्याम्च्याच्यासाठी चांगलेच आहे. उगाच ई व्ही एम वगैरे मुद्द्यावरुन विरोध करण्यापेक्षा महाराष्ट्रातील औद्योगीक विकास खास करुन कोकण आणि विदर्भ पट्ट्यात . राष्ट्रवादीला तारेल. पश्चीम महाराष्ट्रात कुठे काय दाबायचे म्हणजे तोंड उघडेल हे भाजप पेक्षा तेच चांगले ओळखून आहेत. ३ सर्वच ऑटो मोबाईल कम्पन्यांनी त्यांच्या गेल्या तीमाहीतील विक्री घटल्याची चिंता बोलून दाखवली आहे. ४ रीयल इस्टेट चे नक्की काय चालले आहे तेच समजत नाहिय्ये
  • Log in or register to post comments
म
माकडतोंड्या Fri, 08/02/2019 - 12:47 नवीन
४ रियल इस्टेट संपली हो कधीच
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Fri, 08/02/2019 - 10:27 नवीन
राज ठाकरेंच्या नेतृत्वात EVM विरोधात मुंबईत पत्रकार परिषद सुरु आहे. ह्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील सर्व विरोधीपक्ष उपस्थित आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Fri, 08/02/2019 - 10:32 नवीन
सध्या भारत चंद्रावर यान उतरवायच्या प्रयत्नात आहे व इकडे राजू ठाकरे मतपत्रिकेवर मतदान घ्या म्हणतोय. यावेळी मतदाना दरम्यान बॅलेटबॉक्स पळवायची योजना बनविलेली दिसते मनसेप्रमुखांनी.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Fri, 08/02/2019 - 15:11 नवीन
सोशल मिडियावर मनसे बाबत टिका करणाऱ्यानां शोधून ठोका म्हणणाऱ्या राज ला जनमत कधीच समजेल नाही हे मात्र नक्की . ई व्ही एम बाबत जनता मूर्ख आहे का ? विरोधी पक्षानीं ई व्ही एम बद्दल रान उठवले आहे आणि त्यांच्या इशाऱ्या वर नाचणाऱ्या राज ला पाहुन उत्तर भारतीय लग्नात पोटाची खळगी भरण्यासाठी नाचकाम करणाऱ्या महिलांची आठवण झाली . ई व्ही एम मुळे आता पर्यन्त हजारो झाडांचे प्राण वाचले , ई व्ही एम मध्ये जर फेरफार करता येत असती तर विरोधी पक्षानां पुरावे बाबूशाही ने लगेच पुरवले असते कारण बाबुशाही मध्ये सर्व जाती धर्माचे लोक असतात व भाजप वर तोंडसूख घेण्यासाठी या व्हिसलब्लोअर ने सर्वात पुढे पाऊल ठेवले असते . ठाकरे बंधु महाराष्ट्रातील जनतेला गुलाम समजत असावेत , गुलामां वर हुकूमत गाजवीण्या साठी , एकमेकांचे पाय ओढण्यासाठी उगिचच शिवप्रेम , ई व्ही एम ची नाटके चालली आहेत . या नाटका साठी राजने त्या भांडखोर ममताची मदत घेवून वैचारिक दिवाळखोरी चे प्रदर्शन घडविले यात शंका नाही .
  • Log in or register to post comments
व
विनोद वाघमारे गुरुवार, 08/08/2019 - 13:22 नवीन
म्हणजे सन्शयाला जागा नको. दुध का दुध, पानी का पानी होइल. वैचारिक दिवाळखोरी वगैरे भ्रम आहेत सगळे. 'ई व्ही एम मुळे आता पर्यन्त हजारो झाडांचे प्राण वाचले' बिरबलच्या 'झाडाखाली बिर्यानी बनविन्याच्या गोष्टिची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
ग
गब्रिएल गुरुवार, 08/08/2019 - 13:56 नवीन
ह्ये मातर लई ब्येस बगा ! लई येळापासून चालू आसलेली पद्धत, ज्यानं सुरू केली तोच हारला, की त्येची रड काडायला बदला आनी मंग दुसरा रडाया लागला की परत बदला. फकस्त दुदका दुद आनी पानी का हाच ख्योळ चालू ठ्येवा. द्येश काय आपोआप चालू र्‍हाईलच आनी जेवान द्यायला भगवान बसल्येला हाईच. लsssईच बेस आयडिया सर्जी ! =))
  • Log in or register to post comments
व
विनोद वाघमारे Fri, 08/23/2019 - 09:42 नवीन
'विरोधी पक्षानीं ई व्ही एम बद्दल रान उठवले आहे' का चुकीचि माहिति पसरवता? आधी माहिति घ्या गोळा करा व्यवस्थित, आणि मग बोला. EVM चा मुद्दा आधि कोनि काढला ते शोधा. बाकि दुसर्याच्या लग्नालाच जाता कि तिथे नाचनार्या बाया बघायला जाता. त्यान्चे भाषण ऐकत जा, म्हणजे मुद्देसुद भाषण कशाला म्हणतात ते कळेल.
  • Log in or register to post comments
म
मामाजी Fri, 08/23/2019 - 13:34 नवीन
२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत मोदिंनी गुजरातमधे केलेल्या विकासाची तोंड फाटे पर्यंत स्तुति करून (भजपशी प्रत्यक्ष आघाडी अथवा युती न करता पण) मोदिंच्या नावावर मत मागत सभा घेत होते तेंव्हाची ती भाषणे पण मुद्देसुद होती..
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 08/02/2019 - 17:21 नवीन
निवडून आलेल्याइतरांची मदत का घेतात? स्वत:च निवडून येऊन बाकं का वाजवत नाही? ------- इविएम नको तर {महागडे} मोबाईल, तंत्रज्ञान तरी का वापरता? त्यातही बरीच गोलमाल आहेच. ------- दगडी पाटीवर पुसूनपुसून शिकता येतेच. ट्याबचे वाटप कशाला? ------- तुमच्याच नेत्यांनी भारताला एकविसाव्या शतकात नेलं हे चुकलं का? ----------------- आणि समजा चिठ्ठ्या टाकुनही मतं नाही मिळाली तर कोणता मुद्दा मांडणार?
  • Log in or register to post comments
व
विनोद वाघमारे गुरुवार, 08/08/2019 - 13:28 नवीन
"आणि समजा चिठ्ठ्या टाकुनही मतं नाही मिळाली तर कोणता मुद्दा मांडणार?" तर मग खरोखर आत्मपरीक्षण करणार.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 08/08/2019 - 14:31 नवीन
मग अदृष्य शाईचा शोध लावायचा. सांगायचं की आमच्या मतापुढील शाई आपोआप गायब होते आहे आणि ती भाजप च्या उमेदवाराच्या जागी उमटते.
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 08/09/2019 - 13:08 नवीन
त्या तमाम मतदारांनी समोर येऊन सांगायचे कि आम्ही भाजपा ला मत दिले मग आमचे मनसैनिक त्यांचा कायमचा बंदोबस्त करतील. पुन्हा एकदा लाज टाकरे !!!
  • Log in or register to post comments
व
विनोद वाघमारे Mon, 08/12/2019 - 16:27 नवीन
चुकीला शिक्षा हि झालीच पाहिजे. पुन्हा एकदा ठोकरे !
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Sun, 08/04/2019 - 11:08 नवीन
सिमारेषेवर लष्कर वापर करत असलेल्या बोफोर्स तोफा ज्याचा पल्ला ३०km च्या पुढे आहे. दर्शवते की प्रसारमाध्यमात येणार्‍या बातम्यापेक्षा मोठ्या प्रमाणात युध्द सुरु आहे.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sun, 08/04/2019 - 11:22 नवीन
भारत सरकार जम्मू काश्मीर मध्ये नक्की काय करणार आहे ते कळेनासे झाले आहे . अफ़ग़ानिस्तान मधून us माघार घेत असताना पाकिस्तान ची तोंड फाटेस्तो कौतुक करत आहे व जम्मू कश्मीर प्रश्ना मध्ये लुड़बुड करण्याचा प्रयत्न करत आहे . Us च्या लुड़बुड मुळे पाकिस्तान जम्मू काश्मीर प्रश्न धगधगता ठेवण्यासाठी गेले चारपाच दिवस कुरापत्या काढत आहे . जम्मू , कश्मीर आणि लदाख असे तीन राज्य स्थापन करण्याची हवा ट्विटर वर खुप वाहत आहे .
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Sun, 08/04/2019 - 20:34 नवीन
त्याच्या डोमॅस्टिक प्राॅब्लेम कडुन पब्लिकचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आणी अमेरिकेला अफगणिस्तानमधे ब्लॅकमेल करण्यासाठी काश्मिर वापरुन घेत आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Mon, 08/05/2019 - 10:12 नवीन
ट्रम्प तात्यांना अफगाणिस्तानातून लवकरात लवकर बाहेर पडायचे आहे. त्यांचे भारताला म्हणणे आहे कि अफगाण मध्ये सैन्य पाठवा. भारत अमेरिकेच्या मदतीला आला तर अमेरिकेला लवकर बाहेर पडता येईल. भारत सैन्य पाठवायला तयार नाही, एक सॉफ्ट स्टेट म्हणून भारताची अफगाण मध्ये चांगली पॉवर आहे. पण भारताला तिथे युद्ध लढायचे नाही. अजून एक उपाय (हा उपाय भारतीय सैन्य मदतीचा पर्याय नाही) म्हणजे तालिबानची दाढी कुरवाळून , त्यांना जरावेळ शांत करून गुपचूप निसटायचे. त्यासाठी पाकिस्तानची मदत गरजेची आहे. म्हणून तात्याने इम्रानला/ आयएसआय दिलेली ऑफर 'मी काश्मीर प्रश्नात मध्यस्ती करतो, तुम्ही अफगाण मध्ये मला मदत करा'
  • Log in or register to post comments
झ
झेन Mon, 08/05/2019 - 07:55 नवीन
घटनेतील 370 कलम काश्मीर मध्ये रद्द करण्याची शिफारस
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Mon, 08/05/2019 - 11:06 नवीन
आता हा पहिला अंक संपला आहे. पुढे पाकडे कश्मीरियत , जमुरियत , आवाम की मांग असे करून कुरापत काढण्याचे ठरवेल तेव्हा फुटिरतावाद्याना पहिला दणका बसेल, नंतर सैन्य तैनात आहेच
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Mon, 08/05/2019 - 11:14 नवीन
कदाचित लाहोरमधे स्वस्त मिळेल!
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Tue, 08/06/2019 - 20:15 नवीन
भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री, सुषमा स्वराज यांचे निधन. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांनी ज्या पद्धतीने देशासाठी काम केले ते खरंच कौतुकास्पद होते. परराष्ट्र मंत्री या नात्याने ज्या आपुलकीने आणि जबाबदारीने त्यांनी भारतातील आणि भारताबाहेरील नागरिकांची काळजी घेतली, ते पाहून खरंच मन भारावून जायचे. आपल्या एका ट्विट ला देखील मिळणारा प्रतिसाद पाहून परदेशातील भारतीयांना आपण भारतीय असल्याचा गर्व व्हायचा. आंतरराष्ट्रीय राजकारणात गरज पडल्यास कणखर आणि सडेतोड भूमिका घेऊन भारताची ताकद जगाला दाखवून दिली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 08/07/2019 - 17:28 नवीन
पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे तसेच राजनैतिक संबंधांचा स्तरही घटवणार असल्याचे म्हटले आहे. बुधवारी झालेल्या पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काय आर्थिक परिणाम होतील भारतावर आणि पाकीस्तानवर ?
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर Fri, 08/09/2019 - 00:40 नवीन
पाकिस्तान : पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे भारत: इसमें तेरा घाटा, मेरा कुछ नाही जाता!
  • Log in or register to post comments
स
सर टोबी गुरुवार, 08/08/2019 - 08:09 नवीन
या संस्थळावर आणि एकूणच जनतेत असली तरीही व्यापारीदृष्ट्या पाकिस्तानचे आपल्या दृष्ठटीने पुष्कळच महत्व आहे. इथे कोणी बजाज ऑटोमध्ये काम करणारे असतील तर ते याची पुष्टी करतीलच. शेतमाल आणि चित्रपट उद्योग यांनाही याची झळ पोहोचणार आहे. सध्याच्या काळात जेंव्हा रोजगार आणि बाजारात उठाव कमी आहे त्या काळात हि झळ येत्या काही दिवसातच चांगली जानवू शकते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/08/2019 - 09:17 नवीन
चूक On a deeper analysis, it appears that Pakistan's decision to temporarily suspend trade ties will not have much impact on both the nations. Read more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/70574898.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 08/08/2019 - 14:34 नवीन
महिलांना मोफत मेट्रो प्रवास, घरटी २०० युनिट पर्यंत मोफत वीज, २ हजार सीसीटीव्ही नंतर राजमान्य राजश्री केजरीवाल सर आता दिल्लीकरांना मोफत इंटरनेट देणार आहेत. धरतीवर जन्नत कुठे असेल तर ती काश्मीर मधे आहे अश्या अर्थाचे एक वचन आहे पण मला वाटत दिल्ली हाच खरा स्वर्ग होणार. दिल्लीत स्थायिक व्हावे असा विचार परत मनात घर करुन राहिला आहे :)
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 08/09/2019 - 17:53 नवीन
हल्ली एम्स चे नाव ऐकले की पोटात गोळाच येतो !
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sat, 08/10/2019 - 10:08 नवीन
खांग्रेस आणि अन्य पक्षातुन कितीही लोक्स भाजपात आले तरी त्यांचा वापर फक्त आणि फक्त संख्याबळासाठीच होइल. वरच्या लेवल ला भाजपाइच रहातील. बाकी जे लोक्स भाजपात जात आहेत ते आपले प्रोजेक्ट, बेहिशेबी मालमत्ता वगैरे वाचवण्यासाठीच जात असतील.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sat, 08/10/2019 - 11:00 नवीन
कोल्हापुर व सांगली मध्ये आलेल्या पूरामूळे झालेली हानी भरून यायला दोन चार वर्ष लागतील , पण भाजप सेने च्या सरकार ने पुरस्थिति गांभीर्य ने हातळली नाही हे ही नक्की . बोलबच्चन मुख्यमंत्री दोन दिवस जन आदेश च्या यात्रेत बिझी होते तर सेना प्रमुख बाल राज्यभिषेक तयारित मग्न होते . त्या दोन दिवसात कोल्हापुर कर अक्षरशः दैवाच्या भरोशावर होते . नालायक विरोधकानी आरडाओरड चालू केल्या नंतर बोलबच्चन हवाई पाहणी करायला गेले . त्यात अजून भर महाजननीं पाहणी करताना हसून सेल्फी काढल्या मुळे पुरग्रसतांच्या जखमें वर मिठ चोळले गेले . एकंदरीत आपदकलीन परिस्थिति कशी हैंडल करु नये याचे उत्तम उदाहरण मुख्यमंत्री नीं
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sat, 08/10/2019 - 12:10 नवीन
भाजपा समर्थक असलो तरी ट्रम्प यांच्याशी सहमत. कोल्हापूर आणि सांगली दोन्ही ठिकाणी पूरग्रस्तांना मदत करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले. शिवसेनेने देखील कोल्हापूरकरांना वाऱ्यावर सोडून दिले होते, कोल्हापूर हार्दिक शिवसेनेचा गड समजला जातो तरीही शिवसेनेच्या नेतृत्वाने अक्षम्य दुर्लक्ष केले.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 08/10/2019 - 15:48 नवीन
भाजपा समर्थक असलो तरी ट्रम्प यांच्याशी सहमत. हे वाचले आणि, 'राष्ट्राध्यक्ष ट्रंप चक्क इथेही पचकले की काय?' असा विचार मनात चमकला. प्रतिसाद पूर्ण वाचल्यावर तो गैरसमज दूर झाला. :)
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 08/10/2019 - 16:30 नवीन
NDTV च्या प्रमोटर प्रणय राॅय व राधिका राॅय ह्यांना मुंबई विमानतळावर अटक !! देश सोडुन बाहेर जात होते !!! एन्डीटीव्हीने एका बँकेकडून घेतलेलं कर्ज मुदतीआधी फेडलं म्हणून त्यांच्या विरोधात चौकशी सुरू आहे. कर्ज मुदतीआधी फेडलं म्हणून नाही तर कर्ज फेडताना बॅंक अधिकार्यांच्या संगनमताने कमी व्याज दराने कर्जाची परतफेड केली गेली. ह्या प्रकारामुळे बॅंकेला ४५ कोटीच नुकसान झाल. त्याप्रकरणात प्रणय राॅय विरोधात चौकशी सुरू आहे "The Central Bureau of Investigation (CBI) has already filed a First Information Report (FIR) in this regard and raided their home for diverting around Rs. 45 crores from ICICI Bank loan fraud in 2008. This SEBI Order is a vindication for CBI which is yet to file charge sheet. CBI sleuths have already found that Roy diverted this money to buy a home in Cape Town in South Africa." 2008 ला केलेल्या ह्या गुन्ह्याची साधी दखल २०१४ पर्यंत काॅंग्रेसच्या सरकारात घेतली गेलेली नाही. आता NDTV चे प्रमोटर प्रणय राॅय व राधिका राॅय वर बर्याच केसे संबंधी चौकशी चालु आहे.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 08/10/2019 - 18:39 नवीन
केली तर कशाला त्यांचे भाऊबंद ( खाल्लेल्या पार्टीत मनसोक्तपणे फुकटची मद्य आदि चंगळ केलेले) कशाला सुद्धा अच्छे दिन म्हणणार नाहीत. तुम्ही मिपावरील विचिरवंतांना विचारा,ते तुमच्याशी " भारत सरकार, संबंधीत बॅंक यांच्या दृष्टीने ४५कोटी म्हणजे काय मोठी रक्कम नाही. मलल्यावर का नाही कारवाई केली,नीरव मोदीचे काय झाले? तसेच ही माध्यमांची मुस्कटदाबी आहे, काश्मीरमध्ये बंद असलेली दोन दुकाने दाखविली म्हणून ( शेजारच्या उपहारगृहात आमच्याच बातमीदाराने चहा नाष्टा केला) ते दाखवता येणार नाही. तस्मात् ही बातमी कुठेही येणार नाही. आणि त्यांच्या समर्थनार्थ पेपरवाले ते डावे बुद्धीमंत लगेचच येतील याची खात्री बाळगा. वाचकांची पत्रेवाला पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sat, 08/10/2019 - 19:36 नवीन
" धरणात पाणी नाही तर मुतु काय ? " म्हणणारा बारामतीकर , मुंबई हल्ल्या नंतर उध्वस्त ताज होटल मध्ये रामगोपाल वर्मा ला घेवून जाणारा कोंबडा हेअरकट , आणि पुरग्रसतांच्या मदती वर लेबल छापणारा आमदार , नावेत बसून सूहास्यवदन करत सेल्फी काढनारा पालकमंत्री , विरोधकाच्या साथी ला जावून बसलेला पेंटर , मुलाच्या राज्याभिषेकसाठी तड़फड करणारा सेनामालक हे सगळे एकाच पातळी वरचे निर्दयी नेते आहेत . आणि बोलबच्चन तर फक्त पुढील टर्म बूक करण्यासाठी केंद्रसरकारला न दुःखवीण्याचा प्रयत्न करत आहे . " देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र " हि घोषणा ऐकायला चांगली वाटते पण कोणीही कितीही प्रयत्न करु द्या मोदींच्या नखाची ही सर कोणाला येणार नाही .
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 08/10/2019 - 19:44 नवीन
सगळे नाटक करून सोनीया गांधीच पुन्हा एकदा अध्यक्ष जाहीर होणे जवळपास अपेक्षीत होते, कारण संसदीय पक्षाचे प्रमुखपद सवत;कडे ठेवल्या नतंर अद्याप गांधी घराण्या ची मक्तेदारी त्यांना संपवायची नाही ते स्पष्ट होतेच . झालेही तसेच, सगळ्यात विनोदी बाब जाहीर झाल्यानंत पहिल्या काही ट्विटमध्ये एक ट्विट आले त्यात 'खोदा पहाड निकली बुढीया' हे चपखल वाक्य होते. पण या घोषणेपुर्वी काही मिनीटे राहुल गांधी बाहेर आल्या नंतर काँग्रेस अध्यक्ष पदा बाबत राहुल गांधी काही बोलतील म्हणून गराडा घातलेल्या पत्रकारांसमोर राहुल गांधींनी मला तर काश्मिर प्रश्ना संबंधात बोलवण्यात आले होते हे सांगुन थांबले असते तर राहुल गांधी कसले त्यांनी काश्मिर मध्ये हिंसक घटनेच्या बातम्या असल्याची पाकीस्तान्यांना शोभेलशी संतापजनक भाषा वापरली. त्या नंतर एनडी टिव्हीचा रिपोर्टर सुद्धा त्या अफवा आहेत आणि काश्मिर मध्ये आलबेल असल्याचे सांगत होता. राहुल गांधींना काश्मिरची काळजी वाटते एवढे म्हणूनही सरकारला प्रश्न विचारता आला असताच पण देशाचे काही होवो देश विरोधी बोलणे थांबवणार नाही असा पणच लांगलचलक पक्षाने घेतलेला अद्याप सोडलेला नाही आणि बुढीया आणि तिचा राजदुलारा सुद्धा :(
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Sat, 08/10/2019 - 20:37 नवीन
त्यांना हवे असलेल्या अध्यक्षांचे नाव मागितले गेले, त्यामुळे घाबरुन एकाही लोकशाहीच्या खंद्या समर्थक नेत्याने ते द्यायचे धाडस केले नाही, शेवटी लोकशाहीचा विजय झाला आणी महाराणीचे नाव फायनल झाले.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sun, 08/11/2019 - 16:09 नवीन
आईची तब्येत बरी नसते म्हणून तरुण तडफदार (कोण रे तो त्याला अर्धवट म्हणाला ..जाऊ द्या लक्ष देऊ नका ) मुलाला अध्यक्ष केला. पोराने अपेक्षेप्रमाणे दिवे लावले ( देखो भैय्या.. देखो भैय्या.. देखो भैय्या.. तुम लोग मेरा साथ नही देते तो ) अचानक बॅकग्राउंडला किशोरचं गाणं सुरू होतं.. " मै तो चला जिधर चले रस्ता, मुझे क्या खबर है कहा मेरी मंजील " मग अगदी डिट्टो आपल्या आजीसारखं नाक असलेल्या बहिणीला साकडं घातलं. पण आपण अध्यक्ष झालो तर आपल्या नव-याच्या कर्तृत्वामुळे आपलं ते टोकदार नाक कधी कापलं जाईल याची शाश्वती नसल्याने बहीण पिछेमुड झाली मग काय शेवटी दोन्ही मुले निकम्मी निघाल्यावर " इस डेश को बॅचाने के लीये मुझे ही कुछ कॅरना पॅडेगा " असं म्हणत आईसाहेब पुन्हा सिंहासनावर विराजमान झाल्या .
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 08/11/2019 - 17:58 नवीन
सगळ्या गडबडीत राहूनच जातय सारखं, रोज लिहिन म्हणतो पण काही कारणास्तव राहून जातयं ! विचारायचं आहे की पुरगस्त भागात कोणी मिपाकर आहेत काय ? सुखरुप आहात काय ? इथे लांब बसून काळजी करण्याव्यतिरीक्त काही करु शकतो का आम्ही ? काही मदत होण्यासारखी असेल तर प्लीज इकडे लिहा कोणीतरी.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sun, 08/11/2019 - 22:42 नवीन
+१
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 08/14/2019 - 17:16 नवीन
Rajasthan: All six accused acquitted in Pehlu Khan lynching case देश-परदेशात प्रचंड राजकिय गदारोळ झालेल्या पेहलू खान खटल्याचा निकाल लागून कोर्टाने सर्व सहा आरोपींना आरोपातून मुक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी पहलू खानकडे गोमांस होते असा आरोप दाखल केला गेला होता. त्यामुळे, पहलू खान प्रकरणातील ज्यांनी प्रचंड गोंधळ केला होता त्या लिंचिस्तानी मंडळींची मोठी पंचाईत झाली होती. आणि आता हा निकाल ! मुख्य म्हणजे पहलू खानवरचे आरोप दाखल करणे, खटला चालवणे आणि खटल्याचा निकाल लागणे, या सर्व गोष्टी घडताना राजस्तानात कॉन्ग्रेस सरकार होते/आहे. त्यामुळे, आता लिंचिस्तान ब्रिगेडची काय प्रतिक्रिया असेल, हे पाहणे मनोरंजक होईल.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 08/17/2019 - 20:13 नवीन
‘Beaten’ by mob, Dalit youth from Alwar dies after 2 days याच राज्यातल्या (राजस्तानातल्या) पहलू खानच्या प्रकरणात, घसा बसेल इतकी जगभर आरडाओरडा करणारी, तथाकथित पुरोगामी आणि मानवाधिकाराचे पुरस्कर्ती मंडळी, या दलित तरुणाच्या मृत्युच्या बाबतील तोंडात गुळणी धरून बसली आहेत. त्यानंतर... ‘Lynched’ Dalit man’s father ends life in Alwar त्या दलित तरूणाच्या वडिलांनी, सरकार आणि इतर कोणीही आपल्या तक्रारीची दखल घेत नाही यामुळे निराश होऊन आत्महत्या केली अशी बातमी आहे. इतके झाले तरीही, तथाकथित पुरोगामी आणि मानवाधिकाराचे पुरस्कर्ती मंडळींची दातखीळ सुटलेली नाही. लिंचीस्तान ब्रिगेडही अचानक गप्प झाली आहे... त्यांना भारतात राहण्यात भिती न वाटेशी लागली आहे ?! :( "पिडित व्यक्तीचा धर्म" आणि "घटना घडताना सत्तेत असणारे सरकार" यांच्याकडे पाहून मगच आरडाओरडा करायचा की गप्प बसायचे ते ठरवणार्‍या, तथाकथित पुरोगामी आणि मानवाधिकाराच्या पुरस्कर्त्या मंडळींना कोणी "ढोंगी लिबरांड" म्हटले की, त्यांना आणि त्यांच्या अंधभक्तांना, राग येतो आणि ते रागाने इतरांना शिव्या देतात व इंटॉलरंट म्हणतात !!! धन्य आहे ! आज तरी अशक्य दिसत आहे, पण हे लोक जेव्हा सर्व प्रकारच्या अन्यायांना चूक समजायला लागतील, तेव्हाच त्यांना आपली (उरली असेल तरच) लाज वाचवता येणे शक्य होईल.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/15/2019 - 09:51 नवीन
https://www.opindia.com/2019/08/mani-shankar-aiyar-kashmir-meltdown/
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 08/15/2019 - 10:42 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 08/16/2019 - 04:35 नवीन
ते सगळं बंदुकीच्या धाकाने आहे हो, लडाखमध्ये कुणालाही आनंद झालेला नाही,काही मिपाकरांनी त्यांच्या दिव्यचक्षुंनी संपूर्ण जम्मू काश्मीर ची सफर केलीच आहे महाभारताच्या संजयासमान आणि जनतेचे भयानक हाल चालू आहेत.गेल्या पंधरा दिवसांपासून. आधी सगळं कसं अगदी सुशेगाद होते,दगडफेकीचे रोखीत पैसे मिळायचे,नेत्यांची मुले परदेशात शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्या सुविधेत काही कसर नको म्हणून जे काही आर्थिक सहाय्य देता येईल ते अतिरेकी संघटना परस्पर देत असत आपण फक्त त्या बदल्यात अतिरेक्यांना आश्रय देणे आणि भारतीय जवानांची खबर देणे हे काम करायचे. इतर वेळी सापडलाच एखादा जवान एकटा दुकटा तर त्याला मारुन त्याची शस्त्र द्यायची अतिरेक्यांना. भारतातील पर्यटक येतात झक मारत इथेच,त्यांचे पैसे घेऊन पोषींद्याचाच देश कसा उध्दवस्त होईल ते बघायचे. आपले समर्थक आहेतच जालावर आणि विचारवंताच्या रुपाने,कधी अल्लाने मौका दिलाच तर त्या विचारवंताची खिदमत करायची, नाही तर ते फुकटची प्रसिद्धी आणि परदेशी निमंत्रण यातच खुश असतात,इकडे यायला सवड थोडीच आहे. अत्यंत भयभीत होऊन एका काश्मीरी इसमाने लिहिलेला प्रतिसाद. आम्ही आमच्या दिव्यचक्षूंनी आपल्या साठी आणला आहे. टपाली दूरस्थ नाखु बिनसुपारीवाला
  • Log in or register to post comments
M
mayu4u Fri, 08/16/2019 - 07:07 नवीन
लै भारी नाखुचाचा!
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 08/16/2019 - 07:19 नवीन
भारीये हे! :-) अवांतरः बादवे तू आत्ता तिकडे की कुणाकडून हा फोटू आलाय?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा