Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी : ऑगस्ट २०१९

ध
धर्मराजमुटके
गुरुवार, 08/01/2019 - 19:21
🗣 125 प्रतिसाद
राजकीय वार्ता : राष्ट्रवादीतून भाजपात इनकमिंग मोठ्या प्रमाणवर सुरु झाल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष काही जिल्ह्यांपुरताच मर्यादित राहिल की काय असे वाटू लागले आहे. या निवडणूकीचे निकाल लागल्यावर राष्ट्रवादी, मनसे या पक्षांचे भवितव्य काय असेल याची स्थिती स्पष्ट होईल. भाजपात आता आनंदाचे वातावरण असले तरी एव्हढ्या मोठ्या लोकसंख्येला खायला काय घालायचे यावरुन भविष्यात संकटे उभी राहू शकतील असे वाटते. शिवाय पोटच्या पोरांच्या तोंडचा घास काढून घेऊन दत्तक घेतलेल्या पोरांचे पोट भरावे लागणार आहे की देवाने चोच दिली आहे तर चाराही तोच देईल याचाही निकाल काय लागतो ते बघणे रोचक ठरेल. भाजप मधे आता जागा फुल झाली आहे, आता भरती नाही असे मुख्यमंत्री म्हणाले तरी माझी त्यांना विनंती आहे की थोडं थोडं सरकून घ्यायला सांगा नेत्यांना. अजून थोडी जागा होऊ शकते गाडीत. फक्त येणार्‍या काळात कार्यकर्ते व्यासपीठावर बसतील आणि नेते समोरच्या खुर्च्यांवर बसतील एवढे होणार नाही याची काळजी घ्या. शिवसेनेचे आदित्य ठाकरे सक्रीय राजकारणात उतरले आहेत, बहुतेक वरळी मधून निवडणूक लढवतील अशी चिन्हे आहेत. तसे झाले तर ठाकरे घराण्यात निवडणूक लढविणारा पहिली व्यक्ती म्हणून त्यांची इतिहासात नोंद होईल. किंगमेकर ते किंग असा प्रवास होणार काय हे तर आनेवाला वक्त ही बतायेगा ! भाजपाच्या वाढीचा शिवसेनेवर काय परिणाम होईल हे पाहणे देखील रोचक ठरेल. साहेबांच्या आवाजसरशी रस्त्यावर उतरणार्‍या कार्यकर्त्यांची पिढी आता अस्तंगत होत चालली आहे. आदित्य ठाकरेंच्या काळात बहुतेक अफजलखानाचा कोथळा, पाठीत खंजीर खुपसणे, लखोबा लोखंडे सारखे वाक्प्रचार अस्तंगत होतील अशी चिन्हे आहे. दलित मंडळींच्या वेगळ्या चुली एकत्र येऊन काही चमत्कार घडेल हे बहुधा येत्या ५० वर्षात तरी शक्य दिसत नाही. काँग्रेस मधे आता महाराष्ट्रात कोणता मोठा नेता राहिला आहे काय हे आठवून पाहण्यासाठी मेंदूला खुप चालना द्यावी लागेल. तीन तलाक कायद्यामुळे मुस्लीम मते कशी व्यक्त होतात हे देखील या निवडणूकीत पहायला मिळेल. भाजपा वाढली तर शिवसेना या निवडणूकीत तर बरोबर राहिल मात्र भविष्यात हेच दोन एकमेकांचे विरोधी पक्ष म्हणून समोर येतील काय ? अर्थात राजकारणात काहीही शक्य असते, एखादी मोठी घटना होत्याचे नव्हते करते आणि कोणाच्या खिजगणतीत नसलेला पक्ष पुन्हा वर चढू लागतो असेही अनुभवास येऊ शकते. पिढ्यान पिढ्या जनतेची सेवा करणार्‍या घराण्यांना रिकाम्या हाताने बसणे शक्य होत नाही त्यामुळे ते एका पक्षातून दुसर्‍या पक्षात जातच राहणार. नोकरी मधे जसे आजकाल लोक २-३ वर्षात नोकरी बदलतात तसेच समजायचे हे ! दिल्ली मधे महिलांना मेट्रोत फुकट प्रवास या घोषणेनंतर (ही योजना प्रत्यक्षात आली की अजून अभ्यास चालू आहे ?) आज केजरीवाल सरांनी २०० युनिट पर्यंत वीजबिल नाही अशी एक अफलातून योजना काढली आहे. आता महाराष्ट्र सोडून दिल्लीत राहयला गेले तर बरे पडेल की काय याचा विचार करतोय :) फक्त भविष्यात रोज ऑक्सीजनचा सिलींडर विकत घ्यावा लागेल श्वसनासाठी. तोही बहुतेक सरकार फुकट देऊ शकेल. धाग्याचे नाव चालू घडामोडी आहे आणि मजकूर सगळा राजकारणाविषयी आहे त्याबद्द्ल माफी मागतो. वाचक / प्रतिसादक हळूहळू इतर गोष्टींची भर घालतीलच.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 58791 views

🗣 चर्चा (125)
य
यशोधरा Fri, 08/16/2019 - 08:06 नवीन
लदाखी स्नेह्याकडून.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 08/16/2019 - 08:09 नवीन
काश्मीरातही तिरंग्यापुढे संचलन, ध्वजवंदन झालं बरं. जमलं तर क्लिप टाकेन.
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 08/16/2019 - 09:50 नवीन
ट्रम्पतात्या जोमात, भक्तसमर्थक कोमात! As the protesters were being led out, a Trump supporter wearing a "Trump 2020" shirt near them began enthusiastically shaking his fist in a sign of support for the president. But Trump mistook him for one of the protesters and said to the crowd: "That guy's got a serious weight problem. Go home. Start exercising. Get him out of here, please."
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sun, 08/18/2019 - 15:42 नवीन
चीन ने 370 वरुन पाकिस्तान ची साथ देताना यूनो मध्ये भारताच्या मार्गात खोड़ा घालण्याचा प्रयत्न केला , राग याचा आला की भारताच्या बाजूने चीन ला कानफाडले गेले नाही . त्यांचे परराष्ट्रसचीव भारताच्या अंतर्गत प्रश्न कश्मीर प्रश्नावर मुक्ताफळे उधळत असतील तर आपले सचिव हॉन्गकॉन्ग बद्दल का गप्प बसले आहेत ? हल्ली पाकिस्तान पेक्षा चीन च्या भूमिके वर डोक गरम होत आहे आणि आपले परराष्ट्र विभाग मुग गिळून बसले आहे .
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 08/18/2019 - 16:05 नवीन
सध्या भारताने ताक फुंकुन प्यायची भूमिका घेतलेली दिसते. हॉंगकॉंग प्रकरण चांगलेच तापलेले आहे. चीनला अनेक देशानी समज दिली आहे. या पार्श्वभूमिवर चीनकडून काही आगळीक झाली तर त्याचा सरळ फायदा भारताला व्यापारात होईल. शिवाय चीनची प्रतिमा जगात डागाळली गेल्यामुळे जॉब मार्केटवरदेखिल परिणाम होऊन भारताला अजुन एक फायदा मिळेल. ह्यावेळी तरी भारताने दखल न घेतलेली बरी! चीनची एक चूक पाकिस्तानला पण अकारण महागात पडेल, कारण चीनवर आर्थिक निर्बंध म्हणजे पाकिस्तानची गळचेपी! ट्रम्पतात्या (तुम्ही नाही हो) अकांडतांडव करून पाकिस्तानला खडे बोल ऐकवेल. मग जी पाकिस्तानची फरफट होईल ती बघायला मजा येईल. हे आमचे मनातले मांडे हो!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 08/19/2019 - 08:03 नवीन
१. आंतरराष्ट्रिय राजकारणात, पडद्याआडच्या यशस्वी खेळ्या करून, पाकिस्तानच्या बाबतीत भारताने चीनला अनेकदा माघार घ्यायला लावली आहे. ताजी उदाहरणे द्यायची झालीच तर, हाफिज सईदला अतिरेकी घोषित करण्यात चीनने दशक+ काळ केलेला विरोध मागे घेणे आणि नुकत्याच झालेली संयुक्त राष्टसंघाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीचा फियास्को (भारताच्या बाजूने १४-१ असा विजय), या दोन ठळक घटना सांगता येतील. २. भारतिय परराष्ट्रमंत्र्यांच्या नुकत्याच झालेल्या चीन भेटीत, चीनने स्वतःहून भारत-चीन सीमासमस्या सोडविण्यासाठी भक्कम पावले उचलायची इच्छा सार्वजनिक्रित्या प्रकट केली आहे... ही कृती चीनच्या गेल्या काही दशकांच्या कृतीपेक्षा फार सकारात्मक आहे. तेव्हा आता चीनला हाँग काँग किंवा तिबेटवरून छळण्याने, आता केवळ जरासा चिमटा काढून त्याचा दीर्घकालीन विरोध/दुष्मनी पत्करण्याशिवाय इतर काहीही साधणार नाही. तसेही, हाँग काँग व तिबेट या दोन्ही संबंधात काही भरीव करून चीनला अडचणीत आणण्याइतकी ताकद सद्या भारताकडे नाही. त्याविरुद्ध, "योग्य संधीची वाट पाहत परिस्थितीचे शांतपणे निरिक्षण करत राहणे (Watchful expectancy and masterly inactivity)" हे तत्व यासंबंधात सर्वात जास्त फायदेशीर आहे... हाँग काँग आणि तिबेट, दोन्हीही समस्या इतक्यात कोठेही पळून जाणार्‍यातल्या नाहीत... त्या चीनच्या कुशीत दीर्घकालीन खोल रुतलेले काटे आहेत. :) ३. गेल्या अनेक दशकांत, भारताने सतत, "नितीमत्तेच्या मोठ्या गप्पा मारण्याचे आणि वेळ आली की पायात शेपटी घालण्याचे", धोरण स्विकारले होते, ते चूक होते आणि त्याने भारताच्या आंतरराष्ट्रिय स्थानाला खूप मोठा धोका केला, यात वाद नाही. मात्र, उगाच छाती पिटत विरोधकाला/शत्रूला आव्हान देत राहण्याने किंवा त्याला चिमटे काढत राहण्याने सुद्धा काही साधले जात नाही. तसे असते तर अमेरिकेचा ट्रंप आजचा सर्वात यशस्वी मुत्सद्दी ठरला असता. :) त्याविरुद्ध, आपल्या विरोधकाला एकटे पाडून, इतरांकरवी दबाव आणून, आपल्याला हवा तो फायदा साधणे, ही चाणक्य निती केव्हाही जास्त चांगली मुत्सद्देगिरी आहे... विशेषतः तो विरोधी देश चीन आहे, जो केवळ संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीचा कायम सभासदच नाही तर आर्थिक-सामरिकरित्या प्रबळ असलेला शेजारी देश आहे. गेल्या काही वर्षांतील पाकिस्तानसंबधातल्या घटना पाहिल्या तर हेच दिसते आहे. भारताने चीन-पाकिस्तान जोडगोळीला आंतरराष्टिय राजकारणात केवळ वेगळेच पाडले आहे असे नाही तर, अनेकदा चीनला पाकिस्तानचा पाठींबा काढून घेण्यास भाग पाडले आहे. या सगळ्यात, भारताच्या प्रगल्भ मुत्सद्देगिरीचेच दर्शन होत आहे. "रक्ताचा एकही थेंब न गळता, एकही गोळी न झाडता आणि एकही अपशब्द न उच्चारता जो विजय मिळवला जातो, तोच सर्वोच्च विजय असतो", कारण या गोष्टींनी विजय मिळवला तरीही, केवळ शत्रूचेच नव्हे तर आपलेसुद्धा नुकसान होतच असते.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Mon, 08/19/2019 - 08:54 नवीन
अगदी मुद्देसुद प्रतिसाद हेच लिहायचे होते , पण आमची प्रतिभा मर्यादित आहे हो!
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 08/19/2019 - 12:35 नवीन
आमची डोकी त्या ममता सारखी तापट व्हायला लागल्यात , हाता सरशी त्या चीन ला दोन कानामागे टाकल्या जाव्यात ही ईच्छा त्यामुळे झाली . बाकी म्हात्रे सर !! एकदम मुद्देसूद प्रतीसाद .
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 08/20/2019 - 15:37 नवीन
मॅगी नूडल्स सारखे दोन मिनिटात सुटले पाहिजेत. त्यामुळे एक्का काकांनी कितीही सांगितलं तरी राणीचे गुलाम राजाचेच ऐकणार.
  • Log in or register to post comments
M
mayu4u Wed, 08/21/2019 - 06:14 नवीन
राजाचे नाही, जोकर चे!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 08/21/2019 - 07:14 नवीन
हाता सरशी त्या चीन ला दोन कानामागे टाकल्या जाव्यात ही ईच्छा त्यामुळे झाली हे व्हायला हवे, अशीच इच्छा आहे... पण ते करताना वस्तूस्थितीचा विसर पडला तर आपल्यालाच खूप महागात पडेल, नाही का ? वरचा उद्येश तर सफल व्हायलाच हवा पण बाजू तडक आपल्यावर उलटायला नको, असे हवे असल्यास (आपण नेहमी ज्यांचे नाव आदराने व भक्तीभावाने घेत असतो त्या शिवराय आणि चाण्यक्य यांना आठवून), अनेक गनिमी काव्याच्या रणनिती वापरता येतात, उदाहरणार्थ... १. पाहुण्याच्या चपलेने विंचू मारावा. २. तडक चपलेने मारण्याऐवजी शालजोडीतले (चपलेचे फटके) द्यावे. इत्यादी, इत्यादी. =)) ;)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 08/18/2019 - 18:44 नवीन
आंतरराष्ट्रिय राजकारणात आपण गप्प बसून, आपले काम दुसर्‍यांकडून करून घेणे, केव्हाही जास्त परिणामकारक ठरते (Silence speak louder than words). त्यातून, "आम्हाला स्वतः बोलायची गरज नाही, इतर अनेक जण ते काम आमच्यासाठी करायला तयार आहेत इतकी आमची पत वाढली आहे", असा संदेश जातो. शिवाय, आता भारत-चीन सीमारेषा आखण्याबद्दल चीनने कधी नव्हे तो उघड पुढाकार दाखवला आहे... त्या बोलण्यांत कडवटपणा नसलेला जास्त फायद्याचे ठरेल. तसे पाहिले तर चीन एक पोचलेलं (आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत कायम सभासद असलेलं) बेनं आहे. त्या मारक्या बैलाला आव्हान देण्याने तो मुद्दाम नाठाळपणे अंगावर येऊन टक्कर देण्याचीच खात्री आहे. तेव्हा, त्याला चुचकारून शक्य तेवढे आपले काम काढून घेणे, केव्हाही चांगले. तसेही, गेल्या काही महिन्यांत चीनला अनेकदा पाकिस्तानविरोधी पवित्रा घ्यावा लागला आहे... (मनाविरुद्ध असूनही चीनला असे का वागावे लागले हे, आपण व चीन दोघांनाही, पक्के माहीत आहे, तरीही) त्यासंबंधी चीनला न खिजवता, आपला कार्यभाग साधून घेणे, केव्हाही जास्त मुत्सद्देगिरीचे असेल. कारण, आपला झालेला मानभंग चीन कधीच विसरत नाही, असा इतिहास आहे... आणि तो हट्टून बसलाच तर, त्याच्याशी तडक टक्कर देण्याइतका सबळ, भारत अजून तरी नाही. असे असले तरी, हल्ली भारत चीनला एका ठराविक सीमेपलिकडे जाऊ देत नाही. याचे एक ताजे व उत्तम उदाहरण असे... १. आताच झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या काश्मीरसंबंधी झालेली बैठक फुसकी ठरेल याची भारताने पुरेपूर आणि यशस्वी खबरदारी घेतली. प्रथम, "भारताविरुद्ध उघड आणि मतदानासह बैठक घ्यावी असा पाकिस्तानचा अर्ज" फेटाळून लावण्यात आला. नंतर, केवळ चीन या कायम सदस्याने आग्रह धरल्याने बैठक घेतली गेली. ती बैठक... (अ) बंद दाराआड केलेली, (आ) (लिखित, ध्वनिमुद्रित, चलतचित्रिकरण, इ) कोणत्याही प्रकारची नोंद (मिनिट्स ऑफ मिटिंग) न ठेवता झालेली, (इ) तक्रार करणार्‍या पाकिस्तानच्या अनुपस्थितीत (पक्षी पाकिस्तानला बाजू मांडायची संधी नाकारूनन) केलेली, आणि (इ) बैठकीनंतर कोणतेही लिखित/तोंडी विधान न करणारी, अशी पूर्णपणे फुसकी (पक्षी : उगी उगी घेतली ना बैठक, आता चूप हो पाहू अशी) बैठक व्हावी अशी तरतूद (भारत सद्याच्या सुरक्षा परिषदेच्या १५ राष्ट्रांमध्ये नसतानाही) भारत करवून घेऊ शकला... हा एक मुत्सद्दी विजयच (कू) समजला जात आहे. २. यानंतर, आपले अपयश लपविण्यासाठी, पाकिस्तान व चीनने पत्रकार परिषद घेऊन, स्वतःला सोयिस्कर अश्या टिप्पण्या केल्याच... मात्र, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळले. त्यानंतर, कधी नव्हे ते, भारताच्या संयुक्त राष्ट्रसंघामधील कायम राजदूत असलेल्या स्येद अकबरुद्दीन यांनी पत्रकात परिषद घेऊन, "चीन आपले म्हणणे सर्व सदस्यांच्या नावांवर खपवत आहे" असे स्पष्ट करून, चीन-पाकिस्तान या जोडीला इतर कोणाचाही पाठींबा नाही हे उघड केले. या मुत्सद्दी वाक्यरचनेचा साध्या सोप्या भाषेतला अर्थ, "चीन-पाकिस्तानची जोडगोळी खोटे बोलत आहे", असा होतो. असे ताबडतोप पत्रकार परिषद घेऊन चिनचा प्रतिवाद करणे किंवा त्याचे पितळ उघड करणे, भारताने याअगोदर कधीच केले नव्हते. यातून, चीनला जो काही संदेश देणे अपेक्षित होते, तो पोचला. :)
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sun, 08/18/2019 - 19:04 नवीन
बरोबर.. सध्याचेअंतर राष्ट्रीय राजकारण हे खरंच किचकट असले तरी भारत प्रत्येक वेळी अगदी खंबीर आणि देशहिताची भूमिका घेत आहे. पूर्वीच्या सरकार सारखी घाबरलेली, आत्मविश्वास नसलेली आणि फक्त अल्पसंख्यांक ( खरंच? ) लोकांचे हित जपणारी नाहीये. डोकलाम विवाद, आणि काश्मीर चा मुद्दा हे दोन्ही प्रश्न सरकारने अत्यंत योग्य रीतीने हाताळले.
  • Log in or register to post comments
M
mayu4u Mon, 08/19/2019 - 06:18 नवीन
कुणीतरी वेगळ्या प्रकारे हाताळणार होते; पण कसे ते त्यान्ना माहित नव्हते ते आठवले! :ड
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 08/19/2019 - 09:37 नवीन
पाकीस्तानी मदरसा शिक्षण सुधारणा साधण्यातील समस्या संबंधाने पाकीस्तानी इंग्रजी वृत्तपत्र डॉनचा एक ऑनलाईन लेख वाचनात आला. जिज्ञासुंच्या माहितीस्तव
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 08/19/2019 - 16:45 नवीन
आज महाराष्ट्र राजकारणात बरीच खळबळ .
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 08/19/2019 - 16:48 नवीन
Former MPs get 7-day deadline to vacate government houses भारतिय नेते लोकांच्या दिव्य पारंपारिक प्रथेप्रमाणे जनतेची उर्फ सरकारी मालमत्ता आपल्या तिर्थरुपांची मालमत्ता असल्यासारखी ओरबाडायची असते, कबज्यात घ्यायची असते, तिच्याभोवती नागासारखे वेटोळे घालून बसायचे असते आणि जमेल तेव्हा गिळंकृत करायची असते. याच न्यायाने, आपला संसदेतील काळ संपला तरीही, दिल्लीतील सर्वात उच्चभ्रू समजल्या जाणार्‍या Lutyens' नावाच्या वसाहतितील बंगले न सोडण्याची खासदारांची परंपरा आहे. या स्थितीबद्दल, सरकार अनेकदा नक्राश्रू ढाळते, इतकेच काय, सर्वोच्च न्यायालयानेही त्याबद्दल कडक ताशेरे मारलेले आहेत... पण, कथा मागील पानावरून पुढे सुरू ! काही, सांसद तर इतके पोचलेले असतात की, आपल्या मृत पूर्वज सांसदाचे घरसुद्धा ते अनेक वर्षे रिकामे करून देत नाहीत... आणि सरकारने तकादा लावला की त्यांना आपल्या पूर्वजाने "भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी केलेले अथक परिश्रम आठवतात" आणि ते अजरामर करण्यासाठी ते त्या बंगल्यात त्याच्या नावे संग्रहालय स्थापन करण्याची योजना पुढे करतात... म्हणजे, त्या सरकारी बंगल्यावर कायम हक्काचे शिक्कामोर्तब झाले ! (कोण म्हणतोय रे की भारतिय राजकारणी हुशार नाहीत असे?). उदाहरणार्थ : भूतपूर्व मंत्री श्री जगजीवनराम यांचा १९८६ साली मृत्यु झाला तरी त्यांच्या सांसद असलेल्या मीरा कुमार या कन्येने त्यांचा बंगला सरकारला परत केला नव्हता. सन २०१३ मध्ये या प्रकरणाचा गाजावाजा झाला तेव्हा सरकारने तो बंगला, "जगजीवन राम फाऊंडेशन"ला श्री राम यांच्या नावे संग्रहालय करण्यासाठी, तब्बल २५ वर्षांसाठी बहाल करून, सगळा व्यवहार सुरळीत करून दिला ! संसदेत कार्यरत असलेल्या विधायकांच्या निवासासाठी बांधलेले बंगले जर जुन्या विधायकांनी असे कायमस्वरूपी बळकावले तर मग एक-दोन दशकांत दिल्लीतील मुख्य वसाहती केवळ जुन्या-नव्या विधायकांची घरे बांधण्यासाठी राखून ठेवायला लागतील. :( सद्याही, सुमारे २०० भूतपूर्व सांसदांनी आपला कार्यकाल संपल्यानंतर बंगले परत केलेले नाहीत. पण, अहो आश्चर्यम् ! या वेळेस, Lok Sabha Housing Committee ने त्यांच्यावर कारवाई करण्याचे ठरवले आहे... त्यांनी बंगले रिकामे केले नाही तर चक्क पाणी आणि वीज तोडण्याचे आदेश दिले आहेत. बघुया, या वेळेस तरी, सरकार सर्व अवैध कब्जे काढून टाकण्यात यशस्वी होईल का ते !
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 08/20/2019 - 08:18 नवीन
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना २२ ऑगस्टला जर इडीने चौकशीसाठी बोलावले तर मनसैनिक महाराष्ट्राचा गुजरात करतील. (२००२) महाराष्ट्रातील नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी फार गरज नसेल तर येत्या २२ ऑगस्टला घराबाहेर पडू नये. -- महाराष्ट्र नवनिर्माण सेना. अभिजित पानसे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 08/20/2019 - 08:28 नवीन
कोणत्याही राजकीय पक्षाला आपले राज्य असे वेठीस धरू देता कामा नये. श्री राज ठाकरे याना चौकशीस बोलावलेले आहे यात काहीही गैर नाही. त्यांना विना चौकशी अटकेत ठेवलेले नाही. उगाच शक्तिप्रदर्शनासाठी राज्यास असे कोणी वेठीस धरत असतील तर त्यांना सज्जड दम देणे आवश्यक आहे. यावर हिंसात्मक आंदोलन केले अंतर त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून होणारी सर्व नुकसान भरपाई त्या पक्षा कडून दंडासकट वसूल केली पाहिजॆ. श्री राज ठाकरे हे काही श्री मोदी श्री चिदंबरम किंवा श्री राहुल गांधी यांच्या पेक्षा कोणत्याही दृष्टीने वरिष्ठ नेते नाहीत. ( हे सर्व नेते लोकनियुक्त खासदार होते/ आहेत कोणी स्वयंघोषीत नेते नाहीत) हे सर्व जर चौकशीला सामोरे जातात तर श्री राज ठाकरे यांना चौकशीला सामोरे जाण्यात कोणताही अपवाद करता कामा नये. डॉ मनमोहन सिंग या माजी पंतप्रधानाना पण चौकशीस सामोरे जावे लागले तर बाकी कुणाचाही मुलाहिजा ठेवायचे कोणतेही कारण नाही. https://www.businesstoday.in/current/economy-politics/manmohan-singh-summoned-as-accused-in-coal-field-case/story/216780.html
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 08/20/2019 - 10:22 नवीन
सर्वच राजकीय घराणे पुजा आणि व्यक्ति पुजातून सर्वांनीच बाहेर पडावयास हवे
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 08/20/2019 - 14:42 नवीन


INX Media case: P Chidambaram moves SC for relief, asked to mention appeal tomorrow

भूतपूर्व अर्थमंत्री चिदंबरमना दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला.



या अभूतपूर्व निकालानंतर कॉन्ग्रेसच्या गोटात शांतता पसरली आहे. या निकालाला रद्द करून अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जान्यामान्या कॉन्ग्रेसी नेते-कम-वकिलांच्या (सिब्बल, संघवी, सलमान खुर्शिद, इ) फौजेची लगबग सुरु झाली आहे आणि अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी उद्या सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Tue, 08/20/2019 - 15:30 नवीन
आपल्या भारतात सोइ प्रमाणे कागदी घोडे नाचविण्यात भाजप ही कमी नाही असे मला वाटत आहे , त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे INX MEDIA CASE . 2014 ला भाजप सत्तेत आली असताना सीबीआय ने जुलै 2018 ला चार्जशीट दाखल केले आहे , इतका उशीर का व्हावा ? हे न उलगडणारे कोडे आहे . कदाचीत त्यांच्या अडचणी समजण्याची कुवत माझ्यासारख्या सामान्यात नाही : ) माझ्यासारखा अतीसामान्य माणसाने जर कुठला फ्रॉड केला तर तिसऱ्या दिवशी मला रिमांड मध्ये घेतील आणि दोन तीन महिन्यांत माझ्यावर चार्जशीट ठोकली जाईल : )
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 08/21/2019 - 09:01 नवीन
मोठ्या आर्थिक गुन्ह्याची माहिती काढून त्याच्या स्रोतापर्यंत पोहोचणे हे फार कठीण असते आणि ती गोष्ट व्यवस्थित पुराव्याशिवाय केली तर आरोपी सुटण्याची शक्यता बरीच जास्त असते. यास्तव सत्तेत आल्या आल्या शहाणा राजकारणी आर्थिक गुन्ह्याच्या प्रथम वाटा बंद करतो त्यानंतर "आपली माणसे( सनदी नोकरशहा) महत्त्वाच्या जागी नेमतो आणि मगच खणायला सुरुवात करतो. सत्तेतून जाणार असे समजल्यावर राजकीय पक्ष शेवटच्या दिवसात "आपली माणसे" मोक्याच्या जागी बदलीवर आणून बसवतात म्हणजे त्याला हलवायचे तरी ६ महिने थांबावे लागते. यामुळेच मल्ल्या निरव मोदी सारख्या माणसांना आता सरकार आपल्या मागे लागणार आहे हेही समजून येते आणि ते नाहीसे होतात. नव्या सरकारला सुद्धा कोणती माणसे आपली आणि कोणती परक्याची आहेत आणि यातील किती लोक आपल्याकडे वळू शकतील याचा अंदाज घेण्यास बराच काळ लागतो. त्यानंतर महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेऊन पाणी कुठे मुरतंय हे पाहावे लागते. यानंतर यातील कोणाविरुद्ध पुरावा पुरेसा जमवता येईल याचा अदमास घ्यावा लागतो.कारण उगाच अरण्यरुदन करून काही वर्षे फुकट घालवून निष्पन्न काही होत नाही. शिवाय यातील किती नोकरशहा आपली निष्ठा विकतील याची काही खात्री देता येत नाही. जसे काळविटाने आत्महत्या केली असतानाही एका नटाला उगाच गुंतवले गेले होते. हा सगळा सारीपाटाचा डाव सामान्य माणसांना सहज समजत नाही. त्यामुळे त्याना असे वाटत असते कि सरकार काहीच काम करीत नाहीये.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 08/21/2019 - 14:52 नवीन
@ ट्रंप : आपल्या भारतात सोइ प्रमाणे कागदी घोडे नाचविण्यात भाजप ही कमी नाही असे मला वाटत आहे , त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे INX MEDIA CASE . 2014 ला भाजप सत्तेत आली असताना सीबीआय ने जुलै 2018 ला चार्जशीट दाखल केले आहे , इतका उशीर का व्हावा ? हे न उलगडणारे कोडे आहे . कदाचीत त्यांच्या अडचणी समजण्याची कुवत माझ्यासारख्या सामान्यात नाही : ) माझ्यासारखा अतीसामान्य माणसाने जर कुठला फ्रॉड केला तर तिसऱ्या दिवशी मला रिमांड मध्ये घेतील आणि दोन तीन महिन्यांत माझ्यावर चार्जशीट ठोकली जाईल : ) जेव्हा माणसाला नितिमत्तेचा झटका येतो, तेव्हा त्याला लोकशाही सुचते आणि जेव्हा हवे असलेले घडून येत नाही असे दिसते, तेव्हा हुकुमशाही कारवाई हवी असते. ;) :) हा विरोधाभास बाजूला ठेऊन जरासा विचार करू शकलो तर, हे जग गुंतागुंतीचे असले तरी, समजायला तितकेसे कठीण नाही ! ;) मानवी मानसिकता आणि व्यवहार यांचा जरा खोलवर विचार केला तर जगभर साधारणपणे खालील परिस्थिती दिसेल. राजेशाहीत आणि/किंवा इतर प्रकारच्या हुकुमशाहीत किंवा राज्यक्रांतीने सर्वोच्च नेता बदलला गेला की तो नवा सर्वेसर्वा होतो. तो ताबडतोप हाताखालच्या सर्व अधिकार्‍यांत आणि व्यवस्थेत हवे तसे बदल घडवून आणू शकतो. त्याला विरोध करायचा पर्याय कोणाला नसतो... जर आपले मुंडके धडावर रहावे असे वाटत असले, तर ! :) त्याविरुद्ध, लोकशाहीत सरकार बदलले (पक्षी : दुसर्‍या नेत्याला सर्वोच्च पद मिळाले) तरी तो सर्वेसर्वा बनू शकत नाही. जुन्या प्रशासनात असलेली बाबूशाही (पक्षी : अर्थ, गृह, इत्यादी महत्वाच्या पदांवरचे सेक्रेटरीज आणि त्यांची कामे सावरणारे कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी) व इतर वैधानिक आणि अर्धवैधानिक संस्था (उदा: सिबीआय, ईडी, इ) यातले वरिष्ठ-कनिष्ठ अधिकारी पूर्वीप्रमाणेच आपल्या पदावर असतात. हुकुमशाहीप्रमाणे, त्यांना लगेच बदलून, त्यांच्याजागी आपल्या तत्वांप्रमाने काम करणार्‍या लोकांची नेमणूक करता येत नाही (सिबीआयच्या मुख्याच्या बदलाच्या वेळचे नाटक आठवत असेलच) किंवा सगळे कायदे-नियम आपल्या मनाप्रमाणे बदलता येत नाहीत. योग्य आणि देशाच्या भल्यासाठीचे बदलही लोकशाही आणि सद्य कायदाप्रक्रियेप्रमाणेच करावे लागतात... आणि ही प्रक्रिया वेळकाढू असते, हे सांगायला नकोच. या जुन्या अधिकार्‍यांनी जुन्या राजकारण्यांबरोबर हातात हात घालून (बरे-वाईट) काम केलेले असते. किंबहुना, राजकारण्यांबरोबरच अनेक संशयास्पद कामांत त्यांचे हात अडकलेले असतात. जुनी व्यवस्था जेवढी जास्त काळ असेल आणि ती जेवढी जास्त भ्रष्ट असेल, तेवढे शासन आणि ते चालवणारे बाबूलोकही जास्त भ्रष्ट असतात, हे आलेच. कारण, भ्रष्ट व्यवस्थेत, नीतीमान अधिकारी नसतातच असे नव्हे, पण, नितीमत्ता गुंडाळुन ठेऊन, नेत्यांना त्यांच्या कारवायांत मदत करणारे लोकच बहुसंखेने भरभर वर जातात, हे सांगायला नकोच. असे अधिकारी, सत्तापालट झाला तरी, पडद्याआडून जुन्या राजकारण्यांना मदत करतात. सद्या गाजत असलेल्या चिदंबरम प्रकरणात, काही महिन्यांपूर्वी, भारताच्या अ‍ॅटर्नी जनरलने सर्वोच्च न्यायालयात, "पुराव्यांची अनेक कागदपत्रे आम्ही कोर्टाला देण्याअगोदर माध्यमांना मिळत आहेत आणि त्यातली काही श्री चिदंबरम यांच्यावर घातलेल्या धाडीत सापडली आहेत" असे विधान केले होते, हे आठवत असेलच. असे का होते याची अनेक कारणे असू शकतात, त्यातली काही महत्वाची अशी... (अ) लोकशाहीत ५ वर्षानी सत्तापालट होऊ शकतो. तेव्हा, हुशार बाबू (उच्च्पदस्थ बाबूलोक आणि बाबूगिरी मुरलेले सर्व प्रकारचे बाबू हुशारच असतात, त्याशिवाय ते इतके यशस्वी होऊ शकले नसते) लोकांचे असे मत असणे आश्चर्यकारक नाही की :"नेते दर पाच वर्षांनी बदलतात पण त्यांची सगळी कामे करणारे आणि त्यांना सल्ला देणार्‍या आमची खुर्ची इथे ३०-३५ वर्षे कायम असते". (आ) सत्तापालट झाल्यावर छत्रछाया गमावल्यामुळे अनेक भ्रष्ट बाबूलोकांची दुकाने बंद झालेली असतात... त्यामुळे ते नाराज असणे स्वाभाविक आहे. तेव्हा भ्रष्टाचाराविरुद्ध काम करणार्‍या नवीन प्रशासनाला त्यांची मदत जरासा हात राखूनच आणि/किंवा जेवढ्यास तेवढी राहणे शक्य आहे. (इ) एखाद्या प्रकरणात जुन्या राजकारण्यांवर कारवाई झाली तर, (१) त्या प्रकरणात मदतनीस असलेल्या बाबू लोकांनाही ते धोकादायक असते आणि (२) रिपल इफेक्ट्स होऊन, जुन्या नेत्याच्या छत्रांखाली, बाबू लोकांनी केलेले इतर अनेक गैरव्यवहार उघड होण्याचाही धोका असतो. (ई) जुन्या नेत्याला अडचणीत आणण्यापेक्षा त्याला पडद्याआडून मदत करून ५ वर्षे वेळ मारून नेणे आणि तो परत सत्तेवर आल्यावर आपले दुकान परत सुरु करणे, हा विचार सोयीचा वाटला तर आश्चर्य ते काय? (उ) जुन्या नेत्याशी तात्विक पायावर समिकरण जुळलेल्या अधिकार्‍याला बदल पचविणे कठीण जाणारच आणि त्याने आपली हुशारी नवीन व्यवस्थेला पडद्यामागून सुरुंग लावण्यास व जुन्या नेत्याला परत सत्तेवर आणण्यास, कामी आणणे, फार जगावेगळे होणार नाही. (ऊ) याशिवाय, जुन्या राजकारण्यांनी स्वतःचे हितसंबंध राखण्यासाठी अनेक नेताभिमुख (पक्षी : स्वतःचा भ्रष्टाचार पचवता येईल असे) कायदे केलेले असतात. ते बाद करून नवीन जनताभिमुख कायदे करणे ही प्रक्रिया लोकशाहीत गुंतागुंतीची आणि वेळखाऊ असते. इतर अनेक कारणे असू शकतात, पण वरील काही मुख्य कारणे मुद्दा समजून घ्यायला पुरेशी आहेत. यामुळे, अनेक दशके घट्ट पाय रोऊन बसलेली आणि अनेक हितसंबंध निर्माण झालेल्या प्रशासनात, सर्व महत्वाच्या प्रशासकिय, संवैधानिक आणि अर्धवैधानिक संस्थांत (सेक्रेटरीएट, सिबीआय, ईडी, इ), नवे सरकार आले तरी, पहिल्या दहापैकी बहुसंख्य अधिकारी जुन्या सरकारची 'बाळे' असतात... हे कटू असले तरी सत्य आहे. म्हणूनच, लोकशाहीत अमुलाग्र प्रशासनिय बदल घडवून आणण्यास ३ (तीन) कार्यकाल लागतात असे म्हणतात... १. पहिली ५ वर्षे बस्तान बसलेल्या अधिकार्‍यांना ताब्यात आणणे आणि त्यांचा उघड/गुप्त विरोध मोडून काढत, शक्य तेवढे काम करवून घेण्यात जातो. २. दुसर्‍या ५ वर्षांत, बहुतेक अधिकार्‍यांना, "नवीन व्यवस्था पाय रोऊन उभी राहिली आहे, तेव्हा आपण सुधारून नवीन व्यवस्थेशी जुळवून घेणे बरे" असे वाटते. त्याचबरोबर, प्रत्येक महत्वाच्या खात्यातील १० पैकी ३ ते ५ वरिष्ट अधिकारी निवृत्त झालेले असतात किंवा नवीन व्यवस्थेने बदलले असतात. अर्थातच, नवीन बदलांचा जोर आणि वेग वाढू लागतो. ३. तिसर्‍या ५ वर्षांत भल्याभल्या (एन्ट्रेंच्ड) अधिकार्‍यांचा धीर सुटतो आणि बहुतेक सर्व उच्च अधिकारी नवीन व्यवस्थेशी जुळवून घेण्यास शिकलेले असतात. जे तसे करू शकत नाहीत, ते इथपर्यंत (कार्यकाल संपून किंवा त्यापूर्वी स्वेच्छेने) निवृत्त झालेले असतात किंवा बिनकामाच्या/बिनमहत्वाच्या जागी बदली झालेले असतात. अर्थातच, नवीन बदलांचा जोर आणि वेग जनतेच्या अपेक्षा जास्ती जास्ती पूर्ण करू लागतो. वरील प्रक्रिया, काही सरकारे जास्त जोमाने आणि कमी वेळात करू शकतात, तर काही सरकारे कमी जोमाने आणि जास्त वेळात करू शकतात... पण लोकशाही व्यवस्थेत ही प्रक्रिया अनिवार्य असते.
  • Log in or register to post comments
M
mayu4u गुरुवार, 08/22/2019 - 08:54 नवीन
सखोल, सन्तुलित आणि सुंदर विवेचन! धन्यवाद, एक्का काका!
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Tue, 08/20/2019 - 15:13 नवीन
जोशींच्या पुत्राची आणि पेंटर ची ईडी चौकशी करणार असे प्रसिद्ध झाल्या नंतर जोशींची पाठराखण करण्याचा सेनेने प्रयत्न केला नाही , पण पेंटरच्या कारागीरानीं अपेक्षे प्रमाणे थयथयाट चालू केला आणि " 22 तारखेला ठाणे बंद पाडू , हानी झाल्यास त्यास सर्वस्वी मुख्यमंत्री जबाबदार " असे ब्रश चे फटकारे मारण्यास सुरवात केली . तर मुख्यमंत्र्यानीं ही कारागिरांना ढोस द्यायला सुरुवात केली पण आजच पेंटर ने आपल्या कारागिरांना सामान्य जनतेला त्रास देऊ नका असे बजावले आहे . सगळी गम्मत च चालली आहे : ) आश्चर्य म्हणजे पेंटर निष्कलंक असल्याचा दृष्टांत राष्ट्रवादी आणि काँग्रेस ला झाला व दोन्ही पक्ष पेंटर निष्कलंक असल्याचे ठामपणे सांगू लागले . IF & LS या कंपनीला तब्बल 91 हजार कोटींचे कर्ज फेडायचे आहे व या कंपनीचे 200 करोड कोहिनूर मध्ये बुडाले आहेत . ते 200 करोड चे प्रकरण शेकण्याच्या शक्यते मुळे पेंटर ने कोहिनूर ची हिस्सेदारी विकून अंग काढून घेतले . आता त्याच प्रकरणाची चौकशी ईडी करू पाहत आहे तर त्यात सरकार विरोधकांचा आवाज दाबून टाकत आहे असा साक्षात्कार राकॉ आणी कॉ ला झाला . तरी पण शेवटी महत्वाचा प्रश्न शिल्लक राहतो त्या 91 हजार मध्ये अजून किती जणांचे हात ओले झालेले आहेत ? आणि गेली 5 वर्ष मोदी ( फक्त भाजप उपयोगी नाही ) सत्तेत असताना एव्हढा मोठा घोटाळा लक्षात कसा नाही आला ? व आरोपी विरुद्ध लक्षणीय कारवाई कशी झाली नाही ?
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित Tue, 08/20/2019 - 15:51 नवीन
च्यायला भाजप-शिवसेनाचे इनकमिंग बघून हा शेर आठवला बनके एक हादसा बाजार में आ जायेगा जो नहीं होगा वो अखबार में आजायेगा चोर उचक्कों की करो कद्र! के मालूम नहीं कौन कब कौनसी सरकार में आ जायेगा! :) राहत इन्दौरी....
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 08/20/2019 - 16:36 नवीन
चिदंबरमला बेल मिळालेला नसल्याने तो ईथे तिथे सैरावैरा पळत आहे. त्याच्या बाजुन सलमान खुर्शिद व कपिल सिब्बल सुद्धा आहेत. अशी बातमी टिव्ही वर दाखवली जात आहे !! हाय कोर्टाने बेल नाकरल्यावर चिदंबरम लगेच सुप्रिम कोर्टाकडे धावला. तिथे सलमान खुर्शिद व कपिल सिब्बल वाटच बघत होते. पण चिदंबरमला सुप्रिम कोर्टात पोहोचायला वेळ लागला तो पर्यंत सु को ची वेळ झालेली. मग हे तिघे सर न्यायाधिशांच्या चेंबरमध्ये गेले व बेल द्यायची विनवणी केली. पण ती मान्य झाली नाही!! चिद्दुला आता अटक होणार अशी अटकळ बांधली जात आहे. चिदंबरमला भाजपा सरकारच्या काळात २५ वेळेला बेल मिळालेला आहे. त्या काळात चिदंबरमने निवडणुक लढली व जिंकली सुद्धा !
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 08/20/2019 - 21:10 नवीन
१. चिदंबरमला अटकपूर्व जामीन नाकारला गेला. २. आपल्यावरचा खटला काढून टाकावा असा तरूण तेजपालचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने नाकारला. ३. मलेशियाने झाकीर नाईकला सार्वजनिक भाषणे देण्यास बंदी घातली आणि त्याला भारतात पाठवावे अशी पाच मलेशियन मंत्र्यांनी मागणी केली. ४. कार्यकाल संपलेल्या २०० सांसदांना, "सरकारी बंगले रिकामे करा नाहीतर वीज-पाणी तोडण्यात येईल" अशी तंबी दिली गेली. ५. रातुल पुरी या कमल नाथच्या पुतण्याला बँक अफरातफरीच्या आरोपाखाली अटक केली गेली. स्वच्छ भारत अभियान जोरात चालू आहे ! :)
  • Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर Wed, 08/21/2019 - 10:00 नवीन
इडी ने चिदंबरम साठी लुक आउट नोटीस जारी केले आहे आणि सोबत सुप्रिम कोर्टात caveat पण दाखल केली आहे .
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 08/21/2019 - 11:06 नवीन
१. Hindus and Muslims Don't Get Along म्हणून कुणीही विचारलं नसताना, काश्मिरात मध्यस्थी करण्याची परत एकदा ऑफर देणे! परिणाम?: संबंधितांकडून दुर्लक्ष! २. ट्विटरवर चीनच्या अध्यक्षांना Personal meeting ठरवून आपण हाँगकाँगचा प्रश्न सोडवूया गडे, म्हणून गळ घालणे. परिणाम?: संबंधितांकडून दुर्लक्ष! ३. 'आले ट्रम्पोजीच्या मना' न्यायाने ट्विटरवरून डेन्मार्कला ग्रीनलँड विकत घेण्याची ऑफर देणं - आणि डेन्मार्कने फाट्यावर मारल्यावर ठरलेली भेट पुढे ढकलणं! परिणाम?: संबंधितांकडून थट्टा! ४. गूगलने हस्तक्षेप केल्यामुळे हिलरी क्लिंटनला माझ्यापेक्षा अधिक लोकांनी मतं दिली, अशी खुळचट कॉन्स्पिरसी थिअरी मांडणं. परिणाम?: सर्वांकडूनच थट्टा! (अर्थात, ट्रम्पभक्त आणि फॉक्स न्यूजवरचे चाटूगण वगळता - ती एक पेश्शल क्याटॅगरी आहे :) :) :) :) छ्या:, यांच्यापेक्षा रागा बरे!!!!
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Wed, 08/21/2019 - 14:13 नवीन
आपल्या शवपेटिकेची तयारी आतापासुनच करायला लागले आहेत वाटते?
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 08/21/2019 - 20:33 नवीन
नको हो, तात्यांना उदंड आयुष्य लाभो!! इतका करमणूक करणारा राष्ट्राध्यक्ष दुसरा होईलसं वाटत नाही!!! हा आजचा एक सिक्सर - (वाचून मला 'अंदाज अपना अपना'मधलं 'ब्रेड का बादशाह और आमलेट का राजा - बजाज!' आठवलं): Trump Quotes Conservative Conspiracy Theorist Who Calls Him the ‘King of Israel’ and ‘The Second Coming of God’
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या गुरुवार, 08/22/2019 - 23:20 नवीन
गुगल, ट्विटर ह्या अनेक कम्पन्या ट्रंप आणि रिपब्लिकन लोकांच्या विरोधी असतात असे आढळले आहे. चुकून प्रसिद्ध झालेल्या इमेल्स, काढून टाकलेल्या कर्मचार्‍यांनी वेळोवेळी ह्या पूर्वग्रहाबाबत बोलून दाखवले आहे. उदा. ही बातमी पहा https://www.bizjournals.com/sanjose/news/2018/09/21/google-trump-conservative-bias-travel-ban-goog.html ही पण https://reclaimthenet.org/google-manager-leaked-email-fake-news तमाम तथाकथित पुरोगामी लोकांनी ट्रंपविरुद्ध कंबरा कसल्या होत्या. त्यात नट, नट्या, खेळाडू, आणि मोठ्या कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारीही होते. कॉन्सर्वेटिव लोकांची खाती बंद करण्यात गुगल, फेसबुक आणि ट्वीटरचा हातखंडा आहे हे वेळोवेळी दिसले आहे. आणि अशा अभिजन लोकांनी दाखवलेल्या तुच्छतेचा परिणाम म्हणून ट्रंप निवडून आला. तमाम माध्यमांनी छातीठोकपणे सांगितले होते की ट्रंप जिंकणे केवळ अशक्य आहे. पण तरी तो जिंकला. डेन्मार्कच्या पंतप्रधानाने ट्रंपच्या मागणीला आब्सर्ड म्हणून धुडकावले. खरे तर एका देशाच्या प्रमुखाने दुसर्‍या देशाच्या प्रमुखाबद्दल बोलताना असे शब्द वापरणे उचित नाही. पण ट्रंप असल्यामुळे सबकुछ चलता है असे काही लोकांना वाटते. बहुतेक सर्व माध्यमांना ट्रंपचा तिरस्कार वाटत असल्यामुळे हा शिष्टाचारभंगदेखील भूषणावह समजला गेला. ट्रंपद्वेष्टेपणाचा अतिरेक झाला की त्याच्या सगळ्या गोष्टी निंदनीय आणि हास्यास्पद वाटतात. पण सगळ्या तशाच असतील असे नाही. आंतरराष्ट्रीय घडामोडीत सहभागी होण्याचा प्रयत्न करणे ह्यात खरे तर काय चूक आहे? एका महासत्तेचा प्रमुख म्हणून ते अपेक्षितच आहे. ग्रीनलंड मागितले ते काही गोल्फ कोर्स बांधायला नाही तर संरक्षणाकरता एक मोक्याचा तळ बांधता यावा म्हणून. सगळे प्रयत्न यशस्वी होतातच असे नाही पण म्हणून प्रयत्नच करु नये अशी अपेक्षा चूक आहे.
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 08/23/2019 - 00:46 नवीन
निव्वळ ट्रंप आहे म्हणून सगळे काही हास्यास्पद?
जो माणूस वरचेवर कॉन्स्पिरसी थिअरीज ट्विटत बसतो आणि वर स्वतःला 'चोझन वन' आणि इस्रायलचा राजा म्हणवून घेतो, त्याला हास्यास्पद नैतर काय म्हणायचं?
गुगल, ट्विटर ह्या अनेक कम्पन्या ट्रंप आणि रिपब्लिकन लोकांच्या विरोधी असतात असे आढळले आहे.
बाकीची नेहमीची कॅसेट जाऊ द्या; 'गूगलने दीड कोटी मतं क्लिंटनकडे वळवली' असा ट्रम्पचा आरोप आहे. काही पुरावा आहे ट्रम्पकडे का नुसतंच असं असू शकेल/तसं असू शकेल आणि कॉन्सिपरसी वेबसायटींच्या लिंका? की 'टेड क्रुझच्या वडिलांनी जेएफकेचा खून केला' आणि 'सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश स्कलिया यांचा खून चेहर्‍यावर उशी दाबून झाला' अशा उज्ज्वल परंपरेतला अजून एक ट्रम्पतात्यांचा खोटारडा दावा?
आंतरराष्ट्रीय घडामोडीत सहभागी होण्याचा प्रयत्न करणे ह्यात खरे तर काय चूक आहे? एका महासत्तेचा प्रमुख म्हणून ते अपेक्षितच आहे.
हा असला युक्तिवाद येणार असं वाटलंच होतं! कृपया प्रतिसाद नीट वाचावा. मी मांडलेला मुद्दा हाच आहे की 'आले ट्रम्पोजीच्या मना' म्हणून केली जाहीर मागणी ग्रीनलँडची हे नक्कीच अ‍ॅब्सर्ड आहे. ट्रम्प काही चक्रवर्ती सम्राट किंवा हुकुमशहा नव्हे, की आलं मनात आणि केली मागणी. अमेरिकन राज्यघटनेप्रमाणे - जिचं पालन आणि संरक्षण करण्याची शपथ ट्रम्पतात्यांनी घेतली आहे - लेजिस्लेटिव्ह ब्रँच ही एक्झिक्युटिव्ह ब्रँचच्या समकक्ष आहे. परराष्ट्रधोरणाच्या दृष्टीने सिनेट आणि आर्थिक दृष्टीने हाऊस - हे मान्य करणार आहे का? लोकांनी निवडून दिलेल्या ह्या लोकप्रतिनिधींचं मत याबद्दल काय आहे? शिवाय ट्रिलियन डॉलर डेफिसिट समोर दिसताना यासाठीचे पैसे कुठून येणार? (की मेक्सिको देणार? ;)? आणि उपलब्ध डिप्लोमॅटिक चॅनेल्सद्वारे डेन्मार्कच्या प्रशासनाची याबाबत काय भूमिका आहे, याचा काही कानोसा घेतला गेला होता का? ह्या गोष्टी एका महासत्तेचा प्रमुख म्हणून अपेक्षितच आहेत.
ट्रंपद्वेष्टेपणाचा अतिरेक झाला की त्याच्या सगळ्या गोष्टी निंदनीय आणि हास्यास्पद वाटतात. पण सगळ्या तशाच असतील असे नाही.
यासारख्या विधानांना मी 'ट्रंपभक्तीचा अतिरेक झाला की...' छापाचं विधान करून उत्तर देऊ शकतो. पण असल्या ट्रम्पियन टॅक्टिक्समध्ये रस नाही. तेव्हा तुमचं चालू द्या!
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 08/23/2019 - 10:15 नवीन
बरोबर एका महिन्यापूर्वी, ट्रम्पतात्यांनी 'मोदींनीच मला काश्मिरात मध्यस्थी करण्याची विनंती केली' अशी लोणकढी थाप मारली होती. असली कुठलीही विनंती केली नसल्याचं आपल्या परराष्ट्रविभागानं लगोलग स्पष्ट केलं. मुलायम सिंगांसारख्या विरोधी पक्षात वर्षानुवर्षं बसलेल्यांनीही, संरक्षण खातं त्यांच्याकडे असताना, भारताचं वर्षानुवर्षं 'मध्यस्थ नको' हे धोरण पुढे चालवलं होतं - त्याला मोदींसारखा खमका पंतप्रधान तिलांजली देईल, हे संभवत नाही. त्यानंतर उचललेली पावलंही, हे पुरेसं स्पष्ट करतात. मग आता मोदी खोटं बोलताहेत की आपल्या बापाचा जन्म जर्मनीत झाला असं सांगत* फिरणारा हा महासत्तेचा प्रमुख नरपुंगव? (*एकदा असं बोलले तात्या, तर कदाचित जीभ घसरली/नजरचूक म्हणता येईल - पण चक्क चार-पाचदा निरनिराळ्या प्रसंगी, न्यू यॉर्क शहरात जन्म घेतलेल्या आपल्या पिताश्रींना ट्रम्पतात्यांनी जर्मनीत जन्म घेणं भाग पाडलं! ओबामा केनियात जन्मला आणि फ्रेडअण्णा ट्रम्प जर्मनीत - निस्ता सावळा गोंधळ!!! अर्थात, शाब्दिक कसरती करून यालाही कशी हिलरी/ओबामा/बायडेन/शुमर जबाबदार आहेत, असा जावईशोध लावणारे महाभाग निघतीलच!)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 08/21/2019 - 12:06 नवीन
चिदंबरम प्रकरण फारच तापतय। आता गेले कुठे ११५ सोडून? इंद्राणी बाइंनी बरीच माहिती उघड केल्याने गुंता वाढला आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Wed, 08/21/2019 - 15:02 नवीन
इंद्राणी व पिटर मुखर्जीनी चिदंबरम विरुद्ध साक्ष दिल्याने काॅंग्रेसचे धाबे दणाणले आहेत !! ईंद्राणीला तिच्या मुलीच्या हत्त्येबद्दल अटक झालेली तेंव्हापासुन ह्याची तयारी सुरु झालेली !! एकंदरीत हे सरकारचे काय प्लान्स आहेत ह्याचा थांगपत्ता लागत नाही आणि त्यात हा विरोधी पक्ष आहे लिंबु टिंबु !!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 08/21/2019 - 15:33 नवीन
INX Media केस महत्वाची पण एक रेड हेरिंग होती आणि चिदंबरमविरुद्ध ६ (सहा) वॉटरटाईट केसेस न्यायलयापुढे ठेवल्या गेल्या आहेत, अशी बातमी आहे. त्यामुळेच... (अ) दिल्ली हाय कोर्टाने अटकपूर्व जामीन रद्द केला आहे आणि चिदंबरम गुन्ह्याचा म्होरक्या (किंगपिन) आहे असा ताशेरा मारला आहे. (आ) सर्वोच्च न्यायलयाने जामीन देण्यासाठी केलेल्या अर्जाची सुनावणी त्वरेने करण्याला नकार दिला आहे... ती केस आता शुक्रवारी सुनावणीला येईल. म्हणजेच, तोपर्यंत चिदंबरमला अटक करण्यास परवानगी आहे. सर्वात लाजिरवाणी गोष्ट अशी की, भारत सरकारमध्ये अर्थमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या व्यक्तीला कायद्यापासून पळून लपून बसावे लागले आहे... साध्या सरळ कायदेशीर भाषेत चिदंबरम सद्या फरार (fugitive) आहे ! :( काही महिन्यांपूर्वी, चिदंबरमविरुद्ध कारवाई सुरू झाल्यावर कॉन्ग्रेस शांत होती. त्यामुळे चिडून चिदंबरने अनेक गर्भित धमक्यांची विधाने केली होती. त्यानंतर मात्र कॉन्ग्रेस नेहमीच्या प्रथेप्रमाणे "व्हेंडेटा, व्हेंडेटा" अशी ओरड करत आहे. पण, तरीही ईडी/सिबीआयने चिदंबरमला ताब्यात घेऊन चौकशी करायला परवानगी मिळाली नसल्याने सर्व निर्धास्त होते. आता अटक होऊन चौकशी झाली तर सगळी हाडे कपाटातून बाहेर पडतील व त्यातील किती हाडे आपल्या नावे असतील या भितीने अनेकांची (ही यादी ठरविण्यासाठी फार विचारशक्ती लागणार नाही) गाळण उडाली आहे. अर्थातच, सर्वोच्च न्यायालयातील अनेक जान्यामान्या वरिष्ठ वकिलांची फौजेची धावधाव सुरू झाली आहे, हे माध्यमांत दिसत आहेच.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 08/21/2019 - 17:09 नवीन
चिदंबरम साहेबानी छुपी धमकी दिली असेल कि मी अडकलो तर मी सर्वाना अडकवेन म्हणून मग लोकांची हबेलंडी उडाली असेल.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 08/21/2019 - 18:26 नवीन
चिदंबरम साहेबानी तशी छुपी धमकी नाही दिली... जेव्हा सिबीआय चौकशी सुरू झाली आणि कॉन्ग्रेसी नेते गप्प राहिले होते, तेव्हा त्यांनी, "मी एकटा खाली जाणार नाही" अश्या अर्थाची उघड धमकी माध्यमांत दिली होती. तेव्हा, ही धमकी कॉन्ग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांसाठी ती धमकी होती असे माध्यमांत येत होते.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 08/21/2019 - 19:18 नवीन
काँग्रेसने कुणि नवा अध्यक्ष निवडला असता तर चिदंबरम पासून हात झटकता आले असते. गोवलेली मंडळीना हात झटकणे अवघड जात असावे. माजी अर्थमंत्र्यांना अटक झाल्याने काँरेसला कॉर्पोरेट फंडींग करणारी मंडळी काही काळ काही प्रमाणात तरी फंडींग बाबत हात आखडता घेतील त्यामुळे काँग्रेसच्या आर्थीक अडचणीत भर पडेल. एकदा माजी अर्थमंत्र्यास आत टाकण्यास मागे पुढे पाहीले नाही - एकदा आरडा ओरडा करून झाला की कुणी पुढच्या ओरडण्याकडे लक्ष देत नाही- म्हटल्यावर आपल्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून परिवाराचे चमचेही वर्षाभरात माघार घेऊन परीवाराची साथ सोडतील असे काही झाले तर या कष्टाचा भाजपाला खरा राजकीय फायदा होईल.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 08/21/2019 - 16:20 नवीन
कार्तीची ५४ कोटींची मालमत्ताही अगोदरच जप्त केली आहेच. म्हणजे अगदी दुधधुले नसावेत.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 08/21/2019 - 18:33 नवीन


चिदंबरम सिबिआयच्या ताब्यात. राममनोहर लोहिया रुग्णालयात वैद्यकिय तपासणीसाठी नेण्यात आले, जी अटकपूर्व आवश्यकता आहे.

  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Wed, 08/21/2019 - 19:20 नवीन
येत्या शुक्रवारी न्यायाधीश गुईगुई आज घडलेल्या अटक नाट्यावर ताशेरे ओढून चिद्दु ला जामिनावर सोडणार . आता भाजप च्या विरोधात नखे काढण्यात गुईगुई एकदम एक्स्पर्ट झाला आहे :)
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 08/22/2019 - 03:45 नवीन
इंद्राणीच्या माहिती आधारे छापा घातल्यावर रु दहा लाखचा चेक कार्तीने घेतल्याची नोंद सापडली हा पुरावा चिदंबरमच्या विरोधात गेला आहे. कालच्या नोटीशीनंतर घरी पावणेनऊला आल्यावर सिबीआई टीम परतली. पण त्यांना बंगल्याचे दार उघडले नाही म्हणून ते भिंतीवरून आत जावे लागले/ गेले. हेसुद्धा विरुद्धच. जामिनवगैरे मिळेलच पण केस स्ट्रान्ग होत जात आहे. मोठी परदेशी गुंतवणूक बोर्डाची अनुमती साडेचार कोटी असताना ३०५ची घेणे हासुद्धा मुद्दा आहेच. एकूण पुरावे वाढत आहेत. हे राजकीय सूड असल्याचे कान्ग्रेस म्हणते पण आता लगेच लोकसभा निवडणुका नसल्याने कानग्रेस/विरोधी पक्षाला फायदा होणार नाही.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 08/22/2019 - 06:54 नवीन
" बाटला हाउस एनकाउंटर" बद्दल बोलायला बंदी आहे ? लिबरल संतुलित लोक ह्या विषयावर मौन आहेत !! पुर्ण सिनेमा मध्ये "हिंदु जनतेला" आतंकी दाखवुन समतोल साधण्याची काॅंग्रेसची ईच्छा जाहीर करणारे शिवराज पाटिल चिदंबरम व सुशीलकुमार यांच्या भुमिकेत तसे दिसणारे Actors घेतले होते पण दिग्विजय सिंगचा ओरिजीनल क्लिपच दाखवला !!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/22/2019 - 18:09 नवीन
West Bengal CM Mamata Banerjee visits a roadside tea stall, makes tea ममता दीदीने एका रस्त्याशेजारच्या चहाच्या टपरीला भेट देऊन चहा बनवला ! बहुतेक, चहा बनवला की पंतप्रधान बनता येते असा त्यांचा समज झालेला दिसतोय ?! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 08/23/2019 - 09:50 नवीन
>>> बहुतेक, चहा बनवला की पंतप्रधान बनता येते असा त्यांचा समज झालेला दिसतोय ?! =)) =)) =)) --- लोल!! तसंही बंगालीत 'चाय' म्हणजे इच्छा असणे. येनकेनप्रकारेण इच्छापूर्तीच!
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन गुरुवार, 08/22/2019 - 18:14 नवीन
NSEL जिग्नेश शहा, ६३मुन लिमिटेड खटल्यात सरकारच्या विरुध्द निकाल. MPID ACT लागु होत नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा