Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी : जून २०१९

ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 06/05/2019 - 09:43
🗣 126 प्रतिसाद
जागतिक बँकेने (World Bank) पुढच्या २०१९-२० या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ७.५% दराने वाढेल असा अंदाज वर्तवलेला आहे हा अंदाज जागतिक बँकेच्या "जागतिक आर्थिक संभावना (Global Economic Prospects) या अहवालात वर्तवलेला आहे. भारताची गेल्या आर्थिक वर्षातील (२०१८-१९) वाढ ७.२% होती.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 72294 views

🗣 चर्चा (126)
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 06/25/2019 - 14:33 नवीन
Top cops told to file FIRs in cut-money complaints फार पूर्वीपासून, कम्युनिस्ट सरकार असल्यापासून, पश्चिम बंगाल राज्यात एक अत्यंत भ्रष्ट प्रणाली काम करत आली आहे. तिला सर्वसामान्य लोकांत "सिंडीकेट" असे म्हटले जाते. या प्रणालीत, सत्तेत असलेल्या सरकारच्या आशिर्वादाने प्रत्येक मोहल्ला, गाव आणि शहर स्तरावर स्थापन केलेल्या या गटांचा मुख्य स्थानिक बाहुबलींनी असतो. स्वतःसाठी, सत्तेतल्या पक्षासाठी आणि सत्तेतल्या नेत्यांसाठी जनेतेकडून अवैध मार्गांनी पैसे जमवणे (पक्षी : लोकांना लुबाडून पैसे जमवणे) हे या सिंडिकेट्सचे मुख्य काम असते. सर्वसामान्य गरीब/श्रीमंत लोक आणि खाजगी संस्थांचे सर्व स्थानिक निर्णय (उदा : जमीन खरेदी करणे, इमारत बांधणे, व्यवसाय-धंदा करणे, त्यासाठी कच्चा माल विकत घेणे, तयार माल विकणे, इ) या सिंडिकेटच्या सहमतीने आणि त्यांना त्यांनी मागितलेले पैसे देऊनच होऊ शकतात. ही एक फार मोठ्या प्रमाणावरची अवैध समांतर संस्था, सत्तेत असलेल्या सरकारच्या वरदहस्ताखाली चालू असल्याने तिला पोलीस आणि न्यायव्यवस्थाही आत्तापर्यंत हात लावू शकत नव्हती... मग लोक दाद तरी कोणाकडे मागणार? आणि दाद मागण्याचा प्रयत्न केल्यास, त्याच्याविरुद्ध दमबाजी पासून ते शारिरीक इजा, यापैकी कोणत्याही मार्गाचा अवलंब केला जात असे. नुकतेच झालेल्या निवडणूकांमध्ये लोकांनी या व्यवस्थेला विरोध सुरू केला आणि त्याला नुकत्याच झालेल्या डॉक्टरांच्या आंदोलनाने बळ मिळाले. जुलुमी सत्तेविरुद्ध आवाज उठविता येतो आणि संघटीत असलो तर सरकारला आंदोलन दाबून टाकणे कठीण जाते, ही जाणीव सर्वसामान्य लोकांना झाली. लोकांच्या सिंडिकेट्सच्या विरुद्ध असलेल्या असंतोषाचा उद्रेक झाला तर ते फार महागात पडेल, या अंदाजाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला नेहमीचा गर्व बाजूला ठेवून सिंडिकेट्सच्या अस्तित्वाला उघडपणे मान्य केले आहे आणि स्थानिक बाहुबलींना अवैध रित्या जमा केलेले पैसे परत करण्याचे उघड आदेश दिले आहेत. व त्यासाठी पोलीसांना एफआरआय दाखल करण्यास सांगितले आहे. ही फक्त वेळ सावरण्यासाठी खेळलेली राजकिय चाल असली तरी, लोकांचा प्रतिसाद (पक्षी : वाढलेली हिम्मत) पाहता आणि अश्या रितीने सरकारी आशिर्वादाने लुबाडलेल्या पैशाची व्याप्ती पाहता, त्या चालीचा हिमधोंडा (स्नोबॉल) बनून ममता दीदीच्या डोक्यावर आदळण्याची बरीच शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये, अनेक दशकांनी, जनतेला जनतेच्या आवाजाच्या ताकदीची कल्पना आली आहे. ही, पश्चिम बंगालसाठी आणि भारतिय लोकशाहीसाठी फार महत्वाची सकारात्मक गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 06/25/2019 - 16:51 नवीन
पश्चिम बंगाल हे राज्य बांगलादेश सीमेवर आहे . बांगलादेश आणि बंगाल ह्या दोन्ही देश आणि राज्य ह्यांची भाषा एकच आहे . त्याचा परिणाम म्हणून अवैध बांगलादेशी घुसखोरांची संख्या इथे बऱ्या पैकी आहे . कम्युनिस्ट राजवट ही नेहमीच हिंदू विरोधी राहिली आहे . त्या मुळे हिंदुस्थान पेक्षा बांगलादेश ह्यांना जवळचा वाटतो . त्या मुळे बरेच अनैतिक धंदे इथे चालू असतात . केंद्रातील काँग्रेस सरकारनी बोटचेपे धोरण स्वीकारल्या मुळे ह्यांची हिमत वाढली आहे . आता bjp चे मजबुत सरकार केंद्रात आहे तेव्हा थोडी चलबिचल बंगाल मध्ये आहे
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 06/25/2019 - 17:31 नवीन
$490 billion in black money stashed abroad by Indians till till 2010: Report भारतातून बाहेर गेलेल्या काळ्या पैशाचा अंदाज घेण्यासाठी, सन २०११ मध्ये युपिए सरकारने प्रायोजित (sponsor) केलेल्या, तीन अभ्यासगटांकडून मिळालेले, पण आत्तापर्यंत उघड न केलेले, निष्कर्ष आता सार्वजनिक्रित्या उघड केले गेले आहेत. हे अहवाल सोमवारी लोकसभेच्या पटलावर ठेवले आहेत. (अ) National Institute of Public Policy and Finance (NIPFP), (आ) National Council of Applied Economic Research (NCAER) आणि (इ) National Institute of Financial Management (NIFM) यांच्या निष्कर्षांप्रमाणे, सन २०१० पर्यंत भारतियांनी भारताबाहेर साठवलेले धन युएस$४९० बिलियन (सुमारे रु३४ लाख ३० हजार कोटी) इतके आहे. यामध्ये भारतात, स्थावर मालमत्ता (जमीन, सदनिका, ऑफिसेस, इमारती, इ), खाणकाम, तंबाखू-गुटका, सोने, चलतचित्र उद्योग, शिक्षणौद्योग, इत्यादींच्या रुपात साठवलेल्या काळ्या पैशांचा समावेश नाही. काही दिवसांपूर्वी, स्विटझर्लंडच्या सरकारने, स्विस बँकात खाते असणार्‍या डझनावारी भारतियांना नोटीसेस बजावल्या आहेत, हे माध्यमात आले होते. याशिवाय, स्विस सरकारशी केलेल्या कराराप्रमाणे, भारत सरकारला, स्विस बँकांतील भारतियांच्या खात्यांचा अहवाल, दर तिमाहीला मिळायला सुरुवात झाली आहे. आता या सर्व माहितीवर आधारीत कोणती कारवाई सुरू केली जाईल, हे पाहणे रोचक होईल.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 06/26/2019 - 09:01 नवीन
$४९० ट्रिलिअन?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 06/26/2019 - 14:20 नवीन
ओके. ४९० अब्ज. म्हणजे तुल्यबळ समांतर अर्थव्यवस्थाच म्हणायला पाहिजे. आपली डॉलरमधली गंगजळीपण यापेक्षा कमी आहे. बापरे.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय गुरुवार, 06/27/2019 - 04:40 नवीन
म्हणजे अगदी एक-पाच लाख (नवीन अंक मापन/उच्चार पद्धती प्रमाणे) नसले तरी तीस / तीन-पाच हजार कुठे नाही गेले !
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/27/2019 - 06:55 नवीन
युएस$४९० बिलियन (सुमारे रु३४ लाख ३० हजार कोटी). हा आकडा, २०११ मध्ये युपिए सरकारने नेमलेल्या कमिट्यांनी दिलेला आहे व तो अहवाल कॉन्ग्रेसच्या विरप्पा मोईली यांनी, गेल्या सोमवारी (२४ जून २०१९) लोकसभा अध्यक्षांकडे सादर केला आहे. या अहवालातील मजकूराप्रमाणे, १९९७ ते २००९ या काळात, दरवर्षी देशाच्या सकल उत्पन्नाचा (जीडीपी) ०.२% ते ७.४% भाग काळ्या पैशाच्या स्वरूपात देशाबाहेर गेला आहे. यामध्ये देशात साठवलेल्या काळ्या धनाचा समावेश नाही. सर्वसामान्य माणसाला आपले काळे धन परदेशात पाठवणे सोपे नाही, ते गब्बर आणि पोहोच असलेली मंडळीच करू शकतात. म्हणजे, एकूण काळे धन त्यापेक्षा अनेक पटींनी जास्त असण्याची शक्यता आहे. :(
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 06/25/2019 - 18:04 नवीन
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 06/26/2019 - 15:03 नवीन
India will do what is in its national interest: Jaishankar to Pompeo on S-400 deal "परराष्ट्रसंबंधांच्या बाबतीत जसे अमेरिका तिच्या हितंसंबंधांकडे पाहून निर्णय घेते, तसेच भारत त्याच्या हितसंबंधांकडे पाहून निर्णय घेईल", असे भारतिय परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सद्या भारतभेटीवर असलेल्या अमेरिकन परराष्ट्रमंत्री पाँपिओ यांना सांगितले आहे. असे करणे हेच योग्य आहे. परंतू, अमेरिकेसारख्या प्रबळ आणि सद्याची एकुलती एक जागतिक महासत्ता असलेल्या देशाला असे (त्याच्या सांगण्याविरुद्ध निर्णय घेत असताना व विशेषतः त्याच्या sanctionsच्या धमकीला भीक न घालता) सांगणे ही कोणत्याही देशासाठी सर्वसामान्य गोष्ट नाही. गेले काही वर्षे भारत असे करत आहे, हे सद्य सरकारच्या राजकिय इच्छाशक्तीचे आणि ती वापरण्याची धमक असल्याचे लक्षण आहे... अर्थातच, हे भारताच्या जागतिक पटलावर उंचावलेल्या प्रतिमेचे लक्षण आहे. आताचे विधान, "अमेरिकन दबावाला न जुमानता, भारताने रशियाकडून S-400 ही अत्याधुनिक युद्धप्रणाली विकत घेण्यासंदर्भात", होते. हे मत भारताने दीड-एक वर्षांपूर्वी उघडपणे व्यक्त केले आहे आणि अमेरिकेच्या अनेक प्रकारच्या सातत्यपूर्ण दबावाला बळी न पडता, कायम ठेवले आहे, हे भारताच्या प्रतिमेसाठीच नव्हे तर भारताच्या संरक्षणव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत स्पृहणिय आहे, यात वाद नाही. असाच दबाव अमेरिका, नाटो सदस्य असलेल्या तुर्कस्थानावर टाकत आहे आणि बर्‍याच अंशी यशस्वी होत आहे, असे दिसत आहे. या युएस५ बिलियन आकारमानाच्या महाखरेदीविरुद्ध असलेल्या अमेरिकन अमेरिकन दबावामागची मुख्य कारणे अशी आहेत... १. S-400 प्रणाली भारताने विकत घेतल्यास, अमेरिकेने रशियाविरुद्ध घातलेल्या बंधनांचा (सँक्शन्स) भंग होतो... हा एकप्रकारे अमेरिकेच्या जागतिक महत्तेचा अपमान होतो. व अमेरिकन प्रथेप्रमाणे अमेरिका सँक्शन्स भंग करणार्‍या देशाविरुद्धही आपोआप सँक्शन्स व्यवहारात येतात. २. तसेच भारताने, (अ) अमेरिकन प्रणाली विकत घेतल्यास, अमेरिकेन अर्थव्यवस्थेला मदत होईल. अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये आणि जागतिक वर्चस्वाच्या रणनितिमध्ये शस्त्रांत्रांचा व्यापाराला अतीअतीमहत्व आहे. (आ) त्याविरुद्ध, रशियन प्रणाली विकत घेतल्यास केवळ रशियन अर्थव्यवस्थेला मदत होईल असेच नाही तर, अमेरिकेचा रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्याच्या प्रयत्न त्याप्रमाणात अयशस्वी होईल. ३. सद्या, S-400 इतकी अत्याधुनिक दुसरी संरक्षक-आक्रमक युद्धप्रणाली आस्तित्वात नाही. अमेरिकेने त्याबदली भारताला त्यांची सर्वोत्तम प्रणाली देऊ केलेली आहे, पण ती S-400च्या तोडीस येत नाही असे तज्ज्ञांचे मत आहे. ४. S-400 ही अमेरिकेच्या अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या विरुद्ध यशस्वी होईल असे तज्ज्ञांचे खात्रीचे अंदाज आहेत. अमेरिकेची मुख्य काळजी हीच आहे. पाकिस्तानकडे अमेरिकन लढाऊ विमाने आहेत. अगोदरच, भारताच्या स्क्वा लि अभनंदन यांनी ६५वर्षे जुनी प्रणाली असलेले मिग-२१ विमान वापरून अमेरिकेच्या नाकाची भूमिका (आणि उत्पन्नाचे महत्वाचे साधन) असलेले एफ-१६ विमान पाडले. यामुळे एफ-१६च्या अजिंकतेच्या दाव्यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता, S-400 वापरून एफ-१६ किंवा दुसरे अत्याधुनिक विमान पाडले तर मग (अ) रशियाने अमेरिकेचे नाक कापले असे होईलच, आणि (आ) त्याचबरोबर, त्या घटनेचा अमेरिकेच्या लढाऊ विमान विक्रिवर लक्षणिय परिणाम होईल. अर्थातच, हा जागतिक अर्थकारण आणि राजकारण यांच्या गुंतागुंतीचा मुद्दा आहे. ५. भारताचे आणि रशियाचे मैत्री आणि सामरिक संबंध खूप जुने (पक्षी : अमेरिका भारताला धाब्यावर बसवत असल्यापासूनचे) आहेत, रशियाने भारताच्या जरूरीच्या काळात मदत केली आहे (जेव्हा, अमेरिका एकतर भारतविरोधी होती किंवा दुसरीकडे बघत होती). हे संबंध नवीन मैत्रीसंबंधांच्या आड येणार नाही आणि नवीन मैत्रीसंबंधांनीही जुन्या मैत्रीसंबंधांच्या आड येऊ नये, असे भारत अमेरिकेला खंबीरपणे सांगत आहे आणि तिच्या गळी उतरवत आहे... हा एक मोठा राजनैतिक विजय आहे. या सोबतच, भारत अमेरिकेने इराणवर घातलेली सँक्शन्स झुगारून, मागच्या दाराने खनिज तेल विकत घेण्याची प्रणाली, एक राखीव चाल म्हणून ठेवून आहे. ते नको असल्यास अमेरिकेने भारताला इराणच्या (आकारमान आणि प्रत) तोडीचे तेल दुसर्‍या देशाकडून मिळवून देण्याची जबाबदारी अमेरिकेवर टाकून भारत प्रतिक्रिया पाहत आहे. याशिवाय, भारताचे इराणबरोबर असलेले सांस्कृतिक-राजकिय-आर्थिक-सामरिक अनेक दशकांचे संबंध हा मुद्दा आहेच... त्याचे एक महत्वाचे उदाहरण छाबाहार बंदर प्रकल्प आहे, जो अमेरिकेला तिचे अफगाणिस्तानमधील हितसंबंध राखण्यास आवश्यक आहे. याशिवाय, इराणला अमेरिकेच मत समजाऊन देणार्‍या दोन-तीन देशांपैकी भारत एक महत्वाचा देश आहे. या दोन्ही प्रकरणात असा निर्णय होईल असे दिसत आहे : भारताला सँक्शन कायद्याच्या "अपवाद यादी"त सामील केले जाईल... या यादीतील देशांना/संस्थांना सँक्शन्स असलेल्या देशांशी व्यापार करायला मुभा असते. वरच्या वस्तुस्थितीची मुख्य कारणे अशी आहेत : (अ) आशिया पॅसिफिक राजकारण-अर्थकारण-समरकारण या सर्वांसाठी अमेरिकेला भारत सोडून इतर पर्याय नाही आणि (आ) त्याचबरोबर, भारताने अमेरिकेच्या दबावाला न झुगारता समर्थपणे उभे राहण्याची राजकिय इच्छाशक्ती आणि धमक दाखवली आहे... आणि ते मानण्यावाचून अमेरिकेला पर्याय नाही.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 06/27/2019 - 01:51 नवीन
जर पुढील वर्षी तात्यासाहेबांची, पर्यायाने त्यांच्या पॉलीसीची, सफेद घरातुन गच्छंती झाली तर हा सगळा गोंधळ कुठले वळण घेईल. यापुर्वीचे सॅम काका इराणबाबत बरेच अनुकुल होते म्हणतात. तेच मार्ग परत ओपन झाले तर परिस्थीती भारताला आणखी सुसह्य होऊ शकेल का??
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/27/2019 - 08:39 नवीन
अमेरिकेत (किंवा इतर कोणत्याही देशात) सरकार कोणाचेही आले तरी अमेरिका (किंवा तो देश) स्वतःचेच हितसंबंध पाहणार. भारताने आपली राजकिय इच्छाशक्ती व पत वापरून, प्रत्येक वस्तूस्थितीत शक्य असेल त्याप्रमाणे, आपले हितसंबंध राखावेत. यापेक्षा वेगळे सत्य नाही. आंतरराष्ट्रिय राजकारणात, आशाळ्भूतपणे पाहून किंवा भीक मागून फक्त अवहेलनाच मिळते... इतर काहीच नाही. एखादी गोष्ट फुकट मिळते आहे असे दिसले तर वर्तमानात/भविष्यात त्याची किंमत मोजावी लागेलच याची १००% खात्री ठेवावी. पूर्णविराम.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 06/27/2019 - 05:58 नवीन
भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेला स्पष्ट शब्दात सांगितले आहे कि भारत स्वतःच्या राष्ट्रीय हितासाठी जे काही आवश्यक आहे ते करणारच. https://timesofindia.indiatimes.com/india/india-will-do-what-is-in-its-national-interest-jaishankar-to-pompeo-on-s-400-deal/articleshow/69958233.cms
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/27/2019 - 08:43 नवीन
स्विझर्लंडने नीरव मोदी आणि त्याच्या बहिणीचे युएस$६.४ मिलियन असलेले बँक अकाऊंट्स गोठवले आहे. आता रिपब्लिक टिव्हीवर ही बातमी दाखवली जात आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 06/27/2019 - 09:59 नवीन
हायप्रोफाइल केस मध्ये मीडिया सांगते त्या पेक्षा वेगळी परिस्थिती असते . निरव चे अनेक बँकेत स्वतःच्या नावावर किंवा dumy नावा वर बँकेत खाती असतील . जे खाते गोठवल आहे असे सांगत आहेत त्या मधून कधीच मोठी रक्कम दुसऱ्या खात्यात transfer झाले असतील. प्रत्येक गैर धंदा करणाऱ्या व्यक्तीला काही खोट्या केस स्वतः chya धंद्या वर घाव्या लागतात संगनमताने पोलिस ना सुद्धा द्याव्या लागतात . त्यामुळे जनतेला दाखवा येते सरकार काम करत आहे तसा प्रकार सुद्धा असू शकतो
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/27/2019 - 14:30 नवीन
मूळ मुद्दा तुमच्या ध्यानात आलेला नाही. किंवा, या घटनेची पार्श्वभूमी माहीत करून घेतली असतीत, तर घाई करून केलेली सर्व "काल्पनिक व्हॉटाबाऊटरी" टाळली असतीत. =)) युएस$४.६ मिलियन ही काही फार मोठी रक्कमही नाही. पण, स्विट्झलँड त्याच्या बँकेतील पैशांना पोलादी संरक्षण देत असते. आतापर्यंत अमेरिका (तेही गेल्या एकदोन वर्षांतच) सोडून इतर कोणता देश त्या अकाऊंट्सना हात लावण्यात फारसा यशस्वी झालेला नाही. यापार्श्वभूमीवर, आणि नवीन भारत-स्विट्झरलँड कराराच्या पार्श्वभूमीवर, भारताला मिळालेले हे यश, ही नंतरच्या मोठ्या कारवायांची सुरुवात आहे. यानंतरही, या कराराच्या अन्वये, दर तिमाहीला, भारताला स्विट्झर्लँडमधील भारतिय संपत्तीचा अहवाल मिळणार आहे. (खाली दिलेली संदेसरा गृपसंबंधीची ताजी बातमी वाचल्यास (किंवा आत्ता टिव्हीवर दाखवल्या जाणार्‍या बातम्या पाहिल्यास), भ्रष्टाचारसंबंधी सरकारच्या जोराने चललेल्या नवीन कारवायांसंबंधी अजून काही कळेल व शंकानिरसन होईल.)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/27/2019 - 14:44 नवीन
EXCLUSIVE | Republic Accesses Document Detailing Properties Worth Rs 9,777 Crores In The Sandesara Scam. Read Here स्टर्लिंग बायोटेक प्रकरणात आरोपी असलेल्या संदेसरा भावंडांच्या, जगभरात पसरलेल्या संपत्तीपैकी सुमारे रु ९,७७७ कोटी किंमतीच्या संपत्तीवर Enforcement Directorate (ED) ने टांच आणली (attachment ) आहे. ही संपत्ती अनेक देशांत विखुरलेली आहे... (अ) नायजेरियातील ४ तेलविहिरी आणि OML 143 नावाचे तेलक्षेत्र (आ) पनामामध्ये नोंद केलेल्या Tulja Bhawani, Varinda, Bhavya, Brahmani, इत्यादी बोटी (इ) अमेरिकेत नोंदवलेले 200 Gulfstream विमान (ई) युके मध्ये असलेली सदनिका, इ याशिवाय, याअगोदर सन २०१८मध्ये, ईडीने PMLA कायद्याअंतर्गत संदेसरांच्या सुमारे रु४,७३० कोटींच्या संपत्तीवर टाच आणलेली आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 06/28/2019 - 01:53 नवीन
जी२० मध्ये आर्थिक घोटाळे करून देशातून पळणाऱ्यांवर कारवाई हा विषय घेतलेला आहे असं कळलं.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 06/28/2019 - 08:27 नवीन
"दहशतवाद" आणि "आर्थिक घोटाळे करून देशातून पळणाऱ्यांवर कारवाई" हे दोन विषय मोदी प्रत्येक आंतरराष्ट्रिय मंचावर उपस्थित करत आहे आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल जागतिक स्तरावर जाणिव व तिरस्कार निर्माण होऊन कडक कारवाईसाठी आंतरराष्ट्रिय सहकार्याच्या दिशेने बरीच प्रगती झाली आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 06/30/2019 - 08:45 नवीन
अरारारा आरारारा आरारारारा... [ हे गाणं आहे, खालच्या बातम्या वाचुन हेच शब्द तोंडातुन निघाले ! ] देशात पीएनबीपेक्षाही मोठा 14 हजार 500 कोटींचा घोटाळा – इडी शहाणपणाचे वावडे का?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant | Tamannaah
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 06/30/2019 - 18:15 नवीन
शुक्रवार २८ जून ला देवळाली रेंजमध्ये मध्ये मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर्सची चाचणी घेण्यात आली.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant | Tamannaah
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 07/01/2019 - 08:53 नवीन
एकदम भन्नाट! -गा.पै.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 07/01/2019 - 19:15 नवीन
Hong Kong protesters smash up legislature in direct challenge to China अमेरिकेशी व्यापारी संबंधांतील मारामारी, देशातील ढासळणारी अर्थव्यवस्था, दक्षीण चीन समुद्रातील सीमारेखेवरून शेजारी देश व अमेरिकेशी चालू असलेले वाद, इत्यादी चिनी राष्टाध्यक्ष शी यांच्या डोकेदुख्यांत अजून एका मोठ्या समस्येची भर पडली आहे. हाँग काँग मधिल ब्रिटिश वसाहतीची ब्रिटनची ९९ वर्षांची भाडेपट्टी (lease) सन १९९७ साली संपली. त्यावेळेस, तो भूभाग परत घेताना चीनने, "हाँग काँग मध्ये आधीची ९९ वर्षे चालू असलेली मुक्त व्यापारी, लोकशाही आणि न्याय व्यवस्था चालू ठेवण्याचे आश्वासन दिले होते. याचे कारण म्हणजे, हाँग काँगचे 'जागतिक स्तरावर महत्वाचे आर्थिक केंद्र' हे महत्व. तसे आश्वास न दिल्यास हाँग काँगची अर्थव्यवस्था धोक्यात येईल हे चीनला पुरेपूर माहीत होते आणि तो धोका स्विकारणे मूर्खपणाचे झाले असते. असे असले तरी, जसजसा काळ जाऊ लागला तसतसे, चीनी ड्रॅगनने मागच्या दाराने, हाँग काँगला आपल्या विळख्या जखडण्याचे काम सुरु केले. तेथिल निवडणूकीत उभे राहणार्‍या लोकप्रतिनिधींच्या निवडीत हस्तक्षेप, प्रशासनात आणि व्यापारी नियमांत ढवळाढवळ, असे करत करत सद्या तेथिल चीनच्या नीतीला विरोध करणार्‍या नागरिकांच्यावर शेवटचा आघात करणारे विधेयक स्थानिक विधानसभेत मंजूर करून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या विधायकात, विरोधकांवरचे खटले हाँग काँग येथून हलवून, चीनच्या मुख्य भूमीवरील कम्युनिस्ट न्यायालयांत नेण्याची तरतूद आहे. एकदा तेथे खटले नेले की 'निकाल' चीनच्या सरकारच्या बाजूनेच लागेल आणि शिक्षा कडक असेल हे सांगणे काही फार कठीण नाही. अर्थातच, सुरुवातीला अडखळत सुरू झालेल्या विरोधाला गेल्या काही दिवसांत जनतेचा मोठा पाठींबा मिळाला आहे आणि त्याची धार प्रखर झाली आहे. सुरुवातीला शांततापूर्ण असलेले हे आंदोलन सद्या अटीतटीचे आणि हिंसक वळण घेऊ लागले आहे. आंदोलकांनी विधान भवनाचे (Legislative Council) संरक्षक कुंपण तोडून इमारतीत प्रवेश केला आणि आतमध्ये बरीच मोडतोड केली, भिंतींवर अक्षरे आणि चित्रे (ग्राफिती) काढली, चीनने मान्य केलेला ध्वज उलटा लटकावला आणि आंदोलकांचा ध्वज रोवला. या आंदोलनात वेगवेगळ्या अंदाजांप्रमाणे ५ ते १० लाक लोकांनि भाग घेतला आहे... हे अभूतपूर्व आहे. हे प्रकरण सद्या बरेच गरम झाले आहे, त्यात अमेरिका आणि ब्रिटनने राजकिय उडी घेतली नसती तरच आश्चर्य. दोन्ही बाजू नेटाने पाय रोवून उभ्या असल्याने, ते कोणत्या दिशेने जाईल नक्की सांगणे हे सद्या तरी कठीण आहे. मात्र, त्याची दीर्घकालीन दिशा, राष्टाध्यक्ष शी यांचे चीनमधील आणि आंतरराष्ट्रिय महत्वावर लक्षणिय प्रभाव टाकेल, यात वाद नाही.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 07/01/2019 - 20:38 नवीन
Lpg गॅस स्वस्त होणार असून तो सुद्धा १०० रुपयांनी
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 07/01/2019 - 22:38 नवीन
#MeToNavhech (#मी_तो_नव्हेच) ;)

भारतातिल तथाकथित विचारवंत, विचार स्वातंत्र्याचे दावेदार, "सोईस्कर" खुट्ट वाजले (किंवा कधी कधी ना वाजले तरी) भयभित होणारे चलतचित्र अभिनेते, "सोईस्कर" खुट्ट वाजले की मार्च काढणारे ढोंगी मेणबत्तीबहद्दर, खान मार्केटी गँग, ल्युटियन गँग, इत्यादी सगळ्याचे ढोंग (हायपोक्रसी), परत एकदा, जगजाहीर झाले आहे. खालील दोन्ही बाबतील काही मोजके अपवाद सोडता, खुट्ट वाजल्यावर जग पेटून ऊठले आहे असा गदारोळ करणारी वर्तमानपत्रे आणि इतर राष्ट्रिय माधमे आणि वरचे सगळे ढोंगी जणु काहीच झाले नाही असे मूग गिळून गप्प आहेत.

१. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत विजयी झालेल्या तृणमूल कॉन्ग्रेसच्या खासदार नुसरत जहान यांनी साडी नेसून, कुंकू लावून आणि मंगळसूत्र घालून लोकसभेत शपथ घेतली यावरून त्यांच्यावर कर्मठ मुस्लीम मुल्लांकडून टीका झाली आणि सामाजिक माध्यमांत ट्रोलिंग झाले. याबद्दल त्या खमक्या खासदाराने त्यांना परत सुनावले. मात्र, तृणमूलची स्त्री मुखिया किंवा दुसर्‍या कोणी महत्वाच्या राजकारण्याने त्यांच्या बाजून बोलल्याचे माध्यमांत दिसत नाही. २. झाईरा वसीम नावाच्या बक्षिसाने गौरविल्या गेलेल्या सिनेमा अभिनेत्रिला, मुस्लिं कट्टरतावादी आणि सामाजिक माध्यमांतील ट्रोलिंगमुळे, आपले सिनेमा करियर सोडून द्यावे लागले. त्या अभिनेत्रिला चित्रपट सृष्टीत घेऊन येणार्‍या, एका लोकप्रिय टिव्ही कार्यक्रमात नाक वर करत (व कधी नक्राश्रूंनी भरलेले नाक पुसत) इतरांच्या नीतीमत्तेवर टीका करणार्‍या, भारतात विचारस्वातंत्र्य उरले नाही म्हणून आपली बायको भयभीत झाली आहे व परदेशात स्थालांतर करू असे सांगते आहे असे ठणकाऊन सांगणार्‍या, एका तथाकथित सुपरस्टारनेही मुका-बहिरा असल्याचा अभिनय करणे योग्य समजले आहे. पुर्वानुभव पाहता, अश्या एखाद्या प्रकारात, इतर धर्माच्या मुलीबद्दल, इतर धर्मगुरूने किंवा राजकिय नेत्याने जरासे अनुद्गार काढले असते तर सगळे आकाश कोसळले असते... व ते एका परीने योग्यच असते. मात्र, आता दातखिळी बसलेल्यांनी तसे करणे ढोंगीपणाची, खोटेपणाची आणि निर्लज्जपणाची परिसीमा ठरते, हे सांगायला नकोच.
  • Log in or register to post comments
M
mayu4u Wed, 07/03/2019 - 12:11 नवीन
नुसरत यांनी निखिल जैन यांच्याशी विवाह केला आहे. त्या अधिकृतरीत्या हिंदू धर्म स्वीकारू शकतील.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/03/2019 - 18:21 नवीन
नुसरत यांनी निखिल जैन यांच्याशी विवाह केला आहे. हे जगजाहीर आहे. त्या अधिकृतरीत्या हिंदू धर्म स्वीकारू शकतील. सद्य कायद्याप्रमाणे, त्यांना साडी नेसणे, कुंकू लावणे आणि मंगळसूत्र घालणे यासाठी, अधिकृतरीत्या हिंदू धर्म स्वीकारण्याची अजिबात गरज नाही आणि त्यांनी अधिकृतरीत्या हिंदू धर्म न स्विकारता, तसे केले तर त्यावरही आक्षेप घेण्याचा अधिकार कोणाला नाही. ****** तुम्हाला मूळ मुद्दा समजला नाही असे वाटते. "कोणी काय खावे, काय पेहरावे, त्या आमच्या घटनादत्त विचारस्वातंत्र्यावर कोणीच (सरकारसुद्धा) घाला घालू शकत नाही" असा वेळोवेळी सोईस्कर गळा काढणार्‍या चलतचित्र अभिनेते, "सोईस्कर" खुट्ट वाजले की मार्च काढणारे ढोंगी मेणबत्तीबहद्दर, खान मार्केटी गँग, ल्युटियन गँग, इत्यादींनी यावेळेस नुसरत यांच्यावर त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याविरुद्ध होणार्‍या टीकेबद्दल तोंडातून ब्र सुद्धा काढू नये, यात त्यांचा सोईस्कर निवडकपणा (उर्फ सिलेक्टिविझम) आणि म्हणूनच निर्लज्ज ढोंगीपणा उघड झाला आहे. या वरच्या गोष्टींत अजून एका गंभीर गोष्टीची भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द राजधानीतील एका मंदीरावर इतर धर्मियांनी दगडफेक केली आणि आत प्रवेश करून मंदीर भ्रष्ट होईल अश्या कारवाया केल्या. "विशिष्ट समाजातील व्यक्तींच्या लिंचींग" बद्दलच्या बातम्या आकांडतांडव करत अनेक महिने चघळत राहणार्‍या माध्यामांनी त्याबाबत आंधळे-बहिरे होणे स्विकारले आहे. तसेच, काही सन्मामनिय अपवाद सोडता, चलतचित्र अभिनेते, "सोईस्कर" खुट्ट वाजले की मार्च काढणारे ढोंगी मेणबत्तीबहद्दर, खान मार्केटी गँग, ल्युटियन गँग, इत्यादींनी यावेळेस नुसरत यांच्यावर त्याच कारणांनी होणार्‍या टीकेबद्दल तोंडातून ब्र सुद्धा काढला नाही. ****** अजून एक... पहलू खान लिंचींग प्रकरण आठवत असेलच. त्या वेळेस, कोणताही पुरावा न देता, पहलू खान "बिचारा निर्दोष" आहे आणि तो एका विशिष्ट धर्माचा असल्यानेच त्याला मारले, असा प्रकरणाला धार्मिक रंग देऊन, वर निर्देशिलेल्या व्यक्ती आणि माध्यमे दुसर्‍या धर्माला झोडपत होत्या, हे आठवत असेलच. काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या सद्य कान्ग्रेस सरकारने त्यासंबंधात दाखल केलेल्या एफआरआय मध्ये पहलू खानच्या नावावर "गाईंची अवैध खरेदीविक्री" करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. कोणत्याही गुन्ह्याकरिता कोणत्याही नागरिकावर, कायदेशीररित्या सक्षम (competent) नसलेल्या कोणत्याही व्यक्ती/संस्थेला, प्राणघातक हल्ला करणेच काय, स्वसंरक्षणार्थ आवश्यक असेली कृती सोडून इतर कोणतीही कारवाई करणे, अवैध आणि निषेधार्य आहे. मात्र, त्याचबरोबर, चलतचित्र अभिनेते, "सोईस्कर" खुट्ट वाजले की मार्च काढणारे ढोंगी मेणबत्तीबहद्दर, खान मार्केटी गँग, ल्युटियन गँग, इत्यादींनी त्यावेळी दाखवलेला ढोंगीपणा (परत एकदा) उघड झाला आहे आणि त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ते बिळात लपून राहीले आहेत. ****** तेव्हा, मुख्य मुद्दा ह्या सततच्या निर्लज्ज ढोंगीपणाचा आहे. अवैध कृतीसंबंधी कडक कारवाई व्हायलाच हवी. पण त्याचबरोबर, अश्या निर्लज्जपणे हेतुपुरर्सर केल्या जाणार्‍या ढोंगी कारवाया समाजातील सौहार्दाला गंभीत धोका पोचवतात. काही जणांचा हा व्यवसाय/खेळ झाला आहे, असेच वाटावे अशी परिस्थिती आहे. म्हणून, त्यांच्यावरही (आवश्यक तर नवीन कायदे करून) कडक कारवाई करणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा