Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी : जून २०१९

ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 06/05/2019 - 09:43
🗣 126 प्रतिसाद
जागतिक बँकेने (World Bank) पुढच्या २०१९-२० या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ७.५% दराने वाढेल असा अंदाज वर्तवलेला आहे हा अंदाज जागतिक बँकेच्या "जागतिक आर्थिक संभावना (Global Economic Prospects) या अहवालात वर्तवलेला आहे. भारताची गेल्या आर्थिक वर्षातील (२०१८-१९) वाढ ७.२% होती.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 72294 views

🗣 चर्चा (126)
ट
टीपीके Wed, 06/19/2019 - 13:13 नवीन
अशा बातम्या वाचायला किती आनंद होतो. ह्याचे व्हिडिओ असतील तर बघितले पाहिजेत
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Wed, 06/19/2019 - 13:31 नवीन
या रणमर्दिनी स्त्रियांनी, तमिळनाडूमधील दुष्काळी वेल्लोर जिल्ह्यातील नागनंधी (नागनंदी) या हंगामी नदीला आपल्या अथक प्रयत्नांनी पुनर्जिवीत केले आहे ह्या प्रयत्नांना सुरुवात २०१४ साली झाली व आता त्याची फळे वेल्लोर जिल्ह्याला चाखायला मिळत आहेत !!
  • Log in or register to post comments
ट
टीपीके Wed, 06/19/2019 - 14:00 नवीन
एक नदी, एक जिल्हा, ५ कोटी. आणि दुष्काळ गायब. शासनाचे दुष्काळ निवारण वार्षिक अंदाजपत्रक हजारो कोटींचे. खरंच इतका पैसा खर्च करायची गरज आहे का?
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Wed, 06/19/2019 - 15:00 नवीन
फार वर्षापूर्वी 'कार्यरत' हे एक अनिल अवचट लिखित पुस्तक वाचले होते. त्यातील एक अवलिया श्री अरुण देशपांडे हे पुणे सोलापुर रोडवर अंकोली या गावात शेतीचे काही प्रयोग करत आहेत. त्यांच्या बोलण्यानुसार मोठमोठ्या धरणाची काही गरज नाही आहे, पण मोठे धरण म्हणजे मोठा पैसा खाण्याची संधी असे गणित असल्यामुळे देशपांडेविषयी जास्त काही माहिती मिळत नाही. सरकार त्यांना अनुल्लेखाने तर मारत नसतील? किंबहुना त्यांचे कार्य तरी प्रसिद्ध करावे. पुस्तक खरोखरच वाचनीय आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 06/19/2019 - 17:10 नवीन
शासनाचे दुष्काळ निवारण वार्षिक अंदाजपत्रक हजारो कोटींचे. खरंच इतका पैसा खर्च करायची गरज आहे का? देशव्यापी पाणीप्रश्न असे वरवरचे ढोबळ अंदाज करून समजत नाहीत आणि सुटतही नाहीत ! त्यासाठी, तज्ज्ञांकरवी देशव्यापी विचार करून बनवलेले महत्वाकांक्षी महाप्रकल्प वास्तवात उतरावे लागतात. त्याबद्दल, फारच त्रोटक काही असे... १. वरच्या उदाहरणातील ५ कोटी रुपयांनी फक्त 'एका जिल्ह्याच्या काही स्थानिक भागाचाच' पाणविकास शक्य झाला आहे. पण, भारतात असे दुष्काळी जिल्हे शेकडोंनी आहेत. तेव्हा साधारणपणे "ते जिल्हे X अंदाजे ५ कोटी" हा हिशेब लावा ! हा खर्च केवळ, तुलनेने छोट्या क्षेत्राचा तळागाळातील प्राथमिक विकास करण्यासाठी होईल व तोच काही हजार कोटींमध्ये जाईल. २. त्याचबरोबर, मोठ्या क्षेत्रांसाठी (एक किंवा अनेक जिल्हे/राज्ये) पाण्याच्या दुर्भिक्षासंबंधी दीर्घकालीन उपाय असलेल्या मोठ्या योजना येतात; उदा: धरणे, तलाव, इ. यापैकी प्रत्येकाला अनेक हजार ते अनेक दशसहस्त्र कोटी लागू शकतात. ३. त्याचबरोबर, देशपातळीवर विचार करून बनवलेल्या पाण्याच्या दुर्भिक्षासंबंधी दीर्घकालीन उपाय असलेल्या मोठ्या योजना येतात; उदा: भारतभरचा अजस्त्र नदीजोड प्रकल्प. (अ) दरवर्षी अनेक राज्यांत महापूर येतात आणि त्यांचे पाणी समुद्रात वाहून जाते. तर, त्याचवेळी इतर अनेक राज्यांच्या मोठ्या भूभागांवर दुष्काळ असतो. (आ) तसेच उत्तरेकडील मोठ्या नद्या पाण्याने बारमाही (पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने आणि इतर काळात हिमालयातील वितळणार्‍या बर्फाच्या पाण्याने) भरलेल्या असतात. हा विसंवाद दूर करण्यासाठी विचारपूर्वक अंमलात आणलेला भारतभरचा नदीजोड प्रकल्प, बहुतेक सर्व राज्यांतील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न लक्षणियरित्या सोडवू शकेल. अश्या प्रकल्पांला अनेक लक्ष कोटी रुपये लागतील. https://www.wikiwand.com/en/Indian_Rivers_Inter-link , इथे या प्रकल्पाबद्दल प्राथमिक माहिती मिळू शकेल. हे सर्व काम करायला आणि ते सुरू केल्यापासून त्याचे दृष्य परिणाम दिसायला, अनेक वर्षे लागतात, हे वेगळे सांगायला नकोच. इतर अनेक मुद्दे आहेत, पण इथल्या चर्चेतील मुख्य मुद्दा स्पष्ट करायला इतके पुरे आहे. आता सांगा, भारतभर पाणी समस्या सोडवायला किती खर्च योग्य असेल ते ?! :) हे सर्व प्रकल्प एकाच वेळी सुसुत्रपणे अंमलात आणले तरच भारताच्या पाणी समस्येला आटोक्यात ठेवता येईल आणि/किंवा तिचे दीर्घकालीन निर्मुलन करता येईल. वाजपेयींच्या कारकिर्दीत सुरू झालेला यासंबंधीचा विचार आणि काम, मधली दहा वर्षे ठप्प झाले होते. सुदैवाने, सद्य सरकारने गेल्या पाच वषांपासून त्या प्रकल्पाची परत जोमाने अंमलबजावणी सुरू केली आहे व त्याची फळे आता दिसू लागली आहेत. एक छोटे उदाहरण : क्षिप्रा ही पूर्वी बारमाही असलेल्या नदीत हल्लीच्या काळात पावसाळ्यात फक्त दोन महिने पाणी असते. तिला नर्मदा या मोठ्या बारमाही नदीशी जोडून बारमाही बनविण्याचा प्रकल्प चालू आहे. या नर्मदा-क्षिप्रा नदीजोड प्रकल्पाच्या एका भागाचे नुकतेच उदघाटन झाले, त्याची ही बातमी व चलतचित्र... MP: Narmada-Kshipra link to be channelled for agri, industry असो. यासारख्या दीर्घकालीन महाप्रकल्पांच्या यशासाठी, प्रचंड राजकिय इच्छाशक्ती तर लागतेच पण संसाधन आणि धन यांच्या गळतीला प्रतिबंध करणारी सबळ इच्छाशक्ती आणि व्यवस्थाही लागते, ज्या आता व्यवहारात उतरल्या आहे आणि म्हणूनच प्रकल्प ठरवलेल्या पैशांत आणि ठरवलेल्या वेळेत पूर्ण होऊ लागले आहेत. जसजसे दिवस पुढे जातील व या महाप्रकल्पाचे अनेक टप्पे पूर्णत्वाला जातील तसतसे त्यांचे परिणाम समोर येतील. मग, त्यांचा प्रभाव पडणार्‍या लोकांना त्यांचा तडक फायदा होईल आणि इतरांनाही ते बातम्यांतून समजतील.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Wed, 06/19/2019 - 18:22 नवीन
थोडा मोठा प्रतिसाद होईल , सवडिने टाकतो
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 06/19/2019 - 19:29 नवीन
जरूर लिहा. हा विषय सर्वांगाने विचार करण्याजोगाच आहे. मात्र, देशभराच्या विकासासाठी केवळ असंख्य छोट्या कारवायांचा पाठपुरावा करणार्‍या अनेक प्रकल्प पुढे आले आहेत आणि वारंवार पुढे येत आहेत. या प्रकल्पांचे जनक आणि पुरस्कर्ते बर्‍याचदा हे विसरतात की... एखाद्याने मोठ्या चिकाटीने चालवलेल्या प्रकल्पाच्या प्रतिकृती देशभर निर्माण करून त्या दीर्घकाळापर्यंत चालू ठेवण्यासाठी लागणारी चिकाटी, समर्पितता आणि त्यासाठी सातत्याने लागणारा लागणारा वेळ व खर्च, इ व्यवहारात त्याच्या जनकाशिवाय किती जणांना शक्य होईल ? त्याऐवजी, मोठ्या प्रकल्पांत "एकॉनॉमिज ऑफ स्केल" या तत्वामुळे ती कामे सातत्याने करण्यास मोजके तज्ज्ञ मन्युष्यबळ उपलब्ध करणे आणि तो प्रकल्प योग्य त्या "फायदा-व्यय" गुणोत्तराने दीर्घकाळ चालवणे शक्य होते... इतरांना फक्त आपल्या जरूरीच्या व्यवसायाचे काम करण्यासाठी त्या प्रकल्पाचा फायदा घेता येतो. थोडक्यात, मोठ्या लोकसंखेसाठी असलेल्या आणि/किंवा मोठ्या भूभागासाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पांमध्ये, प्रत्येक तांत्रिक काम त्या त्या विषयांच्या तज्ज्ञाला/तंत्रज्ज्ञाला करू देणे नेहमीच जास्त फायद्याचे व वेगवान सर्वांगिण विकासासाठी आवश्यक असते. सायकल एखाद्या माणसाच्या स्थानिक वाहतुकीसाठी योग्य (आणि उदात्तही) असू शकेल. पण, स्थानिक भूभाग सोडून मोठ्या अंतराच्या (उदा : १००, १०००, इ किमी) आणि मोठ्या संख्येने असलेल्या माणसांच्या वाहतुकीसाठी हजारो/लक्षावधी सायकली सोईच्या नाहीत हे सांगायला नकोच... त्यासाठी, मोठे महामार्ग, कार, बस, रेल्वे, विमान अश्या सुविधा निर्माण करणे आवश्यक असते. इतरही बरेच मुद्दे आहेत, पण देशाचा विकासाचा विचार करताना, वरचे मुद्दे कळीचे ठरतात. असो. तुमचे विचार ऐकल्यावर विशिष्ट विषयांवर चर्चा करूया.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा गुरुवार, 06/20/2019 - 15:15 नवीन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात टेम्बवली हे माझे आजोळ, या गावात एक नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत आहे. डोंगराच्या घळीतुन एक पाण्याचा प्रवाह गावात येतो. पाण्याची चव अमृततुल्य आहे. सांगायचा मुद्दा हा की जऱ या पाण्याला बंदिस्त करून गावात खेळवले तर बारमाही पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. पण गावकरी त्यात उत्सुक नाहीत. त्यांना शासनाची नळपाणी योजना पाहिजे. दिली. आता गावकरी भरमसाठ पाणी वापरतात. जे देवकृपेने मिळालेले देणे होते ते असेच वाया जात आहे. सरकारी योजनेत पाच मैलावरुन पाणी पंप करून आणले जाते. ज्या दिवशी काही समस्या येते व पाणी येत नाही त्या दिवशी पाटाच्या पाण्यावर मारामारी होते. गावात विंधनविहिरी आहेत. त्यांना पाणी मचुळ येते म्हणून कोणी वापरत नाही. पाटाचे पाणी फक्त विंधनविहिरीत जरी सोडले तरी पाण्याची प्रत सुधारेल. पण सरकार अशा गोष्टीकडे लक्ष देत नाही. मुंबईत पाणी फार लांबवरुन आणले जाते. महापालिका पाणी देताना उत्तम प्रतीचे पाणी मुंबईकराना पुरवते. मग लोक क़ाय करतात? तर हे उत्तम प्रतीचे पाणी गाड्या धुवायला, सोसायटया धुवायला वापरतात. मुंबईत अनेक उद्याने आहेत. त्यांना हे पिण्याचे पाणी झाडाना म्हणून वापरले जाते. सरकार अजिबात दुसऱ्या मार्गाकडे बघत नाही. जसे अनेक विहिरी मुंबईत बारमाही पाण्याच्या आहेत, पण लोक सर्रास त्यांच्या उपयोग कचरा फेकण्यासाठी करतात. माझे म्हणणे हेच आहे की जे काम थोड्या साधनानी जमू शकते त्यासाठी फाफटपसारा कशाला? भले प्रत्येक ठिकाणी अनुकूल परिस्थिति नसेल पण थोडेफार स्वयंपूर्ण होण्याला काय हरकत आहे. एकदा कार्यरत हे पुस्तक वाचून बघा. देशपांडे हरएक मुद्दा उलगडून सांगतात. कदाचित आपल्यासारख्या शहरी माणसाला हा वेडेपणा वाटेल पण जर हा वेडेपणा असेल तर अशा पुष्कळ वेड्यांची गरज आहे देशाला! धरणाचा विषय निघाला आहे म्हणून सांगतो, हि सर्व धरणे 60 ते 70 वर्षात गाळ भरून पाणी साठवण्याची क्षमता हरवून बसतात. पण ह्यावर कोणीच बोलायला तयार होत नाही. कित्येक धरणे तर उस कारखाने चालवायला बांधली आहेत असा संशय येतो. संपादित केलेली वरकड जमीन हा एक संशयाचे धुके निर्माण करणारा मुद्दा आहे .
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/20/2019 - 19:59 नवीन
ते पुस्तक वाचण्याचा प्रयत्न जरूर करेन. परंतु, आता थोडासा मूलभूत विचार करायला हरकत नसावी. तो असा... १. तुम्ही आताही एका जागेवरचा अनुभव सांगत आहात. दर जागेवरची माणसे आणि परिस्थिती वेगवेगळी असल्याने, एका जागेवरचे बरे-वाईट अनुभव भारतातल्या/जगातल्या प्रत्येक जागेला लागू पडतीलच असे नाही. तुम्हीच पुस्तकातले आणि तुमच्या गावाचे, अशी दोन उदाहरणे देवून, याला पुरावा दिला आहे. २. (असे व्यवहारात होणे शक्य नाही, तरी चर्चेसाठी होईल असे मानले, तरी) प्रत्येक गावाने आपले पाणीव्यवस्थापन स्वतःचे स्वतः केले असे गृहित धरूया. मग, शहरांना (जेथे जगातील सुमारे ५४% आणि भारतातील सुमारे ३३% लोकसंख्या राहते) त्यांना पाणीपुरवठा कोण करेल? ३. एखादा 'यशस्वी लहान प्रकल्प' घेऊन त्याच्या मापदंडांना (parameters) अनेक पटींनी गुणले की 'यशस्वी मोठा प्रकल्प' बनत नाही. तसेच, एखादा 'यशस्वी मोठा प्रकल्प' घेऊन त्याच्या मापदंडांना (parameters) अनेक पटींनी भागले की 'यशस्वी लहान प्रकल्प' बनत नाही. प्रकल्पाच्या आकार व आवाक्यातील बदलाबरोबर, त्याचे अनेक मापदंड आणि त्यांच्यावर प्रभाव पाडणारे घटक(factors) यांची संख्या आणि प्रकार लक्षणिय प्रमाणात बदलतात. व त्यांच्यासाठी आवश्यक असलेले उपाय लक्षणिय प्रमाणात वेगेवेगळे असतात. ****** "प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण असावे" हा भोळा आदर्शवाद आजचा नाही, फार जुना आहे. तो आजच्या काळात व्यवहारात येणे शक्य नाही, तरी चर्चेसाठी तो ठीक आहे असे मानले तरी, जगातला प्रत्येक माणूस आदर्शवादाने भारलेला नसतो हे लक्षात ठेऊन, खालील प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधणे रोचक ठरेल... अ) प्रत्येक (अपवादात्मक नव्हे) खेडे तेथिल सर्व जनतेला सर्व प्रकारच्या अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा पुरेश्या प्रमाणात निर्माण करू शकेल का? ...नाही. आ) ते पुरेश्या प्रमाणात तयार होत आहे असे मानले तरी, स्थानिक स्तरावर निर्माण होऊ शकलेल्या, अन्न-वस्त्र-निवार्‍याची (नसलेली) प्रत आणि त्याची (नसलेली) विविधता, तेथिल सर्व लोकांना समाधानी ठेऊ शकेल काय? ...नाही. इ) समजा सगळ्या खेड्यांतला प्रत्येक जण वरच्या गोष्टींतही समाधानी आहे. तर मग, शहरांतल्या लोकसंखेचे काय? त्यांनीही आपल्यापुरते अन्न-वस्त्र-निवारा स्वतःच तयार करायचा का? आणि कसा? ...शक्य नाही. ई) समजा तसेही (शक्य नाही पण, कल्पनेत,) मानले तरीही, भारताला वेगाने विकसित होण्यासाठी ज्या आधुनिक सेवा व उत्पादनांची गरज आहे, त्यासाठीची जी शिक्षण-संशोधन-विकसन व्यवस्था आवश्यक आहे, ती कोण करणार??? वरील मार्गाने चालून, सद्या चालू असलेल्या घरोघरी वीज, घरोघरी कुकिंग गॅस, गावोगावी बँक-शिक्षण व्यवस्था इत्यादी आणि नुकतीच जाहीर केलेली घरोघरी नळाने पाणी; असे विकासप्रकल्प कसे व्यवहारात आणता येतील? की, "ज्यांना खेडेगावात रहायचे असले त्यांनी आधुनिक विकासाच्या संसाधनांना विसरा", असे सांगायचे?किंबहुना, आधुनिक प्रकल्पांनी खेडेगावांतले जीवन विकसित झाले, तेथेच कामाची व उत्पन्नाची साधने निर्माण झाली, (आणि पर्यायाने शहर-गावातील विकासाचे अंतर जितके करता येईल तितके कमी केले), तर गावातील लोकांचे जीवन अधिक सुखी होईल व तेथिल लोकांना शहराकडे धाव घेण्याची गरज तुलनेने खूपच कमी होईल, नाही का? यालाच आपण, "विकास देशभर पसरवणे (spreading development across the nation)", किंवा "विकास साखळीतील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे", असे म्हणू शकतो. केवळ वरच्या आदर्शवादावर गोष्टींवर आधारीत गोष्टी करण्याचा अट्टाहास केल्यास काय होईल असा जरासा विचार करूया... मानवाने आपली शिकारी-गोळाकरी (हंटर-गॅदरर) जीवनशैली सोडून ---> सुमारे १०-१२,००० वर्षांपूर्वी सुरू केलेली शेतीवर अवलंबून असलेली व्यवस्था ---> यंत्रयुगातील अनेक शोध व त्यामुळे निर्माण झालेल्या सुविधा ---> आणि मानवी विकासाची सध्याच्या संगणकयुगापर्यंत झालेली प्रगती; उलट्या गतीने मागे न्यावी लागेल (किंबहुना, ती तशी मागे जाईल), नाही का? यामध्ये, जनुकविज्ञान, औषधविज्ञान, अवकाशविज्ञान, अणुविज्ञान, इ इ इ ना जमेस धरले तर, या उलट चालीच्या परिणितीची झलक अधिक प्रखरतेने डोळ्यासमोर दिसेल. सुमारे १०-१२,००० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या मानवी प्रगतीच्या मागची मूलतत्वे अशी आहेत... (अ) मूळ ज्ञान (understanding) असे की, "सगळ्यांनाच सगळे करणे जमणे शक्य नसते" आणि (आ) मूळ तत्व (principle) आहे, "श्रम विभाजन (डिव्हिजन ऑफ लेबर)". म्हणजेच, ज्याला जे जमेल, ज्या प्रतीचे जमेल, जेवढे जमेल, तसे काम करण्याची संधी उपलब्ध करून देणे. यात बरे-वाईट, उच्च-नीच काहीच नाही, तर, प्रत्येकाला त्याच्या कौशल्य आणि कुवतीप्रमाणे विकासाला हातभार लावायची संधी व फायदा देणे सर्वात जास्त महत्वाचे असते. तीच गोष्ट आहे, विकास करताना सुयोग्य प्रकल्प निवडण्यासाठीचा विचार करतानाची. छोट्या भूगावरचे स्थानिक स्तरावर प्रकल्प, मध्यम आकाराचे प्रकल्प आणि देशभरासाठीचे प्रकल्प, या तिन्हींची त्यांच्या, (अ) आवश्यकतेप्रमाणे, (आ) अपेक्षित दूरगामी परिणामांवर अवलंबून, आणि (आ) शक्य तेवढ्या जास्तीत जास्त फायदा-व्यय गुणोत्तराप्रमाणे, सांगड लावणे अत्यावश्यक असते. "सब घोडे बारा टक्के" असा विचार दूरगामी फायदा देत नाही. ही सांगड ज्या देशांत चांगल्या प्रकारे लावली जाते, तो देश उत्तम रितीने आणि वेगाने विकसित होतो. ही कल्पना अजून फार न ताणता, अजून जराशी जास्त समजूत पटवून घ्यायची असेल तर, एकच गोष्ट करून पहावी. खेड्याबाहेरील आधुनिक व्यवस्थेत निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट, आजच्या खेड्यातील घरातून वजा करा आणि काय शिल्लक उरते याची यादी बनवा ! ती नक्कीच रोचक असेल ! उ) केवळ चर्चेसाठी, समजा, वर अ) ते ई) मध्ये कल्पिलेल्या सर्व अवास्तव कल्पना वास्तवात आणल्या (???!!!) तर, अश्या (केवळ स्थानिक स्तरावर छोटे छोटे स्वावलंबी भूभाग असलेल्या) देशाची (आणि पर्यायाने आपली), आपल्या शेजारी असलेले-नसलेले देश, काय गत करतील बरे ?! ****** व्यवहारात, खूप उच्च आदर्शवादी विचार जगातल्या फार फार फार थोड्या अपवादात्मक लोकांमध्ये आस्तित्वात असतो आणि त्यापैकी फार फार फार थोड्या लोकांना त्यावर आधारलेले जीवन 'निर्माण करणे व निभावणे' जमते. बाकीच्या सामान्य मातीने बनलेल्या लोकांना, "आपल्याला जमेल ते व जमेल तेवढेच निवडक काम, जमेल तसे करणे आणि त्यातून मिळालेल्या धनाचा इतरांनी शोधलेल्या-बनवलेल्या असंख्य गोष्टींचा आपले जीवन जास्तीत जास्त सुखकारक बनविण्यास करणे", इतपतच जमते. पण, तेही फार वाईट आहे असे नाही. तसे करणे शक्य आहे म्हणूनच त्यातल्याच काही लोकांनी हे जग असामान्य बनविणारे शोध लावले, इतरांनी त्यापासून सेवा-उत्पादने बनवणारे उद्योग उभारले आणि उरलेल्या इतरांना नोकरी-व्यवसायाच्या संधी निर्माण केल्या. अर्थातच, या सगळ्याचे फायदे सगळ्यांना मिळत आहेत. देशाच्या सर्वंकश विकासासाठी (म्हणजेच मोठ्या भूभागवरच्या, विविध भौगोलिक परिस्थिती असलेल्या, मोठ्या लोकसंखेसाठी) आखणी करताना आदर्शावादाला व्यवहारवादाचा मोठ्या डोस देऊन मगच आवश्यक तेथे, आवश्यक तेवढे, छोटे-मोठे प्रकल्प उभारणे जरूरीचे असते... आणि तसे केले तरच ते यशस्वी होऊ शकतात. केवळ आदर्शवाद आणि/किंवा आशावाद व्यवहारात फार काळ तरून नेत नाहीत. तसे नसते तर (केवळ उदाहरणासाठी म्हणून) हेमलकसा, राळेगण सिद्धी, इत्यादींसारखे प्रकल्प दरजागी निर्माण झाले असते आणि शहरे सोडून सर्व लोक मोठ्या आनंदाने तेथे जाऊन राहिले असते. मात्र, तसे झाले असते तरीही, वरचा उ) हा मुद्दा शिल्लक उरतोच, नाही का?! देशात "श्रम विभाजन (डिव्हिजन ऑफ लेबर)" या तत्वावर देशात जे काही कमी-जास्त प्रतीचे सुरक्षाकवच निर्माण झालेले आहे, त्यांच्याविना उच्च प्रतीच्या आदर्शवादी प्रकल्पांची ही मोजकी बेटे निर्माण होऊ शकली असती का? :) ******
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 06/23/2019 - 14:13 नवीन
मला काय म्हणायचे आहे ते लक्षात घ्या. मुंबईसारख्या शहरात महानगरपालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टमवर एक कायदा केला आहे. नवीन बांधणार असलेल्या इमारतीत ही सिस्टम अनिर्वाय आहे म्हणून. पण हा नियम कोणीच पाळत नाही. गेल्या दोनचार दिवसापूर्वीची बातमी वाचली होती कि आपल्याकडे असलेल्या दुष्काळी परिस्तिथिवर तोडगा म्हणून इस्राएली तंत्रज्ञान आणायचा घाट चालला आहे. प्रश्न असा आहे की आपली समस्या तंत्रज्ञान वापरुन नाही तर सवयी बदलून दूर होणार आहे. मुंबईतील किती घरात कपडे धुतलेले पाणी टॉयलेटमधे वापरले जाते? हे जेव्हा सामान्य माणसाला कळेल तेव्हाच देश प्रगतिपथावर येईल. अन्यथा परदेशी तंत्रज्ञानाने आपण पाणी अधिक साठवू, पाण्यावर प्रक्रिया करू, पण पाण्याची बचत मात्र करणार नाही. कालपरवाच्या वर्तमानपत्रात बातमी वाचली होती कि महाराष्ट्रात ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे म्हणून! ते पण मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात! असे असेल तर मग रामाशिवागोविंदा! ज्या साखरेची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अत्यल्प आहे तीला आम्ही समर्थन मूल्य देणार आणि ते पण जनतेच्या तोंडचे पाणी पळवून, किंवा महागडया तंत्रज्ञानाने पाणी आणून!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 06/24/2019 - 05:53 नवीन
@ भंकस बाबा "रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम" हा नियम कोणीच पाळत नाही. हि वस्तुस्थिती नाही. कारण मुंबईत मी राहत असलेल्या दोन ( भाड्याच्या घरांमध्ये) आणि माझ्या मालकीचे घर असेलल्या किंवा माझं एवडे आणि माझा भाऊ राहत असलेल्या सर्व सोसायट्यांमध्ये पावसाचे पाणी साठवून बोअर वेल मध्ये ( वडील राहतात तेथे मोठी उघडी विहीर आहे) सोडले जाते आणि हेच बोअरचे पाणी संडास च्या फ्लश साठी वापरले जाते. रेन वॉटर हार्वेस्टिंगचं नव्हे तर प्रत्येक सोसायटीला अग्निशमनासाठी एक वेगळी टाकी बांधावीच लागते आणि महापालिकेचे पाणी प्रथम या टाकीत येते आणि त्या नंतर अतिरिक्त पाणी तुमच्या मूळ टाकीत जाते. ( तीन वर्षांपूर्वी आमची स्थिती अशी होती कि अग्निशमनच्या टाकीत पाणी आहे पण त्याचा सांडवा (ओव्हरफ्लो) कमी असल्याने घरात पाणी नाही. सध्या सदाच्या फांद्या तोडायचं असल्या तरी तुम्हाला महापालिकेची परवानगी घ्यावी लागते अन्यथा फारच कटकट गळ्यात येते. कदाचित मुंबईत जितका कायदा पाळला जातो तितका महाराष्ट्रात कुठेच पाळला जात नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 06/24/2019 - 05:54 नवीन
एवडे --वडील
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Tue, 06/25/2019 - 05:45 नवीन
तुम्ही कुठे राहता हे सांगितलेले नाही. मी मालाडमधील मालवणीत रहातो. इथे असलेल्या mhb कॉलोनित अनधिकृत पाण्याचे कनेक्शन घेणे फार सामान्य आहे. हे पालिका व पोलिस यांच्या संगमनताने होते. अनधिकृत पाणीच नव्हे तर चार माळ्याच्या झोपड्या देखील इथे पाहायला मिळतात. कितीही पाणीकपात असली तरी येथील गलीगल्लीत असलेल्या अनधिकृत मशिदि धूणे हा रोजचा कार्यक्रम असतो. येथे म्हाडाने काही इमारतीदेखील बांधल्या आहेत. एकाही ईमारतीत वॉटर हार्वेस्टिंग केलेले नाही. करायची ईच्छा देखील नाही. महानगरपालिकेने ओला कचरा व्यवस्थापन अनिर्वाय केले आहे, या गोष्टीचा येथील जनतेला थांगपत्ता नाही. घरातून बाहेर पडून प्लास्टिकच्या पिशवित बाँधलेला कचरा ,आधीच साचलेल्या ढिगावर टाकने म्हणजे स्वच्छता हा येथील लोंकाचा प्रामाणिक समज आहे. एकूण क़ाय तर सगळे कठीण आहे
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 06/24/2019 - 08:14 नवीन
@ भंकस बाबा : पाणी नियोजनात, साठवण, पुरवठा, वापर, पुनर्वापर अश्या अनेक पायर्‍या आहेत. आतापर्यंत फक्त पाणी साठवण व पुरवठा या विषयावर चर्चा चालली होती म्हणून पाणी वापरावर बोलण्याचे टाळले होते. कारण, पाणी वापरातले राजकारणी सत्ये सांगितल्यास, लगेच लेबले लावली जातात. पण आता तुम्ही तो विषय पुढे आणला आहे तर त्याबद्दल काही लिहिणे भाग आहे. या फार महत्वाच्या मुद्द्यावर लिहावे की नाही बाबत, वरच्या परिस्थितीमुळे द्विधा मनस्थितीत होतो. याबाबत काही तथ्ये अशी आहेत... १. पाण्याची उधळपट्टी कोठेही केव्हाही निषेधार्ह आहेच. पण, शहरांना आणि गावांना (पिण्यासाठी व शेतीसाठी) होणारा पाणी पुरवठा (किंवा गरज) पाहता, शहरात पाण्याची उधळपट्टी न झाल्याने त्याचा गावांना फार मोठा फायदा होणार नाही. फक्त, आम्हाला पाणी मिळत नाही, पण दुसरा कोणी उधळपट्टी करत आहे, हे मनात सलणे, मानवी प्रतिक्रिया आहे. २. गावांना केल्या जाण्यार्‍या पाण्याचा मोठा भाग शेतीसाठी वापरला जातो. या पाण्याच्या बाबतीत सर्वांना माहीत असलेले, कालपरवाच्या वर्तमानपत्रात बातमी वाचली होती कि महाराष्ट्रात ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे म्हणून! ते पण मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात! , हे सत्य मात्र कोणी गावकरी बोलताना दिसत नाही !!! कारण, त्यामुळे स्थानिक राजकारणी आणि/किंवा नगदी पिकांच्या सधन शेतकर्‍यांवर टीका केल्यासारखे होते... जे ("आपल्या"च नेत्यांवर टीका कशी करायची या विचाराने) हेतुपुरर्सर किंवा भितीने केले जात नाही. त्याऐवजी, फारसा विरोध करण्यास सबळ नसलेल्या शहरी नागरिकावर राग ओकून त्याला झोडपणे सोपे असते. रेन वॉटर हारवेस्टींगची जबाबदारी सरसकट सर्व शहरी गृहप्रकल्पांवर टाकणे, हे त्यापैकीच एक उदाहरण. कोणताही प्रकल्प यशस्वी होण्यासाठी, तो बनवणारा, स्थापीत करणारा आणि दर दिवशी चालवणारा या सर्वांसाठी कौशक्य-वेळ-श्रम-पैसा या सर्वांच्या दृष्टीने शक्य असला पाहिजे... नाहीतर प्रकल्प फसण्याचीच खात्री असते. अनुभव व कौशल्य नसलेल्या शहरी गृहप्रकल्पांवर ही जबाबदारी टाकली आहे. प्रकल्प कसे चालले आहेत यावर लक्ष ठेवण्याची व फसलेल्या प्रकल्पांना तज्ज्ञांची मदत पुरवण्याची काही तरतूद नसल्याने, काही मोजके प्रकल्प सोडता, आनंदीआनंद आहे. बरे, या योजनेमुळे, शहरस्तरावर काही फायदा होतो आहे की नाही, हे पाहणे जरूरीचे आहे, हे कोणाच्याच 'गावी' नाही ! :) ... हा कोणत्याही प्रकल्पाचे यश मोजण्यासाठीचा महत्वाचा मुद्दा, त्या मूळ प्रकल्पात होता की नाही याबद्दल संशय आहे ! जेव्हा मी वर, "देशस्तरावर "लहान-मध्यम-मोठ्या" पाणीप्रकल्पांच्या एकत्रित विचार करण्याबद्दल" लिहिले होते तेव्हा; कोठे-कसे-किती पाणी साठवणे आवश्यक आहे या विचाराबरोबरच साठवलेले पाणी कोठे-कसे-कशासाठी वापर करणे सर्व जनतेच्या सोईचे व फायद्याचे आहे, हे सुद्धा प्रकल्पाच्या आराखड्यात ठरवणे जरूर आहे. तसे होण्याऐवजी, बर्‍याचदा असे प्रकल्प काही ठराविक हितसंबंध नजरेसमोर ठेवून बनवले जातात आणि ते सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आहेत असे दाखवून, नंतर प्रकल्पाचा फायदा ठराविक हितसंबंधियांकडे फिरविला जातो. काही ठिकाणी तर मूळ आराखड्यापेक्षा वेगळे काहीतरी थातूरमातूर काम करून पैशांचा अपहार केला गेला आहे, हे काही फार मोठे गुपित नाही. हे थांबणे जरूर आहे. पृथ्वीवरची संसाधने, योग्य रितीने वापरल्यास, जनतेच्या गरजेस पुरी पडू शकतील, पण ती काही लोकांच्या असीम हव्यासासाठी नक्कीच अपुरी आहेत.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 06/21/2019 - 18:27 नवीन
कार्यरत पुस्तक मलाही फार आवडते.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 06/23/2019 - 08:48 नवीन
प्रत्येक गरजेकडे सरकारकडे हात पसरायचे अशी सवय आपल्याला लावलेली आहे. एक तर जनतेच्या कल्याण कारी योजना फक्त सरकारच करु शकते आणी जनता स्वःताच्या बळावर अशी काम करु शकणार नाही असा एक अलिखित नियम झालेला आहे. त्यामुळे जनतेचा आत्मविश्वास पार खचलेला आहे. गेले कित्येक दशक मराठवाडा, विदर्भ तर सोडाच म हाराष्ट्रातले अनेक जिल्हे आवर्षणाच्या गर्तेत होते. दर वर्षाला टँकरने पाणी पुरवठा केला जायचा. पाण्याच्या दुर्भीक्षामुळे लोकांना शेती करता येईना मग अश्या लोकांनी आपली गावे सोडली आणी गावच्या गावे उजाड झाली. महाराष्ट्रात २०१४ सालच्या भाजपा सरकारच्या येण्याने ही परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. जलयुक्त शिवार योजना आली त्यात लोक सहभागाने योजना सुरु झाली. ह्या योजनेमुळे पाण्याचे स्त्रोत पुन्हा सुरु झाले त्यानंतर पाणी फाऊंडेशन "पाणी कप" सुरु झाला. त्यामुळे गावो गावात शेत तळी, बांधारे, पावसाच्या पाण्याला जमिनीत जिरवुन भुजल पाण्याची पातळी वाढवायचे प्रयत्न सुरु झाले . जलयुक्त शिवार योजना व पाणी फाऊंडेशन "पाणी कप" मुळे परीस्थिती वेगाने बदलत आहे सुधारत आहे. जनतेने स्व:ताच्या महेनतीवर विश्वास ठेवुन काम करायला पाहिजे. दशरथ मांझी सारख्या सामान्य माणसाने अख्खा डोंगर तोडुन रस्ता बनवला फक्त एकट्याच्या बळावर अश्या लोकांचा आदर्श आपल्या समोर ठेवायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 06/19/2019 - 09:20 नवीन
नगरीनिरंजन,
निवडणुकीच्या आधी जगात भारी दौडणारी अर्थव्यवस्था निवडणुकीनंतर रिझर्व बँकेकडून बेलआऊट घ्यायची वेळ येण्याइतकी कशी खालावली?
राखीव पेढीचा पैसा केंद्रीय शासनाद्वारे प्रत्याभूत केलेला आहे. म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या नोटांची हमी केंद्र शासनाने घेतलेली आहे. तसं प्रत्येक नोटेवर लिहिलेलं असतं. यातनं काही गोष्टी स्पष्ट होतात. राखीव पेढीकडून शासनाने अतिरिक्त पैसा मागितला तर पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राखीव पेढीत हा पैसा साचला कुठून ? गेल्या सत्तर वर्षांत कोणी कधीतरी अशी बातमी ऐकलेली होती का? मग अचानक आजच इतका पैसा कुठून उपटला? याचं कारण म्हणजे हे भ्रष्टाचार कमी झाल्याचं लक्षण आहे. हज्जारो कोटी रुपयांचे घोटाळे थांबल्यामुळे इतका पैसा दिसतो आहे. दुसरी गोष्ट अशी की राखीव पेढी कडे शासनाने पैसा मागितला तर तो bail out नसतो. कारण शासनाने पेढीची हमी घेतलेली आहे, पेढीने शासनाची हमी घेतलेली नाही. तिसरी गोष्ट अशी की तुम्ही ज्याला bail out म्हणता तो प्रकार शासकीय तिजोरीत खडखडाट असेल तरंच लागू पडतो. याउलट शासन पेढीकडे जास्तीच्या विकासकामांसाठी पैसा मागतंय. दैनदिन व्यवहारांसाठी नव्हे. असो. शासन बुडीतखाती गेलंय आणि पैशासाठी वणवण फिरतंय असा काहीसा अर्थ तुम्ही उद्धृत केलेल्या लेखातनं व्यक्त होतो. हा अर्थात चुकीचा आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गब्रिएल Wed, 06/19/2019 - 09:58 नवीन
आवो गामासायेब, त्ये त्यांच्या परम्पूज्य न्येत्याची कापी मारून र्‍हायलेत- राफेल, राफेल, राफेल, राफेल आशी आरती आठवू र्‍हायले ना? ;) इरोधी पक्षाकडं बगायंचं आनी निसती घोटाळा घोटाळा आशी बोंब मारायची आसली तर त्येला आब्यास, खरं-खोटं, पुरावा आसलं कायबी लागत न्हाय बगा. =)) =)) =))
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 06/19/2019 - 14:54 नवीन
सरकारवर टीका केली म्हणजे विरोधीपक्षातील नेत्याचा भक्त आहे असं होत नाही.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 06/19/2019 - 14:50 नवीन
शाबास! ह्याच समर्थनाची वाट पाहात होतो. जर करसंकलन वाढले तर सरकारला रिझर्व बॅंकेच्या पैशाची गरजच का भासली? आजवर अशी बातमी कोणी ऐकली नाही कारण आजवर कोणत्याही सरकारने त्या पैशावर डल्ला मारलाच नाही. घोटाळे थांबल्रे म्हणून सगळा पैसा गेल्या ५ वर्षात रिझर्व बॅंकेकडे पैसा जमा झाला हे खास भक्त लॉजिक तुमच्या पोराबाळांना सांगा इतके दिवस अर्थव्यवस्थेच्या वाढीवरून टिमकी वाजवल्यानंतर ह्याचं समर्थन करण्याइतका निर्लज्जपणा आहे की नाही हेच पाहायचं होतं. तो दिसला. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
स
सालदार गुरुवार, 06/20/2019 - 08:22 नवीन
ज्ये बात. असेच म्हणतो. +१
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 06/20/2019 - 09:07 नवीन
नगरीनिरंजन, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देतो : जर करसंकलन वाढले तर सरकारला रिझर्व बॅंकेच्या पैशाची गरजच का भासली? घरी दरमहा बचत होत असली तरी महाग वस्तू सुलभ हप्त्यावर घेतातच ना? त्याच धर्तीवर करसंकलन जरी भरपूर झालं तरी ते अतिरिक्त विकासकामासाठी पुरेसं नाही. इथे अतिरिक्त म्हणजे जास्तीची हा शब्द महत्त्वाचा आहे. असो. राखीव पेढीकडे इतका पैसा कुठून साचला? या एका प्रश्नाचं उत्तर द्या. माहित नसेल तर तसं सांगा. एकदा का पैशाचा स्रोत कळला की मग आपण ठरवू तो कशासाठी वापरायचा ते. तसंही पाहता तिरुपती बालाजीसारख्या देवळांचं धन ताब्यांत घ्यावं म्हणून बरीच ओरड होता असते. कारण तिथे म्हणे तो पैसा अनुत्पादक अवस्थेत पडून असतो. मग हाच नियम राखीव पेढीस लावायला नको का? राखीव पेढी हे अर्थभक्तांचं एक देऊळच मानायला हरकत नाही. पैसा हा नव्या जगाचा देव आहे. अर्थशास्त्राचे नियम ही स्मृती, The wealth of Nations ही श्रुती, अर्थशास्त्रीय विविध संशोधने हे विविध योगमार्ग, भांडवलशाही म्हणजे पुण्यसंचयिनी व्यष्टीसाधना, तर साम्यवाद ही समष्टीसाधना, राखीव पेढी म्हणजे रिझर्व्ह बँक हे मंदिर, जीडीपी हा भक्तीभाव, करसंकलन हा नैवेद्य, राखीव पेढीतील अतिरिक्त पैसा हे मंदिराचं धान्यकोठार, इत्यादि इत्यादि. मग भंडारा घालायचा ना? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sun, 06/23/2019 - 17:42 नवीन
म्हणूनच आधी श्री. अरविंद सुब्रमण्यन यांच्या पेपरची लिंक दिली होती; पण ती तुम्ही सोयीस्कररित्या दुर्लक्षिलीत. शिवाय करसंकलनात १ लाख साठ हजार कोटींचा तुटवडा, दुचाकी-चारचाकीच काय अगदी साबणाच्या विक्रीतही घट इत्यादी अर्थव्यवस्थेच्या दुर्दशेच्या बातम्या तुम्ही वाचल्या तरी असतील की नाही ही शंकाच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रिझर्व बँकेचे काम मॉनेटरी पॉलिसीचे आहे व सरकारचे काम फिस्कल पॉलिसीचे आहे. सरकारला रिझर्व बँकेकडून पैसे घ्यावे लागणे याचा अर्थ फिस्कल टारगेट सरकारला राखता येणार नाहीय असा होतो. परंतु, काहीही डेटा वेळच्यावेळी बाहेर पडू न देता आधी अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचे भासवले व आता रिझर्बँकेकडून पैसे घ्यायची वेळ आली हे चांगले लक्षण नाही. इथल्या तज्ज्ञ मंडळींना काही वाटत नसले तरी गुंतवणूकदार खुळे नसतात. बाकी घटनात्मकदृष्ट्या ते चूक आहे असं मी म्हटलेलंच नाही त्यामुळे खाली काहींनी नियम वगैरे डकवून ठेवलेत त्यांना माझा मुद्दा डोक्यात शिरला नाही असे वाटतेय. असो. बाकी भंडारा तर घातलेलाच आहे; त्याचे इथे समर्थन करणारे तरी त्याचे लाभार्थी असाल अशी आशा!
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Mon, 06/24/2019 - 00:02 नवीन
तुम्ही दिलेल्या लिंक्स मधल्या बातम्या तुम्ही स्वतःच नीट वाचत नाही का? त्यात लिहिलंय - Former chief economic adviser Arvind Subramanian, who has been caught in a storm since he said India’s GDP growth between 2011-12 and 2016-17 may have been over-estimated, had recommended the transfer of a larger chunk of the RBI’s excess capital to the government. “There is no particular reason why this extra capital should be kept with the RBI. Even at current levels, the RBI is already exceptionally highly capitalised,” the Economic Survey for FY17 said, adding that the amount could be redirected towards recapitalising the cash-starved public sector banks. He also noted that the RBI was one of the most highly-capitalised central banks in the world. इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल तर मराठीत सांगतो - रिझर्व्ह बँकेकडे जमा असलेला अतिरिक्त पैसा भांडवलाची कमतरता असणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना द्यायला हरकत नाही. आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची अशी परिस्थिती का आणि कशी झाली? तर ममोसिंगांच्या काळात अनिर्बंध कर्जे वाटली गेली. हे मी नाही तर पुरोगाम्यांचे लाडके माजी आणि एकमेवाद्वितीय आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले आहेत. इथे आणि इथे वाचा. तुमची अपेक्षा काय आहे? की आरबीआयकडे असलेले अतिरिक्त पैसे तसेच ठेऊन द्यावे आणि मोदींनी कसेही करून जगातले एक नंबरचे अर्थतज्ज्ञ असणाऱ्या ममोसिंगांनी केलेली घाण निस्तरावी? वर १२ वर्षे लांबणीवर पडलेलं राफेल डील करावं, सैन्याला आवश्यक असणारी शस्त्रास्त्रे घ्यावीत, बुलेटप्रूफ जॅकेट्स घ्यावीत, नदी जोड प्रकल्प करावा, नवीन रस्ते बांधावे, रेल्वे सुधारावी आणि हे सगळं करताना टॅक्स मात्र कमी करावा. तुम्हाला मोदी आवडत नाहीत हे ठीक आहे, तो तुमचा चॉईस आहे. पण निदान स्वतःच ज्या लिंक देत आहात त्यातील बातम्या तरी नीट वाचा आणि विश्लेषण तटस्थ राहून करा. साबणाच्या विक्रीत घट झाली? लोकांनी अंघोळ करायचं बंद केलं का? का साबणाशिवाय अंघोळ करतात? नुसता मथळा वाचून किंवा जो डेटा मिळतोय त्याचे नीट विश्लेषण न करता निष्कर्ष काढले की असे विचित्र समज होतात. ही बातमी नीट लक्ष देऊन वाचा. बाकी भंडारा तर घातलेलाच आहे, तुम्ही येऊन प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 06/24/2019 - 03:00 नवीन
नमस्कार ट्रेडमार्कसाहेब! अरविंद सुब्रमण्यन यांचे म्हणणे तुम्ही ठळक करून दाखवलेत त्याबद्दल आभार! याचा अर्थ तुम्हाला अरविंद सुब्रमण्यन यांचे विश्लेषण व निष्कर्ष मान्य आहेत तर! म्हणजे युपीए व मोदी सरकार दोघांनीही जीडीपीचा चुकीचा डेटा काढला हे मान्य झाले हे बरे झाले. युपीए व मोदीसरकारमध्ये या बाबतीत काहीच फरक नाही; पण आपल्यासारखे लोक मात्र टिमक्या वाजवत होते. ते एक असो. रिझर्व बॅंकेचा पैसा सरकारने वापरणे हे धोरण म्हणून काहीच वाईट नाही. उदाहारणार्थ अमेरिकेत फेडरल रिझर्वचा सरप्लस ठराविक मर्यादेच्या वर गेला की अतिरिक्त पैसा सरकारकडे देण्याचे धोरण आहे आणि प्रेसिडेंट कोणीही असला तरी ते पाळले जाते. आपल्याकडे असे धोरण आणले जात असेल तर जाहीरनाम्यात वगैरे काही उल्लेख मलातरी दिसला नाही. आपल्याला दिसला असल्यास निदर्शनास आणून द्यावे. एनपीए बद्दलही आपली माहिती व ज्ञान किंचित तुटपुंजे आहे असे वाटते. २००७-०८ मध्ये युपीएच्या काळात लोन्स दिली व ती पुढे एनपीए झाली ह्यात वाद नाही. पण लोन दिल्या-दिल्या ते एनपीए होत नाही. कंपनीला पुढे मंदीचा सामना करावा लागल्यास परतफेड करणे कठिण जाते व मग ते लोन बँकेला एनपीएत टाकावे लागते. ह्यावरुन मोदी सरकारच्या काळात मंदी सहन करावी लागली असे दिसते. शिवाय एनपीए झालेली सगळीच लोन्स युपीएच्या काळात दिलेली नाहीत. थोडक्यात इतक्या दिवस मारलेल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबतच्या बढाया निव्वळ फेका होत्या हे सिद्ध होते. इथून पुढे भंडारा घातला जाईल व त्याचा लाभ लाभार्थींना होईलच. आम्हाला मात्र सरकारी भंडार्‍याचा उपयोग नाही. आपणच त्याचा लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद व इत्यलम्.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Mon, 06/24/2019 - 04:55 नवीन
तुम्ही किती सोयीस्कर निष्कर्ष काढता. तुम्हाला हे मान्य असेलच की तुम्ही स्वतःच दिलेल्या बातम्या नीट वाचत नाही. असो. याचा अर्थ तुम्हाला अरविंद सुब्रमण्यन यांचे विश्लेषण व निष्कर्ष मान्य आहेत तर! मी फक्त तुम्हीच दिलेल्या लिंक मधील बातमीत काय आहे ते दाखवून दिलं. तुम्ही काढलेला निष्कर्ष कसा चुकीचा आहे हे दाखवण्याचा उद्देश होता. युपीए व मोदीसरकारमध्ये या बाबतीत काहीच फरक नाही; पण आपल्यासारखे लोक मात्र टिमक्या वाजवत होते. बराच फरक आहे, पण तो तुम्हाला सांगूनही उपयोग नाही कारण समजणारच नाही. बाकी मी कधीच कोणासाठी टिमक्या वाजवल्या नाही आणि वाजवत नाही. आपल्याकडे असे धोरण आणले जात असेल तर जाहीरनाम्यात वगैरे काही उल्लेख मलातरी दिसला नाही. जाहीरनाम्यात असेल तरच फक्त करावे असा काही नियम आहे का? असल्यास दाखवून द्यावे. युपीएने आम्ही घोटाळे करू असे जाहीरनाम्यात लिहिले होते का? एनपीए बद्दलही आपली माहिती व ज्ञान किंचित तुटपुंजे आहे असे वाटते. तुम्ही फारच विनोदी आहात बुवा. मी बँकिंग मध्ये जवळपास २ दशके काम केले आहे, तरी तुम्हाला वाटत असेल माझे ज्ञान तुटपुंजे आहे तर आम्हाला ज्ञानी करून सोडा की. २००८ साली मंदी आली होती, नंतर मंदी आली का? कुठे आणि कुठल्या क्षेत्रात आली? ह्यावरुन मोदी सरकारच्या काळात मंदी सहन करावी लागली असे दिसते. एनपीए करण्याची संपूर्ण प्रक्रिया इथेच विशद करून सांगा बघू. लोन दिल्यापासून एनपीए कधी होते, ते एनपीए करण्यासाठी काय क्रायटेरिया आहे हे सांगा. एनपीए झाल्यावर काय होते हे सांगा. शिवाय एनपीए झालेली सगळीच लोन्स युपीएच्या काळात दिलेली नाहीत. आता तुमचा रघुराम राजन यांच्यावरही विश्वास उरला नाही. आता कोणावर विश्वास ठेवणार बरं? ध्रुव राठी, विनोद दुवा, रागा का अजून कोणी आहेत?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 06/24/2019 - 05:57 नवीन
मोदी द्वेषाचा चष्मा घातला कित्यांच्या सरकारने केलेली कोणतीही गोष्ट चूकच दिसू लागते आणि आपल्याला पाहिजे तसेच आणि तेवढेच दिसू लागते याचे हे उदाहरण आहे
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 06/24/2019 - 08:20 नवीन
आमचे सरकार हे आत्ताचे सरकार आहे. आणि प्रत्येक सरकारच्या धोरणांवर टीका करणे हे आम्ही आमचे एक नागरिक म्हणून कर्तव्य समजतो. चष्मा कोणी घातला आहे ते आपण उघड केल्याबद्दल धन्यवाद! आपल्याला जी स्वप्ने पडत आहेत गतवैभवाची ते काही खरोखर वैभव नव्हते व ते परत येणार नाही इतके आपल्याला समजले तर बरे होईल आपल्यासाठी.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 06/24/2019 - 08:16 नवीन
क्षमस्व आपले ज्ञान वाढवण्याची जबाबदारी आमची नव्हे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 06/24/2019 - 08:27 नवीन
एकांगी प्रतिसाद देताना तुमचा आकस आणि द्वेष दिसून येतो आहे. सरकारवर टीका करण्याचा कुणालाही अधिकार आहे. पण तो "संपूर्ण" सत्य स्थितीवर अवलंबून असावा एवढीच अपेक्षा असते. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 06/24/2019 - 08:52 नवीन
श्री. पटेल यांच्याप्रमाणेच श्री. विरल आचार्य यांनीही कार्यकाल संपायच्या सहा महिने आधीच राजीनामा दिल्याचे वृत्त आजच प्रसिद्ध झाले आहे. रिझर्व बँकेसारख्या आधुनिक लोकशाही संस्थांबद्दल आस्था असलेल्या कोणत्याही सजग नागरिकाला काळजी वाटणे स्वाभाविक आहे. रिझर्व बँक, अर्थ सल्लागार पद, राष्ट्रीय सांख्यिकी संस्था यातून लोक धडाधड राजिनामे देत असतील तर प्रश्न मनात यायलाच हवेत. आपल्याला कसली काळजी आहे आणि कोणत्या संपूर्ण सत्याची आपण वाट पाहात आहात हे आपणासच माहित.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 06/24/2019 - 09:34 नवीन
रिझर्व्ह बँकेच्या गंगाजळीला सरकारने हात लावू नये असे वाटत असणारे तेथील अर्थतज्ज्ञ राजीनामे देत आहेत. ज्यावेळेस स्वायत्त संस्था आणि सरकारचे जमत नाही तेंव्हा असे परंपरावादी लोक धोरण जमत नसल्यामुळे राजीनामे देतात. सरकारी खात्यात अशा गोष्टी होत राहतात. भारताची आर्थिक शिक्षणाची बाजू भक्कम आहे त्यामुळे त्यांच्या जागी नव्या दमाचे लोक येतीलच. राष्ट्र कुणासाठी थांबत नसतं.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Wed, 06/26/2019 - 02:52 नवीन
तुम्ही नीट पूर्ण वाचत नाही हे परत सिद्ध केलंत. मी बँकिंगमध्ये २० वर्षे आहे हे मी आधीच सांगितलं आहे. मला तुमच्याकडून शिकण्याची काहीच आवश्यकता नाही. पण तुम्हाला माहित नाहीये म्हणून असे प्रतिसाद येत आहेत का? मी सांगितलेल्या एकही मुद्द्यावर आपण प्रतिवाद केला नाही. तुमचा प्रतिवाद काय तर "नागरिक म्हणून सरकारच्या धोरणांवर टीका करणे हा आमचा हक्क आहे" हे सांगणे आणि माझे ज्ञान वाढवणे ही तुमची जबाबदारी नाही हे सांगणे. तुमचा टीका करायचा हक्क कोणीच हिरावून घेत नाहीये, पण टीका करायचीच आहे म्हणून वस्तुस्थिती बघायचीच नाही हे चुकीचे आहे. काही प्रश्न आहेत, तुम्ही तुमच्या हुशारीने उत्तर द्याल अशी अपेक्षा करतो. १. सार्वजनिक ब्यांकांच्या वाईट परिस्थितीला युपीए सरकार जबाबदार आहे या रघुराम राजन यांच्या विधानावर तुम्हाला आक्षेप आहे का? २. ब्यांकांची परिस्थिती वाईट आहे, त्या ब्यांका डुबल्या तरी चालेल पण आरबीआय कडे पडून असलेले पैसे वापरायचे नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? ३. उद्या या ब्यांका जर डुबल्या तर सामान्य लोकांचे ब्यांकांमध्ये ठेवलेले पैसे परत नाही मिळाले तरी चालणार आहे का? ४. या ब्यांका डुबल्यावर लोकांनी इतर ब्यांकांवर विश्वास न ठेवता पैसे काढून घ्यायला सुरुवात केली तर काय परिस्थिती होईल याची तुम्हाला कल्पना आहे का? ५. आरबीआय हे पैसे स्वतःकडे ठेऊन काय साध्य करणार आहे असं तुम्हाला वाटतं? ६. आरबीआय त्यांचे वार्षिक नफा नुकसान पत्र (profit & loss statement) तयार करते का? ते कधी जाहीर केले आहे का? ७. तुम्हाला आरबीआय बद्दल नक्की कसली काळजी वाटत आहे? ८. या गंगाजळीतला हिस्सा जर सरकारला किंवा आरबीआय सांभाळत असलेल्याच ब्यांकांना गरज असताना दिला तर काय वाईट परिणाम होणार आहे असं तुम्हाला वाटतं? ९. या रोखीची चणचण असलेल्या या सार्वजनिक क्षेत्रातल्या ब्यांका वाचवण्यासाठी तुमच्याकडे दुसरा कुठला उपाय आहे का? किंवा ज्या लोकांनी राजीनामा दिला म्हणून तुम्हाला वाईट वाटत आहे त्यांनी तरी कुठला उपाय सांगितलं आहे का?
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे गुरुवार, 06/20/2019 - 10:28 नवीन
How does RBI builds its reserves? The reserves with the RBI accumulate due to several factors. First is its income from three sources: interest on government bonds held for conducting open market operations; fees from government's market borrowing programme; and income from investment in foreign currency assets. Second source is earnings retained after giving dividends to government. Third source is revaluation of foreign assets and gold. Why does a central bank need capital? There are five main reasons for a central bank to hold capital. First, central banks that have foreign assets need capital to absorb potential losses. The RBI's foreign assets are worth Rs 26.4 lakh crore, up from 23.7 lakh crore in FY17. Second, the RBI needs capital to shield the economy from monetary and financial shocks. Third, in case of unstable governments, monetary authorities carry a bigger burden. A Central bank would need more capital in such a situation. Fourth, a central bank needs reserves to perform functions such as price and exchange stability. Fifth, reserves give independence to a central bank. Low capital will force central bank to turn to government in time of need. This will give government influence over the central bank. विकासकामांसाठी सरकारला निधी अपुरा पडत असेल तर सरकारने हा राखीव निधी वापरायला हरकत नाही, परंतू हे पैसे बिनव्याजी कर्ज म्हणून घेणार की लाभांश स्वरूपात घेणार?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 06/20/2019 - 16:49 नवीन
यात रिझर्व्ह बँकेच्या उत्पन्नाचा स्रोत काय हे आलेले नाही. रिझर्व्ह बँक इतर बँकांना पैसे पुरवते त्यावर व्याज आकारते. पैसा छापण्यासाठी / पुरवण्यासाठी असलेला जनादेश (mandate) हा रिझर्व्ह बँकेचा नाही तर सरकारचा आहे. रिझर्व्ह बँक हि सरकारचा एक विभाग आहे, सरकारची मालक नाही. येथे काही लोक सरकार रिझर्व्ह बँकेवर दरोडा मारत आहे अशा थाटात लिहीत आहेत The governor of RBI is not superior to finance minister. If FM insists, I don't see that the governor can refuse, unless he's willing to give up his job.”डॉ मनमोहन सिंह यांनीच आपल्या पुस्तकात लिहिलेले आहे. https://www.dnaindia.com/india/report-rbi-governor-not-superior-to-finance-minister-former-pm-manmohan-singh-in-2014-book-2683667
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प गुरुवार, 06/20/2019 - 12:19 नवीन
http://nbt.in/Ior5mb?baa NBT: शांततावादी समाज की ममता बनर्जी से अपील- अपराध में शामिल हमारे समुदाय के लोगों पर लें ऐक्शन http://nbt.in/Ior5mb?baa via @NavbharatTimes: http://app.nbt.in आता सत्य बाहेर आले कोलकत्ता च्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टरानां मारहाण प्रकरणात शांतता वादी होते . इतक्या दिवस कुठल्याही मीडिया किंवा ममताने त्यांचा धर्म सांगितला नव्हता . आणि ममता शांतीवादी लोकांची पाठराखण करून डॉक्टरनां धमक्या देत होती
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 06/20/2019 - 17:27 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 06/20/2019 - 18:15 नवीन
बर्याच केसेस मध्ये अडकलेले IPS संजीव भट्टला आज कोर्टाने आजिवन कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे . संशयित आरोपीचा पोलिस तुरुंगात अंत झाल्याच्या आरोपावर कस्टोडीयल डेथ कोर्टाने हा निर्णय सुनावलेला आहे ! पुर्वी नांबी नारायणन नावाच्या श्रेष्ठ शास्त्रज्ञाला खोट्या केसमध्ये अडकवुन आयुष्यातुन उठवण्याच काम ह्याच अधिकार्याने केले होते !! हल्लीच नांबी नारायण ह्यांना कोर्टाने निर्दोष सोडले !! ह्याच संजीव भट्टने ईशरत जहान केस मध्ये खोटी साक्ष दिली होती !!
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 06/20/2019 - 18:21 नवीन
गोधरामध्ये पण साक्ष द्यायला हाच होता ना?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 06/21/2019 - 03:26 नवीन
नांबी नारायण यांना आर बी श्रीकुमार यांनी अडकवले. संजीव भट्ट यांनी नव्हे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 06/21/2019 - 03:31 नवीन
संरक्षण क्षेत्रात गुंतवणुकीसाठी उदार धोरण अवलंबल्यानंतर भारताच्या संरक्षण क्षेत्रातील निर्यातीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. (सर्व आकडे कोटी रुपयांत) भारताची संरक्षण निर्यात २०१८-१९ १०,७४५ २०१७-१८ ४,६८२ २०१६-१७ १५२१ २०१५-१६ २०५९ २०१४-१५ १९४० निर्यातीचे स्वरूप छोटी शस्त्रे ५००० एव्हिऑनिक्स २५०० इलेक्ट्रॉनिक सिस्टीम १४०० इतर १८४५
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू Sat, 06/22/2019 - 09:29 नवीन
कंडोम कंपन्यांकडून सरकारला कोट्यवधींचा चुना चारा, कोळसा, 2 जी असे अनेक घोटाळे आजवर उघडकीस आले. अशाच घोटाळ्यांमध्ये आता २०१० ते २०१४ च्या काळातील अजून एक नवा ‘कंडोम’ घोटाळा उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे त्यात एचएलएल लाईफकेअर आणि टीटीके प्रोटेक्टिव डिव्हायसेस लिमिटेड या दोन सरकारी कंपन्याही सामील होत्या. जय मौनमोहन सिंग !!! UPA ने आणखीन किती क्षेत्रात भ्रष्टाचार केला होता हे पाहणे नजीकच्या भविष्यकाळात रोचक ठरेल. लोकसत्ताने बातमीमध्ये घोटाळ्याच्या कालावधीचा उल्लेख केलाय पण UPA चा उल्लेख मात्र जाणीवपूर्वक टाळलाय.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 06/24/2019 - 13:48 नवीन
नगरीनिरंजन,
म्हणूनच आधी श्री. अरविंद सुब्रमण्यन यांच्या पेपरची लिंक दिली होती; पण ती तुम्ही सोयीस्कररित्या दुर्लक्षिलीत. शिवाय करसंकलनात १ लाख साठ हजार कोटींचा तुटवडा, दुचाकी-चारचाकीच काय अगदी साबणाच्या विक्रीतही घट इत्यादी अर्थव्यवस्थेच्या दुर्दशेच्या बातम्या तुम्ही वाचल्या तरी असतील की नाही ही शंकाच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रिझर्व बँकेचे काम मॉनेटरी पॉलिसीचे आहे व सरकारचे काम फिस्कल पॉलिसीचे आहे. सरकारला रिझर्व बँकेकडून पैसे घ्यावे लागणे याचा अर्थ फिस्कल टारगेट सरकारला राखता येणार नाहीय असा होतो.
काहीतरी गडबड होतेय का? तुम्ही उल्लेखलेल्या लेखात फिस्कल टारगेट राखता आलं नाही असं म्हंटलंय. पण त्यासाठी सरकारला दोष दिलेला नाहीये. उलट मी म्हणतो की मोदींनी पैशाची गळती थांबवल्याने राखीव पेढीकडे इतका पैसा जमला आहे. एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा जमल्याची बातमी कधी कोणी ऐकली नव्हती यापूर्वी. याचा अर्थ माझ्या मते मोदी योग्य दिशेने चाललेत. ज्याप्रमाणे राखीव पेढीकडे इतका पैसा जमला त्याच प्रकारे सरकारकडेही जमेल. राखीव पेढीची गळती थांबवायला धोरणात्मक कायदे पुरेसे होते, व ती तुलनेने चटकन थांबली. मात्र करसंकलन त्रुटी भरून काढायला प्रशासकीय बदलांचीही जरुरी आहे. त्यासाठी वेळ लागतो. तितका वेळ मोदींना द्यावा असं माझं मत आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 06/24/2019 - 14:25 नवीन
Your next passport may have chip inside नजिकच्या भविष्यककाळात भाररतिय पारपत्रामध्ये संगणक चिप् सुरक्षाप्रणाली बसविली जाईल. याचबरोबर, परराष्ट्र आणि संचार मंत्रालयांमधील सहकार्याने, जेथे सद्या पारपत्रसेवा नाही अश्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक "पोस्ट ऑफिस पारपत्र सेवा केंद्र (Post Office Passport Seva Kendra उर्फ POPSK) स्थापन करण्याची मोहीम चालू आहे. त्यापकी ४१२ केंद्रे आजतागायत कार्यरत झालेली आहेत. या दोन सेवांच्या संयोगाने नागरिकांची सोय आणि सुरक्षा यांचा संयोग असलेली व्यवस्था होईल.
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू Mon, 06/24/2019 - 17:44 नवीन
long-awaited
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 06/24/2019 - 14:28 नवीन
वरती पाण्याची उपलब्धता आणि होणारा वापर ह्या विषयावर काही सदस्यांनी विचार मांडले आहेत . त्यात शहरी लोक जास्त पाण्याचा वापर करतात ,टॉयलेट chya फ्लॅश मुळे खूप सारे पाणी वाया जाते,किंवा गाड्या धूने, नळ बंद न करणे इत्यादी कारणे आहेत , आणि ग्रामीण भागात उसा सारख्या पिकाला जास्त पाणी लागत हा आक्षेप आहे. मुळात शहर आणि ग्रामीण भाग असा भेदभाव करणेच चुकीचं आहे .दोन्ही क्षेत्र एकमेकावर अवलंबून आहेत .शहरात राहणारी लोक ही खेडे गावातूनच विस्थापित झालेली लोक आहेत . आणि विस्थपण हाच देशा समोरचा ज्वलंत प्रश्न आहे . गावातून तालुक्यात,तालुक्यातून जिल्ह्यात आणि पुढे असे विस्थापण होत आहे . त्याचे कारण लोकांच्या प्राथमिक गरजा भागात नाहीत त्या मुळे ते शहरात येत आहेत ,त्या मुळे शहर आणि गाव दोघांचे ही आरोग्य बिघडत आहे. शेती किंवा शेती आधारित अर्थ व्यवस्था ग्रामीण भागात मजबुत होणे गरजेच आहे . त्यासाठी पाणी ही मूळ गरज आहे . आपल्या कडे पावूस योग्य पडतो फक्त आपण नियोजन करण्यात कमी पडत आहे . शेती साठी ठिबक सिंचन,किंवा तुषार सिंचन वापरल्या मुळे पाणी वाचवत येईल ,पण ही सुविधा शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या परवडली पाहिजे आणि त्या साठी सरकारनी सहाय्य केले पाहिजे. शेती आधारित उद्योग उभे राहिले पाहिजेत आणि त्यात सुधा सुरवातीला सरकारचा सहभाग गरजेचं आहे . ऊस हे पीक का घेतले जाते त्याच एकच कारण आहे बाकी पीक उत्पादन खर्च सुधा देवू शकत नाहीत .नेमक्या मार्केटिंग मध्ये त्रुटी काय आहेत ह्याचा अभ्यास करून उपाय योजना केल्या तर प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल . ग्रामीण भागात च लोकांच्या गरजा भागल्या तर ते शहराकडे विस्थापित होणार नाहीत . आणि प्रचंड गर्दी,प्रदूषण, गुनेहगारी ह्या पासून शहरांना सुद्धा मुक्ती मिळेल. शहराचे हवामान स्वच्छ राहण्यासाठी मोकळ्या प्रदेशाची गरज असते ती गरज खेडे गाव पूर्ण करतात .मोकळ्या जागेत विशाल वृक्ष रोपण तातडीने करणे गरजेचं आहे. पाणी जमिनीत जिरवणे खूप गरजेचं आहे त्या साठी प्रयत्न चालू आहेत पण ह्यात लोकांचा सहभाग वाढला पाहिजे . प्रधमिक गरजा भागवण्यासाठी गावातून शहरात आणि शहरातून विदेशात जाणे हे काही भूषण निय नाही .
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 06/24/2019 - 15:08 नवीन
तुमच्या प्रतिसादात, नेहमीचाच, वरवरचा आणि एकेरी सूर आहे. तो काढताना, हे नेहमीच (बर्‍याचदा सोईस्करपणे) विसरले जाते की... १. सर्व प्रकारची शेतीची उत्पादने निर्माण करणे आवश्यक आहेच, पण... २. प्रत्येक उत्पन्न कोठे असावे याबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी, त्यासाठी लागणार्‍या पाण्याच्या कमी-जास्त उपलब्धतेचा विचार करणे, अत्यावश्यक आहे... सर्वांना योग्य प्रमाणात पिण्याचे पाणी मिळणे हा विचार सर्वात महत्वाचा, त्यानंतर उरलेले पाणी जीवनावश्यक शेतीसाठी आणि नंतर नगदी पिके घेण्याइतपत पाणी उरत असेल तेथेच भरपूर पाणी जरूर असलेली नगदी पिके घेणे योग्य असेल. दुष्काळी भागात भरपूर पाणी लागणारी नगदी पिके घेण्याने होणारे दुष्परिणाम आपण पाहत आलो आहोच... काही थोड्या लोकांच्या फायद्याकडे पाहत नगदी पिकांसाठी पाणी वापरणे, आणि त्यामुळे लहान शेतकरी व सर्वसामान्य जनता पाण्याविना तडफडणे ठेवणे, कितपत योग्य आहे?! आणि तसे होते तेव्हा, शहरी जनतेला सज्जड दूषणे देणार्‍यांपकी किती जण तेथिल सधन शेतकरी व राजकारणी लोकांच्या या स्वार्थी कृतीबद्दल ब्र देखील काढताना दिसतात?... आत्ताच या धाग्याच्या प्रतिसादात हा विरोधाभास सहजपणे पाहता येईल. हितसंबंध राखण्यासाठी पाण्याच्या सर्वंकष नियोजनाकडे दुर्लक्ष करणे (पक्षी : दुष्काळी भागात भरपूर पाणी लागणारी नगदी पिके घेण्याचे न थांबवणे आणि मुद्दा भरकटवण्यासाठी केवळ पाणी संवर्धनाची भलावण करणे किंवा शहरी लोकांना दुषणे देत गोलपोस्ट बदलणे) म्हणजे, टाकीला लागलेली मोठी गळती बंद करण्याकडे हेतुपुरर्सर दुर्लक्ष करून वरून चमचा-चमचा पाणी टाकून ती टाकी भरण्याचा देखावा करण्यासारखे आहे, हे सांगायलाच हवे काय ?
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू Mon, 06/24/2019 - 17:53 नवीन
Rajesh188 खास तुमच्या साठी... स्वयंपूर्ण खेडी
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 06/25/2019 - 09:07 नवीन
स्वयंपूर्ण खेडी नाही तर स्वयंपूर्ण देश होणे गरजेचं आहे . म्हणजे सर्वांचा समान विकास झाला पाहिजे . शहर केंद्रित विकास देशात बरेच जटिल प्रश्न निर्माण करत आहे . जिथे राहतो तिथे रोजगार निर्मिती झाली तरच देशाचा चौफेर विकास होईल . जगात सुद्धा शहर केंद्रित विकासा मुळे प्रश्न निर्माण झाले असतील .त्याचा अभ्यास होणे गरजेच आहे . न्यूयॉर्क किंवा Washington म्हणजे अमेरिका नक्कीच नाही ग्रामीण अमेरिकन लोक कशा परिस्थिती मध्ये राहत आहेत ह्याची सुद्धा माहिती आपल्याला हवी .आणि ती माहिती सहज नेटवर सुद्धा उपलब्ध नाही . त्यांचा अभ्यास करून आपल्या ला आपली धोरण ठरवता येतील . पुढच्यास ठेच मागचा शहाणा ह्या म्हणी प्रमाणे
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 06/25/2019 - 13:46 नवीन
नगरीनिरंजन,
रिझर्व बँकेसारख्या आधुनिक लोकशाही संस्थांबद्दल आस्था असलेल्या कोणत्याही सजग नागरिकाला काळजी वाटणे स्वाभाविक आहे.
राखीव पेढीचा म्हणजे रिझर्व्ह बँकेचा लोकशाहीशी कसलाही संबंध नाही. ही घटनेत नमूद केलेली (उदा. : न्यायालय, महालेखापाल) यांच्यासारखी एक स्वायत्त शासकीय संस्था आहे. मात्र हिच्या कारभारात शासन व/वा लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करू शकंत नाहीत. अगदी असाच प्रकार न्यायालयाच्या बाबतीतही आढळून येतो. न्यायालयाच्या कारभारात कोणीही लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करू शकंत नाही. राखीव पेढीचा लोकशाहीशी संबंध नसला तरी तुमचा 'शासन व राखीव पेढीत मतभेद का होताहेत' हा प्रश्न रास्त आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा