चालू घडामोडी : जून २०१९
जागतिक बँकेने (World Bank) पुढच्या २०१९-२० या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ७.५% दराने वाढेल असा अंदाज वर्तवलेला आहे
हा अंदाज जागतिक बँकेच्या "जागतिक आर्थिक संभावना (Global Economic Prospects) या अहवालात वर्तवलेला आहे. भारताची गेल्या आर्थिक वर्षातील (२०१८-१९) वाढ ७.२% होती.
संघातील मंडळीनी नैसर्गिक संकटा मध्ये जात धर्म न पाहता सामान्य जनतेस खुप वेळा मदती चा हात दिला हे सर्वानां माहित आहे , पण अशा प्रकारे निर्व्याज मनाने जनसेवा करणारी संघटना काँग्रेस व राष्ट्रवादी मध्ये नाहीअर्धा भाग अगदी परफेक्ट, पूर असो की भुकंप, अवर्षण असो की अतिवर्षा, युध्द असो की दंगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सामान्य जनतेस अनेकदा मदतीचा हात दिला आहे आणि त्या मदतीतील शिस्त, निर्व्याजपणा, अचुकता आणि सेवाभाव निष्चितच वाखाणण्याजोगा आहे आणि वेळोवेळी त्याचे कौतुक होत आलेले आहे. मुलतः भारतीय मानसिकता अशा संकटाच्या वेळी भांबावुन जाण्याची जास्त आहे. आपत्ती व्यवस्थापन हा विषयच मुळी आजकाल गंभीरपणे घेतला जातोय. पूर्वीपासून एखादी दुर्घटना घडली की सैरावैरा पळणे, कशाचा पायपोस कशात नसणे, कुणी मदत जरी केली तरी ती अव्यवस्थितपणे, बेशिस्त, असमान पध्दतीने वाटली जाणे, वैद्यकीय मदत ही विस्कळीत स्वरुपाची असणे अशाच पध्दतीने हाताळली जाई. सिस्टिमॅटिकली मदत करण्यात प्रथम क्रमांक जाई सैन्यदलाला. कडवी शिस्त, प्लानिंग करुन हुकुमानुसार सर्व अनुयायांनी आचरण करणे, परिस्थितीची, सुखसोयीची तमा न बाळगता युध्दपातळीवर मदत करणे आणि बरीचशी साधने(डॉक्टर्स, यंत्रसामग्री, दळणवळण, पैसा) हाताशी असलेने सैन्यदल अशा परिस्थितीत कायमच प्रभावी ठरलेले आहे. सैन्याच्या ह्या काही गुणांचा समावेश संघाच्या मदतकार्यातदेखील आहे. त्याबद्दल स्वयंसेवकांचे कौतुक करावेच लागेल पण ह्या कार्यापाठीमागे बर्याच गोष्टी असतात. संघाचे शहरी उच्च्शिक्षित भागात असलेल्या कार्यामुळे डॉक्टर्स वगैरे लोकांचा समावेश अशा मदतकार्यात नेहमीच राहिला आहे. सोबतच बर्याच संघविचारांच्या कार्य्कर्त्यांचे समाजात असलेले निरपेक्ष कार्यकर्ता म्हणून असलेले वजन उपयोगी पडलेले आहे. हे लोक अपहार करणार नाहीत ह्याची खात्री असलेने समाजाने पण वेळोवेळी संघाच्या पाठिमागे मदतीचा हात ठेवलेला आहे. बर्याच गावी संघविचाराने स्थापन केलेल्या ब्लड बँका, रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, पतसंस्था, बँका आदि संस्था अशा वेळी पूर्ण ताकदीने उभ्या राहिलेल्या आहेत. ह्याउलट इतर पक्षांची स्थिती आहे. संघातून जसा भाजपाचा जन्म आहे आणि संघाचा कार्याचा वारसा आहे तसा इतर पक्षांचा नाहिये. त्यामुळे संघ करतो आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेस करत नाही अशी तुलनाच चुकीची आहे. काँग्रेस म्हणा कि इतर पक्ष म्हणा त्यांचे कार्यकर्त्यांचे स्वरुप निराळे आहे. त्यांची मदतीची आणि ती शिस्तबध्दपणे करण्याची पध्दत नाहीच आहे. तशी तुलनाच करायची असेल तर आजच्या भाजपाची आणि काँग्रेसची मदतीची करावी. म्हनजेच राजकीय पक्षाची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची करावी. दुर्घटनेतच नव्हे तर इतर बर्याच ठिकाणी म्हणजे देवस्थाने, सण समारंभ, गर्दीचि ठिकाने, समाजातील काही छोट्यामोठ्या गोष्टी अशात मदत सर्वच पक्षाचे कार्यकर्ते करत असतात पण ते एक्जिनसी संघटनेची मदत ह्या स्वरुपात दिसत नसते. कित्येक सामाजिक कार्यकर्ते मग बाबा आमटे असोत की डॉ बंग दंपती असोत, राजकीय अजेंडा न ठेवता राबत असतात, शिवसेनेसारखे पक्ष आनि त्यांचे शिवसैनिक कित्येक दुर्घटनामध्ये, अपघातांमध्ये स्वतःच्या खिशाला खार लावून नागरिकांना मदत करतात अशी कित्येक उदाहरणे आहेत. घरगुती किंवा लोकल आणिबाणीच्या प्रसंगीही ते सगळ्यात आधी धावत येतात. अशा दुर्घटनामध्ये त्यांनीही प्रचंड मदत निरपेक्ष स्वरुपात केलेली असते. शिरडी, तिरुपतीसारखी कित्येक श्रीमंत देवस्थाने, निरंकार बाबा, ब्रह्माकुमारी, पुट्टपर्ती साईबाबासारखी विवाद्य संतस्थानेही अशा वेळी प्रचंड मोठ्या स्वरुपात मदत उभी करतात. अगदी किल्लारी भुकंपातदेखील जिथे संघाचे कौतुक झाले तिथेच सेवादलानेही भरपूर काम केले. एक्सप्रेस ग्रुपला बांधून घेउन भुकंपात आईवडील गमावलेल्या मुलांसाठी खूप मोठी निवासी शाळा आपले घर ह्या नावाने चालु केली. ती अजुनही चालु आहे. टाटा सोशल सायन्सचे काम त्या काळात उभे राहिले. लॉरी बेकरसारखे अभियंता आणि स्थापत्यविषारदांच्या शिष्यमंडळींनी भुकंपरोधक घरे बांधायला मदत केली. परदेशातून मदत मिळवायला शरद पवारांनीही भरपूर प्रयत्न केले, समाजाच्या सर्व थरात मदत करायची भावना असतेच. फक्त पध्दत वेगवेगळी असते. राजकारणी पक्षांनी किती आणि कशी मदत केली हा चर्चेचा किंवा हिणवण्याचा विषय होऊन नये असे वाटते. तेथील लोकप्रतिनिधींनी अवश्य काम केलेच पाहिजे पण कुणा पक्षांने ते काम केलेच नाही असे कधीच नसते. मदतीच्या कार्यात सर्वच पक्षाचे कार्यकर्ते, नागरिक, संस्था जे जीव तोडून मेहनत करतात ते कौतुकास्पद आहे पण त्या मदतीची अशी जाहिरात करुन किंवा मनानेच किस्से लिहुन त्याची किंमत कमी करु नका इतकी प्रार्थना. त्याचा कुणास हिणवण्यासाठी वापर करु नये असे मनापासून वाटते. धन्यवादसुप्रिम कोर्टाचे जज सुश्रि ईंदिरा बॅनर्जी ह्यांनी प्रतिक्षा शर्माला मु मं ममता बॅनर्जींचा बिनशर्त माफी मागायला लावली !-- - मी वर्तमान पत्रात वाचल्याप्रमाणे, सुरुवातीला कोर्टाने, प्रतिक्षा शर्मा यांना ममता बॅनर्जी यांची बिनशर्त माफी मागायला सांगितले होते. मात्र नंतर शर्मा यांच्या वकिलांने ' माफि मागणे हि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे' असा युक्तिवाद कोर्टासमोर केल्यानंतर, कोर्टाने प्रतिक्षा शर्मा यांनी माफी मागावी ही शिक्षा काढून टाकली होती."a larger number of [the] bad loans originated in the period [of] 2006-2008"
-- during the UPA years, that is. https://www.indiatoday.in/business/story/npas-public-sector-banks-rti-rbi-1343621-2018-09-19म्हणजे, एकंदरीत, स्वच्छ भारत योजनेची जोरदार अंमलबजावणी चालू आहे !!!