चालू घडामोडी : ऑक्टोबर २०१८
Companies pay up Rs 1.1 lakh crore for fear of insolvency action
कर्ज देणे व वसूल करणे यांच्या प्रशासनासंबंधीचे (इन्सॉल्व्हन्सी व बँकरप्सी) नवीन कायदे (उदा : Insolvency and Bankruptcy Code किंवा IBC) आणल्यामुळे पूर्वी चालढकल करत बुडित कर्जांच्या दिशेने वाटचाल करणार्या कर्जदारांवर वचक निर्माण झाल्याचे दिसत आहे. याचा परिणाम म्हणून, याअगोदर कर्ज फेडण्याबाबत चालढकल करणार्या कर्जदारांनी, आतापर्यंत सुमारे रु१.१ लाख कोटीचा भरणा बँकात केला आहे.
गेल्या आठवड्यात सरकारने, या वित्तवर्षांत, नाठाळ कर्जदारांकडून रु१.८ लाख कोटी वसूल करण्याचे लक्ष ठेवल्याचे जाहीर केले आहे.
कायद्याचे बळ व प्रशासकिय पाठींब्याचे (Insolvency and Bankruptcy Board of India किंवा IBBI; National Company Law Tribunal किंवा NCLT; इत्यादी) बळ व बारीक देखरेख आस्तित्वात आल्यामुळे, भविष्यात बँका आपले कर्ज वसूल करण्यात कसूर करण्याची आणि/किंवा कर्जदारांनी चलाखी करून कर्ज बुडवण्याची शक्यता फार कमी झाली आहे.
राफेल खरेदी व्यवहार करण्या अगोदर तो मिपावरील मोजक्या विचारवंत ज्येष्ठ मिपाकर यांचेकडून तपासणी करून प्रमाणित करून घेतला असताहे बाकी लाख टक्के खरे आहे. या गुस्ताखीबद्दल मोदींना पुढच्या सात जन्मी माफी मिळणे शक्य नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे !"हरवलेल्या फायली आहेत/मंत्रालय जळीतकांड मध्ये जळालेल्या फायली (उघडून बघण्यासाठी नाहीत.)"अश्या कल्पकतेचे कौतून होण्याचे दिवस गेले हो ! =)) =)) =)) हल्ली, "त्या गठ्ठ्यात अजून काही फायली टाकून त्यांना, (अ) तळघरात टाकू का ? की त्यापेक्षा उत्तम म्हणजे (आ) अजून एका आगीच्या नवीन अपघातात त्या नाहिश्या होतील अशी व्यवस्था करू का ?" अश्या प्रकारची "भूतपूर्व पापे पुण्यात कन्व्हर्ट करणार्या टेक्नॉलॉजीला" जादा भाव आहे.अनिल अंबानी च्या अनुभवशून्य कंपनी ला यात घेण्याचे कारण काय होते ?सरकार-ते-सरकार करारात कोणत्याही खाजगी कंपनीचे नाव येत नाही. असल्यास केवळ, ज्या कंपनीकडून वस्तू/सेवा विकत घेतली आहे तिला तिच्या किंमतीचा काही ठराविक भागाची ग्राहक देशात गुंतवणूक करावी अशी अट असते*. ती गुंतवणूक करताना, वस्तू/सेवा पुरवणार्या कंपनीने ग्राहक देशात स्वतः कंपनी स्थापन करावी किंवा कोणत्या सरकारी/खाजगी कंपनीशी करार करावा, याबाबत त्या कंपनीला पूर्ण सूट असते. ही वस्तूस्थिती सद्य सरकारने सांगीतली आहे आणि (असे डझनांनी सरकार-ते-सरकार करार केलेल्या) भूतपूर्व सरकारमधील राजकारण्यांनाही माहीत आहे. पण, दशक किंवा जास्तीच्या न्यायिक प्रक्रियेनंतर व सर्वोच्च न्यायालयाची दीर्घ प्रक्रिया पूर्ण होऊन झालेल्या अतिरेक्यांच्या फाशीबद्दल, जेथे "ज्युडिशिअल मर्डर" हे मत अजूनही सतत व्यक्त केले जात आहे, अश्या आपल्या देशात राफालंच्या वस्तूस्थितीला डोळ्याआड करून कपोलकल्पित वक्तव्ये केली जाणे अजिबात आश्चर्यकारक नाही. :( * : या अटीचा मुख्य उद्येश आपण खर्च केलेल्या रकमेचा काही भाग आपल्याच देशात गुंतवला जावा हा असतो. ही गुंतवणूक मूळ कराराशी निगडीत असलेल्या वस्तू/सेवेशी असावी अशीही अट सहसा नसते.उदाहरणार्थ समजा अॅमेझॉ नावाची परकीय कंपनी आहे वस्तुची क्वोटेशन सर्वसाधारण क्ष रुपये आहे, युपिए पासून चालू झालेल्या अटी मुळे भारतात गुंतवणूक किंवा खरेदी करायची म्हणून क्ष +३० % अशी किंमत वाढवून क्वोटेशन देणार मग भारत सरकार क्ष + ३० % मोजणार मग आधिकचा ३० % भांडवलावर परकीय अॅमेझॉ कंपनीस मालकी मिळाली असेल ते ३० % भारतात गुंतवले जातील पण भांडवल कुणाचे भारतीयांनी टॅक्स मधून पुरवलेले. याला काय अर्थ आहे ?वस्तूस्थिती अशी आहे... १. ग्राहक देशात गुंतवणूक करायची अट बहुतेक सर्व देशांच्या आंतरराष्टिय करारांत असते. ही भारताची युपिए/एनडिए/किंवा इअतर कोणत्या सरकारची) मक्तेदारी नसून, शक्य ते सर्व देश आपल्या खर्च झालेल्या पैशांपैकी शक्य तेवढे पैसे या मार्गाने आपल्या देशातील गुंतवणूकीच्या रुपाने परत आणण्याचा प्रयत्न करतात. २. ग्राहक देशातील गुंतवणूकीची टक्केवारी खरेदीच्या एकूण किमतीची टक्केवारी असते... म्हणून, समजा कराराच्या किमतीच्या ५०% गुंतवणूकीची रक्कम ठरली आहे व केवळ वादासाठी, तुम्ही म्हणता अशी, कराराचू एकूण किंमत क्ष+३०% इतकी वाढवली तर, गुंतवणूकीची एकूण रक्कम (क्ष+३०%) च्या ५०% टक्के इतकी होईल. त्याशिवाय, कराराची रक्कम ३०%ने वाढवल्यास तो प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या मानाने महाग ठरेल, ते वेगळे. ३. ही स्थानिक गुंतवणूक केवळ मूळ खरेदीशीच निगडीत उत्पादने/सेवांची असावी अशी अट नसते, कारणः अ) विशेषतः, हाय टेक वस्तूंच्या प्रकल्पांत (उदा. दस्सॉ विमाने, विमानवाहू नौका, पाणबुड्या, अणूप्रकल्प, इ) जरूर असणारी उत्पादने/सेवा, ग्राहक देशात उपलब्ध असण्याची शक्यता कमी/शून्य असते. तशी उत्पादने/सेवांची क्षमता ग्राहक देशांत निर्माण करून मग ती मूळ प्रकल्पासाठी विकत घ्यायचा आग्रह केल्यास मूळ प्रकल्पाला अक्षम्य उशीर होईल ! आ) स्थानिक गुंतवणूकीचे मुख्य उद्येश, (क) आपण खर्च केलेल्या पैशातील काही टक्के भाग आपल्या देशात गुंतवणूकीच्या रुपाने परत यावा, (ख) स्थानिक उद्योगांना दीर्घकालीन चालना मिळावी, (ग) स्थानिक उद्योगांना सद्या देशात आस्तित्वात नसलेले तंत्रज्ञान मिळावे (टेक्नॉलॉजी ट्रान्सफर), आणि (घ) त्यामुळे देशाच्या जीडीपीत व प्रगतीत दीर्घकालीन भर पडावी, असे असतात. ४. वरील कारणांमुळेच या ग्राहक देशातील गुंतवणूकीच्या कलमाला, "प्रकल्पासंबंधिची स्थानिक गुंतवणूक" असे न म्हणता, "ऑफसेट (खरेदीची परिणामकारक किंमत कमी करणारी इन्वेस्टमेंट करणारा) क्लॉज", असे म्हणतात.एक भयानक विदारक सत्य
भारत चंद्रावरच नव्हे तर मंगळावर यान पाठवू शकतो. अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब, अणुपाणबुडी https://en.wikipedia.org/wiki/INS_Arihant स्वतः बनवू शकतो. अणुपाणबुडीतून डागता येणारे आंतरखंडीय क्षेपणास्त्र https://en.wikipedia.org/wiki/K-4_(SLBM)स्वतःच्या हिमतीवर बनवून त्याचे सफल परीक्षण करु शकतो. ब्राह्मोस सारखे अतिवेगवान क्षेपणास्त्र बनवून तैनात करू शकतो किंवा नाविक सारखी स्वतःची GPS (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) https://en.wikipedia.org/wiki/Indian_Regional_Navigation_Satellite_System बनवू शकतो. तर तोफा बंदुका आणि विमाने सारखे अत्युच्च तंत्रज्ञान भारताला स्वतःला बनवता येणार नाही? सीरिया इराक इराण यांनी अणुबॉम्ब बनवू नये म्हणून अमेरिका एवढे प्रचंड प्रयत्न करते आहे तर ते भारताने चांद्रयान अग्नी अरिहंत सारखे तंत्रज्ञान विकसित करु नये म्हणून प्रयत्न केले नाहीत? भरपूर केले अमेरिकाच काय रशिया फ्रांस ब्रिटन आणि इस्रायल सुद्धा करत आहे आणि करत राहणारच . पण जे तंत्रज्ञान बाहेर उपलब्ध होणारच नाही उदा अणुबॉम्ब PSLV इ. ते देशातच निर्माण करणे आवश्यक होते.पण ज्या गोष्टी विकत मिळू शकतात त्यामध्ये भरपूर पैसे खाता येतात. हि संस्कृती गेल्या ७० वर्षात तयार झालेली आहे.
त्यामुळे हे तंत्रज्ञान भारतात तयार होऊच नये म्हणून जसे पाश्चात्य देश प्रयत्न करतात तसेच प्रयत्न भारतातील राजकारणी सरकारी बाबू प्रयत्न करत असतात आणि दुर्दैवाने उच्च सेनाधिकारी आणि उच्च शास्त्रज्ञ सुद्धा यात सामील असतात/ केले जातात आणि जे त्याची तयारी दाखवत नाहीत त्यांना बाजूला सारले जाते किंवा खोटे खटले भरून त्यांना जेरीस आणले जाते किंवा अक्षरशः कुठे तरी ते अपघातात सापडतात आणि मृत्युमुखी पडतात. https://timesofindia.indiatimes.com/india/11-nuclear-scientists-died-in-mysterious-circumstances-in-4-years/articleshow/49272275.cms https://m.dailyhunt.in/news/india/english/defence+lover-epaper-defence/india+s+nuclear+scientists+are+dying+mysteriously+for+many+years-newsid-81939982 जो देश चंद्रावर आणि मंगळावर यान पाठवतो त्याला रायफल किंवा मशिनगन तयार करता येणार नाही का? HAL सारख्या कंपनीला कायमच पांगळं ठेवलं गेलंय. त्यामुळे ७० वर्षे झाली तरी त्यांना स्वतःचे एक विमान धड बनवता आले नाही. तेजस बनवण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पैसाच पुरवला नाही तर शास्त्रज्ञ काम कशावर करणार? आजही HAL ला आपल्या हातात असलेल्या सुखोई विमानांची ऑर्डर पुरी करता येत नाहीये मग त्यांना राफेल दिला असतं तर त्याचे उत्पादन सुरु होण्यासाठी २०२२ उजाडले असते मग ती ऑर्डर पुरी कधी करणार? https://indianexpress.com/article/india/in-rafale-season-hals-3-year-delay-in-sukhoi-rollout-raises-concerns-5381852/ आता सुद्धा हवाई दलाच्या आणि संरक्षण मंत्रालयाच्या डोक्यावर बसून श्री मोदींनी १०० तेजसची ऑर्डर देणे भाग पाडले आहे. https://economictimes.indiatimes.com/news/defence/iaf-to-order-100-modified-tejas-aircraft/articleshow/49330662.cms ऑर्डर नाही त्यामुळे ऍडव्हान्स पैसे नाहीत म्हणून विमान तयार करता येत नाही मग कार्यक्रम रेंगाळत जातो आणि त्यातून अशी स्थिती येते कि परदेशातून विमाने थेट विकत घ्यावी लागतात. असे होऊ नये आणि सुखोई विमानांच्या कंत्राटाच्या वेळच्या चुका परत होऊ नयेत म्हणून ५ व्या पिढीचे लढाऊ विमान पूर्ण तंत्रज्ञानासकटच मिळावे म्हणून मोदी सरकार प्रयत्नशील आहे. A HAL-made Sukhoi (around Rs 450 crore) also costs Rs 100 crore more than the price of the same jet imported from Russia. आहे कि नाही ( भयाण) गंमत. https://economictimes.indiatimes.com/news/defence/after-sukhoi-mistake-india-to-go-for-russian-5th-generation-fighter-only-on-full-tech-transfer-pact/articleshow/57551801.cms डेसो कंपनीच्या मिराज २००० च्या बाबतीत सुद्धा अशीच स्थिती झाली( केली गेली) https://en.wikipedia.org/wiki/Dassault_Mirage_2000#India आपल्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात (IGMDP) https://en.wikipedia.org/wiki/Integrated_Guided_Missile_Development_Programme डॉ अब्दुल कलाम यांनी तरुण आणि अतिशय कार्यक्षम अशा शास्त्रज्ञांना कालापूर्वी भराभर बढती देऊन कार्यक्रम झपाट्याने पुढे नेला होता परंतु पोखरण २ साठी त्यांना या कार्यक्रमातून बाजूला केल्यावर सरकारी बाबू मधील दुद्धचार्यानी त्यांना लाल फितीने जेरीस आणले शेवटी त्यांच्या बुद्धिमत्तेवर डोळा ठेवून बसलेल्या पाश्चात्य कंपन्यांनी त्यांना सुरुवातीला भारतातच लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या दिल्या आणि काही महिन्यांनी उचलून अमेरिका जर्मनी फ्रांस सारख्या ठिकाणी सन्मानाने बोलावून घेतले. यानंतर हा धावणारा कार्यक्रम रांगू लागला आणि शेवटी हे दुद्धाचार्य निवृत्त झाले आणि नव्या दमाचे तरुण शास्त्रज्ञ आले तेंव्हा तो कार्यक्रम परत धावतो आहे. या कार्यक्रमातील बहुसंख्य क्षेपणास्त्राना मंजुरी आणि सुरुवातीचा निधी देणे हे श्री वाजपेयींच्या कार्यकाळातच झाले होते. श्री जॉर्ज फर्नांडिस यांनी त्यात स्वतः लक्ष घातले होते. तेंव्हा त्यांच्यावरही आरोपांची सरबत्ती झाली होती आणि शवपेटिके बाबत प्रचंड गदारोळ केला गेला होता. परंतु पुढच्या १० वर्षात ना धड लक्ष दिले गेले ना पैसे मंजूर झाले. UPA II मध्ये घोटाळूयाच्या भीतीने श्री अँटनी यांच्या काळात कोणतीच गोष्ट मंजूर झाली नाही. त्यामुळे पाणबुडीतील साध्या बॅटऱ्या न बदलल्याने आपली एक पाणबुडी स्फोट होऊन मुंबईतच बुडाली.( हे मी माझ्या पाणबुडीवरील लेखात लिहिले आहे) जितकी खरेदी जास्त तितके पैसे जास्त हि संस्कृती तयार झाली आहे. श्री वाजपेयी किंवा श्री मोदी हे एकटे याला पुरे पडू शकणार नाहीत. श्री वाजपेयी फार सरळ मनाचे होते. श्री मोदी त्यांच्यापेक्षा धूर्त आहेत त्यामुळे हि प्रणाली थोडीतरी बदलेल अशी आशा निर्माण झाली आहे. परंतु एकाच बाबतीत एवढा प्रचंड गदारोळ का होतो आहे कारण हि पैसे झिरपण्याची प्रणालीच बंद करण्याच्या हेतूने श्री मोदी यांनी यात हात घातला आहे. आणि आपले दुकान कायमचे बंद होईल या भीतीने विरोधक जिवाच्या पणाने त्याला विरोध करत आहेत आणि त्याला पाश्चात्य संस्था मदत करत आहेत. एक उदाहरण म्हणून देतो आहे. --कुडानकुलमच्या अणुऊर्जा प्रकल्पापासून तुतिकोरिन(तुथीकुडी) हे १०३ किमी दूर आहे. मग तुतिकोरिन(तुथीकुडी) येथिक ख्रिश्चन डायोसिस चर्च ला कुडानकुलम अणुप्रकल्पाचा विरोध करण्याचे काय कारण ? हे म्हणजे वापीला होणाऱ्या प्रकल्पाला मुंबईच्या चर्चने विरोध करण्यासारखे आहे. हा प्रकल्प रशियाच्या मदतीने चालू होता त्यामुळे त्यात काड्या घालण्यासाठी अमेरिकेने ख्रिश्चन एन जि ओ च्या मदतीने तेथे जन आंदोलन चालवले Prime Minister Manmohan Singh went public with the charge that US non-governmental organisations were behind the agitation, which has stalled work on the nuclear plant in power-starved Tamil Nadu. Although Singh did not mention the faith-based affiliation of these NGOs, it is an open secret that church groups based in the coastal districts of Tamil Nadu, which receive crores of rupees in donations from overseas, have been active in backing the anti-nuclear protest https://www.firstpost.com/politics/church-role-in-kudankulam-protests-merits-wider-probe-228719.html या विषयावर मी "शस्त्रास्त्रांचा बाजार" म्हणून एक लेख मालिका सुरू केली होती परंतु त्याची लांबी रुंदी खोली इतकी जास्त आहे हे मला तेंव्हा जाणवले नव्हते. त्यामुळे मी पार दिशाहीन स्थितीत ते काम अर्धवट सोडले. जेंव्हा त्याची खोली किती आहे ते लक्षात येईल तेंव्हा त्यात परत हात घालायची इच्छा आहे.