चालू घडामोडी : ऑक्टोबर २०१८
Companies pay up Rs 1.1 lakh crore for fear of insolvency action
कर्ज देणे व वसूल करणे यांच्या प्रशासनासंबंधीचे (इन्सॉल्व्हन्सी व बँकरप्सी) नवीन कायदे (उदा : Insolvency and Bankruptcy Code किंवा IBC) आणल्यामुळे पूर्वी चालढकल करत बुडित कर्जांच्या दिशेने वाटचाल करणार्या कर्जदारांवर वचक निर्माण झाल्याचे दिसत आहे. याचा परिणाम म्हणून, याअगोदर कर्ज फेडण्याबाबत चालढकल करणार्या कर्जदारांनी, आतापर्यंत सुमारे रु१.१ लाख कोटीचा भरणा बँकात केला आहे.
गेल्या आठवड्यात सरकारने, या वित्तवर्षांत, नाठाळ कर्जदारांकडून रु१.८ लाख कोटी वसूल करण्याचे लक्ष ठेवल्याचे जाहीर केले आहे.
कायद्याचे बळ व प्रशासकिय पाठींब्याचे (Insolvency and Bankruptcy Board of India किंवा IBBI; National Company Law Tribunal किंवा NCLT; इत्यादी) बळ व बारीक देखरेख आस्तित्वात आल्यामुळे, भविष्यात बँका आपले कर्ज वसूल करण्यात कसूर करण्याची आणि/किंवा कर्जदारांनी चलाखी करून कर्ज बुडवण्याची शक्यता फार कमी झाली आहे.
🗣 चर्चा
(213)
ट
ट्रम्प
Sun, 10/07/2018 - 18:35
नवीन
सैनिकांच्या टाळू वरील लोणी खाऊन गब्बर झालेले , आदर्श बिल्डिंग मध्ये सासरा, आणि मेहुण्या साठी फ्लॅट बाळकवणारे माजी मुख्यमंत्री चव्हाणनीं काँग्रेस च्या नेत्यांची 2014 कु प्रसिद्ध वक्तव्यांची आठवण करून दिली . त्या वक्तव्यांनी त्या वेळी काँग्रेस किती माजली होती याची पुन्हा आठवण चव्हाण साहेबांनी करून दिली . त्या मुजोरपणाची किंमत अजून काँग्रेस च्या नेत्यांना कळली नाही .
' मोदी, फडणवीसांची तुलना लघुशंका करणाऱ्या बाप-लेकाशी; अशोक चव्हाणांची जीभ घसरली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर टीका करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची जीभ घसरली. या दोघांची तुलना करताना त्यांनी चक्क लघुशंका करणाऱ्या बाप-लेकाचे उदाहरण दिले. चव्हाण यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे .
बाप तसा मुलगा याचे उदाहरण देताना चव्हाण म्हणाले, एका गावातल्या शाळेत दुपारी जेवणाच्या सुट्टीत एक खोडकर विद्यार्थी मास्तरांच्या टेबलावर उभा राहून लघुशंका करीत होता. यामुळे चिडलेल्या मास्तरांनी थेट त्या विद्यार्थ्याचे घर गाठले आणि त्याच्या वडिलांनाकडे याची तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या मुलाचे वडिलही घराच्या छतावर उभे राहून लघुशंका करीत असल्याचे त्यांनी पाहिले. देशात आणि राज्यात यापेक्षा वेगळी स्थिती नाही, असे सांगत त्यांनी भाजपा सरकारवर टीका केली. '
- Log in or register to post comments
न
नाखु
Sun, 10/07/2018 - 19:19
नवीन
चे सहकारी पक्ष आहेत आघाडी धर्म पाळणारच की नाही!
धरण काय घर काय?
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 10/08/2018 - 14:59
नवीन
घराचं नाव आदर्श हाउसिंग सोसायटी होतं का त्याचा तपास करावा अशोकरावांनी म्हणतो मी.
-गा.पै.
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Mon, 10/08/2018 - 11:52
नवीन
लखनऊ मध्ये 29 सप्टेंबर ला शाब्दिक वादविवाद होऊन ऍपल मधील कर्मचारी अंकित तिवारी ची हत्या पोलीसांनी केली . या हत्ये ला जातीय वळण देण्याचे काम राजकारण्यांनी सुरू केले कारण अंकित तिवारी हा ब्राह्मण तर योगी आदित्यनाथ हे राजपूत .
गेल्या चार वर्षातील योगी सरकार बद्दल ची नाराजी ला हवा देण्याचे काम केजरीवाल , मायावती ,अखिलेश या विरोधकांनी तर केलेच पण योगी सरकारच्या सत्तेत असलेल्या ब्राह्मण मंत्र्यांनी सुद्धा केले .
ऊ प्र मध्ये 10 % असलेल्या ब्राह्मण समाजाने वेळोवेळी काँग्रेस , समाजवादी पार्टी , बसपा, आणि भाजप अशा सगळ्या पक्षाना साथ दिली .
थोडक्यात योगी सरकार वर नाराज असलेला ब्राह्मण समाज 2019 मध्ये मोदींचे आसन डळमळीत करू शकतो , तेथे घडणाऱ्या घटना पाहता आर एस एस सुद्धा ब्राह्मणांना मोदींसाठी एकजूट ठेवू शकणार नाही .
https://m.maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/victim-of-the-shootout-is-that-person-going/amp_articleshow/66103608.cms
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Tue, 10/09/2018 - 17:21
नवीन
मध्यप्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी मंदिरांच्या वाऱ्या करत आहेत. गुजरात आणि कर्नाटक निवडणुकांनंतर आता काँग्रेसने मध्य प्रदेश निवडणुका झाल्यावर मध्यप्रदेश निवडणुकांसाठी शिवभक्त राहुल गांधी, नर्मदाभक्त राहुल गांधी असे बॅनर लावले आहेत. राहुल गांधी यांना शिवभक्त म्हणून समोर आणले जाते आहे. हिंदू व्होट बँक मिळवण्यासाठी आणि भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेसचा हा टेम्पल रन प्लॅन आहे.
हिंदू मते मिळवण्यासाठी राहुल गांधींचा भक्त अवतार समोर आणला जातो आहे. नरेंद्र मोदींना टक्कर देण्यासाठी ही नीती जाणीवपूर्वक अवलंबली जाते आहे. पोंगा पंडित यात्रा काढल्याने काँग्रेसला पराभवाचा फटका बसला होता. आता हा फटका टाळण्याठी राहुल गांधींचा भक्त अवतार समोर आणला जातो आहे.
चित्रकूट, गुप्त गोदावरी, सती अनुसुया, मइहर मंदिर, राम मंदिर, सीतामढी, रामघाट यांसह अनेक महत्त्वाच्या मंदिरांना राहुल गांधी भेटी देत आहेत आणि देणार आहेत. २००३ ला काँग्रेसचे धोरण हिंदुत्त्ववाद्यांना विरोध करणारे होते. ते २००८ मध्ये आणि २०१३ मध्येही तसेच राहिले मात्र मध्यप्रदेशात पराभवच झाल्यानेच राहुल गांधी यांना भक्त म्हणून समोर आणले जाते आहे. राहुल गांधी यांचे हे धोरण आणि त्यांनी दिलेल्या मंदिर भेटी यांचा नेमका काय उपयोग झाला ते निकालानंतर स्पष्ट होणारच आहे. मात्र प्रचारासाठी टेम्पल रन म्हणजेच मंदिरांच्या भेटींचे हे धोरण अवलंबण्यात आले आहे.
https://www.loksatta.com/maharashtra-news/rahul-gandhis-bhakt-awtar-by-congress-for-mp-polls-1767705/
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Tue, 10/09/2018 - 18:10
नवीन
काँग्रेसने मध्य प्रदेश निवडणुका झाल्यावर मध्यप्रदेश निवडणुकांसाठी शिवभक्त राहुल गांधी, नर्मदाभक्त राहुल गांधी असे बॅनर लावले आहेत. राहुल गांधी यांना शिवभक्त म्हणून समोर आणले जाते आहे. हिंदू व्होट बँक मिळवण्यासाठी आणि भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेसचा हा टेम्पल रन प्लॅन आहे.
काँग्रेस आम जनतेला ईतके उल्लु समजते आहे ? ह्याचा काहीही फायदा होणार नाही !
भाजपाच्या नेत्यांनी केंद्रात व विषेशतः लोकल राज्यात काही घोडचुका केल्यातरच निवडणुकीत त्याचा परीणाम होईल अन्यथा काहीही नाही. जनतेला दाखवण्यासाठी गेल्या पाच वर्षांत पुर्णत्वाला गेलेले प्रोजेक्टस हेच मा श्री मोदीजींचे भांडवल असेल. पण असामान्य
वकृत्व प्रतिभा व राज्यातील परिस्थीतीची पुर्ण जाण व त्यावर उपाय करण्यास कटीबद्द् व गंभीर असणे मोदीजींची चांगली बाजु आहे.
- Log in or register to post comments
स
सर टोबी
Tue, 10/09/2018 - 19:07
नवीन
देशात रामराज्य आले तरीही प्रशासनात अजूनही काही अस्तनीतले निखारे आहेत ज्यांना संरक्षणक्षेत्रात खाबुगिरी करण्याची गेली सत्तर वर्षांची सवय आहे. अशाच एका कुटुंबाची तळी उचलण्यामध्ये धन्यता मानणाऱ्या कुणी नतद्रष्टाने या इंजिनिअरला संशयाच्या जाळयात गोवण्याचे काम केले असणार.
- Log in or register to post comments
स
सर टोबी
Tue, 10/09/2018 - 19:13
नवीन
बैलगाडीच्या खालून चालणाऱ्या श्वानाला बैलगाडी आपणच चालवीत आहोत असा भ्रम होतो त्यातला हा प्रकार आहे. विचारतो कोण यांना?
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 10/10/2018 - 06:09
नवीन
Vladimir Putin invites PM Narendra Modi to 2019 Russia biz meet
भारताची भेट आटपून परत जाण्यापूर्वी रशियन प्रेसिडेंट पुतिन यांनी भारतिय पंतप्रधान मोदी यांना (अ) सप्टेंबर २०१९ मध्ये मॉस्कोमध्ये आयोजित केलेल्या Business Forum Meeting व मे २०१९ मध्ये रशियामध्ये होणार्या 20th Annual Summit ला येण्याचे आमंत्रण दिले आहे ! गुप्त (क्रिप्टिक) राजकारणी संकेत देण्यात रशियन लोकांशी फार कमी जण स्पर्धा करू शकतात, :)
- Log in or register to post comments
फ
फर्स्टमॉन्क
Wed, 10/10/2018 - 06:22
नवीन
गुप्त (क्रिप्टिक) राजकारणी संकेत? म्हणजे तो कसा हे प्लीज उलगडून सांगता का?
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 10/10/2018 - 06:34
नवीन
आमंत्रण केलेल्या कार्यक्रमांच्या तारखा पहा ! :)
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 10/10/2018 - 08:28
नवीन
अब की बार मोदी सरकार!
-गा.पै.
- Log in or register to post comments
फ
फर्स्टमॉन्क
Wed, 10/10/2018 - 14:07
नवीन
वा, खरेच की!! मला समजले ते बरोबर की नाही असा संभ्रम होता पण गा.पै. च्या पोस्टनंतर आता शंका नाही. :)
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
गुरुवार, 10/11/2018 - 09:35
नवीन
पण अशी आमंत्रणे त्या पदाला असतात ना, व्यक्तीला नाही..
जोक कळतोय मला. तरीही..
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 10/11/2018 - 09:43
नवीन
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे.
आचंद्रसूर्य राहो.......
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 10/11/2018 - 14:25
नवीन
पिराताई, तुम्हांस जोक कळला नाहीच्चे मुळी. अबकी बार पुतीन सरकार. असा आहे तो जोक.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
च
चिनार
Fri, 10/12/2018 - 08:49
नवीन
अशी आमंत्रणे त्या पदाला असतात व्यक्तीला नव्हे...सहमत..!
पण २०१९ मध्ये समजा विद्यमान सरकारचा पराभव होऊन राहुल गांधी पंतप्रधान झाले तर अधिकृत आमंत्रण पाठवायचे की नाही हा हक्क रशियन सरकारने राखून ठेवला असेल. अर्थात राहुलजी रशियाला जावेत हीच आमची इच्छा आहे. अन्यथा जागतिक Business Forum Meeting मधल्या उपस्थितांना राहुलजींचे आलू की फॅक्टरी हे business model कसं कळू शकेल?
ता.क. राहुलजींनी 'इकुन पन्नी टाकली की तिकुन खर्रा' अशी मशीन शोधल्याचही ऐकिवात आहे.
- Log in or register to post comments
न
नाखु
Sat, 10/13/2018 - 04:17
नवीन
तूर्तास आमचे सेनाप्रमुख आव्हाड यांच्या सरबराई मध्ये व्यग्र आहेत,नाहीतर युवराजांच्या उपमर्द केला म्हणून तुझा सामन्याच्या अग्रलेखातून कोथळाच काढला असता.
असं आमचे हे म्हणत होते.
मिसामा
ताक कोथळा,बिचवे, लढाई,हे शब्द संजयजी कॉपीराइट असून परवानगीशिवाय वापरल्यास लोकसत्तामध्ये बातमी दिली जाईल याची नोंद घ्यावी
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 10/10/2018 - 09:12
नवीन
China launches anti-halal campaign in Xinjiang
चिनी ड्रॅगनने शिनजिआंग (Xinjiang) प्रांतातील विगुअर (Uighur) मुस्लिमांच्या विरुद्ध नियमांचे पाश अजून जास्त आवळणे सुरू ठेवले आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने ऑगस्टमध्ये जाहीर केलेल्या नियमांप्रमाणे धर्मावर विश्वास ठेवणार्या चुकार सभासदांना शिक्षा / पक्षातून बडतर्फ करण्याची धमकी दिली आहे. त्या मार्गदर्शक नियमांप्रमाणे लोकांना हलाल मांसाचा आग्रह करता येणार नाही.
कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांच्या मते सरकारी अधिकारी आणि पक्षाच्या सभासदांनी, धर्मावर नाही तर मार्क्सिझम-लेनिनिझमवर पूर्ण विश्वास ठेवणे जरूर आहे, आणि सार्वजनिक जीवनात प्रमाणित मांदारिन भाषा (चीनी भाषेचा सरकारमान्य अवतार) बोलणे आवश्यक आहे.
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Wed, 10/10/2018 - 14:01
नवीन
म्हात्रे साहेब ,
चीन मधील मुस्लिम उगीर लोकांच्या गळचेपी बद्दल भारतीय मुस्लिम तर शांत बसले आहेत, निषेध मोर्चे काढत नाहीत आणि पोर्किस्तान सुद्धा दुर्लक्ष करत आहे .
आंतराष्ट्रीय मीडियावर पोर्किस्तान , सौदी व इतर मुस्लिम देशातील लोकांच्या उगीर गळचेपी वरून चीन बद्दल संतप्त प्रतिक्रिया आहेत का ? त्या वर काही प्रकाश टाकता येईल का ?
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 10/10/2018 - 18:08
नवीन
तसे होणे शक्य नाही.
ते का याची थोडक्यात कारणमिमांसा अगोदरच इथे लिहिली आहे.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 10/10/2018 - 18:53
नवीन
डॉक्टर सुहास म्हात्रे,
त्याचं काय झालं की पाकिस्तानला उत्तेजन देण्यासाठी म्हणून चीनने काराकोरम राजमार्ग बांधला खरा, पण त्यामार्गे पाकी अतिरेकी उलट शिनजियांगमध्ये घुसले. ही एक जुनी बातमी : https://tribune.com.pk/story/221828/china-blames-xinjiang-unrest-on-terrorists/
केलें तुकां अन झालें माकां ! म्हणून पाकिस्तानवर नियंत्रण मिळवायला चीन धडपडतोय.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
गुरुवार, 10/11/2018 - 09:23
नवीन
ते न्हाई वो !!!!
आपण ज्या प्रमाणे चीन च्या उगीर लोकांच्या गळचेपी बद्दल मिपावर डिस्कस करतो आणी इतर मुस्लिम देश का गप्प आहेत हे एकमेकांना विचारतो , त्या प्रमाणे आंतरराष्ट्रीय मीडियावर उगीर प्रश्ना वर इतर मुस्लिम देशां बद्दल चर्चा चालू असतील का असे मला म्हणायचे होते .
पाकिस्तान चे डॉन असेल , किंवा us , uk ,aus च्या न्युज पेपर मध्ये उगीर प्रश्नांची बाजू मांडणे आणि त्यावर वाचकांची चर्चा होत असेल का ?
मला खास करून पोर्किस्तान च्या मीडिया चे आणि वाचकांचे उगीर भाऊबंधा बद्दल मत ऐकायला किंवा वाचायला आवडले असते .
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 10/11/2018 - 14:35
नवीन
सर्व मुस्लीम जगतात कोणी फारसा आवाज केल्याचे नजरेत नाही. केवळ राष्ट्रेच नाहीत तर इस्लामिस्ट अतिरेकी संघटनांनीही फार आवाज केल्याचे दिसत नाही. ताचे एकच एक कारण आहे, चीन फटका मारू शकतो, फटका मारेल आणि त्याने मारले तर तारायला कोणीच येणार नाही याची खात्री.
सद्या फक्त अमेरिका आंतरराष्ट्रिय पटलावर त्याबाबतीत बोलू लागली आहे... मात्र, त्यामागे उगीर लोकांबद्दल सहानुभुती किती आणि चीनला विरोध करण्यासाठी केलेला आवाज किती, हे प्रश्न आहेतच.
मुख्य म्हणजे, युएनच्या Human Rights Council मध्ये चीनच्या कृतींवर कधिच गांभिर्याने चर्चा केली गेलेली नाही ! अगदी तिआनआनमेनचे हत्त्याकांडसुद्धा चीनची "आंतरिक राजकिय समस्या " असे म्हणून सोडून दिली होती !!!
“Secretary-General Javier Perez de Cuellar was concerned at the incident, adding that the government should uphold the utmost restraint, but also noted that the UN Charter prohibits interference in member states' internal affairs (especially member states with a Security Council veto).”
From 7 August to 1 September 1989 the Sub-Commission on Prevention of Discrimination and Protection of Minorities (a part of the Commission on Human Rights) met in Geneva for its thirty-seventh meeting. This meeting was the first time since the killings in June "that a human rights meeting ha[d] begun discussing the subject."
At the meeting resolution 1989/5 was adopted by secret ballot on 31 August 1989. The resolution, also called "Situation in China" states the Committee was concerned about what had occurred in China and the implications the crackdown would have on the future of human rights.
The resolution has two points:
१. Requests the Secretary-General to transmit to the Commission on Human Rights information provided by the Government of China and by other reliable sources;
२. Makes an appeal for clemency, in particular in favour of persons deprived of their liberty as a result of the above-mentioned events.”
व्हेटोची ताकद असलेली युएन सुरक्षा परिषदेतील खुर्ची, केवळ भारताने नाकारल्यामुळेच कम्युनिस्ट चीनला मिळाली आहे. त्या खुर्चीची ताकद समजण्यात त्यावेळचे भारतीय नेतृत्व फार कमी पडले यात संशय नाही, पण, तिची ताकद जागतिक स्तरावर दादागिरी करण्यासाठी आपल्याला इतकी उपयोगी पडेल असा अंदाज १९७१ साली चीनच्या नेत्यांनाही वाटला नसेल !
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
गुरुवार, 10/11/2018 - 17:50
नवीन
व्हेटोची ताकद असलेली युएन सुरक्षा परिषदेतील खुर्ची, केवळ भारताने नाकारल्यामुळेच कम्युनिस्ट चीनला मिळाली आहे. त्या खुर्चीची ताकद समजण्यात त्यावेळचे भारतीय नेतृत्व फार कमी पडले यात संशय नाही,
भारतीय नेतृत्व फार कमी पडले
हे खर नाही !! हे जाणुनबुजुन केलेल आहे हे ईतर काही घटनांमुळे सुस्पष्ट होत ! १९४७ नंतर काश्मिरचा प्रश्न न सोडवता जागतीक पटलावर नेउन पाचर मारुन ठेवणे !! आझाद हिंद सेनेला बरखास्त करुन देशाच्या संरक्षण दळाच वाटोळ्ळ केल !
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 10/12/2018 - 14:58
नवीन
डँबिस००७,
तुमच्याशी या बाबतीत सहमत आहे. नेहरूंसारखा (संपादित) माणूस १७ वर्षं पंतप्रधानपदी राहिलाच कसा मुळातून? काहीतरी देशबुडव्या तडजोडी केल्या असणारच त्याने. १९६२ चं चिनी युद्ध हरल्यावर म्हणाला होता की मी माझ्या भ्रामक जगात वावरंत होतो (संदर्भ : https://www.tandfonline.com/doi/abs/10.1080/07075332.2010.489753?journalCode=rinh20). कळायला पाहिजे ते कळतं यातनं.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 10/16/2018 - 14:00
नवीन
प्रशासकांना माझा उपरोक्त प्रतिसाद संपादित करावा लागला. ही तसदी दिल्याबद्दल क्षमा असावी. यापुढे काळजी घेऊन पुराव्याने शाबीत करता येण्याजोगा शब्द वापरेन.
-गा.पै.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Fri, 10/12/2018 - 20:07
नवीन
India wins election to UN Human Rights Council with highest number of votes
संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क परिषदेच्या एशिया-पॅसिफिक विभागाच्या सभासदत्वासाठी झालेल्या निवडणूकीत १९३ सभासद देशांपैकी १८८ देशांची मते भारताला मिळाली. एकूण १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कोणत्याही एका देशाला मिळालेला सर्वात मोठा पाठींबा आहे.
ही निवडणुक १ जानेवारी २०१९ पासून सुरू होणार्या तीन वर्षांसाठी आहे. एशिया-पॅसिफिक विभागासाठी असलेल्या पाच जागांसाठी भारत, बहारेन, बांगलादेश, फिजी आणि फिलिपाईन्स या पाचच देशांनी आपली नावे नोंदवली होती. केवळ याच विभागासाठी नव्हे तर सगळ्याच विभागांत या वेळेस रिक्त जागांएवढीच देशांची नावे पुढे आली होती. त्यामुळे, अर्थातच, हे मतदान देशांच्या विजय-पराभवासाठी नव्हते. तरीही, भारताला मिळालेली सर्वात जास्त संखेची मते, भारताची जगात उंचावलेली पत दर्शविते.

- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 10/15/2018 - 19:26
नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/raj-thackerays-masterstrok-on-corruption-in-jalayukt-shivar-1771874/
.....
खड्डे खाणून महाराष्ट्र खड्ड्यात घातला.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 10/16/2018 - 05:46
नवीन
वयं काक: वयं काक: (आम्ही कावळे आहोत)
सकाळी सकाळी कावळे का ओरडत असतात. आपल्याला अंधार समजून सूर्य नष्ट करेल हि भीती वाटल्याने कावळे सकाळी सकाळी काक: वयं काक: असे ओरडत असतात. (खरं तर क्षुद्र कावळे सूर्याच्या खिजगणतीतही नसतात.)
ता. क. -- याचा कोणत्याही राजकीय प्रतिसादाशी संबंध नाही.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 10/16/2018 - 06:47
नवीन
आपल्या डॉ. एपीजे कलामांचा 15 ओक्टॉबर हा जन्मदिन 'वृत्तपत्र विक्रेता दिन' म्हणून साजरा केला गेला व जाईल.
त्यांच्या आयुष्यात त्यांनी वृत्तपत्र विक्रेता म्हणून केलेल्या कामाला ही आदरांजली आहे.
.
खरोखर कित्येक गरीब घरातील मुलांना ह्या व्यवसायाने मदतीचा हात दिला आहे.
.
पहाटे उठून घरोघरी पेपर वाटणाऱ्या तमाम होतकरुना सलाम.
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 10/16/2018 - 07:30
नवीन
बातम्या मध्ये "वाचन प्रेरणा दिन" असं काही पाहीले आहे
त्या निमित्ताने पंचवटी एक्सप्रेस आणि दख्खन राणी या रेल्वे मध्ये फिरतं वाचनालय सुरू केले आहे असं सांगितलं आहे.
पासधारकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सह्याद्री दूरदर्शन प्रेक्षक नाखु
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Tue, 10/16/2018 - 11:19
नवीन
द वायर नावाच्या डाव्याकडे झुकलेल्या न्युज मिडीया कंपनीत काम करणार्या श्री विनोद दुआ हे काम करत आहेत. ते जन गण मन की बात ह्या नावाने दर रोज आपला व्हीडीयो युट्युब वर उपलब्ध करून देत असतात. युपिएच्या काळात पद्मश्री अवॉर्ड मिळालेले विनोद दुआ हे भारतातले एक सिनियर प्रेस रीपोर्टर आहेत. जन गण मन की बात ह्या त्यांच्या प्रोग्राम मध्ये सध्याच्या सरकारवर खुपच टोकदार टीका करत असतात. कधी कधी त्यांचा तोल सुद्धा जातो.
भारतात तनुश्री दत्ता ह्यांनी सुरु केलेल्या प्रकरणानंतर मी टू ट्रेंड सुरु झाला त्यावर गेल्या आठवड्यात श्री विनोद दुआ ह्यांनी एक कार्यक्रम केलेला होता. ह्या कार्यक्रमात श्री विनोद दुआ ह्यांनी बॉलीवुडच्या श्रेष्ठ कलाकारांना दोष दिला, श्री अमिताभ बच्चन यांच नाव न घेता श्री विनोद दुआ पुढे अस म्हणाले की बॉलीवुडच्या एका श्रेष्ठ कलाका र जो आम्हाला स्वच्छतेचे धडे देत असतो त्याने सुद्धा मि टू वर स्टँड घेतला नाही. अश्या प्रकारे सर्वांवर तोंड सुख घेणार्या श्री विनोद दुआ ह्यांनाच आता तोंडघशी पडाव लागलेल आहे.
श्री विनोद दुआ ह्यांच्यावर श्रीमती निशीता जैन नावाच्या एका फिल्म मेकरनी सेक्शुअल अॅसॉल्टचा आरोप लावला आहे. २९ - ३० वर्षांपुर्वी श्री विनोद दुआ ह्यांनी हे चाळे केले होते. श्री विनोद दुआ ह्यां च्या सुपुत्री मलिक्क दुआ ह्यांनी म्हण्टल आहे जर वडीलांवरचे आरोप खरे असतील तर ते अस्विकार्ह, दु खःदायक व खुप क्लेशदायक असेल.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 10/16/2018 - 14:25
नवीन
Digvijaya says party loses votes if he campaigns; BJP takes BJP takes a dig at Congress
काँग्रेसचे वरिष्ठ नेते, मध्यप्रदेशचे (दोनदा) भूतपूर्व मुख्यमंत्री आणि बराच काळ खुद्द रागांचे मार्गदर्शक असलेल्या दिग्विजय सिंग यांनी वार्ताहरांसमोर, "...माझ्यासाठी फक्त एक काम आहे. कोणताही प्रचार नाही, भाषण नाही. मी भाषण देण्यामुळे काँग्रेसची मते कमी होतात, (म्हणून, भाषण द्यायला) मी जात नाही. (...mera kaam keval ek. Koi prachar nahi, koi bhashan nahi. Mere bhashan dene se to Congress ke vote kat-te hai, mai jata nahi.)" असा शेरा मारून मध्यप्रदेशच्या निवडणूकीत कॉग्रेससाठी पेच निर्माण केला आहे. अर्थातच, माध्यमांसाठी पुढच्या एक-दोन दिवसांच्या रणधुमाळी व चटकदार चर्चांची बेगमी झाली आहे ! =))
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 10/16/2018 - 14:29
नवीन
नेहमी दुसर्या पक्षांना गुगली टाकणार्या दिविसिंगांनी आपल्याच पक्षाला गुगली टाकली आहे. मध्यप्रदेशाती निवडणूकीच्या धुमाळीला रंग चढू लागला आहे. =)) =)) =))
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 10/19/2018 - 11:20
नवीन
काल ऐन सिमोल्लंघनाच्या मुहुर्तावर अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिक टिव्हीवरील क्रमांक ३ची चर्चा ऐकण्यात आली आणि आश्चर्य वाटले. काँग्रेसच्या फेसबुक पेजवरुन पाकीस्तानी वाचकांसाठी 'देश बचाओ मोदी हटाओ' अशी जाहीरात दिल्याचा आक्षेप दिसतो आहे. चुकुन झाले असेल तर या वेळे पर्यंत काँग्रेसने चुकीची कबुली द्यावयास हवी होती, उलट पक्षी अर्णवच्या चर्चेत आलेले काँग्रेस स्पोक पर्सन्स या विषयाबद्दल बेदरकार दिसतात. काँग्रेसचे अक्षरशः अनाकलनीय सिमोल्लंघनाचे आश्चर्य वाटते.
संदर्भ : १, २, ३, ४
अर्णव गोस्वामी रिपब्लिक टिव्ही डिबेट
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Sun, 10/21/2018 - 04:43
नवीन
शबरीमलासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध जाऊन आंदोलने चालू आहेत.
सर्वोच्च न्यायालयापेक्षा मंदीर मोठे मानणे व देशापेक्षा धर्म व देव मोठा मानणे हा देशद्रोह नाही का?
नसेल तर देशापेक्षा धर्म मोठा मानणारे मुसलमान असतील तर त्यांचं काय चुकलं?
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 10/21/2018 - 10:09
नवीन
न.नि.,
जर शहाबानो प्रकरणात कायदा रातोरात बदलला जातो, तर शबरीमालासाठी स्वतंत्र कायदा का होऊ शकंत नाही?
हिंदूंच्या मतास काडीइतकीही किंमत नाही, असा समज वाढीस लागतो आहे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 10/21/2018 - 11:07
नवीन
गा.पै. ह्या धागा चर्चेत आपला प्रतिसाद दिसला नाहीत. तिथे आणि आपल्या सोबतच्या एका चर्चेत घेतली तीच भूमिका पुन्हा मांडाविशी वाटते. प्रबोधनाच्या बाबतीत, दुसर्या बाजू बद्दल मौन पाळून, एकीकडच्याच चुका मोजणे श्रेयस्कर नाही हे मान्यच. त्या साठी दुसर्या बाजूचेही मौन सोडून योग्य तेथे प्रबोधन केलेच पाहीजे.
त्याच वेळी दुसर्या बा़जूचे चुका करतात म्हणून आमच्याही चुका पोटात घाला म्हणणे एका चुकीने दुसर्या चुकीचे समर्थन केल्या सारखे होते. हेही लक्षात घेतले पाहीजे. या विषयावर शनि शिंगणापूर निमीत्ताने मागे एकदा चर्चा केली आहे. तेच मुद्दे पुन्हा उगाळणे टाळतो. थोडक्यात शेवटी समान न्याय तुम्ही तुमच्याच धर्मातील माता भगिनींना देणार ना, मग त्यासाठी हात एवढा आखडता कशासाठी ?
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Sun, 10/21/2018 - 08:01
नवीन
सर्व बाजूंनी निळाशार समुद्र, उसळणा-या लाटा आणि गारेगार वारा…अशा धुंद वातावरणात मुंबईकरांना ‘मुंबई टू गोवा’ प्रवास करता येणार आहे. बहुप्रतिक्षेत असलेली ‘आंग्रिया’ ही मुंबई ते गोवा क्रूझ सेवा शनिवारपासून सुरू झाली. भाऊचा धक्का येथून ही क्रूझ निघाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या क्रूझ सेवेला झेंडा दाखवला. ‘आंग्रिया सी इगल कंपनी’ आणि ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’द्वारे ही क्रूझ सेवा सुरु करण्यात आली आहे.
मुंबई ते गोवा आपण गाडीने, रेल्वेने तसेच विमानाने नेहमीच जातो. पण मुंबई ते गोवा हा प्रवास मुंबईकरांना आता समुद्रमार्गाने क्रूझने करता येणार आहे. जपानमध्ये बनवलेल्या या क्रूझचं नाव मराठा सरदार कान्होजी आंग्रेंच्या नावावरुन ‘आंग्रिया’ ठेवण्यात आले आहे. या क्रूझ सेवेचा दिमाखदार उदघाटन सोहळा भाऊचा धक्का येथे पार पडला. मुंबईहून सायंकाळी ५ वाजता रवाना झालेली क्रूझ दुस-या दिवशी सकाळी ९ वाजता गोव्याला पोहचेल. ही सेवा एक दिवसाआड सुरू असेल. या अनोख्या प्रवासात प्रवाशांना मार्गदर्शकांची साथही लाभणार आहे. मुंबईत ही क्रूझ ‘भाऊचा धक्का’ येथे थांबणार आहे.
काय आहेत क्रूझवर सुविधा?
क्रूझवर जवळपास ८ रेस्टॉरंट्स, बार, कॉफी शॉप, स्विमिंग पूल, मिनी गोल्फ क्लब, क्लब असं बरंच काही अनुभवता येणार आहे. क्रूझमध्ये जवळपास ३५० प्रवासी प्रवास करू शकतात. या आलिशान प्रवासासाठी प्रवाशांना ४ ते १२ हजार रूपये मोजावे लागतील. क्रूझमधील प्रत्येक खोली खास जपानी शैलीत सजवण्यात आली आहे. या जलप्रवासात प्रवाशांना उत्तम जेवण, अल्पोपाहार आणि मनोरंजनाची मेजवानी मिळेल.
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Sun, 10/21/2018 - 08:03
नवीन
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 10/21/2018 - 20:42
नवीन
माहितगार,
आपला उपरोक्त संदेश वाचला.
१.
ऋतुवती स्त्रियांना प्रवेशबंदी असणे हा अन्याय आहे हे कोणी ठरवलं? अय्यप्पा नेहमी संन्याशाच्या रुपात दाखवला जातो. संन्याशांना स्त्रीसहवास निषिद्ध असल्याने शबरीमालाच्या गाभाऱ्यात बायकांना प्रवेश नाही. ज्या दहातेपन्नास मधल्या बाईस अय्यप्पाचं गाभाऱ्यात जाऊन दर्शन घ्यायचं आहे तिने अंचनकोविल येथे खुशाल जावं. शबरीमाला हे स्थान उचित नव्हे.
इकडे स्वामी अय्यपांच्या इतर मंदिरांची माहिती आहे : https://en.wikipedia.org/wiki/Ayyappan#Temples
जर स्त्रीभक्तांना त्यांच्यावर अन्याय झाल्याचं वाटंत नाही तर निधर्म्यांना तसं का वाटतंय? चायसे किटली गरम क्यू? कोणतरी नौशाद खान नामे मुस्लिम उठतो आणि शबरीमालात बायकांना प्रवेश का नाही म्हणून याचिका दाखल करतो. त्यावर न्यायालयाने 'हे आपलं काम नाही' म्हणून अंग काडून घ्यायला हवं. त्याऐवजी हिंदूंच्या भावना पायदळी तुडवायचा निर्णय बिनदिक्कीतपणे माथी मारला जातो. मग रेहाना नावाची मुस्लिम युवती शबरीमाला मंदिरात घुसायला सिद्ध होते. हा सर्व प्रकार पराकोटीचा संशयास्पद आहे.
हिंदूंची मंदिरं उघडपणे भ्रष्ट करायची ताकद नाही म्हणून मागील दाराने प्रयत्न चालू आहेत.
२.
त्या धाग्यात फटाके वाजवणे व बोंबल्या लावणे हे दोनच मुद्दे सापडले. हे दोन्ही हिंदू धर्माशी संबंधित नाहीत. हिंदू धर्माच्या गळ्यात ही धोंड कशासाठी! साहजिकंच अशा चर्चेत मला रस नाही.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 10/22/2018 - 08:43
नवीन
सुधारणांच्या दृष्टीने एकमेकांकडे बोट दाखवणे आणि शेजारी शेजारी एकमेकांचे निंदक असणे एका अर्थी बरे असते. अर्थात शेजारच्या घरात अयोग्य आहे म्हणुन माझ्या घरात अयोग्य असू शकते याचे समर्थन होत नाहि. परस्पर निंदेचा प्रवास सर्वच शेजार्यांच्यात सुधारणा होण्याकडे असणे आदर्श असावे.
हिंदू धर्माबद्दल भक्तांची अंधश्रद्धा आणि तार्कीक उणीव आहे.
१.१) संन्यासाचा मुख्य उद्देश्य मोक्ष प्राप्ती असावा
१.२) संन्यसत्वात सर्व नाती नाकारुन वैराग्य प्राप्ती करावयाची असते त्यामुळे इतर प्रत्येक सजीव ते निर्जीव वस्तुमात्रात ईश्वरीय अस्तीत्वाची माया / अनुभूती म्हणून बघण्या शिवाय मार्ग नसतो. त्यामुळे काहीशे वर्षापुर्वॉ अस्तीत्वात येऊन गेलेल्या अवतारास संन्यसत्वाची अवस्था पूर्णत्वास गेली नसल्यास आजच्या सर्व मग ऋतुमती असोत अथवा नसोत सर्व स्त्रीया स्व कन्येसमान असणार यात आश्चर्य नसावे आणि संन्यसत्वाची (वैराग्याची) स्थिती पूर्णत्वास गेली परमहंसस्थिती आली तर समोर कोणताही सजीव कोणतीही स्त्री आल्याने काही फरक पडण्याचा प्रश्न रहात नाही कारण कोणताही भेदाभेद न पाळता प्रत्येकात ईश्वरीय अस्तीत्व तुम्ही पहात असता त्यामुळे ईश्वराचे कोणतेही अस्तीत्व नाकारण्याचा प्रश्न रहात नाही. ऋतुवती स्त्रीयांना दर्शनाचा आधिकार नाकारणे हा तथाकथित भक्तांनी तार्कीक उणिव आणि अंधश्रद्धेतून केलेला अन्याय आहे.
१.३) केवळ ऋतु कालावधी संपला म्हणून स्त्री पुरुष षडरिपूमुक्त-काममुक्त होतात असे नसावे त्यामुळे हे तार्कीक उणीवेचे आहे. काममुक्तता ही मानसिक स्थिती आहे ती साधण्याची पहिली जबाबदारी संन्याशाची आहे भक्तांची नव्हे. भक्त मन काममुक्त ठेवण्यासाथी व्रत करु शकतात पण पुरुष असोवा स्त्री मनाची काममुक्तता ठेवण्याचे प्रयत्न आणि यशापयश व्यक्तीपरत्वे बदलणार ज्यावर ज्याचे दर्शन घेतले त्या व्यक्तीचे देवत्वाला पोहोचल्या शिवाय नियंत्रण असणार नाही. स्वतःचे मन षडरिपूमुक्त काममुक्त ठेवण्याची जबाबदारी संन्याशाचीच. आणि जर संन्यासी स्वतः देवत्वास पोहोचला असेल तर भक्तांचे मन काममुक्त करण्याची इश्वरीय क्षमता त्यांच्या देवत्वात असणारच. त्यामुळे ऋतुवती स्त्रीयांना दर्शन नाकारणारा सारा युक्तीवाद तार्कीक उणीवेचा ठरतो किंवा कसे.
२) मोक्षप्राप्तीसाठी जो संन्यास घेतला जातो, त्यात मानसिक विरक्ती प्राप्त करणे हे ध्येय असते त्यासाठी (काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर) षडरिपूंचा या त्याग मनावर नियंत्रण ठेऊन करावयाचा असतो, स्त्री तिरस्कारकरुन किंवा स्वतःस बुरख्यात बांधून घेऊन नव्हे. मत्सर किंवा क्रोध केले तरी मोक्षाचा मार्ग स्थगित होतो.
३) केवळ स्त्री न पहाता घेतलेल्या संन्यसत्वाने काम भावना लोप पावते हि अंधश्रद्धा आहे, वैराग्याचा आदर्श शुक आहे ज्याचे मन स्त्री दिसली तरी निर्मळ रहाते.
४.१ ) ऋतुवती असण्याचा पावित्र्याशी संबंढ जोडणे हि दुसरी अंधश्रद्धा आहेत. परमेश्वर आणि त्याच्या अवतारास परमेश्वर निर्मित सर्व सजीव सर्व स्थितीत समान असतात .
४.२) ऋतुवती असण्याच्या काळात तिला श्रद्धेय स्थानाच्या आधाराची स्त्रीला अधिक गरज असते आणि कर्मठ अंधश्रद्ध दृष्टीकोण नेमके गरज असतानाच्या काळात हकनाक स्त्रिचा भावनिक श्रद्धेय आधार काढून घेतात, जी स्थिती नैसर्गिक आहे आणि ज्याबाबत पुरेश्या स्वच्छतेची काळजी घेतली तर पुरेसे आहे त्या बाबत अनावश्यक अपावित्र्याची भावना निर्मिती केली जाते. जगातले ऋतुवती नसलेले सर्व सजीव आणि मानव धरुन दररोज नैसर्गिक विधीचे उत्सर्ग करतच असतात स्वच्छतेनंतर ते पवित्र गृहीत धरले जातात. ऋतुवती असणे सुद्धा स्वाभाविक नैसर्गिक उत्सर्गापलिकडे काहीच नाही. त्यास इतर मानवीय उत्सर्गांपेक्षा अधिक हिनत्व अथवा गौणत्व देण्याचे काहीच कारण नाही. उत्सर्ग उत्सर्ग आहे त्या बाबत स्वच्छतेची आपापली काळजी घेतली कि शरीर पवित्र होते.
४.३) जगातील इतर प्रमुख धर्मीय ऋतुवती असण्यावरुन स्त्रीयांना इश्वरीय प्रार्थनेचा आधिकार नाकारत नाहीत. हिंदू धर्मीय ऋतुवती असण्यावरुन स्त्रीयांना इश्वरीय प्रार्थनेचा आधिकार नाकारला जाण्यात ऋतुवती स्त्रीयांवर अन्याय आहेच पण एखाद्या बाबतीत अंधश्रद्धेमुळे एखादी सवलत स्वधर्मीयांनाच नाकारणे हा स्वतःच्याच धर्मीय आणि स्वतःच्याच धर्मावर अन्याय आहे. तुमच्या धर्मात अन्याय आहे म्हणून कुणि तुमच्या धर्माकडे पाठ फिरवण्यात तुमच्याच धर्माचे नुकसान असते. त्यामुळे स्वकीयांवर अन्यायाचे चुकीचे समर्थन प्रशस्त नसावे.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 10/22/2018 - 14:36
नवीन
माहितगार,
१.
हिंदू धर्माबद्दल भक्तांची अंधश्रद्धा आणि तार्कीक उणीव आहे.
जरी असली तरी काय बिघडतंय? कुणाचं काही नुकसान झालंय का?
२.
कारण कोणताही भेदाभेद न पाळता प्रत्येकात ईश्वरीय अस्तीत्व तुम्ही पहात असता त्यामुळे ईश्वराचे कोणतेही अस्तीत्व नाकारण्याचा प्रश्न रहात नाही.
स्त्रीभक्तांना कोणीही नाकारीत नाहीये.
३.
ऋतुवती स्त्रीयांना दर्शनाचा आधिकार नाकारणे हा तथाकथित भक्तांनी तार्कीक उणिव आणि अंधश्रद्धेतून केलेला अन्याय आहे.
भक्तीत अधिकाराची भाषा नसते. त्यातूनही ज्यांना हा न्याय वाटतो त्यांनी शबरीमालास जाऊ नये. अशांकडे अंचनकोविलसारखे इतर पर्याय उपलब्ध आहेत.
४.
केवळ ऋतु कालावधी संपला म्हणून स्त्री पुरुष षडरिपूमुक्त-काममुक्त होतात असे नसावे त्यामुळे हे तार्कीक उणीवेचे आहे. काममुक्तता ही मानसिक स्थिती आहे ती साधण्याची पहिली जबाबदारी संन्याशाची आहे भक्तांची नव्हे. भक्त मन काममुक्त ठेवण्यासाथी व्रत करु शकतात पण पुरुष असोवा स्त्री मनाची काममुक्तता ठेवण्याचे प्रयत्न आणि यशापयश व्यक्तीपरत्वे बदलणार ज्यावर ज्याचे दर्शन घेतले त्या व्यक्तीचे देवत्वाला पोहोचल्या शिवाय नियंत्रण असणार नाही. स्वतःचे मन षडरिपूमुक्त काममुक्त ठेवण्याची जबाबदारी संन्याशाचीच. आणि जर संन्यासी स्वतः देवत्वास पोहोचला असेल तर भक्तांचे मन काममुक्त करण्याची इश्वरीय क्षमता त्यांच्या देवत्वात असणारच. त्यामुळे ऋतुवती स्त्रीयांना दर्शन नाकारणारा सारा युक्तीवाद तार्कीक उणीवेचा ठरतो
देवाच्या वतीने बोलणे तुम्ही कोण? शिवाय श्री. पप्पूशिरोमणी यांच्या 'गरिबी ही मानसिक अवस्था आहे' या विधानाची आठवण होते ती वेगळीच.
तसेच शबरीमालाचा काममुक्तीशी कसलाही संबंध नाही.
५.
स्त्री तिरस्कारकरुन किंवा स्वतःस बुरख्यात बांधून घेऊन नव्हे. मत्सर किंवा क्रोध केले तरी मोक्षाचा मार्ग स्थगित होतो.
ते अय्यप्पा बघून घेतील.
६.
केवळ स्त्री न पहाता घेतलेल्या संन्यसत्वाने काम भावना लोप पावते हि अंधश्रद्धा आहे, वैराग्याचा आदर्श शुक आहे ज्याचे मन स्त्री दिसली तरी निर्मळ रहाते.
कामभावनेपायी बायकांना दूर ठेवलंय हीच मुळी अंधश्रद्धा आहे.
७.
ऋतुवती असण्याचा पावित्र्याशी संबंढ जोडणे हि दुसरी अंधश्रद्धा आहेत. परमेश्वर आणि त्याच्या अवतारास परमेश्वर निर्मित सर्व सजीव सर्व स्थितीत समान असतात .
समानता नामक पदार्थ निसर्गात कुठेही आढळून येत नाही. त्यामुळे त्याच्या नादी न लागणेच श्रेयस्कर.
८.
ऋतुवती असण्याचा पावित्र्याशी संबंढ जोडणे हि दुसरी अंधश्रद्धा आहेत. परमेश्वर आणि त्याच्या अवतारास परमेश्वर निर्मित सर्व सजीव सर्व स्थितीत समान असतात .
हे अवताराने ठरवायला हवं ना?
९.
उत्सर्ग उत्सर्ग आहे त्या बाबत स्वच्छतेची आपापली काळजी घेतली कि शरीर पवित्र होते.
पावित्र्याचे नियम काय आहेत? तुम्ही यमनियम पाळून योगसाधना वगैरे केलीये का? किंवा धर्मशास्त्रांचं अध्ययन केलेलं आहे का?
१०.
जगातील इतर प्रमुख धर्मीय ऋतुवती असण्यावरुन स्त्रीयांना इश्वरीय प्रार्थनेचा आधिकार नाकारत नाहीत.
हिंदू धर्म तरी कुठे नाकारतोय. अगदी पाळी चालू असलेली बाईसुद्धा नामस्मरण करू शकते. नामाला सीमा नाही.
११.
हिंदू धर्मीय ऋतुवती असण्यावरुन स्त्रीयांना इश्वरीय प्रार्थनेचा आधिकार नाकारला जाण्यात ऋतुवती स्त्रीयांवर अन्याय आहेच पण एखाद्या बाबतीत अंधश्रद्धेमुळे एखादी सवलत स्वधर्मीयांनाच नाकारणे हा स्वतःच्याच धर्मीय आणि स्वतःच्याच धर्मावर अन्याय आहे.
हिंदू धर्मातल्या भक्तीत अधिकारांची भाषा नसते. त्यामुळे अन्यायाची भाषाही गैरलागू आहे.
१२.
तुमच्या धर्मात अन्याय आहे म्हणून कुणि तुमच्या धर्माकडे पाठ फिरवण्यात तुमच्याच धर्माचे नुकसान असते.
ते भक्त स्त्रिया आणि अय्यप्पा बघून घेतील.
असो.
एक सावधगिरीची सूचना. कम्युनिस्ट लोकं नेहमी अधिकाराची भाषा करतात. त्यांच्यापासून सावधान!
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 10/23/2018 - 07:22
नवीन
आपल्याच घरातील कन्या, माता, भगिनीं, भार्यांचे स्वातंत्र्य आणि आधिकार (अ)सुरक्षीत करण्यासाठी भांडवलशाही, समाजवाद ते परधर्मीय कॉन्स्पिरसी थेअरीज कशासाठी ?
अन्यायाने मनातील श्रद्धा आणि भक्ती विरुन जाण्याची शक्यता असते . हिंदूधर्मीय संकुचित कर्मठ अंधश्रद्धा आणि अन्यायच नास्तिकतेला आणि परधर्म शरणतेला पाठबळ पुरवत आल्याचा काही शतकांचातरी इतिहास असावा.
..
वाक्य बर्याचबाजूंनी निसटतय, मुख्य म्हणजे सेल्फ गोल आहे :) एक एक करुन बघूया
१) भक्तीस काहीच अधिकार नसतील हिंदूंच्या भक्तीत जसे सर्वांचे सर्व हस्तक्षेप वैध ठरतील , त्यात न्याय आणि राज्यसंस्थेची हस्तक्षेपही वैध ठरतात.
२) तुमची मुर्तीपुजा ते अनेक देवता वाद नाकारुन तुमच्या भक्तीत अब्राहमीक धर्म ते मुस्लीम राज्यकर्ते यांनी केलेले हस्तक्षेप ज्यात मुर्ती / मंदिर भंजन ते जिझीया कर लावणे याचाही समावेश व्हावा हे भक्तांच्या भक्तीला काहीच आधिकार उरले नाही तर वैध ठरते.
३) ईश्वर आणि भक्ताचे नाते केवळ मालक आणि गुलाम असणे हि कल्पना अब्रहामीक आणि मुख्यत्वे मुसलमानी असावी, तिकडून हिंदूंनी काही प्रमाणात उसनी घेतली असावी. हिंदू धर्मात भक्ताचा ईश्वरावर आधिकार फार मोठा आहे. ईश्वराच्या घरी आलेल्या भक्ताला ईश्वराला अतिथी म्हणूनच स्वागत करावे लागते, भक्त ईश्वरालाही शाप देऊ शकतात. अख्खी भगवद गीता आधिकारांसाठी संघर्ष करण्यास सांगते. आयप्पाच्या मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अतिथी स्त्रीस परत पाठवणे हिंदूसंस्कृती च्या आतिथ्य संस्कारानुसार अनुचित असावे.
नाम स्मरण तर इतर धर्मीय पण करु शकतात. ईतर धर्मात व्यक्ती मुर्तींची दैविक व्यक्ती म्हणून जोडलेली नाही. हिंदू धर्मात मुर्ती दैविक व्यक्ती म्हणून जोडली आहे. दैविक व्यक्ती असलेल्या मुर्तीवर श्रद्धा निर्माण करुन दिली जाते आणि अगदी तिला जेव्हा गरज आहे तेव्हा मुर्तीपासून दूर ठेऊन केवळ नामस्मरण कर म्हणून आधिकार नाकारला जातो ? (या न्यायाने वीर्य उत्सर्जीत होणार्या वयातील सर्व पुरुषांनाही मुर्तीपुजेपासून सक्तीने दूर का ठेऊ नये ?)
पुरुषांच्या शरीरात वीर्याची निर्मिती आणि स्खलन कोणत्याही पिरीयॉडीक शिस्ती शिवाय चालू असते आणि तरीही त्यांचे पावित्र्य टिकून राहते ! पण सृजनाच्या त्याच प्रक्रीयेचा भाग असलेली पाळीची प्रक्रीया अपवित्र ? हा कोणता न्याय ? ईतर शारिरीक उत्सर्ग तर स्त्री पुरुष दोघांनाही चुकत नाहीत. जिथे केवळ स्वच्छतेची काळजी घेणे पुरेसे आहे त्यासाठी आपल्याच कुटूंबीयांना अखंड अन्याय्य प्रक्रीयेचे राबवणे कशासाठी ?
वैज्ञनिक दृष्ट्या पहाता पाळी सजीव सृष्टीच्या चैतन्यपूर्ण सृजनातील सुदृढतेसाठीची महत्वाची प्रक्रीया आहे ती अपवित्र कशी असू शकेल ? बरे तसे पहाता पाळी केवळ चारच दिवस येते त्यासाठी अयप्पा मंदिरात ऊरलेले २६ दिवस * १२ महिने * ४१ वर्षे दर्शन नाकारण्याचे समर्थन कसे होते ?
अगदी होय, त्या हिंदू धर्मशास्त्राचे अध्ययन केले आहे ज्यात कोणत्याही विवाहीत गृहस्थाची ईश्वरचरणी उपासना -अगदी ब्रह्मदेवाची सुद्धा - अर्धांगिनी शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळे आयप्पा मंदिरात सध्या होणारी अर्धांगिनी सोबत नसतानाची गृहस्थांची उपासना अर्धवट रहाते त्यामुळे अन्याय केवळ स्त्रीयांवरच नाही सर्व गृहस्थ पुरुष भक्तांवरही होतो आहे. त्यांची उपासना प्रयत्न करुनही अर्धवट ठेवली जात असल्याने त्या भक्तांवर तो अन्याय आणि अन्यायच आहे.
.
तार्कीक उणीवेचे विधान आहे . आधी प्रश्न पावित्र्याचे नियम काय कसे असावेत असा असावयास हवा. ज्या नियमांचा आधारच ईश्वरीय सजीवांना विषमतेची वागणूक असू शकेल असे काही नियम कुठे असतील तर त्या नियमांचे स्वतःचेच पावित्र्य संपलेले असते . ज्या नियमांचे पावित्र्य संपले आहे त्यांना पावित्र्याचे नियम कसे काय म्हणणार ?
आधि अपवित्र विषमतेच्या नियमांचे पालन करण्याची अपेक्षा करुन मग पावित्र्याचे नियम विचारण्यासाठी कोणते नैतिक आधिकार शिल्लक रहातात ? जे विषमतेने अपवित्र झाले ते निर्योग आहे . आम्ही समान संधी देणार्या खर्या पवित्र योगाची साधना करतो .
अगदीच अस काही नाही . हिंदू धर्म अवतार आणि अगदी ईश्वरासही अनिर्बंध स्वातंत्र्यही देताना दिसत नाही. आलेल्या आतिथीस नाकारण्याचा आधिकार त्यांनाही नाही. आणि जे दर्शनास आले त्यांना आशिर्वाद द्यायचे कि नाही तेही अवतार ठरवतो ना ? अवताराची स्वतःची ईच्छा झाल्या शिवाय भक्ताला बोलावणेही जात नाही अशी पण एक श्रद्धा आहे ना ? अवताराने ज्या स्त्रीयांच्या मनात ईच्छा निर्माण करुन बोलावून घेतले त्या स्त्रीयांना दर्शना पासूनवंचित करणारे ईतर कोण ? जेव्हा अवतार न्यायाधीश , पोलीसी, सरकारी अवतार धारण करुन दर्शन घेऊ ईच्छित स्त्रीयांना दर्शनाची मोकळीक देईल तेव्हा हिंदू धर्मातील उदात्ततेस ग्रहण झालेले व्हिलनीश भोंदू खोटे भक्त -आता पर्यंत सुधारणा वादासमोर बर्याच गोष्टीत विरघळलेत - एक दिवस याही बाबतीत विरघळून जातील .
आपल्या बाकी प्रश्नांची उत्तरे वर आलेली आहेत त्यामुळे त्यांचे पुर्नलेखन टाळतो. चर्चेसाठी अनेक आभार.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 11/05/2018 - 05:28
नवीन
माहितगार, निसटत्या बाजू १ व २ हे दोन्ही प्रतिसाद आवडले.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Mon, 10/22/2018 - 15:04
नवीन
Number of 'crorepatis' has risen by 60% in last four years: CBDT
आयकर विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीप्रमाणे खालील माहिती मिळाली आहे :
१. मूल्यांकन(असेसमेंट) वर्ष २०१४-१५ आणि मूल्यांकन वर्ष २०१७-१८ यामध्ये एक कोटीपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न जाहीर करणार्यांची संख्या ८८,६४९ वरून वाढून १,४०,१३९ झाली आहे, म्हणजे, जवळ जवळ ६०% ने वाढली आहे..
२. वित्तवर्ष २०१३-१४ (मूल्यांकन वर्ष २०१४-१५) आणि वित्तवर्ष २०१७-१८ : करविवरण (आय टी रिटर्न) भरणार्यांची संख्या ३.७९ लाखांवरून वाढून ६.८५ लाख झाली आहे, म्हणजे ८०% पेक्षा जास्त वाढली आहे..
नोटाबंदी आणि जीएसटी पार नाकाम झाल्या आहेत असा एक प्रवाद आहे. पण, तसे असतानाही, वरचे आकडे पाहून, माझ्यासारख्या अज्ञानी माणसाला काही प्रश्न पडले आहेत...
अ) इतक्या कमी वेळेत, इतके लोक, एकाएकी इतके श्रीमंत कसे झाले ? म्हणजे, बापरे ! एकाएकी, अच्छे दिन आले की काय?
आ) समजा काहीजण पूर्वी आपले उत्पन्न लपवित होते आणि आता त्यांनी ते जाहीर करायला सुरुवात केली, म्हणून त्यांचा आकडा एकाएकी इतका वाढला असला... तर मग, काळाबाजारी लोकांना कराच्या जाळ्यात गुंतविण्याच्या सरकारच्या सगळ्या योजना अयशस्वी झालेल्या असतानाही... इतक्या लोकांना पूर्वी लपवत असलेले उत्पन्न आता जाहीर करण्याची उपरती कोणत्या कारणाने झाली असावी? कोणत्या कारणाने का होईना, जर लोकांना आपले उत्पन्न लपवणे गैरसोईचे वाटू लागले असेल तर, ती अच्छे दिनांची खूण मानावी काय?
मिपावरील जाणकार अर्थतज्ज्ञांच्या विश्लेषणाच्या प्रतिक्षेत.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 10/22/2018 - 15:50
नवीन
छे छे
काँग्रेसच्या ७० वर्षाच्या आर्थिक सुधारणांचे परिणाम आत्ता दिसायला लागले आहेत.
"गरिबी हटाव" म्हणून इंदिराजींनी सांगितले होते ना त्याचेच हे परिणाम.
बाकी सर्व मोहमाया आहे.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 10/22/2018 - 19:18
नवीन
आजच्या घडीला एक कोटी रूपये रक्कम एकदम किरकोळ बाब आहे.
त्याचा आणि नोटबंदीचा संबंध जोडला हे काय उमगले नाही.
....
हे फक्त 'चालू' सरकार मुळे घडले ह्याला काही आधार असेलच याबाबत साशंक आहे. असो.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 10/22/2018 - 19:28
नवीन
एक कोटी रुपये वर्षाला म्हणजे सव्वा आठ लाख महिन्याला उत्पन्न आहे.
साडे पाच कोटी रुपये एक एकरात काढणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्याला ठीक आहे.
इतरांना किरकोळ नाही.
बाकी चालू द्या.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »