मिपाच्या मुखपृष्ठावर करुणानिधींना श्रद्धांजली? ये बात कुछ हजम नही हुवी!
तामिळ भाषेसाठी त्यांचे योगदान कितीही मोठे असले तरी करुणानिधींसारख्या भ्रष्टाचार, घराणेशाही , LTTE शी संबंध असल्याचे आरोप झालेल्या व्यक्तीला मिपा सारख्या मराठी अंतरंग-मराठी अभिव्यक्ती ब्रीदवाक्य असणाऱ्या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर श्रद्धांजली? ये बात कुछ हजम नही हुवी!
चू.भू.द्या.घ्या.
🗣 चर्चा
(134)
अ
अभ्या..
Fri, 08/10/2018 - 11:39
नवीन
अगदी अगदी
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Fri, 08/10/2018 - 11:37
नवीन
प्राडॉ ,
तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है !!
हम होंगे कामयाब एक दिन !!!ओ ! ओ !
मन में है विश्वास !
हम होंगे कामयाब एक दिन !
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Fri, 08/10/2018 - 11:42
नवीन
बघ लेका अभ्या... आणि तू म्हणतोस की माझ्या ब्यानरकडे कोणी लक्ष देत नाही ! घे आता, मोज टीआरपी =)) =)) =))
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
Fri, 08/10/2018 - 12:06
नवीन
=)) =)) =))
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Fri, 08/10/2018 - 14:50
नवीन
मला वाटतंय त्या करुणानिधी चे आपल्याला काही घेणेदेणे नाही , पण शहीद जवान राणे साठी हा विषय आता बंद करा . बस झालं आता !!! तुमच्या सगळ्यांचे इतर धाग्यावरील प्रतिसाद आणि या धाग्यावरील प्रतिसादांची तुलना जर कोणी केली तर त्याला प्रश्न पडेल ' हेच का ते ज्ञानी लोकं ? ' त्यामुळे आता या धाग्यावर पाय ओढणे बंद करा .
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Fri, 08/10/2018 - 21:30
नवीन
बाकी अभ्या शेठ,
मी काय म्हणतो की
15 ऑगस्ट चा बॅनर करायचा ठरला असेलच तर आत्ताच सांगून ठेवतोय की त्या दिवशी आमचा बड्डे असतो आणि नेपोलियन बोणापार्ट चा देखील !
तेव्हा भविष्यातील वाद विवाद टाळण्यासाठी बॅनर बनवताना काळजी घ्यावी म्हणून आपली आगाऊ सूचना !!
अवांतर : बॅनर वर नेपोलियन चा आल्प्स क्रॉस करतानाचा आणि आमचा अजिंक्यतारा क्रॉस करतानाचा फोटो वापरल्यास उत्तम !
:D
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
Fri, 08/10/2018 - 21:55
नवीन
१५ ऑगस्ट हा भारतीय गणराज्याचा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो त्या दिवशी देशापुढे तुमच्या सारख्या चिरकुट लोकांचा बड्डे असेल तर तो खिजगणतीत येणार नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी. बाकी ब्यानर वगैरेची काळजी संपादक घेतीलच तुमच्या आगाऊ सूचनेची गरज नाही.
कळावे लोभ असावा
झाडाच्या फाट्यावर मारणारी संघटना सदस्य - रंगीला रतन
ता.क. या पुढे कुठल्याही धाग्यावर उगाच घाण करणाऱ्या लोकांना मग ते जुने असोत कि नवीन ह्याचा मुलाहिजा न बाळगता तिथल्या तिथे झोडपण्यात येईल हि आगाऊ सूचना.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Sat, 08/11/2018 - 08:03
नवीन
ख्या ख्या ख्या
एक तर मुळ प्रतिसाद विनोदी , त्यापुढे जाऊन तो स्पष्टपणे आमचे मित्र, अभ्याशेठला उद्देशुन असताना तु त्याला उत्तर दिलेस त्यावरुन बौधिक पातळी कळाली होतीच , (संपादित), चिरकुट , खिजगणती, फाट्यावर मारणे , मुलाहिजा न बाळागणे , झोडपणे वगैरे शब्द पाहुन तुझ्या विषयीही अंदाज बांधला होता , तो खरा निघाला :) मजा आली !!
आता ह्या पुढे तुझ्या सारख्याशी बोलण्यात काही अर्थ नाही , त्यामुळे जाऊ दे , खुष रहा !!
हां तर अभ्या शेठ , बॅनर साठी कच्चा माल हवा असल्यास कळवणे !
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Sat, 08/11/2018 - 22:31
नवीन
दोन आयडींमधील भांडणे त्यांच्या व्यक्तिगत पातळीवर जातात हे काही मिपावर नवीन नाही.
पण, मार्कस/प्रगो कि गिरीजा आयडी "बौद्धिक पातळीवरून आणि शब्दांवरून जात ओळखण्याची कला" हे जे असले भाष्य करतो यावरून या तथाकथित उच्चशिक्षित आणि उच्चवर्णीय "नीच" मानसिकता दिसून येते!
संपादक या आयडीवरती काय कारवाई करतात हे बघूया!
माझ्याकडून मी असल्या मनोवृत्तीचा निषेध करतो...
टीप : रंगीला रतन कोणाचा डुआयडी आहे कि नाही हे मला नाहीत नाही... त्याने काही फरक देखील पडत नाही.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Sun, 08/12/2018 - 03:55
नवीन
हा हा
ही कला आम्हाला नुकतीच अवगत झाली आहे, तुम्हालाही शिकवतो . फार सोप्पी आहे, फक्त युट्युब उघडून व्हायरल होत असलेली भाषणे ऐका एका दिवसात कळेल तुम्हाला.
आता उदाहरणार्थ परवाच एक भाषण ऐकले : एक तरुण लहान मुलगी तावातावाने भाषण देत म्हणाली - मुख्यमंत्रीसाहेब, आम्ही तुम्हाला आमचा हक्क मागतोय , तुमची बायको नाही मागत !
हसून हसून पुरेवाट झाली =)))) आता हे स्वाभाविक आहे की त्या पोरीला ती काय बोलत आहे ते कळत नाहीये, कोणी तरी लिहून दिलेली पोपटपंची चालू आहे पण तरीही नुसते शब्द पाहून तुम्हालाही कळले असेल ते कोणी लिहिले असावे ते !!
तरी मी तुम्हाला फार मवाळ उदाहरण दिले आहे , अजून एक दोन जहाल उदाहरणे दिली तर तुम्ही काही न सांगताच त्या लोकांच्या झेंड्याचा रंग ओळखाल.
तस्मात आहे हे असं आहे, शब्दांची निवड पाहून माणसाच्या सामाजिक स्थिती बद्दल अंदाज बांधता येतो ही वस्तुस्थिती आहे.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने |
शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु ||
शब्दचि आमुच्या जीवीचे जीवन |
शब्द वाटे धन जनलोका ||
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव |
शब्देचि गौरव पूजा करु ||
असं तुकोबा म्हणून गेलेत.
शब्द हा आपल्या सामाजिक उच्च नीचतेचा आरसा आहे , अतएव शब्द आपण जपुनच वापरले पाहिजेत !
आता धाग्याच्या संदर्भाने सांगतो की करुणानिधी हे व्यक्तीगत पातलीवर कितीही दीर्घद्वेषी असतील, पण एकदा त्यांचे देहावसान झाले की वैर संपले मतभेद संपले - मरणान्तानि वैराणी !!
एकदा माणूस गेल्यावर त्याच्याविषयी कसली चर्चा करताय ? जे जिवंत आहेत त्यांच्या विषयी बोला की !
असो।
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 08/12/2018 - 18:53
नवीन
हम्म.. .......... ........... ............. ............... ...
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Fri, 08/10/2018 - 22:35
नवीन
मिपावर "फाईट क्लब" म्हणून एक वेगळा टॅब निर्माण करता येईल काय?
म्हणजे तिथे फक्त भांडणेच करायची, कुठलीही चर्चा नाही, लॉजिक नाही! नुसतं एकमेकांच्या प्रतिसादावर तुटून पडायचं! :D
राग जिरून भांडण संपेपर्यंत तिथेच धुळवड चालू द्यायची!
एखाद्या धाग्यावर वातावरण तापलं कि लगेच "भेट तिकडे मग सांगतो" अशी धमकी द्यायची!
सगळी लोक आपला राग तिथे जाऊन शांत करू शकतील, आणि इतर धाग्यांवर शांतता देखील राहील!
याशिवाय अर्थातच प्रसिद्धी देखील भरपूर मिळेल! लांबून लांबून लोक येतील खास "फाईट क्लब" साठी!
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Sat, 08/11/2018 - 16:24
नवीन
कल्पना आवडली , पण फाईट क्लब ऐवजी आखाडा असे मराठमोळे नाव देवू किंवा 'तांबडी/लाल माती' असे सूचक नाव देता येईल.
- Log in or register to post comments
भ
भाते
Tue, 08/14/2018 - 08:22
नवीन
मिपा सदस्यांसाठी खफची सोय आहे याची सगळया मिपा सदस्यांना बहुदा कल्पना असेल अशी अपेक्षा आहे. मिपाकरांना जो काही धिंगाणा, धुडगुस घालायचा आहे तो खफवर करु देत ना! एकमेकांच्या भांडणाची जाहीर वाच्यता कशाला? आता जर नळावरची भांडणे मिपासदस्य नसलेल्या मिपावाचकांसमोर जाहीरपणे करायची हौस असेल तर गोष्ट वेगळी!
तळटीप - जरी मी तुमच्या प्रतिसादाला उत्तर दिले असले तरी ते तुम्हाला उद्देशून नाही आहे याची कृपया नोंद घ्यावी. हा प्रतिसाद समस्त मिपाकर सदस्यांसाठी आहे.
वाचनमात्र
भाते
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Tue, 08/14/2018 - 08:38
नवीन
अहो, खफ वर नीट भांडता येत नाही हो...
जे लोक निवांत गप्पा मारायला तिथे येतात ते इथे भांडू नका म्हणतात, काय तो धिंगाणा धाग्यावर घाला... (इन जनरल हा! मलाच असे नाही, सगळ्यांना)
मग मी म्हणतो लोकांनी मनसोक्त भांडायचं तरी कुठं?!! ;)
#नेशनवॉण्टसटूनो
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
Fri, 08/10/2018 - 22:47
नवीन
कोणी दिली आहे हो अशी धमकी? (आमची ती पद्धत असली तरी)
इथे फाईट क्लब करायची कोणाची इच्छा होती? उगाच काही लोकांनी चर्चेला व्यक्तिगत रूप दिले, नाहीतर विषय केव्हाच संपला होता.
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Fri, 08/10/2018 - 23:15
नवीन
अहो त्या प्रतिसादातील घटना आणि कल्पना या काल्पनिक आहेत. त्यांचा कुठल्याही जिवंत अथवा मृत धाग्याशी संबंध नाही.
तसा संबंध आढळल्यास तो एक योगायोग मानावा! :)
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
Fri, 08/10/2018 - 23:34
नवीन
हे ठीक आहे.
आम्ही तर केव्हाच हा धागा वाचनमात्र करावा किंवा मिटवून टाका हि विनंती संपादकांना केली होती पण काही लोकांना आणखीन प्रतिसाद द्यायची खाज होती. देऊ देत कि त्यांना प्रतिसाद आम्ही बसलोच आहोत वाट बघत त्यांच्या प्रतिसादाची.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 08/14/2018 - 14:15
नवीन
हे म्हणजे
सरकार म्हणते पाणी वाचवा, कागद वाचवा.... अरे मग सामान्य माणसाने धुवायचे कशाने?
अश्या टाईपचा प्रश्न वाटतोय =))
- Log in or register to post comments
न
नाखु
Sun, 08/19/2018 - 03:39
नवीन
हा आणि नेशन वाला प्रतिसाद वाचून खूप हसलो
दोघांचेही आभार
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Sat, 08/11/2018 - 10:21
नवीन
धाग्यावर चर्चा होत असताना खेळत वातावरण ठेवण्याची अलिखित जबाबदारी धागामालकाची असते पण इथं तुम्हीच ज्यास्त पातळी सोडलेली दिसतेय या मुळे हानी मिसळपाव ची होणार आहे . दहा दिवसांपूर्वीच व्हाट्सएप मूळे मिसळपाव ची हानी झाली का या विषयावर मिपा च्या तज्ञ मंडळींनी सभासद वाढवण्यासाठी एक से एक सल्ले ऐकवले होते .
अशा पार्श्वभूमीवर मिपा ची हानी होण्याची शक्यता असेल तर विनाकारण वाद घालण्या पेक्षा तात्विक चर्चेवर भर दिला पाहिजे . तुम्हा दोघांनीं शाब्दिक हल्ले करताना पातळी चा विचार केला नाही , खालच्या पातळीवरचे शब्द वापरण्यात कसला आलाय शूरपणा ?. प्रा बिरुटे शांत बसल्यानंतर सुद्धा तुम्ही चारपाच रिप्लाय मध्ये आक्रमक भाषा वापरली , त्या ऐवजी दुर्लक्ष केले असते तर रंगीला भाऊ तुमची महत्ता अजून वाढली असती .
मला प्रश्न पडलाय संपादक मंडळ करुणानिधी सारखा काळा चष्म्या घालून बसले आहे का ? या वादा मध्ये संपादकांना आनंद वाटतोय .
आता कृपाकरून माझ्यावर पण हल्ला करू नका
- Log in or register to post comments
र
राही
Sat, 08/11/2018 - 15:46
नवीन
उगीचच आक्रस्ताळी भाषा वापरल्याने वातावरण बिघडते.
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
Sat, 08/11/2018 - 17:28
नवीन
धाग्यावर चर्चा होत असताना खेळत वातावरण ठेवण्याची अलिखित जबाबदारी धागामालकाची असते पण इथं तुम्हीच ज्यास्त पातळी सोडलेली दिसतेय
मान्य आहे ट्रम्प साहेब , पातळी सोडायची मला काही हौस नव्हती पण समोरची व्यक्ती जर उगाच वैयक्तिक पातळीवर येत असेल तर ते सहन करण्यासाठी आम्ही गांधीवादी असण्याची हि गरज नाही ना. (संपादित)
साहेब एक लिमिट असते फालतूपणा सहन करण्याची ती ओलांडली गेली तेव्हाच आक्रमक भाषा वापरली गेली आहे हे लक्षात घ्या. विषय भटकवणे हा काही जणांचा हातखंडा असला तरी त्याला प्रतिबंध करणे आपल्या हातात असते हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय पटला तर स्वीकारा नाही पटला तर फाट्यावर मारा.
सभ्य लोकांसाठी सभ्य आणि अति शहाण्यांसाठी महा अतिशाहणा - रंगीला रतन
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
Sat, 08/11/2018 - 17:43
नवीन
संपादक महाशय जर माझा प्रतिसाद संपादित करत असाल तर माझी जात काढणारा प्रतिसाद का तसाच ठेवला आहे ह्याचे स्पष्टीकरण द्याल का?
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Sat, 08/11/2018 - 19:14
नवीन
हा हा हा
रंगील्या, प्रतिसाद संपादित झाले म्हणून काय तुझी आयडेंटिटी बदलणार आहे का ? तू जे शब्द वापरलेस ते पुसले म्हणून ते शब्द ज्याचे प्रतिनिधित्व करतात ती वृत्ती पुसली जाणार आहे का ?
आज ना उद्या परत काहीतरी लिहिशील तेव्हा ते परत दिसून येणारच आहे, आता कितीही सोज्वळ शब्द वापरल्याने तुझे स्वरूप लपले जाईल काय :D
काक: कृष्ण पिक: कृष्ण, को भेद: पिककाकयो: ।
वसंत समये प्राप्ते, काक काक: पिक पिक: ।।
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
Sat, 08/11/2018 - 19:44
नवीन
छोड ना बे ... अब जाते जाते काहेका गिला और शिकवा?
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Sat, 08/11/2018 - 18:54
नवीन
समोरची व्यक्ती आपल्या पेक्षा वयस्करच आहे असे गृहीत धरून टंकलेखन केले तर मला वाटतंय असे फालतू शब्द वापरण्याची दोघांनाही गरज पडली नसती .
सुरवातीला मी सुद्धा मनोरंजना साठी बिरुटे साहेबांच्या बाजूने उतरलो होतो , पण त्यातील फोलपणा ' खिडकीतील शुकशुक ' आणि ' झोडपणे , फाट्यावर मारणे , मुलाहिजा न बाळगणे ' या वापरलेल्या शब्दा मूळे कळला .
तुमचे दोघांचे वाद वैयक्तिक पातळी वर पोहचल्या नंतर फक्त ' राही ' चां प्रतिसाद सोडता बाकी सदस्यांनी इकडे न फिरकण्याची काळजी घेतली , बरोबर आहे कशाला झुंजीच्या मध्ये उतरतील ? , सगळ्यांनीच असे एकमेकांना फाट्यावर मारत बसले तर लक्ष्मीनगर , इंदिरानगर मध्ये राहत असल्याचे फील येईल . फक्त आई बहिणी वरून शिव्या घालायच्या बाकी राहिल्या होत्या .
श्री जयंत कुलकर्णी , श्री सुहास म्हात्रे , कुमार साहेब , आदित्य जी
आणि अजून दोन तीन आदरणीय लेखकांच्या समृद्ध लेखांना मुश्किलीने 30 / 35 प्रतिसाद आणि हा पातळी घसरलेला लेख जर शतक मारत असेल तर संपादकांनीं डोळ्यावरची पट्टी काढून असले वादग्रस्त लेख बुडवले पाहिजेत .
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
Sat, 08/11/2018 - 19:27
नवीन
ट्रम्प साहेब हा माझा मिपा वरचा शेवटचा प्रतिसाद आहे,, कोणालाही व्यक्तिगत पातळीवर दुखावणे हे मला पटत नाही. माझा तसा कुठलाही उद्देश पण नव्हता पण काही गोष्टी अशा घडतात कि तेव्हा तुमच्या हातात कुठलाही नियंत्रण राहत नाही. माझ्याकडून माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठ्या व्यक्तींचा उपमर्द झाला असल्याच्या जाणीवेतून मी कायमस्वरूपी मिसळ पाव या माझ्या आवडत्या संकेतस्थळावरून गमन करत आहे . सदस्य नाही राहिलो तरी वाचक म्हणून कायम मिपाशी निगडीत राहीनच.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे , मार्कस ऑरेलियस आणि राही यांची माफी मागून आपली रजा घेतो.
कळावे लोभ असावा
रंगीला रतन
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
Sat, 08/11/2018 - 20:11
नवीन
पण तुम्ही तर गमन करतो म्हणताय,
वर कळावे लोभ असावा पण म्हणताय!
मला पडलेला दुसरा जेन्यूईन प्रश्न हा की
आता नेमकं कळवायचं कुठं? अन लोभ कसा ठेवायचा!
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Sun, 08/12/2018 - 22:05
नवीन
मलाही धक्का बसला होता त्यांचे चित्र मुखपृष्ठावर पाहून.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 08/13/2018 - 08:14
नवीन
अरेरे ! आचार्य अत्रे यांच्या १२० व्या जयंतीचा सर्वांना विसर पडला .
कोणीही त्यांचे बॅनर केले नाही वगैरे वगैरे ....
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 08/13/2018 - 10:49
नवीन
करुणानिधीत आणि आचार्य अत्रे, साहित्य लेखन, हजरजवाबी विनोद बुद्धी, मातृभाषा प्रेम , आणि जातीयतेला विरोध, सामान्यांचा कळवळा हि समान वैशिष्ट्ये असावीत. एवढ्या भांडवलावर करुणानिधी राजकारणात यशस्वी झाले तेच गुण प्र.के. अत्रेंकडे होते पण म्हणावे तसे प्रकेंच्या हाती राजकीय यश लागले नाही. कदाचित हिंदी भाषा विरोध टोकाला नेणे, घराणेशाही आणि निवडणूक खर्चाच्या निमित्ताने आर्थीक साशंकीत व्यवहारात गुंतवून घेणे , बाळाला धुतलेल्या पाण्यासोबत उत्क्रांत संस्कृतीतील सकारात्मक गोष्टींचे बाळ फेकणे प्र.के.ंना जमले नसावे. करुणानिधीत आणि प्रकेत एक फरक जन्मतः होता जो प्रकेंना पुसणे शक्यही नव्हते.
प्रके प्रके होते त्यांचे नाव काढले गेलेच आहे तर व्यक्तीपुजा विरहीत अभिवादन __/\__
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 08/13/2018 - 10:11
नवीन
मार्कस यांचे वाक्य
दुर्लक्षीत न करता, विचारांच्या सेंसॉरशीपसाठी वापरल्या जाणार्या व्यक्तो पुजेच्या या भारतीय स्वरुपाची चर्चा होण्याची गरज असू शकेल का ?
- Log in or register to post comments
R
Ram ram
Tue, 08/14/2018 - 10:57
नवीन
करुणानीधी कुठे राज ठाकरे कुटं? खंजीरवाल्या मानसाच्या नादी लागून रायलाय नव्हं? रमेश किणीला कोणी मारले?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3