मिपाच्या मुखपृष्ठावर करुणानिधींना श्रद्धांजली? ये बात कुछ हजम नही हुवी!
तामिळ भाषेसाठी त्यांचे योगदान कितीही मोठे असले तरी करुणानिधींसारख्या भ्रष्टाचार, घराणेशाही , LTTE शी संबंध असल्याचे आरोप झालेल्या व्यक्तीला मिपा सारख्या मराठी अंतरंग-मराठी अभिव्यक्ती ब्रीदवाक्य असणाऱ्या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर श्रद्धांजली? ये बात कुछ हजम नही हुवी!
चू.भू.द्या.घ्या.
🗣 चर्चा
(134)
उ
उपयोजक
Fri, 08/10/2018 - 16:46
नवीन
या करुणानिधी आणि त्यांच्या पक्षाला स्वभाषेबद्दल एवढंच प्रेम होतं तर त्रिचनापल्ली आणि चेन्नैत राष्ट्रभाषा प्रचार समितीमार्फत हिंदी शिकवणं अजूनही का सुरु आहे?
याचं कारण सांगाल?
- Log in or register to post comments
र
राही
Fri, 08/10/2018 - 18:52
नवीन
त्यांनी हिंदी बॅन करा असं म्हटलेलं नसावं. फक्त कुठूनही तमीळ भाषा आणि संस्कृतीवर कुरघोडी किंवा तिची गळचेपी होऊ नये असंच त्यांचं म्हणणं असावं बहुधा. मात्र त्या काळात त्रिभाषासूत्र जे निघालं होतं ते हिंदी भाषकांना खूपच फायदेशीर आणि अन्य प्रादेशिक भाषा बोलणाऱ्यांना अन्यायकारक होतं. त्याला कडाडून विरोध झाला होता.
राष्ट्रभाषाप्रचार समिती ही दक्षिणेत म्हणजे मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये बऱ्याच वर्षांपासून- अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत आहे. मद्रास प्रेसिडेन्सी हा बराच मोठा इलाका होता आणि तो बहुभाषिक होता. सध्याचा तमीळनाडु हा त्याचा एक भाग होता.
- Log in or register to post comments
र
राही
Fri, 08/10/2018 - 18:59
नवीन
आणि त्या काळात हिंदी पाट्याबाबत ' खळ्ळ खट्याक' कदाचित झालंही असेल पण भाषिक संस्था सक्तीने बंद पाडल्या गेल्या नसाव्यात. आता काळानुरूप किंवा उद्दिष्ट साध्य झाल्यामुळे तमीळ अस्मितेची धार बोथट झाली आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 08/11/2018 - 04:01
नवीन
@ राही
१) हिंदी भाषेस संवाद माध्यम म्हणून स्विकारण्यात इतर भाषिकांच्या साशंकतांमुळेच त्रिभाषासुत्राचा जन्म झाला. त्रिभाषा सुत्रामुळे हिंदी भाषी पाल्यांनाही हिंदी शिवाय एक इतर भारतीय भाषा शिकणे अनिवार्य होणार होते . हिंदी भाषकांनी त्रिभाषा सूत्र स्विकारले पण इतर भारतीय भाषा शिकण्या एवजी संस्कृत शिकण्याची पळवाट निवडली. आक्षेप संस्कृत शिकण्यावर नाही, हिंदी पाल्यांनी तिसरी भाषा हिंदी शिवाय इतर प्रादेशिक भाषा न निवडण्यावर आहे. आणि इतर भाषिकांचा हा आक्षेप एवढाच मर्यादीत ठेऊन आपापसात राजकीय समन्वय करुन हिंदी प्रदेशात इतर प्रादेशिक भाषा शिक्षणासाठी दबाव देता आला असता. द्रविड कळघम आणि त्यांचे तमिळ नेते आक्षेप घेण्यात सर्वात पुढे होते तर हिंदी शिवाय इतर भाषिकांशी समन्वयातही त्यांचा पुढाकार असावयास हवा होता. त्यात द्रविड कळघम आणि त्यांचे तमिळ नेतृत्व कमी पडले असे आपणास वाटत नाही का ?
२) हिंदीचा विरोध मुद्दा काही क्षणासाठी दूर करुन पहा , त्रिभाषा सूत्र घेऊन त्यांना किमान दक्षिणेतील इतर भाषांचे तेलगु/ कन्नड/मल्याळमचे शिक्षण त्यांना शाळातून देता आले असते ते तरी त्यांनी केले का ?
३) हिंदीच्या आक्रमणाला तर एकाच अपभ्रंश कुळातील असल्यामुळे मराठी आणि महाराष्ट्राला सर्वाधीक झेलावे लागते असे कोणते प्रत्यक्ष झेलणे तामीळींच्या वाट्याला आले ? केवळ त्रिभाषा सुत्रीत हिंदी शिकवण्याचे काम केरळ, कर्नाटक, आंध्र तिन्हींनी केले या तिन्हींनी भाषा शुद्धीकरणाच्या मोहीमा तमीळ लेव्हल ला नेल्या नाहीत या तिघांचे नेमके कोणते असे नुकसाने झाले ? तामीळ नाडूचा हिंदी विरोध हिंदीच्या प्रत्यक्ष आक्रमण फारसे न होताच पॅरानॉईआ/फोबीआ स्वरुपाचा नव्हता का ?
४) आपणास भाषा विवादातील काका कालेलकराम्ची भूमिका कल्पना आहे का ? हिंदी शिवाय इतर भाषीयांनी काका कालेलकराम्ची भूमिका का लावून धरली नाही ?
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
Fri, 08/10/2018 - 22:28
नवीन
काय बोलताय ह्याचे भान आहे का तुम्हाला ? कोणाची तुलना कोणा बरोबर करताय?
बाळासाहेबांनी तामिळ भाषिकांचे अतिक्रमण रोखण्यासाठी हटाओ लुंगी बजाओ पुंगी चा नारा दिला होता. जर तुमच्या लाडक्या करुणानिधींनी रोजगाराच्या संधी तामिळनाडूमध्ये निर्माण केल्या असत्या तर का त्या बिच्चार्या तामिळ लोकांना एवढे दूर महाराष्ट्रात येऊन स्थयिक व्हायची वेळ आली असती का?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 08/11/2018 - 06:55
नवीन
तामीळनाडूतून बाहेर पडलेले लोक मुख्यतः "ब्राम्हण" होते कारण "ग्रेट द्रविडीयन मुव्हमेंट"मुळे ब्राह्मणविरोधी वातावरणात त्यांना नोकऱ्या मिळणे शक्यच नव्हते.
त्यामुळे तेथील उच्च शिक्षित tambram (तामिळ ब्राम्हण) हे सरकारी मुलकी खात्यात गेले आणि पार उच्च पदावर पोहोचले. उदा. इसरो( कस्तुरीरंगन , राधाकृष्णन), भाभा अणुसंशोधन केंद्र /अणुऊर्जा आयोग (राजा रामण्णा, एम आर श्रीनिवासन, पी के अय्यंगार, आर चिदंबरम)
बाकी जे अर्धशिक्षित होते त्यांनी मुंबईत येऊन टायपिस्ट, स्वीय सहाय्यक सारख्या नोकऱ्या धरल्या. यात त्यांना इंग्रजी उत्तम येत होते ही वस्तुस्थिती. या लोकांनीच "माटुंगम" सारख्या ठिकाणी वस्ती केली. यांची दुसरी पिढी अमेरिकेत स्थायिक झाली आहे.
"बाकी हटाव लुंगी बजाव पुंगी" मुळे किती मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या हा एक वादाचा मुद्दा आहे
- Log in or register to post comments
च
चिगो
Mon, 08/13/2018 - 10:10
नवीन
ह्या वाक्यासाठी टाळ्या, राहीजी.. एवढं जरी नेत्यांना आणी जनतेला कळलं, उमगलं तरी अनेक तंटे, मतभेद आणि प्रश्न मिटतील.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
गुरुवार, 08/09/2018 - 20:03
नवीन
पेरियार/अन्नादुराई/करुणानिधी वगैरे मंडळींचे मराठीबद्दल काय विचार होते ह्यावर काय सांगता येईल कोणाला?
ह्यात जे उत्तर येईल त्यावरून मी (माझ्यापुरते) तामिळ भाषाप्रेमी करुणानिधी ह्यांचा मराठी भाषाप्रेमी वांडो म्हणून आदर करायचा की नाही हे ठरवून घेईन!.
(मराठमोळा) वांडो.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/10/2018 - 04:33
नवीन
अभ्यासेठ, धागा पाहिलाच नव्हता. अभ्या म्हटला की काहीतरी कुटाना आहेच. =))
अरे वेगवेगळे फोटो लावायचे ना भो.... भावनिक आणि वैचारिक गोंधळ होतो रे...आणि माणूस टेंपररी हर्ट बीर्ट होतो, तेही इथं व्यक्त येता होतं म्हणून, नाय तर तसंही त्याला काय किंमत बिम्मत नसते. मी तर अभ्या बॅनर आवडलं असा मेसेज करून मोकळाही झालो होतो.
स्व.मेजर कौस्तुभ राणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. स्व. करूणानिधी यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली.
अवांतर : अभ्यासेठ, संसार वगैरे काय म्हणतो ? आपण कधी भेटणार ? बसून गप्पा वगैरे करू म्हणतो. सॉरी हं एकाच प्रतिसादात वेगवेगळे विषय घेतल्यामुळे कोणा वाचकांच्या भावना वगैरे दुखावल्या असतील तर दिलगीरी वगैरे आहेच.बाकी चालू द्या....!
-दिलीप बिरुटे
(अभ्याच्या बॅनरचा फ्यान)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 08/10/2018 - 05:05
नवीन
धन्यवाद हो सर,
आपला कुटाण्याशी कायबी संबंध नसतो, तरी माझी सखी म्हणते तेच खरं बघा. ती म्हणते भानगडीतच पडत जाऊ नको. कशाला लष्कराच्या भाकऱ्या.
तरीबी एक वाचक म्हणून काय म्हणतो, आणलंय मरणाने त्यांना एकत्र तर तो काळ काय चुकीचा का? ही श्रद्धांजली आहे, घटनांची घेतलेली एक दखल. एक नोंद. ती पण वेगवेगळ्या शाईत लिव्हायचा अट्टाहास म्हणजे नवलच. एखाद्या काळविशेषांत दोन वेगवेगळ्या माणसांच्या मृत्यूची नोंद झाली म्हणजे दोघांना एका पंक्तीत बसवले असा अर्थ काढणे म्हणजे अवघड आहे.
येनिवे ते बॅनर बिनर काय नाय, तुम्ही या, मस्त जेवण करू, यासाठी आपल्या धनाजीरावाला कामाला लावू. जाताना आम्हा सुखी संसाराचा आशीर्वाद द्या. लै झाले.
आशीर्वादोच्छूक अभ्या..
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/10/2018 - 05:16
नवीन
>>>आणलंय मरणाने त्यांना एकत्र तर तो काळ काय चुकीचा का?
लै अवघड झालय भो. या पुढे माझ्याशी बोलतांना वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची एकत्र नाव घ्यायची नाहीत. वल्ली उर्फ़ प्रचेतस क्षेत्र आयटी, लेखन गड किल्ले शिल्प व प्रशांत क्षेत्र सायकलवर दिवस रात्र राहणे यांचा एकत्रित उल्लेखकरु नये.
संत तुकारामाच्या अभंगावर बोलणार असाल तर कबीर मी सहन करणार नाही. कमलहसन वर बोलणार असाल तर सैराटच्या मंजूळेच्या दिग्दर्शनावर बोलणार नाही, अजुन मोठी यादी आहे, ती संध्याकाळी टाकतो.
दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 08/10/2018 - 16:15
नवीन
आता रात्र होत आली, यादी कधी टाकणार आहात?
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Sat, 08/11/2018 - 08:07
नवीन
ही चूक अभ्याकडून ही असण्याची शक्यता आहे . त्याला सध्या आपण सोलापूरवाला की पुणेवाला अशा गोंधळाचा सामना करावा लागतोय ! :)))
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/10/2018 - 06:02
नवीन
प्रिय मालक, संपादक. सहसंपादक, संचालक. सह संचालक.
स.न.वि.वि
ज्या बॅनरविषयी ही चर्चा चालू आहे त्या बॅनरचे चित्र धाग्यात माळल्यास चित्र आणि चर्चा काय होती हे माझ्या येत्या पिढीला कळेल, तेव्हा चित्र धाग्यात माळुन उपकृत करावे ही नम्र विनंती.
अवांतर : 'तू नभातले तारे माळलेस का तेव्हा' हे गाणे ऐकल्यामुळे माळणे हा शब्द प्रतिसादात आला आहे. दोन वेगवेगळे विषय धागा वाचल्यापासून येत आहे. दिलगीरी आहेच.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
Fri, 08/10/2018 - 07:07
नवीन
कोणाच्या वैयक्तिक धाग्यात किंवा प्रतिसादात फक्त दोनच नाही चाळीस पन्नास विषय एकत्र आले तरी हरकत नाही.
कोणी व्यक्तिगत आयुष्यात त्याच्या आवडत्या , वंदनीय , आदर्श असलेल्या व्यक्तींचे अगदी १० x १२ इंच साईझ चे फोटो लॉकेट बनवून गळ्यात घालून मिरावले तरी कोणाची काही हरकत नाही.
मूळ विषय पब्लिकली डिस्प्ले होणार्या बॅनर वर करुणानिधींना दिलेल्या स्थानाचा आहे तो बॅनर कोणी बनवला हा नाही त्यामुळे उगाच चर्चेला व्यक्तिगत रूप देऊ नका. आधीच्या प्रतीसादाद जेम्स वांड यांनी सांगितल्या प्रमाणे चालू घडामोडींमध्ये संपादक मंडळाने श्रद्धांजलीचा धागा काढून काम भागले असते ज्यांना आहे कळवळा त्या व्यक्ती बद्दल त्यांनी वाहिली असती भावपूर्ण श्रद्धांजली प्रतिसादातून त्यावर. पण बॅनर हा संकेतस्थळाला भेट देणाऱ्या प्रत्येकाला इच्छा असो कि नसो दिसतोच दिसतो त्यासाठी कुठलं धागा व प्रतिसाद उघडून वाचायची गरज पडत नाही. तुम्ही प्रतिसादात सांगितलाय कि तुम्हाला बॅनर आवडला तुम्ही तसे कळवून मोकळे झालात. तसेच ज्यांना बॅनर पेक्षा त्याचं काही भाग नाही आवडला ते आणि ज्यांना आवडला तेही इथे व्यक्त झालेत. सदस्यांनी मन मोकळेपणाने आपापली मते माडली आहेत त्याला उगाच व्यक्तिगत बनवू नका.
मिपा हितचिंतक, वाचक - रंगीला रतन.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/10/2018 - 07:50
नवीन
>>>>>>> सदस्यांनी मन मोकळेपणाने आपापली मते माडली आहेत त्याला उगाच व्यक्तिगत बनवू नका.
ऑ.....! आपण जशी आपली मतं मांडलीत, त्या प्रमाणे मलाही माझं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. आपण हा धागा काढ़ण्याची तशी गरज नव्हतीच असं माझं व्यक्तिगत मत आहअसलं तरी पण मी तसं काही म्हणालेलो नाही, आणि मी ज्यांना काही म्हणालो असे आपणास वाटत आहे त्यांचा अजुन काही तसा आक्षेप दिसला नाही, तसं काही असेल तर माझं मी आणि ते पाहुन घेऊ आपणास त्यांनी किंवा मी मध्यस्थी कारायची सांगितलेले नाही...!
तेव्हा आपण काही काळजी करू नका आपण आपलं मत मांडून मोकळे झालात तेव्हा आम्हाला आमचंही मत मांडू द्यावे आभार...!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
Fri, 08/10/2018 - 10:31
नवीन
तुम्हीच आवरा जरा!
मिपा हि व्यक्ती नसून एक संस्था आहे असे आजवर मी मानत होतो. हा धागा काढून ब्यानर बद्दलची नाराजी कुणा व्यक्तीला उद्देशून व्यक्त केली नसून संपादक मंडळाकडे व्यक्त केली आहे. असे असताना तुम्ही उगाच तो ब्यानर बनवणाऱ्या कलाकाराला मधे ओढून चर्चा व्यक्तिकेंद्रित करत आहात.
आणि हो! तुमच्या सारख्या “जुन्या” जाणत्या सदस्याच्या प्रतिसादामुळे हा ब्यानर “अभ्या” यांनी बनवल्याची माहिती माझ्या सारख्या नवीन सदस्याला मिळाली त्याबद्दल आभार.
अभ्या साहेब तुमच्या कलेबद्दल कुठलीही टीका करण्याचा उद्देश हा धागा काढण्यामागे नव्हतं हे कृपया समजून घ्या हि विनंती.
संपादक मंडळास विनंती: या धाग्यावर येणाऱ्या प्रतिसादांमुळे नवीन वाचनीय धागे बोर्डावर खाली जात असल्याने हा धागा वाचनमात्र केला अथवा मिटवून टाकला तरी काही हरकत नाही.
मिपा हितचिंतक, वाचक - रंगीला रतन
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/10/2018 - 10:52
नवीन
आपलं काय म्हणनं होतं ते सांगायचं होतं तरसंपादक मंडळाला व्य नि करायचा ना मग, जाहीर धागा कशाला काढ़ायचा ? आता प्रतिसाद असेच येणार तिरपे तारपे, आणि मी संपादक मंडळाला धाग्यात चित्र टाका म्हणून सांगितले तुम्हाला नाही. कारण सदरील चर्चा कशाबद्दल आहे ते नवख्या माणसाला कळणार नाही म्हणून, तेव्हा तुम्ही उगा मला उपप्रतिसाद लिहायचे कारणच नव्हते. कारण एकदा तुम्ही खिड़कीत आलात आणि कोणी शुक शुक केल्यावर जुने जाणते म्हणून तक्रार नाय करायची. कळलं ना ? की नाही.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
Fri, 08/10/2018 - 12:01
नवीन
तुम्हीच आवरा जरा! (भाग २)
आपलं काय म्हणनं होतं ते सांगायचं होतं तरसंपादक मंडळाला व्य नि करायचा ना मग, जाहीर धागा कशाला काढ़ायचा ?
मागे कोणीतरी एका धाग्यावर "झेपत नसेल तर वाचू नका. कोणी अक्षता देऊन बोलावल नाहीये तुम्हाला" असा झकास प्रतिसाद दिला होता तोच तुमच्यासाठी पेस्टवतो
झेपत नसेल तर वाचू नका कोणी अक्षता देऊन बोलावल नाहीये तुम्हाला
आता प्रतिसाद असेच येणार तिरपे तारपे, आणि मी संपादक मंडळाला धाग्यात चित्र टाका म्हणून सांगितले तुम्हाला नाही. कारण सदरील चर्चा कशाबद्दल आहे ते नवख्या माणसाला कळणार नाही म्हणून, तेव्हा तुम्ही उगा मला उपप्रतिसाद लिहायचे कारणच नव्हते.
एकतर मी प्रतिसादात किंवा उपप्रतिसादात कुठेही धाग्यात चित्र टाकण्या बद्दल काही लिहील नाही तरी ते तुम्हाला दिव्यदृष्टीने दिसले. राहिली गोष्ट तिरप्या तार्प्या प्रतिसादांची तर त्याबद्दल काहीच आक्षेप नाहीये फक्त ते व्यक्तिकेंद्रित असू नयेत अशी इच्छा होती पण आता तुम्हाला वैयक्तिक पातळीवरच उतरायचय तर नाईलाज आहे.
मिपाच्या मुखपृष्ठावर करुणानिधींना श्रद्धांजली? ये बात कुछ हजम नही हुवी!
हे शिर्षक वाचून “सदरील चर्चा कशाबद्दल आहे ते नवख्या माणसाला कळणार नाही”
वाचक एवढे अनाडी असतात अशा भ्रमात तुम्ही आहात का?
तुम्ही खिड़कीत आलात आणि कोणी शुक शुक केल्यावर जुने जाणते म्हणून तक्रार नाय करायची. कळलं ना ? की नाही.
प्रतिसादात किंवा उपप्रतिसादात तुम्हाला जुन्या जाणत्या विषयी तक्रार कुठे दिसली बुवा? उलट आभार मानलेत तुमचे माहिती बद्दल कदाचित पुन्हा दिव्यदृष्टीने दिसली असेल!
आणि कळायचय काय त्याच्यात मी खिडकीत आल्यावर कोणी शुकशुक केले तर त्याला अभिवादन करायचे कि हाड करून हाकलून द्यायचे हे ठरवायला मी समर्थ आहे तुमच्याकडून ते शिकायची गरज नाही.
कोणीतरी एका धाग्यावर एका डॉक्टरांना “तुम्ही खरंच डॉक्टर आहात का हो?” असा प्रश्न विचारला होता.
तुमच्या साठी असाच प्रश्न दोनदा विचारावा वाटतो
तुम्ही खरंच प्राध्यापक आहात का हो?
तुम्ही खरंच डॉक्टर आहात का हो?
कळावे, लोभ असावा
“अरे ला कारे” संघटना (डोम्बिवली) सदस्य – रंगीला रतन
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/10/2018 - 14:01
नवीन
=)) डू आयडी घ्यावा लागला का प्रा.डॉ. कोण आहेत विचारायला
>>>>>>झेपत नसेल तर वाचू नका कोणी अक्षता देऊन बोलावल नाहीये तुम्हाला.
धागा काढल्यावर प्रतिसाद लिहिणारे तर लिहिणारच आणि तुम्हालाच फार त्रास झालाय बॅनरवर करुणानिधी आणि शहीद काणे पाहुन. आम्ही तर तुमचा धागा आणि तुम्हालाही इंजॉय करतोय तेव्हा झेपण्याचा प्रश्न नाय काका ! =))
>>>>आता तुम्हाला वैयक्तिक पातळीवरच उतरायचय तर नाईलाज आहे.
हो हो ! व्यक्तिगत पातळीवरच यायचंय तुम्हाला तेव्हा त्यासाठीच तहेदिलसे शुभेच्छा....! =))
>>>>>>प्रतिसादात किंवा उपप्रतिसादात तुम्हाला जुन्या जाणत्या विषयी तक्रार कुठे दिसली बुवा?
आपणच लिहिलेला प्रतिसाद वाचायचे विसरुन गेले का ? चांगलंय. चांगलंय ! या निमित्ताने डू आयडी लेखन करायला लागले हे काय कमी आहे ! =))
शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
Fri, 08/10/2018 - 14:12
नवीन
गेट वेल सून मामू!
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/10/2018 - 10:55
नवीन
>>>>>संपादक मंडळास विनंती: या धाग्यावर येणाऱ्या प्रतिसादांमुळे नवीन वाचनीय धागे बोर्डावर खाली जात असल्याने हा धागा वाचनमात्र केला अथवा मिटवून टाकला तरी काही हरकत नाही.
संपादक मंडळास विनंती, धागा राहु द्यावा. मला प्रतिसाद लिहायचे आहेत. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Fri, 08/10/2018 - 11:00
नवीन
बाजारात ओरडून विकणारा माती विकू शकतो , पण शांत बसणारा सोने विकू शकत नाही .
पन्नास वेळा न सांगणारा मीपा हितचिंतक !!!!!!!!
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Fri, 08/10/2018 - 11:14
नवीन
प्रतिसाद रंगीला साठी होता पण चुकून डॉप्रा कडे गेला
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 08/10/2018 - 06:12
नवीन
आमच्या गावात पाण्याचे नळ आले तेव्हा मिपावर नव्हतो. मात्र तेव्हा मिसळपाव होते? असल्यास तेव्हा या ऐतिहासिक घटनेवर मिपावर लेख आला होता का? आला नसल्यास तुम्हा शहरी लोकांना ग्रामिण भागातील जनतेचे सुख बघवत नाही असे मानायचे का? आला असल्यास असाच लेख आमच्या शेजारच्या गावात नळाचे पाणी आले तेव्हा आला होता का? नसल्यास असा दुजाभाव का?
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Fri, 08/10/2018 - 11:10
नवीन
जाऊ द्या हो , परसोनाल नका घेऊ .
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 08/10/2018 - 17:10
नवीन
बरोबर. म्हणून तुम्ही धावून आलात. :)
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 08/10/2018 - 07:36
नवीन
पहिल्यांदा अभ्या चे असे वादग्रस्त बॅनर बनवल्याबद्दल अभिनंदन !
नेहमीसारखे छान बनवले असते तर कोणीही दखल घेतली नसती .
बदनाम हुये तो क्या हुवा ? कुछ ना तो हुवा :)
या निमित्ताने दखल घेतली हे ही नसे थोडके .
बाकी बॅनर , धागे वगैरे : इथे सगळ्यांना धागे काढायचे आणि बॅनर बनवायचे स्वातंत्र्य आहे.
गडकरी , फडके असतील किंवा इतर कोणीही असेल , प्रत्येक वेळी अभ्या..ने बॅनर का बनवावे ? ज्याअंना जे बॅनर बनवायचे आहे त्यांनी नीलकांत , संपादक मंडळाशी संपर्क साधून बॅनर पब्लिश करावे . तेच धाग्याबद्दल लागू होते.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 08/10/2018 - 08:08
नवीन
ह्या कामाचे श्रेय मला नको,
माझा वाटा अल्पसा, कर्ता करवित्याकडे पोहोचले श्रेय.
धन्यवाद.
- Log in or register to post comments
आ
आदिजोशी
Fri, 08/10/2018 - 08:23
नवीन
पूर्वी असा प्रश्न विचारल्यास 'जे आहे ते असे आहे. आवडले नसल्यास चपला घाला आणि चालू पडा बा***'. असे उत्तर मिळत असे. असो.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 08/10/2018 - 10:17
नवीन
पूर्वीची ब्यानरेसुद्धा अशी नसायचीत ;)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 08/10/2018 - 10:50
नवीन
अनुष्कावैणीची आठवण येऊ लागली काय टक्या?
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 08/10/2018 - 17:12
नवीन
तेव्हा टक्याचा मिपाजन्म झाला नसेल बहुतेक.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 08/13/2018 - 10:19
नवीन
ज्ञानोबा, तुकारामांच्या जागेवर फटाकडीचे चित्र पाहिल्याचे स्मरते...आता ते मिसळपाव होते का "स्क्रीनशॉट" ते आठवत नाहीये ;)
- Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत
Fri, 08/10/2018 - 09:08
नवीन
करुणानिधी यांना मिपावर स्थान मिळाल्याचे पाहून बरे वाटले. तामिळ भाषेला अभिजात दर्जा मिळवून देताना त्यांनी (आणि त्यांचा विरोधी पक्षांनीही) प्रयत्न केले होते. त्यांचे तामिळ साहित्यातील योगदान महत्वाचे आहे.
त्यांच्या राजकीय मतांबद्दल सहमत नाही. पण ते एक असो.
मातृभाषेवर प्रेम करणाऱ्या आणि त्यासाठी झटणाऱ्या करुणानिधींना श्रद्धांजली..
शहीद मेजर राणे यांना श्रद्धांजली!
अवांतर: बरीच वर्षे झाली मराठीला अभिजात दर्जा मिळणार हि अजूनही दरवर्षीच्या २७ फेब्रुवारीची बातमी आहे.
बाकी चालू देत ....
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 08/10/2018 - 09:19
नवीन
मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यावर नेमके काय होईल?
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/10/2018 - 11:13
नवीन
अवांतर होईल म्हणून इथे लिहित नाही. का लिहु ??
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 08/10/2018 - 11:19
नवीन
लिहा.
नैतरी अजून काय अवांतर व्ह्यायचे राह्यलंय?
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
Fri, 08/10/2018 - 12:05
नवीन
सहमत
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/10/2018 - 14:18
नवीन
>>>>>नैतरी अजून काय अवांतर व्ह्यायचे राह्यलंय?
:(
आपल्या मताचा आदर आहे, वेळ मिळाला की लिहितो. ;)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 08/10/2018 - 16:11
नवीन
कधी वेळ मिळणार तुम्हाला??
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 08/10/2018 - 17:17
नवीन
प्रा डॉ नी उत्तर दिले की मलाही सांगा हं.
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
Fri, 08/10/2018 - 12:04
नवीन
लिहा हो...
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 08/10/2018 - 16:59
नवीन
काही तरी नक्की होईल.
हे वाचून एक श्लोक आठवला
यस्य कस्य तरोर्मुलं
येन केनापी मर्दितं
यस्मै कस्मै प्रदातव्यं
यद्वा तद्वा भविष्यति
अर्थात
कोणत्या तरी झाडाची मूळे घ्यावीत
ती कशाने तरी ठेचावीत
कुणालातरी द्यावीत
म्हणजे
काही तरी नक्की होईल
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 08/10/2018 - 17:18
नवीन
हा श्लोक मिपाकर युयुत्सु यांच्या मिपा स्वाक्षरीमध्ये असायचा.
- Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत
Tue, 08/14/2018 - 08:57
नवीन
प्रा डॉ ची प्रतिक्रिया येईल, त्यात अधिक माहिती असेल पण माझ्या बाजूने ह्या दोन विटा. :
प्रा हरी नरके यांचा ब्लॉग
हा ब्लॉग लिहिला तेव्हा प्रा हरी नरके अभिजात मराठी भाषा समितीचे समन्वयक होते, आत्ताचे माहिती नाही.
Wikilink
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 08/14/2018 - 09:46
नवीन
हा फायदा पण आहे बरकां ! या १००, ५००, १००० कोटींचे नेमके काय करणार हा प्रश्न प्रचेतस रावांच्या बाजूनेअॅडवान्स मध्येच विचारतो पण प्रचेतस राव किंवा अभिजातराव प्रश्न मागे घ्या म्हणाले तर नक्कीच मागे घेऊ. नाही नाही मागे घेतलाच.
पण १००, ५००, १००० कोटी खर्च करण्याची कपॅसिटी तर राज्य सरकारची पण असते पण दानत आणि मतपेटी ची जुळवणूक सुद्धा महत्वाची असते. आता जिथली मतपेटी त्रिशंकु परैस्थिती निर्माण करु शकते अशा भाषांचे अभिजाततत्व लौकर मान्य होते हे.वे.सान.ल.
केंद्र सरकार कडून एवढा पैसा आणि बाकी सुविधा प्रत्येक राष्ट्रीय भाषेसाठी मिळण्यास खरे म्हणजे काहीच हरकत नसावी. पण शिक्षण असो नौकरी असो वा अजून कोणते क्षेत्र सर्वांनाच जोजे वांछिल तोते एवजी काहींनाच राक्षण्य आणि दाक्षिण्यच्या तत्वावर वाटले म्हणजे, मोठे झाल्याचे आणि मोठे केल्याचे समाधान जे लाभते ते सर्वात महत्वाचे .
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 08/14/2018 - 14:38
नवीन
मी तो प्रश्न विचारणार नाही.
माझे म्हणणे मूळात मराठी ही अभिजात भाषा आहे की नाही ह्याबद्दलचे आहे. माझ्या माहितीप्रमाणे भाषा अभिजाततेचे निकष म्हणजे भाषा प्राचीन हवी, त्या भाषेत विपुल आणि समृद्ध लेखन झालेले असले पाहिजे आणि ती स्वतंत्ररित्या विकसित झालेली असली पाहिजे.
ह्या तिन्ही निकषांवर मराठी भाषा उतरत नाही असे माझे मत आहे. नरके वगैरे अभिजाततेचे समर्थक महाराष्ट्री प्राकृतालाच मराठी भाषा असे समजतात जे माझ्यामते चूक आहे. प्राकृतातील कित्येक शब्द मराठीत नाहीत. मराठी विकसित झाली ती संस्कृत, प्राकृत, अरबी, फारसी ह्या भाषांमधून. मराठीत एक ज्ञानेश्वरी सोडता अभिजात लेखन फारसे आढळत नाही. (गाथासप्तशती ही प्राकृतात आहे त्यामुळे त्याचा विचार मी येथे करत नाही.) तुकाराम गाथा, पंडिती काव्ये ही तुलनेने अलीकडची.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 08/14/2018 - 15:42
नवीन
प्रचेतसजी तुमचा प्रश्न तात्वीक दिसतोय आणि मागणी करणार्यांची मागणी व्यावहारीक (+ जनतेची भावनिक) अधिक असावी. एकदा जनतेच्या भावनांनी मनावर घेतले आणि मतपेटीला अडले की तत्वतः काय बरोबर ते बाजूस पडून भावना आणि मतपेटी काय म्हणेल ते होत रहाते, त्याला नाईलाज आहे.
हा प्राडॉसरां नी भाष्य करण्याचा प्रांत झाला पण मानवांच्या वापरातील भाषांसाठी लागणार्या व्यवहारातील गरजा विषयक सुविधा मिळवण्यासाठी अभिजात - गैर अभिजात अशा वर्गिकरणावर भर असण्याबद्दलच मी मुळात साशंक आहे. हे जन्माधारीत विषमतेसारखे झाले. केंद्रिय सत्तेच्या साठमारीसाठी दक्षिणी राजकीय पक्षांना विशेष पैसे वाटण्या साठी अस्मिता चुचकारण्यासाठी घातलेला घोळ आहे. इतरांंची मागणी मागे पर्यंत न देता प्रत्येकाचा मागेल तसा मतपेटीशी जुळेल असा इगो आणि राजकीय हितसंबंध चे कारण आहे. अभिजातता हा देखावा आहे. तामिळ अभिजात नसती तरी काही कारणे काढून सत्तेच्या साठमारीसाठी तेवढा वाटा वळता केंद्रसरकारला करावाच लागला असता हि वस्तुनिष्ठ बाजू असावी.
लॉजीकली फॉलशिअय्स अर्ग्यूमेंट वाटते. पृत्वीवर माणूस पहिल्यांदा संवाद साधला असेल तिच भाषा पूर्ण स्वतंत्र आणि प्राचीन असू शकते त्या नंतरच्या भाषा स्वतंत्र विकसित असतात - भाषिक गटांचा फरक सुचित करायचा असेल तरी प्रोटो भाषां पर्यंत जावे लागेल संस्कृत असो वा तमिळ यांच्याही आधी काही प्रोटो भाषा असली पाहीजे ज्याच्या संशोधनाला मदत लागू शकते. सर्वसाधारण ललित साहित्याला आणि जिथे लिहिले जाते आहे तिथे विशेष मदतीची गरजच काय ?
या निकषावर विपुल लेखन होणार्या भाषांची मदत तोडुन ज्यांच्यात विपुल लेखनाचा अभाव राहीला अशा वंचित भाषांना मदतीची गरज आहे तिकडे निधी वळवावेत.
भाषेसाठी पैसा आणि सुविधा हव्या असतील तर त्या भाषा तज्ञांनी सरळ गरज पटवावी पक्के नसलेले आधार शोधू नयेत असे मलाही वाटते.
आणि कुणि काही म्हणाले तरी माझी भाषा माझ्या सर्व उणीवांसहित अभिजात आहे ती इतरांसाठी २१व्या शतकातील भेसळयुक्त असली तरीही.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Fri, 08/10/2018 - 11:32
नवीन
यानिमित्ताने एक आठवण ताजी झाली.
अंधश्रद्धेविरुद्ध लढा देणारे नरेंद्र दाभोलकर आणि प्रसिद्ध व वलंयाकित ज्योतिषी जयंत साळगावकर यांच्या बातम्यांनी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर एकाच दिवशी मोठी जागा व्यापली (दोघांचा मृत्यू दिनांक २० ऑगस्ट २०१३)
विज्ञानवादी लोक ज्योतिषशास्त्र ही अंधश्रद्दा आहे असे मानतात (आता ते तसे आहे की नाही हा वाद बाजूला ठेवूयात) त्यामुळे हा योगायोग मोठाच विचित्र होता.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »