मिपाच्या मुखपृष्ठावर करुणानिधींना श्रद्धांजली? ये बात कुछ हजम नही हुवी!
तामिळ भाषेसाठी त्यांचे योगदान कितीही मोठे असले तरी करुणानिधींसारख्या भ्रष्टाचार, घराणेशाही , LTTE शी संबंध असल्याचे आरोप झालेल्या व्यक्तीला मिपा सारख्या मराठी अंतरंग-मराठी अभिव्यक्ती ब्रीदवाक्य असणाऱ्या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर श्रद्धांजली? ये बात कुछ हजम नही हुवी!
चू.भू.द्या.घ्या.
🗣 चर्चा
(134)
न
नीलकांत
गुरुवार, 08/09/2018 - 09:52
नवीन
बहुआयामी लोक असतात. त्यांच्या काही गुणांचे कौतुक करण्यात अडचण नाही. करुणानिधी हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते.
मिपातर्फे त्यांना श्रद्धांजली देण्यात आली ती त्यांच्या आपल्या मातृभाषेचा अभिमान जपणाऱ्या नेत्याच्या स्वरूपात. त्याकाळात जेव्हा केंद्रशासनाच्या शक्तीने हिंदी भारतावर लादण्याचा प्रयत्न केला जात होता तेव्हा अन्य भारतीय भाषांनी त्याला विरोध केला. त्यामध्ये तामिळनाडू , तामिळ जनता व करुणानिधी पुढे होते. आज मराठीला प्रादेशिक व हिंदीला राष्ट्रीय समजणाऱ्या दुर्दैवी काळात मराठीचा अभिमान कसा बाळगावा यासाठी तामिळकडून शिकण्यास काहीच हरकत नाही असे वाटते.
मराठीचा उल्लेख झाल्यावर सावरकरांचा उल्लेख येतो. त्यांच्या उदाहरणानुसार बोलायचे झाल्यास ज्या भावनेने म्हणजे केवळ प्रेरणा मिळावी म्हणून जोसेफ मॅझणी व गॅरीबाल्डी यांचे चरित्र मराठीत लिहिले तश्याच, पण येथे भाषिक अस्मितेच्या संदर्भाने करुणानिधीना श्रद्धांजली.
- मराठी नीलकांत
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 08/09/2018 - 11:06
नवीन
ते स्वाक्षरीत जरा "एम निलकांथ" केलं तर जास्त संयुक्तिक ना? ;)
- Log in or register to post comments
ओ
ओम शतानन्द
Fri, 08/10/2018 - 09:46
नवीन
बहुआयामी लोक असतात. त्यांच्या काही गुणांचे कौतुक करण्यात अडचण नाही. करुणानिधी हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते.
नथुराम गोडसे हे ही बहुआयामी व्यक्तिमत्व होते.
त्यांच्याही गुणांचे कौतुक करण्यात अडचण वाटू नये.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 08/09/2018 - 10:45
नवीन
भाषिक अस्मितेचा मुद्दा असला तरीही मलाही करुणानिधी ब्यानर पटलेले नाही. मातृभाषेचा अभिमान आणि भाषेचा अट्टाहास ह्या वेगळ्या गोष्टी आहेत आणि तामिळी अभिमान हा अट्टाहास रुपात बघण्यात येतो.
मेजर राणे ह्यांना आठवणीने ब्यानरवर जागा दिलीत, धन्यवाद!
- Log in or register to post comments
च
चाणक्य
गुरुवार, 08/09/2018 - 10:49
नवीन
+१
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
गुरुवार, 08/09/2018 - 10:52
नवीन
+१०१
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
गुरुवार, 08/09/2018 - 15:48
नवीन
+१
हेकटपणा, दुराभिमान, आढ्यता, इतर भाषांना तुच्छ लेखणे, आर्यन थिअरी प्रमाण मानून द्रविड नसलेल्यांचा दुस्वास करणे,प्रचंड लॉबिंग करणे, दुसऱ्या देशातील आपल्यासारख्या लोकांसाठी आपल्या संघराज्यातल्या सरकारची स्थिरता धोक्यात आणणे इ.इ. दुर्गुण सर्वसाधारणपणे तामिळ अस्मितेत येतात.
सर्वांशी समरस होऊन काही गोष्टींचा आस्वाद घेणे, माहिती, साहित्य, संस्कृतींची देवाणघेवाण करणे ह्याने आपल्या संस्कृतीच्या कक्षा रुंदावू शकतात हे मान्य नसलेला वर्ग.
शहीद राणे यांना सलाम.
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Fri, 08/10/2018 - 10:12
नवीन
यशोधराजींना अगदी सहमत
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
गुरुवार, 08/09/2018 - 10:50
नवीन
नीलकांत साहेब खुलाशा साठी आभार.
भाषिक अस्मितेच्या संदर्भाने वाहिलेली श्रद्धांजली कितपत पटली हा भाग निराळा पण निदान त्या मागची भूमिका समजली.
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
गुरुवार, 08/09/2018 - 11:41
नवीन
या दिवंगत करुणानिधी यांनी सतत हिंदी भाषेला कडाडून विरोध केला, प्रसंगी हा विरोध हिसंक देखील होता. त्यांच्या ह्या कामगिरीवरुन त्यांना प्रसारमाध्यमे व बुद्धीजीवी लोकांनी "आपल्या मातृभाषेचा अभिमान जपणारा नेता" हे बिरुद दिले मात्र "हिंदी भाषेला" तोच विरोध महाराष्ट्रात करणार्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांना त्याच प्रसारमाध्यमांनी व इतर बुद्धीजीवी लोकांनी खलनायक, प्रांतवादी, गुंडा वगैरे ठरवले.
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
गुरुवार, 08/09/2018 - 11:50
नवीन
यव्हढं काय त्यात ? त्यांना बी जागा देवु की !!!!
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 08/09/2018 - 12:35
नवीन
"आपल्या मातृभाषेचा अभिमान जपणारा नेता" हे बिरुद दिले मात्र "हिंदी भाषेला" तोच विरोध महाराष्ट्रात करणार्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांना त्याच प्रसारमाध्यमांनी व इतर बुद्धीजीवी लोकांनी खलनायक, प्रांतवादी, गुंडा वगैरे ठरवले.
सहमत. द्रविडी अस्मिता म्हणणारे मराठी लोक मराठी च्या आंदोलनाला मात्र प्रादेशीक संकुचित म्हणतात .
राज ठाकरेंच्या हिंदी विरोधाला उत्तर भारतीय चॅनेल्स त्याना खलनायक म्हणून उभे करतात. पण कोणत्याच हिंदी चॅनेल ने हिंदी भाषीक उत्तर भारतीयाना देशोधडीला लावणार्या यादवांविरुद्ध एकही वाक्य उच्चारलेले नाहिये.
मूर्ख उत्तर भारतीय विचारसरणीचे ओझे वहाण्यापेक्षा स्वतंत्र बाणा कधीही चांगला.
- Log in or register to post comments
र
रामदास२९
गुरुवार, 08/09/2018 - 17:24
नवीन
हे खर आहे .. राज ठाकरेन्ची ही भुमिका योग्य आहे..
- Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी
गुरुवार, 08/09/2018 - 13:54
नवीन
निलकांत यांना विनंती !
मुखपृष्ठावर डावीकडे दिसणार्या माणसाने उजवीकडे दिसणार्या माणसांसारख्या अनेक माणसांच्या मृत्यूस हातभार लावला आहे आणि ते सुद्धा प्रभाकरनच्या प्रचाराला बळी पडून. मला वाटते ही दोन्ही छायाचित्रे एकाचवेळी मुखपृष्ठावर झळकवणे हे योग्य होणार नाही.... किंबहुना डावीकडील माणसाचे योगदान द्रविडीस्थान हे आहे तर उजवीकडील माणसाचे योगदान भारत एकसंध ठेवणे हे आहे...
There were several critics of Rajiv Gandhi’s military misadventure. But no one criticised individual soldiers being dragged into a thankless, unwinnable war as Karunanidhi did when he refused to receive the last contingent of the IPKF which was sent packing by then President R. Premadasa after reaching a compact with the Tigers in 1989. Swallowing the LTTE propaganda, Karunanidhi said he could not receive an army that “killed thousands of innocent Tamils and raped Tamil women”.
So outrageous was this statement that a senior army officer of the IPKF, himself a Tamil, wanted to resign and go public against Karunanidhi, but was prevailed upon by his superiors not to do so.
शेवटी तुमची मर्जी.
जयंत कुलकर्णी.
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
गुरुवार, 08/09/2018 - 15:28
नवीन
असंच काहिसं म्हणायचं होत मला पण शब्द सामर्थ्यात कमी पडलो. एकवेळ कोणी साहित्यिक लेखक गेला बाजार कवीला इथे स्थान दिले असते तरी वावगे नसते ठरले पण करुणानिधी सारख्या वादग्रस्त राजकारण्याला ब्यानर वर बघून विचित्र वाटले.
- Log in or register to post comments
न
नीलकांत
गुरुवार, 08/09/2018 - 19:30
नवीन
नमस्कार सर,
करूणानिधी आणि स्व. मेजर राणे यांची तुलना नक्कीच नाही. किंवा त्यांना एका समान पातळीवर मोजन्याचा जरा सुध्दा प्रयत्न नाही. केवळ मागे पुढे घडलेल्या घटनाक्रमामुळे एकाच बॅनरवर आपण दखल घेतली एवढंच. याशिवाय दोघेही एकाच बॅनरवर आहेत याला अन्य काही अर्थ नाही. तसा गैरसमज झाला असल्यास मी दिलगीर आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 08/09/2018 - 14:08
नवीन
प्रतिसादातून नीलकांतजींच्या भावना समजल्या. करुणानिधींच्या तामीळ भाषेवर प्रेम व्यक्त करणार्या कवितेचा अनुवाद अभ्यासल्यास त्यातील काही भावना नक्कीच उदात्त आहेत. या लिंकेवर इंग्रजी अनुवाद उपलब्ध आहे पण कॉपीराईट गांभीर्यामुळे इथे च्योप्य्पेस्ट करणे शक्य नाही. तेव्हा काही ओळींचा इंग्रजी ते मराठी अनुवाद मीच करुन देतो.
त्यांच्या Semmozhiyaana Thamizh Mozhiyaam गिताची सुरवात
हिंदी विरोधी अंदोलन करणारे करुणानिधी तरुण वयात राज ठाकरेंप्रमाणे मते ठेवत होते का कल्पना नाही. उपरोक्त ओळी त्यांनी बर्याच उशीराने लिहिलेल्या काळातील असल्या तरी राज ठाकरेंच्या भूमिकेहून दूर दिसतात. करुणानिधींचा विरोध भाषिक वसाहतवादाला असावा भाषिक समुहांना तेवढा नसावा किंवा असला तरी काळाच्या ओघात मावळला असावा. 'त्यांच्या जन्मानंतर प्रत्येक जागा घर आहे,' मधील विचार श्रीलंकन तामीळांच्या वरील दबावातून बनला असल्यास कल्पना नाही.
अजून एक ओळ आहे त्यात ते म्हणतात
त्यांची हि ओळ अप्रत्यक्षपणे त्यांच्या हिंदी विरोध आणि आर्यन इन्व्हॅजन थेअरीने बनलेल्या मता सोबत समजून घेता येईल का ? चांगले किंवा वाईट इतरांमुळे घडत नाही या वाक्यात ते दुसर्या पक्षास दोष देत नाहीत असे वाटत असतानाच 'ते आपण आपल्यावर लादलेले असते' म्हणत सुप्त संघर्षाची नांदी करत असतात. त्यांची हि पॉलीसी मराठी मराठी प्रेमींना कितपत जमणे दूर समजेल या बाबत ही साशंकता वाटते.
त्याच वेळी ते खालील ओळीतून संघर्षाला मर्यादाही घालताना दिसतात
मटेरील वेल्थ सर्वांची कॉमन असल्याचे शिकवते . म्हणणारा विचार चक्क साम्यवादी आहे तरी ते कम्युनीस्ट का नव्हते याची कल्पना नाही.
हा विचार तमीळ भाषेस इतर सर्व गोष्टींपेक्षा मोठा करतो . त्याच वेळी भाषाशास्त्रीय दृष्ट्या वस्तुनिष्ठ नाही आणि ह्या वस्तुनिष्ठतेचा अभाव तामीळ आत्मगौरवास आत्मगर्वाच्या पातळीवर केव्हा घेऊन जातो ते त्यांचे त्यांनाही समजत नाही.
तामीळचा आग्रह धरण्यात काहीच चुकीचे नाही. पण तो आग्रह त्यांच्या पद्धतीने टोकास नेताना आपल्याच देशात काही हजार वर्षे विकसीत होत गेलेल्या भाषा आक्रमकांच्या ठरवून , परकीय खंडातील इंग्रजी भाषेचे शारण्य पत्करण्यातील शहाणपण मेकॉलेप्रेमींना समजले तरी माझ्या सारख्या देशप्रेमी अज्ञानी लोकांना उमजत नाही. नेपाळी लोकांनी देवनागरी आणि संस्कृत स्विकारले म्हणून नेपाळी भाषेचे उत्तरप्रदेश बिहार शेजारी असून नेपाळी भाषेस नुकसान झाले नाही (तेच पुर्णच पाणी सोडलेल्या राजस्थानी लोकांना स्थानिक भाषेची ओळख शिल्लक ठेवावी वाटली नाही) तेव्हा दुसर्या भाषा स्विकारताना अथवा नाकारताना भाषिक अभिमानाची रेष नेमकी कुठे आणि कशी ओढायची याचे भान असण्याची गरज असावी. प्रत्येक जण कुठेतरी कमी पडतो तमीळ कुठे कमी पडले तर हरकत नाही पण एकुण स्थानिक अस्मिता जपताना देशाच्या एकात्मतेसाठी लागणारी मुरड घालून संवाद भाषा म्हणून आंध्र, कर्नाटक आणि केरळ आणि इतर अहिंदी भाषी राज्ये त्रिभाषा सूत्र म्हणून शैक्षणिक अभ्यासक्रमात स्विकारती झाली तसे तामीळनाडू ने स्विकारलेले नाही.
प्रश्न केवळ एकात्मतेचा नाही, तेलगू, कन्नड मल्याळम मराठी बंगाली, असामी , गुजराथी, पंजाबी आपापल्या वेगळ्या भाषिक अस्मिता जपतात. तामीळीं आणि कन्नडीगांनी वेगळीच टोके गाठल्यामुळे राष्ट्रीय राजकारणात महाराष्ट्रासहीत दक्षिणेची आघाडी करुन राष्ट्रीय राजकारणात समतोल साधण्याची संधी , द्रमुकच्या सवता सुभा राजकाराणाने घालवली का असे बर्याचदा वाटून जाते.
असो इन एनी केस माणूस खूपच वाईट होता असे नाही, तरी पण केलेल्या उत्पातमुल्याधारीत सवत्या सुभ्याच्या भाषिक राजकारणाचा एकुण परिणाम भारतात इंग्रजी भाषेचे अधिपत्य टिकून रहाण्यात झाला . व्यक्तिगत स्तरावर परिवारवाद नेपोटीझम मधून हा माणूस इतर बर्याच भारतीय आदर्श परिवारवादाप्रमाणे दूर राहू शकला नाही हे वास्तवही कुठे तरी स्विकारावे लागते. आणि मृत्यूपरांत सहानुभूती बाळगून श्रद्धांजली वाहणे योग्य असले तरी मराठी मिपाच्या मथळ्यावर जाण्याच्या करुणानिधींच्या योग्यते बाबत धागा लेखका प्रमाणे हलकीशी साशंकता वाटते. (अर्थात धागा लेखका प्रमाणे श्रीलंकेतील तामीळी अतीरेकाची अंशतः जबाबदारी द्रमुक करुणानिधींच्या वाटेस गेली तरी इंदिरांजींचे शीत युद्धकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणही त्यास अंशतः कारणीभूत असावे)
आज राज ठाकरेंची महाराष्ट्रीय नेत्यात सर्वाधिक शोधप्रीयता असेल (गूगल ट्रेंड) पण त्यांची तुलना प्रबोधनकार ठाकरेंशी करणे जसे उचित होणार नाही तसेच ते करुणानिंधीशी करणेही योग्य नसावे असे वाटते.
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
गुरुवार, 08/09/2018 - 15:34
नवीन
अंशतः सहमत.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
गुरुवार, 08/09/2018 - 18:41
नवीन
तरी ते कम्युनीस्ट का नव्हते याची कल्पना नाही.
पोराचं नाव स्टालिन ठेवलंय तरी ही शंका का यावी?
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 08/09/2018 - 18:58
नवीन
खरचं की, एकदम मान्य
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 08/09/2018 - 19:00
नवीन
कदाचित सोव्हीएत मॉडेलचे आदर्श आणि रशियनांनी नेहरु - इंदिराशी जमवून घेण्यामुळे करुणानिधींना राष्ट्रीयधारेत सामील करुन घेणे जमले असेल ?
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 08/09/2018 - 15:32
नवीन
एकाच फलकावर लावण्यात आले आहेत हे आवडलं नाही
अर्थात हे वैयक्तिक मत म्हणून दुर्लक्ष केले तरी हरकत नाही.
लेख आणि फलकावर जागा ह्या दोनही वेगवेगळ्या प्रकारच्या मानवंदना आहेत असा माझा समज होता.
आडगावचा कंपूहीन नाखु बिनसुपारीवाला
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
गुरुवार, 08/09/2018 - 15:41
नवीन
फोटो पाहून वाईट वाटले.भाषिक अस्मिता ही करुणानिधींची मक्तेदारी नव्हे.ते सर्व तमिळांचे यश.
https://amp.scroll.in/article/872338/dmk-leader-mk-stalin-says-he-hopes-southern-states-come-together-to-demand-separate-dravidanadu
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 08/09/2018 - 18:30
नवीन
नेहरु - इंदिरा नेतृत्वातील काँग्रेस फुटीरता वादास कंटोल करण्यात राजकिय दृष्ट्या यशस्वी झाली तरी, आयडीयॉलॉजीतील तार्कीक उणीवा खोडून काढण्यात नेहरु - इंदिरा नेतृत्वातील काँग्रेस सम हाऊ कमी पडत राहीली , किंबहूना भारतीय राष्ट्रवाद मग तो नेहरुंचा असो अथवा सावरकरांचा किंवा त्या आधीचा या आवश्यक युक्तीवादाच्या किंवा जसे राजीव मल्होत्रा म्हणतात तसे इंडियन ग्रँड नॅरेटिव्ह समजून घेणे आणि समजावून देणे किंबहूना पुश करण्याच्या फ्रंटवर बराच कमी पडत रहातो असे वाटत रहाते.
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
गुरुवार, 08/09/2018 - 15:53
नवीन
यांच्या हिंदीविरोधाचं खरं कारण हे आहे.
The concept of Dravida Nadu had its root in the anti-Brahminism movement in Tamil Nadu, whose aim was to end the alleged Brahmin dominance in the Tamil society and government. The early demands of this movement were social equality, and greater power and control.[8] However, over the time, it came to include a separatist movement, demanding a sovereign state for the Tamil people. The major political party backing this movement was the Justice Party, which came to power in the Madras Presidency in 1921.
Since the late 19th century, the anti-Brahmin Tamil leaders had stated that the non-Brahmin Tamils were the original inhabitants of the Tamil-speaking region.[9] The Brahmins, on the other hand, were described not only as oppressors, but even as a foreign power, on par with the British colonial rulers.[10]
The prominent Tamil leader, E. V. Ramasami (popularly known as "Periyar") stated that the Tamil society was free of any societal divisions before the arrival of Brahmins, whom he described as Aryan invaders. Periyar was an atheist, and considered the Indian nationalism as "an atavistic desire to endow the Hindu past on a more durable and contemporary basis".[11]
The proponents of Dravida Nadu constructed elaborate historical anthropologies to support their theory that the Dravidian-speaking areas once had a great non-Brahmin polity and civilisation, which had been destroyed by the Aryan conquest and Brahmin hegemony.[10] This led to an idealisation of the ancient Tamil society before its contact with the "Aryan race", and led to a surge in the Tamil nationalism.[9] Periyar expounded the Hindu epic Ramayana as a disguised historical account of how the Aryans subjugated the Tamils ruled by Ravana.[12] Some of the separatists also posed Saivism as an indigenous, even non-Hindu religion.
The Indian National Congress, a majority of whose leaders were Brahmins, came to be identified as a Brahmin party.[8] Periyar, who had joined Congress in 1919, became disillusioned with what he considered as the Brahminic leadership of the party.[9] The link between Brahmins and Congress became a target of the growing Tamil nationalism.
In 1925, E.V.Ramasamy launched the Self-respect movement, and by 1930, he was formulating the most radical "anti-Aryanism".[10] The rapport between the Justice Party and the Self-Respect movement of E.V.Ramasamy (who joined the party in 1935) strengthened the anti-Brahmin and anti-North sentiment. In 1937–38, Hindi and Hindustani were introduced as new subjects in the schools, when C. Rajagopalachari of Congress became the Chief Minister of Madras Presidency. This led to widespread protests in the Tamil-speaking region, which had a strong independent linguistic identity. Periyar saw the Congress imposition of Hindi in government schools as further proof of an Aryan conspiracy.
https://en.m.wikipedia.org/wiki/Dravida_Nadu वरुन
या करुणानिधी आणि त्यांच्या पक्षाला स्वभाषेबद्दल एवढंच प्रेम होतं तर त्रिचनापल्ली आणि चेन्नैत राष्ट्रभाषा प्रचार समितीमार्फत हिंदी शिकवणं अजूनही का सुरु आहे?
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 08/09/2018 - 18:21
नवीन
राष्ट्रभाषा प्रचार समितीमार्फत हिंदी ला तामीळनाडूत चांगला रिस्पॉन्स असावा.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Wed, 08/15/2018 - 09:11
नवीन
चेण्णैजवळ्च्या उपनगरात रहात असताना "स्पोकन हिंदी"च्या काही पाट्या दिसायच्या !
वाटायचं, आपणपण असला एक बोर्ड लावावा !
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
गुरुवार, 08/09/2018 - 16:00
नवीन
स्पष्टीकरण ओढून ताणून वाटलं.. करुणानिधीचें बॅनर आवडले नाही.
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
गुरुवार, 08/09/2018 - 16:16
नवीन
मिपाला जन्मशताब्दीचे वर्ष असलेल्या सुधीर फडकेंची आठवण आली नाही, पण करूणानिधीला श्रद्धांजली अर्पण कराविशी वाटली.
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 08/09/2018 - 16:23
नवीन
योगदान दखलदायक नसावं कदाचित!
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
गुरुवार, 08/09/2018 - 16:33
नवीन
:-)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 08/10/2018 - 16:13
नवीन
केवळ त्यांचा बॅनर नाही म्हणून त्यांचं योगदान अदखलपात्र होतं असं नव्हे. माझ्या आठवणीप्रमाणे मराठी दिनाच्या बॅनर वर सुधीर फडके ह्यांना स्थान मिळालेलं आहे.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 08/10/2018 - 04:39
नवीन
तुम्ही काढलेल्या सुधीर फडकेंची आठवण धाग्याची लिंक द्या
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/10/2018 - 05:05
नवीन
एकच प्याला हे राम गणेश गडकरी यांनी लिहिलेल्या मराठी नाटकाला १०० वर्ष झाली पण एक कपभर सुद्धा उल्लेख मिपवर आला नाही की गडक-यांचा कुठे फोटो मिपावर लागला नाही, गूगलवर गडकरी शोधायला गेले तर नितीन गडकरी यांची माहिती सापडते, येत्या पिढीला रा.ग, गडकरी कोण होते त्यांचं काय योगदान होते यावर एक बॅनर आणि लेखन अपेक्षित होतं, तेव्हा कुठे जातो यांचा धर्म काय माहिती.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
र
रामदास२९
गुरुवार, 08/09/2018 - 17:20
नवीन
राम वगैरे देवतान्ची, हिन्दू सन्स्क्रुतिची यथेच्छ टिन्गल मारणारा, द्रविड सन्स्क्रुति चा (तथाकथित) वारसा चालविणारा, भ्रष्टाचाराचा मेरुमणी, नीतिमत्ताहीन .. हा कसला भाषाभिमानी.. लिट्टे शी सम्बध जोडून निवडणूका जिन्कणारा .. ह्याच्या विषयी कसला आदर
- Log in or register to post comments
र
रामदास२९
गुरुवार, 08/09/2018 - 17:22
नवीन
मेजर राणे ह्यांना कोटी कोटी वेळा नमस्कार ..
- Log in or register to post comments
अ
अर्जुन
गुरुवार, 08/09/2018 - 17:32
नवीन
आपल्या देशाचा पंतप्रधानाच्या हत्या करणार्याच्यां गौरव करणारी कविता लीहिणारांचा फोटो मिसळपावच्या मुखपृष्ठावर पाहुन मनाला यातना होतात. तामिळ अस्मितेपायी आपण किती जवान गमवले ? श्रीलंकेबरोबर आपले संबंध कायमचे बिघडले. देशात प्रांतियवाद वाढला. कोवळ्या वयात देशासाठी सर्वस्व अर्पण करणार्या जवानाच्या फोटो शेजारी, आपल्ल्या नातेवाईकांसाठी देशाचा खजिना लुटु देणारार्याचा फोटो ?
- Log in or register to post comments
र
रामदास२९
गुरुवार, 08/09/2018 - 17:40
नवीन
खरय .. जसा काही हे नसताना तमिळ भाषिकान्ना भाषा प्रेम्च नव्हत.. याने फक्त एक केला जाति जातित द्वेष आणि भाषाप्रेमाच व्यापारी करण करून सर्व पदान्वर कुटुम्बीयान्ची भरती ..
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
गुरुवार, 08/09/2018 - 18:55
नवीन
तूर्तास जास्त बोलणे इष्ट नाही. बॅनर आवडले नाही , ताज्या घडामोडी धाग्यात संपादक मंडळाच्या वतीने कोणीतरी श्रद्धांजली वाहिली असती तरी भागले नसते.
दुसरं म्हणजे मेजर राणेंचा वेगळा काढून लावलेला फोटोही आवडलेला नाही. मी तेव्हा मिपावर नव्हतो पण कर्नल संतोष महाडीकांचा फोटो बॅनर केला होता का? लावला नसला तर हा फरक का? लावला असला तर असे भाषा प्रांत इत्यादी ओळखी पलीकडे गेलेल्या वीरांचे असे क्षेत्रीय अन भाषिक वर्गीकरण करून चिकटवणे बरे वाटत नाही (मला तरी) एकंदरीतच सैनिकांबद्दल आदर असला तर एक "मार्त्यर विंडो" सुरू करून (दुर्दैवाने) रोज (हकनाक) हुतात्मा होणाऱ्या प्रत्येक सैनिकांचा फोटो अपडेट करता येईल की त्यापेक्षा, किती वीर धारातीर्थी पडले ह्याचा एक कॅटलॉग होईल तो, एक डिजिटल मेमोरियल किंवा कैक लोकांना तरुण तरुणींना स्फूर्तिस्थान असलेलं एक जालीय प्रेरणास्थान.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
गुरुवार, 08/09/2018 - 19:04
नवीन
मिपा हे एक खासगी संस्थळ आहे, हे धावते ठेवायला मालक नुसते झटत नाहीत तर ज्याचं सोंग वठवता येत नसतं असे दामाजीपंत पण खर्च करत असतात.
त्यामुळे त्यांनीच दिलेला मत मांडायचा हक्क वापरून मनातले लाऊड थिंकिंग इथं मांडलं तरी शेवटी त्यांनी त्यांच्या संस्थळांवर काय ठेवायचं हे ठरविणे त्यांचे वैयक्तिक "प्रेरोगेटिव्ह" आहे.
थोडक्यात, मालक म्हणत्याल ती उगवती!
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 08/09/2018 - 19:10
नवीन
आपले मिपा मालक अगदीच असे (म्हणजे माझेच खरे म्हणून रेटणार्या माहितगार सारखे :) ) नाहीत म्हणूनच तर मिपाकर मनमोकळेपणे मते व्यक्त करत आहेत.
ते मान्य आहेच त्या बाबत शंका नाही. सदस्यांच्या साशंकता मिपा मालकांच्या निर्णयापेक्षा करुणानिधी आणि त्यांच्या मागच्या पार्श्वभूमीबाबत आहेत, ते त्या व्यक्त करत आहेत असे वाटते.
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
गुरुवार, 08/09/2018 - 19:38
नवीन
आपले मिपा मालक अगदीच असे (म्हणजे माझेच खरे म्हणून रेटणार्या माहितगार सारखे :) ) नाहीत म्हणूनच तर मिपाकर मनमोकळेपणे मते व्यक्त करत आहेत.
पूर्णपणे सहमत. मिपाकर मनमोकळेपणे मते व्यक्त करत आहेत.
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
गुरुवार, 08/09/2018 - 19:35
नवीन
भावना पोचल्या! सहमत आहे.
- Log in or register to post comments
स
सतिश पाटील
गुरुवार, 08/09/2018 - 19:40
नवीन
अगदी अगदी आवडले.देशासाठी कामी आलेल्या जवानाला मुखपृष्ठावर श्रद्धांजली. पण दर दिवसाआड जवान अमर होताहेत, मग ही मालिका अखंड चालू ठेवावी.
कलाईनार- एक जाज्वल्य तामिळप्रेमी, बळजबरीने हिंदी प्रचार प्रसार करताना आपल्या तामिळ भाषेचं महत्व जाणून बुजून नेहरू सारखे लोक कमी करणार आणि त्याच अनुषंगाने तामिळ संस्कृतीवर देखील याचा प्रभाव पडलाच असता, हे वेळीच ओळखून भाषेवर होणारे अतिक्रमण अडवले.
राष्ट्रवाद, भाषाप्रेम हे कडवटच असावे.
4 ओळींचे एक वाक्य इंग्रजी आणि हिंदी शब्दांची कुबडी घेतल्या शिवाय बोलून दाखवायचा प्रयत्न करावा. मगच निलकांतवर घसरावे.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
गुरुवार, 08/09/2018 - 19:54
नवीन
4 ओळींचे एक वाक्य इंग्रजी आणि हिंदी शब्दांची कुबडी घेतल्या शिवाय बोलून दाखवायचा प्रयत्न करावा. मगच निलकांतवर घसरावे.
हे कोणाला उद्देशून होते जरा स्पष्ट करता येईल का?
- Log in or register to post comments
न
नीलकांत
गुरुवार, 08/09/2018 - 19:51
नवीन
नमस्कार,
सहसा दक्षिणेबाबत आपण एवढं बोलत नाही. पण दक्षिणेचा आपल्या भाषेबाबतचा आग्रह मला आवडला त्याची दखल घ्यावी असे मनात होतेच त्याच वेळेस करुणानिधी वारले आणि त्यांना एक भाषाभिमानी असे म्हणून आपण श्रध्दांजली देऊया असे ठरवले. आपल्या भाषेचा अभिमान, त्या भाषेला कुणी दुय्यम म्हणत असेल तर प्रसंगी आपला आग्रह अट्टाहास वाटला तरी त्याची काळजी न करता आपली भुमिका कायम ठेवणारा लोकनेता म्हणून त्यांना श्रध्दांजली देऊया असे मनात होते.
जेव्हा विषय दक्षिणेच्या राजकारणाचा येईल तेव्हा ई पेरीयारस्वामी आणि द्रविड मांडणीशिवाय विषय पुढे जाणारच नाही. द्रविड मांडणी आणि गेल्या जवळपास शतकभरातील दक्षिणेतील हिंदू धर्माविषयीचा जाहीर आविष्कार याबाबत मला वाचून ठाऊक आहे. त्या सर्व प्रकाराशी मी सहमत असण्याची शक्यता नाहीच. करुणानिधी कम्युनिस्ट असतील तर त्याविषयीही मला काहीही ममत्व नाहीच.
मला आवडला तो त्यांचा त्यांच्या भाषेप्रति असलेला अभिमान. त्यासाठी त्यांना श्रध्दांजली.
एखादा मानुस आवडला म्हणजे तो १०० टक्केच आवडावा का? त्याच्यातील चांगलं वाईट निवडता येणार नाही का? मला सावरकर आवडतात म्हणून ते १०० टक्केच आवडले पाहिजेत का? तर तसं होत नाही. आपल्याला एखादे मत, एखादी भुमिका आवडली असे होऊ शकते ना? की अगदी भक्तच होणे आवश्यक आहे?
या धाग्यावर आपले मत मांडणार्या सर्व सन्माननिय सदस्यांच्या मताचा आदर आहे तसेच ज्यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यांच्या नाराजीची दखल सुध्दा घेतली आहे. यापुढे बॅनर करताना असे दोन भिन्न क्षेत्रातील लोकांना एकत्रीत न करण्याचा प्रयत्न राहील.
- नीलकांत
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
गुरुवार, 08/09/2018 - 19:59
नवीन
आपले मनापासून आभार _/\_
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 08/10/2018 - 03:26
नवीन
आनंद द्विगुणित झाला
वाचकांची पत्रेवाला नाखु
- Log in or register to post comments
र
राही
Fri, 08/10/2018 - 15:27
नवीन
श्री नीलकांत, आपला प्रतिसाद आवडला. मिपाच्या अग्रभागी करुणानिधींना स्थान दिल्याचेही खटकले नाही. ते आणि शहीद राणे एकाच कालावधीत दिवंगत झाले हा योगायोग.
करुणानिधी याचे स्थान तमीळनाडूत साधारण आपल्या कै बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे आहे. त्यांनी त्यांची प्रादेशिक अस्मिता ठामपणे मांडली. तमीळ ही एक प्राचीन आणि संपन्न भाषा असूनही तिची तितकीशी दखल राष्ट्रीय स्तरावर समाजात
घेतली जात नव्हती हा सल तमीळ जनतेत तीव्र स्वरूपात होता. त्याला त्यांनी तोंड फोडले. विविधतेतून एकता साधणे म्हणजे साऱ्या विविधता एकतेमध्ये विलीन करणे नव्हे. आपल्या देशाचे फेडरल - संघराज्यात्मक स्वरूप टिकण्यासाठी हे आवश्यक आहे.
आपण लिहिलेय त्याप्रमाणे रामस्वामी पेरियार, द्रवीड मुन्नेत्र कळ्हम, करुणानिधी यांच्या उल्लेखाशिवाय भारताचा इतिहास पुढे सरकू शकत नाही.
असों. बॅनरला समर्थन.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 08/10/2018 - 16:08
नवीन
करुणानिधींनी त्यांचे स्वतंत्र स्थान निर्माण केले, ५ वेळा मुख्यमंत्री म्हणून निवडून आले, दुर्दैवाने बाळासाहेब हयात असताना देखील शिवसेनेला तसे स्थान निर्माण करता आले नाहीच
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »