Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - जून २०१८

M
manguu@mail.com
Tue, 06/12/2018 - 15:33
🗣 363 प्रतिसाद
भय्युजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली आहे. उदयसिंह देशमुख असं त्यांचं मूळ नाव असून अध्यात्मिक गुरु म्हणून त्यांची ओळख आहे. इंदूरमधील बॉम्बे रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं मात्र त्याचा काही उपयोग झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता आणि दिवाळखोरीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असं सांगण्यात येत आहे. भय्युजी महाराज यांना अनेक राजकारणी राजकीय गुरु मानत होते. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा छंद होता. स्वच्छता अभियान असेल किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग घेतला जात होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते त्यांचा राजकीय सल्ला घेत होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्जबाजारी झाले होते अशीही माहिती समोर येते आहे. भय्यूजी महाराज यांनी असे पाऊल का उचलले याचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी राजकारणातलाही सहभाग कमी केला होता. काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्यू महाराज यांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्ती येत असत. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत. भय्युजी महाराजांना मध्यप्रदेश सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. गेल्याच वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. त्याचसुमारास भय्युजी महाराजांनी आपण राजकीय क्षेत्राशी संबंध कमी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पहिल्या पत्नीच्या निधनानंतर परिस्थिती बिघडलेली होती. समाजाला दिशा दाखवणारा संत अशी त्यांची ओळख होती. धार्मिक, सांप्रदायिक, कृषि, शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांना गती होती. भय्यूजी महाराजांनी कामाचा व्याप प्रचंड वाढवला होता आणि तो व्याप सांभाळण्यापलीकडे गेला होता असं मत त्यांच्या निटवर्तीयांनी व्यक्त केलं आहे. अत्यंत धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवावं लागलं होतं. त्यासोबत कौटुंबिक समस्याही त्यांना सतावत होत्या अशी शक्यता व्यक्त होत आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 118005 views

🗣 चर्चा (363)
ग
गामा पैलवान Mon, 06/25/2018 - 08:18 नवीन
मंगूश्री, भारतप्रेमी मुस्लिमांचे योगदान नाकारले आहे. पठाणांचे नेते खान अब्दुल गफारखान हे भारतवादी होते. म्हणून त्यांना पाकड्यांनी तुरुंगात टाकलं. नेहरूंनी शब्द टाकला असता तर खानसाहेबांना तुरुंगातून काढून घरकैदेत हलवता आलं असतं. पण नेहरूने तितकंही केलं नाही. इतकी त्याला भारतीप्रेमी मुस्लिमांची धास्ती होती. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 06/26/2018 - 13:15 नवीन
नेहरूने तितकंही केलं नाही. इतकी त्याला भारतीप्रेमी मुस्लिमांची धास्ती होती. हे काही तितकस खर नाहीय !! त्याच कारण वेगळच आहे आणी ते ईथे उघड करता यायच नाही !! नेहरुंच वागण प्रत्येक वेळेला संशयास्पदच होते !! ते खरच भारतीय होते का असा प्रश्न पडतो ?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 06/26/2018 - 14:28 नवीन
...पठाणांचे नेते खान अब्दुल गफारखान हे भारतवादी होते. म्हणून त्यांना पाकड्यांनी तुरुंगात टाकलं. नेहरूंनी शब्द टाकला असता तर खानसाहेबांना तुरुंगातून काढून घरकैदेत हलवता आलं असतं. पण नेहरूने तितकंही केलं नाही.
हे ओव्हर सिंप्लीफिकेशन आहे. आता महाराष्ट्राचे जाधव पाकीस्तानात अडकले आहेत नेमके कसे घेऊन येणार त्यांना. ईव्हन अ‍ॅट दि कॉस्ट ऑफ सिव्हील वॉर पाकीस्तान होऊ द्यावयस नको होता. किमान सिम्ध, बलूच आणि सरहद प्रांत पाकीत्सानात जाऊ द्यावयास नको होते. ह्या मुद्यावर नेहरु गांधींच्या बोटचेपेपणा मुळे त्यांनाही न सुधारता येणारा एक प्रॉब्लेम होऊन बसला.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 06/26/2018 - 16:40 नवीन
डँबिस००७, करा हो बिनधास्त उघड. कोण विचारणार आहे. नेहरू मरून कितीतरी वर्षं होऊन गेली. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 06/24/2018 - 13:03 नवीन
'गांधी परिवारावाचे योगदान छोटे केले गेले' फारच छान !!
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 06/26/2018 - 06:24 नवीन
एकेश्वरास प्रतिमापुजन चालत नसेल तर परिवारवादाचेही प्रतिमा पूजन थांबाबवयास हवे होते. गेली सत्तर वर्षे तो एकेश्वर काय करतो कुठे बिझी असतो कळत नाही :(
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 06/26/2018 - 18:43 नवीन
Brexit bill becomes law, allowing UK to leave the EU रडतखडत चाललेल्या प्रक्रियेमुळे, "कदाचित, ब्रिटन ऐनवेळेस परत इयुमध्ये सामील होईल" अश्या वावड्या सारख्या उडत असतानाच; २५० तासांच्या पेक्षा जास्त काळाच्या मॅरॅथॉन चर्चेनंतर ब्रिटिश संसदेने EU (Withdrawal) Bill हे बिल केल्यावर, त्यावर ब्रिटिश राणीचा होकार नोंदवला गेला आहे. आता, ब्रिटनने बाहेर पडणे अपरिवर्तनीय होऊन विघटनाच्या प्रक्रियेच्या पुढच्या पायर्‍या ही औपचारिकता राहिली आहे. या विघटनामुळे, ब्रिटनला केवळ इयुशीच सर्व व्यापारी करार परत एकदा करायला लागणार असे नाही, तर इयुशी करार असलेल्या जगातील सर्व देशांशीही वेगवेगळे करार करणे भाग आहे. आता यात कोणाचा जास्त फायदा होईल हे काळच सांगेल. ब्रिटनमधल्या ब्रेक्झिटच्या पाठीराख्यांनी मात्र मोठा जल्लोश सुरू केला आहे !
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 06/27/2018 - 10:10 नवीन
एका आंतरधार्मिय विवाह झालेल्या स्त्रीने पासपोर्ट मिळताना झालेल्या त्रासाबद्दल विदेशमंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट केले होते आणि त्यानंतर संबधित अधिकार्‍यावर बदलिची कारवाई झाली व ती स्त्री व तिच्या पतीला एका दिवसात तात्काळ पासपोर्ट दिले गेले होते. हे प्रकरण माध्यमांत बरेच चर्चिले गेले आणि त्याला धार्मिक भेदभावाच्या रंगानेही रंगवले गेले होते. त्यानंतर दर दिवशी हे प्रकरण बरेच वेगळे असल्याच्या बातम्या येत आहेत. सर्वप्रथम संबंधित अधिकार्‍याने, पासपोर्टसाठी दिलेल्या वेगवेगळ्या कागदपत्रांत महिलेचे नाव वेगवेगळे आहे हे निदर्शनात आणून दिले व ते महिलेला आवडले नाही व तिने तक्रार करताना लपवून ठेवल्याचे बाहेर आले. कागदपत्रांतील अशी विसंगती शोधून त्याबद्दल चौकशी करणे हे तर पासपोर्ट अधिकार्‍याचे मूलभूत कर्तव्य आहे ! आता, अजून एक माहिती बाहेर आली आहे, महिलेने आपले "हल्लीचे राहण्याचे ठिकाण (current residence)" लखनौ आहे असे अर्जात नमूद केले होते. मात्र, पासपोर्टसंबंधिच्या पोलीस रिपोर्टमधून असे बाहेर आले आहे की ती लखनौमध्ये राहत असल्याचा कुठलाच पुरावा मिळत नाही रीपोर्टमध्ये, “Applicants name in passport form is Tanvi Seth while in her marriage certificate Sadia Anas. Applicant is working in BT Global Business Service Pvt Ltd, Noida. Applicant lives on rent at B604, JM Archit apartment, Section 76, Noida. This rental address is not mentioned in the passport form by application.” असे नमूद केलेले आहे. ही पार्श्वभूमी पाहता, (अ) खोटी माहिती सादर करणे आणि (आ) पासपोर्ट अधिकार्‍यावर धार्मिक भेदभावाचे खोटे आरोप करणे, या दोन आरोपांखाली त्या स्त्रीचा पासपोर्ट रद्द होऊ शकतो, असे कळते. हे आणि नुकत्याच झालेल्या विहिरीत पोहणार्‍या मुलांना मारहाण झालेले प्रकरण, अश्या प्रकारच्या उदाहरणांवरून सर्व सुजाण नागरिकांनी धडा घेणे जरूरीचे आहे. अर्धवट माहितीच्या आधारे चुकून किंवा मुद्दाम एखाद्या घटनेला आपल्याला हवा तसा रंग देवून आपल्या पोळीवर तूप ओढून घेणे, हे फक्त व्हॉट्सअ‍ॅप सारख्या मुक्त माध्यामांपुरते सीमीत राहिलेले नाही. दुर्दैवाने, ते मानाच्या समजल्या जाणार्‍या छापील आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतही अपवादात्मक राहिलेले नाही. अश्या कृतींनी सामाजिक सौहार्द बिघडते आणि पर्यायाने देशाचे नुकसान होते, हे लक्षात घेणे हल्ली आवश्यक नाही, असाच व्यवहार बर्‍याच माध्यमांत दिसतो आहे. आपल्याला सोईस्कर असलेली बातमीची आवृत्ती पकडून तिच्या बाजूने प्रतिक्षिप्त क्रियेने वादावादी करण्यापेक्षा (आणि पर्यायाने गैरसमज पसरविणार्‍या नाठाळ लोकांना मदत करण्यापेक्षा), जरासे थांबून तथ्ये बाहेर आल्यावर पक्के मतप्रदर्शन करणे सर्व सुजाण नागरिकांना जास्त शोभून दिसेल.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Wed, 06/27/2018 - 13:37 नवीन
अशा कितीतरी मुली मुस्लिम मुलांच्या प्रेमात पडल्या असतील आणि आयुष्य उध्वस्त करून घेतले असेल . झारखंड में ‘लव जेहाद’ की शिकार बनी अंतरराष्ट्रीय स्तर की शूटर धरमबीर सिन्हा [Edited By: दिगपाल सिंह] रांची, 24 August 2014 झारखंड की राजधानी रांची में 'लव जेहाद' का एक सनसनीखेज मामला सामने आया है. पीड़ि‍त तारा शाहदेव एक अंतरराष्ट्रीय स्तर की निशानेबाज हैं. तारा के मुताबिक इस साल 7 जुलाई को उनकी शादी शहर के रेडिशन ब्लू होटल में रंजीत सिंह कोहली नाम के एक व्यक्ति से हुई थी. लेकिन शादी के बाद से ही उस पर जानवरों की तरह अत्याचार होने लगे. तारा को जब पता चला कि उसके पति का नाम रंजीत सिंह, नहीं बल्कि रकीबुल हसन है, तो उस जुल्म की इंतेहा कर दी गई. तारा पर जबरन धर्म परिवर्तन करने का दबाव बनाया जाने लगा. इस मामले में स्थानीय पुलिस ने एफआईआर दर्ज की ली है. 7 जुलाई को हिन्दू रीति-रिवाज के साथ तारा और रंजीत की शादी हुई थी. शादी के दिन अंतरराष्ट्रीय स्तर की शूटर तारा बेहद खुश थी, उसकी शादी एक निजी कंपनी के मालिक रंजीत से हो रही थी. लेकिन शादी के एक महीने बाद ही हालत ये है कि तारा ठीक से चल भी नहीं पा रही है. पति ने उसे किस हद तक प्रताड़ित किया है यह तो तारा के शरीर के जख्मों को देखकर ही अंदाजा लगाया जा सकता है. उसकी तमन्ना थी कि वो शूटिंग में देश का नाम रोशन करे, लेकिन उसके अपने पति ने ही उसे अपने पैरा पर खड़ा होने लायक भी नहीं छोड़ा. असल में तारा की दिल दहला देने वाली कहानी झूठ, फरेब और मक्कारी की घिनौनी दास्तान है. तारा का आरोप है कि उसके पति ने उसे बंदूक की नोंक पर रखकर जबरदस्ती उसके साथ फिजिकल रिलेशन बनाए. असल में तारा को अपने पति की हकीकत तब पता चली जब उनके घर इफ्तार पार्टी का एक निमंत्रण आया. शादी के बाद तारा के ससुराल में एक दिन झारखंड के एक मंत्री हाजी हुसैन अंसारी की तरफ से इफ्तार पार्टी का निमंत्रण आया, इसमें जनाब रकीबुल हसन खान के नाम का संबोधन था, जिसे देखकर तारा चौंक उठी. इसके बाद हकीकत परत दर परत खुलती चली गई. अंतरराष्ट्रीय ख‍िलाड़ी तारा चोट के निशान दिखाते हुए तारा ने बताया कि उनके बीच दरार तब और गहरा गई जब 9 जुलाई को उसके पति ने 20-25 हाजियों को घर बुलाया और उस पर जबरन धर्म परिवर्तन के लिए दबाव बनाया. इस दौरान विरोध करने पर उसे न सिर्फ बुरी तरह मारा गया, बल्कि कई बार कुत्ते से कटवाया भी गया, ताकि वह डर से धर्म परिवर्तन कर ले. यही नहीं जुबान खोलने पर उसके भाई को मरवा डालने की धमकी तक दी गई. रक्षाबंधन के दिन वो किसी तरह रांची के किशोरगंज इलाके में स्थित अपने मायके गई और मौका पाकर कागज के टुकड़े में अपनी व्यथा लिखकर मेज की दराज में छोड़ आयी. उसे लगा था कि किसी की नजर पड़ेगी तो वे उसकी मदद के लिए आएंगे. लेकिन यहां भी उसकी किस्मत दगा दे गई. आखि‍र 17 अगस्त को उसने घर में काम करने वाले एक नौकर से मोबाइल लेकर अपने भाई को अपना दुखड़ा सुनाया. इसके साथ ही उसने अपने भाई से कहा कि वह पुलिस लेकर ही उसके घर आए. तारा को डर था कि उसका भाई अकेला आया तो ऊंचे रसूक वाला उसका पति उसके भाई को किसी मामले में फंसा देगा. तारा के अनुसार उसके पति रंजीत उर्फ रकीबुल की राजनीति और न्यायिक हलकों में अच्छी पैठ है. तारा की रंजीत से मुलाकात होटवार स्टेडियम में हुई थी, जहां वो शूटिंग की प्रैक्टिस के लिए अक्सर जाया करती थी. यहीं पर रंजीत ने तारा को सबके सामने पसंद करने व शादी का प्रस्ताव दे दिया था. 14 जून को रंजीत कुमार कोहली ने उसे घर पर डिनर के लिए बुलाया, इसके ठीक एक दिन बाद 15 जून को एक दोस्त के निमंत्रण पर तारा उसके घर डिनर के लिए पहुंची. वहां रंजीत भी पहले से ही मौजूद था, उसने तारा को अंगूठी व कंगन पहना दिया और शादी की तारीख तय करने की बात कही. इसके बाद 20 जून को दोनों की सगाई हुई और सात जुलाई को दोनों विवाह बंधन में बंध गए. लेकिन उसे यह पता नहीं था की मेहंदी का रंग उतरने के पहले ही उस पर सितम ढाने का सिलसिला शुरू हो जाएगा. FIR के बाद से रंजीत कुमार कोहली उर्फ रकीबुल अपने मां के साथ फरार है. हालांकि पुलिस फिलहाल इस पूरे मामले में फूंक-फूंककर कदम उठा रही है और ज्यादा बोलने से कतरा रही है. मामले के खुलासे के बाद झारखंड में खेलों से जुड़े संगठनों ने सीबीआई जांच की मांग की है. वहीं नकली हिंदू बनकर शादी रचाने के मामले में हिन्दू संगठनों ने भी सड़क पर उतरने का मन बना लिया है.लव-जेहाद: तारा शाहदेव को मिला तलाक, रकीबुल बन गया था रंजीत http://dhunt.in/4ixwn?s=a&ss=pd via Dailyhunt
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 06/27/2018 - 13:44 नवीन
डॉ सुहास म्हात्रे,
अश्या कृतींनी सामाजिक सौहार्द बिघडते आणि पर्यायाने देशाचे नुकसान होते, हे लक्षात घेणे हल्ली आवश्यक नाही, असाच व्यवहार बर्‍याच माध्यमांत दिसतो आहे.
या दोन्ही घटनांवरून बरीचशी माध्यमं मुद्दाम तेढ निर्माण करीत आहेत असं दिसतं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 06/27/2018 - 14:04 नवीन
बरीच भारतिय माध्यमे आणि त्यातले बरेच विश्लेषक (?!) एकांगी वादावादी करून अनेक आभास निर्माण करतात हे गुपित राहिलेले नाही... आणि त्यामागे त्यांचे वैयक्तिक हितसंबंध असतात हे पण काही गुपित नाही. मात्र, शिक्षित आणि समजूतदार म्हणवून घेणारे नागरिक जेव्हा त्यांची री ओढतात... आणि पर्यायाने स्वतःचे आणि स्वतःच्या पुढच्या पिढ्यांचे नुकसान करण्यास हातभार लावतात... तेव्हा नक्कीच खंत वाटते. :(
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Wed, 06/27/2018 - 13:45 नवीन
आज फ़ॅमिली कोर्ट ने तिचा घटस्फोट मंजूर केला , लिंक मध्ये ती बातमी आहे .
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Wed, 06/27/2018 - 17:59 नवीन
ह्या बातमीला मिपावर आणणारे श्री मंगुsssश्री आता झालेल्या नविन डेव्हलप्मेंट मुळे व्यथीत झालेले आहेत अशी नविन माहीती समोर आलेली आहे !!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 15 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 17 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 19 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 23 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा