Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - जून २०१८

M
manguu@mail.com
Tue, 06/12/2018 - 15:33
🗣 363 प्रतिसाद
भय्युजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली आहे. उदयसिंह देशमुख असं त्यांचं मूळ नाव असून अध्यात्मिक गुरु म्हणून त्यांची ओळख आहे. इंदूरमधील बॉम्बे रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं मात्र त्याचा काही उपयोग झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता आणि दिवाळखोरीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असं सांगण्यात येत आहे. भय्युजी महाराज यांना अनेक राजकारणी राजकीय गुरु मानत होते. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा छंद होता. स्वच्छता अभियान असेल किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग घेतला जात होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते त्यांचा राजकीय सल्ला घेत होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्जबाजारी झाले होते अशीही माहिती समोर येते आहे. भय्यूजी महाराज यांनी असे पाऊल का उचलले याचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी राजकारणातलाही सहभाग कमी केला होता. काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्यू महाराज यांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्ती येत असत. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत. भय्युजी महाराजांना मध्यप्रदेश सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. गेल्याच वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. त्याचसुमारास भय्युजी महाराजांनी आपण राजकीय क्षेत्राशी संबंध कमी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पहिल्या पत्नीच्या निधनानंतर परिस्थिती बिघडलेली होती. समाजाला दिशा दाखवणारा संत अशी त्यांची ओळख होती. धार्मिक, सांप्रदायिक, कृषि, शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांना गती होती. भय्यूजी महाराजांनी कामाचा व्याप प्रचंड वाढवला होता आणि तो व्याप सांभाळण्यापलीकडे गेला होता असं मत त्यांच्या निटवर्तीयांनी व्यक्त केलं आहे. अत्यंत धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवावं लागलं होतं. त्यासोबत कौटुंबिक समस्याही त्यांना सतावत होत्या अशी शक्यता व्यक्त होत आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 118005 views

🗣 चर्चा (363)
स
सोमनाथ खांदवे Sat, 06/16/2018 - 04:53 नवीन
मंडळी वार जाग्यावर सोडा , आता स्पश्ट झालय त्या मारहाणीत मराठी व ब्राह्मण या पैकी कुणीच नाय . राहुल गांधी ( आदर दिला पायजे बाबा ! कदाचित व्हईल सुदा पंतपरधान ) नेहमी परमाणे तोंडावर पडले त्यांना बी वाटल व्हत या केस मदी ब्राह्मण हायेत .
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 06/16/2018 - 06:17 नवीन
ते खोटे बोलताहेत, मग पाण्यात उतरलेले अनेक्जण असताना केवळ तीघानाच का मारले ?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 06/16/2018 - 17:22 नवीन
जागता पहारा यामधे आलेलि प्रतिक्रिया "आम्ही पाणी पितोय आणि तुम्ही नागड्याने यात आंघोळ करताय व्हय रे भाड्यानो, बाहेर या, तुम्हाला दाखवतो हिसका," असे म्हणून राहुल आणि सचिन या नागव्याने आंघोळ करत असलेल्या पोरांना जसे आहेत तसे विहिरीतून बाहेर काढले. त्यांना तसेच रागाने शेजारच्या शेडमध्ये नेण्यात आले. तेव्हा जाताना त्यांनी झाडाच्या फांद्या तोडून लज्जारक्षण केले. "नालायकांनो, तुम्हाला हजारदा सांगून तुम्ही ऐकायला तयार नाही, माजलाय रे !!" असे म्हणून सुती पट्ट्याने त्यांना चार फटके देण्यात आले व सोडण्यात आले. नंतर त्यांनी आंघोळीस उतरण्यापूर्वी विहिरीच्या काठावर दगड ठेवून ठेवलेले कपडे घालून पळ काढला. जामनेर मधील वाकडी गावातील ही तसे पाहायला गेले तर तशी अत्यंत सामान्य घटना आहे पण सध्या या घटनेला देशावर काहीतरी फार मोठे संकट आले आहे ..महाराष्ट्र खूप वर्षे पाठीमागे गेला ...अशा पद्धतीने घेतले जातेय आणि पराचा कावळा केला जातोय !! विहिरीचा मालक ईश्वर जोशी हा मुळात कोणी ब्राम्हण नव्हे. 'जोशी हा जातीने ब्राह्मण असता तर मजा आली असती' असे वाटणाऱ्यांचा हिरमोड झाला, हे खरे. त्यांचे जातीय दंगल घडवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले पण त्याला इलाज नाही! भिक्षा मागत फिरणाऱ्या कुडमुडे जोशी समाजाच्या भटक्या विमुक्तातील ईश्वर जोशी याची ही विहीर आहे आणि राहुल व सचिन ही मातंग समाजाची पोरे आहेत. ईश्वर जोशीने अनेक वेळा सांगितले की "बाबांनो, आम्ही हे पाणी पितो. आमच्या बरोबर अनेक लोक हे पाणी पितात. त्यामुळे तुम्हाला अंघोळ करायची असली तर पाणी बाहेर काढून आंघोळ करत चला. आत उतरून करू नका. पुन्हा सांगितले नाही म्हणू नका." असे अनेकदा समजावून सांगितलं. त्याचबरोबर अती झाल्यावर "तंगडे तोडीन" असे धमकावून सांगून सुद्धा पाहिले पण ऐकतील ती पोरे कसली..!! गुरं - शेळ्या घेऊन जायचं आणि कोणी नाही असे बघून धडाधड विहिरीत उड्या टाकायच्या. कुणी आलं, असे दिसले की, पळून जायचं.. या सर्वाला ईश्वर वैतागला होता. त्याने या दोघांच्या घरी जाऊन त्यांना व त्यांच्या पालकांना समजावले होते... पालकांची अगदी रडक्या स्वरात अजीजी केली होती. "जरा तुमच्या पोरांस्नी समजावून सांगा. नागड्यानं अंगुळ करत्यात. त्यात मुतत्यात. तेच पानी आमी पितावय !" तेव्हा "हिकडं यारं" म्हणून पालकांनी पोरांना समजावले होते. "जाऊ नका रं, तिकडं आन गेल्यासात तर हीरीत उतरू नगासा बगा. आज्याबाद पवायचं न्हाई. कळत नाही काय रे, तुम्हासनी !!" पण पोरांनी ऐकलं नाही !! एका मातंग व्यक्तीने पोरांच्या आईला उभा करून केस केली. मग पोलिसांनीही व्हिडिओ पाहिला व प्रथमदर्शी 323, 405, 506 व अट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत राहुल व सचिनने आपली चूक झाल्याचे पटकन मान्य केले !! तसेच त्यांच्या पालकांनीही 'आमची कोणतीही तक्रार नाही. पोरच harami हाईती. आमचं दिकाल ऐकत न्हाईती' असं पोलीस स्टेशनला स्पष्टपणे सांगितले आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sat, 06/16/2018 - 19:04 नवीन
वाह ! हे वाचुन एकदम मनाला हायसं वाटलं ! आता पाहुया वृत्तपत्रे ही बातमी कधी देतात ते अन मिपावरील स्वयं घोषित पुरोगामी कधी स्वतःची चुक कबुल करतात ते !!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sat, 06/16/2018 - 05:46 नवीन
ह्या घटनेत नागवं करून पट्ट्याने बेदम मारहाण करून वर व्हिडीओ बनवून तो व्हायरल केला गेला. ह्याला तुम्ही 'चार रट्टे देणं' म्हणाल का?
>>> चार रट्टे म्हणजे मोजून चार रट्टे ! सदर प्रकरणात मोजक्याच तिघांना बाजूला काढून मारणं हा प्रकार झालाय तो चुकीचाच आहे हे मी किमान 3 वेळा म्हणालो आहे वर ! त्यातून नागव करून मारणे अन त्याचा विडिओ काढून वायरल करणे हे कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाहीयेच ! चुकीचेच आहे ! मी त्याचे कदापि समर्थन करणार नाही , कोणताच सुज्ञ मनुष्य झाल्या प्रकाराचे समर्थन करणार नाही . कृपया गैरसमज करून घेऊ नका, मी कोणत्याही प्रकारे झालेल्या घटनेचे समर्थन करत नाहीये, पण झालेल्या घटनेला विहिरीचा मालक " जोशी" आहे म्हणून जो जातीय रंग द्यायचा प्रयत्न केवळ मिपावरच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर झाला त्याचा मी निषेध करत आहे आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे ह्या जातीपातीच्या राजकारणात सुशिक्षित लोकं सामान्यज्ञान फाट्यावर मारत आहेत त्याचा अजून जोरदार निषेध करत आहे ! बाकी गैरसमज नको . लहानग्या पोरांना नागव करून मारण्याचा जो झाला प्रकार चुकीचाच झालाय, ती पोरं कोणत्या का जातीची असेनात, मला त्यांच्या बाबत वाईटच वाटते आहे, आणि सदर प्रकरणातील गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी ह्यात काहीही दुमत नाही . आता बास.
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 06/16/2018 - 08:10 नवीन
ओके. चार रट्टे देऊन पोरांना सज्जड दम भरून हाकलून लावणे योग्य ठरले असते. प्रसंगी त्यांच्या आईवडिलांकडे त्यांची तक्रार केली असती, योग्यच झाले असते. एक म्हणजे विहीरमालकाची ती विहीर खासगी मालमत्ता आहे. तिथे कुणाही आगंतुकाला पोहू देण्यात बराच धोकाही आहे. कुणाच्या जीवाचं काही बरेवाईट झालं तर मालकाच्याच डोक्याला ताप होणार. त्यापेक्षा विहिरीत मुलांना पोचण्यास मज्जाव करणं योग्यच आहे. गावाकडे पिण्याच्या पाण्याच्या विहिरीतही पोहतात. पण आरोग्यदृष्ट्या तो मुद्दाही योग्य धरू. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत पोहू नये. अंघोळ करू नये. पण हे सगळं टाळण्यासाठी, मुलांना भीती बसावी व परत आपल्या विहिरीत ती उतरू नयेत हे करण्यासाठी मालकाने जी अमानुष पद्धत वापरली आहे ती मानवतेला कलंक फासणारी आहे. असो. माझ्याकडूनही चर्चेला पूर्णविराम.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 06/16/2018 - 04:31 नवीन
गेल्या आठवड्याभरात राखीगढीतील मृतावशेषांच्या जेनेटीक अभ्यासा बद्दलची बातमी आणि चर्चा इंग्रजी वृत्त माध्यमातून प्रामुख्याने दिसते आहे. त्या प्रमाणेच नागपूरजवळील नगरधन येथील वाकाटक कालीन अवशेषांचे उत्खनना बाबत इंडींयन एक्सप्रेस मध्ये हे वृत्त आले आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 06/16/2018 - 07:49 नवीन
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या पुजार्‍यांच्या नेमणूकी बाबत बातमी आहे. सर्वजातीच्या पुजार्‍यांना समान संधी असेल असे या बातमी वरुन दिसते. पौरोहीत्यात समान संधींचे स्वागत केले पाहीजे. आणि अशा सकारात्मक बातम्या असल्या म्हणजे समाजातील भेदाभेदही मिटण्यास मदत होईल आणि समाजातील परस्पर विश्वासास चालना मिळेल.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 06/16/2018 - 08:08 नवीन
माहितगार, माझ्या मते पौरोहित्य हे वाट्टेल त्याने करायची गोष्ट नाही. वंशपरंपरेने पुरोहित होत असेल तर कुणाच्या पोटात दुखायचं कारणंच काय मुळातून? पुरोहिताने फक्त धर्म पाळला म्हणजे झालं. दर वेळेस वेगळा पुरोहित नेमला तर पौरोहित्याच्या प्रशिक्षणासाठी अतिरिक्त संसाधनं खर्ची घालावी लागतील. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 06/16/2018 - 08:51 नवीन
प्रश्न उलटा आहे समान संधीने कुणाच्या पोटात का दुखावे ? थोडक्यात ज्या परंपरा सर्वजनांच्या आहेत त्या सर्व परंपरात समान संधी असणे नक्कीच गरजेचे आहे, आणि हिंदू धर्माच्या उदात्ततेच्या तत्वांना हे पाऊल साजेसेच आहे. इन एनी केस समाज बदलाची प्रागतिक प्रक्रीयेची ईश्वरेच्छा थांबवणे तुमच्या आणि आमच्या हातात नाही. या विषयावर सविस्तर भूमिका आधीच्या विवीध धागाचर्चांमधून मांडून झाली आहे. त्याची पुर्नावृत्ती करत नाही. शरदजींच्या एका धागा चर्चेत वंशपरंपरे बाबत आपणास विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर (आपण स्वतची समजूत नेमकी कशी काढता ? ) आपणाकडून अद्याप तरी आले नाही -कि आपण देऊ शकला नाही - त्यामुळे आपली वैचारीक प्रक्रीया अपुर्ण रहात असावी, याचे या निमीत्ताने स्मरण झाले. असो.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 06/16/2018 - 16:58 नवीन
माहितगार, माझ्या माहितीप्रमाणे समान संधी पोटभरू व्यवसायार्थ उचित आहे. पौरोहित्य ही पोट भरायची विद्या नाही. त्यामुळे इथे समान संधीचं सूत्र लावण्यात येऊ नये. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 06/17/2018 - 04:24 नवीन
पौरोहित्य ही पोट भरायची विद्या नाही.
पौरोहित्य करणारे लोक पौरोहित्य करण्याचे पैसे घेत नाहीत काय?
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sun, 06/17/2018 - 05:01 नवीन
पण सैध्यांतीकरित्या ति मजुरी किंवा कष्टाचे दाम नसुन पुरोहिताप्रती यजमानाने कृतज्ञना व्यक्त करण्याची पद्धत म्हणुन आहे. (पुरोहीतवर्ग सर्रास आपला 'रेट' सांगुन सेवा देतात हे खरं आहे, पण निरालसपणे आपली नित्य साधना करुन पौरोहित्य करणारे एक महाराज मी स्वतः बघितले आहेत. पुरोहीत वर्गाप्रती असणारी माझी चीड त्यांच्या संपर्कात आल्यावर बरीच कमी झाली)
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Mon, 06/18/2018 - 13:56 नवीन
तुमच्याप्रमाणेच मीही त्या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची वाट पहात होतो. तसेच श्री. शरद यांना विचारलेल्या मनुस्मृतीबाबतच्या प्रश्नाचेही, उत्तर मिळाले नाही. त्यांनी ‘प्रिय श्री स्वधर्म’ असा नविन धागाही काढला, पण उत्तर दिलेले नाही. त्यामुळेच मी त्या धाग्यावर काहीच लिहू शकलो नाही. एकदा भूमिका घेतलेलीच असेल, तर अशा प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत की काय, असे वाटते.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 06/19/2018 - 05:03 नवीन
टागोरांचा भारत अजून जागा व्हायचाय; sand of dead habit मध्ये reason has lost its way चालू आहे,
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 06/16/2018 - 08:18 नवीन
काश्मीरमधील पत्रकार शुजात बुखारी यांची गोळ्या घालून हत्त्या करण्यात आली. तसेच ड्युटीवरून गावी परतत असलेला निशस्त्र पोलीस औरंगजेब याचे अपहरण करून निर्घृण हत्त्या केली गेली. या दोन्ही घटनांमधून दहशतवाद्यांचा भ्याडपणा सिद्ध होतो आहे.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Sat, 06/16/2018 - 09:59 नवीन
आस काय करताय ? काश्मिर प्रश्न , आतेरिकी कारवाया , ह्ये असल इथ चघळत बसायला आमाला येळ हाये का ? . इथ फकस्त दलित मुस्लिम इरुद्ध सवर्ण ह्यानच्या मारामाऱ्या आणि भाजप इरोध या वर वाद घालत बसायच त्यो देश गेला खड्ड्यात . आमच्या मॅगुं बाबा ने तर त्या ईशयाच कापीराईट च घेतलय , जवा पासून धागा काडलय तवा पासून रोज रतीब च घालताय .
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 06/16/2018 - 11:49 नवीन
भाजपये विरोधी पक्षात होते तेमव्हा तेही असेच करायचे. आता आम्ही विरोधी पक्षात आहोत ना ?
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Sat, 06/16/2018 - 13:06 नवीन
आर तस नव्ह ! काश्मीर मध्ये शांतते साठी ज्यांनी जीव दिला शुजात बुखारी , पोलिसदलातील शिपाई औरंगजेब यांच्या बद्दल सवताच्या मनाने धा वीस वळी लिव की , तुज बी मन हलक व्हईल . सारख सारख भाजप इरोधात लिवल्या मूळ अजीर्ण व्हईल रे बाबा .
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 06/16/2018 - 12:16 नवीन
आमच्या मॅगुं बाबा ने तर त्या ईशयाच कापीराईट च घेतलय , जवा पासून धागा काडलय तवा पासून रोज रतीब च घालताय . तस करुन मंगु बाबा ला वाटतय की २०२८ मध्ये तरी कॉंग्रेस येईल !
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 06/16/2018 - 10:35 नवीन
शुजात बुखारींना शासनाने व्यक्तीगत सुरक्षा का दिलेली नव्हती , पोलीस दलाचा शिपाई औरंगजेब बहुधा बस मध्ये होता (चुभूदेघे) त्या बसला सुद्धा संरक्षण नव्हते का ?
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 06/16/2018 - 11:42 नवीन
गुटख्याची गाडी सोडली नाही म्हणून संतापलेल्या भाजपा आमदाराने पोलीस निरीक्षकाला दमबाजी केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली. गंगापूर- खुलताबादचे आमदार प्रकाश बंब यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना दमबाजी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. गंगापूर पोलिसांनी गुटख्याची एक गाडी पकडली होती. ती गाडी आमदार प्रकाश बंब यांच्या कार्यकर्त्याची होती, अशी चर्चा आहे. ती गाडी सोडण्यासाठी आमदार बंब यांनी पोलिसांना फोन केला. मात्र, पोलीस ऐकत नसल्याने आमदार बंब थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना दमबाजी केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘मला कळतं कुठे काय चालतं ते. याबाबत लोकप्रतिनिधींनी पोलिसांना सांगू नये आणि पोलिसांनी लोकप्रतिनिधींना शिकवू नये. आजपासून विभागात कुठेही अवैध धंदे चालणार नाही. सीएम साहेबांकडून मुंबईतून बदली करायला लावेन’, अशी धमकी देताना ते व्हिडिओत दिसत आहेत. आमदाराचा फोन आल्यावर कुठलीही गाडी सोडलीच पाहिजे आणि माझे म्हणणे ऐकत नसाल तर बदली करुन टाकेन, असा धमकीवजा इशाराच त्यांनी पोलिसाला दिला. https://www.loksatta.com/maharashtra-news/will-transfer-you-bjp-mla-prashant-bamb-threatens-to-gangapur-police-inspector-1697999/
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sun, 06/17/2018 - 07:25 नवीन
सतत , विना थकता , भाजपा विरोधी बातम्या मग त्या गल्लीतल्या भाजपा कार्यकर्त्यांशी संबंधित असोत वा राष्ट्रीय पातळीवरील नेत्याशी संबंधित असोत शेअर करण्याच्या तुमच्या अथक परीश्रमाला सलाम ! जगभरात भाजपा संबंधित जरा कुठे खुट्ट झालं की लगेच तुमच्या JIRA Heat map मध्ये दिसत असणार बहुतेक ;-) प्रत्येक पोस्ट शेअर करण्यासाठी ठराविक पैसे जरी मिळाले तरी पण मला माझे रोजचे काम सोडून होणे अवघड आहे. म्हणून जरा जास्तच आदर वाटतोय तुमचा.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sat, 06/16/2018 - 13:00 नवीन
शरद पवारांनी त्यांच्या सवयी प्रमाणे पुन्हा एकदा स्वत:च्याच वक्तव्यावरुन घूमजाव केले आहे. ----------------- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात यापुढं पुणेरी पगडीऐवजी फुले पगडीचा वापर करा, असं वक्तव्य करणाऱ्या शरद पवार यांनी या मुद्द्यावरून आता वेगळाच सूर आळवला आहे
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Sat, 06/16/2018 - 13:20 नवीन
दोन दिवस बाजूला ठेवून या देशाचा इचार करून बग ,या रमजान च्या पवित्र महिन्यात लष्करान पाकिस्तान बरुबर एकतर्फी शस्त्रसंधी क्येली व्हती ,पण ती बेनी कुत्री गोळीबार करायची कै थांबली नाय . आन ती काश्मिरी पब्लिक मस्जिद मदी नमाज पडून आल्या बरुबर कशापायी लष्करावर दगडफेक करत व्हती ? कंच्याच धर्मात आस शिकवल नाय . तूंच काय मत हाये याबद्दल ? जबरदस्ती नाय पण इग्नोर मारू नगस .
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 06/16/2018 - 14:30 नवीन
रमजानच्या वेळी अतिरेक्यांनी गोळी का मारली , याचे उत्तर मी द्यायचे. मग अधिक मासाच्या मुहूर्तावर अनारसे खात हरिहरी करण्याऐवजी विहिरीवरून बडवाबडवी केली , तर त्याचे उत्तर तुम्ही देणार का ?
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Sat, 06/16/2018 - 15:17 नवीन
आहो मंगु बाबा , देशा बद्दल , नमाज नंतर दगडफेक करणाऱ्या काश्मिरी जंते बद्दल , पत्रकार शुजात बुखारी बद्दल आणि देशासाठी वीरगती प्राप्त झालेल्या शिपाई औरंगजेब बद्दल आपली काय तरी मत मांडा ना आस मी म्हणल्यालो .तुमी फिरून फिरून त्याच चौकात येताय मला काय समजना .
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 06/16/2018 - 15:28 नवीन
शाइस्तेखान प्रकरण रमजान महिन्यात झाले. पानिपत संक्रांतीला झाले. हिंदु पौराणिक लढाया - रावण , नरकासुर वगैरे कोणत्या ना कोणत्या सणालाच झालेत ना ? राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेब याच्या हत्येनंतर देशभरात संतापाचं वातावरण आहे. निवृत्त लष्करी अधिकारी असलेल्या औरंगजेबच्या वडिलांनी मुलाच्या हौतात्म्यानंतर केंद्र सरकारला अल्टिमेटम दिला आहे. औरंगजेबच्या मारेकऱ्यांना ७२ तासांत संपवा, अन्यथा मी स्वत: त्याच्या हत्येचा बदला घेईन,' असं त्यांनी म्हटलं आहे. ईदच्या सुट्टीसाठी घरी परतणाऱ्या औरंगजेबचं पुलवामा इथं दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं. अपहरणानंतर या जवानाची निर्घृण हत्या करण्यात आली. मुलाच्या हत्येमुळं औरंगजेबचे वडील हनीफ यांना मोठा धक्का बसला आहे. अशा स्थितीतही देशासाठी लढण्याची व मरण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. 'औरंगजेबच्या मारेकऱ्यांना ७२ तासांत संपवा', असं आवाहन त्यांनी मोदी सरकारला केलं आहे. 'सरकारनं ७२ तासांत माझ्या मुलाच्या हल्लेखोरांना मारलं नाही तर मी स्वत: दहशतवाद्यांशी दोन हात करून सूड घेईन,' असं त्यांनी म्हटलं आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 06/16/2018 - 16:15 नवीन
हिंदु पौराणिक लढाया - रावण , नरकासुर वगैरे कोणत्या ना कोणत्या सणालाच झालेत ना ?

तुमचे डोकं नेहेमी तिरपंच चालतं म्हणून सगळा बेसिकमध्येच लोच्या आहे.

असे

चांगल्याचे वाईटावर विजय

म्हणूनच सण साजरे होतात. उदा. विजयादशमी साजरी केली जाते ते श्री रामानी रावणावर विजय मिळवला म्हणून

त्यांनी(श्री रामानी) काही विजयादशमीचा मुहूर्त पाहून लढाई नव्हती केली.

काहीही हा मोगा
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 06/16/2018 - 16:34 नवीन
ह्या सणांची पौराणिक महत्वे त्याहीपूर्वीपासून आहेत. नंतर रामायण महाभारत कालीन काही घटनाही त्याच दिवशी घडल्या , ज्यांचा पगडा लोकांवर जास्त असल्याने त्या घटना त्या सणाशी अधिक निगडीत झाल्या आहेत. उदा. विजयादशमी ला तुम्ही राम रावणाचा संदर्भ देताय , पण या सणाला कौत्स गुरुदक्शिणा - मोहरांचा पाऊस, पांडवानी शस्त्र घेतले, महिषासुर वध असे अनेक संदर्भ आहेत , त्यातले काही रामायणाच्याही पूर्वीही आहेत. उदा - कौत्स गुरुदक्शिणा - मोहरांचा पाऊस मीही तेच म्हणतोय - त्यांनी(श्री रामानी) काही विजयादशमीचा मुहूर्त पाहून लढाई नव्हती केली. इतकेच नव्हे तर विजयादशमी अन दिवाळी आहे, सण आहे, म्हणून लढाई करायचे कुणी पुढेही ढकलले नव्हते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 06/16/2018 - 16:50 नवीन
तेंव्हा तुमच्या सारखे पुरोगामी, सेक्युलर, बुद्धिवादी, निधर्मांध लोक नव्हते ना त्यामुळे श्रीरामाना अशा चिंता कराव्या लागत नव्हत्या. बाकी रामायण अगोदर होते का महाभारत याचा हि नीट अभ्यास करून सांगा बरं आम्हाला काय काय कसं कसं आणि केंव्हा झालं ते बाकी महिषासुराला शहिद म्हणणारी मंडळी ज ने यु मध्ये आहेतच काड्या घालायला.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 06/16/2018 - 17:12 नवीन
निधर्मि लोक सत्तेत आहेत का हो सध्या ? पूर्ण बहुमतात भाजपाजी सत्तेत आहेत ना ? युद्ध करायचे की तह हे सरकार ठरवते ना ? विजया दशमीचे संदर्भ 1. कौत्स , महिषासुर , ह्यातले 1, 2 मला माहीत नाही 2. राम रावण 3. पांडव शस्त्र https://www.speakingtree.in/blog/vijayadashami/m-lite इथे अजून संदर्भ आहेत .
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 06/17/2018 - 06:05 नवीन
मंगूखानला म्हणायचे आहे की शाइस्तेखानाची बिनपाण्याची हजामत करायला शिवाजी महाराज ( इथे ह च्या जागी ग ची भाषा वापरणार होतो , पण मंगुच्या भावना.... असो) रमजान संपण्याची वाट बघत बसले नाही, तर संधि मिळाल्यावर वार केला . असेच ना मोगाभाई?
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 06/17/2018 - 06:41 नवीन
मला काय म्हणायचे आहे हे कुणाला तरी समजले, ( या विषयापुरता , आता मी सुखाने मरतो. )
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 06/17/2018 - 10:42 नवीन
ते मगासच्याला टायम नव्हता म्हनून अर्धच टायपलं. थोरल्या महाराजाच्या वक्ताला ते तुमचं मानवाधिकार का क़ाय ते नव्हतं, आणि असत तरी महाराजांनी पैलादाँ त्यांना टकमक टोक दावलं असतं आणि मग स्वराज्य उभारल असत
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 06/17/2018 - 11:09 नवीन
मानवाधिकारवाल्यांपुढे कोंगेसवाले लोटांगण घालत होते म्हणून तर श्री मोदीजीना निवडून दिलेत ना ? आता तेही तेच कारण देणार ?
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Sun, 06/17/2018 - 11:58 नवीन
धोबीपछाड झाली तरी पैलवानांन हार मानायचं नसत , मर्दा सारख पुढच्या कुस्तीला तयार व्हायच . शाब्बास र पठ्ठ्या ! . आपल्या गव्हर्नमेंट ने रमजान महिन्या साठी मोठ्या मनानं एकतर्फी शस्त्रसंधी क्येली आन त्यात बी तू मानवाधिकार च राजकारण करतोय व्हय र ? रमजान महिन्यात आपल्या सैन्याने उलटा गोळीबार क्येला असता तर तुमच्या सारख्यानी मोदी सरकार ला घेरलं असत "रमजान महिन्यात गोळीबार करता ?" . आर !! त्या अफगाणिस्तान मधी सुदा तीन दिवस गोळीबार बंद व्हता . आज आपली बुलट बंद हाय का ? चालू कर बुलट , आन सुरवात कर गावच्या ह्या गल्लीतून त्या गल्लीत फिरायला , फटार !!!!!! ठो !! ठो ! ठो !!!! फटार !!!!! दुपार व्हत आली तरी भाजप च्या उण्या दुण्या नाय काढल्या याला काय आर्थ हाये का ?.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 06/17/2018 - 14:52 नवीन
मोदी सरकारने काढलेल्या विकेट या कोंग्रेसच्या काळातील विकेटपेक्षा भरपूर जास्त आहेत, मानवाधिकार्वारल्यांना तेव्हाच फाट्यावर मारायला पाहिजे होते जेव्हा काश्मीरात पंडित बेघर झाले होते, मताच्या बेगमीसाठी लांगुलचलन केले आणि काश्मीर जवळ जवळ हातातून गेले
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 06/17/2018 - 15:34 नवीन
तेंव्हा हे करायला हवे होते, अन ते नको करायला हवे होते. आता तुम्हाला का निवडून दिलय ? शिवाजी महाराज असते तर - मानवाधिकारवाल्याना जुमानले नसते , हे भक्त लोक स्वतःच लिहितात . शिवरायांचे आशिर्वाद देऊ , मोदीना निवडून देऊ , असे म्हणून त्याना निवडूनही दिले. आणि आता विसंगत आचरण ? भक्तांची फसगत झाल्याचे आता तरी लक्शात येते आहे का ?
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Sun, 06/17/2018 - 16:50 नवीन
आताशी कुठ 4 वर्ष झाल्यात , आर !! पॉर्ऱ्ह सुद्धा नऊ माहिन्यानीच व्हत्यात , लै प्रश्न सोडवायच हायेत बाबा . 40 वर्ष्यात जर भाजप न काँग्रेस ने तयार क्येलेल्या अडचणी नाय सोडवल्या तरच म्हणता येईल फसगत झाली . जगातील सीरिया ,येमेन या आणि काही आफ्रिकेतल्या मुस्लिम कन्ट्री सोडल्या तर गेल्या साठ सत्तर वर्ष्यात सगळ्या द्येशानी प्रगती क्येलेली हाये . मंगु बाबा तुमाला नै वाटत का आपण पण अशीच प्रगती क्येली पायजे ?. सोच भला व्होगा भला !!!!
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 06/17/2018 - 17:00 नवीन
नेपाळ तर हिंदुराष्ट्र आहे ना ? pure hindu राष्ट्र ? त्यांनी काय उजेड पडलाय ? मुस्लिम अन ख्रिश्चनांच्या नावाने कोकलून शेवटी नोकर्या करायला त्यांच्याच देशात जातात , नेपाळला का जात नाहीत ?
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Sun, 06/17/2018 - 18:51 नवीन
परत गाडी घसरली वाटत !! नीट वाचा मंगु भाई ! ' सीरिया , येमेन आणि आफ्रिकेतील मुस्लिम कन्ट्री सोडून बाकी सगळ्यांची प्रगती झाली ' आस म्या म्हणलो . आपल्याला पण बाकी च्या सारखी प्रगती करायची का नाय ?. फटार !!!!! फट !!फट !! ठो !! ठो !!!!! तुमची बुलट नेपाळ ख्रिश्चन कन्ट्री ला काशी काय पोचली ? डायरेक्ट टट्रॅक चैन्ज .
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 06/17/2018 - 22:12 नवीन
जगातील सीरिया ,येमेन या आणि काही आफ्रिकेतल्या मुस्लिम कन्ट्री सोडल्या तर गेल्या साठ सत्तर वर्ष्यात सगळ्या द्येशानी प्रगती क्येलेली हाये . त्या सगळ्यात 2014 पूर्वी भारत नव्हता का ?
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 06/17/2018 - 17:02 नवीन
आणि भाजपेयींची 5 कुणाची ?
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Sat, 06/16/2018 - 15:29 नवीन
पवित्र म्हैन्यात ह्ये आस कस वागत्यात मला ह्येच कळत न्हाय , तुमचा काय अभ्यास आसल तर आमाला बी सांगा येवढी च ईनंती हाये ' रमजान चा महिना असल्याने भारताने महिनाभर शस्त्रसंधी पाळली. मात्र पाकिस्तानचे नापाक इरादे जसेच्या तसेच आहेत हेच दिसून येते आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन पाकिस्तानने केलेच शिवाय जम्मू काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेकही करण्यात आली. त्यामुळे आज रमजान ईद असूनही या ठिकाणचे वातावरण काहीसे धुमसतेच राहिले आहे. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग भागातही सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी पाकिस्तान आणि आयसिसचे झेंडेही फकडवण्यात आले. तसेच जमावही मोठ्या प्रमाणात जमला होता आणि घोषणाबाजी करू लागला होता. त्यामुळे या जमावाला पांगवण्यातठी सुरक्षा दलांनी अश्रू धुराच्या नळकांड्याही फोडल्या. दोन दिवसांपूर्वीच जामा मशिद भागातही असाच प्रकार घडला होता. गेल्या 4 आठवड्यांपासून दगडफेकीच्या घटना कमी झाल्या आहेत असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असले तरीही गेल्या काही दिवसांपासून दगडफेकीच्या घटना वाढल्या आहेत. पाकिस्तानच्या या नापाक हरकतीचे परिणाम अटारी आणि वाघा बॉर्डरवरही बघायला मिळाले या ठिकाणी बीएसएफच्या जवानांनी आणि पाकिस्तानच्या रेंजर्सनी ईदची मिठाईही दिली नाही. '
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Sat, 06/16/2018 - 15:38 नवीन
च्याक ! च्याक !!आदीच सांगितलं व्हत ना भाजप कांग्रेस बाजूला ठ्येवायची म्हणून ? मोदीच्या इतिहास आब्यास चा सबंद च न्हाई .
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Sat, 06/16/2018 - 16:28 नवीन
ह्ये काय मंगु बाबा, पाकिस्तान च्या गोळीबार ला आन जनते च्या दगडफेकी ला तुमी समर्थन च द्येताय की त्यांचा निषेध करायचं सोडून . काय आर्थ त्या निसत्या कापी पेस्ट ला . कुठली तुलना कुठ करताय , येवढी पुराणातील वांगी दाखवून काय उपयोग .तुमाला देशप्रेमच नाय गाड्या .
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 06/16/2018 - 17:15 नवीन
मी भाजपाने शस्त्र संधी करू नये या संदर्भात बोललो पाकिस्तान हे शत्रू राष्ट्र असल्याने त्याने भारतावर केलेले सर्वच हल्ले निषेधार्हच आहेत .
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Sat, 06/16/2018 - 17:37 नवीन
मंगु बाबा , ज्याच्या डोक्यात आन मनात असत त्येचं लेखणी द्वारे प्रतिबिंबित व्हत असत .ताकाला जाऊन भांड कशाला लपवताय ? पाकिस्तान चा निषेध करायचा सोडून पुराणातील लढाया चा उल्लेख जो तुमी केला " शाहिस्तेखान च प्रकरण रमजान महिन्यात झाले. पानिपत संक्रांतीला झाले. हिंदु पौराणिक लढाया - रावण , नरकासुर वगैरे कोणत्या ना कोणत्या सणालाच झालेत ना ? " यातून तुम्ही कक्लीअर सिध्द करताय की पाकिस्तान ने रमजान महिन्यात केलेला गोळीबार बरोबर हाये .याच्या पुढ तुमी याच इशयावर शब्दा चा अजून किस पाडत आसाल तर तुमीच डोक तपासून घ्या .
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 06/16/2018 - 18:57 नवीन
सण अन कामबंदी हेही आम्हाला अप्रुपच आहे . माझ्या 13 वर्षाच्या मेडिकल प्रोफेशनात मी हार्डली 4-5 दिवाळ्या घरी राहिलो असेन , त्यातले 2 अपघातामुळे घरीच होतो म्हणून सणाचे निमित्त करून युद्ध बनद करणारे भारत सरकार , ते काँग्रेसचे असो की भाजपाचे , हा विचार मला acceptable नाहीच
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 13 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 14 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 16 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 20 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा