Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

बिथरलेले हिंदूत्व

न
नर्मदेतला गोटा
Tue, 04/03/2018 - 12:07
💬 196 प्रतिसाद
स्वातंत्र्यपूर्व काळामधे त्या वेळच्या इंग्रज राज्यकर्त्यांनी हिंदू आणि मुसलमानांमधे डावं-उजवं करण्याचा प्रयत्न केला. अनेकदा हिंदूंना डावलून मुसलमानांना झुकतं माप दिलं गेलं. यामुळे हिंदूंमधे आपल्याला डावललं जातं आहे अशी एक सुप्त भावना होती. यातूनच हिंदूत्वाच्या राजकारणाला सुरुवात झाली. सावरकरांनी भारतीय राजकारणामधे हिंदूत्वाचा ठळकपणे उच्चार केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा हेसुद्धा हिंदूत्वाचाच आधार घेत होते. संघाची राजकीय शाखा असलेल्या भारतीय जनसंघाने सुद्धा हिंदूत्वाचे राजकारण केले. स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी पूर्वीच्या राज्यकर्त्यांचाच कित्ता गिरवला. त्यामुळे स्वतंत्र भारतामधेही हिंदूंमधे डावलले गेल्याची भावना तशीच राहिली. त्यामुळे हिंदूत्वाच्या राजकारणाला बळकटी मिळत राहिली. पुढे शाहबानो प्रकरण घडले. एका मुसलमान स्त्रीला कायद्याने दिलेला न्याय, कायदा बदलून नाकारण्यात आला. हे काही मुल्ला मौलवींची मर्जी राखण्यासाठी झाले. यामुळे हिंदूत्वावर आधारित राजकारण करणाऱ्यांना आयते कोलीतच मिळाले आणि मग त्यांनी सरकारच्या विरोधात रान पेटवले. "बघा बघा हिंदूंनो तुमची दखलसुद्धा घेतली जात नाही आणि मुल्ला मौलवींची मात्र मर्जी कशी राखली जाते पहा" असे हिंदूत्ववादी हिंदू जनतेला सांगत राहिले. हिंदूंवरती सतत कसा अन्याय होतो आहे असे सांगणारे हिंदूत्ववादी हिंदूंच्या विरोधात बघा कसे संघटित षडयंत्राचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगताना लव्ह जिहाद सारखे मुद्दे पुढे आणू लागले. हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाच्या कथा रंगवून रंगवून सांगितल्या जायला लागल्या आणि यामधून हिंदूंना फक्त आम्हीच सोडवू शकतो असे म्हणून स्वतःचे महत्व वाढविण्याचा हिंदूत्ववादी प्रयत्न करू लागले. ह्या देशांत हिंदू धर्म खतरे में असे म्हणायला हिंदूत्ववाद्यांना संधीची कमतरता कधीच भासली नाही. त्यांना भांडवल करता येईल असे मुद्दे सतत मिळत राहिले. यातूनच ज्या राजीव गांधींनी शाहबानोचा निर्णय फिरवला, त्याच राजीव गांधींना हिंदूंना खूष करण्यासाठी अयोध्येच्या मंदिराचे दरवाजे उघडावे लागले. हिंदूत्वाचे राजकारण सुरूच राहिले. आपल्यावर अन्याय होतो आहे हे म्हणणे विरोधात असताना तसे सोपे असते. छोट्या छोट्या गोष्टींचे भांडवल करून जनतेमधे असंतोष उभा करता येतो. सरकारने हज यात्रेला सबसिडी दिली तर "त्यांना देता मग आम्हाला का नाही" किंबहुना "आम्हा हिंदूंना डावललं जातंय" ही आवडती बोंब ठोकता येते आणि त्यातून राजकारण साधता येते, स्वतःचे महत्व अबाधित राखता येते. या सगळ्या प्रयत्नातून अखेर हिंदूत्ववादी म्हणवणार्‍या पक्षांना भारतामधे सत्ता मिळाली. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर बसले. पण आजवर हिंदूंवर सतत अन्याय होतो आहे, हिंदूंना सतत डावललं जात आहे अशा प्रकारच्या तक्रारी करण्याची सवय पडलेल्या कार्यकर्त्यांना आता मात्र कुठलाच उद्योग राहिला नाही. कारण तक्रार तरी कुणाच्या विरोधात करायची ? सरकार त्यांचेच होते. पण हिंदूंवर अन्याय होतो आहे अशी रडारड करण्याची सवय मात्र गेली नाही. ती वेगळ्या स्वरूपात बाहेर यायला लागली. आपल्याकडे मूळातच जंगलतोड खूप झालेली आहे. राखायला पाहिजेत अशी जंगले सुद्धा आपण राखू शकलेलो नाही. त्या ठिकाणी माणसाचे अतिक्रमण झाले. त्यामुळे होळीच्या निमित्ताने तरी लाकडे जाळू नका आणि वृक्षतोड करू नका. निसर्गाने आपल्याला दिलेले पाणी मर्यादित आहे. रंगपंचमीच्या निमित्ताने आपल्या घरातले पाणी नासू नका त्यामुळे आपलीच गैरसोय होणार आहे. असे कोणी सांगायला गेले की बिथरलेले हिंदूत्ववादी अंगावर यायला लागले. आम्हा हिंदूंनाच तुम्ही बंधने का घालता ? त्यांच्या बकरी ईदला ते इतके पाणी खर्च करतात मग आम्ही पाण्याची नासाडी का करू नये असे युक्तिवाद ऐकू यायला लागले. दिल्लीतील प्रदूषण पाहून सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातली त्यावेळी अनेक हिंदूत्ववाद्यांनी त्याचा निषेध केला. काही जणांनी तर आजवर आपण फटाके उडवत नव्हतो पण केवळ निर्णयाचा निषेध करण्यासाठी फटाके उडविणार आहोत असे जाहीर केले. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर हिंदूत्ववादी निस्तेज व्हायला लागले. पर्यावरणाच्या विनाशामधे हिंदूत्व शोधायला लागले. सत्तेमधे बसलेले लोक आपापले काम करत होते पण सत्तेबाहेर राहणाऱ्या हिंदूत्ववादी गटांमधे मात्र तू जास्त भगवा की मी अशी अहमहमिका सुरु झाली. पूर्वी अहिंदूंचे कसे लाड होत आहेत म्हणून त्यांच्या विरोधात लढणारे हिंदूत्ववादी आपापसात लढून स्वतःचे उपद्रवमूल्य वाढवण्याचा प्रयत्न करू लागले. गो सेवकांच्या हिंसाचारामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना कानपिचक्याही दिल्या. ज्या हिंदूत्वाने आयोध्येसारखे लढे उभारले, तेच हिंदूत्ववादी आता अगदी क्षुल्लक मुद्यांचे केविलवाणेपणाने राजकारण करताना दिसू लागले. राजकारणातला आणखी एक सुप्त हेतू असतो. तो म्हणजे आपल्याला मते देणाऱ्यांना चुचकारणे आणि आपल्या विरोधात असणाऱ्यांना झोडपणे, धाक दाखवणे, बदनाम करणे. हिंदूत्ववाद्यांनी एक प्रकारे हिंदूंना चुचकारले आणि आपल्याला मते न देणाऱ्या अहिंदूंना इशारे दिले, धाक बसवला. सुरुवातीला हिंदूत्ववादी अशी प्रतिमा असणाऱ्या नरेंद्र मोदींना केवळ हिंदूंचेच नव्हे तर मुस्लिमांचे सुद्धा समर्थन मिळू लागल्यानंतर मुस्लिमांना दुखावणे परवडणारे नव्हते. मुस्लिमांच्या विरोधात लव जिहाद वगैरे सारखे मुद्दे मांडणे सुद्धा आता अवघड झाले. कारण आपल्याला मत न देणाऱ्याला सर्व प्रकारे कोंडीत पकडण्यासाठी निरनिराळे प्रचाराचे, अपप्रचाराचे मुद्दे वापरले जातात. ते मुद्दे तो आपला मतदार झाल्यानंतर पुन्हा बासनात गुंडाळून ठेवावे लागतात. लव जिहादचे प्रकरण म्हणून सांगितलेली एक केस 2017 मधे न्यायालयाने फिरवली आणि त्या मुलीला पुन्हा आपल्या नवऱ्याबरोबर राहण्याची मुभा देण्यात आली. लव जिहादची हाकटी पिटणारे तोंडावर आपटले. मुसलमान सुद्धा आपला मतदार झाल्यानंतर हिंदूत्ववादी राज्यकर्ते त्यांच्या अजानच्या वेळी आपली सभा थांबवून ठेवू लागले. अशा वेळी हिंदूत्ववाद्यांना आपलेच दात ओठ खाण्यावाचून दुसरा काही पर्याय राहीला नाही. पुढचा काही काळ तरी हिंदूत्वाला भारतामधे मार्केट राहणार नाही, असे दिसते.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 48085 views

💬 प्रतिसाद (196)
व
विशुमित गुरुवार, 04/05/2018 - 07:00 नवीन
चान चान चान ...!!
  • Log in or register to post comments
न
नर्मदेतला गोटा Fri, 04/06/2018 - 07:46 नवीन
विशुमित, हेच म्हणायचे होते मला लोक लवकर मुद्द्यावर येत नाहीत आणि लेखामधे आपल्या स्वतःवर टीका केलेली आहे असे मानतात.
  • Log in or register to post comments
न
नर्मदेतला गोटा गुरुवार, 04/05/2018 - 14:43 नवीन
बिटाकाका सामान्य हिंदू वेगळा आणि हिंदूत्त्वाचे राजकारण करणारा वेगळा
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका गुरुवार, 04/05/2018 - 15:52 नवीन
बर्राबर वलीकलाव! हेच सांगण्याचा प्रयत्न चाललाय! सगळ्या हिंदुत्ववाद्यांना राजकारण करणारे हिंदू म्हणता येत नाही.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर गुरुवार, 04/05/2018 - 16:37 नवीन
सगळ्या हिंदुत्ववाद्यांना राजकारण करणारे हिंदू म्हणता येत नाही.
एक शंका _ जैनांना (अमित शहा) तुम्ही हिंदू मानता का ? बिटेकर काका ..
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 04/05/2018 - 16:47 नवीन
अर्रारा...
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका गुरुवार, 04/05/2018 - 19:19 नवीन
काय वाह्यात प्रश्न कम शंका आहे, मी मानायचा न मानायचा प्रश्न येतोच कुठे? ते स्वतःला काय मानतात हे त्यांना विचारा.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर गुरुवार, 04/05/2018 - 19:29 नवीन
सगळ्या हिंदुत्ववाद्यांना राजकारण करणारे हिंदू म्हणता येत नाही.
तुमच्या या वरील प्रतिक्रियेचा व "अमीत शहांनी स्वतः ला हिंदू मानण्या/न-मानण्याचा", काय संबंध आहे ? ते लक्षात आले नाही. ठीक आहे, तुमच्या वरील प्रतिक्रियेवरून, मी परत माझ्या शंका विचारू शकतो का तुम्हाला ? १. अमित शहा तुम्हाला हिंदुत्ववादी वाटतात का ? २. अमित शहा तुम्हाला राजकारणी वाटतात का ? ३. २ चे उत्तर होकारार्थी असेल, तर अमित शहांच्या राजकारणाची बैठक तुम्हाला हिंदुत्ववादी-राजकारण करणारी वाटते का ?
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका गुरुवार, 04/05/2018 - 20:25 नवीन
मालक बररोबर उलटा मुद्दा चर्चित आहात आपण. माझा मुद्दा भारतात अनेक हिंदुत्ववादी (अगदी सामान्य लोकं सुद्धा) आहेत आणि ते अजिबात राजकारण करत नाहीत हा आहे. ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर करून काय उपयोग? ----------------------------- अमित शहा किंवा कुठलेही राजकारणी हे काही हिंदुत्ववादयांचे प्रमाण नाही. तुम्ही फक्त एकच मुद्दा पुढे रेटत आहात, सगळे हिंदुत्वमाफी हे राजकारणी आहेत हा. आपल्या मतांमध्ये जमीन अस्मानाचा फरक दिसतोय त्यामुळे ही माझी लेखनसीमा समजा. मूळ मुद्दा कळल्यास, पुढे चर्चा संभवु शकते, तोपर्यंत शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 04/05/2018 - 20:48 नवीन
"तुम्हाला मूळ मुद्दा समजलाच नाहीये" हे तर मिपावरील वादाचे भरतवाक्य आहे. सो....
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 04/06/2018 - 04:35 नवीन
बरं बीटाकाका, माझ्यावर असे काऊ नका. मला आपला अँगल कळायला वेळ लागतोय हे मानूनसुद्धा. .
माझा मुद्दा भारतात अनेक हिंदुत्ववादी (अगदी सामान्य लोकं सुद्धा) आहेत आणि ते अजिबात राजकारण करत नाहीत हा आहे.
. काका, आपल्या मान्यतेनुसार, "राजकारण अजिबात न करणाऱ्या हिंदुत्ववादी अनेक लोकांपैकी", आपल्याच मतानुसार टॉप 5 नावं देता येतील का प्लिज ?
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Fri, 04/06/2018 - 06:00 नवीन
१. मला योग्य वाटत असलेली व्याख्या मी वर दिली. २. त्या व्याख्येनुसार हिंदू सभ्यता, धार्मिकता किंवा सामाजिकता याचं आचरण आणि अभ्यास करणारे सर्व सामान्य, असामान्य जन हे हिंदुत्ववादी ठरतातअसे मत वर मी मांडले. ३. हिंदुत्ववाद हा फक्त राजकारणाशी निगडित विषय आहे हे मला पटत नाही. ====================== आता वरील मतांनुसार टॉप ५ राजकारण न करणारे हिंदुत्ववादी वगैरे काही लिस्ट करण्याची गोष्ट आहे असे मला अजिबात वाटत नाही. आजूबाजूचे हिंदू हे तितकेच महत्वाचे हिंदुत्ववादी आहेत. ====================== राजकारण न करणारे हिंदुत्ववादी बहुसंख्य असूनही काही ठराविक संघटनांच्या ठराविक विषयावरील हिंदुत्ववादावर आधारित राजकारणाला केस बाय केस पाठिंबा दर्शवतात तसेच केस बाय केस विरोध दर्शवतात, पण तो पूर्णतः वेगळा विषय आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 04/06/2018 - 06:26 नवीन
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 04/06/2018 - 06:27 नवीन
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Fri, 04/06/2018 - 13:35 नवीन
ते कोणतर कुणालातरी म्हणलं होतं मागे, सगळं समजयलाच पाहिजे असं नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 04/06/2018 - 13:52 नवीन
>>> एक शंका _ जैनांना (अमित शहा) तुम्ही हिंदू मानता का ? बिटेकर काका .. बिटाकाकांना माहिती नसावे, म्हणून मीच खुलासा करतो. अमित शहा जैन नसून हिंदू आहेत. बाकी तुमचं चालू द्या. पुष्यमित्र शुंग महाराज की जय!
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 04/06/2018 - 14:55 नवीन
ब्वार गुर्जी , तुम्ही म्हणता तर तसं समाजा . Image removed.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 04/06/2018 - 15:09 नवीन
अमित शहा (जैन) ???? . Image removed.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 04/06/2018 - 15:16 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/i-am-not-jain-i-am-hindu-vaishanv-amit-shah-replays-to-congress-1658552/
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Fri, 04/06/2018 - 18:10 नवीन
श्रीगुरुजी, मला माहिती नव्हते असे नाही, शिवाय त्यांनाही माहीत नसेल असे नाही. पण ते अजो म्हणतात तसं सिनिसिझम केला नाही तर मग काय मज्जा ;);) ===================== मुळात ते जैन असते तरी त्याचा या विषयाशी काय संबंध??
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 04/06/2018 - 19:05 नवीन
मुळात ते जैन असते तरी त्याचा या विषयाशी काय संबंध?? आहे ना. बादरायण संबंध जोडून जातीयवादी मळमळ ओकणे हे त्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. उदाहरणार्थ श्रीरामायण आणि पुष्यमित्र शुंग. तसेच उगाच जैन, हिंदू असले काहीतरी उकरायचे. मग त्याचा विषयाशी अजिबात संबंध नसला तरी हरकत नाही.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Fri, 04/06/2018 - 21:34 नवीन
जसा तुम्ही त्यांचा जैन असण्याचा बादरायण संबंध उकरून काढला, तसे. हम्म, आले लक्षात.
  • Log in or register to post comments
न
नर्मदेतला गोटा गुरुवार, 04/05/2018 - 18:06 नवीन
बिटाकाका आता कळलं तुम्हाला, थँक्स
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका गुरुवार, 04/05/2018 - 19:17 नवीन
कपाळावर हात मारून घ्यायची स्मायली!!!
  • Log in or register to post comments
T
Topi Wed, 04/04/2018 - 19:46 नवीन
ज्या भारतीय नागरिकांना एका पेक्षा जास्त बायकांशी लग्न करता येत नाही ते हिंदू आहेत
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 04/06/2018 - 17:57 नवीन
ही खतरनाक व्याख्या अहे =))))
  • Log in or register to post comments
न
नर्मदेतला गोटा Wed, 04/04/2018 - 21:02 नवीन
कृपया लेखामधे वर्णिलेल्या उदाहरणांबद्दल बोला त्या उदाहरणांमध्ये काहीच वावगं वाटत नसेल तर स्वच्छपणे तसं सांगा
  • Log in or register to post comments
प
प्रियाभि.. Wed, 04/04/2018 - 22:21 नवीन
असा एकांगी लेख नर्मदेच्या गोट्याचाच असू शकतो..
  • Log in or register to post comments
S
sagarpdy गुरुवार, 04/05/2018 - 07:27 नवीन
पुढचा काही काळ तरी हिंदूत्वाला भारतामधे मार्केट राहणार नाही, असे दिसते.
कायपण ! आमच्या पाठीशी शिवभक्त, मंदिर प्रेमी युवराज आहेत. https://www.huffingtonpost.in/uday-balakrishnan-/the-congress-is-indias-or_b_10520672.html अर्थात हिंदुत्वाची व्याख्या काय ती सेटल करून घ्या.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 04/05/2018 - 07:34 नवीन
सही बात.. जब तक "सुरज" "चांद" रहेगा... हिंदूत्वाला भारतामधे मार्केट राहणारच. ... <<अर्थात हिंदुत्वाची व्याख्या काय ती सेटल करून घ्या. ==>> अजून हिंदू धर्म आहे की जीवन पद्धती हेच जर नीट ठरले नाही तर व्याख्या कुठून सेटल करणार?
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 04/05/2018 - 07:38 नवीन
मुसलमान सुद्धा आपला मतदार झाल्यानंतर हिंदूत्ववादी राज्यकर्ते त्यांच्या अजानच्या वेळी आपली सभा थांबवून ठेवू लागले.
त्येचं कसं हाय, पुरोगामी लोक मोदीची भाषणं आत्ता ऐकू लागलेत म्हणून त्यांना अजानच्या वेळेस भाषण आत्ता आत्ता थांबू लागलंय असं वाटतंय. पर तसं काय नाय. ते भाषणं अगोदर बी थांबायचे आन (बिथरलेल्या) हिंदू लोकायले ते थांबणं अगोदरपासूनच माहिताय. ============================================= पुरोगाम्यांची माहिती जशी जशी वाढलालीय तसा तसा त्यांचा कॉग्निटिव डिसोनान्स (शब्दसौजन्य : युयुत्सु) लैच वाढत चाल्लाय.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 04/05/2018 - 07:48 नवीन
<<ते भाषणं अगोदर बी थांबायचे आन (बिथरलेल्या) हिंदू लोकायले ते थांबणं अगोदरपासूनच माहिताय>>> ==>> अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी पूर्वीसुद्धा होयच्या पण २०१४ नंतर काही लोकांना त्याचा साक्षात्कार होऊ लागला. तो भाग गौण आहे. <<< पुरोगाम्यांची माहिती जशी जशी वाढलालीय तसा तसा त्यांचा कॉग्निटिव डिसोनान्स (शब्दसौजन्य : युयुत्सु) लैच वाढत चाल्लाय.>>> ==>> हीच तर धोक्याची चाहूल वाटत आहे.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 04/05/2018 - 08:18 नवीन
एका बाईवर बलात्कार झाला. पोलिसांनी डावं-उजवं करण्याचा प्रयत्न केला. बलात्कार्‍यांना झुकतं माप दिलं गेलं. यामुळे तिच्यामधे आपल्याला डावललं जातं आहे अशी एक सुप्त भावना होती. यातून सूडाची सुरुवात झाली. तिच्या घरच्यांनी तोच कित्ता गिरवला. कोर्टातही तिला डावलले गेल्याची भावना तशीच राहिली. पुढे तिचे घर जाळले गेले. हे काही बलात्कार्‍यांची मर्जी राखण्यासाठी झाले. यामुळे तिच्या घरच्यांना आयते कोलीतच मिळाले आणि मग त्यांनी सरकारच्या विरोधात रान पेटवले. "बघ गं बाई, तुझी दखलसुद्धा घेतली जात नाही आणि बलात्कार्‍यांची मात्र मर्जी कशी राखली जाते पहा" असे घरचे शेजार्‍यांना सांगत राहिले. अबलेवर सतत कसा अन्याय होतो आहे असे सांगणारे छेडछाडिसारखे सारखे मुद्दे पुढे आणू लागले. या कथा रंगवून रंगवून सांगितल्या जायला लागल्या. ह्या गावात बायका खतरे में असे म्हणायला घरच्यांना संधीची कमतरता कधीच भासली नाही. त्यांना भांडवल करता येईल असे मुद्दे सतत मिळत राहिले. यातूनच ज्या सरपंचांनी साक्ष फिरवली, त्याच पंचांना घरच्यांना खूष करण्यासाठी त्यांच्याच स्वतःच्या घरात जाऊ द्यावे लागले. आपल्यावर बलात्कार झाला आहे हे म्हणणे झाला असल्यावर तसे सोपे असते. छोट्या छोट्या गोष्टींचे (बलात्कार शेवटी एक संभोगच, त्यात काय एवढं? तो आनंदाने का नाही करू द्यायचा, इ इ) भांडवल करून मनामधे असंतोष उभा करता येतो. सरकारने बलात्कार्‍यांच्या वकीलाची फी दिली तर "त्यांना देता मग आम्हाला का नाही" किंबहुना "आम्हाला डावललं जातंय" ही आवडती बोंब ठोकता येते आणि त्यातून राजकारण साधता येते, स्वतःचे महत्व अबाधित राखता येते. या सगळ्या प्रयत्नातून अखेर सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळाला. पण आजवर आमच्यावर सतत अन्याय होतो आहे, सतत डावललं जात आहे अशा प्रकारच्या तक्रारी करण्याची सवय पडलेल्या बाईला आता मात्र कुठलाच उद्योग राहिला नाही. कारण तक्रार तरी कुणाच्या विरोधात करायची ? निकाल तिच्याच बाजूचा. पण अन्याय होतो आहे अशी रडारड करण्याची सवय मात्र गेली नाही. ती वेगळ्या स्वरूपात बाहेर यायला लागली. आपल्याकडे मूळातच जंगलतोड खूप झालेली आहे. राखायला पाहिजेत अशी जंगले सुद्धा आपण राखू शकलेलो नाही. त्या ठिकाणी माणसाचे अतिक्रमण झाले. त्यामुळे होळीच्या निमित्ताने तरी लाकडे जाळू नका आणि वृक्षतोड करू नका. निसर्गाने आपल्याला दिलेले पाणी मर्यादित आहे. रंगपंचमीच्या निमित्ताने आपल्या घरातले पाणी नासू नका त्यामुळे आपलीच गैरसोय होणार आहे. असे कोणी सांगायला गेले की बिथरलेली बाई अंगावर यायला लागली. आम्हालाच तुम्ही बंधने का घालता ? त्यांच्या क्रिकेट लॉनला ते इतके पाणी खर्च करतात मग आम्ही पाण्याची नासाडी का करू नये असे युक्तिवाद ऐकू यायला लागले. गावातील प्रदूषण पाहून सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातली त्यावेळी अनेक शेजार्‍यांनी त्याचा निषेध केला. काही जणांनी तर आजवर आपण फटाके उडवत नव्हतो पण केवळ निर्णयाचा निषेध करण्यासाठी फटाके उडविणार आहोत असे जाहीर केले. निकाल आल्यानंतर घरचे निस्तेज व्हायला लागले. पर्यावरणाच्या विनाशामधे न्याय शोधायला लागले. केसवर काम करणारे लोक आपापले काम करत होते पण पाठींबा देणार्‍या गटांमधे मात्र अहमहमिका सुरु झाली. पूर्वी बलात्कार्‍यांचे कसे लाड होत आहेत म्हणून त्यांच्या विरोधात लढणारे घरचे आपापसात लढून स्वतःचे उपद्रवमूल्य वाढवण्याचा प्रयत्न करू लागले. बाबांनी तापलेल्या भावाला कानपिचक्याही दिल्या. ज्या लोकांनी एवढी मोठी केस जिंकली, तेच आता अगदी क्षुल्लक मुद्यांचे केविलवाणेपणाने भांडण करताना दिसू लागले. न्यायप्राप्तीतला आणखी एक सुप्त हेतू असतो. तो म्हणजे आपल्याला मते देणाऱ्यांना चुचकारणे आणि आपल्या विरोधात असणाऱ्यांना झोडपणे, धाक दाखवणे, बदनाम करणे. घरच्यांनी एक प्रकारे शेजार्‍यांना चुचकारले आणि आपल्याला मते न देणाऱ्या बलात्कार्‍यांच्या समर्थकांना इशारे दिले, धाक बसवला. सुरुवातीला न्यायासाठी केस लढणारे अशी प्रतिमा असणाऱ्या गृहप्रमुखांना केवळ शेजार्‍यांचीच नव्हे तर अन्यायकर्त्यांच्या शेजार्‍यांचे सुद्धा समर्थन मिळू लागल्यानंतर बलात्कार्‍यांना दुखावणे परवडणारे नव्हते. त्यांच्या विरोधात छेडछाड वगैरे सारखे मुद्दे मांडणे सुद्धा आता अवघड झाले. कारण आपल्याला समर्थन न देणाऱ्याला सर्व प्रकारे कोंडीत पकडण्यासाठी निरनिराळे प्रचाराचे, अपप्रचाराचे मुद्दे वापरले जातात. ते मुद्दे तो आपला समर्थक झाल्यानंतर पुन्हा बासनात गुंडाळून ठेवावे लागतात. छेडण्याचे प्रकरण म्हणून सांगितलेली एक केस 2017 मधे न्यायालयाने फिरवली आणि त्या मुलाला सोडून दिले. अशी हाकटी पिटणारे तोंडावर आपटले. अन्यायकर्ते सुद्धा आपले समर्थक झाल्यानंतर गृहकर्ते त्यांच्या पूजेच्या वेळी आपली व्यत्यय आणणारी कामे थांबवून ठेवू लागले. अशा वेळी शेजार्‍यांना आपलेच दात ओठ खाण्यावाचून दुसरा काही पर्याय राहीला नाही. पुढचा काही काळ तरी बलात्काराला न्याय देण्यासाठी गावामधे मार्केट राहणार नाही, असे दिसते. ====================================================================================== बलात्कारकर्ते म्हणजे काँग्रेस, मुसलमान नव्हे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 04/05/2018 - 08:30 नवीन
<<बलात्कारकर्ते म्हणजे काँग्रेस, मुसलमान नव्हे.>> ==>> छान.. तुम्ही पण भाजप प्रवक्ते झालात का ? दंडवत घ्या ..._/\_
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर गुरुवार, 04/05/2018 - 08:41 नवीन
नै हो, जोशी प्रवक्ते नव्हे तर, तर ते या कल्पित कथेतील सर्वोच्च-न्यायालया च्या भूमिकेत, आहात कुठे ?
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 04/05/2018 - 08:49 नवीन
थँक्यू, थँक्यू. मस्त वाटलं.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 04/05/2018 - 08:50 नवीन
असे मी अजो ना लगेच नाही म्हणू शकणार कारण त्यांचे बरेच लिखाण एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा वेगळा अँगल देऊन जातो. बऱ्याच वेळा ते मजेशीर पद्धतीने आपले म्हणणे मांडतात. फक्त ते नक्की कोणाची बाजू घेऊन बोलतात हे अजून तरी ठामपणे समजले नाही. असो...
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 04/05/2018 - 08:57 नवीन
फक्त ते नक्की कोणाची बाजू घेऊन बोलतात हे अजून तरी ठामपणे समजले नाही.
लोकांची वा पक्षांची स्वतःचीच बाजू फार ठाम नसते. मग मी कसा काय कोणाची ठाम बाजू घेऊ शकेन. --------------------- ज्या कुणाचं ज्या कोणत्या विषयात जे काही मत आहे "किमान मांडायच्या वेळी" ते सुसंगत, संपूर्ण आणि सुस्पष्ट असावं अशी माझी अपेक्षा असते. ते मत माझ्या मताशी मॅच न होणं गौण असतं.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 04/05/2018 - 09:10 नवीन
हे तुमच्या बाबत तंतोतंत मान्य आहे आणि मला हे पटते देखील.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 04/05/2018 - 08:48 नवीन
मी सध्याला तरी भाजप प्रवक्ता* आहे. भाजप सध्याला देशासाठी बेस्ट चॉइस आहे. लेट्स नॉट मिन्स वर्ड्स. ========================= हा प्रतिसाद लेखाच्या लॉजिकच्या शोधार्थ आहे. भाषा प्रचंड विचित्र आहे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. उगाच मंडळींना हिंदू वि मुस्लिम संदेश जाऊ नये म्हणून काँग्रेस वि भाजप असं म्हणायचं आहे. =================== *आत्मघोषित
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 04/05/2018 - 08:55 नवीन
<<गाच मंडळींना हिंदू वि मुस्लिम संदेश जाऊ नये म्हणून काँग्रेस वि भाजप असं म्हणायचं आहे.>> ==>> हे मात्र चांगले केलेत. मग चालु द्यात भाजप-काँग्रेसच द्वंद्वव . काही हरकत नाही. पुरोगामी काही फक्त काँग्रेस मधेच नाही आहेत, एवढे नमूद करू इच्छितो.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 04/05/2018 - 09:00 नवीन
पुरोगामी हा शब्द भक्त या शब्दाचा काउंटर पार्ट म्हणून वापरतो. चांगला शब्द बदनाम करायचा अधिकार दोन्हीकडे असायला पाहिजे ना? ===================== भक्त तरी कुठे फक्त भाजपमधेच आहेत?
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 04/05/2018 - 09:09 नवीन
बदनाम करण्याने लौकिक दृष्टीने जरी त्याला कमीपणा आला तरी त्याचा चांगुलपणा कमी होईल असे वाटत नाही. हे तुम्ही देखील जाणता. बाकी मोठे होता नाही आले तर पुढच्याला छोटे करा अशी चाणक्य फेम वाक्य कुठेतरी वाचले होते. असो... .... भक्त सगळीकडे आहेत पण भाजप भक्त लय पावरफुल मसला आहे. होईल तुम्हाला देखील अनुग्रह.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 04/05/2018 - 09:26 नवीन
बदनाम करण्याने लौकिक दृष्टीने जरी त्याला कमीपणा आला तरी त्याचा चांगुलपणा कमी होईल असे वाटत नाही.
+१११ सर्व विचारसरणींचे अनेक सज्जन लोक असतात. त्यांच्या सातत्यशील चांगुलपणामुळे विचारसरणींना एक सनातन समर्थक वर्ग उभा राहतो. विचारसरणींचं असं स्वतःचं चांगुलपण किंवा वाईटपण नसावं. म्हणजे जगात अत्यंत प्रजाहितदक्ष राजे झाले आहेत आणि अनेक लोकशाहींनी नागरीकांना देशोधडीला लावले आहे. पण का कोण जाणे अशा सज्जन व्यक्तिंची आपल्या विचारधारेशी अत्यंत दृढ भावनिक बांधिलकी असते नि अशी बांधिलकी विरुद्ध वा भिन्न विचारधारेतील चांगुलपण पहायला लागणारी बुद्धी कुंठित करून टाकते. दुर्दैवानं त्यांची गाठही नेहमी भिन्न विचारसरणीच्या अशाच लोकांशी पडते ज्यांचा ज्वर जास्त आणि वैचारिक प्रतिनिधित्वक्षमता शून्य असते.
  • Log in or register to post comments
न
नर्मदेतला गोटा Sat, 04/07/2018 - 05:39 नवीन
हेही खरेच
  • Log in or register to post comments
न
नर्मदेतला गोटा गुरुवार, 04/05/2018 - 14:15 नवीन
सध्याच्या काळात हिंदुत्वाच्या नावाखाली जी उदाहरणे पहायला मिळतात त्याबद्दल कोणी मत व्यक्त करते आहे का ?
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका गुरुवार, 04/05/2018 - 14:19 नवीन
तुम्ही टाकली आहेतच कि उदाहरणे पण ती सरसकटीकरणात जातात असे मत व्यक्त केलेच आहे. तुम्ही टाका तुमची स्पेसिफिक उदाहरणे म्हणजे केस बाय केस चर्चा करतीलच सगळे.
  • Log in or register to post comments
न
नर्मदेतला गोटा गुरुवार, 04/05/2018 - 14:30 नवीन
मग नका घालवू ना सरसकटीकरणात
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका गुरुवार, 04/05/2018 - 14:33 नवीन
शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
न
नर्मदेतला गोटा गुरुवार, 04/05/2018 - 20:25 नवीन
1. काय वाह्यात प्रश्न कम शंका आहे, मी मानायचा न मानायचा प्रश्न येतोच कुठे? 2. तुमच्या वरच्या चिखलफेकीत  3. तुम्ही दोघेही कुठल्याही मुद्द्यावर बोलत नसून माझ्या वैयक्तिक मतांवर पिंका टाकायचे काम करत आहात  4. आपला कयास चुकीचा होता मालक 5. तुम्हाला माझा मुद्दा समजलेला नाहीये  6. कपाळावर हात मारून घ्यायची स्मायली कुणी वाह्यातपणा करतो आहे, कुणी मुद्दा सोडून बोलतो आहे, कुणी नुसताच पिंका टाकतो आहे, कुणी चिखलफेक करतो आहे, काही जणांची बिटाकाका म्हणताहेत ते समजून घेण्याची पात्रताच नाही यामुळे बिटा काकांना कपाळाला हात लावावा लागत आहे . . .
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days 23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days 23 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days 23 hours ago
  • सुंदर !!
    5 days 23 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 23 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा