Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुक-२०१७ मतमोजणी

ग
गॅरी ट्रुमन
Sat, 12/16/2017 - 14:48
🗣 249 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सोमवार १८ डिसेंबर रोजी होईल. मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होईल. नेहमीप्रमाणे त्या दिवशी मी मिपावर ऑनलाईन असणारच आहे. जसेजसे कल आणि निकाल येतील तसेतसे ते इथे पोस्ट करणार आहे. त्यासाठी हा नवा धागा उघडत आहे. या धाग्यावर विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि त्याअनुषंगाने संबंधित विषयांवर चर्चा व्हावी ही अपेक्षा. धन्यवाद.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 43803 views

🗣 चर्चा (249)
श
श्रीगुरुजी Mon, 12/18/2017 - 09:20 नवीन
शून्य
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 12/18/2017 - 09:20 नवीन
एकही नाही :)
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 12/18/2017 - 17:35 नवीन
गुजरातमध्ये राष्ट्रवादी पेक्षा None of the Above (NOTA) ला अधिक मते (vote share) मिळाली आहेत.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 12/18/2017 - 09:19 नवीन
राहुलबाबाने अशोक चव्हाणांचे कौतुक न करता तिथल्या कॅान्ग्रेस कमिटीचे केले. आताही तसेच करणार आणि लेवल दाखवणार का?
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 12/18/2017 - 09:20 नवीन
जातीवादी पक्षाचा पराभव होणे ही आनंदाची गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 12/18/2017 - 09:24 नवीन
विरमगाममधून भाजपच्या डॉ.तेजश्री पटेल यांनी काँग्रेसच्या लाखाभाई हरवड यांचा १५६५ मतांनी पराभव केला आहे. विरमगाममध्ये हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर या दोघांचेही घर आहे. त्यामुळे या मतदारसंघातून भाजपचा विजय व्हायलाच हवा होता. तो तसा झाला आहे याचे समाधान आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 12/18/2017 - 11:22 नवीन
विरमगाममधून भाजपचा विजय झाला असे एन.डी.टी.व्ही च्या वेबसाईटवर काही वेळापूर्वी बघितले होते. पण आता तिथेच काँग्रेसच्या लाखाभाई हरवड यांचा विजय झाला आहे असे म्हटले जात आहे. नक्की काय चालू आहे हे समजत नाही.
  • Log in or register to post comments
स
सखारामगटणे Mon, 12/18/2017 - 11:34 नवीन
http://eciresults.nic.in/ConstituencywiseS0639.htm?ac=39 भाजपा हरले आहे तिथे
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Mon, 12/18/2017 - 09:24 नवीन
१. गुजराती लोकं मोदींनाच मत देणार, २. मोदींनी जातीयवादी राजकारण केलं, ३. मोदींच्या मित्रांनी भरमसाठ पैसा ओतला निवडणुकीत, ४. गुजरात आणी हिमाचलच्या लोकांना अक्कल नाही, ५. मोदींनी द्वेषाचे आणी सीडी प्रकरणाचे घाणेरडे (??) राजकारण केले . . . . . . . . (ईन्फिनीटी) ईव्हीएम हॅक
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Mon, 12/18/2017 - 09:25 नवीन
सुरत मधील सर्व १२ जागा भाजपा जिंकणार असे दिसते. नोटबंदी व जीएसटीचा फटका सर्वात जास्त सुरत मधील व्यापार्‍यांना बसला असे निवडणुक प्रचारात कॉंग्रेस सतत सांगत होती तो कॉंग्रेसचा चुनावी जुमला होता असेच आता म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 12/18/2017 - 09:45 नवीन
आताची स्थिती (एबीपी) - गुजरात - भाजप १००, काँग्रेस - ८० हिमाचल - भाजप ४१, काँग्रेस २३
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 12/18/2017 - 09:46 नवीन
वडनगरमधून भाजपचा पराभव
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 12/18/2017 - 09:56 नवीन
वडनगरमधून भाजपचा पराभव
मोदींचे जन्मस्थान वडनगर (मेहसाणा जिल्हा) ही विधानसभा जागा नाही. तर विधानसभा जागा आहे वडगामची. ही जागा मेहसाणा जिल्ह्यात नाही तर बनासकांठा जिल्ह्यात आहे. तिथून जिग्नेश मेवाणी जिंकला आहे. मोदींचे जन्मस्थान असलेल्या वडनगर गावाचा कोणत्या विधानसभा मतदारसंघात समावेश होतो हे बघायला हवे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 12/18/2017 - 09:46 नवीन
अजूनही सगळे निकाल हातात आलेले नाहीत. त्यामुळे आकडे वरखाली होत आहेत. याक्षणी भाजप १०० आणि काँग्रेस ७९ असे आकडे आहेत. काही वेळापूर्वी भाजप १०५ वर असताना मी काही आकडे गोळा केले. ते खालीलप्रमाणे: विभागांमधील निकाल Image removed. मध्य गुजरात Image removed. सौराष्ट्र-कच्छ Image removed. उत्तर गुजरात Image removed. दक्षिण गुजरात Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 12/18/2017 - 09:53 नवीन
या आकड्यांवरून समजून येईल की भाजपने आपले अहमदाबाद, सुरत आणि वडोदर्‍यामधील बालेकिल्ले राखले आहेत. सौराष्ट्रमधून मोठ्या प्रमाणावर भाजपची पिछेहाट झाली आहे. पाटीदार समाजाची नाराजी त्याला नक्कीच जबाबदार होती असे म्हणायला हवे. सौराष्ट्रात अमरेली जिल्हा वगळता भाजप सगळीकडे शक्तीशाली होता. यावेळी अमरेली जिल्ह्यातून काँग्रेसने स्वीप केला आहे. पण जुनागढ, जामनगर, सुरेन्द्रनगर, भावनगर या एकेकाळच्या भाजपच्या बालेकिल्ल्यातही भाजपची पिछेहाट झाली आहे. पण भाजपने सौराष्ट्रमधून झालेले नुकसान काही प्रमाणात मध्य गुजरात आणि दक्षिण गुजरातमध्ये भरून काढले आहे. तरीही सौराष्ट्रमध्ये झालेले नुकसान जास्त असल्यामुळे जागा मागच्यावेळे पेक्षा कमी आलेल्या दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 12/18/2017 - 10:00 नवीन
भाजपने सौराष्ट्रमध्ये झालेले नुकसान उत्तर गुजरातमध्ये काही प्रमाणात भरून काढले आहे. त्यात पंचमहाल जिल्ह्यातील आकडे महत्वाचे आहेत. या जिल्ह्यात ७ पैकी ५ जागा भाजप पुढे आहे तर काँग्रेसला एकही जागेवर पुढे नाही. महत्वाचे म्हणजे पंचमहाल जिल्ह्यात गोधरा येते. तसेच शेजारच्या दाहोद जिल्ह्यातही ६ पैकी ४ जागांवर भाजप पुढे दिसत आहे. या भागात शंकरसिंग वाघेलांचा काही प्रमाणावर जोर आहे. एकेकाळी वाघेला गोधरामधून लोकसभेवर निवडूनही गेले आहेत. शंकरसिंग वाघेला निवडणुकांपूर्वी बाहेर पडल्याचा काँग्रेसला नेमका इथेच फटका बसलेला दिसतो.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 12/18/2017 - 10:05 नवीन
गुजरातमध्ये भाजपाच्या जागा कमी झाल्या आहेत. भाजपसाठी हा धोक्याचा इशारा आहे, भाजपने आता काही टोकाचे धार्मिक मुद्दे बाजूला ठेवत विकासावर लक्ष केंद्रित करावे ही अपेक्षा. मी मोदीभक्त / मोदीविरोधक वगैरे नाही. जाती-धर्माचे राजकारण न करणारा , गुन्हेगारी व भ्रष्टाचाराला आळा घालणारा आणि विकासाची कास धरणारा कोणताही पक्ष सत्तेत यावा आणि देशाची भरभराट व्हावी, देशातील नागरिक सुरक्षित आयुष्य जगावेत हीच इच्छा
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 12/18/2017 - 10:25 नवीन
नागरिक म्हणून मी अनेक वर्षे भाजपाला केशरी कॉंग्रेस व कॉंग्रेस ला सफेद भाजपा मानत आलो आहे. केवळ मोदी( खोटारडे असले तरी ) यांच्या वैचारिक पध्हती मुळे मी आता तरी भाजपाचा समर्थक आहे. या पक्षाने नाईलाजाने का होईना आपले जनसंघ पण सोडून कॉंग्रेसला ला गुरू मानले आहे. काँग्रेस संस्कृतित रमलेला एक सध्या तुरूंगात आहे तर भाजपाचा एक माजी मुख्यमंत्री तुरुंगात जाणार आहे. भाजपा ला शत्रू मानून एकत्र आलेली माणसे पहाता भाजपाच्या जागा कमी होणार हे स्पष्ट होते. पण कॉंग्रेस ने बोलून न दाखविलेला सत्तेचा त्यांचा अम्दाज चुकलाच. एक जागेने का होईना भाजपाला जीवदान मिळाले तरी भारतीय लोकशाहीत हा १०० टक्के विजयच मानावा लागेल. कारण आपल्या लोकशाहीत पराभूत म्हणजे कुचकामी असेच म्हटले जाते. अर्थात भाजपाला यातून काहीतरी शिकता ये ईल ते आसे की काँग्रेस मुक्त भारत या ऐवजी गव्हर्नन्स युक्त भारत ही नवी घोषणा मोदीनी निवडली पाहिजे.
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Mon, 12/18/2017 - 10:29 नवीन
प्रथम भाजप चे गुजरात आणि हिमाचल प्रदेश मधील विजयाबद्दल अभिनंदन. गुजरात आणि हिमाचल प्रदेश मध्ये नक्कीच भाजप ला सरळ विजय मिळला आहे आणि काँग्रेस पराजित झाली आहे. परंतु भाजप ला गुजरात मध्ये मिळालेल्या जागा नक्कीच मोदी आणि शाह यांच्या अपेक्षेनुसार नाहीत. या निवडणुकीत भाजप कडे केंद्रातील सत्ता, अमर्याद रिसोर्सेस, संघ आणि भाजप च संघटना बळ, धार्मिक ध्रुवीकरण, मोदी शाह सारखे नेते असे अनेक प्लस पॉईंट होते, तर काँग्रेस कडे जातीय ध्रुवीकरण, तरुण नेते, सरकार विरोधाचा असंतोष हे प्लस पॉईंट होते. यातून भाजप आणि काँग्रेस या दोघांना योग्य तो संदेश मतदारांनी दिला आहे यात काही शंका नाही. काँग्रेस च संख्याबळ वाढलं हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे याच कारण, लोकशाही मध्ये सत्ताधारी पक्षास तुल्यबळ विरोधी पक्ष हवा (equilibrium) नाहीतर मदमस्त हत्ती सारखी सरकार ची अवस्था होते. जे भाजप च झालं आहे , गर्विष्ठ मोदी आणि शाह, चुकीची आर्थिक धोरण, शेतकऱ्याकडे दुर्लक्ष, निराशाजनक रोजगार निर्मिती, उजिवकडच्या धर्माध संघटनाची गोरक्षा आणि लव्ह जिहाद च्या नावाखाली चालेली हिंसा हि अनेक कारणे भाजप ला २०१४ साली भरभरून मतदान करणाऱ्या काही मतदारांना भाजप पासून दूर नेत आहे (माझ्या सारख्या). काँग्रेस अजून हि लोकांना पर्याय वाटत नाही परंतु भाजप ला धडा शिकवण्यासाठी काबूत ठेवण्यासाठी लोक काँग्रेस मजबूत करतायत. भाजप ने योग्य तो धडा घेऊन कोर्स करेक्शन करावे अन्यथा लोक काँग्रेस ला पर्याय म्हणून पाहतील. काँग्रेस मुक्त भारत हे मोदींच दु स्वप्न साकार न होण्यातच देशाचं भलं आहे, २०१९ साली मोदी पंतप्रधान आणि तुल्यबळ विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस हे समीकरण नक्कीच हिताचं आहे. मुळात भाजप चे समर्थक काँग्रेस वर जातीयवादाचा आरोप करतात जो योग्यच आहे, परंतु भाजप हा धर्मांध आणि काही प्रमाणात जातीयवादी पक्ष आहे. जातीयवाद आणि धार्मिकवाद दोन्ही देशाला धोकादायकच, धार्मिकवाद पेक्षा जातीयवाद अधिक धोकादायक म्हणून भाजप आणि त्यांच्या सहयोगी संघटनेच्या चुकीच्या धोरणांना डिरेक्टली /इंडिरेक्टली पाठिंबा देणे हा बुद्दिभेद आहे किंवा आपला तो बाब्या आणि दुसऱ्याच ते कार्ट हे लॉजिक आहे . इथून पुढे भाजपाला issue बेस्ड विरोध (आणि समर्थन) हे नक्कीच राहील.
  • Log in or register to post comments
च
चिर्कुट Mon, 12/18/2017 - 11:06 नवीन
बराचसा सहमत आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 12/20/2017 - 01:22 नवीन
लोकशाही ही अधिकात अधिक मते मिळविणार्‍या माणसाची हुकुमशाहीच असते. निवडणुकीत विजेत्यास किती जनाधार मिळाला ते कळते. पराभूतास ही जनाधार असतो याची दखल आपली काय जगातील कोणतीच लोकशाही घेत नाही. माझ्या तरी माहितीप्रमाणे"वेटेड राईट तू व्होट टू मेक अ लॉ " अशी व्यवस्था जगात कुठेही नाही. विरोधी पक्ष ही एक हिडीस कल्पना असून त्यामुळे राजकीय शत्रूत्वाची भावना निर्माण होते. सत्ताधारी व सत्ता नसलेले यात घातक फरक आपल्या लोकशाहीत आहे. लोकांच्या वास्तव जनाधाराचे प्रतिबिम्ब आपल्या लोकशाहीत होत नाही. सर्व खासदारांचे वेतन वाढवायचे असले तर मात्र १०० टक्के मतदान ठरावाच्या॑ बाजूने होते.
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Mon, 12/18/2017 - 10:49 नवीन
हार्दीक पटेल आता ईव्हिएम वर मुक्ताफळं उधळत आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 12/18/2017 - 10:54 नवीन
आता हार्दिक पटेलची पत्रकार परीषद चालू आहे. नेहमीप्रमाणे भाजपने ईव्हीएम मुळेच यश मिळवले आहे (जेवढे मिळवले आहे तेवढे) असे तो म्हणत आहे. तसेच सुरतमधील वारच्छा मतदारसंघात १ लाख १० हजार पाटीदार मतदार असताना तिथे भाजप जिंकूच कसा शकतो वगैरे मुक्ताफळे तो उधळत आहे. म्हणजे आपण पाटीदार- पटेल समाजाचे नेते म्हणून वावरलो तरी सगळ्यांना प्रभावित करू शकलो नाही हे काही मान्य करायला तो तयार नाही. तसेच गुजरातची जनता बर्‍यापैकी जागृत झाली आहे पण अजून अहमदाबाद-सुरतच्या लोकांना जागृत व्हायला हवे अशी नवी मुक्ताफळे तो उधळत आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 12/18/2017 - 11:04 नवीन
हार्दिक पटेल आता इथेच संपेल.. यापुढे त्याला कुणी विचारणार नाही.. तो स्वतः निवडणूक लढला नाही ना ?
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 12/18/2017 - 11:39 नवीन
वयात बसत नाही बहुधा. २५ वय लागतं. हा २३ आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 12/18/2017 - 11:14 नवीन
एकूणच काँग्रेसने हार्दिक-अल्पेश-जिग्नेश या त्रिकूटाला बरोबर घेऊन घाणेरडे जातीचे राजकारण खेळले त्याला पूर्ण यश आले नाही हे समाधान आहे. राहुल गांधी म्हणत आहेत की काँग्रेस पक्ष देशाला २१ व्या शतकात तर मोदी मध्ययुगात घेऊन जात आहेत. पण स्वतः जातीपातीचे घाणेरडे राजकारण खेळून काँग्रेसच देशाला मध्ययुगात घेऊन जात आहे. या राजकारणाचा जितका मोठा पराभव व्हायला हवा होता तितका झालेला नाही पण तरीही त्या राजकारणाला पूर्ण यश आले नाही हे पण काही कमी नाही.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 12/18/2017 - 11:20 नवीन
भाजप १०५ खाली राहिला तर भाजपसाठी हा अतिशय निराशाजनक निकाल असायला हवा. गुजरातमध्ये विरोधी पक्ष मोट बांधून भाजपला रोखू शकते तर देशभरात कुठेही ते केले जाऊ शकते. माझ्यादृष्टीने तरी हा भाजपसाठी धोक्याचा इशारा आहे. जीएसटी, नोटबंदी वगैरे विषयांना स्वतःच्या पद्धतीने मांडून, गैरसमज पसरवून विरोधी पक्ष भाजपला गुजरातमध्ये रोखू शकतोय हा त्यांच्यासाठी धक्काच मनाला गेला पाहिजे.
  • Log in or register to post comments
S
SHASHANKPARAB Mon, 12/18/2017 - 16:06 नवीन
Anti incumbency हा एक मोठा फॅक्टर धरला तर ही गणिते राष्ट्रीय स्तरावर चालणे मुश्किल आहे. देशात राजकारण फक्त धार्मिक गनिटांवरच चालेल. शिवाय धक्क्यातून शिकण्याची आणि तत्पर निर्णय घेण्याची मोदी शहा जोडगोळीची खासियत पहिली तर 2019 अजूनही मोदींच्याच खिशात आहे असं वाटत. आता सर्वात आधी भ्रष्टाचाराची प्रकरणे सरकार खऱ्या अर्थाने हाताळायला सुरुवात करेल असे वाटते. त्यात विरोधकांना गुंतवुन ठेवले तर जातीय समीकरणे दूरच, स्वतःचे धोतर कसे वाचवायचे या विवंचनेत ते पडतील. त्यात काँग्रेसला तथाकथित नवसंजीवनी ,( म्हणजे जातीय समिकरणांमुळे आलेली सूज) राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली मिळाल्याने, कॉंग्रेसलाच तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्वपदी बसवावे असा आवाज निघू लागेल, ज्याला ममता व बिजू जनता दल उघड विरोध तर आपले काकासाहेब पडद्याआडून कारस्थान करून विरोध करतील....
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 12/18/2017 - 11:44 नवीन
काँग्रेसनी काही चुका केल्या त्या त्यांना महागात पडलेल्या दिसत आहे. भाजपचा थोडक्यात विजय झालेला दिसत आहे. काँग्रेसने या चुका केल्या नसत्या तर आज निकाल वेगळा लागला असता. माझ्या मते काँग्रेसने केलेल्या चुका पुढीलप्रमाणे: १. जेव्हा राष्ट्रीय पातळीवरच्या मुद्द्यांवर नरेंद्र मोदी विरूध्द राहुल गांधी अशी लढत होते तेव्हा राहुल गांधी मोदींना पुरे पडू शकणार नाहीत हे परत एकदा सिध्द झाले आहे. त्यामुळे काँग्रेसने निवडणुक स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करून लढवायला हवी होती. राहुल गांधींनी सुरवातीला 'गुजरातनू विकास गांडा छे' वगैरे स्थानिक मुद्दे आणून सुरवात चांगली केली होतीच. पण शेवटी मणीशंकर अय्यरनी मोदींना 'नीच' म्हणून फूलटॉस टाकला. त्यामुळे मोदींची प्रतिमा हा मुद्दा गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये नसतानाही तो मुद्दा आणला गेला. आणि ती संधी मोदी थोडीच सोडणार होते? अजून मी सगळ्या आकड्यांचे विश्लेषण केलेले नाही पण सध्या वाटत आहे की भाजपने मागच्या वेळेपेक्षा जास्त मते मिळवली आहेत. पण काँग्रेसचीही मते वाढली आणि मतांचे डिस्ट्रीब्युशन अशा पध्दतीने झाले की त्यामुळे भाजपला १०० च्या आसपास जागा मिळताना दिसत आहेत. गुजरात विधानसभा निवडणुका-२०१७ या लेखात म्हटले होते की भाजपला काठावरचे (म्हणजे ९५) बहुमत पाहिजे असेल तर काँग्रेसपेक्षा ४.५% मते जास्त हवीत. जर भाजप १०० च्या आसपास असेल तर भाजपने ५ ते ५.५% मते जास्त मिळवलेली दिसत आहेत. काँग्रेसने टाकलेल्या फूलटॉसमुळे नक्की किती मते फिरली हे सांगता येणार नाही पण समजा अगदी अर्धा टक्का मते जरी त्यामुळे फिरली असतील तरी दोन पक्षांमधला मतांचा फरक ४% ते ४.५% इतका असता. कदाचित त्या परिस्थितीत भाजपने काही जागा गमावल्याही असत्या आणि भाजप बहुमताच्या खाली (९१) गेला असता. २. याच धाग्यात म्हटल्याप्रमाणे पाटीदार मतदारांना आकर्षित करायच्या गडबडीत काँग्रेसने आपल्या पारंपारिक मतदारांना दुरावले. ज्या मतदारांनी यापूर्वी कधीही भाजपला मत दिले नव्हते त्यांनीही यावेळी भाजपला मत दिले आहे. समजा काँग्रेसने आपली पारंपारीक मते कायम राखली असती आणि वर पाटीदार समाजातील मते आकर्षित केली असती तर मात्र भाजपचा मोठा पराभव करण्यात काँग्रेस यशस्वी होऊ शकला असता. ३. शंकरसिंग वाघेलांना जाऊ दिले ही पण काँग्रेसची मोठी चूक झालेली दिसत आहे. याच धाग्यात म्हटल्याप्रमाणे गोधरा आणि दाहोदमध्ये भाजपने सौराष्ट्रमध्ये झालेली पडझड काही प्रमाणात सावरली आहे. हा भाग गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपला फार यश मिळालेले नव्हते. या दोन जिल्ह्यातून ५-६ जागा कमी झाल्या असत्या तरी भाजपला अगदीच थोडके बहुमत मिळाले असते. अजून मुद्दे आठवले तर लिहितोच.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 12/18/2017 - 11:59 नवीन
सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास काँग्रेस आघाडीवर होता. एक वेळ अशी आली होती की काँग्रेसने भाजपपेक्षा १२ जास्त मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली होती. त्यावेळी ई.व्ही.एम एकदम व्यवस्थित होती. पण नंतर काँग्रेस पिछाडीवर गेल्यानंतर मात्र ई.व्ही.एम वाईट झाली. श्री.रा.रा.संजय निरूपम यांनी ई.व्ही.एम ला दोष दिलाही आहे. विशेष म्हणजे माजी मुख्य निवडणुक आयुक्त गोपालस्वामींबरोबरच नवीन चावलांनीही ई.व्ही.एम वर प्रश्नचिन्ह उभे करू नका असे म्हटले आहे. हे नवीन चावला काँग्रेस पक्षाच्या जवळचे आहेत, आणीबाणीदरम्यान ते बदनाम झाले होते आणि २००८ मध्ये त्यांची मुख्य निवडणुक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली तेव्हा या कारणामुळे भाजपने त्यांच्या नियुक्तीविरूध्द आक्षेपही घेतले होते. तरीही काँग्रेसवाले आणि हार्दिक पटेलसारखी फालतू मंडळी परत परत ई.व्ही.एम वर प्रश्नचिन्ह उभे करत आहेतच.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Tue, 12/19/2017 - 09:16 नवीन
ही काँग्रेसी मंडळी इतकी नालायक आहेत कि पुढे त्यांना ५५% सीट मिळतिल तेव्हा देखिल आम्हाला ७५% मिळाल्या, ई व्ही एम ने घोटाला केला, असं म्हणतील.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 12/18/2017 - 12:01 नवीन
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पत्रकारांना सामोरे जायचे नाकारले आहे. याविषयी काँग्रेस समर्थकांचे काय म्हणणे आहे?
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 12/18/2017 - 12:04 नवीन
माझा भाजप १३० जागा जिंकेल याचा अंदाज गुजराती जनतेने साफ चुकवला आहे. याचा अर्थ मी तज्ज्ञ नाही असा होत नाही. असो .. चला भाजपच्या सर्वोच नेत्यांचे गुजराती अस्मितेने नाक वाचवले. चांगली, नियोजनबद्ध टक्कर देऊन मनोरंजन केल्याबद्दल भाजपचे हार्दिक आभार आणि अभिनंदन ...!! EVM बाबत आणखी पारदर्शकता यावी याबद्दल मी अजूनही आग्रही आहे. भले काँग्रेस ने देखील मुसंडी मारली असली तरी ही. ... काँग्रेसचे विशेष अभिनंदन काटे कि टक्कर दिलीत. पण खचू नका पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागा. कारण तुमच्या कडे वेळच वेळ आहे. राहुल यांनी पार्टीमधून अमित शाह सारखे संघटनात्मक गुण असलेले लोक हेरून पुढची रणनीती राबवावी. .... ट्रुमन जी चे सुद्धा खूप खूप आभार ज्यांनी क्षणो क्षणी अपडेट्स देऊन खुर्चीवर स्वतः खिळून बसून आम्हाला पण तसे करायला भाग पाडले. एक वेळ तर मिपा ने Drupal एर्रोर पण दाखवला होता, एवढे वाचक या धाग्यावर तुटून पडले होते. ... गुजरात मध्ये भाजप का जिंकले आणि काँग्रेस का हरले याचे विश्लेषण करणारा कोणीतरी धागा काढलेच पण त्याला तेवढा रिस्पॉन्स मिळेल असे वाटत नाही. ज्याला असा धागा काढायचा आहे त्याने आपल्या जवाबदारीवर काढावा. ...
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 12/18/2017 - 12:21 नवीन
अजून काही मतदारसंघांमध्ये मतमोजणी सुरू आहे. गोधरामध्ये आता काँग्रेस १६७ मतांनी तर मोडासामध्ये काँग्रेस १४७ मतांनी पुढे आहे. हे दोन निकाल अजूनही बदलू शकतात. काँग्रेसने धांधुका ३५ मतांनी तर कपराडाची जागा १७० मतांनी जिंकली आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 12/18/2017 - 12:57 नवीन
हिमाचलमध्ये भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा सुजानपूर विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. आता बहुदा केंद्रीय मंत्री जयप्रकाश नड्डा मुख्यमंत्री होतील. पक्षाचा विजय होणे पण मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचा पराभव होणे हा प्रकार निदान माझ्या आठवतीत तरी प्रथमच झाला आहे असे वाटते. १९९६ मध्ये केरळमध्ये कम्युनिस्टांचा विजय झाला पण ज्येष्ठ नेते अच्युतानंदन यांचा पराभव झाला होता. अच्युतानंदनना अधिकृतपणे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहिर केले गेले नव्हते आणि पक्ष जिंकल्यास ते मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा होती. तेव्हा ती परिस्थिती नक्कीच वेगळी होती.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 12/18/2017 - 13:56 नवीन
१९८९ मध्ये एनटीआर ३ पैकी १ किंवा २ मतदारसंघात हरले होते.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Mon, 12/18/2017 - 15:38 नवीन
अहो तो पण मास्टर स्ट्रोक आहे म्हणे !!
  • Log in or register to post comments
च
चष्मेबद्दूर Mon, 12/18/2017 - 15:18 नवीन
प्रतिसाद पटला. सहमत आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 12/18/2017 - 16:32 नवीन
अवांतर : गॅरी ट्रुमन,
अहमदाबादच्या उत्तरेला काँग्रेस आणि दक्षिणेला भाजप विजयी होत असे. पण आता गुजरातमध्ये पूर्व-पश्चिम विभागणी दिसत आहे. पश्चिमेकडे असलेल्या सौराष्ट्रमध्ये काँग्रेस जिंकत आहे पण पूर्वेकडे भाजप.
गुजरातचं पूर्वपश्चिम विभाजन पारंपरिक व नैसर्गिक आहे. मराठा कालखंडात गुजरात व माळवा असा महसुली प्रांत असे. त्याच्या पूर्वेस कच्छ व सौराष्ट्र हा महसुली प्रदेश असायचा. दक्षिणेस सुरत व डांग असा प्रदेश असे. आजच्या नकाशावर बघायला गेलं तर उत्तर व मध्य गुजरात हा पूर्वकालीन गुजरात होता. नर्मदेच्या दक्षिणेस सुरत व डांग प्रदेश असे. क्वचित त्यासोबत वसई ते डहाणू हा लाटप्रदेश देखील सामील असे. पूर्वेकडे कच्छ काठियावाड एकत्र असून त्यासोबत सौराष्ट्र द्वीपकल्प महसुली गणनेत घेत. मोदींना पूर्व व पश्चिम गुजरात सांधण्याचं काम करावं लागेलसं दिसतंय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Mon, 12/18/2017 - 20:28 नवीन
आपलं काम चोख केलं साहेबांनी. भाजपाने टेक्नीकली निवडणुक जींकली आहे. आणि विजय हा विजय असतो. मुख्य म्हणजे नाक कापायचं वाचलं. हार्दीक अभिनंदन. २०१९ निवडणुकीत यु.पी.मधे काँग्रेस+सपा+बसपा, महाराष्ट्रात काँग्रेस+राष्ट्रवादी, बिहारमधे काँग्रेस+राजद, कर्नाटक, राजस्थान, पंजाब, दिल्ली, केरळ मधे काँग्रेस एकटी समर्थ आहे. बंगाल, तमिळनाडु युपीए चे समर्थक आहे. आणि गुजरातमधे तरुण तुर्कांचे राजकारण आता स्पीड पकडणार... राहुलबाबा, द बॉल इज इन युअर कोर्ट. तुम्ही फक्त चुका टाळा, मणिशंकर अय्यर सारख्या मंडळींना वेळीच कंट्रोल करा. सत्ता सोपान दृष्टीक्षेपात आलाय.
  • Log in or register to post comments
ए
एमी Tue, 12/19/2017 - 03:02 नवीन
ये जितना भी कोई जितना है **!! शेवटची सुरवात वगैरे वगैरे...
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Tue, 12/19/2017 - 04:18 नवीन
प्रश्न असा आहे........ की BJP ला 'हार्दिक' अभिनंदन असे म्हटलेले 'पटेल' का ??
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Tue, 12/19/2017 - 05:01 नवीन
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Tue, 12/19/2017 - 05:01 नवीन
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Tue, 12/19/2017 - 05:02 नवीन
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Tue, 12/19/2017 - 12:24 नवीन
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Tue, 12/19/2017 - 14:24 नवीन
अडकलेला बोळा काढू का? ह्याची 'शहा'निशा करावी लागेल.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 12/19/2017 - 15:25 नवीन
श्री मणिशंकरजी अय्यरांचे हार्दीक अभिनंदन ? का बाबा ??
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 12/19/2017 - 21:15 नवीन
राष्ट्रीय राजकारणावर खंग्री प्रभाव टाकु शकणारी घटना टाळण्यात अय्यर साहेबांनी मोलाची भुमीका निभावली. अभिनंदन नको करायला ???
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 10 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 10 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 10 hours ago
  • सुंदर !!
    3 days 10 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 10 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा