गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुक-२०१७ मतमोजणी
नमस्कार मंडळी,
गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सोमवार १८ डिसेंबर रोजी होईल. मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होईल. नेहमीप्रमाणे त्या दिवशी मी मिपावर ऑनलाईन असणारच आहे. जसेजसे कल आणि निकाल येतील तसेतसे ते इथे पोस्ट करणार आहे. त्यासाठी हा नवा धागा उघडत आहे. या धाग्यावर विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि त्याअनुषंगाने संबंधित विषयांवर चर्चा व्हावी ही अपेक्षा.
धन्यवाद.
🗣 चर्चा
(249)
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 12/18/2017 - 07:18
नवीन
काँग्रेसचे नेते शक्तीसिंग गोहिल यांचा मांडवी (कच्छ) मधून पराभव झाला आहे.
आता भाजप-- १०३ आणि काँग्रेस--७५.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 12/18/2017 - 07:21
नवीन
सौराष्ट्रमधून भाजपने पिछाडी बरीच कमी केली आहे. सौराष्ट्र आणि कच्छमधील ५४ जागांपैकी २९ जागांवर काँग्रेस आणि २५ जागांवर भाजप पुढे आहे. या ५४ पैकी ४८ जागा सौराष्ट्रमध्ये आहेत आणि कच्छमध्ये ६ पैकी ३-३ जागांवर भाजप आणि काँग्रेस पुढे आहेत.
सकाळी काँग्रेस पुढे होती त्याचे कारण पक्षाने सौराष्ट्र आणि उत्तर गुजरातमध्ये आघाडी घेतली होती. आता सौराष्ट्रमध्ये काँग्रेसची आघाडी कमी झाली आहे आणि उत्तर गुजरातमध्ये भाजपने चांगलीच आघाडी घेतली आहे.
- Log in or register to post comments
S
SHASHANKPARAB
Mon, 12/18/2017 - 07:28
नवीन
भाजपला या निवडणुकीत पाटिदार मतांचा निश्चित फटका बसलेला आहे, तेव्हढाच फायदा कॉंग्रेसचा झालेला दिसतो (दक्षिण व पश्चिम गुजरातमध्ये). परंतु इतर ठिकाणी भाजपने चांगली कामगिरी केलेली आहे. भाजपला गुजरातमधील इतर भागात पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळाल्यात. यामुळे हे म्हणता येईल की नोटबंदी हा विषय लोकांनी हिशेबात धरलाच नाही. जीएसटी देखील काही दिवसांनी स्थिर होईल. पण जातीयवाद आणि आरक्षण वाद फोफावतोय ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे.
- Log in or register to post comments
S
SHASHANKPARAB
Mon, 12/18/2017 - 07:31
नवीन
भाजपला या निवडणुकीत पाटिदार मतांचा निश्चित फटका बसलेला आहे, तेव्हढाच फायदा कॉंग्रेसचा झालेला दिसतो (दक्षिण व पश्चिम गुजरातमध्ये). परंतु इतर ठिकाणी भाजपने चांगली कामगिरी केलेली आहे. भाजपला गुजरातमधील इतर भागात पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळाल्यात. यामुळे हे म्हणता येईल की नोटबंदी हा विषय लोकांनी हिशेबात धरलाच नाही. जीएसटी देखील काही दिवसांनी स्थिर होईल. पण जातीयवाद आणि आरक्षण वाद फोफावतोय ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे.
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 12/18/2017 - 07:48
नवीन
मतांचे जातीयवादी ध्रुवीकरण करूनही एकूण निकाल बदलता आले नाहीत हे चांगलेच झाले. कोणीच किंगमकेर नाही.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 12/18/2017 - 07:28
नवीन
कॉग्रेसने गुजरातमध्ये चांगलीच कडवी लढत दिली. पण तरीही २०१९ मध्ये मोदींना मात देता येणे (निदान गुजरातमध्ये) तितके सोपे नाही. आताच रिपब्लिक चॅनेलवर यशवंत देशमुखांनी म्हटले की काँग्रेसच्या मतदारांपैकी १२% मतदारांनी आता लोकसभा निवडणुका झाल्या तर भाजपला (मुख्यतः मोदींना) मत देऊ असे म्हटले. आताच यशवंत देशमुखांनी जाहिर केले की यावरून भाजप गुजरातमधील २६ पैकी २६ लोकसभेच्या जागा जिंकू शकेल.
भाजपने यावेळी पटेल-पाटीदार मतदार गमावले पण ते मतदार परत भाजपकडे जाऊ शकतील. पण काँग्रेसने वनवासी मतदार गमावले ते काँग्रेसला परत मिळतील याची शक्यता फारच कमी असेही यशवंत देशमुख म्हणाले.
पटेल मतांमागे धावताना आपल्या हक्काच्या मतदारांकडे काँग्रेसने दुर्लक्ष केले ते भलतेच महागात पडलेले दिसते.
- Log in or register to post comments
च
चिनार
Mon, 12/18/2017 - 07:34
नवीन
वनवासी मतदार म्हनजे कोण??
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 12/18/2017 - 07:38
नवीन
वनवासी म्हणजे ट्रायबल्स. त्यांना आदिवासी मतदार असेही म्हणता येईल पण मला आदिवासी हा शब्द थोडा डिमिनिंग वाटतो. त्यामानाने वनवासी हा शब्द ठिक वाटतो.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Mon, 12/18/2017 - 07:47
नवीन
संघ परिवार आदीवासी हा शब्द वापरत नाही. वनवासी हा शब्द वापरतो. एक गट आदीवासी असेल तर इतर आपोआप परकीय होतात म्हणून असेल कदाचित.
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 12/18/2017 - 07:42
नवीन
नाहीस, असं हे म्हणत होते काल गुरुजी भाऊजी आलें होते चहापाणी करायला तेंव्हा.
पुन्हा एकदा मिसामा
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 12/18/2017 - 07:45
नवीन
समजले नाही. मिसामा म्हणजे काय? गुरूजी भाऊजी म्हणजे श्रीगुरूजी का?
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 12/18/2017 - 08:24
नवीन
मिपा सार्वकालीन माई
भाऊजी ं बाबतीत आपला अंदाज बरोबर ठरला आहे
आणि ते चिनार साठी होते, पण पोस्ट करेपर्यंत मध्ये २-३ गाड्या गेल्याही
निराकरण नाखु
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 12/18/2017 - 08:25
नवीन
मिपा सार्वकालीन माई
भाऊजी ं बाबतीत आपला अंदाज बरोबर ठरला आहे
आणि ते चिनार साठी होते, पण पोस्ट करेपर्यंत मध्ये २-३ गाड्या गेल्याही
निराकरण नाखु
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Mon, 12/18/2017 - 07:41
नवीन
जातीय समीकरणांचे गणित घातले तर भाजपला रोखले जाऊ शकते हेच पुन्हा एकदा सिद्ध होण्याच्या मार्गावर आहे, आधी बिहार आणि आता गुजरात! हे नक्कीच चांगले नाही.
सकाळी काँग्रेस पुढे दिसत असताना बंद पडलेला ईव्हीएमविरोधी सूर पुन्हा चालू होताना दिसतोय.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 12/18/2017 - 08:20
नवीन
जातीय समीकरणांचे गणित ही या पेक्षा बरीच जुनी गोष्ट असावी नाहीका .अर्थात टाळीचा एक हात 'जातींभेदाचे अस्तीत्व' हे मुळ नाही का ? शंकराचार्य ते गुरु साधू संत समेलने गोष्टीं साठी एकत्र आणता येता जातितिभेद मूळापासून निर्मुलनाचा संदेश देण्यासाठी काही केले जाताना का दिसत नाही ?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 12/18/2017 - 07:43
नवीन
गुजरातः भाजप-११० , काँग्रेस-७०
हिमाचलः भाजप-४३, काँग्रेस-२१
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Mon, 12/18/2017 - 07:49
नवीन
<<<<+सकाळी काँग्रेस पुढे दिसत असताना बंद पडलेला ईव्हीएमविरोधी सूर पुन्हा चालू होताना दिसतोय +>>>>>>=
सहमत !!
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Mon, 12/18/2017 - 07:51
नवीन
प्रसाद,
सकाळी काँग्रेस पुढे दिसत असताना बंद पडलेला ई व्हीएम विरोधी सुर पुन्हा चालु झालेला दिसतोय !!
सहमत !!
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 12/18/2017 - 07:52
नवीन
मिपा वरील पुरोगामी, बुद्धिवादी, उदारमतवादी इ इ लोकांची अनुपस्थिती जाणवत आहे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Mon, 12/18/2017 - 08:10
नवीन
मिपा वरील पुरोगामी, बुद्धिवादी, उदारमतवादी लोक
कॉंग्रेसच्या होणार्या संभाव्य पराभवाची कारणे शोधत असावेत बहुतेक. :))
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 12/18/2017 - 08:41
नवीन
कारण शोधायची गरजच नाही.
मतदान यंत्रे घोटाळा हे सर्वसमावेशक आणि सर्वकारण शोधायची गरजच नाही.
मतदान यंत्रे घोटाळा हे सर्वसमावेशक आणि सर्व कालिक कारण उपलब्ध असतेच.
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 12/18/2017 - 07:53
नवीन
मोदी आणि राहुल गांधी यांच्यावर सगळे लक्ष केंद्रित होताना गुजरात मुख्यमंत्र्यांचे काम हा तिथल्या विधानसभा निवडणुकात महत्त्वाचा मुद्दा मतदारांसाठी असू शकतो याकडे दुर्लक्ष झाले. भाजपच्या मतांची टक्केवारी प्रत्यक्षात वाढली आहे याचा अर्थ रूपाणी यांनी न बोलता चांगले काम केले असणार असे वाटते.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Mon, 12/18/2017 - 08:02
नवीन
मला हे फक्त दिल्लीतल्या वाचाळ माध्यमांनी तयार केलेले चित्र वाटते. त्यांना मोदी/राहुल काय म्हणाले - खरंतर ते काय म्हणाले यापेक्षासुद्धा त्यांचं एखाद दुसरं वाक्य - यातच रस असल्याने त्यांनी तसंच चित्र उभं केलं! वास्तविक मोदींनी काही गुजरातमधील सगळ्या मतदारसंघात सभा घेतल्या नाहीत. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी नक्कीच त्याच्या प्रचारात स्वतःच्या कामाचा प्रचार केला असणार.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 12/18/2017 - 07:58
नवीन
यावेळी भाजप आणी काँग्रेसच्या मतदानाच्या टक्केवारीत ५-६% फरक दिसत आहे. त्या आधारावर भाजप याक्षणी १०७ आणि काँग्रेस ७१ जागांवर पुढे आहे.
आतापर्यंतचे मतदानाचे गणित लक्षात घेता ५-६% मते जास्त घेऊन भाजपने ९५ ते १०० जागा जिंकल्या असत्या. त्यापेक्षा आणखी १० जागा जास्त जिंकलेल्या दिसत आहेत. एकूणच आतापर्यंतचे मतदानाचे गणित बदललेले दिसत आहे. रिपब्लिकवर दाखवलेल्या नकाशावरून दिसते की यापूर्वी गुजरातमध्ये उत्तर-दक्षिण अशी विभागणी असायची म्हणजे अहमदाबादच्या उत्तरेला काँग्रेस आणि दक्षिणेला भाजप विजयी होत असे. पण आता गुजरातमध्ये पूर्व-पश्चिम विभागणी दिसत आहे. पश्चिमेकडे असलेल्या सौराष्ट्रमध्ये काँग्रेस जिंकत आहे पण पूर्वेकडे भाजप.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 12/18/2017 - 08:13
नवीन
हिमाचल प्रदेशात भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल ३ हजार मतांनी पिछाडीवर आहेत असे रिपब्लिकवर जाहिर केले आहे. जर पक्ष जिंकला पण मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार हरला तर ती विचित्र परिस्थिती होईल. हिमाचलमध्ये मतदारसंघ लहान असतात त्यामुळे ३ हजार ही पिछाडी त्यामानाने मोठी आहे. ती इतक्या सहजपणे भरून काढता येईल का ही शंका वाटते.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Mon, 12/18/2017 - 08:26
नवीन
हिमाचलमध्ये विधानपरिषद आहे का ? असल्यास काही अडचण होणार नाही. विधानपरिषदेवर आणता येईलच.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 12/18/2017 - 08:27
नवीन
नाही हिमाचलमध्ये विधानपरिषद नाही.
- Log in or register to post comments
र
रामदास२९
Mon, 12/18/2017 - 14:41
नवीन
कदाचित जयराम ठाकूर किन्वा जगतप्रकाश नड्डा मुख्यमन्त्री होतील.. किन्वा नवीन फारसे चर्चेत नसलेले नाव पुढे येईल..
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Mon, 12/18/2017 - 15:31
नवीन
नड्डा होतील..
ते संघाच्या शिफारशीत आहेत...
किंबहुना, संघाच्या माणसाच्या हातात चाव्या देता याव्या,
म्हणूनच धुमल व त्यांचा निकटवर्तीय व्यक्तीचा पराभव होऊ दिला गेला असावा.....फार मोठी चाणक्यनीतीची संभावना नाकारता येत नाही....क्विन्स गॅमंबिट .....
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Mon, 12/18/2017 - 08:14
नवीन
एनडी टिव्हीवर सध्या
ई.व्ही.एम. टेंप्मरिंग व ईलेक्शन कमिशन कसे भाजपा व इतर पक्षांत भेदभाव करतो हा मुद्दा चर्चीला जात आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 12/18/2017 - 08:20
नवीन
हि.प्र. मधून प्रेमकुमार धूमल ३००० मतांनी मागे आहेत. सुरवातीला मोदींना धुमल यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करण्यास उत्सुक नव्हते. त्यांना जे पी नड्डांचे नाव जाहीर करायचे होते. परंतु ठाकूर मतांच्या दबावामुळे त्यांना शेवटी धूमलांचेच नाव पुढे आणावे लागले. धूमल पडले तर नड्डा मुख्यमंत्री होतील.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 12/18/2017 - 08:21
नवीन
गुजरातः भाजप १०५, काँग्रेस ७४
हिमाचलः भाजप ४३, काँग्रेस २३
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Mon, 12/18/2017 - 08:21
नवीन
कॉंग्रेस प्रवक्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हिमाचल प्रदेश मध्ये कॉंग्रेस हरली ती anti incumbency मुळे.
मात्र गुजरात मध्ये कॉंग्रेस हरली ती ई.व्ही.एम. टेंप्मरींग मुळे.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 12/18/2017 - 08:38
नवीन
रिपब्लिक चॅनेलवर जाहिर केले आहे की आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत भाजपला ५०.११% मते मिळाली आहेत. जागा दिसताना मागच्या वेळेपेक्षा कमी दिसत आहेत पण २०१२ मधील ४७.८५% वरून दोन-सव्वादोन टक्के मते भाजपला जास्त मिळत असतील तर तो भाजपचा जबरदस्त विजय म्हणायला हवा. लोकसभेत मोदींच्या नावावर आणखी ५% मते जरी मिळाली तर भाजप २०१४ प्रमाणेच क्लीन स्वीप करेल. सगळे आकडे आले की त्याचे विश्लेषण करायचेच आहे.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 12/18/2017 - 08:43
नवीन
गुजरातमध्ये काँग्रेसने सलग सातवी निवडणुक गमावलेली आहे तर भाजपने सलग सहावी निवडणुक जिंकली आहे.
अजूनही काही जागांवर चुरस चालू आहे आणि मतमोजणी जशी पुढे जात आहे त्याप्रमाणे त्या जागांवरील लीड बदलत आहेत.
आता भाजप १०१ आणि काँग्रेस ७६.
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Mon, 12/18/2017 - 08:43
नवीन
मिपा वरील तसेच मबो वरीलही फुरोगामी, बुद्धिवादी, उदारमतवादी लोकांची अनुपस्थिती नक्कीच खुपत आहे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Mon, 12/18/2017 - 09:00
नवीन
मायबोलीवर "राजकारण गुजरातचे" या धाग्यावर तर आता स्मशान शांतता पसरली आहे. गेले कित्येक दिवस भाजपाचा पराभव होईल या आशेवर असणारी भूते अचानक आज अंतर्धान पावली आहेत.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 12/18/2017 - 08:50
नवीन
मेहसाणामधून उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचाही विजय झाला आहे. आज बराच वेळ मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल दोघेही मागे होते. आता दोघांचाही विजय झाला आहे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Mon, 12/18/2017 - 09:03
नवीन
या दोन्ही राज्यांच्या निकालानी
मोदी सरकारच्या नोटाबंदी व जीएसटीच्या नावाने २४*७ बोंबलणार्या अनेकजणांच्या कानाखाली सणसणीत आवाज काढलाय.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 12/18/2017 - 09:07
नवीन
२०१९ मध्ये आता कोणत्या मुद्द्यावर मोदींना घेरावे हा प्रश्नच विरोधकांना पडेल.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 12/18/2017 - 09:06
नवीन
सध्याचे आकडे:
गुजरात- भाजपः १०४, काँग्रेसः ७४
हिमाचल- भाजप: ४२, काँग्रेसः २२
- Log in or register to post comments
ज
जेसीना
Mon, 12/18/2017 - 09:13
नवीन
२०१९ मध्ये आता मोदींना जास्तच प्रभावीपणे उभे राहता येईल , जरी राज्यसभेत त्यांचा संख्याबळ वाढले नाही आणि विरोधकांनी त्यांची काही विधेयक राज्यसभेत अडवून ठेवली तर मग विरोधकांचा काही खरा नाही , मोदींना उगाचच आयते कोलीत मिळेल हातात
आणि जर विरोधकांनी ते मंजूर करण्यात हातभार लावला तरी मोदींचाच फायदा
ये तो ऐसा हुआ ना भाई "अब चिट भी मेरी और पट भी "
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 12/18/2017 - 09:13
नवीन
गुजरातमध्ये राष्ट्रवादीने १ जागा जिंकली आहे़.
- Log in or register to post comments
ज
जेसीना
Mon, 12/18/2017 - 09:14
नवीन
आणि आम आदमी पार्टी ने ?
उगाचच विचारावासा वाटलं :)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 12/18/2017 - 09:19
नवीन
शिवसेना व आआपने नैतिक विजय मिळविला.
- Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर
Mon, 12/18/2017 - 20:12
नवीन
सडजि फार अपेक्षा ठेवुन होते.... तेच ईंटरनँशनल शीएम.
पण कपिल मिश्रा ने अशी पाचर मारलिय का सडजि अजुनहि त्या एरंडेला ची गुळणि धरून बसलेत. चिऊसेने च्या बाबतीत न बोललेलच बरय बाब्बो हे डायरेक माणसाच्या मेंदुतुन त्याचा कोथळा च काढतेत.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 12/18/2017 - 09:19
नवीन
त्यांच्या इंटर्नल सर्व्हेमध्ये ११० जागा येणार होत्या.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Mon, 12/18/2017 - 09:20
नवीन
सर्व जागी डिपॉझिट जप्त
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 12/18/2017 - 20:29
नवीन
ते लाभार्थी आहेत. ;)
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Mon, 12/18/2017 - 09:19
नवीन
किती उमेदवार जिंकले किंव्हा आघाडीवर आहेत?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »