गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुक-२०१७ मतमोजणी
नमस्कार मंडळी,
गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सोमवार १८ डिसेंबर रोजी होईल. मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होईल. नेहमीप्रमाणे त्या दिवशी मी मिपावर ऑनलाईन असणारच आहे. जसेजसे कल आणि निकाल येतील तसेतसे ते इथे पोस्ट करणार आहे. त्यासाठी हा नवा धागा उघडत आहे. या धाग्यावर विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि त्याअनुषंगाने संबंधित विषयांवर चर्चा व्हावी ही अपेक्षा.
धन्यवाद.
जीएसटी, नोटाबंदी असे लोकविरोधी निर्णय करुनही
हे निश्चित लोकांना विरोधी वाटले की तुम्ही काढलेला निष्कर्ष आहे? उपरोक्त सर्व बाबी सोडल्या तर इतर काही सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या कामांचा प्रभाव असेल असं अजिबात वाटत नाही का? कुठलेही शिक्के न मारता उघड्या डोळ्यांनी बघणारा अडाणी नाखु