Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ताज्या घडामोडी - भाग १८

ग
गॅरी ट्रुमन
Mon, 12/11/2017 - 14:28
🗣 150 प्रतिसाद
आज राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर निवडून आल्याचे अधिकृतपणे जाहिर करण्यात आले आहे. Rahul ते १६ डिसेंबर रोजी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेणार आहेत. राहुल गांधी गुजरातमधील मतदान पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष बनणार नाहीत असे वाटतच होते. तसेच होणार असे दिसते. अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेणे गुजरात मधील मतदानापर्यंत लांबविण्यासाठी कोणी डमी उमेदवार अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभा केला जाईल असे वाटले होते तसे मात्र झालेले दिसत नाही. डमी उमेदवार उभा न करताही राहुल गांधी अध्यक्षपदाची सुत्रे गुजरातमधील मतदान होईपर्यंत लांबविणार आहेत. असो. राहुल गांधींचे अभिनंदन. त्यांची अध्यक्ष म्हणून पुढील वाटचाल बरीच खडतर असणार आहे हे नक्कीच. काँग्रेस पक्ष अभूतपूर्व संकटात सापडला आहे त्याला नवी संजीवनी द्यायचे आव्हान राहुल गांधींपुढे असेल.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 44693 views

🗣 चर्चा (150)
र
राघवेंद्र Mon, 12/11/2017 - 15:57 नवीन
आज न्यूयॉर्क मध्ये पाईप बॉम्ब स्फोट पोर्ट ऑथॉरिटी बस टर्मिनल मधील सबवे स्टेशन मध्ये झाला. त्यामुळे न्यूयॉर्क मध्ये जाणारे सर्वे रस्ते बंद केले आहेत. पण कोणीही दुर्घटना गस्त झाले नाही.
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Mon, 12/11/2017 - 16:00 नवीन
आज राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर निवडून आल्याचे अधिकृतपणे जाहिर करण्यात आले आहे.
रागां यांचे अभिनंदन . काँग्रेस मध्ये उपाध्यक्ष जो बनेल तोच दिशा ठरवेल असे वाटते. बघू कोण होते ते.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Mon, 12/11/2017 - 19:21 नवीन
काँग्रेसमधले उपाध्यक्ष पद बहुतेक राहुल गांधींसाठी खास तयार केलेले होते. त्यामुळे आता ते पद काढून टाकण्यात येईल असं वाटतंय. गांधी घराण्यातील व्यक्तीशिवाय कोणीही अध्यक्ष/ उपाध्यक्ष होऊ शकत नाही. फार फार तर प्रियंका तयार झाली तर तिला देतील.
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Mon, 12/11/2017 - 17:37 नवीन
मध्य-पूर्वेकडील देशान्मधे (विषेशतः सौदी अरेबियाला) धार्मिक कट्टरवादापासून दूर जावासा वाटतय ही चान्गली सुरूवात आहे. https://economictimes.indiatimes.com/news/international/world-news/saudi-arabia-lifts-decades-long-ban-on-cinemas/articleshow/62020594.cms
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 12/12/2017 - 12:25 नवीन
ज्यांनी हल्लाबोल आंदोलन सुरु केलं आहे, त्यांचे डल्लामार पुरावे आपल्याकडे आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांनी डल्ला मारलेले पुरावे गृहमंत्री या नात्याने ताबडतोब पोलिस किंवा न्यायालयाकडे दिले पाहिजेत आणि डल्ला मारलेल्यांना अटक केली पाहिजे. असे पुरावे संबंधित यंत्रणांकडे ना देता स्वःतकडे ठेवणे चुकीचे आणि पदाशी , जनतेशी द्रोह केल्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
N
NiluMP Tue, 12/12/2017 - 12:56 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Tue, 12/12/2017 - 13:37 नवीन
सहमत आहे. फडणवीसांकडेही पुराव्यांनी भरलेले ३७० पानी आरोपपत्र तयार दिसत आहे. आता यावर कारवाई व्हावी अशी अपेक्षा असेल तर मग इतरांनी पुरावे आणून द्यावेत हे म्हटले की ते पक्के राजकारणी शोभतील.
  • Log in or register to post comments
B
babu b Tue, 12/12/2017 - 14:26 नवीन
आंदोलकांवर सारवासारव करुन भाजपात समावून घ्यायचे असेल. जाता जाता -सारवासारव याची व्युत्पत्ती-- घाण नजरेस पडू नये म्हणून शेणाबरोबर जमिनीत सारवून टाकणे .
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 12/12/2017 - 14:36 नवीन
तुमचं मूलभूत (original) येउ द्या कि. उगाच आमचं कशाला वापरताय? बाकी व्हिसाचा फुलफॉर्म आणि पासपोर्टची व्युत्पत्ती सापडली कि पुढे चर्चा करू.
  • Log in or register to post comments
ग
गंम्बा Wed, 12/13/2017 - 09:56 नवीन
पुरावे असताना आणि पूर्ण अ‍ॅथोरिटी असताना अजुन पर्यंत फसणवीस पुरावे पोलिसां ना देत नसतील किंवा खटला दाखल करत नसतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि न्यायालय ह्यात पुढाकार घेउ शकते. पेपर मधल्या बातमी चा दाखला देत न्यायालयानी फसवणीसांवर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 16:49 नवीन
पुरावे असताना आणि पूर्ण अ‍ॅथोरिटी असताना अजुन पर्यंत फसणवीस पुरावे पोलिसां ना देत नसतील किंवा खटला दाखल करत नसतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि न्यायालय ह्यात पुढाकार घेउ शकते. पेपर मधल्या बातमी चा दाखला देत न्यायालयानी फसवणीसांवर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे.
मा. चिदंबरम, मा. शिंदे. सेक्यूलर पुरोगाम्यांच्या गळ्यातले लाडके ताईत मा. राहुलजी, मा. भाषणवाचक सिंग इत्यादिंकडे भाजप आणि संघ हे अतिरेकी कारवाया करत असल्याचे पुरावे आहेत. आपण समजलं की असीमानंद, प्रज्ञा, पुरोहीत हे अतिरेकी आहेत ( हे ना संघाचे आहेत ना भाजपचे) तरी आज मिपावरच्या पुरोगाम्यांनी म्हटल्याप्रमाणे संघाचे सुनिल जोशी यांनी कट उघड करायची धमकी दिली होती. म्हणजे देशप्रेमी कामच केलं आहे. ================ तर काँग्रेसच्या या नेत्यांनी देशाच्या सुरक्षेशी संबंधित पुरावे समोर आणावेत. हे लोक पुरावे पोलिसां ना देत नसतील किंवा खटला दाखल करत नसतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि न्यायालय ह्यात पुढाकार घेउ शकते. पेपर मधल्या बातमी चा दाखला देत न्यायालयानी फसवणीसांवर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे. ======================= मार्मिक गोडसे त्यांच्या सुप्रसिद्ध फोकाने चौकात मारहाणविधी करू शकतात.
  • Log in or register to post comments
B
babu b Wed, 12/13/2017 - 10:21 नवीन
२००० पर्यंतच्या झोपडीधारकांना पक्की घरं देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता २००० ते २०११ या काळातील बेकायदा झोपडीधारकांनाही पक्की घरं देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. बांधकाम आणि तत्सम खर्च वसूल करून या झोपडीधारकांना पक्की घरं देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयावर आज हिवाळी अधिवेशनात शिक्कामोर्तब करण्यात आलं. सरकारच्या या निर्णयाचा १८ लाख मुंबईकरांच्या साडे तीन लाख झोपड्यांना लाभ मिळणार आहे. ......... https://m.maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/illegal-slumdwellers-will-also-get-houses-under-sra-scheme/articleshow/62051704.cms ...... हेच काँग्रेसच्या काळात घडले असते , तर इथले विचारवंत तुटून पडले असते ... करदात्यांच्या पैशाचा अपव्यय म्हणून ... आता हेच काम पवित्र झाले असेल
  • Log in or register to post comments
प
पुंबा Wed, 12/13/2017 - 10:46 नवीन
राज्य सरकारचा निषेध. अत्यंत चुकीचा पायंडा पडतो अश्या गोष्टींमुळे. काँ-रा. काँ. पेक्षा नक्की काय वेगळे भव्य दिव्य काम भाजप सरकार करते आहे काही अंदाज लागत नाही. मुंडे- तावडे- गिरिश महाजन हे असले मंत्री!
  • Log in or register to post comments
B
babu b Wed, 12/13/2017 - 14:23 नवीन
कोळसा घोटाळ्याचा निकाल लागला. मधु कोडा , माजी मुख्यमंत्री दोषी आढळले म्हणे. कधी ते भाजपाचे समर्थक होते, कधी काँग्र्सचे ! ह्याना आता कोणच्या पक्षात धरायचे ?
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 16:16 नवीन
बाबुराव, कोळशाचे आवंटन कोर्टाने पिछवाड्यावर लाथ घालून कँसल केले. अगदी करारावर सह्या झालेल्या. कुठे कुठे काम चालू झाले होते. =================== हा टोटल घोटाळा आहे असे कोर्ट म्हणाले. त्यावेळचा कोळसा मंत्री सोनियागुलाम मनमोहन होता. आणि हां, तो १००% पुरोगामी सेक्यूलर काँग्रेसचा १००% आजीवन पाईक होता.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 12/13/2017 - 15:05 नवीन
श्रीरामसेतू मानवनिर्मित आहे. नासाचे संशोधन . . . http://indianexpress.com/article/india/is-ram-setu-man-made-us-channels-claims-rekindles-tussle-between-bjp-congress-4981238/
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Wed, 12/13/2017 - 15:59 नवीन
सारखा मन्दिरात जाण्याचा ढोन्ग करणारया कोन्ग्रेस च्या, डी.एम.के च्या नेत्यान्ना विचारावा कि ह्यावर त्यान्ना काय वाटत आहे. रामाने कोणत्या अभियान्त्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली होती अस विचारणार्या करूणानिधी आणि तो सेतू तोडण्यासाठी आतूर झालेल्या बालू च्या थोबाडात बसली बरा झाला.. लाज त्यान्ना अस बोलताना वाटायला पाहिजे होती..
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 12/13/2017 - 16:02 नवीन
ते मुरलेले पुरोगामी निधर्मांध राजकारणी आहेत. लाज हा शब्द अशा लोकांच्या शब्दकोशात नसतोच.
  • Log in or register to post comments
B
babu b Wed, 12/13/2017 - 17:33 नवीन
त्या सेतूसमुद्र प्रोजेक्टचीही गंमतच आहे. त्याचा मूळ प्लॅन शिजला बाजपेयींच्या काळात , तेंव्हा रामभक्त कुंभकर्णावस्थेत होते. ... http://www.thehindu.com/news/national/tamil-nadu/bjp-stalling-sethu-project-amounts-to-betrayal-of-vajpayee-dmk/article4485379.ece ..... पुढे भाजप सरकार गेले. नवीन सरकार आले आणि मग हे भक्त लोक सेतू बचाव करत नाचू लागले.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 12/14/2017 - 05:57 नवीन
द हिंदू मध्ये आलेली करुणानिधीच्या तोंडची गोष्ट देता स्रोत म्हणून? काय राव...
  • Log in or register to post comments
B
babu b गुरुवार, 12/14/2017 - 16:28 नवीन
हो का ? मग विश्वासार्ह स्त्रोत कोणता ? रामानंद सागर का ?
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 12/14/2017 - 17:35 नवीन
पप्पू. त्यांच्यासारखा ज्ञानी कोण?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 12/13/2017 - 18:07 नवीन
श्रीराम ही काल्पनिक व्यक्ती आहे अशा अर्थाचे प्रतिद्न्यापत्र २००७ मध्ये तत्कालीन देशद्रोही सरकारने न्यायालयात दिले होते.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 12/14/2017 - 15:10 नवीन
त्यात चुकीचे काय आहे?
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 12/14/2017 - 16:49 नवीन
आज ज्याला आपण इतिहास म्हणतो त्या शास्त्राच्या जन्मापूर्वीच्या घटनांना काल्पनीक ठरवणं हि त्या शास्त्राची आणि त्या घटनांची पायमल्ली नाहि काय ? सरकारचं नेमकं प्रतिज्ञापत्र काय आहे ठाऊक नाहि, पण "उपलब्ध साधनं आणि प्रचलीत शास्त्रकसोट्यांनुसार सिद्ध होत नाहि" असं काहि स्टेटमेण्ट देता आलं असतं.
  • Log in or register to post comments
B
babu b गुरुवार, 12/14/2017 - 17:37 नवीन
नेमके स्टेटमेंट काय आहे , माहीत नाही. पण बाजपेयीच्या काळात जे काम बिनबोभाट होणार होते , त्याच कामाला काँग्रेसच्या काळात मात्र भक्तांचा विरोध अन मग राम असल्या / नसल्याचे पुरावे सरकारनेच शोधून द्यायचे , हे सगळे कसे घडले ?
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 12/14/2017 - 17:51 नवीन
कोर्टाने सरकारकडे पुरावे मागितले (किंवा त्याबद्दल मत प्रदर्शन करायला सांगितलं असेल.. ठाऊक नाहि). त्यामुळे इच्छा असो/नसो, सरकारला स्टेटमेण्ट द्यावच लागलं. राहिला मुद्दा बिनबोभाटिचा... तर त्या तालाची सुरुवात काँग्रेसनेच केली, तो इश्यु सेटल करण्याऐवजी त्यावर राजकीय पोळी भाजण्याची अवदसा काँग्रेसलाच सुरुवातीला आठवली. आता त्यावर नाचण्यापलिकडे दुसरं ऑप्शन नाहि, शिवाय त्यात मजा देखील आहे काँग्रेसपार्टीसाठी. सो एन्जॉय द सीन.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 12/14/2017 - 05:52 नवीन
याचाच अर्थ असा होतो की, ट्रम्पची गळाभेट घेवुन मोदींनी नासाला फितवले हे पक्के. नासा, ट्रम्प, अमेरिका, मोदी आणी श्रीगुरुजींचा कडकडीत निषेध. (आमी नाय ज्जा !!!!!).....अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र भाजपाचा निषेध राहिला होता.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 12/21/2017 - 08:05 नवीन
संजय सोनवणी चा या विषयावर ब्लॉग वाचण्यामध्ये आला. https://sanjaysonawani.blogspot.in/search?updated-max=2017-12-20T06:38:00-08:00&max-results=1
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 12/13/2017 - 17:26 नवीन
अण्णा हजारे मार्च २०१८ पासून परत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनापासून राजकारणी दूर असावेत अशी अण्णांची इच्छा आहे. तसेच आंदोलनात सामील होणार्‍यांकडून कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेणार नाही आणि कोणत्याही पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणुक लढवणार नाही असे स्टॅम्प पेपरवर लिहून घेणार आहोत असे अण्णा हजारेंनी म्हटले आहे. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/no-any-kejriwal-will-be-born-in-2018-movement-says-anna-hazare/articleshow/62052644.cms सर्वात महत्वाचे म्हणजे या आंदोलनातून आणखी एखादा अरविंद केजरीवाल जन्माला येऊ नये असेही अण्णा म्हणाले आहेत. अण्णांच्या त्या अराजकतेने भरलेल्या आंदोलनाला माझा अगदी पहिल्यापासूनच विरोध होता आणि अजूनही आहे. अण्णांविषयी मत चांगले नव्हतेच पण तरीही अरविंद केजरीवाल या माणसाला पुढे यायला व्यासपीठ अण्णांनी दिले हा प्रकार तर अगदीच अक्षम्य होता असे मला वाटते. आता अण्णा केजरीवालांना कितीही विरोध करत असले तरी उपयोग नाही. शेवटी पश्चात्तापास काहीही अर्थ नसतो कारण घटना आधीच घडून गेलेली असते.
  • Log in or register to post comments
B
babu b Wed, 12/13/2017 - 20:15 नवीन
असे लिहून घ्यायचा अण्णाना कायदेशीर अधिकार आहे का ? समजा दिले लिहून आणि नंतर एखादा उभा राहिला निवडणुकीला , तर आण्णा काय करणार ? सगळी कामे सोडून त्याचे कोर्टकज्जे लढत बसणार ?
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 12/14/2017 - 05:59 नवीन
असे लिहून घ्यायचा अण्णाना कायदेशीर अधिकार आहे का ?
लेकरांची शपथ खायचा केजरीवालला कायदेशीरा अधिकार होताच ना?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 12/13/2017 - 19:12 नवीन
15 डिसेंबरपर्यंत राज्यात एकही खड्डा दिसणार नाही : चंद्रकांत पाटील
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 12/14/2017 - 06:03 नवीन
७० वर्षे खड्ड्यांत कंबरडे मोडून घेऊनही विनोदबुद्धी शाबूत?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 12/14/2017 - 18:48 नवीन
रड्या आहे रे हा ! जे सध्याचा मंत्री पुड्या सोडतोय त्यावर बोला , कोणी अक्षता घेऊन आले नव्हते आश्वासन द्या म्हणून ! आता फेकताय तर लगेच 70 वर्षे आठवतात . मी काय 70 वर्षांचा नाही , त्यामुळे आधी काय झालं त्याचा देणंघेणं नाही. सध्याचा बोला
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 12/14/2017 - 18:51 नवीन
तुम्हाला बातमी क्वोट करून हसायला एक महिना लागतो हे तुमचं टाईमस्टँडर्ड. ====================== दीड महिन्यात राज्यातले सगळे खड्डे बुजवणं आरामात शक्य आहे. जगात हे सर्वत्र होतं.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 12/14/2017 - 20:41 नवीन
पार लॉजिक गंडला गड्या तुमचा ! बातमी जुनीच आहे पण 1-2 दिवसात 15 डिसेंबर येणार होती जी आज आहे, पण खड्डे तसेच आहेत. बोलाची कढी आणि बोलाचा भात हे सांगायचं होता . आता एकही खड्डा नाही असा सांगू नका ;)
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 12/15/2017 - 06:11 नवीन
खड्डा दाखवा हजार रुपये मिळवा !!
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Fri, 12/15/2017 - 06:31 नवीन
लॉजिक कसा काय गंडला? मंत्री काय चंद्रावरचे खड्डे महिन्यात बूजवू म्हणले होते की काय? ============================== http://indianexpress.com/article/cities/mumbai/maharashtras-new-rs-1300-crore-plan-to-make-roads-pothole-free-4798695/ हा पुरोगामी पेपर. त्यातली बातमी. सरकारनं आपला रोड रिपेअरचा अप्रोच बदलला आहे. =============================== बाय द वे, तुम्हाला रस्त्यारस्त्यातला फरक कळतो का? कोणते खड्डे पाहून अजून खड्डे तसेच आहेत असं म्हणत आहात?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 12/15/2017 - 06:48 नवीन
खड्डेमुक्त रस्त्याच्या डेडलाईनचा आज शेवटचा दिवस बाकी PWD च्या अखत्यारीतील रस्त्यावर खड्डे आहेत की नाहीत हे मिपाकर पण सांगतील आणि मी इथे फोटो पण टाकतो. असे खोट बोलणे नेत्याचा काम आहे , पण लोकांनी त्याच्या मागे किती फरफटत जायचा हे समजलं पाहिजे. आता तुमचा प्रतिसाद वाचायला मज्जा येईल, वाट बघतोय
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Fri, 12/15/2017 - 07:19 नवीन
असे खोट बोलणे नेत्याचा काम आहे
नेता काँग्रेसचा असेल तर, होय. ==========================
मी इथे फोटो पण टाकतो.
टाका ना. =======================
PWD च्या अखत्यारीतील रस्त्यावर खड्डे आहेत की नाहीत
बघा हं, राष्ट्रीय महामार्ग, म्यूनिसिपल रोड्स, रुरल रोड्स आणि बॉर्डर रोड इ इ चे फोटो नका टाकू.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Fri, 12/15/2017 - 07:20 नवीन
आता तुमचा प्रतिसाद वाचायला मज्जा येईल, वाट बघतोय
तुम्हाला वाचायला मज्जा देण्यातच आमच्या जीवनाची सार्थकता सामावली आहे हो साहेब.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 12/15/2017 - 06:49 नवीन
<<सरकारनं आपला रोड रिपेअरचा अप्रोच बदलला आहे.>> ==>> कसला अप्रोच बदलला?? मी ज्या राज्य महामार्गावरून रोज ये जा करतो तेथील खड्डे दगड मातीने बुजवले आहेत. चंद्रकांत पाटीलांनी एका चॅनेल वरील चर्चे मध्ये सांगितले होते कि कमीत कमी ८० कमी च काम टेंडर काढून फक्त एकाच कॉन्ट्रॅक्टर ला दिले जाईल ज्याच्या कडे खड्डे बुजवायचे अद्यावत यंत्रणा आहे. पण प्रत्येक्षात ह्या काँट्रॅक्टरानी लोकल ठेकेदारांना सब-काँट्रॅक्टस देऊन कामचलाऊ कामे केली आहेत. हे उदाहरण पालखी महामार्गावरील जेजुरी वाल्हे या गावातून जाणाऱ्या रस्त्यांबाबत अखोदेखी सांगतोय.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Fri, 12/15/2017 - 07:26 नवीन
मी ज्या राज्य महामार्गावरून रोज ये जा करतो तेथील खड्डे दगड मातीने बुजवले आहेत.
खड्डे बुजवलेत ना? ते महत्त्वाचं आहे. सरकारनं आता २ वर्षाचं कंत्राट (मॅनेजमेंट काँट्रक्ट) दिलं आहे नि अप्रोच बदलला आहे. तेव्हा माती हा टेंपररी उपाय असेल वा ती जितक्यांदा हटेल तितक्यांदा पुन्हा स्वतःच्या पैशाने कंत्राटदाराला भरून द्यावी लागेल. =========================
पण प्रत्येक्षात ह्या काँट्रॅक्टरानी लोकल ठेकेदारांना सब-काँट्रॅक्टस देऊन कामचलाऊ कामे केली आहेत.
कामाचा दर्जा हा आपला विषय नाही. ही ऐतिहासिक काँग्रेसी कीड आहे. ती अशी २-३ वर्षात जाणार नाही. बाकी सब-काँट्रक्ट देणे ही सिविल इंडस्ट्रीतली सामान्य गोष्ट आहे, लिगल आहे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 12/15/2017 - 07:43 नवीन
मॅनॅजमेन्ट कॉन्ट्रॅक्ट असेल तर ओके...!! फक्त खड्डा दाखवा आणि हजार (?) मिळवा ही स्कीम चालूच ठेवावी लागेल. २ वर्षांनी जर Escalation Cost वाढली तर तेव्हा पुन्हा बोलू.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Fri, 12/15/2017 - 07:48 नवीन
तेव्हा माती हा टेंपररी उपाय असेल वा ती जितक्यांदा हटेल तितक्यांदा पुन्हा स्वतःच्या पैशाने कंत्राटदाराला भरून द्यावी लागेल. तरीच मातीने खड्डे बुजवलेल्या रस्त्याच्या कडेला जागोजागी मातीने भरलेली घमेली घेवून काही माणसं हल्ली दिसू लागलीयेत. अच्छा! म्हणजे ती कंत्राटदारांची माणसं असतात तर.
  • Log in or register to post comments
B
babu b Wed, 12/13/2017 - 20:10 नवीन
https://www.thequint.com/news/india/pm-modi-seaplane-flew-from-karachi सीप्लेन आले कराचीतून प्रॉडक्शन जपानचे रजिस्ट्र्व्शन अमेरिकेत ! त्यात बसून बोलायचे - फेक इन इंडिया ! http://www.business-standard.com/article/elections/modi-s-seaplane-flew-from-karachi-to-escort-him-to-dharoi-cost-rs-45-lakh-117121300170_1.html ४५ लाखाची उधळपट्टी. सिक्युरिटीचे नियम धाब्यावर !
  • Log in or register to post comments
B
babu b Wed, 12/13/2017 - 20:36 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 12/14/2017 - 06:15 नवीन
बब्बु राव, भारत आणि पाकिस्तान यांच्या मधे विमान सेवा बंद आहे का?
  • Log in or register to post comments
B
babu b गुरुवार, 12/14/2017 - 03:12 नवीन
आजच्या टाइम्सलाही बातमी आहे. अमेरिकन क्राफ्ट आणि अमेरिकन पायलट याना घेउन प्रवास करणारे मोदीजी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. मोदी , भाजपा , भक्तांचे अभिनंदन. ( इतक्या मोठ्या विक्रमाचा ४५ लाख इतका क्षुल्लक खर्च कोण करणार , हा क्षूद्र प्रश्न मला पडला होता . )
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 8 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 9 hours ago
  • सुंदर !!
    3 days 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा