ताज्या घडामोडी - भाग १८
आज राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर निवडून आल्याचे अधिकृतपणे जाहिर करण्यात आले आहे.
ते १६ डिसेंबर रोजी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेणार आहेत. राहुल गांधी गुजरातमधील मतदान पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष बनणार नाहीत असे वाटतच होते. तसेच होणार असे दिसते. अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेणे गुजरात मधील मतदानापर्यंत लांबविण्यासाठी कोणी डमी उमेदवार अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभा केला जाईल असे वाटले होते तसे मात्र झालेले दिसत नाही. डमी उमेदवार उभा न करताही राहुल गांधी अध्यक्षपदाची सुत्रे गुजरातमधील मतदान होईपर्यंत लांबविणार आहेत. असो.
राहुल गांधींचे अभिनंदन. त्यांची अध्यक्ष म्हणून पुढील वाटचाल बरीच खडतर असणार आहे हे नक्कीच. काँग्रेस पक्ष अभूतपूर्व संकटात सापडला आहे त्याला नवी संजीवनी द्यायचे आव्हान राहुल गांधींपुढे असेल.
🗣 चर्चा
(150)
इ
इरसाल
गुरुवार, 12/14/2017 - 05:54
नवीन
वरचे १४.३२ लाख मी दिलेत काय प्रॉब्लेम आहे ????????
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 12/14/2017 - 06:12
नवीन
क्विंट वाचणारांच्या अकलेचे दिवाळे वाजलेले असते, इथे तर पुरोगामीपणाच्या जोशात साला बिझनेस स्टँडर्ड ने देखिल क्विंटचाच हवाला देऊन बातमी पुढे रेटली आहे.
===========================
सरकारमधे कोणी नसताना सोनियाबाई किती हजार कोटी खर्च व्हायचे?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 12/14/2017 - 06:18
नवीन
चंपाबाईचा नारा
मोदी हटवा
देश वाचवा
ओवैसी आणा
देशाचा दार अल सलाम करा
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 12/14/2017 - 14:42
नवीन
महाराष्ट्रातील सत्तेतून शिवसेना याचवर्षी बाहेर पडेल असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. सत्तेतून बाहेर पडायचा २०१४ पासून शिवसेनेने हा दिलेला ६८ वा इशारा आहे असे म्हणतात.
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
गुरुवार, 12/14/2017 - 15:29
नवीन
ह्या बातमीत खालील वाक्य आहे
कदाचित ? नक्की कधी ठरणार आहे ?
ज्याप्रमाणे कृष्णाने शिशुपालाचे १०० अपराध होईपर्यंत वाट पहिली आणि मगच त्याला देहदंड केला त्याप्रमाणे हे बहुतेक १०० इशारे दिल्यानंतर ह्या सरकारमधून बाहेर पडून त्यांचा कोथळा बाहेर काढतील,कदाचित .
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 12/14/2017 - 15:41
नवीन
म्हणजे कदाचित आणखी ३२ इशारे द्यायला वाव आहे :) आणि तोपर्यंत विधानसभेचा कार्यकाळ संपून निवडणुकांची वेळही आली असेल. म्हणजे प्रत्यक्ष सत्तेतून बाहेर पडावेही लागणार नाही :)
- Log in or register to post comments
ज
जानु
गुरुवार, 12/14/2017 - 14:49
नवीन
गुजरात आणि हिमाचल बीजेपी च्या विरोधात गेले तर हे बदलापूर प्रमाणे सेना राष्ट्रवादी समीकरण मांडू असा इशारा देत आहेत. साहेब ही तसेच काहीतरी बोलले...
- Log in or register to post comments
ज
जानु
गुरुवार, 12/14/2017 - 14:51
नवीन
दोन्ही राज्ये भाजपाकडे राहतील हे निश्चित आहे. उगा आपले बालिश बहु ........
- Log in or register to post comments
ख
खेडूत
गुरुवार, 12/14/2017 - 18:41
नवीन
पाक रुपया अनेक दिवस कॄत्रिमरित्या डॉलरला १०५ वर ठेवला होता, काल अचानक ११० रुपये झालाय. येत्या तीन महिन्यांत त्यांची अवस्था कठीण होणार आहे.
पुढच्या कर्जासाठी नाणेनिधीची भेट आहे पुढच्या महिन्यात, त्याची तयारी चाललेली दिसते.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 12/15/2017 - 10:50
नवीन
पुरोगाम्यांसाठी वाईट दिवस
______________________
तोंडी घटस्फोट दखलपात्र फौजदारी गुन्हा ठरविणारे विधेयक मंत्रीमंडळाने मंजूर केले आहे.
https://news.rediff.com/commentary/2017/dec/15/cabinet-clears-triple-talaq-bill/88e6fd05dba3c0776637adc70e468e4a
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Fri, 12/15/2017 - 12:19
नवीन
भाजप सरकारनं ट्रीपल तलाकची केस पुरोगामी बाजूनं इतकी नेटानं लढवली आणि जिंकली. मराठी संकेतस्थळावरच्या एकाही पुरोगामी सदस्यानं त्यांचं तोंडभर कौतुक केलं नाही. हे काय याच्या १/१०० पुरोगामी काम काँग्रेसने कधी केलं नाही.
यांच्या बुद्धीला काय कीड लागली असावी? कोणता न्यूनगंड असावा?
- Log in or register to post comments
B
babu b
Fri, 12/15/2017 - 12:24
नवीन
The apex court held that the triple talaq is against the basic tenets of Quran.
म्हणजे ते कुराणाप्रमाणेच वागले.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Fri, 12/15/2017 - 12:30
नवीन
कोण कुराणाप्रमाणे वागले म्हणता? सुप्रिम कोर्ट? काय संबंध? अहो, तलाक देणारे कुराणाप्रमाणे नै वागले असे कोर्ट म्हणते. कोर्टाचा कुराणाप्रमाणे वागण्याचा काय संबंध येतो? उगाच काहिही.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 12/15/2017 - 12:57
नवीन
तात्काळ तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणारं विधेयक कॅबिनेटकडून मंजूर !
सरकारचे अभिनंदन !!
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Fri, 12/15/2017 - 15:47
नवीन
नक्कीच सरकारच अभिनंदन. सामाजिक समतेच्या आणि मुस्लिम महिलांच्या हक्काच्या दृष्टीने उपयुक्त असे पाऊल.
- Log in or register to post comments
न
नाखु
Sat, 12/16/2017 - 05:30
नवीन
मुनी, अमितदादा
असं नाही करायचा, चांगल्या कामाची प्रशंसा करण्याचा वाईट विचारकरू नका
जळी स्थळी मोदी फडणवीस वाईट आहेत हे पहायला शिका, मिपा पुरोगामी सुधारक विचारवंत होऊन जाल.
इतरांच्या मताला किंमत देण्याची श्रद्धा असलेला अंधश्रध्दाळू नाखु
- Log in or register to post comments
B
babu b
Sat, 12/16/2017 - 06:02
नवीन
त्याच्या मताला किंमत द्या
- Log in or register to post comments
न
नाखु
Sun, 12/17/2017 - 04:53
नवीन
तुम्ही नका विचार मौक्तिक टाकु, दरेकर अवतारात झालेली मूळव्याध बरी झाली की कळवा तर्रीबाज मिसळ खायला बोलावतो
- Log in or register to post comments
प
पुंबा
Mon, 12/18/2017 - 07:37
नवीन
मात्र, जर सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार तलाक ए बिदत यापुढे बेकायदेशिर ठरला आहे आणि तश्या पद्धतीने झालेल्या घ्टस्फोटाला कायदेशिर मान्यता नाही याचा अर्थ गुन्हा घडलाच नाही. तर मग या गुन्ह्याला शिक्षा कशी काय करता येईल?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 12/15/2017 - 14:04
नवीन
गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये व्ही.व्ही.पी.ए.टी मधून मिळालेल्या किमान २५% पावत्यांची मतदानयंत्रांबरोबर पडताळणी करून बघावी ही काँग्रेस पक्षाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने नाकारली आहे.
एक गोष्ट कळत नाही. व्ही.व्ही.पी.ए.टी मधून मिळालेल्या पावत्यांमध्ये दुसर्या पक्षाला मत दिल्याचे नमूद झाले तर मतदार तिथल्यातिथे तक्रार करू शकतात. तसे काही झाल्याची एकही बातमी वाचनात आली नाही. काही ठिकाणी मतदानयंत्रेच चालत नव्हती म्हणून काही काळ मतदान थांबले होते पण निवडणुक आयोगाच्या प्रतिनिधींनी यंत्रे बदलली अशा बातम्या आल्या होत्या पण कोणी अशा पावत्यांची तक्रार केल्याचे वाचनात आले नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे समजा पूर्ण गुजरातमध्ये २ कोटी मतदारांनी मतदान केले असेल तर त्याच्या २५% म्हणजे ५० लाख लोकांकडून पावत्या गोळा करणे आणि त्यांची मतदानयंत्रांबरोबर पडताळणी करणे म्हणजे मोठेच अपसव्य होईल. अशा मिळालेल्या पावत्या किती जण जपून ठेवतात ही शंकाच आहे. आणि या सगळ्या प्रकारात मतदान गुप्त ठेवायच्या प्रकारचे काय होणार?
आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर अख्खे मतदानयंत्र हॅक करता येऊ शकत असेल तर त्याच मतदानयंत्रातून आलेल्या पावत्याही कशा विश्वासार्ह असतील? त्यामुळे या पावत्यांची पडताळणी मतदानयंत्राबरोबर झाली तर मग पावत्याही चुकीच्या होत्या अशी नवीच टूम निघणार नाही याची काय खात्री आहे?
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
Fri, 12/15/2017 - 16:22
नवीन
हे लोक ईव्हीएम बद्दल एवढा आरडाओरडा करतात आणि मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे अशी मागणी करतात. पण पूर्वापार बूथ कॅप्चारिंग, मतपेट्या गहाळ होणे, मतपत्रिका बदलल्या जाणे हे प्रकार घडत होतेच. त्याला आळा घालण्यासाठी म्हणून ईव्हीएमचा पर्याय पुढे आला आणि जे पूर्वी बूथ कॅप्चारिंग ई करायचे त्यांना आता ते करता येत नसल्याने चिडचिड होत असावी.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 12/15/2017 - 16:29
नवीन
हे असं उघड वस्त्रहरण करायचं नाही.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Fri, 12/15/2017 - 19:57
नवीन
<<<आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर अख्खे मतदानयंत्र हॅक करता येऊ शकत असेल तर त्याच मतदानयंत्रातून आलेल्या पावत्याही कशा विश्वासार्ह असतील?>>>
==>> मला वाटते यावरच मुख्य आक्षेप असावा. २५% नाही पण रॅन्डमली ४०-५० सॅम्पल्स चेक करायला हरकत नव्हती.
मतदान सुरु होण्यापूर्वी पोलिंग अजन्ट्स ने केलेली तपासणी आणि प्रत्येक्षात मतदान झाल्यानंतर केलेली पडताळणी याची खातर जमा केली तर बिघडले कुठे?
कसून चौकशी होण्यासाठी एवढा प्रतिकार का केला जातोय?
हे केले असते तर विरोधक आणि लोकांच्या मनातला संशय दूर झाला असता.
आणि समर्थकांना विजयाचा निर्भेळ आनंद साजरा करता आला असता.
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
Fri, 12/15/2017 - 20:49
नवीन
काँग्रेसने केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. मग आता सुप्रीम कोर्ट पण भाजप मॅनिप्युलेट करत आहे असं म्हणणं आहे का?
मतदानयंत्र हॅक करता येतं हा आरोप सिद्ध करण्यासाठी खूप संधी देऊन झाली, खूप प्रयत्न करून झाले पण ते कोणालाच सिद्ध करता आलं नाही. आणि गमतीची गोष्ट म्हणजे हा आरडाओरडा फक्त भाजप जिथे जिंकतं तिथेच केला जातो. इतर ठिकाणची मतदानयंत्र मात्र हॅकप्रूफ असतात. भाजप जिथे हरते तिथे पण भाजप कडून मतदान यंत्रांबाबत तक्रार झाल्याचं आठवत नाही, असेल तर दाखवून द्यावे.
मग विरोधी पक्षांकडे एखाद्या भारी हॅकरला हाताशी धरून मतदानयंत्र हॅक करून दाखवता येण्याइतकी पण कल्पकता नाही? का पैसे नाहीत?
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Sat, 12/16/2017 - 04:17
नवीन
याबाबत भाजपला झुकतं माप द्यायची गरज नाही.. 2009 मध्ये भाजपनेही असे आरोप केले होते.
फक्त तेव्हा मिपा नव्हते आणि सोशल मीडिया पण नव्हता, त्यामुळे ही भांडणे देखील प्रिंटेड मीडियामध्ये व्हायची, जी लोक एव्हढी मनावर घेत नसत. असे आरोप करणे हा राजकारणाचा भाग आहे, त्यात आपण किती अडकायचे हे आपण ठरवायचे आहे.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Sat, 12/16/2017 - 04:25
नवीन
आर्टगत एक गोष्ट मात्र आहे, केजरीवालने जशी नौटंकी केली तशी मात्र भाजपाने केली नव्हती. पण भाजपचे नेते तेव्हढे पोरकट कधीच नव्हते नाही का?
आज देखील काँग्रेस अधिकृतपणे अशी नौटंकी करत नाहीच आहे, त्यांचा घटम भिंद्यात वाला पब्लिसिटी विभागच ही नौटंकी करतोय.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 12/16/2017 - 04:45
नवीन
हो असे आरोप अडवाणींनी केले होते. तसेही गेल्या अनेक वर्षांपासून अडवाणींना गांभीर्याने घेणे लोकांनी बंद केले असल्यामुळे त्या तक्रारीची फारशी दखल कोणी घेतली नव्हती. या तक्रारी आल्यानंतर निवडणुक आयोगाने खुले आव्हान देऊन यंत्र हॅक करून दाखवा यासाठी आठवड्याभराचा कालावधी सर्व राजकीय पक्षांना दिला होता. ते आव्हान स्विकारायला किती पक्षांचे लोक गेले होते हे पण तपासून बघायला हवे. जे कोण गेले होते त्यापैकी एकालाही तसे मशीन हॅक करणे शक्य झाले नाही ही पण गोष्ट तितकीच खरी. या प्रकारानंतर सुब्रमण्यम स्वामी कोर्टात गेले होते आणि त्यांनी व्ही.व्ही.पी.ए.टी हा प्रकार सुरू करावा यासाठी प्रयत्न केले.
मतदानयंत्रे इतक्या सहजपणे हॅक करता येत असती तर २०१४ मध्ये काँग्रेसला अवघ्या ४४ जागा मिळून दाणादाण उडालीच नसती. मुंबई-पुण्यात अनेक ठिकाणी अनेक मतदारांची नावेच मतदारयादीतून गायब करायचा प्रकार २०१४ मध्ये झाला होता. त्याप्रकारे सत्ताधारी पक्ष मतदान प्रभावित करायचा प्रयत्न करतील. पण मतदानयंत्रांद्वारे तसे करणे शक्य वाटत नाही.
नाही हो. मिपा २००७ पासून आहे. मायबोली तर १९९६ पासून आहे. सोशल मिडियामध्ये त्याकाळी भारतात ओरकूटचे प्राबल्य होते. फेसबुक आले होते पण फेसबुकवर आताइतक्या प्रमाणावर लोक नव्हते. त्यातही फेसबुकवर राजकारणावर चर्चा करणे हा प्रकार निदान भारतात तरी नव्हता. तरीही त्यावेळी सोशल मिडिया नव्हता असे नाही.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 12/16/2017 - 04:35
नवीन
आताही प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एका मतदारकेंद्रावर अशी पडताळणी केली गेली होती. आणि जर काही कोटी मतदार असतील त्यापैकी अगदी एकानेही पावतीवर वेगळेच मत आले आहे याची तक्रारही केली नव्हती हे पण लक्षात घ्यायला हवे.
ते होणे नाही. संशय घेणारे काहीही झाले तरी संशयच घेत राहणार. वर म्हटल्याप्रमाणे समजा व्ही.व्ही.पी.ए.टी मधून आलेल्या सगळ्या पावत्यांची पडताळणी झाली तरी मग त्या पावत्याच कशा चुकीच्या आहेत--- म्हणजे यंत्राने मत भाजपलाच दिले पण पावतीवर काँग्रेसचा हात छापून आला वगैरे ओरड सुरू होईल. असल्या माणसांचा संशय दूर करायची काहीही गरज नाही.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Sat, 12/16/2017 - 13:35
नवीन
हि आणखी एक बातमी ...
https://www.loksatta.com/desh-videsh-news/repolling-to-be-conducted-at-6-polling-stations-in-vadgam-viramgam-daskroi-and-savli-tomorrow-in-gujrat-1601783/
विविध राजकीय पक्षांकडून इव्हीएममध्ये छेडछाडी आणि तांत्रिकदृष्ट्या गोंधळ झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर येथील सहा मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
या मध्ये "
१.
"""दोन तीन केंद्रांवर एकाला मतदान केल्यानंतर काँग्रेसला पाठींबा दर्शवलेले अपक्ष उमेदवार जिग्नेश मेवानी यांच्या नावासमोरील दिवा लागत असल्याचे समोर आले होते. यामुळे स्थानिकांनी या मतदानावर आक्षेप घेत निषेध नोंदवला. या प्रकरणाची चौकशी करुन येथे फेरमतदान घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली होती. """"
आणि
"""
२.
तर, दासक्रोई, विरामगाम येथील केंद्रांवर चाचणी मतदानादरम्यान घेतलेला मतदानाचा डेटा पुसण्याचे निवडणूक अधिकारी विसरुन गेले तसेच व्हीव्हीपॅटमधील पावत्या काढण्याचे राहून गेले त्यानंतर त्यावरच प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. यावरही आक्षेप घेण्यात आल्याने येथेही फेरमतदान होणार आहे."""
ह्या दोन्ही प्रकरणात शंका घायला बराच वाव आहे.
१. मध्ये लिंकिंग पूर्णतः चुकीचे आहे
२. मध्ये एवढे ट्रैनिंग आणि नोकरी जाईल याचा दबाव असताना देखील डेटा पुसण्याचे काम निवडणूक अधिकारी विसरुन कसे जाऊ शकतात ?
त्यामुळे EVM कर्वे मतदान १००% फुल्ल प्रूफ आहे या दाव्याला अर्थ राहत नाही. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने आणि मतदारांनी सजग राहून निष्पक्ष आणि निर्भेळ मतदान पार पडण्याकरिता करीत निवडणूक आयोगाला सहकार्य आणि वचक ठेवली पाहिजे, हे माझे मत आहे.
एवढे पटवून देण्याचा प्रयत्न करून देखील मोदीद्वेषी आणि पुरोगामी निर्धर्मांद असल्याचे कृपया शिक्के मारू नका.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 12/16/2017 - 13:46
नवीन
फक्त यापूर्वी बूथ कॅप्चरींग, मतपेटीत शाई ओतणे, मतपत्रिका पळवून नेऊन भराभर शिक्के मारून त्या पेटीत भरणे वगैरे वगैरे प्रकारांमुळे किती मतदानकेंद्रांवर फेरमतदान घ्यावे लागायचे हे पण बघा. कुठलीही पध्दत अगदी १००% फूलप्रूफ नसतेच. तसा कोणी दावा केल्याचेही ऐकिवात नाही आणि तसा दावा केला तर तो चुकीचा आहे. पण पूर्वीच्या पध्दतीपेक्षा ही पध्दत कितीतरी जास्त विश्वासार्ह आहे हे नक्की.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Sat, 12/16/2017 - 14:00
नवीन
मोदीद्वेषी आणि पुरोगामी निर्धर्मांद हे शब्द आपण मला कधीहि वापरले नाहीत याची नोंद घ्यावी.
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
Sat, 12/16/2017 - 15:52
नवीन
सुरुवात झालेली आहे
हार्दिकचा आरोप
सात शेपट्यांच्या उंदराच्या गोष्टीची आठवण झाली.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 12/15/2017 - 16:40
नवीन
मतपत्रिका आणि आधार कार्ड लिंक करायला हवे म्हणजे खोटे मतदान करता येणार नाही.
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
Fri, 12/15/2017 - 16:57
नवीन
मुनिवर्य तुम्हाला बूथ कॅप्चरिंग किंवा मतपेट्या पळवून त्यातील मते बदलणे म्हणजे काय माहित असेलच! गुंडांकरवी मतदान अधिकाऱ्याला दमदाटी करून जे मतदान करायला येतील त्यांच्या मतपत्रिका हव्या तश्या बदलून घ्यायचे किंवा लोकांनी मत दिल्यानंतर मतपेट्या सील करून ठेवतात तिथूनच किंवा वाहतूक करताना त्या मतपेट्या पळवून त्यांना पाहिजे तश्या मतपत्रिका बदलल्या गेल्या तर मतपत्रिका आणि आधार लिंक करून काय होणार? मतपत्रिकांद्वारे मतमोजणी करताना फक्त मत कोणाला आहे ते बघतात त्या पत्रिकेवर बाकी माहिती नसतेच (आधार नंबर वगैरे) त्यामुळे ती पत्रिका खरी का खोटी हे मोजणीच्या वेळेला कळणे अशक्य आहे.
या ऐवजी ईव्हीएम आणि आधार लिंक करणे हा चांगला पर्याय आहे. एवढे आरोप करूनही ईव्हीएम हॅक करता येतं हे कोणीही सिद्ध करू शकलेलं नाही. केजरीवालांनी एवढी नौटंकी केली तेही अजून सिद्ध करू शकलेले नाहीत.
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Fri, 12/15/2017 - 17:33
नवीन
भाजपच्या नावाने मोडायला आता बोटचं शिल्लक नसणार.
पुढच्या मतदानाला स्वतःच ईव्हीएम मशीन घेवुन जावं म्हणावं !!!!
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Sat, 12/16/2017 - 04:14
नवीन
मुळात आधार आणि मतपत्रिका लिंक करणे, किंवा वही वही पॅट ची पावती घरी देणे हा गुप्त मतदान या संकल्पनेवर झालेला हल्ला आहे असे आपल्याला वाटत नाही का?
मतदान हे गुप्तच राहिले पाहिजे. पावती घरी न्यायला दिली तर उद्या घरी उमेदवाराची माणसे घेऊन पावतीची पडताळणी करू शकतात , आणि मत दिले नाही म्हणून खून पण करू शकतात.
आत्ता सुद्धा evm मध्ये कोणत्या वोर्डात किती मतदान झाले ते कळते म्हणे, त्याचा वापर उमेदवार बूथ स्तरावर लोकांना धमकावण्यासाठी करतात असे ऐकून आहे.
- Log in or register to post comments
B
babu b
Sat, 12/16/2017 - 05:04
नवीन
दंगेखोरानी चक्क राजस्तानात कोर्टावर तिरंग्याशिवाय दुसरा ध्वज फडकवला ! हा गुन्हा नाही का ?
https://www.outlookindia.com/website/story/hindu-groups-attack-police-unfurl-saffron-flag-on-udaipur-court-premises-in-supp/305606
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 12/16/2017 - 09:50
नवीन
ओ बाबुराव, कोर्टावर नाही हो, कोर्टाच्या प्रवेशद्वारापाशी. एव्हढे द्वेषांध झालात की नीट वाचताही येईना?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Sat, 12/16/2017 - 05:04
नवीन
*मी कुठेसं वाचलंय..*
सामना सुरु होण्याआधीच *कोणता संघ जिंकेल* याची अतिशय *तर्कशुद्ध*(Logical) *ठोस* (convincing) आणि *ठामपणे* (unequivocal) भविष्यवाणी करणे
आणि *सामन्यानंतर 'तो' संघ का हरला* याचे तितकेच *अभ्यासपुर्ण आणि बिनतोड विवेचन* करणे
या *दोन्ही* गोष्टी ज्याला जमतात...
...
...
...
...
...
...
त्याला जरुर *तज्ज्ञ* (Expert) म्हणावे ..
*श्री योगेंद्र यादव* यांना मानलं मी ..
निवडणुकविषयक *तज्ज्ञ* म्हणुन !!! - *प्रसाद भागवत*
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 12/16/2017 - 05:46
नवीन
आज सोनिया गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होणार आहेत आणि राहुल गांधी नवे पक्षाध्यक्ष बनणार आहेत. या निमित्ताने सोनियांच्या राजकीय कारकिर्दीविषयी लिहितो.
राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीने अध्यक्षपदावर सोनिया गांधींची निवड केली होती. पण त्यांनी त्यावेळी अध्यक्षपद स्विकारायला नकार दिला होता. नरसिंहराव पक्षाध्यक्ष आणि पंतप्रधान झाले तरीही सोनियांनी पडद्याआडून सुत्रे हलवायला प्रयत्न चालूच ठेवला होता. यासाठी सोनियांना अर्जुनसिंग, माधवराव शिंदे, कमलनाथ, माखनलाल फोतेदार आणि काही प्रमाणावर तामिळनाडूतील वझापडी के. राममूर्ती, पी.रंगराजन कुमारमंगलम इत्यादींची मदत होत होती. नरसिंहरावांनी मोठ्या चातुर्याने पक्षावर पकड ठेवली होती पण त्यांना स्वतःचा जनाधार फार नसल्यामुळे पक्षातील गांधीघराणे निष्ठावान लोकांना तोंड देता येणे शक्य झाले नव्हते. तरीही नरसिंहरावांनी त्या परिस्थितीतही बराच खमकेपणा दाखवला. राव पंतप्रधान झाले २१ जून १९९१ रोजी. त्यानंतर महिन्या-दीड महिन्यातच कावेरी नदीच्या पाणीवाटप प्रश्नावरून तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्यात जुंपली होती. तेव्हा काँग्रेसचे तामिळनाडूतील नेते वझापडी के.राममूर्ती आणि पी.रंगराजन कुमारमंगलम यांनी कावेरी प्रश्नावर तामिळनाडूवर अन्याय होत आहे असा आरोप करत नरसिंहराव मंत्रीमंडळातून राजीनामा दिला. नरसिंहरावांवर दबाव ठेवायच्या उद्देशाने सोनियांनीच पडद्याआडून सुत्रे हलवली होती असे मला वाटते. नरसिंहराव मुळात अल्पमतातील सरकार चालवत होते. त्यामुळे अगदी सुरवातीलाच हा प्रकार झाल्यामुळे राव संबंधित मंत्र्यांच्या मिनतवार्या करतील, नाकदुर्या काढतील अशी सोनियांची अपेक्षा असावी. पण तसे काहीही झाले नाही. रावांनी के.राममूर्तींचा राजीनामा लगोलग मंजूर केला आणि आपल्या दबावतंत्राचा काही फायदा होत नाही हे लक्षात घेऊन पी.रंगराजन कुमारमंगलम यांनी राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवायच्या आत मागे घेतला.
रावांचे गणित समजण्यासारखे होते. त्यांचे सरकार पडले असते तर परत निवडणुका घ्यायला लागल्या असत्या आणि ते कोणालाच परवडले नसते. रावांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानात या कारणामुळे राष्ट्रीय आघाडी आणि डावे पक्ष (जनता दल, कम्युनिस्ट, तेलुगु देसम इत्यादी) अनुपस्थित राहिले. या पक्षांचे मिळून साधारण १३५ खासदार लोकसभेत होते.या खासदारांनीही राव सरकारविरोधात मतदान केले असते तर रावांचे सरकारही वाजपेयींच्या सरकारप्रमाणे १३ दिवसात पडले असते. भाजपने त्यावेळी विश्वासदर्शक ठरावावर राव सरकारचा नावापुरता विरोध केला होता. मनमोहनसिंगांचे नवे आर्थिक धोरण आल्यावर भाजपचा दृष्टीकोन राव सरकारविषयी वरवरचा विरोध करायचा पण संसदेत सहकार्य करायचे असाच होता. तर राष्ट्रीय आघाडी-डावे पक्ष यांनी राव सरकारला विरोध केला होता. दरम्यान अजितसिंग वगैरे मंडळींना जनता दलातून फोडून रावांनी आपली बाजू अजून सुरक्षित केली होती. अयोध्या प्रकरणानंतर भाजप राव सरकारचा कडवा विरोधक झाला पण राष्ट्रीय आघाडी-डावे पक्ष राव सरकारला तेवढ्यापुरते सहकार्य करायच्या मनस्थितीत होते. तेव्हा काहीही झाले तरी लगेच निवडणुका नकोत म्हणून कोणाचेतरी सहकार्य घेऊन राव सत्ता टिकवू शकत होते. याचा फायदा घेऊन रावांनी मधूनमधून सोनियानिष्ठांना शक्य होईल त्याप्रमाणे बाहेरचा रस्ताही दाखविला. ८ जानेवारी १९९३ रोजी भारतीय वायुदूतसाठी रशियाकडून भाड्याने घेतलेले एक १०-१२ सीटर छोटे विमान पडले. त्याची 'नैतिक जबाबदारी' घेऊन सीव्हील एव्हिएअशन मंत्री माधवराव शिंदेंनी मंत्रीमंडळातून राजीनामा दिला. राव आपली मनधरणी करतील अशी त्यांची अपेक्षा असेल तर ती काही पूर्ण झाली नाही. १८ जानेवारी १९९३ रोजीच्या मंत्रीमंडळाच्या पुनर्रचनेत सोनियानिष्ठ माखनलाल फोतेदार आणि पी.रंगराजन कुमारमंगलम यांना डच्चू दिला.
राव सरकारपुढे खरे संकट उभे राहिले होते जुलै १९९३ मधील अविश्वास ठरावाच्या दरम्यान. पण रावांनी झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना फोडून आणि दोन-अडीच वर्षातच परत निवडणुका होतील या काँग्रेस खासदारांना असलेल्या भितीचा वापर करून घेऊन आपले सरकार वाचवले. अर्जुनसिंग मधूनमधून रावांना अडचणीत आणायचा प्रयत्न करत असत पण त्यांच्या बाजूला नक्की किती खासदार आहेत याचा उलगडा न झाल्यामुळे जे काही चालले आहे ते चालू द्यावे आणि मध्यावधी निवडणुका नकोत असा विचार करत बहुसंख्य खासदार परत रावांविरूध्द जायला तयार नव्हते. याचा रावांनी फायदा उचलला आणि सोनियांचे फार चालू दिले नाही.
नोव्हेंबर १९९३ मधील उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप जिंकेल आणि त्यानंतर रावांवर दबाव आणता येईल अशी सोनियानिष्ठांची अटकळ होती. पण प्रत्यक्षात भाजप केवळ दिल्लीमध्ये अपेक्षेप्रमाणे जिंकला. राजस्थानात शेखावत मुख्यमंत्री झाले पण बहुमताला मात्र जागा थोड्या कमी पडल्या. हिमाचल आणि मध्य प्रदेशात तर काँग्रेसचा विजय झाला आणि उत्तर प्रदेशात सपा-बसपा युतीला जनता दल आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री झाले. भाजपच्या या निराशाजनक कामगिरीमुळे सोनियानिष्ठांना आणखी काही काळ थांबावे लागले. त्यांना खरी संधी मिळाली डिसेंबर १९९४ मध्ये. त्यावेळी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात विधानसभा निवडणुका झाल्या. दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसने अगदी सपाटून मार खाल्ला. त्यानंतर या पराभवाला नरसिंहरावांना जबाबदार ठरवून अर्जुनसिंगांनी मंत्रीमंडळातून राजीनामा दिला. पण त्यांच्याबरोबर कोणीच खासदार बाहेर पडले नाही. कारण तेच की नक्की किती आकडा आहे, तो सरकार पाडायला आणि पर्यायी सरकार बनवायला पुरेसा आहे का याचा अंदाज कोणालाच आला नाही.त्यानंतर रावांनी अर्जुनसिंगांना काँग्रेसमधूनही बाहेरचा रस्ता दाखवला.
मे १९९५ मध्ये पी.रंगराजन कुमारमंगलम यांनी मनमोहनसिंगांनी सादर केलेल्या बजेटवर कपातसुचना आणायचा प्रयत्न केला. अशा कपातसुचना सत्ताधारी पक्षाचे खासदार आणत नाहीत तर विरोधी पक्षांचे खासदार आणतात. त्यामागचा बोलविता धनी सोनियाच होत्या हे सांगणे न लागे. पण तो फुसका बार ठरला. १९ मे १९९५ रोजी अर्जुनसिंग आणि नारायणदत्त तिवारी यांनी काँग्रेस (तिवारी) या आपल्या पक्षाची स्थापना केली. त्यांच्याबरोबर तामिळनाडूतील कुमारमंगलम, राजस्थानातील शीशराम ओला, उत्तर प्रदेशातील तिवारीनिष्ठ सत्पाल महाराज असे त्यांच्या मतदारसंघाबाहेर फार प्रभाव नसलेले नेतेच बाहेर पडले.
तेव्हा सांगायचा मुद्दा हा की रावांनी ५ वर्षे सोनियांना मस्त टोलवत ठेवले होते. १९९६ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा १९७७ पेक्षाही मोठा पराभव झाला. त्यानंतर नरसिंहराव लखुभाई पाठक यांना फसविणे, झारखंड मुक्ती मोर्चा लाच प्रकरण, सेंट किट्स प्रकरण या तीन प्रकरणांमध्ये अडचणीत आले. अशावेळी राव पक्षाध्यक्ष पदावरून पायउतार झाले आणि सीताराम केसरी नवे अध्यक्ष बनले. त्यानंतर मधल्या काळात काँग्रेसमधून बाहेर पडलेले अर्जुनसिंग, तिवारी, माधवराव शिंदे इत्यादी नेते स्वगृही परतले. चाचा केसरी ही स्टॉप गॅप अॅरेन्जमेन्ट होती आणि रावांनी मोठ्या चातुर्याने सोनियांना टोलवत ठेवले होते ते करणे केसरींना शक्य झाले नाही.
अशावेळी सोनिया स्वतः राजकारणात प्रवेश करायची संधी शोधत होत्या. ती संधी केसरींनीच सोनियांना दिली. ३० मार्च १९९७ रोजी केसरींनी कोणालाही विश्वासात न घेता अचानक देवेगौडा सरकारचा पाठिंबा काढून घेतला. हा निर्णय फारसा कोणालाही आवडला नव्हता कारण परत निवडणुका झाल्यास त्याला सामोरे जायच्या स्थितीत पक्ष नव्हता. त्यामुळे तडजोड म्हणून इंद्रकुमार गुजराल यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारला काँग्रेसने पाठिंबा दिला. त्यानंतर केसरींची पक्षावरील पकड अजून ढिली होत आहे ही संधी साधून १९ मे १९९७ रोजी सोनियांनी काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व घेतले. नोव्हेंबर १९९७ मध्ये राजीव गांधी हत्याकांडाची चौकशी करणार्या जैन कमिशनचा अंतरीम अहवाल आल्यावर त्यात जैन कमिशनने द्रमुक पक्षावर एल.टी.टी.ई च्या वाढीबद्दल ठपका ठेवल्याचे उघड झाले. त्यानंतर काँग्रेसने गुजराल सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यासाठी सीताराम केसरी फास उत्सुक नव्हते पण अर्जुनसिंग इत्यादी सोनियानिष्ठांनी त्यांना तसे करणे भाग पाडले. २८ नोव्हेंबर १९९७ रोजी गुजरालांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि सोनिया अधिक सक्रीय भूमिका घ्यायचा मार्ग मोकळा झाला. तो कसा हे पुढच्या भागात बघू.
- Log in or register to post comments
B
babu b
Sat, 12/16/2017 - 06:08
नवीन
अशा प्रकारची राजकारणे सगळ्याच पक्षात असतात.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sat, 12/16/2017 - 08:45
नवीन
भारताच्या सर्वात जास्त काळ सत्तेत राहिलेल्या पक्षाच्या 18-19 वर्षे अध्यक्ष राहिलेल्या सोनिया गांधींविषयी एक स्वतंत्र लेख मिपावर नक्कीच असू शकतो. तरी हा प्रतिसाद व भावी भाग दुसरा स्वतंत्रपणे प्रकाशित करावेत ही विनंती.
- Log in or register to post comments
म
महेश हतोळकर
Sat, 12/16/2017 - 08:52
नवीन
बरोबर आहे. स्वतंत्र आणि सविस्तर लेखमाला कराच.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 12/16/2017 - 13:31
नवीन
धन्यवाद पैलवान. सुरवातीला एका प्रतिसादात सगळे मुद्दे मांडता येतील असे वाटत असताना पहिल्यांदा दोन आणि नंतर तीन (कदाचित नंतर चारही) भाग करावे लागणार असे कळले. त्यापैकी दोन भाग इथेच आल्यामुळे नंतरचा (चे) भागही इथेच देतो. नाहीतर एकच भाग वेगळा विचित्र वाटेल.
परत एकदा धन्यवाद.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 12/16/2017 - 09:05
नवीन
२८ नोव्हेंबर १९९७ रोजी इंद्रकुमार गुजराल यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ४ डिसेंबर १९९७ रोजी ११ वी लोकसभा बरखास्त करण्यात आली. १२ व्या लोकसभेसाठी मतदान फेब्रुवारी-मार्च १९९८ मध्ये व्हायचे होते. चाचा केसरींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा अगदी पूर्ण धुव्वा उडेल अशी परिस्थिती होती. किंबहुना डिसेंबर १९९७ मध्ये १२ व्या लोकसभेसाठी मुख्य लढत भाजप आणि संयुक्त आघाडी यांच्यात होईल असे चित्र होते. काँग्रेसला फार कोणी जमेस धरत नव्हते. हळूहळू काँग्रेसमधून एकामागोमाग एक नेते पक्षाबाहेर पडू लागले. सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडणारे होते एकेकाळचे सोनियानिष्ठ पी.रंगराजन कुमारमंगलम. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील अस्लम शेरखान, राजस्थानातील अब्रार अहमद हे इतर माजी केंद्रीय मंत्रीही बाहेर पडले आणि या सगळ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशावेळी २९ डिसेंबर १९९७ रोजी सोनियांनी काँग्रेससाठी निवडणुकांमध्ये प्रचार करू असे जाहीर केले आणि सर्व काँग्रेसजनांना दिलासा मिळाला. सोनियांनी श्रीपेरूम्बुद्दूरपासून १५ जानेवारी १९९८ पासून प्रचाराला सुरवात केली. लोकसभा निवडणुकांसाठी मतदान १६, २२ आणि २८ फेब्रुवारी रोजी होणार होते. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात सोनियांनी प्रचाराचा धडाका लावला. त्यांच्या सभांना गर्दीही बर्यापैकी जमत होती. त्यामुळे काँग्रेसवाल्यांचा आत्मविश्वास वाढला.
२ मार्च रोजी मतमोजणी सुरू झाली. काँग्रेसने महाराष्ट्र आणि राजस्थानात मोठा विजय मिळवला. पण अनेक महत्वाच्या राज्यांमध्ये काँग्रेसचा व्हाईटवॉश झाला. त्यात उत्तर प्रदेश, तामिळनाडू या मोठ्या राज्यांबरोबरच पंजाबचाही समावेश होता. विशेष म्हणजे अमेठी आणि रायबरेलीमधूनही काँग्रेसचा पराभव झाला होता. ओरिसामधून काँग्रेसने १९९६ पेक्षा ११ जागा गमावल्या तर बंगालमध्ये ८ जागा गमावल्या. गुजरातमध्येही ४ जागा गमावल्या. या सगळ्यांमुळे महाराष्ट्र आणि राजस्थानात मोठा विजय मिळाला तरी काँग्रेसने १९९६ इतक्याच म्हणजे १४० च्या आसपास जागा १९९८ मध्ये जिंकल्या. चाचा केसरींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने निवडणुक लढवली असती तर शंभर जागा मिळणेही मुश्कील झाले असते हे नक्की. सोनियांनी काही प्रमाणात पक्षाची बाजू सांभाळली. त्यानंतर ८ मार्च १९९८ रोजी पक्षाच्या सर्व नेत्यांनी सोनियांना पक्षाध्यक्ष व्हा म्हणून साकडे घातले. सीताराम केसरींना काँग्रेस मुख्यालयात कोंडून ठेवायचाही प्रकार झाला. सोनिया काँग्रेस अध्यक्ष झाल्या. त्यानंतर एप्रिल १९९८ मध्ये ए.आय.सी.सी च्या दिल्लीमधील अधिवेशनात त्यांच्या पक्षाध्यक्ष पदावरील निवडणुकीला मान्यता देण्यात आली.
१९९८ मध्ये सत्तेत आलेले वाजपेयी सरकार पहिल्या दिवसापासून जयललिता, ममता बॅनर्जी यांच्या ब्लॅकमेलींगमुळे डुगडुगत होते. मंत्रीमंडळाच्या सामुहिक जबाबदारीच्या तत्वाच्या ठिकर्या उडवल्या जात होत्या. दोन केंद्रीय मंत्री-- राम जेठमलानी आणि अण्णा द्रमुकचे एम.थंबीदुराई (सध्याचे लोकसभेचे उपाध्यक्ष) एकमेकांवर जाहिर आरोप करत होते. तर उधमसिंग नगर जिल्हा प्रस्तावित उत्तराखंडमध्ये सामील न करता उत्तर प्रदेशातच ठेवावा म्हणून अकाली दलाने जाहिर दबाव सरकारवर आणला होता. सुरवातीचे ८-९ महिने वाजपेयी सरकार बर्यापैकी अपयशी ठरले होते. कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. या पार्श्वभूमीवर सोनियांनी वाजपेयी सरकारला जोरदार विरोध करणे सुरू केले. नोव्हेंबर १९९८ मध्ये दिल्ली,राजस्थान आणि मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होत्या. त्यापैकी दिल्ली आणि राजस्थानात भाजप सत्ताधारी होता. दिल्लीमध्ये काँग्रेसचे नेतृत्व सांभाळायला शीला दीक्षित या काहीशा विस्मृतीत गेलेल्या नेत्यांना पुढे आणले गेले. २८ नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली तेव्हा काँग्रेसने दिल्लीत ७० पैकी ५३ आणि राजस्थानात २०० पैकी १५१ जागा जिंकून अपूर्व यश मिळवले. मध्य प्रदेशात दिग्विजयसिंगांच्या काँग्रेस सरकारचा पराभव होईल अशी अपेक्षा होती. ९ महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने मध्य प्रदेशात ४० पैकी ३० जागा जिंकल्या होत्या. पण दिग्विजयसिंगांनी परत विजय मिळवून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. या निवडणुकांमधले निकाल म्हणजे लोकांचे वाजपेयी सरकारविरूध्दचेच मत होते असे म्हणायला हरकत नसावी. काँग्रेस पुनरागमन करणार असे वातावरण सोनियांनी निर्माण करायला सुरवात केली होती.
त्यानंतर सोनियांनी वाजपेयी सरकार पाडायचा प्रयत्न सुरू केला. वाजपेयी सरकार डुगडुगत असताना 'सरकार पडल्यास काँग्रेस पर्यायी सरकार द्यायची आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडेल' असे सोनियांनी कित्येकवेळा म्हटले होते. त्याच दरम्यान डिसेंबर १९९८ मध्ये 'वाढत्या असहिष्णुतेचा' आद्य अध्याय सादर करण्यात आला होता. मध्य प्रदेशात झबुआ जिल्ह्यात चार ख्रिस्ती नन्सवर बलात्कार करण्यात आले होते. आणि हा प्रकार ख्रिस्ती मिशनरी सक्तीचे धर्मांतर करतात त्याविरूध्दची प्रतिक्रिया आहे असे पूर्व दिल्लीचे भाजपचे माजी खासदार भंवरलाल शर्मा यांनी म्हटले. डिसेंबर महिन्यात ख्रिस्ती समाजाने ख्रिस्तींच्या प्रार्थनास्थळावर वाढलेल्या हल्ल्यांविरूध्द 'डे ऑफ प्रोटेस्ट' आयोजित केला होता. त्यातच २३ जानेवारी १९९९ रोजी ओरिसात ग्रॅहॅम स्टेन्सची जाळून निर्घृण हत्या झाली. त्यावेळी केंद्र सरकारने मुरली मनोहर जोशी, जॉर्ज फर्नांडिस आणि नवीन पटनायक या तीन केंद्रीय मंत्र्यांना ओरिसामध्ये परिस्थितीचा आढावा घ्यायला पाठवले. त्यावेळी हे मंत्री प्रत्यक्ष घटनास्थळी अर्धा तासही नव्हते आणि त्यानंतर 'या हत्येमागे परकीय शक्तींचा हात आहे' असे त्यांनी जाहीर केले असे पेपरात वाचल्याचे आठवते.
इथपर्यंत सोनियांसाठी सगळे काही ठिक चालू होते. पण नंतर मात्र त्यांनी काही चुका केल्या त्या त्यांना महागात पडल्या. बिहारमध्ये दलितांवर रणबीर सेनेकडून एकामागोमाग दुसरे हल्ले करण्यात येत होते. म्हणून वाजपेयींच्या सरकारने (खरं तर वाजपेयी परदेशी असताना लालकृष्ण अडवाणींच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळाच्या बैठकीत) राबडी देवींचे बिहार सरकार बरखास्त करून राज्यघटनेच्या ३५६ व्या कलमान्वये राष्ट्रपती राजवट जारी केली. बिहारमध्ये दलितांवर हल्ले वाढल्यावर सोनियांनी जाहिरपणे 'राबडी देवींच्या सरकारला सत्तेत राहायचा नैतिक अधिकार राहिलेला नाही' असे म्हटले होते. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रपती राजवटीला समर्थन देईल या अपेक्षेने वाजपेयींनी बिहार सरकार बरखास्त केले खरे. पण नंतर सोनियांनी त्या प्रस्तावाला संसदेत पाठिंबा द्यायचे नाकारले. वाजपेयी सरकारने लोकसभेत हा प्रस्ताव मंजूर करून घेतला पण राज्यसभेत तो प्रस्ताव नामंजूर होणार हे स्पष्ट होते. राज्यसभेत ठराव मतदानाला जाण्यापूर्वी स्वतः वाजपेयी आणि अडवाणींनी सोनियांना प्रस्तावाला पाठिंबा द्यायचे आवाहन केले. पण सोनियांनी ते नाकारले. त्यानंतर काही दुसरा पर्याय नाही हे लक्षात घेऊन वाजपेयी सरकारला बिहारमधील राष्ट्रपती राजवट मागे घेऊन राबडी देवींच्या सरकारची पुनर्स्थापना करावी लागली. एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट जारी करून मग ती मागे घेण्याचा हा पहिलाच प्रकार होता.
त्यानंतर सुब्रमण्यम स्वामींनी वाजपेयी सरकार पाडण्यात पुढाकार घेतला. ३० मार्च १९९९ रोजी स्वामींनी दिल्लीत आयोजित केलेल्या चहा पार्टीमध्ये सोनिया आणि जयललिता दोघीही सामील झाल्या होत्या. त्यावेळी 'लवकरच राजकीय भूकंप होईल' असे विधान जयललितांनी केले. त्यानंतर १४ एप्रिल रोजी जयललितांनी वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. १५ एप्रिल रोजी वाजपेयींनी लोकसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. या ठरावावर १५ आणि १६ एप्रिल अशी दोन दिवस चर्चा झाली. १७ तारखेला वाजपेयींनी चर्चेला उत्तर दिले आणि त्यानंतर ठरावावर मतदान झाले. १६ एप्रिल रोजी रात्री मायावतींचे ठरावावरील चर्चेत भाषण झाले त्यावेळी आपला पक्ष या चर्चेत तटस्थ राहिल असे मायावतींनी जाहिर केले. पण १७ तारखेला सकाळी सोनियांनी मायावतींची भेट घेऊन त्यांना वाजपेयी सरकारविरूध्द मत द्यायचा आग्रह केला. खरं तर मायावती तशाही सरकारविरूध्दच मत देणार होत्या असे नंतर उघडकीस आले पण त्यांच्या कार्यपध्दतीत ससपेन्स ठेवणे हा एक भाग होता त्याप्रमाणे त्यांनी केले. या ठरावावर वाजपेयी सरकार २६९ विरूध्द २७० अशा एका मताने पडले.
वाजपेयी सरकार पडल्यावर लगेचच सोनियांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल अशी अपेक्षा होती. पण त्यात पहिल्यांदा खोडा घातला बंगालमधील डाव्या आघाडीच्या फॉरवर्ड ब्लॉक आणि आर.एस.पी या पक्षांनी. त्यांनी जाहिर केले की आपण भाजपविरूध्द १० वेळा मत देऊ पण काँग्रेसला मत देणार नाही. या दोन पक्षांचे लोकसभेत ६ खासदार होते. राष्ट्रपती नारायणन यांनी १९९८ मध्ये सरकार स्थापन करायला आमंत्रित करण्यापूर्वी वाजपेयींकडून नारायणन यांनी पाठिंब्याची पत्रे मागितली होती. त्यामुळे यावेळीही तसेच करणे त्यांच्यासाठी अगत्याचे झाले. राष्ट्रपतींनीही विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यात मुलायमसिंग यादवांनी (एकूण २१ खासदार) आपण काँग्रेसला पाठिंबा देणार नाही असे राष्ट्रपतींना सांगितले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तसेच सोनियांनी २३३ खासदारांच्या पाठिंब्याची पत्रे सादर केली. जर लोकसभेत एन.डी.ए ला पाठिंबा देणारे २७० खासदार (लोकसभा अध्यक्ष धरून) त्यापेक्षा कमी खासदार असलेल्या कोणत्याही आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करणे राष्ट्रपतींसाठी औचित्याला धरून झाले नसते. शेवटी कोणाचेही सरकार स्थापन होणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर २६ एप्रिल १९९९ रोजी १२ वी लोकसभा बरखास्त करण्यात आली.
आता यापुढील भागात १९९९ च्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतरच्या सोनियांच्या वाटचालीविषयी लिहिणार आहे.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 12/16/2017 - 14:39
नवीन
२६ एप्रिल १९९९ रोजी बारावी लोकसभा बरखास्त करण्यात आली. सोनियांचे सरकार स्थापन करायचे स्वप्न मात्र भंगले. याचा सोनियांना नक्कीच धक्का बसण्यासारखा प्रकार होता. कारण एकतर आपण सरकार स्थापन करू शकतो इतके आकडे आपल्याकडे आहेत की नाही याची पडताळणी न करता वाजपेयींचे सरकार सर्व विरोधकांनी खाली आणल्यामुळे लोकांची सहानुभूती आपोआप वाजपेयींकडे गेली. त्यातही अगदी एकाच मताने सरकार पडल्यामुळे ही सहानुभूती नक्कीच वाढली असे म्हणायला हरकत नसावी.
या धक्क्यातून काँग्रेस पक्ष सावरतो ना सावरतो तोच आणखी एक धक्का काँग्रेसला बसला. ७-८ मे १९९९ च्या आसपास काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवारांनी सोनियांनी त्यांच्या परदेशी झालेल्या जन्मामुळे १३ व्या लोकसभेसाठीच्या निवडणुकांसाठी स्वतःला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहिर करू नये असा आग्रह धरला. १० मे रोजी शरद पवार, पी.ए.संगमा आणि तारीक अन्वर यांनी त्याच अर्थाचे पत्र लिहिले. त्यानंतर सोनियांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहिर केले. मग काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शने करणे, पवार-संगमा-अन्वर यांची पोस्टर फाडणे वगैरे प्रकार झाले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिग्विजय सिंग आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी राजीनामा द्यायची तयारी दर्शवली. त्यानंतर पवार-संगमा-अन्वर यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. काँग्रेसला हा मोठा धक्का होता. कारण काँग्रेसने १९९८ मध्ये महाराष्ट्रातून ३३ जागा जिंकल्या होत्या. पूर्ण देशात जिंकलेल्या जागांच्या जवळपास २५% जागा एकट्या महाराष्ट्रातून पक्षाने जिंकल्या होत्या. पवार पक्षाबाहेर गेल्यामुळे इतर कुठे नाही तरी महाराष्ट्रात मोठा धक्का काँग्रेसला बसू शकणार होता.
या प्रकरणामुळे माजलेली खळबळ थांबते ना थांबते तोच कारगीलमध्ये पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी केल्याचे उघडकीस आले. २६ मे १९९९ पासून भारतीय हवाईदलाने पाकिस्तानी घुसखोरांविरूध्द हवाई हल्ले सुरू केले. खरं तर कारगीलमध्ये पाकिस्तानी सैन्याला घुसू देणे हीच मुळात वाजपेयी सरकारची चूक होती. अशी हालचाल पाकड्यांकडून होत आहे असे पत्र कारगीलमध्ये तैनात असलेल्या एका लष्करी अधिकार्याने वरीष्ठांना पाठवले होते असेही उघडकीस आले आहे. जर ते संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निदर्शनास आणून दिले नसेल तर संबंधित लष्करी अधिकार्यावर कारवाई व्हायला हवी होती. तसे काही झाल्याचे मला तरी माहित नाही. तेव्हा जॉर्ज फर्नांडिस यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणण्यात आली होती असा त्याचा अर्थ होतो का? त्यातच 'अठ्ठेचाळीस तासात घुसखोरांना भारतीय भूमीतून फेकून देऊ' असे जॉर्ज फर्नांडिस म्हणाले होते. प्रत्यक्षात युध्द २ दिवस नाही तर २ महिने चालले होते. थोडक्यात कारगील प्रकरणी वाजपेयी सरकारची नक्कीच चूक होती पण तरीही कारगील युध्दामुळे वाजपेयींची प्रतिमा अधिक खुलून निघाली. तशा प्रकारचे वातावरण निर्माण करण्यात भाजपला यश आले. कारगीलमध्ये पाकिस्तानी घुसखोरांना हाकलल्यानंतर निवडणुकांमध्ये काँग्रेसचा विजय होणे अगदीच दुरापास्त झाले.
१३ व्या लोकसभेसाठी सप्टेंबर-ऑक्टोबर १९९९ मध्ये मतदान झाले. सोनिया अमेठीमधून निवडणुक लढविणार हे स्पष्टच होते. त्याव्यतिरिक्त त्या दुसर्या मतदारसंघातून निवडणुक लढविणार याची कुणकूण भाजपला लागली होती. त्यासाठी त्या अगदी सुरक्षित मतदारसंघ निवडतील ही भाजपची अटकळही खरी ठरली. काँग्रेसचा १९९८ पर्यंत एकदाही पराभव न झालेले दोन मतदारसंघ होते. एक होता कर्नाटकातील बेल्लारी आणि दुसरा होता आंध्र प्रदेशातील कडप्पा. यापैकी एका ठिकाणाहून सोनिया निवडणुक लढवतील हे भाजपने लक्षात घेतले. सोनियांनी उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी कर्नाटकातील बेल्लारीतून अर्ज भरला त्यानंतर भाजपने लगोलग सुषमा स्वराजना तिथे रवाना केले आणि त्यांचाही अर्ज सोनियांविरूध्द भरण्यात आला. सोनियांनी १९९८ पेक्षा जास्त झंझावाती प्रचार १९९९ मध्ये केला. पण कारगील युध्दानंतर वाजपेयींच्या उजळ झालेल्या प्रतिमेपुढे काँग्रेसचे काही चालले नाही. महाराष्ट्रात पवारांच्या राष्ट्रवादीमुळे काँग्रेसने १९९८ च्या तुलनेत २३ जागा गमावल्या. तसेच कारगील लाटेत राजस्थानात ९ जागा गमावल्या. हरियाणात १० पैकी एकही जागा काँग्रेसला जिंकता आली नाही. आंध्र प्रदेशात चंद्रबाबू नायडूंच्या झंझावातामध्ये काँग्रेसने १९९८ च्या तुलनेत १७ जागा गमावल्या. सोनियांनी उत्तर प्रदेशात प्रचारावर खूप भर दिला. १९९८ मध्ये अगदी एकही जागा जिंकता न आल्यामुळे काँग्रेसकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. उत्तर प्रदेशात काँग्रेसने १० जागा जिंकल्या. तसेच भाजपने १९९९ मध्ये जे.एच.पटेल यांच्या जनता दलाच्या गटाबरोबर युती करायचा अनाकलनीय निर्णय घेतला त्यामुळे प्रस्थापितविरोधी मते भाजपकडे जाण्याऐवजी काँग्रेसकडे गेली आणि काँग्रेसने कर्नाटकात विजय मिळवला. १९९९ मध्ये काँग्रेसने ११२ म्हणजे १९९८ पेक्षाही कमी आणि तोपर्यंतची सर्वात वाईट कामगिरी केली.
लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर सोनियांनी वाजपेयी सरकारविरूध्द मोठीच आघाडी उघडली. १९९९ मध्ये भाजपला विजय मिळाला त्यात कारगील युध्दाचा वाटा मोठा होता आणि त्यानंतर भाजपची मते कमी होऊ शकतील हे सोनियांनी ताडले. २००१ मध्ये काँग्रेसने केरळ आणि आसामात विजय मिळवला तर तामिळनाडूत जयललितांबरोबर युती करून विजयी आघाडीत काँग्रेस पक्ष होता. २००२ मध्ये उत्तराखंड आणि पंजाब ही राज्ये काँग्रेसने भाजपकडून जिंकून घेतली तर उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव झाला त्यामुळे भाजपचे बळ नक्कीच कमी झाले होते. पुढे एप्रिल २००२ मध्ये दिल्ली महापालिकेत काँग्रेसने जोरदार विजय मिळवला. डिसेंबर २००२ मध्ये काँग्रेसला गुजरात जिंकण्यात अपयश आले पण मार्च २००३ मध्ये हिमाचलमध्ये भाजपचा आरामात पराभव काँग्रेसने केला. एकूणच भाजप बॅकफूटला गेला होता हे नक्कीच.
डिसेंबर २००३ मध्ये भाजपने मध्य प्रदेश, छत्तिसगड आणि राजस्थानात विजय मिळवला आणि जनमत आपल्या बाजूला वळले आहे असा गैरसमज करून घेऊन सप्टेंबर-ऑक्टोबर २००४ मध्ये होणार्या लोकसभा निवडणुका भाजपने ६ महिने लवकर घ्यायचा निर्णय घेतला. दरम्यान द्रमुक आणि मित्रपक्ष एन.डी.ए मधून बाहेर पडले. त्यांच्याशी युती करायचा काँग्रेसने महत्वाचा निर्णय घेतला. वास्तविकपणे १९९७ मध्ये जैन कमिशनच्या प्रश्नावरून द्रमुकच्या मंत्र्यांना गुजराल सरकारमधून काढा ही मागणी सोनिया समर्थकांनीच केली होती. नंतर जैन कमिशनच्या अंतिम अहवालात द्रमुकला क्लीन चीट दिली गेली होती पण १९९७ मध्ये अशी मागणी करून देशाला मध्यावधी निवडणुकांना सामोरे जायला भाग पाडण्यात आपली चूक झाली याविषयी एका नया पैशाचे स्पष्टीकरण सोनियांच्या काँग्रेसने दिले नाही. आणि भाजपनेही ते कधी मागितले नाही. वास्तविक या मुद्द्यावरून काँग्रेसला पूर्ण भंडावून भाजपला संधी होती. ते का केले नाही हे मला अजूनही कोडेच आहे. सोनियांनी आंध्र प्रदेशात चंद्रशेखर रावांच्या तेलंगण राष्ट्रसमितीबरोबर तर बिहार-झारखंडमध्ये राष्ट्रीय जनता दलाबरोबर युती केली. महाराष्ट्रातही राष्ट्रवादीबरोबर जमवून घेतले. या सगळ्या युत्यांचा काँग्रेसला चांगला परिणाम बघायला मिळाला. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये यु.पी.ए ला २१७ तर एन.डी.ए ला १८५ जागा मिळाल्या. युपीएच्या २१७ पैकी ४० जागा होत्या तामिळनाडू आणि पाँडिचेरीमधल्या. द्रमुकबरोबर युती केल्यामुळे त्या जागा आपसूक युपीएकडे गेल्या. द्रमुकला जाऊ देणे ही भाजपची मोठी चूक ठरली. द्रमुक एन.डी.ए मध्येच असता तर २००४ चा निकाल प्रत्यक्षात लागला त्याच्या उलटा लागला असता (एन.डी.ए २२५ आणि यु.पी.ए १७७).
अनेक जण भाजपच्या २००४ मधील पराभवाचे खापर 'इंडिया शायनिंग' जाहिरातींवर फोडतात. पण माझ्या मते खरे कारण 'इंडिया शायनिंग' नव्हते तर भाजपने युत्या करताना चुका केल्या आणि काँग्रेसने मात्र जिंकणार्या पक्षांशी युत्या केल्या हे होते.
१३ मे २००४ रोजी १४ व्या लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागला. त्याच दिवशी संध्याकाळी वाजपेयींनी राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया पंतप्रधान होतील अशी अटकळ होती. निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर सोनिया राष्ट्रपती कलामांना भेटायला गेल्या त्यापूर्वी आपल्याला पंतप्रधानपद नको असे कोणतेही संकेत सोनियांनी दिले नव्हते. पण कलामांशी भेट घेऊन नंतर काँग्रेस खासदारांच्या बैठकीत त्यांनी आपण आपल्या 'अंतरात्म्याचा आवाज ऐकला' असे म्हणत पंतप्रधानपद नाकारले. त्यामुळे अनेकांनी शक्यता व्यक्त केली की कलामांनी त्यांच्या इटालियन ओरिजिन्सविषयी प्रश्नचिन्ह उभे केले होते म्हणून सोनियांनी हा निर्णय घेतला. नंतर कलामांनी असे काही आपण केले नव्हते हे स्पष्टीकरण आले तरी या वावड्या उठतच राहिल्या. अजूनही उठतातच. मला वाटते की स्वतः पंतप्रधानपद नाकारून सोनियांनी एक जबरदस्त राजकीय खेळी केली. विरोधकांच्या भात्यातील बाणच त्यांनी हे पाऊल उचलून काढून घेतले आणि मनमोहनसिंग हा विरोध न करता येण्यासारखा चेहरा पंतप्रधानपदासाठी दिला. तसेच त्यांना 'सुपर पी.एम' असल्यासारखी सत्ता उपभोगायला मिळाली.
वेळ मिळाल्यास यु.पी.ए सरकारविषयी चौथ्या भागात. वेळ नाही मिळाला तर तीन भागांमध्येच सोनियांच्या राजकीय कारकिर्दीविषयी जे काही लिहायचे होते ते संपवतो.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 12/16/2017 - 14:43
नवीन
गुजरातमधील परिस्थिती आणि एक्झिट पोलचे निकाल यांच्यात तफावत आहे त्यामुळे आपल्याला एक्झिट पोलचे निकाल पटलेले नाहीत असे परखड मत शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
- Log in or register to post comments
ज
जानु
Sun, 12/17/2017 - 11:06
नवीन
यावर उद्याच बोलु...
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Sun, 12/17/2017 - 13:02
नवीन
राजकारणात नवख्या असून सलग 10 वर्षे देशाची सत्ता मिळवणे ही मोठी कामगिरी आहे. यूपीए 1 च्या चांगल्या कामगिरी नंतर यूपीए 2 ची कामगिरी फार वाईट होती. पहिल्या वेळी जागतिक मंदी असून देशातील परिस्थिती नियंत्रणात होती. नंतर भ्रष्टाचारामुळे काँग्रेस खड्ड्यात गेली
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Sun, 12/17/2017 - 14:50
नवीन
जागतिक मंदी पहिल्या करकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आली. तोपर्यंत भारतात रिअल इस्टेट बूम यायला लागले होते, त्यामुळे फारसा प्रोब्लेम आला नाही.
मागची २-३ वर्ष अर्थव्यवस्था खर्या धोकादायक वळणावर आली होती. अजून एक चुकीचे पाऊल आणि कपाळमोक्ष अशी परिस्थिती.
आता हळूहळू सुधारतेय असे वाटतेय. पण अजून माहीत नाही.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »