Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

निश्चलनीकरण सर्वेक्षण

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 11/16/2017 - 15:47
🗣 207 प्रतिसाद
निश्चलीकरण या अत्यंत धाडसी व महत्वाच्या निर्णयाला नुकतेच १ वर्ष पूर्ण झाले. हा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी संध्याकाळी ८ वाजता जाहीर केल्यानंतर देशात प्रचंड खळबळ माजली होती. काळा पैसा बाहेर काढणे, बनावट चलनाला आळा घालणे अशी काही प्रमुख उद्दिष्टे या निर्णयामागे होती असे सांगण्यात आले होते. या निर्णयाला काही जणांनी प्रचंड पाठिंबा दिला तर काही जणांनी कडाडून टीका केली. आज एक वर्षानंतर सुद्धा हेच चित्र कायम आहे. निश्चलीकरणामुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, अनेकांचे प्रचंड नुकसान झाले, देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली, देशाच्या प्रगतीचा वेग मंदावला, अनेक उद्योगधंदे बंद पडले असे दावे अनेकजण करीत असताना या निर्णयामुळे काहीही नुकसान झाले नाही, रोखरहीत व्यवहार वाढल्याने भ्रष्टाचार कमी झाला, बनावट चलन नष्ट झाले, मालमत्ता करासारखी अनेक थकित बिले वसूल झाली, बँकांकडे मोठ्या प्रमाणात चलन जमा झाल्याने व्याजाचे दर कमी झाले इ. दावे या निर्णयाचे समर्थक करीत आहेत. आज एक वर्ष उलटल्यानंतर याच विषयावर मिपांकरांची मते जाणून घ्यावीत या उद्देशाने हे सर्वक्षण करीत आहे. खालील प्रश्नांवर ० ते १० या कक्षेत प्रश्नांचे मूल्यांकन करता येईल. ० गुण = उद्दिष्ट अजिबात साध्य झाले नाही/अजिबात नाही १ गुण = उद्दिष्ट अगदी किंचित प्रमाणात साध्य झाले/अगदी किंचित २ गुण = उद्दिष्ट अगदी थोड्या प्रमाणात साध्य झाले/अगदी थोड्या प्रमाणात . . ५ गुण - अर्धे उद्दिष्ट पूर्ण झाले (किंवा अर्धे उद्दिष्ट अपूर्ण आहे)/मध्यम प्रमाणात . . ८ गुण - उद्दिष्ट बर्‍याच प्रमाणात साध्य झाले/बर्‍याच प्रमाणात ९ गुण - उद्दिष्ट बहुतांशी साध्य झाले/खूप जास्त प्रमाणात १० गुण - उद्दिष्ट पूर्ण साध्य झाले/अत्यंत जास्त प्रमाणात असे गुणांकन करता येईल. गुणांकन करताना फक्त गुण न देता त्याविषयी सविस्तर स्पष्टीकरण, स्वानुभव इ. आकडेवारीनिशी लिहिल्यास जास्त चांगले. प्रश्न १) निश्चलीकरणाची उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली असे तुम्हाला वाटते? प्रश्न २) निश्चलीकरणामुळे तुम्हाला स्वतःला व कुटुंबियांना किती त्रास झाला व नुकसान झाले? प्रश्न ३) निश्चलीकरणामुळे इतरांना किती त्रास झाला व नुकसान झाले? प्रश्न ४) हा निर्णय धाडसी, राजकीय फायदा/तोटा नजरेसमोर न ठेवता केलेला, काळा पैसा बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता का?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 38995 views

🗣 चर्चा (207)
B
babu b Wed, 11/22/2017 - 18:49 नवीन
सारांश - मारुतीच्या बेंबीतील विंचू
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Wed, 11/22/2017 - 20:20 नवीन
सारांश - मारुतीच्या बेंबीतील विंचू अगदी बरोबर.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/23/2017 - 03:40 नवीन
"जीजी रं जीजी रं जीजीजी" (कानावर डावा हात ठेवून आणि उजवा हात पुढे करून) . . . चालू द्या
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 11/23/2017 - 04:32 नवीन
तुम्ही बसा "थंडगार" बेंबी चिवडत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/23/2017 - 09:56 नवीन
आम्ही असल्या तुमच्यासारख्या फालतू गोष्टी करीत नसतो.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 11/21/2017 - 13:10 नवीन
नोटबंदीमुळे एखादा क्ष फायदा झाला असे वाटत असेल तर तोच फायदा नोटबंदी न करता मिळवता आला असता का हे तपासून पाहिले पाहिजे.
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 11/22/2017 - 16:25 नवीन
विरोधी पक्षाला / त्यांच्या जाज्वल्य समर्थकांना पोगो बघण्यातून सवड मिळाली तर हे ही काम करावे. किती दिवस दुसर्‍याच्या ओंजळीने पाणी पिणार..?
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Wed, 11/22/2017 - 16:52 नवीन
प्रश्न २) निश्चलनीकरणामुळे तुम्हाला स्वतःला व कुटुंबियांना किती त्रास झाला व नुकसान झाले? उत्तर: या प्रश्नाच्या उत्तराची गणती (count) करावी. माझे स्वतःचे उत्तर : यत्किंचीतही नाही!!! ज्यांचे उत्तर वेगळे असेल त्यांचे कठोर परीक्षण नक्की होणार.....
  • Log in or register to post comments
M
mayu4u गुरुवार, 11/23/2017 - 07:51 नवीन
बाकी धाग्याचं काश्मीर करणारे नेहमीचे यशस्वी कलाकार गोंधळ घालतायत, तो चालू दे!
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sat, 11/25/2017 - 07:46 नवीन
कोणताही सरकारी निर्णय जेव्हा घेतला जातो तेव्हा त्या त्या निर्णयाचे परिणाम समाजातील वेगवेगळ्या घटकांना कमी जास्त प्रमाणात बसतात. कोणतेही सर्वेक्षण करायचे असेल तेव्हा त्या निर्णयाचा परिणाम सगळ्यात जास्त कुणाला बसला असण्याची शक्यता असेल त्या लोकांना विचारल्यास उत्तम ठरते. मिपावर वावरणारी मंडळी ही स्मार्ट/नेट/पेटीम/क्रेडिट कार्ड वापरणारी जनता आहे. त्यामुळे निश्चलनीकरण केल्याने कुणाला किती त्रास झाला ह्याचे सर्वेक्षण करायचे असेल तर मिपा पेक्षा असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना भेटून जरा कानोसा घेतला असता तर जास्त उत्तम माहिती मिळाली असती. जसे की ह्या निर्णयाचा फटका असंघटीत क्षेत्रातील लोकांना बसून त्यांचे रोजगार गेले असे निश्चलनीकरनाचे विरोधक म्हणतात. मग हे असंघटित क्षेत्रातील लोकांचे मत जाणून घ्यायचे असेल तर काय करता येईल? तर उदाहरण द्यायचे झाल्यास पुण्यासारख्या शहरात नाक्यानाक्यावर उभे असणारे मजूर (उदा. वारजे फ्लायओव्हर, कोथरूड मधील किनारा हॉटेल परिसर, हडपसर मधील भाजी मंडई समोरील फ्लायओव्हर खाली) ह्यांच्याकडे जाऊन चौकशी करावी. रस्त्याच्या बाजूला दिवसभर हाताने चरक फिरवून ऊसाचा रस काढून देणारी लोक असतात त्यांना विचारावे किंवा एखाद्या हॉटेल मध्ये चहा प्यायला जावे आणि चहा पिता पिता फडके मारणाऱ्या किंवा कपबश्या उचलणाऱ्या व्यक्तीला सहज चौकशी केल्यासारखे विचारावे. माहिती अशी समाजात मिसळून घ्यावी. कारण असे असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक मिपा किंवा अन्य कुठल्याही संस्थळावर असतील असे वाटत नाही. मिपावर धागा काढून फक्त समर्थक आणि विरोधक ह्यांच्यातील कलगीतुरा सोडला तर जास्त काही हाती लागणार नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 11/29/2017 - 10:57 नवीन
निश्चलीकरण या महत्त्वाच्या निर्णयाच्या एक वर्षानंतर निदान मिपाकरांची तरी या विषयावर मते जाणून घ्यावी या उद्देशाने हा धागा काढला होता. काही जणांनी सविस्तर मत देण्याबरोबर प्रश्नांचे ० - १० या कक्षेत रेटिंग दिले, तर काही जणांनी प्रश्नांना रेटिंग न देता फक्त सविस्तर मत व्यक्त केले. धाग्यात व्यक्त झालेल्या मतांचा सारांश खालीलप्रमाणे - प्रश्न १) निश्चलीकरणाची उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली असे तुम्हाला वाटते? फारच थोड्या प्रतिसादकांनी रेटिंग दिले आहे. या प्रश्नाचे सरासरी रेटिंग ६.१ आहे. इतर मते अशी आहेत - - अतिरेकी, नक्षलवादी कारवायांमध्ये लक्षणीय घट, सामान्य माणसांना विशेष त्रास झाला नाही, अर्धे उद्दिष्ट अपूर्ण आहे पण उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली - काळ्या पैशाबद्दल जो अंदाज बांधला होता त्यामुसार सुमारे २-3 लाख कोटी पर्यंत काळा पैसा येणार असे सांगितलं जात होत. प्रत्यक्षात फक्त काही हजार कोटी पैसा बँकामध्ये आला नाही! नोटबंदी मध्ये आता पर्यंतचा मोठा भ्रष्टाचार झालाय! आणि तो इतक्या मोठ्या प्रमाणात विखुरलाय कि छाननी करणे पण कठीण आहे! आणि जर "अंदाज खोटा होता" मानलं तर मुख्य उद्दिष्टच फसलेले दिसत. म्हणजे सगळ्या देशाला उगीच वेठीला धरलं गेलं! - पैसे छपाई, वितरण, ATM यंत्र कॅलिब्रेशन फक्त यात भरपूर खर्च झाला - २००० च्या नवीन नोटेची बनावट नोट लगेच बाजारात आली, त्यामुळे बनावट चलन नष्ट करणे हा उद्देश फसला. - निश्चलीकरणामुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली, जीडीपी कमी झाला. - उ प्र निवडणुकांमध्ये पैसे वाटले जाण्याचा प्रकार बंद करणे व त्यायोगे सपा/बसपा ची कोंडी करून विधान सभेत विजय मिळवणे हे भाजप चे मुख्य उद्दिष्ट असावे. हे उद्दिष्ट सफल झाले आहेच. - निश्चलनीकरणाची उद्दिष्टे बऱ्यापैकी साध्य झाली. काळा पैसा जमा करणाऱ्यांच्या छातीत धडकी भरली आहे. सरकारी अधिकारी जे पैसे खात होते ते तसेच खात राहणार आहेत. व्यावसायिक जे औरस उत्पन्नावर कर भरत नव्हते. ते सध्या तरी भीतीमुळे का होईना आपले उत्पन्न जास्त दाखवायला लागले आहेत. - सरकारने कुठेही अधिक्रुत उद्दिष्टे सान्गितली नाहीत तरी रोख व्यवहार कमी करणे असेल तर ते साध्य झाले - १५.४४ लाख करोड पैश्यापैकी १५.२७ लाख करोड जरी परत आला तरी , १५.४४ लाख करोड मधील बरेच समान्तर अर्थव्यवस्थेत होते , ते बैन्किन्ग प्रणाली मध्ये नव्हते आता १५.२७ बैन्किन्ग प्रणाली मध्ये आले. १,३८,१६५ लोकान्नी जवळपास ४,९२,२०७,०० लाख करोड जमा केले, म्हणजे जमा झालेल्या पैश्याच्या १/३ हिस्सा. १७.७३ लाख सन्दिध्द व्यवहार सापडले. डिजिटल व्यवहारान्मध्ये लक्षणीय वाढ, स्वच्छ अर्थव्यवस्थेला सुरूवात. - नोटाबंदीचा एक काही निश्चित उद्देश जाणवत नाही. लहान मुले क्रिकेट खेळतांना खेळता खेळता अनेक नियम बदलतात. उदा: एक टप्पा आउट असा काही नियम मधेच सुचतो. किंवा चौकार मारल्याची सीमारेषा ही नसून ती होती; इ.इ.. मला नोटाबंदीचा खेळ आणि त्याचे उद्दिष्टे याप्रमाणे जाणवतात. किमान आमच्या अर्थमंत्र्यांनी एकदा नेमकी उद्दिष्टांची यादी आणावी म्हणजे त्यांना जरी समजले तरीही आमच्या सारख्या सामान्य जनतेला समजणे सोपे जाईल. - मुद्दलात उद्दिष्टे कोणती होती हेच माहित नसेल तर या प्रश्नाचे उत्तर कसे देणार? - मोदींनी तो जाहीर करताना सांगितलेल्या तीन उद्दिष्टांवरच त्याचे मूल्यमापन व्हायला हवे. त्या तीनही उद्दिष्टांमध्ये फारसे यश मिळाल्याचे दिसले नाही. (जवळजवळ शून्य यश मिळाले आहे). - काळा पैसा, समांतर अर्थव्यवस्था यांच्या विरोधात सरकारने उचलेल्या एकूण १८-२० पावलांपैकी निश्चलनीकरण हे एक होते. सामान्य जनतेने गैरसोय सहन करून नोटबंदीला पाठींबा दिला, म्हणून इतर कोणत्याही योजनेला विरोध करायला कोणाला जागा उरली नाही. काळ्या पैश्यामुळे समांतर अर्थव्यवस्थेत व्यवहार व्ह्यायला लिक्विडिटी राहते. ९९% पैसा पांढरा झाल्याने समांतर अर्थव्यवस्थेची भयंकर गोची झाली आहे. अगदी समांतर अर्थव्यवस्थेच्या मूळ अर्थव्यवस्थेशी असलेल्या सिनर्जीवर देखील परिणाम झाला आहे प्रश्न २) निश्चलीकरणामुळे तुम्हाला स्वतःला व कुटुंबियांना किती त्रास झाला व नुकसान झाले? फक्त एकानेच या प्रश्नाला रेटिंग दिले असून ते शून्य आहे. - अजिबात त्रास झाला नाही - फारसा त्रास झाला नाही - शून्य त्रास झाला - मला किंवा कुटुंबाला काहीच त्रास झाला नाही. - बराच कमी, इन्टरनेट बान्किन्ग, कार्ड मुळे त्रास झाला नाही. - फार नाही. - घरातली सगळीच कामे जानेवारीपर्यंत पोस्टपोन करावी लागली. रांगेत ४-५ तास थांबावे लागले. - यत्किंचीतही नाही!!! प्रश्न ३) निश्चलीकरणामुळे इतरांना किती त्रास झाला व नुकसान झाले? फक्त एकानेच या प्रश्नाला रेटिंग दिले असून ते शून्य आहे. - परिचितांपैकी कुणालाच नाही. - निश्चलनीकरणामुळे सामान्य माणसांना थोडे दिवस त्रास झाला परंतु असामान्य माणसांना आपले औरस किंवा अनौरस उत्पन्न दडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागले आणि आजही इकडम तिकडम केले ते पकडले जाईल हि डेमोक्लीसची तलवार त्यांच्या डोक्यावर टांगती आहेच. - नोटाबंदीच्या काळात राज्यातील काही जि.म.बॅंकांना संशयास्पद व्यवहारामुळे नोटा बदलून देण्यास बंदी घातली होती त्यामुळे बँकाच्या ग्राहकांचे अतोनात हाल झाले. अद्याप ह्या बँकांकडील बाद झालेल्या नोटा RBI ने बदलून दिल्या नसल्याने ह्या बँकांचे नेहमीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. राज्यसरकार राजकारण खेळत असल्याने सामान्य ठेवीदारांचे पैसे अडकून पडले आहे. शेतकऱ्यांना नवीन कर्जही मिळाले नाही आणि बँकेतील स्वतःचे पैसेही मिळण्याचे मार्ग बंद असल्याने त्याची आर्थिक कोंडी झाली आहे. नोटाबंदिमुळे कारण नसताना ग्रामीण भागातील जनतेला हा त्रास भोगावा लागतोय. - राजकिय पक्ष , त्यान्चे कार्यकर्ते विरोधाला विरोध करतात कारण ते काळ्या अर्थव्यवस्थेतले एक घटक आहेत. ज्यान्च्या कडे बेहिशोबी पैसा आहे अश्या लोकान्ची स्थिती फारच बिकट झाली. सहन करता येत नाही आणि सान्गता येत नाही. - भरपूर नुकसान झाले, खासकरून ग्रामीण विभागात. गावातल्या महिलांनी अडीअडचणीला डब्ब्यात पैसे जमवून ठेवलेले नाईलाजाने डब्ब्याच्या बाहेर काढावे लागले. अनेक घरातील "कर्त्या" पुरुषांना "काळेधन" म्हणजे हेच याचा साक्षात्कार झाला. त्यातील काही घरी काश्मीर इतका नव्हे पण हिंसाचार झाला. बऱ्याच महिलांनी या मारहाणीची कुठेही तक्रार केली नाही. तेंव्हा बऱ्याच "कर्त्या" मंडळी "राष्ट्रउभारणी" साठी अशी मारहाणही करावी लागते आणि सहन करावी लागते असेही म्हणाले. एटीएम च्या रांगेत ज्या १०० जणांचा मृत्यू झाला. काही जण या ५०० च्या नोटा बँकेत घेऊन गेले आणि जे गेले ५००/- रुपये भरण्यासाठी जाण्यायेण्याचा खर्च सरासरी रु. १५०/- दुपारच्च चहापाणी किंवा नाश्ता / जेवण १००/- .शिवाय त्यादिवशीची १५०/- ची मजुरी बुडाली. रु. ५००/- भरायला ४००/- चा खर्च! - ज्या प्रकारच्या व्यवहारात लोक कॅशच वापरत आले आहेत तिथे नक्कीच त्रास झाला असावा असे वाटते - प्रॉपर्टीचे काळे पैसे (पांढरे पैसे काळे करायला) देणारास सॉलिड प्रॉब्लेम झाला. बायकोच्या एका मैत्रिणाला नेमकी त्याच दिवशी भिषीची ८० हजार का कैतरी कॅश मिळाली नि तिची तारांबळ उडाली. प्रश्न ४) हा निर्णय धाडसी, राजकीय फायदा/तोटा नजरेसमोर न ठेवता केलेला, काळा पैसा बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता का? ० - धाडसी परंतु राजकीय दृष्ट्या धोकादायक निर्णय - होय - निर्णय धाडसी होताच. नंतर अनेकदा नियम बदलले गेले, हा गोंधळ टाळायला हवा होता. नवीन चलन वापरात आणण्याची गरज नव्हती. - स्वतःची राजकीय कारकीर्द पणाला लावून आणि ज्यात कोणताही स्वार्थ नसताना श्री मोदी यांनी हे पाऊल उचलले ते पूर्ण यशस्वी होणार नाही सुद्धा. पण एक नेता इतका धाडसी निर्णय घेऊ शकतो( भले अनेक लोकांना टोकाचा किंवा मूर्खपणाचा वाटतो) हे कौतुकास्पद आहे. आणि UPA २ च्या धोरण लकव्याच्या पार्श्वभूमीवर तर अधिकच ठळकपणे उठून दिसतो. हि केवळ अर्थ क्रांती नसून "नैतिक" क्रांती आहे. - एक मतदार म्हणून माझ्या नेत्याचा अभिमानच वाटला. सकृतदर्शनी कोणताही वैयक्तिक लाभ नसताना एवढा महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेणे नक्किच सोपे नाही. आणि निर्णय माझा पंतप्रधान घेतो आहे, त्याचा रबरस्टँप केलेला नाही. - अत्यन्त धाडसी निर्णय. मोदीन्नी चाकोरीबध्द दाम्भिक राजकारणाला, अर्थकारणाला छेद दिला, स्वतःची राजकिय कारकिर्द पणाला लावली. काळा पैसा आणणे किन्वा नवीन तयार होऊ नये यासाठीचा हा प्रामाणिक प्रयत्न होता. - ख्रिसमस मधे सांता खरोखरच असतो असे लहान मुलांना वाटणे आणि नोटाबंदी यशस्वी झाली असे अनेक प्रौढांना वाटणे; यात फरक कसा करावा उमगत नाही. शिवाय हा प्रयत्न प्रमाणिकच होता अशा आशयाच्या गोबेल्स जाहिराती याच पुरावा असल्यामुळे अजून काय पुरावा देणार? - धाडसी आणि राजकीय फायदा-तोटा नजरेसमोर न ठेवता घेतलेला निर्णय होता हे नक्की. त्या निर्णयामागची उद्दिष्टे माहित नसतील तर तो काळा पैसा बाहेर काढायचा प्रामाणिक प्रयत्न होता की नाही हे सांगता येणार नाही. - प्रामाणिक? अर्थातच. धाडसी? या करिता मोदिंचा ऋणी आहे. ____________________________________________________________________________________________________ " निश्चलीकरणाची उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली असे तुम्हाला वाटते?" या प्रश्नावर दोन्ही बाजूने परस्परविरोधी मते व्यक्त झाली आहेत. निश्चलीकरणामुळे स्वतःला व कुटुंबियांना अत्यल्प किंवा अजिबात त्रास झाला नाही असे बहुतेकांचे मत आहे. "निश्चलीकरणामुळे इतरांना किती त्रास झाला व नुकसान झाले?" या प्रश्नावर देखील परस्परविरोधी मते व्यक्त झाली आहेत, परंतु त्यात स्वानुभवाधारीत मते फारशी नसून केवळ माध्यमांवर विसंबून मत दिले आहे असे जाणविते. "हा निर्णय धाडसी, राजकीय फायदा/तोटा नजरेसमोर न ठेवता केलेला, काळा पैसा बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता का?" या प्रश्नाला बहुतेकांनी होकारार्थी उत्तर दिले आहे. इति सारांशसीमा! -
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 11/29/2017 - 15:32 नवीन
प्रश्न १) निश्चलीकरणाची उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली असे तुम्हाला वाटते? सगळ्या , देशव्यापी उद्दिष्टांबद्दल मला माहित नाही. माझ्यापुरतं बोलताना महागाई / आयकराचे दर कमी झाले तर उद्दिष्टे साध्य झाली असे मी म्हणेन. अजून तसे काही दिसत नाही. काही प्रमाणात दुकानदार /व्यापारी जे पुर्वी क्रेडिट कार्ड वा पेटीएम ने व्यहवार करत नव्हते ते आता करु लागलेत. पेटीमचा व्यहवार हा माझ्याकरिता पर्यायाने क्रेडीट कार्डचाच व्यहवार आहे, त्यामुळे मला कमी रोकड जवळ तसेच बचत खात्यात बाळगून चालते. पर्यायाने मला गुंतवणू़कीवरील अधिक व्याजाचा , तसेच क्रेडिटकार्डावरील पॉइंट्सचा लाभ होतो. या लाभांमुळे मी वरील ३ गुण दिले आहेत. प्रश्न २) निश्चलीकरणामुळे तुम्हाला स्वतःला व कुटुंबियांना किती त्रास झाला व नुकसान झाले? होय. त्रास झाला. ATM च्या रांगेत अनेकदा उभे रहावे लागले. अर्थात नोटांबदीच्या निर्णयापेक्षा त्याची ढिसाळ अंमलबजाववणी यास कारणीभूत आहे. प्रश्न ३) निश्चलीकरणामुळे इतरांना किती त्रास झाला व नुकसान झाले? इतरांच्या त्रासाशी मला काही देणे घेणे नाही. प्रश्न ४) हा निर्णय धाडसी, राजकीय फायदा/तोटा नजरेसमोर न ठेवता केलेला, काळा पैसा बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता का? मला माहित नाही. मला काही देणे घेणे नाही.
  • Log in or register to post comments
B
babu b गुरुवार, 12/07/2017 - 05:05 नवीन
पेटीएम फुकट असते का ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 12/07/2017 - 05:53 नवीन
हो फुकट आहे
  • Log in or register to post comments
B
babu b गुरुवार, 12/07/2017 - 09:35 नवीन
अग्गोबै ! फुकट उद्योग करतात . मग जेवतात कसे ?
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 12/07/2017 - 09:52 नवीन
वापरणार्‍याला फुकट असलं म्हणजे झालं.. त्यांनी कसं जेवायचं हा त्यांचा प्रश्न आहे... तुम्ही पेटीएम वापरलं नसेल कदाचित पण टीव्हीवर काही फ्री दिसणारे चॅनेल्स असतातच त्याबद्दल तर माहित असेल ना ..एकदाच त्याकरिताची डिश आणि सेट टॉप बॉक्स (साधारण दोन हजार रुपये फक्त) घेवून आयुष्यभर फुकट बघता येतात.. आणि या डिश / सेट टॉप बॉक्सच्या किंमतीतलेही काहीही पैसे त्या चॅनेलवाल्यांना मिळत नाहीत इतकं नक्की
  • Log in or register to post comments
थ
थॉर माणूस Tue, 12/12/2017 - 20:19 नवीन
ते मॉडेल वेगळं आहे. फ्री टू एअर वाहिन्यांचे उत्पन्न जाहीरातींवर अवलंबून असते. पेटीएम ट्रँजॅक्शन चार्जेस वर चालते बहूतेक. जोवर पैसे पेटीएम वॉलेटमधे आहेत तोवर ठीक आहे, पण ते तुम्ही तुमच्या बँक अकाऊंटवर नेण्याचा प्रयत्न केलात तर चार्जेस लागतील. अर्थात हे अत्यंत बेसिक स्पष्टीकरण आहे, त्यांचे बिजनेस मॉडेल गेटवे कमीशन, मार्केटप्लेस कमीशन, एकूण युजर्सच्या वॉलेटमधे आलेल्या पैशांची पुनर्गुंतवणूक करणे, पेमेंट बँक अशा अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. - "There ain't no such thing as a free lunch"
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 12/13/2017 - 15:59 नवीन
पैसे तुमच्या बँक अकाऊंटवर नेण्याचा प्रयत्न केलात तर चार्जेस लागत नाहीत. पे टी एम वर अनेक जाहिराती ( नोटिफिकेशन द्वारे) दाखवल्या जातात त्याच्या उत्पन्नातून ते आपला खर्च चालवतात. ज्यादिवशी त्यांनी चार्ज लावायला सुरुवात केली त्यादिवसापासून लोक त्यांना टाटा करतील. हे त्यांनाही माहित आहे. रच्याकने --गुगल फेसबुक व्हॉट्स ऍप फुकट कसे चालवतात. चंपाबाईनी त्यांना जेवता कसे हा प्रश्न विचारला नाही? निश्चलनीकरणाबद्दल काहीही आले कि त्यांचे डोळे पिवळे होतात.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 12/13/2017 - 18:19 नवीन
चंपाबाईनी त्यांना जेवता कसे हा प्रश्न विचारला नाही? निश्चलनीकरणाबद्दल काहीही आले कि त्यांचे डोळे पिवळे होतात. फक्त डोळेच पिवळे होतात?
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 12/13/2017 - 18:30 नवीन
पेटीएम टू अकाउंट ट्रान्सफरला ट्रान्सफर फी आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 12/14/2017 - 04:50 नवीन
पेटीएम ची स्वतःची बँक आहे तिथे पैसे वळवायला फी नाही पण तुमच्या दुसऱ्या बँकेच्या अकाउंट मध्ये टाकायचे असतील तर नाममात्र फी आहे.
  • Log in or register to post comments
थ
थॉर माणूस Wed, 12/13/2017 - 21:02 नवीन
(Update with effect from April, 2017: The fee to transfer money to your bank account will continue to be 0% for merchants and change to 2% for customers.) मी वर म्हटल्याप्रमाणे पेटीएम चे मॉडेल अनेक गोष्टींवर अवलंबून आहे, फक्त एका गोष्टीवर नाही. गुगल, फेसबूक जाहीराती आणि गोळा केलेल्या माहितीमधून पैसे कमावतात (data is new oil) त्यापलीकडे सुद्धा इतर अनेक गोष्टी आहेतच (मार्केटप्लेस चार्जेस, ट्रँजॅक्शन्स, शॉपिंग, गेम्स इ. अनेक). व्हाट्सअ‍ॅपचे स्पेसिफीक रेव्हेन्यू मॉडेल नाही. फेसबूकने त्यांना ते ज्या प्रमाणात डेटा गोळा करत होते ते पाहून खरेदी केले होते. सध्या एंड टू एंड एन्क्रिप्शन मुळे त्यांना चॅट डेटा मिळवता येत नाही असे म्हणतात, तरी यूजर डेटा फेसबूकला मिळतो. त्याशिवाय फेसबूक कॉर्पोरेट चॅट प्लॅटफॉर्म म्हणून व्हाट्सअ‍ॅपला पुढे करण्याच्या तयारीत आहे बहूतेक, तिथून थोडा रेव्हेन्यू जनरेट होऊ शकेल.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 12/14/2017 - 08:50 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 12/15/2017 - 12:56 नवीन
पेटीएम वापरणार्‍या व्यापार्‍याला काय चार्जेस पडतात त्याचा विचार मी करत बसणार नाही....त्याला ते पैसे बँक अकाउंटमध्ये न्यायला पैसे पडतात का ? पडतही असतील कदाचित. मला काय करायचंय.. जर त्याला परवडत असेल तर तो मला पेटीएम ने पेमेंट करु देईल नाहीतर 'नाहीये पेटीएम' असं नम्रपणे (!!) सांगेल.. किंवा कदाचित "पेटीएम वापरणार असेल तर वर अजून अमूक इतके चार्जेस पडतील " असंही तितक्याच नम्रपणे सांगू शकेल. जर अधिकचे चार्जेस असतील तर पेटीएम वापरायचं की नाही हे मी ठरवेन. बाकी मला ते पैसे बँक अकाउंटमध्ये नेण्याची गरजच पडत नाही. मुळात मी गरजेप्रमाणे थोडे थोडेच पैसे पेटीएममध्ये आणतो. मग जी सुविधा मी वापरत नाही त्याकरिता किती चार्जेस आहेत किंवा कसे त्याचा विचार मी कशाला करु... मला एखाद्या वस्तू/सेवाकरिता पेटीएम वापरुन वा रोख पैशांतही सारखाच खर्च येतो. पेटीएम वाले जेवतात की नाही , असल्यास कसे त्याच्याशी मला देणं घेणं नाही. पण एक निरीक्षण आहे की अनेक दुकानदार कुठलाही अधिकचा भार न लावता पेटीएमने पैसे स्वीकारतात तेव्हा त्यांना किती भार लागत असेल हा एक प्रश्नच आहे.. यात आमच्या ऑफिसच्या कॅन्टीनमधले विक्रेते, ऑफिसबाहेरील एक टपरीवाला, एक औषध दुकानदार (हा मला औषधाच्या मुळ किमतीवर म्हणजे GST ज्या किमतीवर लागते त्या किमतीवर १०% सूटही देतो), न्हावी (सलून) ई येतात. [टीप : मी मोदीभक्त वगैरे नाही..]
  • Log in or register to post comments
B
babu b Fri, 12/15/2017 - 14:35 नवीन
कॅश खरेदी विक्री होती तेंव्हा विक्रेता , खरेदीदार दोघनाही कसले चार्जेस नव्हते. आता पेटी एम आले. त्यात म्हणे खरेदीदारावर चार्ज नाही. विक्रेत्याला चार्ज लागतोच ना ? मग विक्रेता तो खरेदीदाराकडून वसूल करत असेलच ना? की मोदींच्या प्रेमापोटी स्वतःचे मार्जिन जाळून उद्योग करतो ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 12/15/2017 - 14:45 नवीन
बाबू भि. मी स्वतः ८ नोव्हेंबर२०१६ च्या अगोदर पासून पेटीएम वापरतो आहे आणि गेले एक वर्षपेशा जास्त माझ्या रुग्णांकडून त्याद्वारे पैसे घेतो आहे. त्यासाठी रुग्णांना कोणताही भुर्दंड पडत नाही कि मला स्वतःला एक दमडी भरायला लागलेली नाही. या आलेल्या पैशातून मी माझी विजेची, गॅसची टेलिफोन आणि मोबाईलची बिले भरतो. जेथे पाहिजे तेथे पेटीएमने पैसे हि भरतो उदा. उबर टॅक्सीसाठी. पेटीएमचा स्वतःचा अकाउंट आहे ज्याला एक संलग्न असे डेबिट कार्डही मला फुकट मिळाले आहे. त्यातून मी पैसे खर्च करतो. पेटीएम अकाउंट मध्ये पॅसीए भरायला किंवा काढायला एक दमडीहि लागत नाही. याचा बँकेसारखा वर्षाचा आवक जावकचा हिशेबही(अकाउंट पासबुक) मी आयकर खात्याला सादर केला आहे आणि माझा आयकर रिटर्नही पस होऊन आला आहे. ज्या गोष्टीचा आपल्याला अनुभव नाही त्याबद्दल फुकटच्या पिचक्या टाकण्याची सवय सोडून द्या. केवळ मोदींद्वेष म्हणून काहीही लिहायचे.
  • Log in or register to post comments
B
babu b Fri, 12/15/2017 - 20:12 नवीन
साखर कारखान्यागत प्रकरण दिसते आहे. साखर कारखान्यात मुलाना नेले की त्याना वाट्टेल तितकी साखर खाणे फुकट असते. पण साखर घरी न्यायची तर मात्र वजन करुन विकतच घ्यावी लागते. एकाने दुसर्याच्या पेटीएमात भरले की दोघाना चार्जेस नाहीत. पण तिथून कोणत्याही बॅंकेत ट्रान्सफर करायचे तर काहीतरी चार्जेस लागतच असतील. पेटीएम बॅंक / डेबिट कार्ड असले तरी बाकीची ब्यान्क अकाउंटही वापरणारच ना ? त्यात पैसा नको ? की सगळे पैसे फक्त पेटीएमात ठेवून फक्त पेटीएम टू पेटीएमच करायचे ? व्यवसायातून दोनचार लाख कमावून पेटीएमात पडले शिल्लक , की कुठेतरी एफ् डी , घराचा हप्ता , पोस्टात पैसे टाकायला ते दुसर्या खात्यावर फिरवावे लागतीलच ना ? तेंव्ह तरी transaction charges जात असतील ना ? नेटवर पेटीएम चार्जेस असे गुगलले की कसले कसले चार्जेस येत आहेत.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 12/16/2017 - 11:19 नवीन
तुमचा प्रॉब्लेम नक्की काय आहे? कॅशलेस व्यवहार कि पेटीएम? पेटीएम वर चार्जेस लागत असतील वापरू नका ना, त्यात काय एवढे. यूपीआय वापरा!
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Sun, 12/17/2017 - 19:59 नवीन
आणि वापरुन बघण्याऐवजी ते उगाच तारे तोडत बसलेयत... पेटीएम चा वापर = मोदीभक्ती असं नवीन समीकरणही मांडत आहेत.. असो.. चालू देत..
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Mon, 12/18/2017 - 07:23 नवीन
प्रिय बाबू साहेब, पेटीएमच्या सर्व ग्राहकांचे जे एकत्रित डिपॉझीट आहे (त्याला बँकिंगमधे फ्लोट म्हणतात) त्यावरचे व्याज हाच त्यांचा धंदा.
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन गुरुवार, 12/07/2017 - 06:54 नवीन
हो.
  • Log in or register to post comments
B
babu b Sun, 12/10/2017 - 05:29 नवीन
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/45-indians-paid-bribe-in-past-one-year-survey/articleshow/62005624.cms नोटाबंदीनंतरही देशात ४५ टक्के लाचखोरी
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 12/14/2017 - 07:18 नवीन
नोटबंदी अयशस्वी झाली म्हणतात देशात लाचखोरीचा पैसाच नव्हता म्हणायचं, आणि नंतर पुन्हा अयशस्वी झाली म्हणताना भ्रष्टाचाराचं प्रचंड प्रमाण तितकंच राहिलं आहे असं म्हणायचं. पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं वाटतं.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 12/14/2017 - 08:05 नवीन
काळा पैसा नव्हता असं कोणी म्हणत नव्हते, उलट सरकारच्या बिनडोक निर्णयाला धूप न घालता काळा पैसेवाल्यांनी आपला पैसा विविध मार्गाने बँकेत जमा केला. आता सरकार अशा आयते जाळ्यात सापडलेल्यांना पकडणार आहे म्हणे. थोडेफार सापडतील, परंतू बरेचसे पळून जातील किंवा आयुष्यभर गुंगारा देत बसतील. सरकारचा घाम काढणार हे नक्की.नवीन काळा पैसा निर्मितीही व्यवस्थीत चालू आहे त्यामुळे सरकारला नवीन मूर्खपणा करायलाही बराच वाव आहे. सरकारला अपयशाच्या आगाऊ शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 12/14/2017 - 08:41 नवीन
मा.गो.
निर्णयाला धूप न घालता काळा पैसेवाल्यांनी आपला पैसा विविध मार्गाने बँकेत जमा केला.
नेमकं हेच तर लक्ष्य होतं नोटाबंदीचं. एकदा का काळा पैसा बँकेत दाखल झाला की तो काळा रहात नाही. कारण त्याची नोंद झालेली असते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 12/14/2017 - 09:53 नवीन
उलट सरकारच्या बिनडोक निर्णयाला धूप न घालता काळा पैसेवाल्यांनी आपला पैसा विविध मार्गाने बँकेत जमा केला.
असं कसं म्हणता येईल? उलट अख्ख्या जगात ही सर्वात जलद, गुप्त, कमी काळाची नोटबंदी आहे. या पेक्षाही कठोर नोटबंदी केली असती तर तुम्ही किती कांगावा केला असता. एवढी आरामदायक नोटबंदी केली तरी तुम्ही ते तुमचे सुप्रसिद्ध बांबूचे फोक घेऊन पंतप्रधानांच्या पार्श्वभागावर हाणायला तावातावाने निघाला होता हे विसरलात का? काही लोकांनी तर १२५ लोकांच्या मर्डरची रेअरेस्ट ऑफ द रेअर केस त्यांच्यावर लावली. ------------------------ निर्णयाला बिनडोक शब्द वापरायचा बिनडोकपणा करू नका काळे पैसे होते हे मान्य असेल तर? अंमलबजावणीत नक्की काय चुकलं? तुम्ही कशी केली असती. ---------------------------- नोटबंदीच्या काळात जनधन खात्यांमधे किती पैसा वाढला मैतंय? आता हा पैसा ज्या गरीबांनी पांढरा करून दिला http://www.thehindubusinessline.com/money-and-banking/number-of-jan-dhan-acs-rose-by-226-crore-after-note-ban/article9565923.ece (बघा मी कसा डावड्या पेपरांच्या लिंका देत असतो. आकड्यांसाठी) २.२५ कोटी नविन खाती उघडली गेली. एका खात्यात लाख रु म्हटले तरी नोटबंदीचे उद्दीष्ट परिपूर्ण होते ना? सरकारने या खात्यांत जमा करायची राशी ५० हजार पेक्षा कमी असा नियम नोटबंदित केला. २२ कोटींपैकी १३ कोटी खात्यांत नोटबंदी पूर्वी खडकू नव्हता. आज अशी खाती ४ कोटी च्या आसपास आहेत. ============================= नोटबंदी अचानक (त्यात अचानक काय म्हणा) झिरो बॅलॅन्स खात्यांत वाढ झालेली. =============== सरकार असं अधिकृतपणे म्हणू शकत नाही, पण गरीबांच्या खात्यात थोडे पैसे टाकायचं काम झालेलं आहे. ============================================================================================ नोटबंदी १००% काळा पैसा मिटवण्यात १००% यशस्वी झाली असती तर अर्थव्यवस्था पूर्णतः बसलीच असती. काळी आणि पांढरी अर्थव्यवस्था बहीणी बहीणी आहेत. त्यांचं प्रमाण इथं निलाजरं होतं. काळ्या अर्थव्यस्थेला देखील चलायला तेच चलन लागतं. नोटबंदीनं पांढर्‍या अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होत नाही (तत्कालिक सोडला तर). नोटबंदी मंजे फक्त काळ्या अर्थव्यवस्थेच्या शेपटावर ठेवलेलं पाउल आहे.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 12/14/2017 - 11:57 नवीन
एवढी आरामदायक नोटबंदी केली तरी तुम्ही ते तुमचे सुप्रसिद्ध बांबूचे फोक घेऊन पंतप्रधानांच्या पार्श्वभागावर हाणायला तावातावाने निघाला होता हे विसरलात का? हे असं मी कधी म्हटले आहे? आणि अशी कृती करून तुमच्या जिभेच्या आवडत्या कामात अडथळा आणयाची माझी तर अजिबात इच्छा नाही.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 12/14/2017 - 12:32 नवीन
http://www.misalpav.com/node/41032
इथे
कुठलाही मागचा पुढचा विचार न करता(कधी करता?) ८ नोव्हें. २०१६ ला नोटाबंदीची घोषणा केली. काळा पैसा,खोट्या नोटा, दहशतवाद नष्ट करण्याचं ब्रम्हास्त्र सोडल्याचे तुम्ही घोषित केले. दोन दिवसात तुम्हाला कळाले, की ते ब्रम्हास्त्र नसून बुमरँग आहे. नोटा बदलायला लोकांना बँकांसमोर रांगा लावाव्या लागल्या, त्यात अनेक जणांचे प्राण गेले. लोकांचा विरोध वाढत गेला... ३१ डिसेंबरपर्यंत सगळे सुरळीत झाले नाही तर तुम्ही सांगाल त्या चौकात मी शिक्षा भोगायला तयार आहे असे जनतेला भावनीक आवाहन केले. (मी तर पोकळ बांबू घेवून तयारच होतो). पण कसचं काय , ३१ तारखेनंतरही गोंधळ चालूच होता आणि तुम्ही जनतेपासून तोड लपवत होता.
तुम्ही केलीय ना इच्छा व्यक्त पंतप्रधानांना हाणण्याची? ========================================================
तुमच्या जिभेच्या आवडत्या कामात अडथळा
माझ्या जिभेचं आवडतं बडबडणं चालूच आहे. त्यात तुमच्यासारखे अडथळा आणूच शकत नाहीत. --------------- बाकी आत्ता कळलं तो पुरो-द्धारक राहुल सारख्या सारख्या बाह्या का मागे सारत असतो, का दमलेला असतो, का लग्न करत नाही. काय सवयी लावून ठेवल्यात म्हणावं!
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 12/14/2017 - 15:49 नवीन
ह्यात मी 'पार्श्वभाग ' असा उल्लेख केल्याचे तुम्हाला कुठे आढळले? की तुमच्या जिभेला लावलेल्या चाटवणाचाच उल्लेख तुमच्याकडून आपोआप टंकला जातो? देशाच्या पंतप्रधानांचा आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नसावा ,नाहीतर त्यांनी असा फिल्मी डायलॉग मारला नसता. आणि खरोखरच जरी ते असे चौकात प्रायश्चित्त घ्यायला उभे राहिले असते तरी मी त्यांना शारिरीक किंवा कोणतीच शिक्षा करू शकलो नसतो, कारण तसा मला कायदेशीर अधिकारच नाही. हां! शाब्दिक फटकारे नक्कीच मारले असते. एखाद्याचे विचार पटले नाही तर त्याला शारिरीक शिक्षा देण्याची परंपरा असलेलेच असे निष्कर्ष काढू शकतात. बाकी आत्ता कळलं तो पुरो-द्धारक राहुल सारख्या सारख्या बाह्या का मागे सारत असतो, का दमलेला असतो, का लग्न करत नाही. काय सवयी लावून ठेवल्यात म्हणावं! हे मला कशाला सांगताय? माझा काय संबंध त्या व्यक्तीशी? कोण काय हस्तव्यवसाय करतोय ह्याच्याशी मला काही देणेघेणे नाही.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 12/14/2017 - 18:20 नवीन
ह्यात मी 'पार्श्वभाग ' असा उल्लेख केल्याचे तुम्हाला कुठे आढळले?
ह्यात तुम्ही पार्श्वभाग सोडून उरलेले मोदी असं लिहिलं आहे का? अता खोटं का बोलताय? सारवासारव का करताय?
की तुमच्या जिभेला लावलेल्या चाटवणाचाच उल्लेख तुमच्याकडून आपोआप टंकला जातो?
???? तुमच्याकडच्या पाककृती आम्हाला नै ठाऊक.
देशाच्या पंतप्रधानांचा आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नसावा ,नाहीतर त्यांनी असा फिल्मी डायलॉग मारला नसता.
अहो ती बोलायची पद्धत आहे. न्यायव्यवस्थे पेक्षा अजून लोकांकडून वरचा मार खाईन असं म्हणायचं होतं.
आणि खरोखरच जरी ते असे चौकात प्रायश्चित्त घ्यायला उभे राहिले असते तरी मी त्यांना शारिरीक किंवा कोणतीच शिक्षा करू शकलो नसतो, कारण तसा मला कायदेशीर अधिकारच नाही.
पोकळ बांबू स्वतःच्याच काही कामासाठी घेतला होता का मग?
एखाद्याचे विचार पटले नाही तर त्याला शारिरीक शिक्षा देण्याची परंपरा असलेलेच असे निष्कर्ष काढू शकतात.
"भर चौकात मला हाणा", "माझी धिंड काढा" हे सामान्य वाक्प्रचार आहेत. चौकात पोकळ बांबू घेऊन थांबणे हा वाक्प्रच्चार नाही. त्यामुळं प्रकटन करताना तुमची मानसिकता काय होती हे प्रामाणिकपणे सांगा
कोण काय हस्तव्यवसाय करतोय ह्याच्याशी मला काही देणेघेणे नाही.
काऊंटरपार्टिला कसं काय देणं घेणं नाही?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 12/14/2017 - 18:42 नवीन
एकापाठोपाठ एक टाकलेल्या तुमच्या उसळत्या चेंडूंमुळे मागो पार शेकून निघालेत.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 12/14/2017 - 18:59 नवीन
नाय नाय गुरुजी, मला काही श्रेय नाही घेता येणार. शेकून काढणारे पोकळ बांबू मला रिमोट कंट्रोलनी नाय वापरता येत. त्यासाठी पुरोगामी आत्मप्रेरणाच लागते.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Fri, 12/15/2017 - 07:29 नवीन
एकापाठोपाठ एक टाकलेल्या तुमच्या उसळत्या चेंडूंमुळे मागो पार शेकून निघालेत. गोलंदाज षटकात सगळेच चेंडू स्वैरपणे उसळते टाकू लागला आणी तुमच्या सारखा बावचळलेला यष्टीरक्षक असल्यास चेंडू सोडुन दिल्यास हमखास चौकार मिळत असताना शेकून घेण्याचा प्रश्नच येत नाही. हां! चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात तुम्ही तोंडावर पडून माती आणि दात तुमच्या घश्यात जात असेल तर त्यात नवीन काही नाही, त्याची तुम्हाला सवयच आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 12/15/2017 - 09:38 नवीन
चालू द्यात स्वप्नकुंथन . . . अजो धावत येतील, पुन्हा एक उसळता चेंडू टाकतील, मग मी चेंडू सोडून देईन, यष्टीरक्षकसुद्धा चेंडू सोडून देईल आणि चौकार मिळेल . . . या स्वप्नरंजनात मग्न असतानाच पुन्हा एकदा अजोंचा उसळता चेंडू येतो आणि पुन्हा एकदा कानफाट शेकून निघते, चेंडू फानफाटावर इतक्या जोरात आदळतो की मागो खाली कोसळतात व माती घशात जाते. दात मात्र घशात जात नाहीत, कारण आधीच्या चेंडूने सगळे दात आधीच घशात गेलेले असतात आणि नाक गॅटिंगच्या नाकासारखे झालेले असते. पंच एकंदर परिस्थिती बघून पॅव्हेलियनकडे बघून खूण करतात आणि ग्राऊंड स्टाफ घाईघाईत स्ट्रेचर घेऊन पळतपळत येतात . . .
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Fri, 12/15/2017 - 11:00 नवीन
चालू द्यात स्वप्नकुंथन . . . अजो धावत येतील, पुन्हा एक उसळता चेंडू टाकतील, मग मी चेंडू सोडून देईन, यष्टीरक्षकसुद्धा चेंडू सोडून देईल आणि चौकार मिळेल . . . या स्वप्नरंजनात मग्न असतानाच पुन्हा एकदा अजोंचा उसळता चेंडू येतो आणि पुन्हा एकदा कानफाट शेकून निघते, तुमचा पार्टनर कबूल करतोय "चला, आमची बॉलिंग, विकेट किपिंग चूकीची. मान्य आहे." कोण स्वप्नरंजन करतय ते दिसतेय. तशीही तुम्हाला तोंडावर आपटून घ्यायची सवय आहेच म्हणा.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 12/15/2017 - 11:05 नवीन
पुरोगाम्यांचं तोंड शेकाटलेलं दिसलं की आम्ही फक्त मजा बघतो. शेकाटल्यानंतर फलंदाजाची समजूत काढायची असते हे समजलेलं दिसत नाही. इतक्या वेळा शेकाटल्यानंतर सुन्नपणा आलेला दिसतोय. असो. ब्याट आणायची सोडून पोकळ बांबू घेऊन फलंदाजीला का आला होता हे पण त्यांनी विचारलंय. त्याचं उत्तर कधी देणार?
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Fri, 12/15/2017 - 11:11 नवीन
कोण पुरोगामी? आणि मला असा आसूरी आनंद घ्यायला आवडतही नाही, कीव येते.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Fri, 12/15/2017 - 11:17 नवीन
तुमचा पार्टनर कबूल करतोय "चला, आमची बॉलिंग, विकेट किपिंग चूकीची. मान्य आहे."
मूळात बॅटींगसाठी ते सुप्रसिद्ध पोकळ बांबूचे फोक टाकून देऊन एक छानपैकी बॅट घेऊन या असं मला तुम्हाला म्हणायचं होतं. ते तुम्ही केलेलं दिसत नाही.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Fri, 12/15/2017 - 09:41 नवीन
चला, आमची बॉलिंग, विकेट किपिंग चूकीची. मान्य आहे. पण तुम्ही सुप्रसिद्ध पोकळ बांबूच्या फोकाने बॅटींग का करत असता ते आधी सांगा.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 12/15/2017 - 09:50 नवीन
हहपुवा. तळाच्या फलंदाजांवर उसळते चेंडू सोडायचे नसतात असा एक संकेत आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 10 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 10 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 10 hours ago
  • सुंदर !!
    3 days 10 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 10 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा