Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

निश्चलनीकरण सर्वेक्षण

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 11/16/2017 - 15:47
🗣 207 प्रतिसाद
निश्चलीकरण या अत्यंत धाडसी व महत्वाच्या निर्णयाला नुकतेच १ वर्ष पूर्ण झाले. हा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी संध्याकाळी ८ वाजता जाहीर केल्यानंतर देशात प्रचंड खळबळ माजली होती. काळा पैसा बाहेर काढणे, बनावट चलनाला आळा घालणे अशी काही प्रमुख उद्दिष्टे या निर्णयामागे होती असे सांगण्यात आले होते. या निर्णयाला काही जणांनी प्रचंड पाठिंबा दिला तर काही जणांनी कडाडून टीका केली. आज एक वर्षानंतर सुद्धा हेच चित्र कायम आहे. निश्चलीकरणामुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, अनेकांचे प्रचंड नुकसान झाले, देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली, देशाच्या प्रगतीचा वेग मंदावला, अनेक उद्योगधंदे बंद पडले असे दावे अनेकजण करीत असताना या निर्णयामुळे काहीही नुकसान झाले नाही, रोखरहीत व्यवहार वाढल्याने भ्रष्टाचार कमी झाला, बनावट चलन नष्ट झाले, मालमत्ता करासारखी अनेक थकित बिले वसूल झाली, बँकांकडे मोठ्या प्रमाणात चलन जमा झाल्याने व्याजाचे दर कमी झाले इ. दावे या निर्णयाचे समर्थक करीत आहेत. आज एक वर्ष उलटल्यानंतर याच विषयावर मिपांकरांची मते जाणून घ्यावीत या उद्देशाने हे सर्वक्षण करीत आहे. खालील प्रश्नांवर ० ते १० या कक्षेत प्रश्नांचे मूल्यांकन करता येईल. ० गुण = उद्दिष्ट अजिबात साध्य झाले नाही/अजिबात नाही १ गुण = उद्दिष्ट अगदी किंचित प्रमाणात साध्य झाले/अगदी किंचित २ गुण = उद्दिष्ट अगदी थोड्या प्रमाणात साध्य झाले/अगदी थोड्या प्रमाणात . . ५ गुण - अर्धे उद्दिष्ट पूर्ण झाले (किंवा अर्धे उद्दिष्ट अपूर्ण आहे)/मध्यम प्रमाणात . . ८ गुण - उद्दिष्ट बर्‍याच प्रमाणात साध्य झाले/बर्‍याच प्रमाणात ९ गुण - उद्दिष्ट बहुतांशी साध्य झाले/खूप जास्त प्रमाणात १० गुण - उद्दिष्ट पूर्ण साध्य झाले/अत्यंत जास्त प्रमाणात असे गुणांकन करता येईल. गुणांकन करताना फक्त गुण न देता त्याविषयी सविस्तर स्पष्टीकरण, स्वानुभव इ. आकडेवारीनिशी लिहिल्यास जास्त चांगले. प्रश्न १) निश्चलीकरणाची उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली असे तुम्हाला वाटते? प्रश्न २) निश्चलीकरणामुळे तुम्हाला स्वतःला व कुटुंबियांना किती त्रास झाला व नुकसान झाले? प्रश्न ३) निश्चलीकरणामुळे इतरांना किती त्रास झाला व नुकसान झाले? प्रश्न ४) हा निर्णय धाडसी, राजकीय फायदा/तोटा नजरेसमोर न ठेवता केलेला, काळा पैसा बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता का?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 38995 views

🗣 चर्चा (207)
D
Duishen Fri, 11/17/2017 - 13:04 नवीन
प्रश्न १) निश्चलीकरणाची उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली असे तुम्हाला वाटते? 17 Nov 2017 - 1:04 am | शब्दबम्बाळ जी म्हणतात त्या प्रमाणे मलाही जाणवते. नोटाबंदीचा एक काही निश्चित उद्देश जाणवत नाही. लहान मुले क्रिकेट खेळतांना खेळता खेळता अनेक नियम बदलतात. उदा: एक टप्पा आउट असा काही नियम मधेच सुचतो. किंवा चौकार मारल्याची सीमारेषा ही नसून ती होती; इ.इ.. मला नोटाबंदीचा खेळ आणि त्याचे उद्दिष्टे याप्रमाणे जाणवतात. किमान आमच्या अर्थमंत्र्यांनी एकदा नेमकी उद्दिष्टांची यादी आणावी म्हणजे त्यांना जरी समजले तरीही आमच्या सारख्या सामान्य जनतेला समजणे सोपे जाईल. त्यामुळे तूर्तास गुण शून्य! प्रश्न २) निश्चलीकरणामुळे तुम्हाला स्वतःला व कुटुंबियांना किती त्रास झाला व नुकसान झाले? प्रश्न ३) निश्चलीकरणामुळे इतरांना किती त्रास झाला व नुकसान झाले? कुटुंबाची व्याख्या माझ्यासाठी अख्खा भारत आहे. पण महाराष्ट्रातील रहिवासी असल्यामुळे आणि महाराष्ट्रातील माझी भटकंती बघता मी महाराष्ट्र असं कुटुंबाची व्याख्या करतो. उर्वरित राज्यातील कुटुंबांना नातेवाईकांच्या श्रेणीत टाकतो. भरपूर नुकसान झाले, श्रीगुरुजी! खासकरून ग्रामीण विभागात. गावातल्या महिलांनी अडीअडचणीला डब्ब्यात पैसे जमवून ठेवलेले. नरेगावर काम करून किंवा शेतमजुरी करून जमवलेले हे पैसे कधी कधी ५००/- च्या नोटेत बदलून घेतलेले. नाईलाजाने डब्ब्याच्या बाहेर काढावे लागले. अनेक घरातील "कर्त्या" पुरुषांना "काळेधन" म्हणजे हेच याचा साक्षात्कार झाला. त्यातील काही घरी काश्मीर इतका नव्हे पण हिंसाचार झाला. बऱ्याच महिलांनी; श्रीगुरुजी, तुम्ही न वाचलेली मनुस्मृती (जी परंपरेने डोक्यात भरवली आहे...) ती आठवून या मारहाणीची कुठेही तक्रार केली नाही. तेंव्हा बऱ्याच "कर्त्या" मंडळी "राष्ट्रउभारणी" साठी अशी मारहाणही करावी लागते आणि सहन करावी लागते असेही म्हणाले. एटीएम च्या रांगेत ज्या १०० जणांचा मृत्यू झाला ते भारतीय कुटुंबातील नाहीत की काय अशी शंका येते. त्यांच्या मृत्यूने नुकसान झाले की नाही यावर काही नोटबंदी समर्थक मगरीचे अश्रू ढाळण्यापलीकडे काही करू शकले असे नाही. कदाचित हे नुकसान नसावे. बर, काही जण या ५०० च्या नोटा बँकेत घेऊन गेले. ग्रामीण भागात बुलेट ट्रेन असल्यामुळे दळणवळण सोय-सुविधा तसेच रस्ते सुविधा ही अमेरिकेच्या रस्त्यांशी बरोबरी करणारी! रोजच्या एस.टी.महामंडळ नावाच्या बुलेट ट्रेनने तालुक्याच्या ठिकाणी गेले. ...आणि जे गेले ५००/- रुपये भरण्यासाठी जाण्यायेण्याचा खर्च सरासरी रु. १५०/- दुपारच्च चहापाणी किंवा नाश्ता / जेवण १००/- .शिवाय त्यादिवशीची १५०/- ची मजुरी बुडाली. रु. ५००/- भरायला ४००/- चा खर्च! काही जण किमान १००/- रु वाचले या आनंदात तर काही महाभाग आपण राष्ट्रउभारणी करण्यात आणि "काळेधन" जमा करण्यात इतके आनंदी झाले की उरलेल्या ५०/- १००/- शुद्ध देशी घेतली... छान, रम्य दिवस होते ते! ग्रामीण महिलांशी चर्चा करतांना गरिबीची रेखा आणि वेगवेगळ्या अहवालावर बोललो त्यांनी अहवाल मागितले मला वाटलं त्यांना वाचायचा असेल तर त्या म्हणाल्या जेंव्हा कधी घरात धान येईल त्यावेळेस हा अहवाल चुलीत सरपण म्हणून तरी वापरते (बहुतेक सबसिडीचा गॅस.पोहोचला नसावा आणि पोहोचला तरी नवीन सिलेंडर भरून घेण्याची क्रयशक्ती किंवा मजुरी मिळत नाही). अजून काही असे नोटाबंदी यशस्वी झाल्याचे अहवाल असल्यास कृपया ग्रामीण भागात पाठवावे. अन्न नसल्यामुळे नुसतीच चूल पेटवून फायदा नाही पण किमान थंडीचे दिवस चालू आहेत तेंव्हा शेकोटी पेटवता येईल. एव्हडे म्हटल्यावर आता किती गुण द्यावे बरं! दोन्ही प्रश्नांच्या गुणांसाठी मार्क्स शून्य! प्रश्न ४) हा निर्णय धाडसी, राजकीय फायदा/तोटा नजरेसमोर न ठेवता केलेला, काळा पैसा बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता का? जिथे भाकरीचा प्रश्नही राजकीयच असतो तिथे सत्तास्थानातील लोकांनी घेतलेला निर्णय अराजकीय असू शकेल? ...आणि सध्याचे राजकारण नि:स्वार्थी आहे यावर विश्वास ठेवण्यास काय वाव! ख्रिसमस मधे सांता खरोखरच असतो असे लहान मुलांना वाटणे आणि नोटाबंदी यशस्वी झाली असे अनेक प्रौढांना वाटणे; यात फरक कसा करावा उमगत नाही. शिवाय हा प्रयत्न प्रमाणिकच होता अशा आशयाच्या गोबेल्स जाहिराती याच पुरावा असल्यामुळे अजून काय पुरावा देणार? मार्क्स शून्य!
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 11/17/2017 - 14:45 नवीन
Duishen, तुमच्या विवेचनाचं प्रतिबिंब उत्तरप्रदेशांतल्या निवडणुकीत दिसून येत नाही. उत्तरप्रदेशातल्या जनतेला वरील विवेचन पटणारं नाही. महाराष्ट्रातल्या जनतेस तरी का पटावं? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
D
Duishen Fri, 11/17/2017 - 16:32 नवीन
गामाजी, त्याकाळात उत्तर प्रदेशात भटकंती झाली नाही. पण अनेक लेख सूचित करतात की मध्यम आणि गरीब व्यापाराचे नुकसान झाले. जर कदाचित स्वानुभव सांगा असे श्रीगुरुजींनी नमूद केले नसते तर मी अहवाल आधार म्हणून घेतला असता. अहवालांवरही चर्चा होऊ शकते. हा स्वानुभव असल्यामुळे तो इतरांना पटवा अथवा इतरांनी पटवून घ्यावा यासाठी मुळीच दिलेला नाही. तो जसा आहे तसा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित त्याच काळात इतर कुणी ग्रामीण भागात फिरले असेल तर त्याचा अनुभव वेगळा असू शकेल. उत्तर प्रदेशात भाजपला ३९.७% मते मिळाली याचा अर्थ ६०.३% भाजपा विरोधात होती. आपल्या तर्काने मी विचार केल्यास ६०.३% नोटाबंदीविरोधात होती. त्यामुळे मी किंवा आपण उत्तर प्रदेशच्या जनतेला वेगळे काही पटवून द्यावे असे नाही. जर उत्तर प्रदेशचा विजय गृहीत धरला तर नांदेडमधील नुकत्याच झालेल्या निवडणुकांचा आणि कॉंग्रसच्या विजयाचा देखील विचार करावा लागेल.
  • Log in or register to post comments
अ
अभिदेश Fri, 11/17/2017 - 21:47 नवीन
कोणत्या पक्षास आणि किती वेळा 50 % पेक्षा जास्त मत मिळाली आहेत ? अगदी १९५१च्या पहिल्या निवडणुकीत सुद्धा कौंग्रेसला ४५ % मिळाली. तेव्हा जागे व्हा आणि थोडा अभ्यास वाढवा. https://en.wikipedia.org/wiki/Elections_in_India
  • Log in or register to post comments
D
Duishen Fri, 11/17/2017 - 22:41 नवीन
मी जागृत (Awake ) असल्यामुळे जागा असणे हे महत्त्वाचे ठरत नाही. कारण अनेक व्यक्ती जागे असूनही "निद्रिस्त" असत्तात किंवा झोपेचे सोंग आणतात. लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. लिंक दिली नसती तरीही मतदान किती होते आणि किती मार्जिनने निवडणुका जिंकल्या गेल्या याचे साधारण वाचन आहे. नकळतपणे आपण माझ्या मुद्द्याला पाठींबा दिलात. निवडणुकीतील विजय म्हणजे सरकारने आखलेल्या धोरणांचा विजय असतो असा माझा तरी नक्कीच बाळबोध समज नाही. त्यामुळे युपी मधील भाजपचा विजय हा नोटबंदी या धोरणाचा विजय आहे असेही मनात नाही. हाच तर्क मी गामाजीच्या प्रतिसादात देत होतो. १९५१ चा उल्लेख केल्यामुळे सांगतो- त्या काळातही सक्षम विरोधी पक्ष नव्हता पेक्षा विरोधी पक्ष सक्षमपणे होण्याची किंवा एकत्र येण्याची वेळ म्हणजे आणीबाणीचा हुकूमशाही काळ! म्हणजे १९५१ ते आणीबाणीचा काळ यामध्ये दुसऱ्या एखाद्या सक्षम राष्ट्रीय पक्षाचे नाव चटकन नजरेसमोर तरी येईल का? अभिदेश जी, एक छोटी विनंती! अभ्यासकाने मूळ स्त्रोत उपलब्ध असतांना असे मूळ स्त्रोत देणे आवश्यक आहे. हे अभ्यासकाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. उदा: इलेक्शन कमिशनची वेबसाईट. जर मूळ स्त्रोत उपलब्ध नसेल तर विकी सारखे दुय्यम स्त्रोत चालतो पण तोही अनेक जागी शंकास्पद ठरू शकतो. कृपया खुद्द विकिपीडियाचे Disclaimer वाचावे.
  • Log in or register to post comments
अ
अभिदेश Fri, 11/17/2017 - 22:52 नवीन
चुकीची आहे असे आपले म्हणणे आहे का ? राहाता राहिला प्रश्न नोटबंदीला पाठिंबा होता कि नव्हता , भारतामध्ये निवडणुकांमध्ये ह्या कोणाला किती टक्के मते मिळाली ह्यानुसार ठरत नाहीत तर कोणाला किती जागा मिळाल्या ह्यावर ठरतात , त्यामुळे जर कोणत्या पक्षाला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर लोकांना त्या पक्षाची भूमिका मान्य आहे असेच समजावे लागेल. हे आपल्या सारख्या अभ्यासू आणि जागृत व्यक्तीला माहित नाही हे पाहून खेद वाटला.
  • Log in or register to post comments
D
Duishen Fri, 11/17/2017 - 23:52 नवीन
टक्केवारी चुकीची आहे असे मी म्हणालो नाही. कृपया प्रतिसाद पुन्हा वाचावा. प्रतिसाद असा आहे - "अभ्यासकाने मूळ स्त्रोत उपलब्ध असतांना असे मूळ स्त्रोत देणे आवश्यक आहे. हे अभ्यासकाचे व्यवच्छेदक लक्षण आहे". आणि आपण अभ्यासक असल्यामुळे हे जाणता असा माझा विश्वास आहे. १९८४ ला कॉंग्रेसला जो अभूतपूर्व विजय मिळाला होता तो नेमक्या कुठल्या भुमिकेमुळे? कारण तेव्हड्या जागा ना खुद्द कॉंग्रेसला कधी पूर्वी किंवा नंतर मिळाल्या ना इतर पक्षाला आजतागायत मिळाल्या! त्यानंतरचे दशक ते २०१४ पर्यंत दोन प्रकारच्या कडेबोळांनी चालवले. एक कडबोळ म्हणजे यु.पी.ए. आणि दुसरे कडबोळ म्हणजे एन.डी.ए. जनतेला जर खरोखरच भूमिका मान्य आहेत असे गृहीत धरले तरीही मग सत्तापिपासुंनी सत्ता मिळविण्यासाठी जे प्रकार केले (म्हणजे कडेबोळे तयार करण्याचे...) त्याला भूमिकेची मान्यता असे म्हणता येईल का? शिवाय आपले एक विधान आवडले - "... तर लोकांना त्या पक्षाची भूमिका मान्य आहे असेच समजावे लागेल." हे वाक्य मनोमन पटले. समजावे लागेल. म्हणजे गृहीत धरावे लागेल. जे समजले ते सत्यच असेल असे नाही. किंवा जो समज आहे तो सत्य असलाच पाहिजे असे नाही. उदा: अमेरिकेची जनता लिंगसमभाव मनात नाही असा माझा समज कारण तिथे ट्रम्प सारखी व्यक्ती निवडून आली. किंवा बराक ओबामा निवडून आले म्हणजे अमेरिकन जनता ही वंशभेदी नाही असा माझा समज आहे. पण माझा समज म्हणजे सत्यता असलीच पाहिजे बंधन नाही. ते केवळ माझ्यासाठी सत्य असू शकेल. अमेरिकन जनतेसाठी नाही.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Fri, 11/17/2017 - 16:03 नवीन
नोटाबंदीचा एक काही निश्चित उद्देश जाणवत नाही.
तसं तुम्ही पक्के सरकारद्वेष्टे असल्यामुळे ९ नोव्हेंबर रोजी प्रकाशित झालेल्या सरकारी प्रेस इंफॉर्मेशन ब्यूरो वर विश्वास ठेवत नसणार. म्हणून तुमच्यापेक्षा जास्त द्वेष्टे असलेल्या स्क्रोलची लिंक देत आहे. यात उद्दिष्टे होती असं लिहिलं आहे. https://scroll.in/article/849159/failed-objectives-rbi-report-has-demolished-the-government-s-many-claims-about-demonetisation ================= अर्थातच केवळ उद्दिष्टे असण्याला मार्क नसतात हे मान्य आहेच, पण मानसिकता किती निगेटिव असावी याला मर्यादा असावी म्हणतो.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Fri, 11/17/2017 - 16:09 नवीन
http://pib.nic.in/newsite/PrintRelease.aspx?relid=153403 ------------------
  • Log in or register to post comments
D
Duishen Fri, 11/17/2017 - 17:48 नवीन
कुठलेही सत्तास्थान मिळवायचे असले की द्वेष उपयोगचा ठरतो. कुणी सत्तेसाठी घर सोडतं तर कुणी सत्यासाठी! सत्यासाठी घर सोडलेल्यांवर दोन्ही बाजूने "द्वेषाचा" आरोप स्वाभाविक आहे. शेवटी एकाद्याने दिलेली भेट अथवा आरोप दोन्ही स्वीकारायचे की नाही हा त्या त्या व्यक्तीच्या स्वभाव विशेषांवर अवलंबून आहे.त्यामुळे दिलेली भेट घेतलीच पाहिजे असे काही बंधन नाही. जी भेट अथवा आरोप घेतलाच नाही तो देणाऱ्या व्यक्तीच्याच हातात / मनात राहून जातो. शिवाय राग, लोभ, द्वेष याप्रकारच्या षडरीपुंवर विजय मिळवावा असे वाक्य सर्व माणसांना लागू आहे. माझा तर प्रयत्न चालूच आहे. आता मुद्द्याकडे वळू! लिंक वाचली. यापूर्वीही वाचली होती. माझ्या प्रतिसादात मी "नोटाबंदीचा एक काही निश्चित उद्देश जाणवत नाही." असे वाक्य वापरले. मी असे म्हटलेले नाही की नोटाबंदी उद्देशहीन होती. माझे इतकेच म्हणणे आहे की सरकारच्या वतीने जे जे उद्देश म्हणून वेळोवेळी सांगितल्या गेले आहे त्यामुळे "एक काही निश्चित उद्देश जाणवत नाही." आता मला निश्चित उद्देश जाणवला नाही म्हणून जर माझी मानसिकता निगेटिव्ह ठरत असेल तर ते तुमचे मत! मत व्यक्त केल्याबाबत धन्यवाद! ज्या महिलांनी नोटाबंदी मुळे डब्ब्यातील साठवलेले पैसे बाहेर काढले आणि घरगुती (शारीरिक/ मानसिक) हिंसाचाराला सामोरे गेले त्यांना मी "मानसिकता किती निगेटिव असावी याला मर्यादा असावी म्हणतो" असे म्हणू शकत नाही. किंवा त्याकाळात ज्यांची मजुरी बुडाली आणि दुसऱ्या दिवशीची चूल पेटली नाही त्यानाही मी "मानसिकता किती निगेटिव असावी याला मर्यादा असावी म्हणतो" असे म्हणू शकत नाही. ज्याचे छोटे-मोठे व्यापार बुडाले त्यांनाही मी "मानसिकता किती निगेटिव असावी याला मर्यादा असावी म्हणतो" असे म्हणू शकत नाही. किंवा जर जे व्यक्ती एटीएम च्या रांगेत असतांना मृत्यू पावले त्यांचा घरच्यांनाही मी "मानसिकता किती निगेटिव असावी याला मर्यादा असावी म्हणतो" असे म्हणू नाही शकतं!
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Fri, 11/17/2017 - 18:08 नवीन
मी लग्न केलं आहे. लग्न करायचा माझा एक काही निश्चित उद्देश नव्हता. लग्न करून मी अत्यंत सुखी आहे. न केलं असतं तर नसतो, कोणतंही एक निश्चित उद्दिष्ट सांगता येत नसूनही मी माझ्या लग्नाला उद्दिष्टपूर्ण (आणि पूर्णौद्मानतो)) मानतो. असो. ============= काळा पैसा हो, काळा पैसा! बिनबापाचा पैसा.
  • Log in or register to post comments
D
Duishen Sat, 11/18/2017 - 00:15 नवीन
अजून एक अनुभव नमूद करावा वाटतो. त्याकाळात बऱ्याच लग्नांचा शुभमुहूर्त टळला किंवा काही कुटुंबांना भयंकर त्रासातून जावे लागले अशा बातम्या पहिल्या.त्याकाळात सुमुहूर्त आहे असे म्हणणारे सगळेच ज्योतिष चुकले असावेत का! आमच्याही एका मित्राचे लग्न लांबले. खरतर ज्योतिषांनी त्याला सुमुर्ह्त काढून दिला होता. आम्ही मित्र त्यावेळेस ऑक्टोबर मधे जमणार होतो. त्यामुळे त्याला ऑक्टोबरमधे लग्न कर असे सुचविले. पण त्याने मित्रांच्या सल्ल्याऐवजी ज्योतिषाचा सल्ला ऐकला. नोटाबंदी नावाच्या राहुने त्याचा सुमुहुर्ताचा सूर्य गिळंकृत केला. त्यानंतर त्याने मे महिन्यात कुठलाही मुहूर्त न बघता लग्न केले. सुखी आहे सध्या!
  • Log in or register to post comments
ए
एमी Sat, 11/18/2017 - 06:00 नवीन
प्रतिसाद आवडला. नोटबंदीनंतर मराठी आंजावर एवढ्या चर्चा झालेल्या पण त्यात कुठेच या 'गाडग्या-मडक्यात, डब्ब्यात किडूकमिडूक जमा करून ठेवणाऱ्या बायकां' बद्दल एकही वाक्य वाचल्याच आठवत नाहीय. वर्षानुवर्षे जमा केलेली पुंजी एका फटक्यात मातीमोल झालीच + पुढे मारहाण सहन करावी लागली ते वेगळंच....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 11/18/2017 - 07:00 नवीन
पुंजी मातीमोल झाली ?????????
  • Log in or register to post comments
स
सिंथेटिक जिनियस Fri, 11/17/2017 - 13:58 नवीन
देशाचा पंतप्रधान असले फालतु निर्णय घेतो या वरुन गुजरातमध्ये का दम निघतोय ते कळत आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 11/17/2017 - 14:42 नवीन
सिंजि, गुजरातेत दम निघतोय, तर मग उत्तरप्रदेशांत निघालं ते काय होतं? नोताबंदी तिथेही झाली होती ना? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 11/17/2017 - 14:43 नवीन
‌
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Fri, 11/17/2017 - 16:13 नवीन
कारणे: १. प्रत्येक नोटेला बाप मिळाला. २. जर पूर्वी १००० रु चे काम १०० इतक्या मूल्याच्या च्या नोटांत चालायचे तर नोटबंदी नंतर १०५० रु चे काम ७० रु चालत आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Fri, 11/17/2017 - 16:48 नवीन
नोटबंदीवर आपल्यासारख्यांनी भाष्य करणे म्हणजे आंधळ्यांनी हत्ती कसा आहे यावर भाष्य करण्यासारखे आहे हे मागच्या वर्षी म्हटले होते आणि आजही मला तसेच वाटते. या निर्णयामागे नक्की काय विचार होता, उद्दिष्टे काय होती, इतर कोणते घटक निर्णयप्रक्रीयेत होते या सगळ्या गोष्टी माहित नसतील तर त्यावर कोणतेही (अनुकूल/प्रतिकूल) भाष्य करणे म्हणजे आंधळ्यांनी हत्तीचे वर्णन करण्यासारखेच आहे. तरीही निर्णयाची अंमलबजावणी मात्र पूर्ण गंडलेली होती हे नोटबंदीच्या निर्णयानंतर दीड महिना झाल्यानंतरही बँकांपुढच्या रांगा बघून नक्कीच म्हणावेसे वाटते. पूर्वीही १०० च्या नोटा सगळ्या ए.टी.एम मध्ये नसायच्याच. हल्ली १०० च्या नोटा असलेल्या ए.टी.एम चे प्रमाण आणखी कमी झाले आहे असा अनुभव मला तरी आला आहे.
प्रश्न १) निश्चलीकरणाची उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली असे तुम्हाला वाटते?
पास. मुद्दलात उद्दिष्टे कोणती होती हेच माहित नसेल तर या प्रश्नाचे उत्तर कसे देणार? प्रश्न २) निश्चलीकरणामुळे तुम्हाला स्वतःला व कुटुंबियांना किती त्रास झाला व नुकसान झाले? फार नाही. मी पहिल्यापासूनच शक्य तिथे कॅशलेसच होतो. त्यामुळे बँकेपुढे दोन वेळा तासभर रांगेत उभे राहायला लागले होते. तसेही मुंबईत दररोज दोन-अडीच तास प्रवासात जातातच. महिन्यातून एखाद दोन वेळा ट्रॅफिक जॅम, गाड्या उशीराने असणे अशा कारणाने आणखी उशीरही होतोच. त्यामुळे दोन महिन्यात दोन वेळा तासभर रांगेत उभे राहायचे फार वाटले नव्हते. प्रश्न ३) निश्चलीकरणामुळे इतरांना किती त्रास झाला व नुकसान झाले? ज्या प्रकारच्या व्यवहारात लोक कॅशच वापरत आले आहेत तिथे नक्कीच त्रास झाला असावा असे वाटते (मी कुठे बघायला गेलो नव्हतो). कॅशलेस व्यवहारांमध्ये नोटबंदीमुळे वाढ झाली हे नोटबंदीचे यश/अपयश मोजायचे एकक असू नये. समजा काही कारणानी आठवडाभर मॅगी सोडून इतर कोणतेही खाद्यपदार्थ उपलब्ध नसतील तर त्या आठवड्यात मॅगीचा खप प्रचंड वाढलेला दिसेल. त्याप्रमाणेच मुळात हातात कॅशच नसेल तर कॅशलेस व्यवहार करण्याशिवाय लोकांपुढे काय पर्याय होता? प्रश्न ४) हा निर्णय धाडसी, राजकीय फायदा/तोटा नजरेसमोर न ठेवता केलेला, काळा पैसा बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता का? धाडसी आणि राजकीय फायदा-तोटा नजरेसमोर न ठेवता घेतलेला निर्णय होता हे नक्की. त्या निर्णयामागची उद्दिष्टे माहित नसतील तर तो काळा पैसा बाहेर काढायचा प्रामाणिक प्रयत्न होता की नाही हे सांगता येणार नाही.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sun, 11/19/2017 - 04:20 नवीन
निर्णयाची अंमलबजावणी मात्र पूर्ण गंडलेली होती...
असे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड थेलर म्हणत आहेत. स्वराज कुमार या भारतीय विद्यार्थ्यानी रिचर्ड थेलरना ई-मेल पाठवून त्यांचे भारतातल्या नोटबंदीवरील मत विचारले. त्यावर त्यांनी पुढील मत मांडले: Image removed.
  • Log in or register to post comments
म
मोदक Sun, 11/19/2017 - 05:50 नवीन
१) अंमलबजावणी आणखी चांगल्या पद्धतीने होऊ शकली असती याबाबत दुमत नसावेच. अगदी पहिल्या दिवसापासून मिपावर अनेक नोटबंदी समर्थकांनीही ही गोष्ट सपशेल मान्य केली होती. त्यामुळे सरकारने या बाबतीत आणखी चांगले नियोजन करणे अपेक्षित होते. २) २००० च्या नोटेचे गणित अजूनही कळालेले नाही. या नोटा चलनातून हळूहळू बाहेर काढल्या जातील अशी अपेक्षा आहे. अजून ६ महिन्यांनी ATM मधूनच या नोटा बाहेर येणे बंद होईल आणि अशा मार्गाने बहुदा चलनातून कमी केल्या जातील. अवांतर.. नोटबंदीच्या निमित्ताने मिपासारख्या छोट्या सँपल साईझमध्ये.. सीएच्या सांगण्यावरून धंदा बंद ठेवेपर्यंत लोकांची झालेली पळापळ, २० लाखाच्या ट्रकसारखे बुद्धीभेद करण्याचे प्रयत्न, खोट्या लिंका देणे आणि त्याचे खोटे समर्थन करणे, अर्धीच माहिती देऊन दिशाभूल करणे, विचारवंतपणाच्या बुरख्याचा फायदा घेऊन दिशाभूल करणारे लेख लिहिणे.. आपण एक लॉजिक देऊन त्याच लॉजिकने आलेले गैरसोयीचे निष्कर्ष नाकारणे.. असे अनेक बालीश आणि हास्यास्पद प्रकार झाले. ते लाईव्ह बघणे (आणि बुरखे टरकावणे) एकदम मजेशीर प्रकरण होते. ;)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 11/19/2017 - 10:11 नवीन
असे अनेक बालीश आणि हास्यास्पद प्रकार झाले. ते लाईव्ह बघणे (आणि बुरखे टरकावणे) एकदम मजेशीर प्रकरण होते. ;) + १ याच धाग्यात "या निर्णयामुळे साठविलेले पैसे एका रात्रीत मातीमोल झाले" असा हास्यास्पद निष्कर्ष काढण्यात आला आहे.
  • Log in or register to post comments
म
मोदक Sun, 11/19/2017 - 11:22 नवीन
..आणि ते हाणामारीचे पण याच धाग्यात पहिल्यांदा वाचले. घरात कर्त्या पुरूषाच्या अपरोक्ष पैसा साठवला म्हणून महिला मंडळाला मारहाण..?? आणि दोष मात्र मनुस्मृतीवर. पप्पूच्या बुद्धीमत्तेवर शंका आहेच आहे.. पण म्हणून अनुयायांनी आपआपले मेंदू गहाण टाकून प्रतिसाद देणे म्हणजे अगदीच हद्द झाली. :))
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 11/20/2017 - 05:24 नवीन
घरात कर्त्या पुरूषाच्या अपरोक्ष पैसा साठवला म्हणून महिला मंडळाला मारहाण..?? आणि दोष मात्र मनुस्मृतीवर.
यात तथ्य आहे.. बऱ्याच बायका दारुडा नवरा नेतो म्हणून पैसे लपवून ठेवतात. ते उघडकीला आल्यावर पैसे पण गेलेवणी मर पण पडला असं होऊ शकते
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 11/20/2017 - 10:45 नवीन
मग याचा दोष पण नोटबंदीला (आणि पर्यायाने मोदींनाच) का..?
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sun, 11/19/2017 - 18:06 नवीन
http://www.livemint.com/Industry/cygPqPW4X5ik9Jzbly3HDK/RBI-stops-printing-Rs-2000-notes-focus-turns-to-new-Rs-200.html?htalert_browser_notification=true १. १००० रु च्या नोटा जितक्या मूल्याच्या होत्या, तितक्याच मूल्याच्या (संख्येने अर्ध्या) २००० च्या आहेत. २. १७.७ च्या (१-३.८%) ऐवजी १५.२२ च्या (१-५.४%) चलन लोकांकडे चलनात आहे. (आकडे लाख कोटींत)
  • Log in or register to post comments
B
babu b Fri, 11/17/2017 - 18:03 नवीन
सरकारनेही किती पैसा आला ? किती गोरा किती काळा आहे , काही सांगितले नाही. अजून मोजणी सुरु आहे ! हेच उत्तर . ( आम्हाला द्या नोटा मोजायला ! )
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Fri, 11/17/2017 - 20:22 नवीन
किती गोरा किती काळा आहे , काही सांगितले नाही.
राखाडी नावाचा एक रंग असतो.
  • Log in or register to post comments
D
Duishen Fri, 11/17/2017 - 21:09 नवीन
श्रीगुरुजी, कुठलेही सर्वेक्षण हे न्युट्रल राहून करावयाचे असते. त्यासाठी शब्दवापरही काळजीपूर्वक करावा लागतो. सर्वेक्षण संशोधनाची एक पद्धती असल्यामुळे संशोधन / सर्वेक्षण याचा हायपोथेसिस न्युट्रल असणे अपेक्षित आहे. अन्यथा तो हायपोथेसिस मानल्या जात नाही. उदा: मी असे म्हटले की "महाराष्ट्रातील सर्व लोक स्वाभिमानी असतात" तेंव्हा हे विधान हायपोथेसिस नसून माझा निर्णय किंवा मत असू शकेल. जर मला हे पक्के माहिती असेल तर आणि माझा निर्णयही तोच असेल तर मी त्या निर्णयाला अनुकूल होतील असेच प्रतिसादक शोधणार आणि इतर प्रतिसाद आले तरीही त्यांची मते माझ्यासाठी महत्त्वाची ठरणार नाहीत. मी येनकेनप्रकाराने ती मते बाजूला ठेवण्याचे प्रयत्न करीन. आता तुम्ही दिलेल्या गाभ्याकडे वळतो. तुमचे पहिलेच विधान "निश्चलीकरण या अत्यंत धाडसी व महत्वाच्या निर्णयाला नुकतेच १ वर्ष पूर्ण झाले." हा तर सरळ सरळ निर्णय झाला किंवा तुमचे मत झाले. जर तुमचे हे मत असेल तर तुमचा प्रश्न क्र. ४ सर्वेक्षण म्हणून गैरलागू आहे. एकप्रकारे तुम्ही अनुकूल मत यावे यासाठी स्वत:चे मत आधीच जाहीर केले. हे सर्वेक्षणाच्या आणि संशोधनाच्या कक्षेत बसणारे नाही. दुसरे असे की प्रश्न सूचक नसावे. आपले प्रश्न क्र. २ आणि ३ हे खूपच सूचक आहेत प्रश्न २) निश्चलीकरणामुळे तुम्हाला स्वतःला व कुटुंबियांना किती त्रास झाला व नुकसान झाले? प्रश्न ३) निश्चलीकरणामुळे इतरांना किती त्रास झाला व नुकसान झाले? त्रास झाला / नुकसान झाले याची कुठेतरी मनाला जाणीव आहे पण मन मनात नाही त्यामुळे असा प्रश्न टाकला असावा असे वाटण्यास पुरेसा वाव आहे. प्रश्न असा असता तर सर्वेक्षणाच्या कक्षेत योग्य असता - २) स्व आणि कुटुंब यांच्या अनुभवावर आधारित निश्चलीकरणाचे १ ते १० मधे रेटिंग करावे./ यापैकी योग्य गुण द्या ३) इतरांनी आपल्यासोबत सांगितलेल्या अनुभवानुसार / त्या अनुभवावर आधारित निश्चलीकरणाचे १-१० मधे रेटिंग करावे. / यापैकी योग्य गुण द्या तुमचा फक्त प्रश्न क्र. १ न्युट्रल होता. काही चुकले असल्यास क्षमस्व! कारण तुमचे हे सर्वेक्षण वाचतांना 'फ्यु रिसर्च सेंटरचा नुकताच झालेला सर्व्हे आठवला.
  • Log in or register to post comments
B
babu b Fri, 11/17/2017 - 22:28 नवीन
जिल्हा बॅंका या लोकांच्या बेहिशोबी पैशांचे हक्काचे घर आहे , असे हायपोथेसिस मांडून सरकारने जिल्हा बॅंकेतला पैसा , ठेवीदार व बॅंका सर्वानाच कुजवले. पण नोटाबंदीच्या काळात कितीतरी जुना ब्लॅक मनी नवीन नोटात भभरून देताना याकसिस , आयशीआयशी अशा मोठ्या ब्यांकाच घावल्या ! पण त्या ब्यान्कांवर कोणतीच कारवाई झालेली दिसत नाही. नुसत्या संशयावरुन जिल्हा ब्यान्का बंद झाल्या. प्रत्यक्ष गुन्हे केलेल्या ब्यान्का मात्र सुरु आहेत.
  • Log in or register to post comments
B
babu b Sat, 11/18/2017 - 00:28 नवीन
भ्रष्टाचार घटला म्हणे ! मग नव्या नोटाना पाय फूटून लाखो करोडो नवीन क्याश लोकाकडे सापडली , ती भ्रष्टाचाराशिवाय का ?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 11/18/2017 - 09:46 नवीन
अरुण जोशी,
हा मूर्ख आपटार्ड आहे.
रघुराम राजन हा माणूस मला मूर्ख कधीच वाटला नाही. तो धूर्त असू शकेल पण मूर्ख खचितच नाही. आणि तो आपटार्ड असण्याची शक्यता शून्य आहे. कारण की त्याची नजर नोबेल पारितोषिकावर आहे. केजरीवालच्या मागे लागून नोबेल नासवणं हा शुद्ध मूर्खपणा आहे. बाकी त्यांच्या कारकिर्दीवर ग्यारी ट्रुमन यांनी वर लिहिलं आहेच. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sun, 11/19/2017 - 14:05 नवीन
नोटबदी हा "मोदींनी घेतलेला" निर्णय होता. त्यामुळे मोदींनी तो जाहीर करताना सांगितलेल्या तीन उद्दिष्टांवरच त्याचे मूल्यमापन व्हायला हवे. त्या तीनही उद्दिष्टांमध्ये फारसे यश मिळाल्याचे दिसले नाही. (जवळजवळ शून्य यश मिळाले आहे). "अमुक लाख खात्यांची तपासणी चालू आहे" या जुमल्यावर भक्त उरलेले दीड वर्ष खूष राहतील. ------------------------- वर कुणीतरी मालमत्ता करांसारखी थकलेली बिले वसूल झाली हा नोटबंदीचा "फायदा" असे म्हटले आहे. माझा पगार दहा हजार आहे . आज मला नोकरीवरून काढून टाकले. त्यामुळे तीन महिन्याचा पगार म्हणून तीस हजार रुपये एकरकमी मिळाले. तर नोकरी गेली आहे हे लक्षात न घेता एकदम तीस हजार रुपये मिळाले याचा आनंद मानण्यासारखे आहे हे.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 11/19/2017 - 20:00 नवीन
वर कुणीतरी मालमत्ता करांसारखी थकलेली बिले वसूल झाली हा नोटबंदीचा "फायदा" असे म्हटले आहे.
यावरुन वाचलेला विनोद आठवला. एका छोट्या दुकानदाराला मिडीयावाला विचारतो की नोटाबंदीबद्दल आपलं काय मत आहे. दुकानदार म्हणतो, माझ्या मते दर दोन वर्षांनी नोटाबंदी व्हायला हवी. मिडीयावाला चक्रावून दुकानदाराला कारण विचारतो. दुकानदार सांगतो की नोटाबंदी झाल्या झाल्या त्याच्या उधारीवाल्या गिर्‍हाईकांनी लगेच हजार पाचशेच्या नोटा देऊन त्याची सारी उधारी चुकती केली. विनोदाचा भाग सोडून द्या पण पुणे मनपा खरंच त्या काळात जुन्या नोटा देऊन आपला मालमत्ता कर भरा हे सांगण्यासाठी रिक्षा फिरवत होती, जाहीराती देत होती.
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 11/20/2017 - 10:30 नवीन
खिक्क.. "मोदींनी घेतलेला निर्णय आहे" हे तुम्हाला पप्पूने येऊन सांगितले काय..?
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Mon, 11/20/2017 - 15:16 नवीन
अहो भक्तांनीच सांगितले की..... असा निर्णय घ्यायला कायतरी इंचांची छाती लागते वगैरे. बाकी जेटलींच्या आणि उर्जित पटेलांच्या बॉडी लॅन्ग्वेजमधून कळत होतं ते.
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 11/20/2017 - 18:37 नवीन
भक्तांचे म्हणणे स्वतःला सोयीस्कर असेल तेंव्हाच मान्य करणे आणि इतरवेळी त्यावरच टीका करणे असा नेमका दांभीकपणा कसा काय जमतो बुवा..? बाकी बॉडी लँग्वेजबद्दल इतकाच अभ्यास असेल तर तुमच्या भावी अध्यक्षांना जरा सल्ले द्या.. त्यांना सवाल आणि जवाब मधला फरक समजाऊन सांगा. ज्युपीटर व्हेलॉसिटीने समजावून सांगू नका अन्यथा.. हॅ हॅ हॅ... ;)
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Mon, 11/20/2017 - 19:28 नवीन
अच्छा ! म्हणजे भक्त खोटं बोलत आहे का?
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 11/20/2017 - 20:50 नवीन
खोटेपणा हा तुमच्या कमाईचा मार्ग. तुमच्याशी बरोबरी करण्यासाठी उच्च प्रतीचा कोडगेपणा लागेल. तो कुठे सामान्यजनांकडे मिळणार.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Tue, 11/21/2017 - 04:17 नवीन
बघाना सत्य बोलल्याची जबाबदारी घ्यायलाही शेळपट भक्त टरकतात.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 11/21/2017 - 04:22 नवीन
आपण आधी आपल्या असत्य विधानांची जबाबदारी घ्या.
  • Log in or register to post comments
B
babu b Sun, 11/19/2017 - 16:31 नवीन
मूडीचा इतिहास .... २००८ च्या मंदीत चुकीच्या शिफारशी केल्याबद्दल अमेरिकेतील २०-२२ राज्यानी मुडीवर ॲक्शन घेतली होती व दंडही केला होता. https://www.theguardian.com/business/2017/jan/14/moodys-864m-penalty-for-ratings-in-run-up-to-2008-financial-crisis लेहमन बॅंकेला उत्त्म दर्जा असे प्रमाणपत्र मूडीने दिले अन त्यानंतर काही काळातच बॅंक शून्य झाली म्हणे ! ( संदर्भ बातमी मिळाली नाही . ) http://hindi.firstpost.com/india/pm-modi-government-lobby-to-improve-moodys-rating-in-vain-6754.html
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sun, 11/19/2017 - 17:03 नवीन
अरे वा. म्हणजे अमेरिकन कंपनीवर दंड आकारणारे अमेरिकन सरकार फारच विश्वासार्ह म्हणायचे का? २००७-०८ मध्ये सी.डी.ओ ट्रॅन्चना चांगले रेटिंग का दिले गेले असावे याविषयी माझे मत मी इथे लिहित आहे. हा प्रतिसाद बाबूरावांसारख्यांसाठी नाही तर बायस्ड नसलेल्या मिपाकरांसाठी आहे. त्यावेळी बाजारातील ९९% पेक्षा लोक मृगजळाच्या मागे धावत होते. भविष्यात नक्की काय वाढून ठेवले आहे हे केवळ रघुराम राजन यांच्यासारख्या थोड्याथोडक्या लोकांनाच समजले होते. मागे वळून बघताना असे वाटते की इतकी साधी गोष्ट सगळ्यांच्या लक्षात कशी आली नसावी? पण त्यावेळी ती गोष्ट लक्षात आली नव्हती हे पण तितकेच खरे. कोणती गोष्ट कोणाच्याच लक्षात आली नव्हती? ज्या सी.डी.ओ ट्रॅन्चना रेटिंग एजन्सींनी ट्रिपल ए रेटिंग दिले होते त्यांच्यावरील परतावा अमेरिकन सरकारच्या बॉन्डवरील परताव्याइतका असायला हवा होता हे अमेरिकन संदर्भात सांगायचे तर अगदी फायनान्स-१०१ कोर्समध्ये शिकायला मिळेल. पण प्रत्यक्षात त्या सी.डी.ओ ट्रॅन्चवरील परतावा अमेरिकन सरकारच्या बाँडपेक्षा २% ने जास्त होता. राजनसाहेबांनी केवळ हा मुद्दा सुरवातीला ध्यानात घेतला आणि त्यावर पुढे अभ्यास करून मोठे संकट येणार आहे हा इशारा २००५ मध्येच दिला होता. याविषयी राजनसाहेबांच्या Fault Lines : How Hidden Fractures Still Threaten The World Economy या पुस्तकात अधिक माहिती मिळेल. रेटिंग एजन्सींनी ती चूक का केली? त्याचे कारण होते की सी.डी.ओ ज्या गृहकर्जांच्या पूलचे बनलेले होते ती कर्जे बुडली तरी त्यावरील डिफॉल्ट हा एकमेकांशी संबंधित नसेल (अनकोरिलेटेड) हे गृहितक त्यामागे होते. पण जेव्हा परिस्थिती बिघडते तेव्हा (अनेकांच्या नोकर्‍या एकाचवेळी जाणे वगैरे) एकाचवेळी अनेक लोक गृहकर्ज थकवू शकतात आणि त्यामुळे हे डिफॉल्ट अनकोरिलेटेड असू शकत नाहीत. अशी एखादी गोष्ट लक्षात घेतली नाही किंवा लक्षात आली नाही तरी त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात याची आर्थिक बाजारात कित्येक उदाहरणे आहेत. तसेच त्यावेळी सी.डी.ओ हा त्यामानाने नवा प्रकार होता आणि बर्‍यापैकी गुंतागुंतीचाही होता. त्यामुळे त्या ट्रॅन्चना रेटिंग देताना रेटिंग एजन्सींना जास्त अडचणी आल्या आणि जर सगळेच सी.डी.ओ विषयी उत्साहित असतील तर मग आपणच वेगळे मत का द्या हा मानवी स्वभावही त्यामागे असेलच असे म्हणता येईल. राजनसाहेबांनी जे धाडस दाखविले ते सगळेच दाखवू शकतात असे नाही. तसेच सी.डी.ओ ची रचना अशी होती की त्यात जी स्थानिक बँक गृहकर्ज देणार आहे त्या बँकेच्या बॅलन्स शीटवर ते कर्ज राहणारच नव्हते. त्यामुळे स्थानिक बँकांनी कर्ज देताना जितकी काटेकोर छाननी (ड्यू डिलिजन्स) करायला पाहिजे होती ती केली नाही. त्याचे कारण जरी कर्ज बुडले तरी ते ती डोकेदुखी मला होणार नाही तर इतर कोणालातरी होईल तेव्हा मी का जास्त लक्ष घालू अशास्वरूपाची बेफिकिर वृत्ती. आणि कर्ज बुडले तर घर ताब्यात घेऊन त्याचा लिलाव करून कधीही पैसे परत मिळू शकतील हा अनाठायी विश्वास. त्यातून महिना १४०० डॉलर्स कमाविणार्‍यांना ५ लाखांपेक्षा जास्तचे गृहकर्ज कर्ज दिले गेले अशाही घटना घडल्या होत्या. रेटींग एजन्सींनी त्या सी.डी.ओ ट्रॅन्चचे रेटिंग केले त्यावेळी मुळातली कर्जे मोठ्या प्रमाणावर गंडलेली होती हे त्यांना किती प्रमाणावर माहित होते याची कल्पना नाही. जर एका सी.डी.ओ मध्ये हजारो गृहकर्जे असतील आणि त्यातली १०% जरी गंडली असतील तरी हा प्रश्न उभा राहू शकेल. आणि रेटिंग एजन्सींनी ती हजारो प्रपोजल स्वतः बघूनच रेटिंग दिले होते का? याविषयी माहित नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की सी.डी.ओ ट्रॅन्चचे रेटिंग करताना ही पार्श्वभूमी होती. पण देशांचे रेटिंग करायची पध्दत रेटिंग एजन्सी गेल्या कित्येक वर्षांपासून वापरत आहेत आणि जेव्हाजेव्हा योग्य ती माहिती रेटिंग एजन्सींना मिळाली तेव्हातेव्हा त्यांनी देशांचे योग्य रेटिंग केलेलेही आहे. अनेक वर्षांपासून वापरात असलेल्या या पध्दतीत रेटिंग एजन्सी मोठी चूक होऊ देतील असे वाटत नाही.२००७-०८ मध्ये रेटिंग एजन्सींची चूक झाली हे मान्यच. पण त्यामुळे रेटिंग एजन्सी आणि अशी देशांना रेटिंग द्यायची पध्दतच गंडलेली आहे असे मला तरी वाटत नाही. २००७-०८ मध्ये मोठे संकट आल्यानंतर नेहमीप्रमाणे जवळचे संशयित पकडणे ( rounding off the proximate suspect) हा प्रकार झाला त्यात रेटिंग एजन्सी मोठ्या प्रमाणावर बदनाम झाल्या. पण ते संकट आले त्यात खुद्द अमेरिकन सरकारची भूमिका (बिल क्लिंटन आणि जॉर्ज डब्ल्यू बुश या दोन्ही डेमॉक्रॅटिक-रिपब्लिकन प्रशासनांची) किती महत्वाची होती याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले गेले. आणि त्यातून २००९ मध्ये बराक ओबामा हा अगदी मोठ्ठा देवदूतच निवडून आल्यासारखे चित्र उभे राहिले होते. त्यामुळे असे प्रश्न कोण विचारणार?
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sun, 11/19/2017 - 18:50 नवीन
प्रश्न १) निश्चलीकरणाची उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली असे तुम्हाला वाटते?
काळा पैसा, समांतर अर्थव्यवस्था यांच्या विरोधात सरकारने उचलेल्या एकूण १८-२० पावलांपैकी निश्चलनीकरण हे एक होते. सामान्य जनतेने गैरसोय सहन करून नोटबंदीला पाठींबा दिला, म्हणून इतर कोणत्याही योजनेला विरोध करायला कोणाला जागा उरली नाही. काळ्या पैश्यामुळे समांतर अर्थव्यवस्थेत व्यवहार व्ह्यायला लिक्विडिटी राहते. ९९% पैसा पांढरा झाल्याने समांतर अर्थव्यवस्थेची भयंकर गोची झाली आहे. अगदी समांतर अर्थव्यवस्थेच्या मूळ अर्थव्यवस्थेशी असलेल्या सिनर्जीवर देखील परिणाम झाला आहे.
fight against corruption, black money, money laundering, terrorism and financing of terrorists as well as counterfeit notes,
हे सरकारचे व्हर्बॅटीम उद्देश होते. बर्‍याच मूर्खांना यात प्रोमोशन ऑफ डिजीटल इकॉनॉमी असे थेट लिहिलेले पाहायचे होते. रुग्णावर इलाज करायचा असे लिहिले असते तर इंजेक्शन द्यायचे, गोळ्या द्यायच्या असे थेट का लिहिले नाही असे हे लोक म्हणाले असते. असो. प्रश्न २) निश्चलीकरणामुळे तुम्हाला स्वतःला व कुटुंबियांना किती त्रास झाला व नुकसान झाले? मला घरातली सगळीच कामे जानेवारीपर्यंत पोस्टपोन करावी लागली. रांगेत ४-५ तास थांबावे लागले, पण तिथे राजकारणाच्या गप्पा करून वेळ सत्कारणी लावला. सुरुवातीला जवळजवळ ५०००-६००० रु दुकानदारांनी घेतले, ४००० रु पेट्रोल पंपावर घेतले. म्हणून मला पैसे बदलायला १ मिनिट देखिल द्यावा लागला नाही. प्रत्येक वेळी कार्ड घेणारी (म्हणून माझ्यामते महाग) दुकाने, हॉटेल्स निवडावी लागली. पे टी एम च्या पेमेंट सिस्टिमचे एक दिल्लीतले कंत्राट मी लिहून दिले होते. तेव्हा त्यांच्या मार्केटींग मॅनॅजरने माझ्या मोबाईलवर अ‍ॅप वापरून दाखवले होते (एक स्युडो आयडी वापरून ट्रँझॅक्न्स केली होती.). मी काहीही केले तरी मला पेटिएम वापरता येईना! शेवटी त्याला संपर्क केला तर तो बिझि! मोबाईल पासवर्ड आणि अकाउंट डीटेल्स जरा रिस्की पद्धतीने सेव करतो म्हणून मी ऑनलाईन पेमेंट मोबाईलवर टाळतो (मागे डायरेक्ट फोन बिलात पैसे आलेले, फोनचा काही संबंध नसलेल्या आयटमचे. एकदा मोबाईलने न विचारता सगळे अकाउंट डिटेल सेव केलेले आणि माझ्या १० वर्षाच्या मुलाने पे म्हटले कि ओटीपी देखील ऑटोमॅटिक एंटर व्हायचा!!!). हे सगळं शिकायचं इरिटेशन. कुटुंबीय जातीचे मोदीविरोधक असल्याने जणू काही मीच (एक भक्त या नात्याने) नोटबंदी केली असे बोल ऐकावे लागले, त्याचाही त्रास झाला. आमचे शेवटचे नवे ५०० रु लवासाच्या एंट्री फि मधे गेले, ते ऑनलाइन घेईनात तेव्हा चिडचिड झालेली. १५-२० दिवसांनी गरीब लोकांनी ऑनलाइन पैसे घ्यायला चालू केले, तेव्हापासून त्रास कमी झालेला. ऑफिसमधे एकदा स्टाफला सांगून २००० रु आणवले (हे टाळायचं होतं, पण जमलं नाही.). शेवटी ऑफिसमधल्या माझ्यापेक्षा नशीबवंत मित्रांनी एन इ एफ टी च्या बदल्यात नवी रोकड दिली नि सगळा त्रास मिटला. प्रश्न ३) निश्चलीकरणामुळे इतरांना किती त्रास झाला व नुकसान झाले? आमच्या एका प्रॉपर्टीचे काळे पैसे (पांढरे पैसे काळे करायला) देणारास सॉलिड प्रॉब्लेम झाला. बायकोच्या एका मैत्रिणाला नेमकी त्याच दिवशी भिषीची ८० हजार का कैतरी कॅश मिळाली नि तिची तारांबळ उडाली. नैतिक दृश्ट्ञा पाहिलं तर यांना अकारण त्रास झाला. लेबर लावणार्‍या कंत्राटदारांना सगळे लेबर तिकडेच लावावे लागले. इतर अनेक जणांना अनेक प्रकारचे (ज्याला माझा पाठींबा आहे असे) नुकसान झाले. प्रश्न ४) हा निर्णय धाडसी, राजकीय फायदा/तोटा नजरेसमोर न ठेवता केलेला, काळा पैसा बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता का? प्रामाणिक? अर्थातच. धाडसी? या करिता मोदिंचा ऋणी आहे.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Sun, 11/19/2017 - 19:11 नवीन
मस्त सर्कस सुरु आहे. लगे रहो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 11/19/2017 - 19:22 नवीन
फक्त विदूषकाची उणीव होती. ती आता भरून निघाली. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Mon, 11/20/2017 - 09:47 नवीन
अर्रे आपुन तो खुल्ला जोकर हैच रे ... मगर इस सर्कसमें घोडे हाथीकी जगह, सब के सब गधे हैं, उसका क्या?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 11/20/2017 - 09:59 नवीन
सब के सब गधे असतील तर घोडे हाथीकी जगह कसे असतील? आणि समजा असले तर?
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Tue, 11/21/2017 - 11:39 नवीन
या सर्वेक्षणात आतापर्यंत जे काही आकडे मिळाले आहेत त्याचे पुढे काय होणार आहे? म्हणजे त्याचे विश्लेषण करून काही अनुमान बांधले जाणार आहे का? की आणखी आकडेवारी मिळेपर्यंत थांबणार आहेत?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 11/22/2017 - 16:52 नवीन
मिपाकरांची मते जाणून घ्यायचा उद्देश होता. आकडेवारी कमी मिळाली, पण बर्‍याच जणांनी आकडेवारी न देता सविस्तर मत व्यक्त केले. आता वेळ मिळाला की सारांश टाकतो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 10 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 10 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 10 hours ago
  • सुंदर !!
    3 days 10 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 10 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा