निश्चलनीकरण सर्वेक्षण
निश्चलीकरण या अत्यंत धाडसी व महत्वाच्या निर्णयाला नुकतेच १ वर्ष पूर्ण झाले. हा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी संध्याकाळी ८ वाजता जाहीर केल्यानंतर देशात प्रचंड खळबळ माजली होती. काळा पैसा बाहेर काढणे, बनावट चलनाला आळा घालणे अशी काही प्रमुख उद्दिष्टे या निर्णयामागे होती असे सांगण्यात आले होते.
या निर्णयाला काही जणांनी प्रचंड पाठिंबा दिला तर काही जणांनी कडाडून टीका केली. आज एक वर्षानंतर सुद्धा हेच चित्र कायम आहे. निश्चलीकरणामुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या, अनेकांचे प्रचंड नुकसान झाले, देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली, देशाच्या प्रगतीचा वेग मंदावला, अनेक उद्योगधंदे बंद पडले असे दावे अनेकजण करीत असताना या निर्णयामुळे काहीही नुकसान झाले नाही, रोखरहीत व्यवहार वाढल्याने भ्रष्टाचार कमी झाला, बनावट चलन नष्ट झाले, मालमत्ता करासारखी अनेक थकित बिले वसूल झाली, बँकांकडे मोठ्या प्रमाणात चलन जमा झाल्याने व्याजाचे दर कमी झाले इ. दावे या निर्णयाचे समर्थक करीत आहेत.
आज एक वर्ष उलटल्यानंतर याच विषयावर मिपांकरांची मते जाणून घ्यावीत या उद्देशाने हे सर्वक्षण करीत आहे.
खालील प्रश्नांवर ० ते १० या कक्षेत प्रश्नांचे मूल्यांकन करता येईल.
० गुण = उद्दिष्ट अजिबात साध्य झाले नाही/अजिबात नाही
१ गुण = उद्दिष्ट अगदी किंचित प्रमाणात साध्य झाले/अगदी किंचित
२ गुण = उद्दिष्ट अगदी थोड्या प्रमाणात साध्य झाले/अगदी थोड्या प्रमाणात
.
.
५ गुण - अर्धे उद्दिष्ट पूर्ण झाले (किंवा अर्धे उद्दिष्ट अपूर्ण आहे)/मध्यम प्रमाणात
.
.
८ गुण - उद्दिष्ट बर्याच प्रमाणात साध्य झाले/बर्याच प्रमाणात
९ गुण - उद्दिष्ट बहुतांशी साध्य झाले/खूप जास्त प्रमाणात
१० गुण - उद्दिष्ट पूर्ण साध्य झाले/अत्यंत जास्त प्रमाणात
असे गुणांकन करता येईल. गुणांकन करताना फक्त गुण न देता त्याविषयी सविस्तर स्पष्टीकरण, स्वानुभव इ. आकडेवारीनिशी लिहिल्यास जास्त चांगले.
प्रश्न १) निश्चलीकरणाची उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली असे तुम्हाला वाटते?
प्रश्न २) निश्चलीकरणामुळे तुम्हाला स्वतःला व कुटुंबियांना किती त्रास झाला व नुकसान झाले?
प्रश्न ३) निश्चलीकरणामुळे इतरांना किती त्रास झाला व नुकसान झाले?
प्रश्न ४) हा निर्णय धाडसी, राजकीय फायदा/तोटा नजरेसमोर न ठेवता केलेला, काळा पैसा बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता का?
१. निश्चलीकरणामुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या : 1.5 million jobs lost in first four months of 2017 हे वाचा! CMIE ची लिंक आहे हा.. कोणीतरी नोटबंदी चे फायदे दाखवायला यांची लिंक वापरली होती म्हणून देतोय.भारतात कोणाकडे रोजगार आहे व कोणाकडे नाही याची अधिकृत माहिती कोणत्याही सरकारी किंवा असरकारी संस्थेकडे नाही. जे आहेत ते केवळ अंदाज आहेत. निश्चचलनीकरणामुळे १५ लाख लोकांच्या नोकर्या गेल्या हा CMIE चा केवळ अंदाज आहे. त्यासाठी त्यांच्याकडे वस्तुनिष्ठ आकडेवारी नाही. त्यांच्या अहवालात तसेही परस्परविरोधी दावे आहेत. CMIE उदाहरणार्थ - While the number of persons employed fell by 1.5 million,the number of people who declared themselves unemployed fell much more - by 9.6 million.किंवा The unemployment rate during September-December 2016 was 6.8 per cent (29.6 million unemployed out of a labour force of 436 million).in January-April the rate fell to 4.7 per centएकीकडे म्हणतात की १५ लाखांच्या नोकर्या गेल्या तर दुसरीकडे म्हणतात की ज्यांच्याकडे रोजगार नाही अशांची संख्या ९६ लाखांनी घटली आणि जाने-एप्रिल २०१७ या काळात बेरोजगारीचा दर ६.८% वरून ४.७% इतका घटला. एकंदरीत या अहवालात गोंधळ आहे.