Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

बटरचिकन

स
स्वाती दिनेश
Mon, 10/20/2008 - 09:52

  • Log in or register to post comments
  • 15107 views


वाचनखूण लावा
| 15107 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ऋ
ऋषिकेश Mon, 10/20/2008 - 10:00 नवीन
बरं झालं दुपारच्या जेवणानंतर फोटु बघितला.. नहितर महाराष्ट्रात एका आयटी कंपनीमधे एक (अचानक लागलेल्या अनावर भुकेने)भुकबळी ! ही हेडलाईन दिसली असती! बाकी तुमच्या कड्या नान साठीची भट्टी देखील आहे की काय? नसल्यास नान कसा करावा? -(बटरसकट जळून खाक) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 10/20/2008 - 10:20 नवीन
नानची घरगुती रेशिपी टाकली आहे आत्ताच..:)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 10/20/2008 - 10:32 नवीन
बासंच .. बादली भर लाळ गळालीये आता .. मला सर्वर रूम पुर्ण ओली केल्याने बाहेर पाठवलं ... :( स्वाती ताई .. मला हॉटेलने किचनओटा :) पण दिलाय .. प्लिज येणं करा हिकडं ... मी सगळा कच्चा माल आणतो :) (सर्वचिकनचापी) टार्जू आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 10/20/2008 - 10:35 नवीन
स्वातीताई, छान रेसिपी आहे. साखर टाकणे सक्तीचे आहे का? मनस्वी
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 10/20/2008 - 10:46 नवीन
साखर टाकणे सक्तीचे आहे का? नाही नाही .. त्यात तर चिकन पण टाकणे सक्तीचं नाही ... तु तुझ्या पद्धतीचा बटर चिकन कर हो मने ... ;) टारस्वी
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 10/20/2008 - 12:09 नवीन
ए तू गप्प बस रे टरटर. मनस्वी
  • Log in or register to post comments
श
शिप्रा Mon, 10/20/2008 - 12:17 नवीन
स्वाती ताई बेसिक शंका ...चिकन मसाला आणी गरम मसाला विकतचा आणायचा का? कारण घरचा मसाला आणी बाहेरचा यात चवीत खुप फरक असतो... नाहितर मसाल्याची रेसिपी पण देना ग... :P जिथे कमी तिथे आम्ही ..:)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 10/20/2008 - 13:06 नवीन
चिंटी,मी तरी एव्हरेस्ट किवा बादशाह मसाले (खरं म्हणजे इथल्या भारतीय दुकानात ज्या कं चा उपलब्ध असेल तो) वापरते. फारफार वर्षांपूर्वी मी गरम मसाला घरी करत असे. रेसिपी शोधायला लागेल कारण हल्ली कित्त्येक वर्षांत केलेला नाही,:) मनस्वी, बटरचिकन खूप तिखट नसते बघ,थोडे गोडुस असते,म्हणून चमचाभर साखर घालायची. स्वाती
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 10/20/2008 - 13:34 नवीन
मनस्वी, बटरचिकन खूप तिखट नसते बघ,थोडे गोडुस असते,म्हणून चमचाभर साखर घालायची. म्हणूनच म्हंटलो तिला की स्वत:च बटरचिकन बनव .. तर मला म्हणे गप्प बस ... नको तिथे हीची मनमानी .. छी बाबा !! -टारस्वी
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 10/20/2008 - 13:30 नवीन
आम्ही अंडी खातो..त्यांचे आई-बाप नाही.. त्यामुळे या पाकृची मजा आम्हाला घेता येणार नाही.. पण जुन्या काळी बटरचिकन खाल्लेले असल्याने पाकृ छान आहे ते समजले :) --लिखाळ.
  • Log in or register to post comments
ल
ललिता Mon, 10/20/2008 - 14:04 नवीन
स्वातीताई, कांदा + टॉमेटो + फ्रेश क्रीम मुळे बटर चिकन भरपूर गोडुस होईल, साखर वगळली तर चालेल का? चवीत फरक होईल का त्यामुळे?
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 10/20/2008 - 15:30 नवीन
अग तुला नको असेल तर नको घालू साखर :) पण मला ती गोडुस चव आवडते म्हणून मी चमचाभर साखर घालते. साखर न घातल्याने कमी गोडुस होईल एवढेच.. स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 10/20/2008 - 15:27 नवीन
पाककृतीबरोबर बटरचिकनचे सुंदर चित्र, चालू द्या !!! :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 10/20/2008 - 16:14 नवीन
अत्याचार आहेत. आधी ललिताताईची शाकुती.. आणि आता हे बटरचिकन.. फोटोंमुळे जीव हैराण होतो. खासह रेसिपी. मी या रेसिपीला वाचन्खुण केली आहे.. आता दिवाळी नंतर लगेचच करणार मी. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 10/20/2008 - 16:54 नवीन
रेसेपी छान दिसतायत, पण चिकन खात नाही गं स्वातीताई. मला वाटते चिकनच्याऐवजी पनिर घातले तर शाकाहारींसाठी पनिर बटर मसाला असे काही होईल का? चिकन मसाल्यामध्ये सगळे पदार्थ शाकाहारीच असावेत. रेवती
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 10/20/2008 - 18:05 नवीन
फोटो आणि पाकृ उत्तमच. पण, का कुणास ठाऊक पण मांसाहाराचा आणि झणझणीतपणाचा एक संबंध मनात तयार झालेला आहे त्यामुळे हे गोडसर चिकन तितकेसे उतरत नाही. हे अर्थात, माझे वैयक्तिक मत. दुसरे नान बाबत. माझ्या वैयक्तिक पसंतीची उतरण अशी - घडीची पोळी - भाकरी (तांदूळ, ज्वारी, बाजरी) - पराठा - तंदूरी रोटी - नान ही तुमच्या पाकृवर टीका नाही हो! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 10/20/2008 - 20:34 नवीन
स्वातीवहिनी, उत्तम पाकृ! लौकरच मिपाच्या मुखपृष्ठावर टाकणार! :) तात्या.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 10/20/2008 - 20:53 नवीन
फोटो पाहुन तोंडाला पाणी सुटले! पाककृती सोपी वाटतेय्.....करुन पहावी म्हणतो! बाकी वरती सुनीलभौंशी सहमत! खरोखरचं मांसाहाराचा आणि झणझणीतपणाचा एक संबंध मनात तयार झालेला आहे......पण तरीदेखील फुकटात बटर चिकन मिळणार असेल तर FTP ;)
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 10/21/2008 - 02:02 नवीन
बटरचिकन आहाहा!!!!! शागुती खाउन होतीय तेवढ्यात बटरचिकन... लाईफ हो तो ऐसी.....
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 10/21/2008 - 08:44 नवीन
:) अगदी असेच म्हणतो

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 10/21/2008 - 14:34 नवीन
१३ खणखणीत प्रतिसाद! काय स्वाती, इतर संकेतस्थळावरील मंडळींना तुझं बटर चिकन फारसं आवडलेलं दिसत नाही! ;) आपला, (कोकणातला) तात्या बर्वा.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 10/22/2008 - 15:31 नवीन
स्वातीची मुळ पाककृती चांगलीच आहे. पण त्यातील साखरेवर, गोडूसपणावर काहींनी आक्षेप (सौम्य शब्दात) घेतला आहे. खास त्यांच्यासाठी खालील सुचवणी..... ५०० ग्रॅम कोंबडीस १ चहाचा चमचा साखर जास्त होत नाही पण अजिबात घातली नाही तरी चालेल. कांदा अर्धवट तळला तर गोडसर राहतो. तो गडद तपकिरी रंगावर परतून घ्यावा. त्याचा गोडपणा जातो. (जास्त तळल्यास कडवट होतो) २ टॉमॅटो वाढवता येतील. टॉमॅटोसुद्धा परतून त्यातील पाणी आटवून टाकायचे. त्यातही गोड चव असते. शिवाय नीट न शिजलेल्या टॉमॅटोंची 'टॉमॅटीश' चव पदार्थाला येते ती टाळण्याचा प्रयत्न करावा. टॉमॅटोचे पाणी आटवून तेल सुटले की साधे नळाचे पाणी घालून रश्याचा दाटपणा सांभाळून घेता येतो. टॉमॅटो केचप मध्येही गोडवा असतो. केचप टाळून किंचित लाल पावडर रंग वापरावा. (अगदी हरभर्‍याच्या डाळी एवढा) फ्रेश क्रिम कमी करता येईल. टीपः १)कांदा उभा पातळ चिरून तळून घ्यायचा आणि त्याची पेस्ट करून घ्यायची. २)टॉमॅटो साले काढून मिक्सर मध्ये मनसोक्त फिरवून गाळून त्याचा रस घ्यायचा. तो तेलात आटवून घ्यायचा. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 10/22/2008 - 16:26 नवीन
खास आमच्यासाठी केलेल्या सुचवणीबद्दल आभार! तशी स्वाती यांनी दिलेली पाकृ ही बटरचिकनची पाकृ म्हणून उत्तमच होती. आता तुम्ही दिलेली कमी गोडाची पाकृ कशी लागते ते करूनच बघावे लागेल (दिवाळी नंतरच योग यावा). Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 10/23/2008 - 19:05 नवीन
सदर उतारा कुठे ठेवणार आहात ते कळवा. वेळ वाचेल. चिकन तंदुर घरी बनवता येईल काय? असेल तर पाककृतीची वाट पाहात आहे. वेताळ.
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 10/23/2008 - 19:05 नवीन
सदर उतारा कुठे ठेवणार आहात ते कळवा. वेळ वाचेल. चिकन तंदुर घरी बनवता येईल काय? असेल तर पाककृतीची वाट पाहात आहे. वेताळ.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 10/31/2008 - 09:56 नवीन
खवय्यांनो, धन्यवाद. रेवती,चिकन ऐवजी पनीर घातले तर पनीर बटर मसाला करता येईल.. बरोबर..:) पेठकर, तुमच्या सुचवणींसाठी धन्यवाद. तात्याभावजी, बटरचिकन मुखपृष्ठावर यायची वाट पाहत आहे :) वेताळ, 'उतारा' फ्रांकफुर्टात ठेवला होता. :) चिकनतंदूर घरगुती पध्दतीने करता येते, लवकरच रेसिपी देते.सॉरी लवकरच उतारा ठेवते,:) ऋषिकेश, टारझन, मनस्वी, चिंटी, लिखाळ, ललिता, बिरुटेसाहेब, प्राजु, सुनील, टींग्या,सहजराव, नंदन, रेवती, पेठकर, तात्या, वेताळ सर्वांना धन्यवाद. स्वाती
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 15 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 27 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 29 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 31 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 34 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा