Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • वि 'लीन' करण
  • ब्रेक के बाद..
  • धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य
  • अजित दादा पवार…"मैने हमेशा मेरे दिल की सुनी है"
  • दाटलेली हुरहूर.
  • मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन
  • बजेट २०२६
  • चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६
  • आंब्याच्या झाडवरचे सरडे
  • "बौद्ध मूर्तीशास्त्र"
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

दृकश्राव्य विभाग :- स्मरणरंजन - माज्या आज्याचा दारूचा धंदा

दिवाळी अंक Mon, 10/16/2017 - 20:30

Header2
लेखक :- ब्रिटिश
अभिवाचन :- अंशुमन विचारे
विशेष आभार :- किरण माने, अमोल उदगिरकर आणि छोटा डॉन

'कोणती तरी गोष्ट करायचीच म्हटलं की सगळी कायनात तुमच्या मदतीला येते' असं शाहरुख म्हणून गेलाय. ते खोटं नाहीये!

दिवाळी अंकात अभिवाचन करताना "ते एक कॅरेक्टर नाही का? मिपावर फार भारी कथा असतात बघ त्याच्या.. ती कथा घ्यायचीच" इतक्या सॉल्लीड माहितीवर ह्या धाग्याचा मुहूर्त केला गेला. अनेकांना हे अत्यंत मुद्देसूद वर्णन देऊन "आठवतेय का कोणाच्या कथा होत्या ह्या?" असे प्रश्न विचारले गेले. एका रम्य क्षणी मिपा उचकत फिरताना अचानक कायनात प्रसन्न झाली आणि "मिथून काशीनाथ भोईर" हे नावं लख्खं आठवलं! ही आगरी कथा घ्यायची ह्यात डौट नव्हताच, पण लेखकूची परवानगी? त्याचं काय? मग पुन्हा जुन्या मिपाकरांना साकडं घालून ब्रिटिश म्हणजे नक्की कोण हे शोधलं, त्यांना गाठून परवानगी सुद्धा मिळवली. पण पुन्हा पुढचा प्रश्न.. वाचणार कोण?

आता हा सर्वात कळीचा प्रश्न होता. आगरी भाषेत विनोदी कथा वाचणारा माणूस सापडता सापडेना. अमोल उदगीरकरांना सहज विचारलं, तर म्हणाले, "किरण मानेंना विचारा. मराठीतले मोठे कलाकार आहेत. नक्कीच रेफरन्स देतील." मिपावरच्या कुणालाही काहीही विचारायला हरकत नसते पण तारांकित लोकांना बोलायला नाही म्हणलं तरी जरा बिचकायलाच होतं. घाबरत घाबरत त्यांना विचारलं, तर त्यांनी अगदी आनंदाने अंशुमन विचारेंचा नंबर दिला. भीड जरा चेपली! मग अंशुमनला मेसेज केला. हाच तो क्षण जेव्हा आख्खी कायनात सोबत होती, तिने बरोब्बर माणसापाशी आणून सोडलं होतं. अंशुमनने ह्या कथेचं अक्षरशः सोनं केलंय!

anshuman

टीव्हीवर दिसणारा हा प्रसन्न माणूस प्रत्यक्षातही अगदी मृदू आणि शांत आहे. मिसळपावच्या विनंतीला त्याने अक्षरशः २ मिनिटांत मान्य केलं आणि तापाने फणफणलेला असतानाही आपला खोळंबा होऊ नये म्हणून इतकं अप्रतिम वाचन केवळ ४ दिवसांत करूनही दिलं. "मला जरा उशीरच झाला द्यायला. मी खरं तर अजून चांगलं काम करू शकतो ह्या कथेवर. पण सर्दीने आवाज खराब आहे.. सॉरी हं.. आणि मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद!" हेही वर सांगितलं!

मी म्हटलं ना.. कायनात फार हुशार असते! बरोब्बर अशी सोन्यासारख्या माणसांना भेटवते.

अंशुमनला मिसळपाव परिवाराकडून मनःपूर्वक धन्यवाद!

किरण माने, अमोल उदगीरकर आणि छोटा डॉन ह्यांचे मनापासून आभार. त्यांच्यामुळेच हे अभिवाचन शक्य झालं!

ज्यांना ऑडीओ ऐकण्यास काही अडचण येत आहे त्यांनी युट्युबची ही लिंक वापरावी.

Footer

आ
आनंदयात्री Tue, 10/17/2017 - 04:40 नवीन
एकदम मजा आली हे अभिवाचन ऐकायला. अभिनंदन!
  • Log in or register to post comments
ज
जुइ Tue, 10/17/2017 - 05:56 नवीन
झक्कास अभिवाचन. मजा आली ऐकताना ;-) .
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 10/17/2017 - 07:07 नवीन
जबरी!!!
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 10/17/2017 - 08:52 नवीन
वाचताना जेवढी मजा आली होती, तेवढीच मजा ऐकताना येतेय.
  • Log in or register to post comments
ब
बाजीप्रभू Tue, 10/17/2017 - 10:28 नवीन
हा हा हा... मस्त ...
  • Log in or register to post comments
M
Maharani Tue, 10/17/2017 - 10:37 नवीन
झक्कास..धमाल आली वाचताना..
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Tue, 10/17/2017 - 10:46 नवीन
अरे काय लिहलय आणि काय मस्त वाचलय. मजा आली ऐकतांना
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Tue, 10/17/2017 - 12:19 नवीन
बाला, कं आवाज लागराय रं...
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar गुरुवार, 10/26/2017 - 16:40 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 10/17/2017 - 12:46 नवीन
अंशुमान विचारे ह्यांचे कॉमिक टायमिंग खूपच सुंदर असते. एरवी ह्या गुणी अभिनेत्याला रुपेरी पडद्यावर पाहिलेच जाते, पण श्राव्य माध्यमात पण ते तितकेच सशक्त आहेत हे जाणवले. जमल्यास त्यांना आमच्या शुभेच्छा कळवाल ही टीम गोष्टला विनंती.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Tue, 10/17/2017 - 13:38 नवीन
जबरी! ब्रिटिशभौंच्या सगळ्याच कथा अंशुमनकडून वाचून घ्या!
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 10/17/2017 - 14:15 नवीन
एकच नंबर!!
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Tue, 10/17/2017 - 14:31 नवीन
ऑडिओ कुठल्याही ब्राउझरवर प्ले किंवा डाउनलोड होईना ...
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 10/17/2017 - 14:44 नवीन
आयफोन का? क्रोमवर व्हायला पाहिजे खरं तर.. साधी गुगल ड्राइव्हची फाईल आहे. वर्क अराऊंड काढते. उलीसाक टाईम द्या!
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Tue, 10/17/2017 - 15:03 नवीन
आयफोन नाही, नोट ४ आहे. लॅपटॉप वर देखील प्ले होत नाहीये. :( वर्क अराउंडच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 10/17/2017 - 15:05 नवीन
मी युट्युबवर ऑडीओ टाकला आहे. धाग्यात आता सर्वात खाली युट्युब दिसेल. तो नक्कीच ऐकता येईल. :)
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Tue, 10/17/2017 - 15:28 नवीन
धन्यवाद. मजा आली ऐकताना.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 10/17/2017 - 20:50 नवीन
आमच्या बाल्याचा लिखान म्हंजे आधीच जबरा, त्यातून तां आयकायला पन मज्जा आली!! :) हापी दिवाली!!
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 10/17/2017 - 21:36 नवीन
कं लिवलंय अन कं मनलंय! _/\_
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 10/19/2017 - 04:33 नवीन
सुंदर झालीय कथा!
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 10/19/2017 - 15:28 नवीन
पुनःप्रत्ययाचा आनंद की काय म्हणतात तो झाला! प्रमाणभाषेव्यतिरिक्त अन्यबोलींतील साहित्य हे वाचण्यापेक्षा ऐकायला जास्त बरे वाटते. त्यात त्या बोलीचे नादमाधुर्य समजून येते, जे निव्वळ वाचताना समजत नाही.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 10944 views
  • Log in or register to post comments
  • 10944 views

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 18 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 30 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 32 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 34 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 37 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: रचस
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 10:29
  • सदस्य: Grishma B.
    नोंदणी: Fri, 05/05/2023 - 11:19
  • सदस्य: शितल ताथोड
    नोंदणी: गुरुवार, 05/04/2023 - 06:25
  • सदस्य: आपुलाची वाद आप…
    नोंदणी: गुरुवार, 04/13/2023 - 03:44
  • सदस्य: Shivaji vishva…
    नोंदणी: Tue, 04/11/2023 - 03:07
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा