Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • वि 'लीन' करण
  • ब्रेक के बाद..
  • धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य
  • अजित दादा पवार…"मैने हमेशा मेरे दिल की सुनी है"
  • दाटलेली हुरहूर.
  • मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन
  • बजेट २०२६
  • चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६
  • आंब्याच्या झाडवरचे सरडे
  • "बौद्ध मूर्तीशास्त्र"
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

बीट - चीज बॉल्स

र
रुपी
गुरुवार, 07/13/2017 - 01:48

b

तेच तेच खाऊन कंटाळा येतो म्हणून नवीन पदार्थ मी शोधत असते आणि कमी मेहनत लागेल पण जास्त भाज्या, प्रथिने आहारात जातील असे फेरफार करुन बनवते. मागच्या भारतवारीत आप्पे पात्र घेतले, आणि इतकी वर्षे माझ्याकडे नव्हते म्हणून आता ते वापरण्याचा सपाटा लावलाय! म्हणून मी हे बॉल्स आप्पेपात्रात बनवलेत, तुम्ही तळून घेऊ शकता.

साहित्यः

  • १ वाटी हरभरा डाळ,
  • १ बीट सोलून, किसून,
  • १ कांदा बारीक चिरुन,
  • ८-१० पुदिन्याची पाने बारीक चिरुन (ऐच्छिक),
  • १/२ वाटी बारीक चिरलेली पालकाची पाने (ऐच्छिक),
  • २-३ हि. मिरच्या बारेक चिरुन/ पेस्ट करुन,
  • ३-४ लसूण पाकळ्या किसून,
  • अर्धा इंच आले किसून,
  • १ चमचा जीरेपूड,
  • २-३ चमचे तांदळाचे पीठ (गरज वाटल्यास),
  • १/२ टीस्पून चाट मसाला,
  • मीठ,
  • लाल तिखट (ऐच्छिक),
  • चीज क्युब्स - १ से.मी. चे तुकडे करुन,
  • तेल

कृती:
१. डाळ धुवून पाण्यात भिजत घाला. २-३ तासांनी पाणी न वापरता मिक्सरला बारीक करुन घ्या. गरज लागली तरी अगदी थोडेसेच पाणी घाला. डाळ शक्यतो जरा भरडसर वाटायची आहे.
२. एका भांड्यात वाटलेली डाळ, बारीक चिरलेला कांदा, किसलेले बीट, आले, लसूण, हि. मिरची, चाट मसाला, चवीप्रमाणे मीठ घालून एकत्र करा. माझ्याकडे होती म्हणून पालक, पुदिन्याची पानेही घातली. बारीक चिरलेली कोथिंबीरही घालू शकता. आणखी तिखट आवडत असल्यास लाल तिखट घाला.
३. आप्पेपात्रात बनवायचे असतील आणि मिश्रण पातळ असेल तर थोडेसे तांदळाचे पीठ घाला. वड्यांसारखे तळायचे असतील तर गरज नाही. म्हणून डाळ वाटतानाच तशी काळजी घ्या. लिंबाएवढा गोळा हातावर घेऊन त्याला वाटीसारखा आकार द्या, त्यात चीजचा एक क्युब ठेवून वरुन बंद करा. सर्व मिश्रणाचे बॉल्स बनवून घ्या.
४. आप्पेपात्र गरम करण्यास ठेवा. थोडे थोडे तेल घाला. तेल गरम झाले की हे बॉल्स त्यात ठेवा. ४-५ मिनिटांनी उलटवा, २-३ मिनिटांनी दुसर्‍या बाजूने भाजले गेले की काढून घ्या. किंवा कढईत तेल गरम करुन त्यात तळून घ्या. गरम गरम खमंग बॉल्स केचपबरोबर खायला द्या.

हे बॉल्स चवीला बर्‍यापैकी फलाफलसारखे वाटले. हे बनवले आणि इतर साहित्य असले तर 'पिटा पॉकेट्स'ही बनवता येतील.
या वेळी घाई होती म्हणून मी जरा मोठ्या आकाराचे बॉल्स बनवले, त्यामुळे चीज जरा कमी वितळले. तुम्हाला वितळलेले चीज आवडत असेल तर आकार जरा लहान घेऊन बघा, किंवा किसलेले चीजही घालून चांगले लागत असावेत. बीटऐवजी किसलेले गाजरही घालता येईल, पण बीट घातल्याने छान रंग येतो.


  • Log in or register to post comments
  • 7774 views


वाचनखूण लावा
| 7774 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
र
रेवती गुरुवार, 07/13/2017 - 01:57 नवीन
वेगळीच पाकृ आहे. आधी न ऐकलेली. फलाफल एकदाच खूप पूर्वी खाल्ल्याने चव आता आठवत नाहीये. आजच एका मैत्रिणीने मसाला वडे पाठवले होते त्याची चव आठवली. बहुतेक तशी चव लागत असावी.
  • Log in or register to post comments
ज
जुइ गुरुवार, 07/13/2017 - 03:09 नवीन
अगदी वेगळी पाकृ आहे. नक्कीच करून बघेन.
  • Log in or register to post comments
प
पियुशा गुरुवार, 07/13/2017 - 09:47 नवीन
यम्मी दिसतंय :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 07/13/2017 - 09:56 नवीन
यम्मी!
  • Log in or register to post comments
स
सानझरी गुरुवार, 07/13/2017 - 10:40 नवीन
तोंपासु!!!!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति गुरुवार, 07/13/2017 - 10:40 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
I
II श्रीमंत पेशवे II गुरुवार, 07/13/2017 - 13:53 नवीन
वा दिसतायत तर छान . तळले तर अजून छान लागू शकतील .पण त्या चीज च काय होईल तळल्यावर ???? पण खायचे काश्याशी , एखादी चटणी ची रेसिपी द्याकी बरोबर या चीज बॉल्स बरोबर , तिखट+गोड अशी चटणी मजेदार ठरेल आप्पे पत्रात गोल आकार करता येतो .....हे आजच कल्ल .... बाकी नवीन डिश मस्तच
  • Log in or register to post comments
र
रुपी Fri, 07/14/2017 - 01:20 नवीन
धन्यवाद :) कमी मेहनत घेतली ना, म्हणून केचपबरोबरच दिले :) तिखटगोड चटणीबरोबर नक्कीच छान लागतील. तळल्यावर चीज मस्त वितळेल, खाताना छान लागेल. ते मध्यभागी घातलंय त्यामुळे तळताना फुटून बाहेर वगैरे येणार नाही. फार तेलकट नको, म्हणून मी आप्पेपात्रात केले.
  • Log in or register to post comments
ज
जेनी... गुरुवार, 07/13/2017 - 14:04 नवीन
वॉव ... करुन बघेन .. हि सानिकास्वप्निल कुठे गेलिय .. दिसली नाहि अजिबातच !
  • Log in or register to post comments
र
रुपी Fri, 07/14/2017 - 01:20 नवीन
धन्यवाद सर्वांना :)
  • Log in or register to post comments
म
मंजूताई Sat, 07/15/2017 - 12:54 नवीन
उचलून तोंडात टाकावेसे वाटताहेत अश्या पावसाळी हवेत ...
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 07/16/2017 - 09:09 नवीन
मस्त दिसत आहेत, ए फ्रा मध्ये करता येतील का बघते. स्वाती
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Tue, 07/18/2017 - 09:16 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 18 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 30 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 32 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 34 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 37 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: रचस
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 10:29
  • सदस्य: Grishma B.
    नोंदणी: Fri, 05/05/2023 - 11:19
  • सदस्य: शितल ताथोड
    नोंदणी: गुरुवार, 05/04/2023 - 06:25
  • सदस्य: आपुलाची वाद आप…
    नोंदणी: गुरुवार, 04/13/2023 - 03:44
  • सदस्य: Shivaji vishva…
    नोंदणी: Tue, 04/11/2023 - 03:07
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा