Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • वि 'लीन' करण
  • ब्रेक के बाद..
  • धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य
  • अजित दादा पवार…"मैने हमेशा मेरे दिल की सुनी है"
  • दाटलेली हुरहूर.
  • मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन
  • बजेट २०२६
  • चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६
  • आंब्याच्या झाडवरचे सरडे
  • "बौद्ध मूर्तीशास्त्र"
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

कुर्कुरीत रवा डोसा

प
पियुशा
Tue, 07/11/2017 - 11:46

राम राम मिपाकर्स,
खुप दिसानी उगवले मिपावर ;)
नुकतच आमचं शुभ मंगल उरकल्यामुळे घर गृहस्थीतुन वेळ मिळणा झाला :)
मग मिपावर येन दूरच .. तरी अधून मधून मिपावर चक्कर टाकायचे आता कळतय अरे संसार संसार ;)
तर असो. आता आलेच आहे तर एक रेसेपी देऊनच जाते :)
घ्या साहित्य :
रवा १ वाटी
तांदुळाची पिठी अर्धा वाटी
२ चमचे मैदा ( ऑप्शनल ) कुणी बेसन पण वापरतात
जिरे - चमचा भर
आलं पेस्ट - अर्धा चमचा( ऑप्शनल )
दही - ३ चमचे
मीठ - चवीनुसार
हिरवी मिरची बारीक कापून किंवा पेस्टुन तुमच्या ऐपतीनुसार ;)
कृती :
वरील सर्व साहित्य पाणी घालून नीट पातळ मिक्स करून घ्या. रवा पाणी शोषून घेतो म्हणून मिश्रण घट्ट वाटल्यास ऐन वेळी जास्तिच पाणी घालून पातळ करू शकता आता हे मिश्रण कमीत कमी अर्धा तास सेट व्हायला ठेवून द्या.
आता नॉनस्टिक पॅनवर थोडं तेल पसरवून हे मिश्रण डावाने पूर्ण पॅन भर एकसारखे ओता . मिश्रण पातळ असेल तरच डोसा कुरकुरीत होईल
मिश्रण नीट ओतणे हीच खरी गोम आहे एकदा हे जमले कि हुश्श करा ;)
एक बाजू खरपूस झाली तरी छान लागतो हा डोसा :) सांबार , चटणी सोबत किंवा तसाही ट्राय करून पहा.
आता हेच मिश्रण घट्ट सर ठेवून यात कांदा उकडलेला बटाटा कोथिंबीर घातली कि झाला तुमचा रवा उत्तप्पा :)
d
लोभ असावा.....
आप्लिच पिवशी उर्फ जिल्बुशा :)


  • Log in or register to post comments
  • 20426 views


वाचनखूण लावा
| 20426 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
स
सानझरी Tue, 07/11/2017 - 12:56 नवीन
झकास.. करुन बघेन हा रवा डोसा.. :)
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Tue, 07/11/2017 - 13:09 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Tue, 07/11/2017 - 15:14 नवीन
भारीय ग्ग ! ...
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Tue, 07/11/2017 - 15:38 नवीन
वा वा, पोरगी संसाराला लागली हो. छान च झालाय डोसा.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 07/11/2017 - 15:38 नवीन
अभिनंदन दोनाचे चार हात झाल्याबद्दल. आणि अशी सुरेख पाककृती टाकल्याबद्दल
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 07/11/2017 - 15:47 नवीन
रेसिपी आवडली गं सौ पियुषा. फोटूही छान आलाय. तू अगदी संसारी मुलीसारखी बोलायला लागलीस की! ;) लग्नाला वर्ष होईपर्यंत प्रत्येक रेसिपीबरोबर एकेक उखाणा येऊ दे.
  • Log in or register to post comments
म
मितान Tue, 07/11/2017 - 16:29 नवीन
+ १११ उखाणा आलाच पायजे :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 07/16/2017 - 09:11 नवीन
रेवतीशी बाडिस.. स्वाती
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 07/11/2017 - 16:36 नवीन
अरे वा!! झालं का लगीन. डावीकडची आमटी संदर दिसत्ये.
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Tue, 07/11/2017 - 17:02 नवीन
'नवीन' पाककृती मस्तच एकदम. अशाच नवीन,नवीन पाककृती शिकून घे सासू बै कडून आणि इकडे रेसिपी टाकत जा.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 07/11/2017 - 17:10 नवीन
सौ.पियुशा* ह्यांची पाकृ आवडली. अन्नपुर्णा प्रसन्न आहे हो मुलीवर! * / माझी आई, माझ्या लनानंतर जिथे जिथे माझा लेखी उल्लेख असेल तिथे, अगदी फ्रिजवर लावलेल्या नोटवर सुद्धा, "सौ" असं लावायची. अत्यंत इरिटेटिंग प्रकार. म्हणून तुझ्यासाठी आवर्जुन वापरण्यात येईल! =))
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Tue, 07/11/2017 - 17:24 नवीन
माझ्या माहेरी पण माझ्या नावापुढे असच लिहितात. एकदा तर सौ.दीदी अस लिहून कहरच केलेला.
  • Log in or register to post comments
प
पियुशा Tue, 07/11/2017 - 17:17 नवीन
सुडा ,झालं हो झाल .......तुम्ही लाडू कधी देता? " डु आयडी , जिल्बुषा,पिवशी न पियुशा, मिपावर केला लेखनाचा श्री गणेशा, घातला धींगाना केल्या गमती जमती , मिपावरचे सख्या न सोबती। "नवीन" रावांचे घेते नाव आता उखाना आठवत नाही राव ;) बाकी शुभेच्छा बद्दल धँस हो :)
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 07/11/2017 - 17:25 नवीन
१ जुलैला नवरा 'नवीन' असलेलं लगीन अटेंड केलं मी, कही यह वह तो नही?
  • Log in or register to post comments
प
पियुशा Tue, 07/11/2017 - 17:30 नवीन
ने नाय नाय आम्ही 30 मार्च ला च उरकल :)
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 07/11/2017 - 17:32 नवीन
हुश्श !! नायतर हा आय्डी इतक्या जवळच्या ओळखीला आहे की काय विचाराने जीव अधांतरी गेला होता. =))
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 07/11/2017 - 17:17 नवीन
पिवडे हे काय नवीन? छान नवीन वाटतेय पाकृ. नवीन नवीन लग्न झालंय ते कळतंय हां लिवण्यातून. नवीन संसारात पाऊल टाकल्याबद्दल शुभेच्छा बर्र का!
  • Log in or register to post comments
प
पियुशा Tue, 07/11/2017 - 17:25 नवीन
लोलम लोल;) तुला मिस केले बाई लग्नात ;))
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Tue, 07/11/2017 - 17:53 नवीन
राग राग झालेली बाहुली
  • Log in or register to post comments
म
मनिमौ Tue, 07/11/2017 - 17:40 नवीन
नव नवीन पाककृती येऊदे. बादवे सुगरण तू आहेसच आणी हा फोटू बघून सुगृहीणी झाल्याची खात्री पटली
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Tue, 07/11/2017 - 17:54 नवीन
नविन पाककृती सुरेख हो पिवडे!
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Tue, 07/11/2017 - 17:54 नवीन
नविन पाककृती सुरेख हो पिवडे!
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 07/11/2017 - 18:56 नवीन
मस्त पाकृ!
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 07/11/2017 - 19:09 नवीन
पाककृती छान! * पण आलेलेल्या प्रतिसादातील एक प्रतिसाद कळला तर शप्पथ!!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 07/11/2017 - 19:37 नवीन
छानच रेशिपी ग पिवशे. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. रेशीपीतले तू स्वतः काय काय केले ? ;)
  • Log in or register to post comments
व
विशाखा राऊत Tue, 07/11/2017 - 23:51 नवीन
नवीन नवनधुची नवीन रेसेपी भारी आहे ;)
  • Log in or register to post comments
व
विशाखा राऊत Tue, 07/11/2017 - 23:52 नवीन
नववधुची **
  • Log in or register to post comments
र
रुपी Wed, 07/12/2017 - 00:07 नवीन
मस्त पाकृ! घरगृहस्थीसाठी शुभेच्छा :) पाकृ आणि उखाणे टाकता टाकता लेखनही थोडं शुद्ध व्हायला लागलंय ;)
  • Log in or register to post comments
अ
अजया Wed, 07/12/2017 - 07:32 नवीन
अर्र पिशवी सुद्द लिहायला लागली तर चाहत्यांचे काय होणार :( - पिशवी असुद्दलेखन चाहता संघाकडून
  • Log in or register to post comments
क
कौशी Wed, 07/12/2017 - 03:37 नवीन
लग्नाच्या शुभेच्छा पियु...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 07/12/2017 - 03:44 नवीन
यावेळी जिल्बी नसून चक्क डोसा निघाला! =)) धन्य धन्य गो जिल्बुषा... धन्य ! (तरिही पाकं क्रुतीत जिल्बीसारखं गोल गोल फिरवणं आलंच आहे! =)) )
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 07/12/2017 - 04:58 नवीन
शिकायली पिवशी आता. :)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 07/12/2017 - 09:11 नवीन
सौ. पिव्शी नुसती संसारीच नव्हे तर सुगृहिणी सुद्धा झाली हे पाहोन आणंद जाहला . डोसा बरीक आणिक जरा पातळ हवा होता ! सौ. पिवशी हीस अणेक आशीर्वाद ( त्यामध्ये ...पुत्रा/कन्या सौ..... भव, हाही इनक्लुड आहे !) :D
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 07/18/2017 - 16:27 नवीन
आमची आजी म्हणायची लग्न एक वर्ष होईपर्यंत नवीन समजलं जातं. म्हणून त्या मंगळसूत्राच्या वाट्या पण उलट्या घालतात (मेडिकल ला इंटर्न शिप असते तसं.). या एक वर्षात मुलीने चांगला स्वयंपाक करायला शिकून घ्यावा नाही तर नवऱ्याला आपण जे शिजवू ते मुकाटपणे गिळण्याची सवय लावावी. ( नवरे नव्या नव्हाळीच्या पहिल्या वर्षात बायकोचं सर्व काही ऐकतात ) म्हणजे पुढे संसार सुखाचा होतो
  • Log in or register to post comments
प
पियुशा Tue, 07/18/2017 - 17:02 नवीन
पहिला पर्याय अवलंबून बघतेय सध्या ;) नायतर दुसरा पर्याय आहेच हाकानाका ;)
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Fri, 07/14/2017 - 08:57 नवीन
छान नवीन पाककृती, स्नेहनकिता ,असं काय ग ?ती नवीन शिकतेय ना?पुढच्या वेळचा होईल हो पातळ डोसा.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Tue, 07/18/2017 - 15:21 नवीन
छान. सांबार, चटणी चा फोटो मस्त. मैदा किंवा बेसन नाही वापरले तरी चालते. ते रवा उत्तप्पाचे माहित नव्हते.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 17 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 29 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 31 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 33 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 36 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: रचस
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 10:29
  • सदस्य: Grishma B.
    नोंदणी: Fri, 05/05/2023 - 11:19
  • सदस्य: शितल ताथोड
    नोंदणी: गुरुवार, 05/04/2023 - 06:25
  • सदस्य: आपुलाची वाद आप…
    नोंदणी: गुरुवार, 04/13/2023 - 03:44
  • सदस्य: Shivaji vishva…
    नोंदणी: Tue, 04/11/2023 - 03:07
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा