Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

पहाडी स्पेशल:- हिमाचली खट्टा मटन

क
केडी
Wed, 06/14/2017 - 13:01

Himachali_Khatta_mutton_1

साहित्य
१/२ किलो मटण, धुवून, कोरडे करून
३ मोठे कांदे बारीक चिरून
१ लसूणाचा गड्डा, सोलून, बारीक चिरून
१ इंच आलं, बारीक चिरून
१ बडी इलायची
५ ते ६ हिरवे वेलदोडे
३ ते ४ लवंग
१ चमचा जिरे
२ चमचे धने
१ चमचा बडीशेप
१ चमचा मेथ्या
१ तुकडा दालचिनी
३ तमालपत्र
१ चमचा लाल तिखट
२ चमचे हळद
१ चमचा कसुरी मेथी
५ ते ६ चमचे आमचूर पावडर (हे आवडीनुसार कमी जास्त)
२ ते ३ मोठे चमचे तेल
मीठ चवीनुसार
अर्ध्या लिंबाचा रस

कृती

मटणाला लिंबाचा रस, १ चमचा हळद आणि मीठ लावून ते किमान २ तास मुरत ठेवावे. रात्रभर ठेवलं तर उत्तम. (अर्थातच फ्रिज मध्ये). सगळे गरम मसाले कोरडे भाजून, मग गार करून त्याची जाडसर भरड काढावी.

Ingredients Step1

Step2 Step3

एका जाड बुडाच्या भांड्यात किंवा कुकर मध्ये तेल तापवून, त्यात बारीक चिरलेला कांदा ३ ते ४ मिनिटे परतून घ्या. कांदा थोडा लालसर झाला कि त्यात मुरलेलं मटण घालून ते परतून घ्या. हे सगळं आपल्याला एकदम मंद आचेवर करायचे आहे. (मटण कोवळे असेल तर लवकर शिजेल, साधारण १ तासात आपल्याला मटण मऊसूद वाफेवर शिजवून घायचे आहे. हे सुरु असतांनाच इतर मसाले व जिन्नस टाकत राहायचे आहेत).

Step4 Step5

झाकण ठेवून साधारण २० ते २५ मिनिटे मटण शिजू द्या. अधून मधून परतून घेत राहा. [मटणाला पाणी सुटेल, त्यामुळे पाणी घालायची गरज लागणार नाही]. आता भांड्यात बारीक चिरलेला लसूण आणि आलं घालून परतून घ्या. अजून १० ते १५ मिनिटे झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या. मटणाला सुटलेले पाणी आटत आले, कि त्यात लाल तिखट आणि उरलेली हळद घालून पुन्हा ढवळून घ्या. झाकण ठेऊन अजून १० मिनिटे शिजू द्या. झाकण उघडून, एकदा परतून त्यात आता मसाल्याची भरड घाला. थोडे परतून मग आमचूर पावडर घालून मटण पुन्हा परतून अजून १० मिनिटे झाकण ठेवून शिजवा.

Step6 Step7

Step8 Step9

साधारण २ कप पाणी गरम करून, आपल्याला रस्सा हवा त्या प्रमाणात गरम पाणी घालून, अजून ५ मिनिटे वाफ काढून घ्या. चवीनुसार मीठ घालून गरम गरम भात बरोबर हे खट्टा मटन खायला घ्या! वाढण्यापूर्वी, कसुरी मेथी हाथाने चुरून वरून भुरभुरावी.

[साध्या तेला ऐवजी सरसू/मोहोरी चे तेल असेल तर ते वापरा, अजून लज्जत वाढेल. आमचूर मुळे एक वेगळीच चव आणि रंग येतो. पाणी न घालता देखील सुक्क म्हणून छान लागेल. कांदा, लसूण आणि आले हे मिक्सर मधून न काढता सुरीनेच बारीक चिरून घ्या, म्हणजे ते जळणार नाही. मटण शिजले नाही, किंवा इतका वेळ वाट पाहायची नसेल तर, कुकर मध्ये ३ ते ५ शिट्ट्या मारून शिजवू शकता (पाणी घालून).]

Himachali_Khatta_mutton_2


  • Log in or register to post comments
  • 11072 views


वाचनखूण लावा
| 11072 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
आ
आदूबाळ Wed, 06/14/2017 - 15:13 नवीन
खतरनाक! (मटण न घालता ही पाकृ... :) )
  • Log in or register to post comments
क
केडी गुरुवार, 06/15/2017 - 06:44 नवीन
(मटण न घालता ही पाकृ...
:-) एक प्रयोग म्हणून मटणा ऐवजी कच्चे बटाटे, सोलून घालून पाहायला हरकत नाही. खट्टे आलू छान लागतील बहुदा.
  • Log in or register to post comments
ज
ज्याक ऑफ ऑल गुरुवार, 06/15/2017 - 09:05 नवीन
केडी ... व्हेज व्हर्जन घरी करून पाहेन नक्की ...
  • Log in or register to post comments
क
केडी गुरुवार, 06/15/2017 - 09:41 नवीन
येस! सोया पण उत्तम लागेल....गुड आयडिया!
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Wed, 06/14/2017 - 15:40 नवीन
पहिले बुकमार्क केले आणि मग वाचले . आता करून पाहीनच. किंवा कोणाला तरी करायला लावेन :))
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 06/14/2017 - 15:45 नवीन
पाहून त्या मटणाला कलिजा खलास झाला ! :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 06/14/2017 - 15:47 नवीन
पाकृ करून बघीन.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Wed, 06/14/2017 - 15:56 नवीन
भारी दिसतय. करुन बघेन लवकरच.
  • Log in or register to post comments
न
निमिष ध. Wed, 06/14/2017 - 18:25 नवीन
हैला लै भारी दिसतंय. लगेच ताटात घेऊन खायला बसावं असं वाटतं आहे !! जबरी - नक्की करून बघणार.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड गुरुवार, 06/15/2017 - 03:40 नवीन
जबरी झकास आहे, तरी ५-६ चमचे आमचूर वाचून अन मटनात 'खट्टा' वाचून मात्र एकदम कसेसे झाले. आंबट मटन कन्सेप्ट स्वीकारली जात नाहीये प्रभू.
  • Log in or register to post comments
क
केडी गुरुवार, 06/15/2017 - 05:32 नवीन
तरी ५-६ चमचे आमचूर वाचून अन मटनात 'खट्टा' वाचून मात्र एकदम कसेसे झाले. आंबट मटन कन्सेप्ट स्वीकारली जात नाहीये प्रभू.
मला देखील हेच वाटलेलं, पण आमचूर पावडर मुळे अगदी हलका आंबटपणा येतो, आणि इतर मसाल्यांची चव खुलून आली, अर्थात हा माझा अनुभव.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ गुरुवार, 06/15/2017 - 05:38 नवीन
आधीच तुला म्हणाले तसं खात नाही पण पाहून खूप मस्त वाटतंय. कसले सुरेख फोटो काढतोस....लाजवाब प्रेझेंटेशन. मस्त दिसतंय फार
  • Log in or register to post comments
क
केडी गुरुवार, 06/15/2017 - 06:45 नवीन
धन्स ग ...बटाटे वापरून करून बघ... छान लागेल....
  • Log in or register to post comments
ज
ज्याक ऑफ ऑल गुरुवार, 06/15/2017 - 09:08 नवीन
लिखाण , प्रेझेन्टेशन , फोटोंची रचना व कोलाज ... हे पण टिपून ठेवलंय . जे जे चांगले ते शिकावं माणसाने .. या तत्वावर ... बाकी लाजवाब ... कधी खाऊ घालता ? (जाता जाता - आपण दोन केडी नी मिळून एक फिरतं हॉटेल काढूया का ? )
  • Log in or register to post comments
क
केडी गुरुवार, 06/15/2017 - 09:44 नवीन
...अगदी मनातला बोललास....हे जरा मनावर घेऊयात.....एखादा फूड ट्रक?
  • Log in or register to post comments
झ
झेन गुरुवार, 06/15/2017 - 09:23 नवीन
असे फोटो आणि प्रेझेन्टेशन असेल तर दोन गोष्टी नक्की होतील - बरीच व्हेज जनता नाँन-व्हेज होईल आणि - तुमच्या पा.क्रू. त येण्यासाठी कोंबड्या/ बकर-यांची लाईन लागेल.☺
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत गुरुवार, 06/15/2017 - 11:28 नवीन
टोमॅटो, दही,लिंबू घालून मटण केलंय पण इतकी आमचुरपावडर घालून नाही केलाय कधी. आता करून पाहीन.फोटो सुरेखच!
  • Log in or register to post comments
क
केडी Fri, 06/16/2017 - 03:58 नवीन
हो, म्हणूनच, जरा वेगळी वाटली, म्हणून करून पहिली ही पाककृती, करून बघा, एक वेगळी चव.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 06/20/2017 - 14:56 नवीन
मांसाहारी नसूनसुद्धा तुमचे फोटोज बघून पदार्थ कावेसे वाटतात हो
  • Log in or register to post comments
क
केडी Wed, 06/21/2017 - 14:04 नवीन
...आभारी आहे _/\_
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 15 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 27 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 29 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 31 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 34 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा