Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

उकडांबा

अ
अनन्न्या
Sun, 05/14/2017 - 07:03

ही पारंपरिक रेसिपी आहे, माझी आजी, आजेसासूबाई करायच्या. पूर्वी कोकणात पावसात फार भाज्या मिळत नसत. तेव्हा या बेगमीच्या पदार्थांचा उपयोग व्हायचा. हे करायला ठराविक झाडाचे रायवळ आंबे वापरले जायचे. फक्त आंबे उतरून काढायचे, पडलेले नको.
aambe
साहित्यः
दहा रायवळ आंबे थोडे पिकलेले, एक वाटी मोहोरी, 300ग्रॅम गूळ, दोन चमचे मीठ, दोन चमचे मेथी पावडर, दोन चमचे हिंग, चार चमचे लाल तिखट, अर्धी वाटी तेल, थोडी हळद
aambe
कृती:
थोडे पिकायला लागलेले आंबे स्वच्छ धुवावेत. पाण्यात घालून दहा मिनिटे उकडावेत. पाण्यातून काढून गार करायला ठेवावेत. 300 ग्रॅम गूळ एका पातेल्यात घ्यावा, त्यात पाऊण ली पाणी घालून पाक करावा. एक वाटी मोहोरी बारीक करून घ्यावी. अर्धी वाटी तेलाची मोहोरी, हिंग, हळद, थोडे तिखट घालून फोडणी करावी, गार करायला ठेवावी. गुळाचा पाक गार करावा. त्यात मेथी पावडर, मोहोरी पावडर, मीठ, तिखट नीट घुसळून घ्यावे. गार झालेली फोडणी मिसळावी. आंब्याची साल देठाकडून सोडवून घ्यावी. काचेच्या बरणीत आंबे ठेवावेत, त्यावर तयार मिश्रण घालावे. हे लोणचं छान मुरलं की खायला घेताना आंबा सोलून खारात कुस्करून खायला घ्यावा. मुरलेला आंबा छान लागतो.aamba


  • Log in or register to post comments
  • 10977 views


वाचनखूण लावा
| 10977 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
पद्मावति Sun, 05/14/2017 - 09:06 नवीन
वाह! मस्तच.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Sun, 05/14/2017 - 09:09 नवीन
काय हा अत्याचार सकळी सकाळी......आता काम करणं अशक्य झालायं. शेवटचा फोटो तर पारच टेम्टींग आलाय. एखाद्या सुटिच्या दिवशी भात/उकडांबा खाउन मस्तपैकी ताणून द्यावी ह्या पेक्षा आनंद तो काय!!! ऑर्डर घेशील काय.....लगेच देतो. नाहीतरी जूनमधे भारतवारी आहेच.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Sun, 05/14/2017 - 11:33 नवीन
घेऊन येते.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sun, 05/14/2017 - 10:04 नवीन
इतका आवडतो उकडांबा........... पण आता रायवळ आंबे पुण्यात कुठे शोधू?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 05/14/2017 - 17:00 नवीन
लै वरील खाल्ल्यालं नाय ह्ये प्रकरण. अताही पाहूनच समाधान! :)
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sun, 05/14/2017 - 17:09 नवीन
काही म्हणा पण कोकणातले लोकच हुषार! काय एक एक पदार्थ असतात तुमच्याकडे. वाह! देवा पुढचा जन्म कोकणात होऊ दे रे बाबा!
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Sun, 05/14/2017 - 18:19 नवीन
हे खरय, एकच पीक आंबा पण तो गोड आणि तिखट कोणत्याही चवीत अप्रतिम लागतो. मग काय आम्ही त्याचे इतके प्रकार बनवतो की प्रत्येक पदार्थ म्हणजे आहाहा!
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 05/15/2017 - 12:01 नवीन
ग्रेट पाकृ व फोटू.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 05/15/2017 - 12:12 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 05/15/2017 - 12:41 नवीन
वा मस्त. ह्याला मेथांबाही म्हणतात आणि आंब्याचे रायतेही म्हणतात.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Tue, 05/16/2017 - 04:02 नवीन
आमच्याकडे मेथांबा म्हणजे मेथी दाण्यावर आंबा फोडी फोडणीत घालतात, आणि रायते मी दिलेय बघ भाजलेल्या आंब्याचे, उकडांबा वर्षभर टिकतो. अर्थात प्रत्येक भागात शब्द वेगळे!
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 05/15/2017 - 12:50 नवीन
वर्षभर टिकतो का हा?
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Tue, 05/16/2017 - 04:03 नवीन
त्यासाठीच करून ठेवतात, आयत्यावेळचे तोंडी लावणे
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे Mon, 05/15/2017 - 16:56 नवीन
आमच्या घरात व शेजारी देखील पूर्वी हा प्रकार आवर्जून दर मे-जून महिन्यात केला जायचा ... घराशेजारी एक आम्ब्याचे झाड होते ज्याचे तुरट चवीचे आम्बे उकडाम्बा आणि लोणच्यासाठी वापरले जायचे , त्या झाडाचे नावच उकडाम्बा होते ... २ /३ वर्षापूर्वी तोडले गेले
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Tue, 05/16/2017 - 04:05 नवीन
म्हणजे उकडांबा करण्यासाठी त्याच झाडाचे आंबे वापरतात.
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Tue, 05/16/2017 - 15:19 नवीन
जीभ चाळवलीस खरी, पण डायरेक्ट बालपणातही पोचवलंस,आता उकडांब्याचे झाड नसल्यामुळे, 'नो उकडांबा..'
  • Log in or register to post comments
स
सही रे सई Tue, 05/16/2017 - 15:38 नवीन
अनन्या फारच मस्त वाटल पाककृती बघून.. ३रा फोटो तर व्वाह क्या कहना.. सगळ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्यास.. माझ्या आईला आणि बाबांना हा प्रकार प्रचंड आवडायचा.. चिनीमातीच्या मोठ्ठ्या बरणीमध्ये आई भरपूर उकडांबा करून वरून पातळ धोतराच फडकं दोरीने बांधून ठेवायची. कोणी पाहुणे आले की त्या बरणी तून थोडे आंबे एका सटा मधे काढून त्यांना वाढले की मंडळी खुश. त्यानंतर सगळ्या कोकणातल्या च आठवणी हमखास निघायच्या.
  • Log in or register to post comments
व
विशाखा राऊत Wed, 05/17/2017 - 13:27 नवीन
तोंपासु.. मस्त मस्त मस्त आंबा क्वीन आहेस तु :)
  • Log in or register to post comments
म
मनिमौ Wed, 05/17/2017 - 14:07 नवीन
बघितले नाहीत. पाकृ वाचली नाहि. म्हणून तोंडाला पाणी पण सुटले नाही
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 42 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा