Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

कांदा आणि कैरीची चटणी

क
कापूसकोन्ड्या
Sat, 04/15/2017 - 06:43

====================
कांदा आणि कैरीची चटणी
====================
साहित्य

  1. दोन मध्यम आकाराचे कांदे (चिरून)
  2. अर्धी कैरी (कमी आंबट आणि लहान असेल तर पूर्ण )साल काढून चिरलेली
  3. हिरव्या मिरच्या ५-६
  4. चिरलेली कोथिंबीर अर्धा कप
  5. लसूण पाकळ्या २-३
  6. तेल २-३ चमचे
  7. गूळ चार चमचे
  8. हिंग चिमुट भर
  9. पाव चमचा मेथीचे दाणे
  10. जिरे एक चमचा
  11. ओवा पाव चमचा
  12. मोहरी फोडणी पुरती
  13. कढीपत्ता ५-६ पाने
  14. मिठ चवीनुसार
  15. कृती (१) साधारण अर्धा तास
    ======================================

    1. तव्यावर थोडेसे तेल घालून हिरव्या मिरच्या परतून घ्या आणि बाजूला काढून घ्या
    2. त्याच तव्यात मेथीचे दाणे, जिरे, लसूण्, हिंग हलकेसे परतून घ्या आणि बाजूला काढून घ्या
    3. ग्राइंडर मध्ये प्रथम कोरडे पदार्थ आणि नंतर चिरलेला कांदा, साल काढलेल्या कैरीच्या फोडी, कोथिंबीर, गूळ,घालून सरबरीत वाटून घ्या
    4. चवीनुसार मिठ टाकून परत एकदा वाटून घ्या
    5. बाउल किंवा वाटीमध्ये चटणी काढून घ्या.
    6. छोट्या कढी मध्ये फोडणी करा, त्यात मोहरी कढीपत्ता टाकून फोडणी थंड होउ द्या. हळद घालू नका रंग संगती बिघडते
    7. थंड झालेली फोडणी चटणी वर टाका
    8. झाली चटणी तयार.

    कृती (२) साधारण पंधरा मिनीटे
    ही कृती पुरूष करत असतील तर सर्वात महत्त्वाची तुम्हाला खरा आदर या मुळेच मिळेल ( एंड टू एंड प्रोसेस)

    1. मिरचीची देठे कांद्याची साले, कैरीची साले ओल्या कचर्‍याच्या डब्यात टाका
    2. मिक्सरची भांडी सुरी किंवा विळी व्यवस्थित स्वच्छ धुवुन ठेवा
    3. फोडणिचे भाडे आणि तवा जागच्या जागी घासायला ठेवा.
    4. ओटा चकाचक करा

    एंजॉय अँड बी हॅपी.
    =========================================
    ..


  • Log in or register to post comments
  • 16950 views


वाचनखूण लावा
| 16950 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
म
मितान Sat, 04/15/2017 - 07:28 नवीन
पर्फेक्ट !!!! आमचे हे अशीच चटणी करतात :))
  • Log in or register to post comments
क
कापूसकोन्ड्या Tue, 04/18/2017 - 03:58 नवीन
म्हणजे नक्कीच कृती नं २ करत असणार तर.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 04/15/2017 - 08:29 नवीन
फारच छान! अगदी पद्धतशीर कृती लिहिली आहे! त्याबद्दल १०० मार्क्स. पण फटु कुठे आहे?
  • Log in or register to post comments
क
कापूसकोन्ड्या Tue, 04/18/2017 - 03:51 नवीन
हाय की वो!
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sat, 04/15/2017 - 08:39 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 04/15/2017 - 10:19 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Mon, 04/17/2017 - 14:12 नवीन
कैरी आणि कांदा ग्राईंडर मधून काढणे पटले नाही मी कैरी कांदा किसून घेतो आणि नुसतेच गूळ आणि तिखट घालून करतो. फोडणी बिडणी काहीच नाही. ट्रस्ट मी टेक्स्चरमुळे फरक पडतो चवीत. तरीपण एकदा तुम्ही लिहिले तसे मेथी दाणे, लसण, कोथिंबीर वापरुन साग्रसंगीत करुन बघावे लागेल.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 04/17/2017 - 14:42 नवीन
आप्पा विदौट ग्रायंडरचीच भारी लागते.
  • Log in or register to post comments
स
सही रे सई Mon, 04/17/2017 - 15:38 नवीन
कैरी आणि कांदा ग्राईंडर मधून काढणे पटले नाही मी कैरी कांदा किसून घेतो आणि नुसतेच गूळ आणि तिखट घालून करतो.
अगदी अगदी.. आमच्या कडे पण अगदी असाच करतात.. त्याला कांदा आंबा म्हणतो आम्ही. मस्त लागतो तो..
  • Log in or register to post comments
क
कापूसकोन्ड्या Tue, 04/18/2017 - 03:53 नवीन
अगदी अगदी मान्य आपण काय हो थोडासा बदल करून खात रहायचे.
  • Log in or register to post comments
क
कापूसकोन्ड्या Tue, 04/18/2017 - 03:59 नवीन
अगदी अगदी मान्य आपण काय हो थोडासा बदल करून खात रहायचे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 04/17/2017 - 14:55 नवीन
ह्यालाच कैरीचा तक्कु म्हणतात काय ?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 04/17/2017 - 15:01 नवीन
तक्कूत भौतेक कांदा नसतो बे.
  • Log in or register to post comments
क
कापूसकोन्ड्या Tue, 04/18/2017 - 03:56 नवीन
तक्कूत भौतेक कांदा नसतो बे. खरं आहे. आमच्याकडे (सांगली तासगव कडे, तक्कू म्हणजे लाल मिर्च्या आणि फोडणी वगैरे घालून मुरवलेली चटणी त्यात मिरच्या तुकडे स्वरूपात असतात.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 04/18/2017 - 15:58 नवीन
तो छुंदा झाला
  • Log in or register to post comments
स
सरनौबत Mon, 04/17/2017 - 16:00 नवीन
आम्ही कांदा-कैरी ला च तक्कु म्हणतो. १ नंबर लागतो.
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 04/17/2017 - 16:14 नवीन
होय, कैरी कांदा किसून घेतला की तक्कूच!!
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 04/24/2017 - 18:35 नवीन
करेक्ट. तो तक्कु. चटणी मिक्सरमधुन काढतात. छुंदा आणखीन थोडा वेगळा असतो. ही पाकृ आवडली!
  • Log in or register to post comments
म
मोनाली Tue, 04/18/2017 - 07:27 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
क
केडी Tue, 04/18/2017 - 15:18 नवीन
मस्तच! नक्की करून बघणार!
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले Mon, 04/24/2017 - 16:23 नवीन
आम्ही टक्कू करतो त्यात कांदा घालत नाही. साधारण कृती अशी, कैरी किसून, त्यात गूळ, मीठ आणि थोडे तिखट घालून कालवायचे आणि वर मेथी मोहरी जिरं हिंग यांची चुरचुरीत फोडणी द्यायची. आंबट गोड चवीत सगळी मज्जा आहे. कांदा कैरी मध्ये पण तसेच, फक्त कांदा किसून अधिकचा. पांढरे कांदे (अलिबाग नागोठणे इकडे मिळतात ते) किसून त्यात कैरीचा किस, हिरवी मिरची ठेचून, मीठ आणि थोडी साखर घालून पण मस्त कांदा-कैरी होते. दिसायला एक्दम पांढरी शुभ्र आणि चवीला भन्नाट. चुंदा हा गुजराती गोड प्रकार आहे. त्याची बरणी ८ दिवस रोज उन्हात ठेवायची. सूर्याच्या उष्णतेने त्यातील साखर कैरीच्या किसात एकजीव होते आणि एक वेगळीच चव लागते.
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Tue, 04/25/2017 - 05:40 नवीन
चुंदा हा गुजराती गोड प्रकार आहे. त्याची बरणी ८ दिवस रोज उन्हात ठेवायची. सूर्याच्या उष्णतेने त्यातील साखर कैरीच्या किसात एकजीव होते आणि एक वेगळीच चव लागते.
एकदम आवडीचा पदार्थ
  • Log in or register to post comments
म
मनिमौ गुरुवार, 05/04/2017 - 07:13 नवीन
डब्यात आणली आहे चटणी. लसूण घालून कधीच करत नाही. एकदा पहाते तशी करून
  • Log in or register to post comments
प
पियुशा गुरुवार, 05/04/2017 - 11:13 नवीन
म्ला फोतु नय दिसत :(
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 42 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा