Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

व्हेज कुर्मा

स
सविता००१
Tue, 03/21/2017 - 08:46

बरेच दिवस हॉटेल मध्ये मिळतो तसा व्हेज कुर्मा करून पहायचा असं चाललं होतं. काल लागला मुहूर्त. तुम्हीही पहा कसा वाटतोय ते.

साहित्यः

१. प्रत्येकी एक वाटी फ्रेंच बीन्स - तिरके शंकरपाळ्याच्या आकारात कापून, गाजर आणि बटाटे सालं काढून, १ सेंमी च्या चौकोनी आकारात चिरून, फ्लॉवर- मध्यम आकाराचे तुरे काढून, मटार.- हे सारं गरम पाण्यात ४ मिनिटे ब्लांच करून लगेच थंड पाण्यात घालून चाळणीवर उपसून ठेवले.
२. पाककृती करायच्या आधी तासभर एक कप गरम पाण्यात ६-६ काजू, बदाम आणि १ चमचा खसखस भिजत घातली होती.
३. मध्यम आकाराचे दोन कांदे पातळ चिरून फ्राय पॅन मध्ये चमचाभर तेल घालून कुरकुरीत होईतो परतून घेतले.
४. मध्यम आकाराचे २ टोमॅटो- प्युरी करून घेतले.
५. तेल, प्रत्येकी एक चमचा जिरं, आलं लसूण पेस्ट, तिखट, गरम मसाला, धने-जिरे पावडर, १/२ चमचा हळद, मीठ चवीनुसार.
६.१ तमालपत्र, १ दालचिनीची छोटी काडी (१/२ इंच), १ मसाला वेलची, ५-५ लवंगा, मिरीचे दाणे
७. २ चमचे दही आणि मूठभर पुदिना पाने धुवून, बारीक चिरून. सजावटीला चिरलेली कोथिंबिर.

कृती:

काजू, बदाम, खसखस बारीक वाटून घेतले. त्यातच परतलेला कांदा घालून परत एकदा अगदी गंधासारखं मऊ वाटून घेतले.
एका भांड्यात तेल गरम करून त्यात सगळा खडा मसाला आणि जिरे घातले. आलं लसूण पेस्ट आणि हा वाटलेला मसाला घालून छान परतले. मग त्यात टोमॅटो प्युरी घालून तेल सुटेतो परतून घेतले. त्यात तिखट, धने-जिरे पावडर, गरम मसाला घालून थोडंसं परतून त्यात दही घातले. बाजूने तेल सुटू लागल्यावर त्यात सगळ्या भाज्या, पुदिना पाने घालून थोडंसं पाणी घातलं. झाकण लावून ५ मिनिटे शिजवलं आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम पोळी बरोवर वाढलं.

.


  • Log in or register to post comments
  • 15074 views


वाचनखूण लावा
| 15074 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
क
केडी Tue, 03/21/2017 - 09:08 नवीन
एक नंबर!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 03/21/2017 - 09:11 नवीन
अरे बेस्टच सौताताई. . सांगलीला खाल्लेला नौरतन कोर्मा आठवला.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Tue, 03/21/2017 - 09:12 नवीन
सौता नाय रे स वि ता असं वेगवेगळं म्हणायचं आणि लिहायच रे. :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 03/21/2017 - 12:09 नवीन
पार्सल कर ग!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Tue, 03/21/2017 - 13:17 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 03/21/2017 - 13:44 नवीन
बेस्ट! ती लाल कलरची अक्षरही पोटात गेली का भाजीसोबत ? =))
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 03/22/2017 - 00:56 नवीन
मस्त ! ती लाल कलरची अक्षरही पोटात गेली का भाजीसोबत ? =)) =)) =)) =))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 3 पेग :- Kannada Rapper Chandan Shetty
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Tue, 03/21/2017 - 14:12 नवीन
पाककृती झकास, करुन पहायला हवा.
  • Log in or register to post comments
क
कौशी Tue, 03/21/2017 - 16:31 नवीन
व्हेज कुर्मा करून बघायला हवा...
  • Log in or register to post comments
क
कौशी Tue, 03/21/2017 - 16:31 नवीन
व्हेज कुर्मा करून बघायला हवा...
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 03/21/2017 - 19:51 नवीन
झकास पाकृ व फोटू.
  • Log in or register to post comments
ख
खादाड Wed, 03/22/2017 - 02:58 नवीन
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 03/22/2017 - 10:28 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments
ख
खादाड Wed, 03/22/2017 - 12:53 नवीन
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर गुरुवार, 04/06/2017 - 06:59 नवीन
मी करून पाहिली. करायला आणि खायला खूप मजा आली. धन्यवाद. फोटो -- Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ गुरुवार, 04/06/2017 - 13:38 नवीन
तुम्हाला आवडला ना... मग बास. आप खूष तो हम भी. पण फोटो मला दिसत नाहीयेत. बघायला आवडतील.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 04/07/2017 - 08:27 नवीन
फोटो काल दिसत होते. बघतो काय करता येईल ते
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 04/07/2017 - 09:06 नवीन
मी बनविलेला कुर्मा
  • Log in or register to post comments
र
रुपी Fri, 04/07/2017 - 20:01 नवीन
मस्त! नक्की करुन पाहणार. काजू, बदाम, खसखस यांची मी पूडच करुन ठेवत असते, त्यामुळे घाईच्या वेळी वापरता येते.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sat, 04/08/2017 - 11:44 नवीन
मस्तच हो. छान आलेत फोटो.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 04/21/2017 - 12:39 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 04/21/2017 - 12:39 नवीन
फ्लिकर वरून फोटो टाकता येत नाहीये.
  • Log in or register to post comments
व
विनिता००२ Sat, 04/22/2017 - 08:56 नवीन
करते मग सांगते :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 42 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा