Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

तंदूरी मलाई ब्रॉकोली

क
केडी
Fri, 03/17/2017 - 06:12

TMB1

साहित्य
५०० ग्रॅम ब्रॉकोली
१ कप किसलेले चेडार चीज
१ कप किसलेले प्रोसेसड चीज (अमुल)
१०० ग्रॅम फ्रेश क्रीम
६ ते ८ वेलदोडे
१५ ते २० काळेमिरे
२ मोठे चमचे लसूण पेस्ट
१ मोठा चमचा आलं पेस्ट
४ ते ६ हिरव्या मिरच्या (आवडीनुसार कमी जास्त करा)

कृती
एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. ब्रोकोलीचे मोठे तुकडे करून घ्या. पाण्याला उकळी आली की त्यात १ मोठा चमचा मीठ घालून, ब्रोकोली २ ते ३ मिनिटे गरम पाण्यात ब्लाँच करून घ्या. गरम पाण्यातून काढून, लगेच गार पाण्यात किंवा नळाखाली गार करून घ्या. ब्रोकोली निथळत ठेवा, तो पर्येंत इतर तयारी करून घ्या.

Step1 Step2

मिक्सर मधून, मिरच्या, आलं, लसूण, वेलदोड्याचे दाणे आणि काळीमिरी बारीक करून घ्या. एका भांड्यात, चीज, क्रीम आणि हि लसूण मिरची पेस्ट एकत्र करून घ्या. मिश्रणात चवीनुसार मीठ घालून, ब्रोकोली ह्या मिश्रणात १ ते २ तास मॅरीनेट करायला ठेवा.

Step3 Step4

ओव्हन, १८० ला प्री-हीट करून, हि ब्रोकोली १५ ते २० मिनिटे भाजून घ्या. कांदा, टोमॅटो बरोबर हि तंदुरी मलई ब्रोकोली गरमागरम वाढा!

Step5

चीज आणि क्रीम मुळे एक छान richness येतो ह्या डिशला! मिरच्या कमी घातल्या तर मुले देखील आनंदाने खातील. ब्रोकोली ऐवजी, बोनलेस चिकन चे तुकडे वापरून ह्याच पद्धतीने केलेला मलई चिकन टिक्का सुद्धा सुंदर लागतो! क्रीम आणि चीज बेस्ड डिश असल्यामुळे, एखाद्या लाम्बरूस्को, जिनफन्डेल किंवा कॅबरने वाईन सोबत अजूनच मज्जा येईल!

TMB2


  • Log in or register to post comments
  • 13076 views


वाचनखूण लावा
| 13076 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
र
रुस्तम Fri, 03/17/2017 - 06:41 नवीन
सकाळी सकाळी अत्याचार
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Fri, 03/17/2017 - 07:58 नवीन
खल्लास!!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 03/17/2017 - 09:52 नवीन
क्लास्स!!
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 03/17/2017 - 11:13 नवीन
पाकृ आवडली.
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 03/17/2017 - 11:20 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 03/17/2017 - 11:40 नवीन
लव्हली !
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 03/17/2017 - 12:05 नवीन
मॅरीनेट करायला ठेवलंय. रात्री आल्यावर हाच मेनू.
  • Log in or register to post comments
क
केडी Fri, 03/17/2017 - 13:07 नवीन
नं विसरता फोटो काढून इथे टाका, आणि कसे झालेले हे पण लिहा... _/\_
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 03/18/2017 - 06:05 नवीन
फोटू
  • Log in or register to post comments
क
केडी Sat, 03/18/2017 - 12:46 नवीन
कॉर्न आणि कांद्याची आयडिया भारी! फोटो छान!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 03/18/2017 - 06:08 नवीन
छान झालेलं. ब्रोकोली कमी होता म्हणून मका आणि कांदा पण घातला. फोटो पहिल्यांयांदाच अपलोड करतेय.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/17/2017 - 14:31 नवीन
दुष्ट. दुष्ट!
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 03/17/2017 - 17:36 नवीन
आम्ही जरा कुठे डाएट करावं म्हटलं की हे दुष्ट लोक क्रीम चीज घेऊन आलेच म्हणून समजा!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 03/18/2017 - 06:10 नवीन
अगं किटो डाएट मध्ये हेच खायचं असतं. बिनधास्त खा.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 03/18/2017 - 06:10 नवीन
अगं किटो डाएट मध्ये हेच खायचं असतं. बिनधास्त खा.
  • Log in or register to post comments
स
सावत्या Fri, 03/17/2017 - 18:17 नवीन
उत्तम पाककृती !!! पण ब्रोकोली आणि चीझ विथ क्रिम.... डायटेशन ला हार्ट अटॅक येईल हो...
  • Log in or register to post comments
क
केडी Sat, 03/18/2017 - 04:07 नवीन
ला पण खाऊ घाला मग....:-)) :-))
  • Log in or register to post comments
आ
आषाढ_दर्द_गाणे Sat, 03/18/2017 - 00:27 नवीन
करून पाहण्यात येईल, पण वजन कमी झाले की(च)
  • Log in or register to post comments
क
केडी Sat, 03/18/2017 - 04:09 नवीन
अहो एकदाच करून बघा....चवीला खाऊन बघा, Weight and Age are mere damn numbers! :-)) :-))
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sat, 03/18/2017 - 05:20 नवीन
ओव्हन नाही माझ्याकडे. तू कर आणि बोलव मला. ते जास्त सोप्पंय.. ओव्हन नसेल तर नाही होणार का रे?
  • Log in or register to post comments
क
केडी Sat, 03/18/2017 - 12:43 नवीन
तव्यावर (ग्रील पॅन) वर भाजून बघ...
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Sat, 03/18/2017 - 10:55 नवीन
मस्त, मस्त!मस्तच!
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 03/18/2017 - 11:20 नवीन
नक्की करून बघणार!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 03/19/2017 - 17:47 नवीन
दिसते आहे. करेन एकदा फुरसतीत. (फुरसतीत करायच्या, स्वत:ला आग्रह करून करायच्या गोष्टींची यादी वाढते आहे.) स्वाती
  • Log in or register to post comments
ब
बरखा Tue, 03/21/2017 - 12:29 नवीन
ब्रोकोली आवडते, नक्की करुन बघणार
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 03/22/2017 - 00:54 नवीन
आहाहा... भूक लागली ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 3 पेग :- Kannada Rapper Chandan Shetty
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 15 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 27 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 29 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 31 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 34 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा