मुहुर्त बघणे ,हे शास्त्र आहे कि थोतांड?
मुहुर्त बघणे हा भारतीय लोकांचे एक आवडता विषय आहे. साडेतीन मुहुर्त ,गोरज मुहुर्त असे मुहुर्ताचे अनेक प्रकार असतात म्हणे,
काही दिवसांपुर्वी माझ्या मित्राच्या दुकानाचे उद्घाटन होते, त्याने मुहुर्त वगैरे बघितला नसल्याने अनेकजण आश्चर्य व्यक्त करत होते. यावरुन मला काही प्रश्न पडले आहेत. जाणकारांनी प्रकाश टाकावा.
1.मुहुर्तावर कार्यारंभ करण्याची सुरवात कधी झाली असावी?
2.मुहुर्तावर आरंभलेली कार्ये तडीस जातात म्हणे, याचा काही विदा आहे काय ?
3.भारतीय सोडले तर इतर जग मुहुर्ताच्या फंदात पडत नाही ,तरीही ते भारतापेक्षा प्रगत कसे?
4.पेशवाईचा पराभव मुहुर्त बघण्याच्या नादापायी झाला होता. ३१ डीसेंबर १८१७ रोजी पेशवे भीमा कोरेगाव इथे इंग्रजांवर हल्ला करणार होते ,परंतु पेशव्यांच्या पुरोहितांनी दुसर्या दिवशीचा मुहुर्त शुभ असल्याचे सांगितले व जोशात असलेले सैन्य पेशव्यांनी लढाईपासून रोखले .ही बातमी इंग्रजांचा सेनापती एलफिन्स्टनला समजल्यानंतर त्याने झोपलेल्या गाफील मराठ्यांवर हल्ला करुन मराठा साम्राज्य अस्ताला नेले. मराठेशाहीचा अस्त मुहुर्ताच्या वेडापायी झाला .
एकढा अनर्थ मुहुर्त बघण्याने होत असेल तर लोक मुहुर्त का बघतात???
🗣 चर्चा
(113)
प
प्रसाद गोडबोले
Tue, 01/14/2014 - 13:49
नवीन
का काथ्याकुट काढताना तुम्ही मुहुर्त पाहिला होतात का ?
नाही आपलं आज संक्रांत आहे म्हणुन विचारलं शिवाय
ही वेळ आज प्लुटोकालात येते , प्लुटोकालात केलेल्या गोष्टी सहसा रेंगाळतात ...
स
सचीन
गुरुवार, 01/16/2014 - 12:50
नवीन
का काथ्याकुट काढताना तुम्ही मुहुर्त पाहिला होतात का ?
नाही आपलं आज संक्रांत आहे म्हणुन विचारलं शिवाय
ही वेळ आज प्लुटोकालात येते , प्लुटोकालात केलेल्या गोष्टी सहसा रेंगाळतात ...
>>>>>>>>>>>>>> बघा हेही चुकले धाग्याने २ दिवसात शंभरी साजरी केली
प
प्यारे१
गुरुवार, 01/16/2014 - 13:06
नवीन
त्यालाच रेंगाळणं म्हणतात!
ब्रॅडमॅन नं एका दिवसात त्रिशतक केलेलं.
नि गविंच्या धाग्यानं ४ तासात शतक केलेलं आहे.
बाबा पाटील तर मटण खाऊन दोन तास झोपले नि परत येऊन बघतात तर इकडे शतक!
काळ खराब हो खराब!
बाबांनी मटण खाण्याआधी मुहुर्त पाह्यलेला का विचारा त्यांनाच. ;)
प
प्यारे१
गुरुवार, 01/16/2014 - 13:07
नवीन
सचीनशेठ, 'तुमचा' काळ खराब हो खराब!
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 01/14/2014 - 14:13
नवीन
नव्या बाटलीत जुनी दारू..
तस्मात... त्वांड गोड करा!

प
प्यारे१
Wed, 01/15/2014 - 11:31
नवीन
>>> त्वांड गोड करा!
खिक्क्क्क्क.
स
सचीन
Tue, 01/14/2014 - 14:14
नवीन
मला तरी मुहूर्त थोतांड वाटते.
पण तुम्ही योग्य जागी हा प्रश्न उपस्तिथ केलात तुमच्या सर्व शंकांना इथले तज्ञ व्यक्ती उत्तरे देवू शकतात.
अ
अत्रन्गि पाउस
Tue, 01/14/2014 - 14:20
नवीन
पेशवाईतले विजय मुहुर्त बघूनच झाले असावेत...
आणि प्रगत देशांमधील म्हणाल तर चांगल्या कामाला १३ तारीख / आकडा सहसा टाळतात असे ऐकून आहे त्याला मुहूर्तच म्हणावे कि आणि काही?
शेवटी हे सिद्धांत किंवा गृहीतके आहेत पटली तर घ्या नही तर सोडून द्या
जाता जाता : समजा उद्या केम्ब्रिज / हार्वर्ड अश्या एखाद्या विद्यापीठात 'मुहूर्त' विषयावर संशोधन होऊन हा एक अलौकिक प्रकार आहे असे सिध्द झाले तर आपलं म्हणणं सध्या आहे तेच राहील का बदलेल?
ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर
Tue, 01/14/2014 - 15:01
नवीन
अन्धश्रद्धा म्हनाव
बदलेल
अ
अत्रन्गि पाउस
Tue, 01/14/2014 - 17:31
नवीन
का बुवा???
अ
अत्रन्गि पाउस
Tue, 01/14/2014 - 17:32
नवीन
ह्यावर काय म्हणणे आहे आपले?
ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर
Tue, 01/14/2014 - 17:49
नवीन
सायंटीफीक रीडक्शनीस्ट एप्रोच वापरुन कार्यकारण भाव स्पष्ट केल्यास विश्वास ठेवण्यात मला अडचण नाही.
अ
अत्रन्गि पाउस
Tue, 01/14/2014 - 18:04
नवीन
"सायंटीफीक रीडक्शनीस्ट एप्रोचं" वगैरे फार जड आहे हो
म्हणजे एखाद्या प्रत्यक्ष अनुभवाला किंवा नवीन कल्पनेला तिकडून(किंवा त्या विचारधारेकडून) प्रमाणपत्र मिळत नही तो पर्यंत आपण स्वीकारत नही का?
ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर
Tue, 01/14/2014 - 18:08
नवीन
प्रमाणपत्र इकडचे किंवा तिकडचे असे नसते हो ,ते फक्त 'शास्त्रीय' असते...
अ
अत्रन्गि पाउस
Tue, 01/14/2014 - 18:21
नवीन
आपली व्याख्या काय?
आणि
पेशवाईतले विजय मुहुर्त बघूनच झाले असावेत... ह्या विधानावर आपले काय म्हणणे आहे?
आ
आनन्दा
Wed, 01/15/2014 - 08:41
नवीन
पेशवाई बुडाली ती पण मुहुर्त चुकल्यामुळे का?
काय राव..
अ
अत्रन्गि पाउस
Tue, 01/14/2014 - 18:07
नवीन
ह्यावर काय म्हणणे आहे आपले?
आ
आयुर्हित
Tue, 01/14/2014 - 18:26
नवीन
सायंटीफीक रीडक्शनीस्ट एप्रोच वापरुन कार्यकारण भाव म्हणजे काय?
आम्हाला layman समजून, सोप्या भाषेत जरा अधिक समजावून सागितले तर बरं होईल.
आपला मिपास्नेही: आयुर्हीत
आ
आनंदी गोपाळ
Tue, 01/14/2014 - 20:40
नवीन
गूगल नामक एक लै भारी सुविधा आपल्या सारख्या लेमन साठीच उपलब्ध आहे.
अभिनंदन, नव्या युगात जन्माला आल्याबद्दल ;)
प
प्रसाद१९७१
Tue, 01/14/2014 - 14:30
नवीन
आंतर जालावर घासुन घासुन कंटाळा आलेले विषय काय काढताय?
ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर
Tue, 01/14/2014 - 15:11
नवीन
या विश्यावर एकतरि धागा दाखवा ,माझ्या मते हा पहिलाच धागा असावा.
स
सूड
Tue, 01/14/2014 - 16:45
नवीन
ओक्के, तुम्हीच पयले. खुश??
ज
जेपी
Tue, 01/14/2014 - 15:28
नवीन
पुर्ण प्रतिसाद देण्यासाठी मुर्हुत शोधतोय .
ख
खटपट्या
Tue, 01/14/2014 - 18:46
नवीन
शिवाजी महाराजांनी कोणतीच लढाई मुहूर्त बघून लढली नव्हती.
आ
आयुर्हित
Tue, 01/14/2014 - 18:47
नवीन
मुहुर्त बघणे हे एक शास्त्र आहे असे माझे ठाम मत आहे.
मुहुर्त बघणे, हा आपल्या सर्व सामान्य माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भागच बनला आहे.
पूर्वी जसे राजवैद्य असावयाचे तसेच राज ज्योतिषी हि असायचे असे ऐकिवात आहे.
आजकालच्या जमान्यात ह्याचा संपूर्ण अभ्यास असलेली व्यक्ती मिळणे अवघड नाही.
गर्भाधान हा संस्कार काही मुहूर्तावरच जास्त चागला/फायद्याचा ठरतो.(पौष महिना याला वर्ज्य आहे असे वाटते)
पण आपल्यासारखे करंटे आपणच! इतका छान विषय असूनही यावर पूर्ण संशोधन होऊ शकत नाही हे दुर्भाग्यच.
मिपावर ही नक्कीच ह्या विषयी मार्ग दर्शन मिळेल अशी अपेक्षा आहे.
आपला मिपास्नेही : आयुर्हीत
ता.क. एक अनुभव आहे, एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त उपग्रह satellite सोडले जातात.
ध
धन्या
Tue, 01/14/2014 - 19:26
नवीन
जास्त चांगला किंवा फायद्याचा म्हणजे कसा? पौष महिना वर्ज्य आहे म्हणजे काय?
संशोधन करायचे म्हणजे नेमके काय करायचे?
या विधानाला समर्थन देणारा विदा आहे का तुमच्याकडे?
आ
आयुर्हित
Tue, 01/14/2014 - 20:04
नवीन
संशोधन करायचे म्हणजे नेमके काय करायचे?
तुम्हाला व सर्व सामान्यांना पडणारे प्रश्न कोणते? त्याची समर्पक उत्तरे शोधून त्याकरणे मागची शास्त्रीय करणे शोधून सर्वांसमोर मांडायची!
असे केल्यास इतर दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळतील.
सध्या माझे संशोधन मधुमेहावर सुरु आहे, त्यामुळे आपण स्वत:व इतर मिपाकर यांनी लक्ष घातल्यास बरे होईल.
आपला मिपास्नेही: आयुर्हीत
आ
आनंदी गोपाळ
Tue, 01/14/2014 - 20:40
नवीन
अहो लेमन,
शास्त्रीय कारणे म्हणजे काय?
सांगता का जरा?
च
चौकटराजा
Wed, 01/15/2014 - 04:24
नवीन
मुहुर्त बघणे हे एक शास्त्र आहे असे माझे ठाम मत आहे.
माझेही असेच मत आहे. शुभकार्यासाठी कोणताही क्षण चांगल्या मुहूर्ताचा असतो असे मी ही मानतो. मी माझी एम ८० ही गाडी पितृपंधरवड्यात खरेदी केली आहे व १८ वर्षात काहीही संकट नाही.
एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त उपग्रह satellite सोडले जातात.
असतील. कारण एकादशीला ही काही खगोलशास्त्रीय अर्थ असू शकेल. जसा अमावास्येला आहे.
ज्योतिष शास्त्रावर त्याच्या विरोधकानी नाही तर त्याच्या पाठीराख्यानी संशीधन करावयाचे आहे.त्यात करंटेपण त्यांचे आहे विरोधकांचे नव्हे.
व
विनोद१८
Tue, 01/14/2014 - 18:58
नवीन
हे अगदी खरे, तसा कोणी दावा केला आहे का ?? नसेल तर महाराजाना या चर्चेत न ओढलेलेच बरे.
विनोद१८
ख
खटपट्या
Wed, 01/15/2014 - 03:42
नवीन
महाराजांना यात ओढायचा अजिबात हेतू नाही. बऱ्याच थोर माणसांनी मुहूर्त विचारात घेतले नाहीत एवढेच म्हणायचे आहे.
बाकी चालुदे…
प
प्रसाद गोडबोले
Wed, 01/15/2014 - 06:40
नवीन
लढाई हा शब्द विसरलात ... फक्त लढाई साठी मुहुर्त बघितले नाहीत ....
बाकी सुवर्णतुला , राज्याभिषेक , सिंधुदुर्गाचे पायाभरणी , रायगडावर राजधानी हलवणे , दक्षिण दिग्विजया करिता घराबाहेर पडणे अशा अगणित गोष्टींसाठी महाराजांनी मुहुर्त नक्कीच बघितले असणार ..
ख
खटपट्या
Wed, 01/15/2014 - 17:47
नवीन
असू शकेल, जाणकार सांगतीलच (पण ते विषयांतर होईल परत)
म
मनीषा
Wed, 01/15/2014 - 04:15
नवीन
पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे..
पण शास्त्रीय कसोट्यांवर खरी ठरताना दिसत नाही.
चांगले मुहुर्त पाहून केलेले विवाह अयशस्वी होताना दिसतात. हे एक चटकन आठवणारे उदाहरण . अशी अनेक देता येतील.
माझ्या माहितीतील एकजण शनिवारी कुठलेही नविन काम्/कार्य सुरू करित नसत (म्हणजे अजूनही करत नसतील) कारण म्हणे न कर्त्याचा वार शनिवार. पण शनिवारी सुरू केलेले काम अयशस्वीच होते आणि इतर दिवशी केलेली यशस्वीच होतात असे काही मला अढळले नाही.
न्युमरॉलॉजी बद्दल आपले काय मत आहे?
प
पैसा
Wed, 01/15/2014 - 05:20
नवीन
१) मुहूर्त बघणे
२) पेशव्यांनी मुहूर्त बघणे
आणखी काही प्रश्न
३) याच लढाईची निवड करण्याचे कारण?
४) मुहूर्त पाहिल्यामुळे लढाई पुढे ढकलली असं बखरी सोडून एखाद्या पत्रात वगैरे लिहिले आहे का?
५) दुसरा बाजीराव युद्धतज्ञ नव्हता हे तुम्हाला माहिती आहे का?
६) पहिल्या बाजीरावाबद्दल आणि माधवराव पेशव्यांबद्दल तुमचे काय मत आहे?
७) पुन्हा सवर्ण/दलित वाद उकरून काढायचा आहे का? (कारण या लढाईचा तसा वापर काही लोक करतात)
८) फक्त पेशवेच मुहूर्त बघत असत का?
९) एक वैयक्तिक वाटू शकेल असा प्रश्न. तुमच्या घरात तुम्ही मुहूर्त पाहून काही करता का?
चर्चा प्रस्ताव ठेवताना तो काही पुरावे वगैरे देऊन आणि प्रत्येक मुद्द्यावर स्वतःचे अनुभव/माहिती/मते मांडून परिपूर्ण असावा याची कृपया काळजी घ्यावी. नाहीतर त्याला अनेक तर्हेचे फाटे फुटतात. अर्थात तसेच काही घडावे हा तुमचा उद्देश असेल तर संपूर्ण प्रतिसाद मागे घेत आहे.
(क्रमशः)
प
प्रभाकर पेठकर
Wed, 01/15/2014 - 05:33
नवीन
हायला! प्रतिसादाला 'क्रमशः'?
ख
खटपट्या
Wed, 01/15/2014 - 06:12
नवीन
*ROFL*
ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर
Wed, 01/15/2014 - 05:44
नवीन
तुम्ही समजता तसे काही नाही, पेशवाईचा अस्त ही एक विलक्षण घटना आहे ,म्हणून ते उदाहरण दिले आहे.
उ
उद्दाम
Wed, 01/15/2014 - 06:17
नवीन
जवळपास सगळी हिंदु लग्ने मुहुर्तावर होतात. त्यातली किती यशस्वी होतात? इतके एकच उदाहरण पुरेसे नाही का?
-- मुहुर्तावर लगीन करुनही पस्तावलेला उद्दाम.
म
मृत्युन्जय
Wed, 01/15/2014 - 06:48
नवीन
आयला तुमचे मत मुहुर्ताच्या बाजुने पडेल असे वाटले नव्हते.
प
पैसा
गुरुवार, 01/16/2014 - 12:13
नवीन
:ROFL:
व
विटेकर
Wed, 01/15/2014 - 06:30
नवीन
आम्ही दासबोध उघडायला मुहुर्त पाहात नाही .. पण वैधृति आणि व्यतिपात हा मुहुर्तावर शुभ कार्याची सुरुवात करणारा मूर्ख आहे असे समर्थांचे सांगणे आहे !
वैधृति आणी वितिपात| नाना कुमुहूर्तें जात |अपशकुनें करी घात| तो येक मूर्ख ||२-१-३६||
त्याचबरोबर शकुन या गोष्टिवर त्यांचा विश्वास नाही , तो भ्रम आहे असे त्यांचे म्ह्णणे आहे..
दुश्चिन्हें अथवा अपशकुन| मिथ्या वार्तेनें भंगे मन |वचके पदार्थ देखोन| या नांव भ्रम ||१०-६-२०||
ब
बॅटमॅन
Wed, 01/15/2014 - 08:16
नवीन
समर्थ इथे स्वतःलाच काँट्रॅडिक्ट करताहेत असे वाटते.
व
विटेकर
Wed, 01/15/2014 - 08:37
नवीन
दासबोधात ते अनेक ठिकाणी परस्परविरोधी लिहितात ! म्हणून तर त्यांनी आपल्याला " विवेक" दिला आहे .
लगेच लक्षात येणारे उदाहरण म्हणजे एकाच ओवीत समर्थ लिहितात:
परंपरा तोडूं नये| उपाधी मोडूं देऊं नये |ज्ञानमार्गे सोडूं नये| कदाकाळीं ||१४-१-२६||
आणि त्याच समासात लगेचच्याच ओवीत लिहितात
कांहीं उपाधी करूं नये| केली तरी धरूं नये |धरिली तरी सांपडों नये| उपाधीमध्यें ||१४-१-३०||
एका त्या अंतिम सत्याशिवाय बाकेची सारी सत्ये ( भासमान ) ही सापेक्ष असतात, अपूर्ण असतात आणि म्हणूनच त्यांनी विवेकाची कास धरुन योग्य निर्णय करा असे सांगितले आहे!
विवेकामधें सापडेना| ऐसें तो कांहींच असेना |येकांतीं विवेक अनुमाना| आणून सोडी ||१९-६-२८||
दासबोधामध्ये विवेक हा शब्द २१० वेळा आलेला आहे !!
ब
बॅटमॅन
Wed, 01/15/2014 - 10:09
नवीन
विटेकरजी अन प्रसादः मला मारकुट्यांचे म्हण्णे पटते आहे. वेगवेगळ्या कालखंडात ग्रंथ लिहिला गेला असल्याने मतपरिवर्तन होणे शक्य आहे अगदी. शिवाय संदर्भानुरूप ते ते वचन पाहिले पाहिजे हेही पटते. आपल्या दोघांच्या विवेचनाबद्दल धन्यवाद.
प
प्रसाद गोडबोले
Wed, 01/15/2014 - 08:41
नवीन
माझ्यामते समर्थांचे बहुतांश वाङ्मय हे ३ पातळीवरचे आहे ...
१) ठार मुर्ख लोकांसाठी
२) सर्वसामान्य प्रापंचिक मुमुक्षुंसाठी
३) अध्यात्ममार्गात बर्यापैकी उन्नत झालेल्या साधकांसाठी
वरील पैकी एक एक श्लोक मुमुक्षुंसाठी आहे तर दुसरा साधकांसाठी ....त्यामुळे मलातरी वरील श्लोकात काही कॉन्ट्रॅडिक्शन वाटले नाही .
(अवांतर : असे वरकरणी कॉन्ट्रॅडिक्शन वाटेल असे अनेक श्लोक सापडतील , रादर एका लेव्हलच्या लोकांकरीता लिहिलेला श्लोक दुसर्या लेव्हलच्या लोकांकरिता डिझास्टर ठरु शकेल ...तेव्हा आधी आपली लेव्हल ओळखणे महत्वाचे !
उदाहरणार्थ : "ज्ञान आणि अज्ञान | दोन्ही वृती रुपे समान || श्रीराम|| " हा श्लोक साधकावस्थेतील लोकांसाठी आहे , तो जर मुर्ख किंव्वा मुमुक्षु लोकांनी गृहीत धरला तर त्यांची वाटच लागेल .)
|अधिकार नसता लिहिले | क्षमा केली पाहिजे ||
म
मारकुटे
Wed, 01/15/2014 - 08:43
नवीन
इतर कुठल्याही धर्मग्रंथाप्रमाणेच दासबोध वेगवेगळ्या काळात, मनस्थितीत आणि परिस्थितीत लिहिला गेला आहे त्यामुळे काही असे गंमतीशीर विधाने आढळतात.
श
शशिकांत ओक
Wed, 01/15/2014 - 07:02
नवीन
मुहुरत पाहून विवाह किंवा सिनेमा यशस्वी होताना दिसत नाही... हे खरे
चांगला या शब्दाने जरा घोळ होतोय असे मानले तर?
पुढील घटनांच्या वाईट परिणामांचा प्रादुर्भाव कमी व्हावा असे वाटून त्यातल्या त्यात कमी नुकसान दायक असा 'चांगला' मुहुर्त पकडणे अभिप्रेत असू शकते.
काळ सदा समान आहे. परंतु प्रत्येका गोष्टीला एक विशिष्ठ समय येतो. मुहुर्त फार चांगला म्हणून कोणी विवाहयोग्य वय नसेल तर लग्नाचा घाट घालत नाही. बहार ही निसर्गतः विशिष्ठ त्या हंगामात येते.
मानवी जीवनात काही आडाखे रचून त्यानुसार काही केले तर कमी धोका किंवा नुकसान होईल असा ही विचार त्यामागे असावा.
गुरूपुष्ययोगावर सोने किवा तत्सम मालमत्ता घरात आणून व्यक्तीची वा प्रतिष्ठेची शोभा वाढावी म्हणून खरेदी केली जाते. विविध सण वा जत्रा, किंवा मेळावे भरवताना सिंक्रॉनिसिटीचे कारण असावे. एकाच कामासाठी अनेकांच्या मानसिक लहरी एकत्र आल्याने एक वेगळे प्रभाववलय तयार होते. दिंडीतून वा जत्रातून विशिष्ठ धार्मिक स्थळांना जाताना केला जाणारा नाम घोष वा करबल्याच्या भीषण कत्तलीची आठवण म्हणून छातीवर हातानी आघात करून केली जाणारी सांघिक साश्रु आठवण यातून एक मानसिक एकात्मता निर्माण होते. ती व्यक्तीच्या प्रभाव वलयातून झटपट कार्य करते असे वाटून प्राचीनकाळापासून कुंभ वा हज सारख्या यात्रा विशिष्ठ तास, दिवस, महिन्यांच्या मुहुर्तावर साकारल्या जातात असे ही विचार करता वाटते. अशा घटनांचा मानसिक प्रभाव मोजायचे एखादे यंत्र वा परिमाण प्रगत झाले तर या प्रभावाला पुरावा मिळेल तोवर याकडे समजून घ्यायच्या गोष्टी असे मानावे लागेल.
च
चौकटराजा
Wed, 01/15/2014 - 07:35
नवीन
विविध सण वा जत्रा, किंवा मेळावे भरवताना सिंक्रॉनिसिटीचे कारण असावे हे पटले. पण सणवार व खाजगी जीवन वेगळे असते. एखादे लग्न व पूजा एका मर्यादित जनसमुदायाची गरज असते . एक सण फार मोठ्या प्रमाणावर जनांचे कार्य वा हालचाल घडवीत असतो. लोक दसर्याच्या दिवशी भारलेपणाचे मंगलमय होतात. हा एक मानसिक प्रयोग असतो रूढीने केलेला.
रूढी माणसासाठी आहेत माणूस रूढीसाठी नाही हे पटले की गणवेश ,तिरंगा, घोष, राष्ट्रगीत यांचे महत्व कमी होऊन उत्कट देशप्रेम महत्वाचे ठरते. सर्व सणाना दिखाउ सिंक्रॉनिसिटी येऊन उपयोगी नाही. मूळ हेतू साध्य होणे आवश्यक असते. असो हे थोडे विषयांतर झाले खरे !
म
मारकुटे
Wed, 01/15/2014 - 07:05
नवीन
तोच विषय तोच मुद्दा तीच व्यक्ती आयडी वेगळा !
पकडले गेले बघा तुम्ही ... आयडी तयार करण्याचा मुहूर्त चुकला
- 1
- 2
- 3
- ›
- »