Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मुहुर्त बघणे ,हे शास्त्र आहे कि थोतांड?

ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर
Tue, 01/14/2014 - 13:41
🗣 113 प्रतिसाद
मुहुर्त बघणे हा भारतीय लोकांचे एक आवडता विषय आहे. साडेतीन मुहुर्त ,गोरज मुहुर्त असे मुहुर्ताचे अनेक प्रकार असतात म्हणे, काही दिवसांपुर्वी माझ्या मित्राच्या दुकानाचे उद्घाटन होते, त्याने मुहुर्त वगैरे बघितला नसल्याने अनेकजण आश्चर्य व्यक्त करत होते. यावरुन मला काही प्रश्न पडले आहेत. जाणकारांनी प्रकाश टाकावा. 1.मुहुर्तावर कार्यारंभ करण्याची सुरवात कधी झाली असावी? 2.मुहुर्तावर आरंभलेली कार्ये तडीस जातात म्हणे, याचा काही विदा आहे काय ? 3.भारतीय सोडले तर इतर जग मुहुर्ताच्या फंदात पडत नाही ,तरीही ते भारतापेक्षा प्रगत कसे? 4.पेशवाईचा पराभव मुहुर्त बघण्याच्या नादापायी झाला होता. ३१ डीसेंबर १८१७ रोजी पेशवे भीमा कोरेगाव इथे इंग्रजांवर हल्ला करणार होते ,परंतु पेशव्यांच्या पुरोहितांनी दुसर्या दिवशीचा मुहुर्त शुभ असल्याचे सांगितले व जोशात असलेले सैन्य पेशव्यांनी लढाईपासून रोखले .ही बातमी इंग्रजांचा सेनापती एलफिन्स्टनला समजल्यानंतर त्याने झोपलेल्या गाफील मराठ्यांवर हल्ला करुन मराठा साम्राज्य अस्ताला नेले. मराठेशाहीचा अस्त मुहुर्ताच्या वेडापायी झाला . एकढा अनर्थ मुहुर्त बघण्याने होत असेल तर लोक मुहुर्त का बघतात???

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • 24008 views

🗣 चर्चा (113)
ग
गब्रिएल गुरुवार, 01/16/2014 - 17:51 नवीन
सचीन कवाधर्न तुमची रेकाट बिगाडलीय. त्ये जून्या गोल्गोल फिरनार्‍या रेकाटिसार्क त्येच त्येच परत परत कानग्रिस कान्ग्रिस गातीया. दिल्लिचि माय्बी वाचत अस्ती तर लईच बोर झाली अस्ती. त्या रेकाटीला जर्रा भंगारात टाका नायतर भंगार माल दुरुस्त करनारा एकादा लाला गाटा आनी विकून चार पयश्ये गाटिला बांदा बर्का.
न
नाखु गुरुवार, 01/16/2014 - 10:29 नवीन
मंदार भाऊ जर पेशवे हरले नसते तर ईंग्रज आले नसते आणि ट्रेन धावली नसती म्हणजे ट्रेन येण्यासाठी किति मोठा त्याग पेशव्यांनी केला हेच मिपा कुकेंना सूचीत करायचे आहे (आता या त्यागाकरिता कोण किरकोळ लोग मेले असतील तर तिकडे अज्जिबात लक्ष देऊ नका) वेब दुनियाला सशक्त पर्याय देणार्या कुकेनां धन्यवाद.
ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर गुरुवार, 01/16/2014 - 11:05 नवीन
पेशव्यांना व्यापार उदीम करायचाच नव्हता असा याचा अर्थ घ्यायचा का? शिवाजीराजेंनी आरमार ऊभे करुन इंग्रजांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले व दळणवळणाचे नवे क्षेत्र जनतेला दिले .आजच्या नेव्ही वगैरेची सुरवात राजेंनी केली होती ..काळाच्या पुढचे विचार...
स
सचीन गुरुवार, 01/16/2014 - 10:54 नवीन
१८१८ ला पुरा भारत इंग्रजांच्या ताब्यात आला आणि इंग्रजांच्या राज्यात लॉर्ड विल्यम बेंटिंकने ४ डिसेंबर १८२९ रोजी सती-बंदीचा कायदा केला आणि सती जाणे, हा फौजदारी गुन्हा म्हणून घोषित करण्यात आला.
उ
उडन खटोला गुरुवार, 01/16/2014 - 11:30 नवीन
तुम्ही काय इंग्रजांना भारतीय जनतेचे तारणहार वगैरे मानता की काय? असेल असेल ...तसेही असेल ... इटालीकरीण मॅडम आणी पप्पू बाबा पण भारतीय जनतेचे तारणहारच नाही का? विसरलोच तुमच्या मागच्या जिलब्या...............!
स
सचीन गुरुवार, 01/16/2014 - 11:59 नवीन
इंग्रजांनी जे काही चांगले काम केले त्याला चांगले म्हणण्यात कसला आलाय संकोच. सतीची प्रथा बंद पाडली हे काम चांगले नव्हते का?
म
मारकुटे गुरुवार, 01/16/2014 - 12:11 नवीन
सहमत आहे. फक्त प्रश्न इतकाच आहे की खरोखर सतीबंदी इंग्रजांमूळे झाली? खरोखर ती समस्या इत्की गंभीर होती? जाऊ द्या इअत्का विचार करण्यापेक्षा इंग्रज हुस्शार हेच मानावे अन डोक्यावर पांघरुण घेऊन झोपावे
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 01/16/2014 - 12:42 नवीन
इंग्रजांनी नक्कीच कित्येक चांगली कामे भारतात केली. पण म्हणून ते 'हुशार' आणि आपण 'मठ्ठ' ठरत नाही. भारतियांची सत्ता इंग्लंडावर प्रस्थापित झाली असती तर भारतियांनीही तिथे चार चांगली कामे केली असती.
च
चैतन्य ईन्या गुरुवार, 01/16/2014 - 12:33 नवीन
जगातील सर्वात बुद्धिमंत लोक इंग्रज.(अमेरिकन्स हेही मुळचे इंग्रज ).भारताने शून्याचा शोध लावला पण ह्या शून्याचे लाख पाश्चिमात्यानी केले.>>> हुशार नक्कीच आहे पण हुशारी पेक्षा स्वार्थी जास्त आहेत. अमेरिका ही इंज्राचीच आहे. त्यांनी मूळ रेड इंडिअन १.२ कोटी लोकांना मारले. संदर्भ आशिष नंदी, हा बाबा स्वतः बंगाली ख्रिश्चन आहे -- हे आपल्या माहिती साठी. ह्यांच्या हुशारीमुळे मानवाचे जीवनमान भरपूर वाढले पण जगात सगळीकडे युद्धे आणि दुसऱ्याची प्रचंड प्रमाणात पिळवणूक करणे ह्याच्वर हे अजूनही जगात आहेत. इराक आणि इराण काय आणि आता पाकिस्तान-अफगाणिस्तान सगळीकडे ह्यांनीच युद्धे केली फक्त तेलासाठी आणि नैसर्गिक साधन सामुग्रुसाठी. जगात गेले तिथे आधीच्या धर्माला नावे ठेवून स्वतःचाच धर्म कसा चांगला म्हणजे जे सगळे जेते करतात तेच त्यांनी केले. तेंव्हा नक्की काय पाहायचे ते तुमचे तुम्ही ठरवा. बाकी जाता जाता सध्या पर्यावरणाचा सगळ्यात जास्त ऱ्हास ह्याच लोकांनी केला आहे आणि आपण पुन्हा त्यांनाच आंधळेपणाने फॉलो करतो आहोत. एवढे तुमच्या सारख्या हुशार लोकांच्या कच्छपी आणि येत जात ब्राह्मण लोकांना जातीयवादी म्हणवणाऱ्या खऱ्या जातीयवाद्यांच्या लक्षात आले म्हणजे झाले.
स
सचीन गुरुवार, 01/16/2014 - 13:07 नवीन
अमेरिका आणि इंग्लंड दुष्ट आहेत हे पटले. मग का आपण आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतो? पोरगा किंवा सगा सोयरा अमेरिकेला गेला कि का आपल्याया कृतकृत्य वाटते?
म
मारकुटे गुरुवार, 01/16/2014 - 13:10 नवीन
डोक्यात पाणी झाले काय ? =)) =)) =))
च
चैतन्य ईन्या गुरुवार, 01/16/2014 - 13:11 नवीन
गम्मत वाटली तुमचे वरचे प्रश्न वाचून इतका वेळ तुम्हीच तर त्यांचे कौतुक करत होतात? आणि तसेही तुमचा सगळा रोख फक्त ब्राह्मण समाजावरच आहे. तेंव्हा नक्की काय ते ठरवा बुवा जातीयवादी कोणाला म्हणावे. नक्की कोण कसा काय हुशार आणि नक्की कोण कसा मुर्ख ते.
त
तुमचा अभिषेक गुरुवार, 01/16/2014 - 17:48 नवीन
ना शास्त्र ना थोतांड. हा एक व्यवसाय आहे. ज्याला जमतो तो कलाकार !
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 18 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 19 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 21 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 25 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा