Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मुहुर्त बघणे ,हे शास्त्र आहे कि थोतांड?

ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर
Tue, 01/14/2014 - 13:41
🗣 113 प्रतिसाद
मुहुर्त बघणे हा भारतीय लोकांचे एक आवडता विषय आहे. साडेतीन मुहुर्त ,गोरज मुहुर्त असे मुहुर्ताचे अनेक प्रकार असतात म्हणे, काही दिवसांपुर्वी माझ्या मित्राच्या दुकानाचे उद्घाटन होते, त्याने मुहुर्त वगैरे बघितला नसल्याने अनेकजण आश्चर्य व्यक्त करत होते. यावरुन मला काही प्रश्न पडले आहेत. जाणकारांनी प्रकाश टाकावा. 1.मुहुर्तावर कार्यारंभ करण्याची सुरवात कधी झाली असावी? 2.मुहुर्तावर आरंभलेली कार्ये तडीस जातात म्हणे, याचा काही विदा आहे काय ? 3.भारतीय सोडले तर इतर जग मुहुर्ताच्या फंदात पडत नाही ,तरीही ते भारतापेक्षा प्रगत कसे? 4.पेशवाईचा पराभव मुहुर्त बघण्याच्या नादापायी झाला होता. ३१ डीसेंबर १८१७ रोजी पेशवे भीमा कोरेगाव इथे इंग्रजांवर हल्ला करणार होते ,परंतु पेशव्यांच्या पुरोहितांनी दुसर्या दिवशीचा मुहुर्त शुभ असल्याचे सांगितले व जोशात असलेले सैन्य पेशव्यांनी लढाईपासून रोखले .ही बातमी इंग्रजांचा सेनापती एलफिन्स्टनला समजल्यानंतर त्याने झोपलेल्या गाफील मराठ्यांवर हल्ला करुन मराठा साम्राज्य अस्ताला नेले. मराठेशाहीचा अस्त मुहुर्ताच्या वेडापायी झाला . एकढा अनर्थ मुहुर्त बघण्याने होत असेल तर लोक मुहुर्त का बघतात???

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • 24008 views

🗣 चर्चा (113)
प
पैसा Wed, 01/15/2014 - 07:08 नवीन
टॉप गिअरमधल्या गाडीला एकदम ब्रेक लावताय का?
स
सूड Wed, 01/15/2014 - 10:03 नवीन
हो ना !! डुआयडी घ्यायची बिचार्‍याची इतकी इच्छा होती जरा हौस भागवून घेऊ देत म्हणावं.
स
सचीन Wed, 01/15/2014 - 10:21 नवीन
मुहूर्त न पाहणाऱ्या इंग्रजांनी जवळपास साऱ्या जगावर राज्य केल तर सदान कदा मुहूर्त पाहणारी पेशवाई हि हरून नष्ट झाली .
म
मारकुटे Wed, 01/15/2014 - 10:48 नवीन
एकंदर धागा पेशवाई कशी मुर्खांची होती आणि ईंग्रज कसे हुस्शार होते हे सांगायला काढला आहे असे दिसते. हल्ली एक इंग्रजप्रेमी सदस्य दिसत नाहीत....
स
सचीन Wed, 01/15/2014 - 10:57 नवीन
इंग्रज हे हुशार होते ह्यात वादच नाही.
स
सूड Wed, 01/15/2014 - 11:08 नवीन
मग हुशार इंग्रजांच्यात राहायला जा, तुमच्या दृष्टीने मागासलेल्या पेशव्यांच्या महाराष्ट्रात काय करताय?
म
मारकुटे Wed, 01/15/2014 - 11:09 नवीन
तुम्हाला हुशार करण्याचे असिधारा व्रत घेतले आहे त्यांनी ! असं बोलू नये... कान पकडून सॉरी म्हणा पटकन.
स
सूड Wed, 01/15/2014 - 11:13 नवीन
>>कान पकडून सॉरी म्हणा पटकन. मी त्यांचा कान पकडायला तयार आहे हो, पण व्हर्च्युअली कसा पकडणार कान?
ट
टवाळ कार्टा Wed, 01/15/2014 - 13:42 नवीन
खिक्क :)
अ
अनिरुद्ध प Wed, 01/15/2014 - 11:23 नवीन
+१ हेच लिहायला आलो होतो.
स
सचीन Wed, 01/15/2014 - 11:26 नवीन
कुठे राहायला जायचे ते नंतर बघू. पण इंग्रज हे हुशार होते हे नक्की.
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 01/15/2014 - 12:26 नवीन
@इंग्रज हे हुशार होते हे नक्की.>>> वादच नाही! हेच विधान "आपण मूर्ख होतो" असंही करता येतं... नै का?
स
सचीन Wed, 01/15/2014 - 12:56 नवीन
आपण हुशार होतो. पण इंग्रज आपल्याहूनही हुशार होते असाही ह्याचा अर्थ होतो.
च
चैतन्य ईन्या Wed, 01/15/2014 - 13:11 नवीन
आपल्याहूनही हां शब्द आधी घातला असता तरच वरचा अर्थ ध्वनित होतो बुवा नाहीतर फक्त "इंग्रज आपल्याहूनही हुशार होते असाही ह्याचा अर्थ होतो." एवढाच होतो ना आपण हुशार होतो किंवा मुर्ख होतो असा ध्वनित होतो.
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 01/15/2014 - 19:27 नवीन
@सचीन आपण हुशार होतो. पण इंग्रज आपल्याहूनही हुशार होते असाही ह्याचा अर्थ होतो.>>> थोडक्यात... तुंम्ही त्या मूर्खांपैकी एक नाहीत... असच तुंम्हाला म्हणायचय ना!?
व
विद्युत् बालक Wed, 01/15/2014 - 17:17 नवीन
अशी स्वतःच्या हुशारीची गुपिते जगजाहीर करू नयेत सचिन राव !
म
मारकुटे Wed, 01/15/2014 - 11:07 नवीन
चला तुम्ही खुश झाले ना ? इतिहासाची ऐशीतेशी.
ए
एम.जी. Wed, 01/15/2014 - 13:24 नवीन
आमच्या नवीन ऑफिसची उद्या पूजा आहे... सकाळी म्हणाजे भल्या पहाटे ४ वाजता " ज्यांना स्वारस्य आहे अशा लोकांनी तिथे यावे " अशी घोषणा मॅनेजमेंटने केली आहे... पहाटे ४ वाजताचा मुहूर्त यासाठी की पूजा सांगणार्‍याला पूजा आटोपून त्याच्या हापिसला पळायचे आहे.. अर्थात हे मला अकाउंट्समधील एकाने खाजगीरीत्या सांगितले... बाकीच्यांना मात्र मुहूर्त ४ वाजताचा आहे हे सांगताहेत... माझे ऑफिस कतारमधे आहे... कदाचित पूजेच्या वेळी पोलीस येऊ नयेत म्हणून पहाटे ४ वाजता उरकत असावेत.. असा माझा कयास आहे. म्हणजेच मुहूर्त बघणे हे शास्त्र असले तरीही सोयीचा मुहूर्त बघणे ही कला आहे..
प
परिंदा Wed, 01/15/2014 - 13:40 नवीन
मुहूर्त बघणे हे शास्त्र असले तरीही सोयीचा मुहूर्त बघणे ही कला आहे..
अगदी अगदी!! स्थळ जुळत असले, पसंत असले तर मग अगदी रिजेक्ट न करता ८ वा/१२ वा गुरु आहे त्यामुळे लग्न यावर्षी करता येत नाही वगैरे सांगतात. हिंदी सिनेमात तर मुहुर्त प्रकरण लैच असते, हिरवणीचा (अ-हिरो किंवा विलनशी)लग्नाचा मुहुर्त असा ठेवतात की हिरोला बरोबर वेळात स्वतःचा मुहुर्त साधता येईल. कुछ कुछ होता है मध्ये काजोल्-सलमानचा लग्नाचा मुहुर्त लांबणीवर पडणे कसे शारुखच्या पथ्यावर पडते तसे. या पिक्चरांचे पण शुटींग, रिलीज वगैरेचे मुहुर्त असतात म्हणे. रमजानात बहुतेक सिनेमा रिलीजचे मुहुर्त नसतात.
न
नाखु Wed, 01/15/2014 - 13:32 नवीन
सदान कदा मुहूर्त पाहणारी पेशवाई हि हरून नष्ट झाली . नेहमीप्रमाणे बेधडक बिना पुराव्याचे सरधोपट (जनरल) विधान. मिपा कु.के.आपले इतीहासाचे ज्ञान अचाट (मुल्यवान) आहे आणि ते जपून ठेवा (आपल्यापाशीच). मात्र कुठलाही धागा/विषय जात्-धर्म्-(जमल्यास संघ) यांचेपाशी आणून सोडण्याचे आपले कसब आ(वा)गळे आहे हे मात्र निर्विवाद..
प
परिंदा Wed, 01/15/2014 - 13:48 नवीन
मुहुर्त म्हणजे ठराविक गोष्टीसाठी योग्य वेळ जेणेकरुन ती गोष्ट सुरळीत पार पडेल. चातुर्मासात भारतात लग्नाचे मुहुर्त नसतात कारण पावसाळा असल्याने पूर्वी मंडप वगैरे घालणे, पुर आलेल्या नद्या वगैरे ओलांडणे असा प्रवास करणे कठीण होते, तसेच लोक शेतीच्या कामात गुंतलेले असत त्यामुळे दिवाळीनंतर(तुळशीच्या लग्नानंतर) लग्नाचे मुहुर्त ठेवत. हे मुहुर्तपण प्रांताप्रांतात वेगळे असतात. मराठी लोक सहसा दिवसा(फार फार तर गोरज मुहुर्तावर) लग्न करतात, तर उत्तरेत अगदी मध्यरात्री १-२ चे मुहुर्त असतात. सौथवाले बहुतेक पहाटेच लग्ने उरकतात. बाकी लढाई, आक्रमण वगैरेचा अनुभव नसल्याने त्यांच्या मुहुर्ताविषयी काही ठाऊक नै ब्वा!!
क
कंजूस गुरुवार, 01/16/2014 - 02:29 नवीन
इकडे एखादी नवीन गोष्ट सुरू केल्यावर लगेच काय बरेवाईट घडते याकडे लक्ष असते . पेशवाईचे म्हणाल तर तो १८१७चा बराच काळ त्या पेशव्याला वाईट असावा त्यातल्या त्यात जरा कमी नुकसानीचा मुहूर्त काढला असावा . मुहूर्त काढा अथवा नाही बरा वाईट काळ येतच असतो . १.चोर लोकपण चोरीला निघतांना काही शकून(=मुहूर्त ?)बघतात .वाईट शकून झाला तरी जावेच लागते .घर चालायला हवे ना . २मुहुर्तावर केलेली लग्नेदेखील फिसकटतात तरी परंपरा चालूच आहे . ३राज्याभिषेकानँतर लगेच जिजाऊचा मृत्यु ही गोष्ट शिवाजीला खंत देऊन गेली ,पुन्हा विधि करवला . ४मुहूर्त पाहाणे एखाद्याला पटले नाही तरी घरातल्या इतर चार जणांना हवे म्हणून त्याप्रमाणे तो जातो .
उ
उद्दाम गुरुवार, 01/16/2014 - 05:03 नवीन
शिवराज्याभिषेकानंतर जिजाऊ गेल्या, रायगडावर वीज पडून घोडे की पागा काहीतरी जळाला आणि कुठल्यातरी चकमकीत एक चांगला योद्धा कामी आला. इतक्या घटना एकदम घडल्या. ( चु भु दे घे)
ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर गुरुवार, 01/16/2014 - 09:21 नवीन
शिवराज्याभिषेकानंतर जिजाऊ गेल्या, रायगडावर वीज पडून घोडे की पागा काहीतरी जळाला आणि कुठल्यातरी चकमकीत एक चांगला योद्धा कामी आला. इतक्या घटना एकदम घडल्या. ( चु भु दे घे)
याचा अर्थ गागाभट्ट मुहुर्त काढायला चुकला असा घ्यायचा काय.... कि मुहुर्त वगैरेचा काहिच प्रभाव मनुष्याच्या आयुष्यात दिसत नाही याअर्थी हे थोतांड असावे असा अर्थ यातून ध्वनीत होतो.
उ
उडन खटोला गुरुवार, 01/16/2014 - 05:41 नवीन
मी स्वतः वर्शाचे ३६५ दिवस सारखे ,असे मानणार्या पैकी एक पण वयाच्या २५ व्या वर्शी असे काही अनुभव आले की सगळे विचारच बदलून गेले म्हणजे असे की अमावास्या /पौर्णिमा या दिवशी मनः स्वास्थ्य बिघडणॅ .वाइट स्वप्ने पडणॅ वगैरे प्रकार सुरू झाले माननीय गुगळे बाबा च्या सहाय्याने अधिक आन्तर-जालीय सन्शोधन केले असता असे समजले की या प्रकारास Energy Vampirism असे नाव आहे. अत्रुप्त आत्मे अन दुश्ट पाशवी आसुरी शक्ती अमावास्या /पौर्णिमा या दिवशी अधिक तीव्रतेने कार्यरत असतात ,असे दिसुन येते. यास्तव जर वाइट शक्ती म्हुर्त बघुन हल्ला करत असतील, तर शुभ शक्ती देखील नक्कीच शुभ मुहुर्तावर मदत करत असतील या तर्काने मुहूर्त या सन्कल्पनेचे स्पश्टीकरण सापदते
ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर गुरुवार, 01/16/2014 - 09:30 नवीन
माननीय गुगळे बाबा च्या सहाय्याने अधिक आन्तर-जालीय सन्शोधन केले असता असे समजले की या प्रकारास Energy Vampirism असे नाव आहे. अत्रुप्त आत्मे अन दुश्ट पाशवी आसुरी शक्ती अमावास्या /पौर्णिमा या दिवशी अधिक तीव्रतेने कार्यरत असतात ,असे दिसुन येते.
पुन्हा तेच सांगतो, या अमानवी शक्तीचे अस्तित्व सिद्ध करण्याची कुठली पद्धत आहे का जी 'कॉमन सेन्स'वर आधारलेली आहे ?(सायंटीफीक मेथेडेलॉजी वगैरे थोडा काळ लांब ठेवा) एखाद्या दूश्ट शक्तीचे अस्तित्व परीणामांनी सिद्ध करता येईल, असा वाईट परीणामांचे दुश्ट शक्तीशी असलेले causal nature स्पष्ट करणारे संशोधन झाले आहे काय?असल्यास प्रकाश त्यावर टाकावा..
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/16/2014 - 10:26 नवीन
@अत्रुप्त आत्मे* अन दुश्ट पाशवी # आसुरी शक्ती Image removed. अमावास्या /पौर्णिमा या दिवशी अधिक तीव्रतेने कार्यरत असतात ,असे दिसुन येते. >>> Image removed. आंम्हाला* दोनच दिवसांपुरतं सीमीत केल्याबद्दल तीव्र णिषेढ! :-/ आंम्ही* हवे तेंव्हा कार्य रत होऊ शकतो! Image removed. बाकिच्यांचं # माहीत नै! =))
प
पैसा गुरुवार, 01/16/2014 - 10:35 नवीन
नवा आयडी आहे पण "अत्रुप्त आत्मा, "दुश्ट पाशवी शक्ती" आणि "गुगळे" या मिपावरच्या हिट्ट मंडळींची नावे घेतल्यामुळे उडन खटोला हे मिपावर नवीन आहेत असे वाटलेच्च नाही!!
उ
उडन खटोला गुरुवार, 01/16/2014 - 11:25 नवीन
हम कौन है, खुद हमे भी अब पता नही ... यही तो है खासियत हमारी कि लोग जाने हमे हैसियत से रहते है हम तो पर्दा-नशीन जमाने को हर्ज है हमारे वजूद से
ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर गुरुवार, 01/16/2014 - 11:27 नवीन
आदाब आदाब उच्चदाब रक्तदाब
स
सचीन गुरुवार, 01/16/2014 - 06:21 नवीन
१८१७ साली पेशव्यांचा दारूण पराभव झाला. इंग्रजांचे राज्य १८१८ च्या आसपास पूर्ण भारतावर स्थापित झाले. नि अवघ्या ३५ वर्षात १८५३ साली भारतात पहिली ट्रेन धावली.(हुशारीची परिसीमा)
म
मंदार कात्रे गुरुवार, 01/16/2014 - 07:04 नवीन
(हुशारीची परिसीमा) याचा अर्थ काय? पेशव्यांचा पराभव झाला म्हणून भारतात पहिली ट्रेन धावली ??? ???
ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर गुरुवार, 01/16/2014 - 09:16 नवीन
पेशव्यांचा पराभव झाला म्हणून भारतात पहिली ट्रेन धावली ??? ???
इंग्रजांच्या बुद्धीचातुर्ताने ट्रेन धावली असे सचीनजी सांगत आहेत.
क
कवितानागेश गुरुवार, 01/16/2014 - 13:07 नवीन
म्हणजे पेशव्यांनी काढलेला मुहुर्त देशासाठी योग्यच होता म्हणायचं... ;)
स
सूड गुरुवार, 01/16/2014 - 16:32 नवीन
>>म्हणजे पेशव्यांनी काढलेला मुहुर्त देशासाठी योग्यच होता म्हणायचं.. छे छे !! असं म्हटलं तर पेशव्यांना मुर्ख कसं ठरवता येईल.
व
वडापाव गुरुवार, 01/16/2014 - 09:23 नवीन
माननीय गुगळे बाबा च्या सहाय्याने अधिक आन्तर-जालीय सन्शोधन केले असता असे समजले की या प्रकारास Energy Vampirism असे नाव आहे. अत्रुप्त आत्मे अन दुश्ट पाशवी आसुरी शक्ती अमावास्या /पौर्णिमा या दिवशी अधिक तीव्रतेने कार्यरत असतात ,असे दिसुन येते. यास्तव जर वाइट शक्ती म्हुर्त बघुन हल्ला करत असतील, तर शुभ शक्ती देखील नक्कीच शुभ मुहुर्तावर मदत करत असतील या तर्काने मुहूर्त या सन्कल्पनेचे स्पश्टीकरण सापदते
अरे बापरे!!!!!
१८१७ साली पेशव्यांचा दारूण पराभव झाला. इंग्रजांचे राज्य १८१८ च्या आसपास पूर्ण भारतावर स्थापित झाले. नि अवघ्या ३५ वर्षात १८५३ साली भारतात पहिली ट्रेन धावली.(हुशारीची परिसीमा)
'मिपाचे कुके' हा किताब योग्यच आहे.
इंग्रजांच्या बुद्धीचातुर्ताने ट्रेन धावली असे सचीनजी सांगत आहेत.
मानलं बुवा गो-यांच्या बुद्धिचातुर्ताला!!
ब
बज्जु गुरुवार, 01/16/2014 - 09:46 नवीन
चर्चेत उडी घ्यायला आजचा मुर्हुत चांगला आहे वाट्त :)
व
वडापाव गुरुवार, 01/16/2014 - 09:56 नवीन
चर्चेत उडी घ्यायला आजचा मुर्हुत चांगला आहे वाट्त
तुम्ही सुद्धा आजचाच मुहूर्त गाठलात की!! :)
म
मंदार दिलीप जोशी गुरुवार, 01/16/2014 - 09:59 नवीन
ट्रेन धावली कारण व्यापाराला इंग्रजांना दळणवळणाची जलद साधने हवी होती इथे. (सचीनजींना एवढे समजू नये म्हणजे त्यांच्या पिढीजात मतिमंदत्वाची परिसीमा) :P :D
प
प्यारे१ गुरुवार, 01/16/2014 - 10:25 नवीन
>>> दळणवळणाची जलद साधने कशाला? लूट वाहून न्यायला?
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/16/2014 - 10:28 नवीन
होय
स
सचीन गुरुवार, 01/16/2014 - 10:56 नवीन
प्यारे, ह्याच दळणवळणाच्या साधनात बसून लाखो लोक प्रवास करतात. नाहीतर टांग्यातून प्रवास करावा लागला असता.
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 01/16/2014 - 11:40 नवीन
राईट बंधू ह्या दोन अमेरिकन भावांनी इंग्रजांना विमान दिलं, नाहीतर बसले असते रेल्वेने खुरडत खुरडत भटकत. म्हणजे आता, अमेरिकन्स सर्वात जास्त बुद्धीमान म्हणायला लागतील. इंग्रजही त्यांच्या पुढे मट्ठच. पण ह्या सर्व शोधांचा मूलाधार भारताने दिलेल्या 'शून्या'त आहे, असं कुठेतरी वाचल्याचं स्मरतं. म्हणजे पुन्हा भारतियच सर्वश्रेष्ठ असं सिद्ध होतं. च्यायला, बराच गोंधळ आहे राव! नक्की कोण सर्वात जास्त बुद्धीवान? इंग्रज, अमेरिकन्स की भारतिय?
स
सचीन गुरुवार, 01/16/2014 - 11:48 नवीन
जगातील सर्वात बुद्धिमंत लोक इंग्रज.(अमेरिकन्स हेही मुळचे इंग्रज ).भारताने शून्याचा शोध लावला पण ह्या शून्याचे लाख पाश्चिमात्यानी केले.
व
वडापाव गुरुवार, 01/16/2014 - 12:04 नवीन
जगातील सर्वात बुद्धिमंत लोक इंग्रज.(अमेरिकन्स हेही मुळचे इंग्रज ).भारताने शून्याचा शोध लावला पण ह्या शून्याचे लाख पाश्चिमात्यानी केले.
गिरीश कुबेर लिखित 'युद्ध जीवांचे' आणि 'अधर्मयुद्ध' वाचल्यानंतर मला अमेरिकन्स आणि इंग्रज हे सगळ्यांत मठ्ठ वाटायला लागले आहेत. असो.
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 01/16/2014 - 12:36 नवीन
भारताने शून्याचा शोध लावला पण ह्या शून्याचे लाख पाश्चिमात्यानी केले.
ह्या लाखात त्यांचा 'एक' आणि भारताची पांच 'शून्य' येतात. शून्यच नसते तर 'लाख' कुठून आणि कसे केले असते? तरीपण हे (त्यांनी त्याचे 'लाख' केले) जसे त्यांचे कौतुक आहे तसेच भारताला रेल्वे दिल्यानंतर देशाच्या कानाकोपर्‍यात (की कोनाकोपर्‍यात?) रेल्वेचे जाळे पसरवून भारतिय रेल्वेला जगाच्या सर्व देशांच्या रेल्वेत बर्‍यापैकी वरचे स्थान भारतियांनीच मिळवून दिले आहे. तसेच, गरीबात गरीबाला परवडेल अशी रेल्वे भारतातच आहे. किफायतशीर मालवाहतूकही भारतिय रेल्वेतूनच होते. हे सर्व भारतियांनी केले आहे इंग्रजांनी येऊन नाही. त्यामुळे त्यांनी 'लाख' केले म्हणून ते हुशार ठरतात तर रेल्वे क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीने भारतियही तितकेच हुशार ठरतात. फाळणी नंतर भारताने केलेली लक्षणीय प्रगती आणि पाकिस्तानची नगण्य प्रगती लक्षात घेतली तरी भारतियांची हुशारी अधोरेखित होईल.
स
सचीन गुरुवार, 01/16/2014 - 12:43 नवीन
पेठकरांशी सहमत. देशाला स्वातंत्र्य मिळाले. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ठ अशी राज्यघटना मिळाली.आणि मुख्य म्हणजे विकासाची दृष्टी असणारे राज्यकर्ते मिळाले देश स्वातंत्र्य झाल्यापासून जवळपास ५५ वर्षे कॉंग्रेसचे राज्य आहे.कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली भारताने अफाट प्रगती केलीय हे खरे आहे.आज देश मंगळावर जावून पोहोचलाय.
अ
अनिरुद्ध प गुरुवार, 01/16/2014 - 12:45 नवीन
+११११ पेठकर काका झक्कासच उत्तर आवडले.
स
सचीन गुरुवार, 01/16/2014 - 12:48 नवीन
खरच पेठकर ह्यांच्या झकास उत्तराबद्दल आभार. देशाचा विकास असाच कायम राहायचा असेल तर कॉंग्रेस शिवाय पर्याय नाही.
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 01/16/2014 - 12:59 नवीन
सचिनसाहेब, नविन वादाला तोंड फोडण्याचा तुमचा प्रयत्न समजतो आहे. तरीपण, उत्तरादाखल एवढेच म्हणेन, काँग्रस पक्ष काय आकाशातून पडला नाही भारतियांचा उद्धार करायला. इथल्या मातीतच जन्मला आणि रुजला. तदवत इतर पक्षही इथल्या मातीतच जन्मले आणि रुजले आहेत. काँग्रेस जसे चुका करत करत शिकला (तुम्ही म्हणता म्हणून) तसेच दुसरा एखादा किंवा पक्षसमुदायही शिकेलच. आता अपेक्षा काय आहे. इतरांनी काँग्रेसला शिव्या घालाव्यात आणि वादावादी चालू राहावी?
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 20 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 21 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 23 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 27 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा