लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य
अगदी अलिकडे पर्यंत गीतारहस्य म्हणजे लोकमान्य टिळकांनी लिहिलेला ग्रंथ एवढच सामन्यज्ञान होत.पण एकेकाळी ह्या ग्रंथाने विक्रिचे तत्कालीन विक्रम केले असावेत असे वाटते. लोकप्रभा साप्ताहीकातील एका लेखात डॉ.यशवंत रायकर यांनी, '१९१५च्या जून महिन्यात प्रसिद्ध झालेल्या गीतारहस्याच्या सर्व प्रती संपल्यामुळे लगेच सप्टेंबर महिन्यात पहिले पुनर्मुद्रण करावे लागले.' अशी माहिती दिली आहे.या ग्रंथाचा जो भाग (बहुधा शेवटील भाग) ऑनलाईन उपलब्ध झाला ते १९२४ सालचे पुर्नमुद्रण आहे त्यावर ५००० प्रती असा आकडा आहे.
लोकप्रभा साप्ताहीकातील डॉ.यशवंत रायकर यांचा हा लेख इतर बाबीकरता वाचनीय (आणि चर्चा करण्याजोगा) आहेच पण त्यात रायकरांनी एखाद्या विषयावर लेखन करताना एखादा परिपेक्ष,एखादी बाजू कशी सुटून जाऊ शकते याचा उहापोह केला आहे.
रायकरांचा लेख आणि गीतारहस्याचा ऑनलाईन उपलब्ध भाग वाचताना अजून एका गोष्टीकडे लक्ष गेल ते म्हणजे लोकमान्य टिळकांनी अवलंबिलेली संस्कृत ते मराठी अनुवादाकरता अवलंबलेली पद्धतपण उल्लेखनीय आहे.
गीतारहस्याचा ऑनलाईन उपलब्ध भाग मराठी विकिस्रोत प्रकल्पात या दुव्यावर उपलब्ध केला आहे.(मराठी विकिस्रोत प्रकल्पात पिडिएफ फॉर्मॅटचे वाचन करताना युनिकोडीकरण करत लिहिण्याची म्हणजे ग्रंथ बारकाव्याने अभ्यासण्याची संधी सुद्धा उपलब्ध होते)
गीतारहस्याचा उपलब्ध सदर ऑनलाईन भाग आणि रायकरांचा लेख याच्या वाचना नंतर काही प्रश्न पडले ते असे
१) गीतारहस्य ग्रंथाचे अधिकृत नाव श्रीमद्भभगवद्गीतारहस्य असे आहे का ?
२) गीतारहस्य ग्रंथाचे एकुण भाग किती ? (अर्काइव्ह डॉट ऑर्गवरून विकिस्रोतावर आणलेली मूळ प्रतीचे १९२४चे पुनर्मुद्रण गीतारहस्य ग्रंथ आहे पण पृष्ठ संख्या कमी आहे का हा गीता रहस्याशी संबंधीत ग्रंथ आहे आणि सुयोग्य आवृत्ती आहे यास दुजोरा/खात्री करून हवी आहे.कारण प्रथम पृष्ठावर ह्या ग्रंथाचा शेवटील भाग असा उल्लेख दिसतो आहे.)
*(कुणाकडे गीतारहस्याचे अजून भाग असतील तर ते मराठी विकिस्रोत प्रकल्पात युनिकोडीकरणाकरता पिडिएफ फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून देऊ शकल्यास हवे आहेत)
*(ऑनलाईन उपलब्ध (दुसर्या का शेवटच्या ?) भागात काही पृष्ठे रिकामी दिसताहेत.२रे, १६वे व १८वे पान रिकामे आहे ह्यातील एखादे पान गहाळ नसून मूळातूनच रिकामे असल्याची खात्री करून हवी आहे.)
३) उपरोक्त ग्रंथाच्या प्रथमपृष्ठावर "कर्मविपाकसिद्धांत" असा ग्रंथ नामोल्लेख दिसत नाही मग तो कुठून येतो ?
४) लोकप्रभेतील रायकरांच्या लेखात "मीमांसाशास्त्रातले ग्रंथतात्पर्य काढण्याचे सात नियम" असा उल्लेख येतो ते सात निय्म कोणते
इत्यादी माहिती हवी आहे.गीतारहस्य बद्दल इतर माहिती चर्चा झाल्यास स्वागतच असेल. उपलब्ध झालेली माहिती मराठी विकिपीडियावरील लेख लिखाणात वापरण्याचा मानस आहे.
येत्या वर्ष २०१४ करता आपण सर्व आणि मिपा परिवारास शुभेच्छा.
🗣 चर्चा
(106)
अ
अवतार
Sun, 12/29/2013 - 17:46
नवीन
हे त्या काळच्या पुणेरी ब्राह्मण समाजातील चालीरीतींना धरूनच होते. ते नुसतेच टिळक राहिले असते तर हे वागणे देखील दुर्लक्षित राहिले असते. पण ते राष्ट्रीय स्तरावरील पुढारी असल्यानेच इतर ब्राह्मण समाजाप्रमाणे त्यांचे सनातनी वागणे हे अधिक उठून दिसते. विशेषत: वेदोक्त प्रकरणात शाहू महाराजांच्या विरोधी भूमिका घेणे, पंचहौद मिशन चहा प्रकरणात काशीला जाऊन सर्व ज्ञात-अज्ञात पापांसाठी प्रायश्चित्त घेऊन येणे, स्वत:च्या कन्येला इंग्रजी शिकणे वर्ज्य करणे; ह्या भूमिका त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या भूमिकेला छेद देऊन जातात. पण ह्याच शाहू महाराजांनी चिरोल खटल्याच्या वेळी टिळकांना गुप्त रीतीने मदत केली होती, टिळकांच्या निधनाची वार्ता कळल्यावर राजवाड्यावरील झेंडा अर्ध्यावर उतरवला होता हे देखील विसरता येत नाही. टिळक काय आणि शाहू काय, यांना त्या काळाच्या मर्यादा होत्या. त्या मर्यादांच्या संदर्भातच त्यांच्या एकूण व्यक्तित्व आणि कर्तृत्वाचा विचार व्हायला हवा.
संत चोखामेळा ह्यांचा एक सुंदर अभंग आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 12/30/2013 - 06:58
नवीन
नमस्कार,
लोकमान्य टिळकांना/ची टिका टिळकांना स्वतःसही नवीन नव्हती.प्रसंगी त्यांच्या जिवलग मित्रांनी, सख्ख्या मुलांनीही त्यांच्या चहात्यांनीही टिका केली.तत्कालीन काँग्रेसमधील मवाळांनी काँग्रेस अधिवेशनात जहाल झाले होते आणि जहाल शांत होते.या सर्व गोष्टी टिळक बहुतांश अभ्यासकांना बर्यापैकी माहितही आहेत.टिळकांच्या नंतरच्या पिढ्यांनी टिका यथायोग्य आदरपुर्वक स्विकारून आपापल्या मार्गांना लागले.
या गीतारहस्य विषयक धाग्यावर आतापर्यंत आलेल्या टिकाकारांनी नविन काहीच माहिती आणलेली नाही.टिळकांवर जनरल अवांतर टिका करणारी मिपा संस्थळावर कधीच चर्चा झाली नाही, सोबत वेगळा धागा उघडणे शक्य नाही का ? भविष्यात वेगळी चर्चा घेणे शक्य नाही ? आणि टिका करावयाची असल्यास या धाग्याच्या गीतारहस्य या विषयाच्या मर्यादेत राहूनही टिका करता येते. तशी टिका स्वतःस न सूचल्यास डॉ.यशवंत रायकरांच्या लेखाचा दुवा चर्चा प्रस्तावात दिलाच आहे. गीतारहस्या संबधीत रायकरांची टिका परिच्छेद जसाच्या तसा कॉपी पेस्ट करून त्या बद्दलही चर्चा होऊ शकते.
अस्थानी विषयास सोडून लेखन करून जे साध्य करण्याचा प्रयत्न आहे तो तरी खरेच साध्य होणार आहे का ? तर तेही नाही.कारण विषयास सोडून असलेल्या लेखनाकडे दुर्लक्षच होण्याची शक्यता अधिक असणार आहे.त्यामुळे कृपया विषयांतर टाळून "लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य" या मुख्य विषयास अनुलक्षून आपण लेखन करत आहोत ना ? हे बघण्याचे पथ्य/औचित्य सर्वांनी पाळून सहकार्य करावे, ही अजून एकदा नम्र विनंती आहे
- Log in or register to post comments
अ
अवतार
Mon, 12/30/2013 - 16:19
नवीन
ही पहिलीच वेळ नाही. जिथून विषयांतर सुरु झाले तिथेच ही सूचना आवश्यक होती. मला जे साध्य करायचे आहे त्यासाठी दुसऱ्यांचा आधार घेण्याची गरज नाही.
वर टिळकांविषयी जे लिहिले आहे ती वस्तुस्थिती आहे. टीका नव्हे. नुसतीच टीका करण्याने काही साध्य होत नाही. म्हणूनच त्या काळातील महामानवांच्या मर्यादा लक्षात घेऊनच त्यांच्या व्यक्तित्व आणि कर्तृत्वाचा विचार व्हायला हवा हे स्पष्टपणे लिहिले आहे. आणि मिपावर विषयास धरून नसलेल्या लेखनाकडे जर दुर्लक्ष होणारच असेल :) तर मग तुम्हीही दुर्लक्ष करणेच उचित ठरले नसते काय?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 12/30/2013 - 17:33
नवीन
नमस्कार,
आपले म्हणणे अंशतः बरोबर आहे.मी प्रस्तावातच विषयांतर टाळावयाचे स्मरण दिले असते तर बरे झाले असते.मागच्या प्रस्तावात ती काळजी सुद्धा घेतली होती आणि नेमके या वेळी राहीले,पण जेव्हा विषयांतर होते आहे हे लक्षात आले तेव्हा १) "टाळण्यात सहकार्याबद्दल धन्यवाद" हा प्रतिसाद आधीच्या प्रतिसादास आवर्जून दिला. पण आपण म्हणता तसे प्रस्ताव पुन्हा बदलून विषयांतर टाळण्याची विनंती जोडण्याची सुविधा असती तर तेही केले असते.ते सध्या उपलब्ध नसल्यामुळे मिपा प्रशासनाला विषयांतर झाकण्याची (वगळण्याची नव्हे) सुविधा उपलब्ध असावी अशी विनंती सुद्धा टाकली.
>>तर मग तुम्हीही दुर्लक्ष करणेच उचित ठरले नसते काय?<< आपले म्हणण्यात अंशतः तथ्य आहे. इतरांनी मांडलेल्या प्रस्तावात विषयांतर येते तेव्हा मी दुर्लक्षच करतो.हा प्रस्ताव मांडणारा मी असल्यामुळे विषयांतर टाळण्याची विनंती करण्याची नैतीक जबाबदारी माझी ठरते आणि केवळ जबाबदारी नव्हे तर एका रचनात्मक उपक्रमाच्या भाग असलेला चर्चा प्रस्तावाचे खूप विषयांतर होणार नाही हे पहाणेही जरूरी ठरते हे आपण समजून घेऊ शकाल असे वाटते.
आपण म्हणता तसे ती कदाचित मिपाची संस्कृतीही असेल तर मात्र अधिक दुर्लक्ष करण्या शिवाय सध्या तरी काही पर्याय दिसत नाही.
- Log in or register to post comments
अ
अवतार
Mon, 12/30/2013 - 17:50
नवीन
पटले नसतील तर ते उडवण्यास माझी हरकत नाही. धन्यवाद!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 12/29/2013 - 05:54
नवीन
गीतारहस्य अजून वाचले नाहीये पण ते नुकतेच विकत घेतलेय पुण्यातल्या अजब च्या प्रदर्शनातून. दोन्ही खंड मिळून फक्त १०० रू.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 12/29/2013 - 08:29
नवीन
मिपाकरांपैकी आणि तेही अलिकडच्या काळात गीतारहस्य कुणी विकत घेतली हि निश्चीत आनंदाची बातमी आहे.धाग्यात विचारलेल्या शंका बद्दल आपल्या मार्गदर्शनाची प्रतिक्षा असेल.
तसेच आंतरजालावर अद्याप न आलेला भाग कुणाच्या साहाय्याने स्कॅन करून मराठी विकिस्रोत प्रकल्पात चढवता आल्यास तसे करून हवे आहे.जून २०१५ मध्ये ग्रंथास १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा पूर्ण गीतारहस्य आंतरजालावर चढवले जाऊन त्याचे युनिकोडीकरणात हातभार लावला गेल्यास नविन पिढ्यांची आणि अभ्यासंकाची चांगंली सोय होऊ शकेल.
प्रतिसादा करता धन्यवाद
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sun, 12/29/2013 - 06:19
नवीन
एकदा तरी नक्की वाचावा असा ग्रंथ. ति शिदोरी फार लांबवर साथ देते.
- Log in or register to post comments
A
Atul Thakur
Sun, 12/29/2013 - 08:15
नवीन
अर्धवटरावांशी सहमत. टिळकांचे पांडीत्य आणि तेजस्वी बुद्धीमत्ता जागोजाग दिसुन येते. त्यावेळी त्यांच्या कर्म अनुषंगाने केलेल्या गीतेच्या मांडणीवर प्रचंड टीका झाल्याचे वाचले आहे. (संदर्भः लोकमान्य - नरहर फाटक) पण टिळक सर्वांना पुरुन उरले. मला तर आजही त्यांनी केलेली मांडणी सर्वात योग्य अशी वाटते. धाग्यापेक्षा जरा वेगळा प्रतिसाद आहे त्याबद्दल क्षमस्व.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 12/29/2013 - 08:33
नवीन
नमस्कार आपला प्रतिसाद धाग्यास अनुसरूनच आहे.गीतारहस्य बद्दल (गीतारहस्यशी संबंधीत समर्थन आणि टिकेसहीत) सर्वंकष माहिती हवी आहे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
- Log in or register to post comments
म
मारकुटे
Sun, 12/29/2013 - 08:26
नवीन
गीतारह्स्य हे गीतेचे कर्म करा संदेश देते ह्या अनुषंगाने केलेले विवेचन आहे. तेच योग्य आहे अस नाही पण एक वेगळा दृष्टीकोन मिळतो. स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी लढणार्यांना प्रेरणा देण्याचे कार्य त्या ग्रंथाने केले. आज कदाचित त्याची गरज नाही. कदाचित भोगवादाला कंटाळलेली पिढी शंकराचार्यांच्या निवृत्तीपर भाष्यकडे आकर्षित होईल. कदाचित द्वैत वाद्याला श्रीभाष्य भावेल. कदाचित आळसात वेळ घालवणार्या पिढिला गीतारहस्य प्रेरीत करेल. कुणाला गीतेत काहीही नाही हे प्रतिपादन करतांना मुक्ती मिळेल.. कुणाला कसा आणि केव्हा आणि कुठला मार्ग सापडेल हे सांगता थोडीच येत? आपला आपला नशीबाचा भोग, भाग अथवा भाग्य!
- Log in or register to post comments
ध
धन्या
Sun, 12/29/2013 - 09:06
नवीन
असंही होऊ शकतं हा विचारच आला नाही कधी. ;)
वल्लीशेठ, गीतरहस्य तुम्ही वाचत नसाल तर आम्हाला दया आधी वाचयला. :)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 12/29/2013 - 10:09
नवीन
देतो की. पण नुसते शेल्फात ठेवणार नैस या अटीवर.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 12/30/2013 - 07:07
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments
आ
आतिवास
Sun, 12/29/2013 - 11:05
नवीन
रोचक धागा.
प्रतिसादकांकडून अधिक माहिती मिळेल अशी आशा.
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Sun, 12/29/2013 - 11:53
नवीन
घरी एक जुनी कॉपी आहे. त्यात या प्रकाशनाबद्दल, पानांबद्दल बघते आणि लिहिते.
मला तरी काही वर्षांपूर्वी वाचताना भाषा क्लिष्ट वाटली, त्यामुळे पूर्ण वाचलं नाही.
- Log in or register to post comments
व
विकास
Sun, 12/29/2013 - 13:31
नवीन
लहानपणी वाचायचा प्रयत्न केला आणि भाषा समजली नाही म्हणून वाचले नाही. मला वाटते मूळ नाव हे, "श्रीमद्भगवद्गीता-रहस्य अथवा कर्मयोगशास्त्र" असे काहीसे नाव होते.
गीतारहस्याचा भर हा त्यातील संन्यस्तयोगा कडे असण्यापेक्षा कर्मयोगाकडे आल्याने त्तत्कालीन हिंदू पंडीतांचा आधी आक्षेप होता. टिळकांचे म्हणणे होते की जी गीता युद्ध कर म्हणून सांगण्यासाठी केली आहे त्यात संन्यास कसला बघता...
अजून एक तसा प्रसिद्ध किस्सा - मंडालेहून सुटून आल्यावर टिळकांच्या या लेखनाबद्दल आधीच माहीती जनतेला झालेली होती. पण इंग्रज तो ग्रंथ हस्तलिखित पटकन परत देत नव्हते. त्यामुळे अनेक जण काळजीने बोलायला लागले, की सरकारने ते परत केले नाही तर? टिळक शांतपणे म्हणाले की, "त्यांनी माझे हस्तलिखित घेतले आहे, डोके नाही!"
त्यांना गीतार्हस्य हे बायबल जसे मिशनरी वाटतात तसे फुकट अथवा कमी किंमतीत वाटायचे होते. अर्थात ते पैशाअभावी फुकट वाटले गेले नाही पण स्वस्तात मात्र बाजारात आले आणि भराभर प्रती संपल्या.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 12/30/2013 - 08:23
नवीन
विकासजी आपला प्रतिसाद गीतारहस्य ग्रंथाच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा माहितीपूर्ण असा आहे.तरीपण गीतारहस्याची १९१५ मधील किंमत ३ रुपये होती असे दिसते.३ रुपये हि किमंत १९१५ साली नेमकी कितपत कमी होती याची अधिक ससंदर्भ तुलनात्मक माहिती उपलब्ध कुणी करून दिल्यास धाग्यास अभ्यासपुर्णता येईल असे वाटते.
आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादाकरिता धन्यवाद
- Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी
Mon, 12/30/2013 - 10:37
नवीन
१९१३-१४ मधे एक मण गहू म्हणजे अंदाजे ३७.३ कि गहू ५ रु ४ आण्याला मिळायचा म्हणजे एका किलो गव्हाची किंमत होती दीड आणे.
तसेच तांदूळ एक मण ५ रु ४ आणे, ज्वारी एक मण रु ४, बाजरी रु ३ आणे ८ प्रति मण.... त्या मानाने हे पुस्तक महागच म्हटले पाहिजे.....
अजून मजेशीर माहिती येथे उपलब्ध आहे.
http://dsal.uchicago.edu/statistics/1903_excel/
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 12/30/2013 - 07:24
नवीन
मिपा सदस्य जयंत कुलकर्णींकडून काही माहिती आली आहे.तरीही जेवढी अधिक माहिती मिळेल तेवढी हवीच आहे.
काळा सोबत भाषिक बदल होतात,लेखकाच्या लेखनात आलेल्या तत्कालीन संदर्भांची आपणास कल्पना नसण्याचीही शक्यता असते.टिळकांना आणि इतर अनेक लेखकांना गीतेचे अनुवाद आणि भाष्य अनेक वेळा लिहावे लागले. त्यामुळे समिक्षा/भाष्य ग्रंथ आणि अशा चर्चा ग्रंथ समजून घेण्यास साहाय्यभूत होतात.
बर्यापैकी मिपाकरांकडे घरी गीतारहस्याची आवृत्ती आहे.पुर्ण गीतारहस्य आंतरजालावर कुणाकडून चढवून मिळेल त्याच्या युनिकोडीकरणात कोणकोण सहभागी होईल ते माहित नाही म्हणून मी प्रत्येकास विनंती करतो आहे.या चर्चेच्या निमीत्ताने ही कामेही मार्गी लागल्यास गीतारहस्याच्या शतकपुर्तीपूर्वी मिपाकरांच्या मुकूटात एका चांगल्या कामाचा मानाचा तूरा खोवला जाईल असा आशावाद आहे.
पुढील प्रतिसादाची प्रतिक्षा असेल. धन्यवाद
- Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी
Sun, 12/29/2013 - 13:41
नवीन
माझ्याकडे एक बहुदा प्रथम आवृत्तीतील प्रत आहे. त्याचे छायाचित्र खाली देत आहे....

- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 12/29/2013 - 13:46
नवीन
इतकी जुनी प्रत म्हणजे भाग्यवान आहात.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 12/29/2013 - 14:06
नवीन
नमस्कार
वल्ली म्हणतात तसे आपणा कडे एवढी जुनी प्रत म्हणजे खरेच भाग्यवान.जयंतजी आपण म्हणता तसे हि प्रथमावृत्ती अथवा द्वितीयावृत्ती असावी कारण इस्वी सन १९१५ मध्ये अगदी चार महिन्याच्या कालावधीतच दुसरी आवृत्ती सुद्धा प्रकाशित झाली .आपणाकडे असणार्या ग्रंथाची पृष्ठ संख्या किती आहे हे समजले तर बरे पडेल.
दुसरे आपण ज्या पानाचे चित्र दिले त्यावर बहिरंगपरीक्षण असा उल्लेख आहे.
यातील अंतरंगपरीक्षण तसेच बहिरंगपरीक्षण म्हणजे काय किंवा याचा संदर्भ काय असावा ? प्रथमच गीतेचे ’बहिरंगपरीक्षण’ केले गेले म्हणजे नेमके काय या बद्द्ल अधिक जाणून घेण्याची सुद्धा उत्सुकता आहे.
प्रतिसादांकरता धन्यवाद
- Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी
Sun, 12/29/2013 - 14:39
नवीन
अंतरंगपरिक्षण म्हणजे हे लिहिण्याची गरज नाही. गीतेचे अंतरंग खरेच काय सांगते त्याचे परिक्षण म्हणजे अंतरंग परिक्षण. बहिरंगपरिक्षणात इतर सर्व गोस्टी मोडतात. उदा. गीतेचा काळ, गीतेच्या इतर टीकांचा विचार, टिळकांनी याचे स्पस्टीकरण देऊन त्या परिक्षणाचे खालील भाग पाडले आहेत . त्याच्या मथळ्यांवरुन आपल्याला कल्पना येईल.
गीता व महाभारत
गीता व उपनिषदे
गीता व ब्रह्मसूत्रे
भागवतधर्माचा उदय व गीता
हल्लीच्या गीतेचा काळ
गीता व बौद्ध ग्रंथ
गीता व बायबल
मला वाटते हे ठीक आहे. मी काही यावर अधिकारवाणीने बोलू शकत नाही. या आधीक काहे माहिती विचरलीत तरमात्र गीता रहस्य परत वाचायला लागेल आणि एकदा सुरु केले की थांबणे कठीण...मग बाकीचे लिखाण मागे पडते.... :-)
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 12/30/2013 - 07:36
नवीन
अंतरंगपरिक्षण आणि बहिरंगपरिक्षणातील ढोबळ फरक आपण माहिती करून दिलात. बहिरंगपरिक्षणाचा एवढा महत्वपूर्ण आंतर्भाव लोकमान्यांनी आपल्या लेखनात केला तरीपण गीता आणि महाभारत टप्प्या टप्प्याने विकसित झाले ह्याकडे टिळकांनी लक्ष का दिले नसावे ह्या बद्दल डॉ.यशवंत रायकरांच्या लेखनाची यानिमीत्ताने आठवण झाली.
पूर्ण गीतारहस्यच ऑनलाईन उपलब्ध असावे अशी इच्छा आहे.म्हणजे तुम्हालाच वाचन अभ्यास आणि लेखनाची गळ घातली असे होणार नाही.दुसरे असेकी इतरांनी गीतारहस्य घरी असल्याचे म्हटले आहे पण आपण प्रत्यक्षात वाचले आहे त्यामुळे लगेच नसले तरी आधून मधून या धाग्यावर आपले मार्गदर्शन होत रहावे अशी विनंती आहे.
आपल्या अभ्यापूर्ण आणि माहिती पूर्ण प्रतिसादांकरता धन्यवाद
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sun, 12/29/2013 - 18:55
नवीन
हायला आमच्याही घरी हीच १९१५ ची प्रत आहे!!!! बघून खूप आनंद झाला. :)
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 12/30/2013 - 07:41
नवीन
आपल्याकडे गीतारह्स्याची जुनी प्रत आहे या बद्दल अभिनंदन. गीतारहस्य ची प्रत असलेल्या मिपाकरांनी मराठी विकिस्रोत प्रकल्पाच्या माध्यमातून गीतारहस्य ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आणि तेथिल युनिकोडीकर्ण झालेला मजकुर वेळोवेळी तपासून मूळाबर हुकूम जसाच्या तसा आसल्याचे तपासण्यात सहकार्य केल्यास गीतारहस्याच्या प्रकाशनास शंभर वर्षे पूर्ण होताना एक चांगले कार्य मार्गी लागण्यात हातभार लागू शकेल असे वाटते.
प्रतिसादाकरता धन्यवाद
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 12/30/2013 - 08:22
नवीन
जसा वेळ मिळेल तसे अवश्य पाहीन हे. :)
- Log in or register to post comments
A
Atul Thakur
Sun, 12/29/2013 - 13:42
नवीन
अर्जुन गीता ऐकल्यावर त्याने संन्यास घेतला नाही. योग्याप्रमाणे तो गुहेत जाऊन ध्यानाला बसला नाही आणि भक्ताप्रमाणे पुजापाठ वा नामसंकीर्तन करु लागला नाही. तो सरळ युद्धाला उभा राहिला आणि ज्या नातेवाईकांना पाहुन त्याला "सिदन्ती मम गात्राणि" वाटले होते त्यांना त्याने कापुन काढले.
गीतेचा अर्थ कर्मयोगपर आहे याचा याहुन वेगळा पुरावा कोणता? मला आजवर त्याकाळच्या विद्वानांनी त्यांच्यावर आक्षेप का घेतला हेच कळले नाहीय.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sun, 12/29/2013 - 21:27
नवीन
>>मला आजवर त्याकाळच्या विद्वानांनी त्यांच्यावर आक्षेप का घेतला हेच कळले नाहीय.
-- अहो अक्षेप नाहि घेतला तर ते विद्वान कसले??? विद्वत्तेची कसोटी... कल भी थी, आज भी है, कल भी रहेगी.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 12/30/2013 - 07:47
नवीन
गीतारहस्यावर आक्षेप घेण्याकरताही काही किमान पातळीची प्रज्ञा लागत असेल असे वाटते, त्यामुळे अगदीच विद्वत्ता दाखवण्याकरता आक्षेप घेत्ले गेले होते किंवा कसे या बद्दल साशंकता वाटते.आक्षेपांशी सहमत होणे गरजेचे नाही पण समजून घेण्यास हरकत नसावी.अर्थात गीतारहस्यावरच्या तत्कालीन आक्षेपांचे कुणाकडून माहिती आली तर हरकत नसावी.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 12/30/2013 - 09:25
नवीन
"गीता कर्मप्रधान आहे कर्मसंन्यासी नाहि" हे एकच कारण आक्षेपांची फौज तयार करायला पुरेसं असावं त्याकाळि... कारण गीतेची संन्यस्त मांडणी विद्वज्जनांकडुन अगोदरच स्विकारली गेली होती.
टिळकांनी मिल्ल, स्पेन्सर, काण्ट वगैरे प्रभृतींच्या साहित्याचा रेफ्रन्स घेतला आहे. बौद्ध तत्वज्ञानाचे दाखले दिले आहेत. हे सगळं "यावनी" कॅटॅगरीचं माप सोवळ्या गीतेला लावणं तत्कालीन विद्वानांना झेपलच नसेल.
"आत्मा ८४ लक्ष योनींमधुन प्रवास करतो" या धारणेत ८४ लक्ष म्हणजे एखादी गुगल फिगर आहे हा टिळकांचा विचार श्रुती-स्मृती प्रमाण मानणार्यांना कसा मानवेल? गीतेत श्रीकृष्णाला अनेक संबोधने आहेत. या संबोधनांमागे काहि विशिष्ट योजना, काव्य आहे असं टिळकांना वाटत नाहि. प्रचलीत नामांपैकी सहज वापरायची म्हणुन घेतलेली नावे यापलिकडे टिळक त्यांना महत्व देत नाहि. बिग मटेरीयल फॉर आक्षेप.
असं बरच काय काय आहे गीता रहस्यात. म्हणुनच म्हणतो... एकदा तरी अवश्य वाचावा हा ग्रंथ. आणि तब्बेतीने वाचावा. त्याची मोहिनीच वेगळी.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 12/30/2013 - 10:15
नवीन
लोकमान्य टिळक अंशतः परंपरावादी होते तरीही तुमच्याच शब्दात सांगायच झाल तर बर्यापैकी "रेडि टु थिंक" स्वभावाचे असावेत असे वाटते,म्हणूनच पाश्चात्य विचारांची सुयोग्य दखल विवीध लेखनातून ते घेत असे दिसते.संस्कृत ग्रंथ मुखोद्गत असूनही त्यातील अर्थ न समजणार्या तत्कालीन बहुसंख्य तथाकथीत पंडीतांना शब्दाच्या ससंदर्भ व्यूत्पत्ती दाखवत लोकमान्यांनी केलेल लेखन न मानवल्या मुळेही आपण म्हणता तसे आक्षेप घेतले गेले असू शकतात.त्या शिवाय त्या आक्षेपात तार्किक उणीवा लॉजीकल फॉलसीज असणे सहज संभवते.
तरीही विषयाच्या सर्व बाजू अभ्यास करताना डॉ.यशवंत रायकर म्हणतात त्याप्रमाणे विष्णु वामन बापटशास्त्र्यांनी गीतारहस्याचे खंडन नेमके कसे केले याची माहिती करून घेणे अभ्यासकांकरीता उपयूक्त ठरू शकते असे वाटते.
जेवढा भाग वाचला त्यावरून मलाही तसेच वाटले म्हणूनच उर्वरीत भागही आंतरजालावर उपलब्ध करण्यात चहात्यांनी पुढाकार घ्यावा असे वाटते.लोकमान्यांच लेखनाची अभ्यासपूर्णता त्यांच्या चाहत्यांनाच नाही तर टिकाकारांकरताही मोहवणारी अशीच होती.
- Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी
Sun, 12/29/2013 - 14:02
नवीन
अनुक्रमणिका खालीलप्रमाणे -
१ विषयप्रवेश
२ कर्मजिज्ञासा
३ कर्मयोगशास्त्र
४ आधिभओतिक सुखवाद
५ सुखदु:खविवेक
६ आधिदैवत व क्षेत्रक्षेत्रविचार
७ कापिल्साख्यशास्त्र किंवा क्षराक्षरविचार
८ विश्र्वाची उभारणी व संहारणी
९ अध्यात्म
१० कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य
११ संन्यास व कर्मयोग
१२ सिद्धावस्था व व्यवहार
१३ भक्तिमार्ग
१४ गीतध्यायसंगति
१५ उपसंहार
१६ परिशिष्टप्रकरण - गीतेचे बहिरंगपरिक्षण
एकूण पाने ८५४ अद्जिक दोन शुद्धीपत्र.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 12/29/2013 - 17:49
नवीन
आपण दिलेल्या माहितीने संदिग्धता कमी होण्यास बरीच मोलाची मदत झाली आहे.आपल्या कडे असलेला ८५४ पानांचा ग्रंथ हा श्रीमद्भवद्गीतारहस्याचा पहीला भाग तात्वीक विवेचनाचा असावा असे दिसते. मूळ संस्कृत श्लोक आणि त्यांचे मराठी भाषांतर दुसर्या भागात येते असे दिसते.
तरीपण थोड्या शंका अजूनही बाकी आहेत मूळ संस्कृत श्लोक आणि त्यांचे मराठी भाषांतर दुसर्या भागात आहे तर त्याचा उल्लेख आपण दिलेल्या पहिल्या भागाच्या मुखपृष्ठा वर आला आहे.तो दुसरा भाग ८५४ पानामध्ये आंतर्भूत आहे का वेगळा या बद्दल अधिक खात्री झाल्यास बरे पडेल.
- Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी
Mon, 12/30/2013 - 03:03
नवीन
मुळ संस्कृत श्र्लोक व त्याचे मराठी भाषांतर या ८५४ पानातच आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 12/30/2013 - 07:58
नवीन
विकिस्रोत प्रकल्पाच्या अचूकतेच्या दृष्टीने महत्वपूण माहिती आपण दिलीत या बद्दल आभारी आहेच.पूर्ण गीतारहस्य विकिस्रोतावर ऑनलाईन उपलब्ध होऊन त्याचे युनिकोडीकरण मार्गी लागल्यास,गीतारहस्याची प्रत असलेली मंडळी विकिस्रोत प्रकल्पात युनिकोडीकरण झालेल्या मजकुराची अचूकता तपासून देण्यात वेळोवेळी सहकार्य करू शकतील आणि आपणही सहभागी व्हावे हि ह्या निमीत्ताने विनंती.
- Log in or register to post comments
A
Atul Thakur
Mon, 12/30/2013 - 04:03
नवीन
“ज्युरींचा निर्णय विरुध्द असला तरी मी निरपराध असल्याबद्दल माझे मत कायम आहे. वस्तुमात्राच्या भवितव्याचे नियंत्रण करणारी (याहून निराळी) उच्च सामर्थे आहेत. मी मोकळा राहाण्यापेक्षा माझ्या कार्याचा उत्कर्ष माझ्या क्लेशांनी व्हावा, अशीच कदाचित ईश्वराची इच्छा असावी.”
टिळकांच्या वाणीतुन स्फुरलेल्या या उद्गारांनंतर न्यायाधीशाने त्यांना सहा वर्षाची सक्तमजूरी, हद्दपारी आणि हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. यापैकी सक्तमजूरी व दंड ही नंतर रद्द झाली. शिक्षा भोगण्यासाठी टिळक मंडालेला आले तेव्हा त्यांची पन्नाशी उलटुन गेली होती. जुन्या व्याधी सतत त्रास देत होत्या. त्यापैकी सर्वात गंभीर मधुमेह त्यांनी आहारावर संयम करुन ताब्यात ठेवला होता. त्याचवेळी त्यांना व्यक्तिगत जीवनातील अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. मुलांची शिक्षणं, पत्नीचा मधुमेह यासारख्या अनेक गोष्टींची त्यांना चिंता वाटत असे.
स्वदेशापासुन दूर, व्याधिंनी पोखरलेलं शरीर आणि चिंतेने होरपळणारं मन घेउन टिळकांनी मंडालेला ज्या कार्याचासंकल्प सोडला तो पाहता त्यांची असामान्य जिद्द प्रत्ययास येते. हा संकल्प म्हणजे भगवद्गीतेवरील भाष्य. वडीलांच्या अखेरच्या समयी त्यांना गीता ऐकवीत असताना टिळक या विषयाकडे ओढले गेले. पुढे स्वतंत्रपणे, इतर मतमतांतरे आणि टीकांचा गलबला बाजुला सारुन गीतेचा अभ्यास करताना गीता ही निवृत्तीपर नसुन कर्मयोगपर आहे या निर्णयाला ते आले. किंबहुना तसा त्यांचा पक्का निश्चय झाला. श्रीभगवद्गीतारहस्य हे त्याचेच फलित आहे.
भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखल्या गेलेल्या टिळ्कांनी बराच काळ डोक्यात घोळत असलेला गीतेवरील सांगोपांग टीका लिहीण्याचा बेत या कारावासामुळे मिळालेल्या सक्तीच्या विश्रांतीत पार पाडण्याचं ठरवलं. कारावासापुर्वीच टिळकांची याविषयीची तयारी सुरु होती. राजकीय चळवळीची कामे सांभाळुन त्यांनी आपला अभ्यास चालवला होता. कारावासात मोकळा वेळ मिळताच टिळकांनी संपुर्ण ग्रंथ फक्त साडेतीन महीन्यात लिहुन काढला. जवळ लेखनिक नाही. स्वतःचं समृद्ध ग्रंथालय दूर पुण्याला. अशासारख्या अडचणींना टिळकांनी जुमानलं नाही. योगायोगाची गोष्ट ही की भगवद्गीतेवरील विसाव्या शतकातील सर्वात महत्त्वाचे भाष्य म्हटले गेलेल्या गीतारहस्याचा जन्म भगवान श्रीकृष्णाप्रमाणेच कारावासात झाला.
सुटका झाल्यावर टिळकांनी ग्रंथ प्रकाशित केला. शंकराचार्यांच्या अभिमान्यांकडून त्यांना प्रखर टीकेला तोंड द्यावे लागले. गीता कर्मपर नसुन संन्यासपर आहे असे प्रतिपादन करणार्यांचा हा गट होता. आचार्यांचे मत खंडन करण्याचं धारिष्ट्य दाखवणार्या टिळकांवर सनातन्यांनी टिकेची झोड उठवली. परंतु असामान्य बुद्धीमत्तेचे टिळक वादविवादात सर्वांना पुरून उरले. आज गीतारहस्य हा ग्रंथ भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील कधीही पराभूत न झालेल्या या नेत्याचं सर्वोच्च प्रतिक बनला आहे
अतुल ठाकुर
संदर्भ: “लोकमान्य” – न. र.फाटक
(पूर्वप्रकाशित)
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 12/30/2013 - 08:12
नवीन
टिळकांचे लेखन अभ्यासतो तेव्हा टिळक परांपरागत तसेच आधूनिक दोन्ही संदर्भांचा समन्वय आणि अभ्यास करत लेखन करत.न.र.फाटकांनी वर दिलेली माहिती पाहता टिळकांचे केवळ कोणत्याही एकाच बाजूने चित्रण करणे योग्य होत नाही.
न.स.फाटकांच्या विवेचना बद्दल डॉ.यशवंत रायकरांचे पुढील प्रतिपादनही सोबतच लक्षात घेता येईल
- Log in or register to post comments
आ
आयुर्हित
Fri, 01/03/2014 - 15:19
नवीन
"त्यापैकी सर्वात गंभीर मधुमेह त्यांनी आहारावर संयम करुन ताब्यात ठेवला होता"
काश !!!
आजकालचे डॉक्टर/मधुमेह तज्ञ कधी याला खूप महत्व देतील?
मधुमेह ताब्यात ठेवता येतो ह्याचा एक चांगला प्रत्यय.
धन्यवाद
कळावे, गोडवा असावा,
आपला लाडका : आयुर्हीत
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 01/03/2014 - 16:48
नवीन
टिळकांच्या नावाने (त्यांचे) प्रसिद्ध वाक्य आहे, जे त्यांनी स्वतः आचरणात आणले होते, "जगण्यासाठी खावे, खाण्यासाठी जगू नये" :)
- Log in or register to post comments
A
Atul Thakur
Mon, 12/30/2013 - 16:58
नवीन
या मताशी सहमत होणे कठीण आहे. न. र. फाटकांचे पुस्तक लोकमान्यांवर आहे मात्र उपसंहारात गांधी उदयानंतर टिळक आणि गांधी अशी तुलना करताना न.र.फाटकांनी काही बाबतीत गांधींना झुकते माप दिल्याचे दिसुन येते.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 12/30/2013 - 17:44
नवीन
गंमतीचा योगायोग म्हणजे न.र. फाटकांनी, केळकरांनी लिहिलेल्या टिळकचरीत्रावर पक्षपाताचा आक्षेप घेतला होता (संदर्भ मटा Apr 14, 2008, 05.02PM IST) आणि न.र फाटकांनी लिहिलेल्या चरित्रावर डॉ.यशवंत रायकरांचा पक्षपाताचा आक्षेप आहे. रायकरांचे खटकलेल्या बाबी म्हणजे डार्विनच्या ‘ओरिजिन ऑफ स्पीसीज्’शी गीतारहस्याची तुलना करणे आणि विष्णु वामन बापटशास्त्र्यांच्या बाजूची दखल न घेणे असे दिसतात
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 12/31/2013 - 02:14
नवीन
अतुलजी
खाली प्रा.बिरुटे सरांच्या प्रतिसादावरून लक्षात आलेली बाब म्हणजे न.चि.केळकरांनी लिहिलेल्या लोकमान्य टिळक चरित्र ग्रंथात गीतारहस्यावरील टिकेची आणि उत्तरांची विसृत दखल घेतलेली असल्यामुळेही न.र.फाटकांनी पुन्रावृत्ती टाळण्याच्या दृष्टीने विष्णु वामन बापटशास्त्र्यांच्या बाजूची दखल घेण्याचे टाळले असेल असेही असू शकते.
आणि आपल्या माहिती आणि अभ्यासपूर्ण प्रतिसादांबद्दल धन्यवाद
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 12/30/2013 - 17:36
नवीन
साहित्यसम्राट न.चि.केळकर यांनी लोकमान्य टीळक यांचे चरित्र लिहिलं आहे त्यात श्रीमद्भभगवद्गीतारहस्य या ग्रंथाबद्दलही लिहिले आहे. तेव्हाच्या टीकारान्नी केलेल्या टिका आणि नंतर त्या टिकांवर लोकमान्य टिळकान्नी दिलेली उत्तरं असे एक प्रकरण आहे. सर्वच वाचण्यासारखे आहे.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 12/31/2013 - 01:54
नवीन
नमस्कार,
मला वाटते न.चि.केळकरकृत "लोकमान्य टिळक यांचे चरित्र" या ग्रंथाचे तीन खंड आहेत. श्रीमद्भभगवद्गीतारहस्य बद्दलचे आपण म्हणता ते प्रकरण कोणत्या खंडात येते हे जाणून घेणे आवडेल.
सोबतच २०१५ मध्ये ग्रंथ प्रकाशनास १०० वर्षे पुर्ण होतात तेव्हा त्या निमीत्ताने मराठी विकिपीडियावरील श्रीमद्भवद्गीतारहस्य या लेखात आपल्या सवडीनुसार भर घालण्या बद्दल विनंती.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 12/31/2013 - 02:18
नवीन
बिरुटे सर
लोकप्रभेतील रायकरांच्या लेखात "मीमांसाशास्त्रातले ग्रंथतात्पर्य काढण्याचे सात नियम" असा उल्लेख येतो ते सात निय्म कोणते य बद्दल काही माहिती उपलब्ध असल्यास तेही जाणून घेणे आवडेल
आणि माहितीपूर्ण प्रतिसादांकरता धन्यवाद
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 12/31/2013 - 07:14
नवीन
गीतारहस्य व् इतर प्रबंध असे शीर्षक आहे तिस-या खंडात त्यात अभिप्राय व टिका आहेत ग्रंथ तात्पर्य यात 1) ग्रंथाचा आरंभ व् शेवट कसा आहे 2) त्यात वारंवार काय सांगितले आहे 3)त्यात अपूर्वता कोणती 4) त्याचा परिणाम किंवा फल काय घडले 5) त्यात उपपत्ति कोणती सांगितले आहे आणि 6) या उपपत्तिच्या द्रढीकरणार्थ किंवा अन्य कारणासाठी दुस-या कोणत्या कोणत्या प्रासंगिक गोष्टी त्यात आहेत ? या सहा गोष्टींचा विचार करून ग्रंथा च्या तात्पर्याचा निर्णय केला पाहिजे.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 12/31/2013 - 07:50
नवीन
ग्रंथतात्पर्य काढण्याचे नियम किती चटकन दिलेत ग्रेट. आपल्या सारख्या अभ्यासू व्यक्तींचा प्रतिसाद लाभला की मिपा मिष्टान्न होते. धन्यवाद.
- Log in or register to post comments
स
सुधीर
Mon, 12/30/2013 - 18:31
नवीन
या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीची छापील प्रत माझ्याकडे आहे. तरीही काही महिन्यांपूर्वी मी पीडीएफ कॉपी जालावर आहे का ते शोधत होतो. तेव्हा मला ही लिंक सापडली होती. मला कल्पना नाही की, ती लिंक अधिकृत आहे का ते.
या ग्रंथाच्या शॉर्ट नोट्स काढाव्यात (स्वतःसाठीच) असं मला खूप वाटलं होतं तसा प्रयत्नही मी ब्लॉगवर केला. पण नेहमीप्रमाणे इतर कामाचा व्याप वाढला. आजकालतर मिपावर यायलाही वेळ मिळत नाही, त्यामुळे शेवटी तो प्रयत्न अर्धवटच राहीला. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे हा ग्रंथ कर्मयोगागावर भर देण्यास सांगतो (कारण ती तत्कालिन समाजाची गरज असावी). पण टिळकांनी सन्यास हा मार्ग नाकारलेला नाही (त्याचं मूळ उगम -सांख्य- ह्यावर त्यांनी उत्तम भाष्य केले आहे, तसचं भक्तीमार्गावरचं त्यांचं विवेचन सुंदर आहे). नीतीमत्तेच्या सर्वोच्चतम पातळीवरची परीक्षा म्हणजे; दोन कर्तव्या मधलं सर्वश्रेष्ठ कर्तव्य ओळखणं आणि ते शुद्ध "बुद्धीने" करणं. आजच्या घडीला हा ग्रंथ केवळ यासाठीच मार्गदर्शक आहे आणि म्हणून तो मला खूप आवडला. बाकी, कर्मविपाकावर काहीजण आक्षेप घेतील, पण तो या पुस्तकाचा मूळ मुद्दा नाहीच. त्यामुळे तो आणि इतर असे काही मुद्दे बाजुला काढले तरी हरकत नाही.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »