Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य

म
माहितगार
Sun, 12/29/2013 - 05:23
🗣 106 प्रतिसाद
अगदी अलिकडे पर्यंत गीतारहस्य म्हणजे लोकमान्य टिळकांनी लिहिलेला ग्रंथ एवढच सामन्यज्ञान होत.पण एकेकाळी ह्या ग्रंथाने विक्रिचे तत्कालीन विक्रम केले असावेत असे वाटते. लोकप्रभा साप्ताहीकातील एका लेखात डॉ.यशवंत रायकर यांनी, '१९१५च्या जून महिन्यात प्रसिद्ध झालेल्या गीतारहस्याच्या सर्व प्रती संपल्यामुळे लगेच सप्टेंबर महिन्यात पहिले पुनर्मुद्रण करावे लागले.' अशी माहिती दिली आहे.या ग्रंथाचा जो भाग (बहुधा शेवटील भाग) ऑनलाईन उपलब्ध झाला ते १९२४ सालचे पुर्नमुद्रण आहे त्यावर ५००० प्रती असा आकडा आहे. लोकप्रभा साप्ताहीकातील डॉ.यशवंत रायकर यांचा हा लेख इतर बाबीकरता वाचनीय (आणि चर्चा करण्याजोगा) आहेच पण त्यात रायकरांनी एखाद्या विषयावर लेखन करताना एखादा परिपेक्ष,एखादी बाजू कशी सुटून जाऊ शकते याचा उहापोह केला आहे. रायकरांचा लेख आणि गीतारहस्याचा ऑनलाईन उपलब्ध भाग वाचताना अजून एका गोष्टीकडे लक्ष गेल ते म्हणजे लोकमान्य टिळकांनी अवलंबिलेली संस्कृत ते मराठी अनुवादाकरता अवलंबलेली पद्धतपण उल्लेखनीय आहे. गीतारहस्याचा ऑनलाईन उपलब्ध भाग मराठी विकिस्रोत प्रकल्पात या दुव्यावर उपलब्ध केला आहे.(मराठी विकिस्रोत प्रकल्पात पिडिएफ फॉर्मॅटचे वाचन करताना युनिकोडीकरण करत लिहिण्याची म्हणजे ग्रंथ बारकाव्याने अभ्यासण्याची संधी सुद्धा उपलब्ध होते) गीतारहस्याचा उपलब्ध सदर ऑनलाईन भाग आणि रायकरांचा लेख याच्या वाचना नंतर काही प्रश्न पडले ते असे १) गीतारहस्य ग्रंथाचे अधिकृत नाव श्रीमद्भभगवद्गीतारहस्य असे आहे का ? २) गीतारहस्य ग्रंथाचे एकुण भाग किती ? (अर्काइव्ह डॉट ऑर्गवरून विकिस्रोतावर आणलेली मूळ प्रतीचे १९२४चे पुनर्मुद्रण गीतारहस्य ग्रंथ आहे पण पृष्ठ संख्या कमी आहे का हा गीता रहस्याशी संबंधीत ग्रंथ आहे आणि सुयोग्य आवृत्ती आहे यास दुजोरा/खात्री करून हवी आहे.कारण प्रथम पृष्ठावर ह्या ग्रंथाचा शेवटील भाग असा उल्लेख दिसतो आहे.) *(कुणाकडे गीतारहस्याचे अजून भाग असतील तर ते मराठी विकिस्रोत प्रकल्पात युनिकोडीकरणाकरता पिडिएफ फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून देऊ शकल्यास हवे आहेत) *(ऑनलाईन उपलब्ध (दुसर्‍या का शेवटच्या ?) भागात काही पृष्ठे रिकामी दिसताहेत.२रे, १६वे व १८वे पान रिकामे आहे ह्यातील एखादे पान गहाळ नसून मूळातूनच रिकामे असल्याची खात्री करून हवी आहे.) ३) उपरोक्त ग्रंथाच्या प्रथमपृष्ठावर "कर्मविपाकसिद्धांत" असा ग्रंथ नामोल्लेख दिसत नाही मग तो कुठून येतो ? ४) लोकप्रभेतील रायकरांच्या लेखात "मीमांसाशास्त्रातले ग्रंथतात्पर्य काढण्याचे सात नियम" असा उल्लेख येतो ते सात निय्म कोणते इत्यादी माहिती हवी आहे.गीतारहस्य बद्दल इतर माहिती चर्चा झाल्यास स्वागतच असेल. उपलब्ध झालेली माहिती मराठी विकिपीडियावरील लेख लिखाणात वापरण्याचा मानस आहे. येत्या वर्ष २०१४ करता आपण सर्व आणि मिपा परिवारास शुभेच्छा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 57722 views

🗣 चर्चा (106)
ब
बॅटमॅन Mon, 01/06/2014 - 12:45 नवीन
प्रत्न हा शब्द बरोबर आहे. त्याचा अर्थ "जुना" असा आहे. संदर्भ खाली पहावा. http://spokensanskrit.de/index.php?script=HK&beginning=0+&tinput=+pratna&trans=Translate&direction=AU
  • Log in or register to post comments
र
राही Tue, 01/07/2014 - 14:23 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 01/07/2014 - 16:44 नवीन
आपल्या मार्गदर्शना प्रमाणे विकिस्रोत प्रकल्पातील लेखन अद्ययावत करता आले.खूप खूप धन्यवाद
  • Log in or register to post comments
श
श्रीनिवास टिळक Wed, 01/08/2014 - 04:17 नवीन
Understanding karma...ची सुधारित आवृत्ती amazon.com वर उपलब्ध आहे. गुगलवर पण आहे (अर्थात ठिकठिकाणी मधली पाने गाळलेली). मूळ आवृत्तीचा draft skydrive वर चढविला आहे त्याचा दुवा https://skydrive.live.com/redir?resid=838F479655AE3BFB%21129
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 01/08/2014 - 04:41 नवीन
गीतारहस्याच्या मूळ प्रथम आवृत्ती (१९१५) चे मुखपृष्ठ आणि नंतरच्या आवृत्तींचे मुखपृष्ठ यात अंशतः फरक असावा असा असे वाटते. मूळ प्रथम आवृत्ती (१९१५) चे मुखपृष्ठा नंतरचे पान मिपा सदस्य श्री जयंत कुलकर्णी यांनी पुरवलेल्या छायाचित्रातून मिळाले.बहुधा मुखपृष्ठावरील मजकुर आणि त्यानंतरच्या प्रथम पानावरील मजकुर एक सारखाच असावा असा अंदाज आहे. मुखपृष्ठा नंतरच्या प्रथम पानावरील मजकूर खाली टंकून उपलब्ध केला आहे.१९१५ची आवृत्ती असलेल्या गीतारहस्या चाहत्यांकडून खालील मजकूर १९१५ आवृत्तीच्या मुखपृष्ठावर असल्याची खात्री करून हवी आहे. शिवाय शेवटच्या कव्हरचे छायाचित्र पहाण्यात आलेले नाही त्यावरही काही मजकुर असल्यास अवश्य कळवावे हि नम्र विनंती The Hindu Philosophy of Life,Ethics and Religion ॐ तत्सत् । श्रीमद्भवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र गीतेचें बहिरंगपरीक्षण,मूळ संस्कृत श्लोक[टंकनभेद],मराठी भाषांतर,अर्थ- निर्णायक टीपा,पौर्वात्य व पाश्चिमात्य मतांची तुलना वगैरेसह . हा ग्रंथ बाळ गंगाधर टिळक यांनीं रचिला. तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर । असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ गीतासु. ३. १९. पुणें. शके १८३७. सन १९१५. किंमत तीन रुपये.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 07/23/2014 - 12:30 नवीन
लोकमान्य टिळकांच्या जन्म दिवसाच्या निमीत्ताने धागा जरा वर काढतो आहे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 15 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 17 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 19 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 23 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा