Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

जय परशुराम...जय वामन!!!

अ — अत्रुप्त आत्मा, Wed, 05/22/2013 - 14:42
आजकाल(म्हणजे अगदी गेली ५ वर्ष सुद्धा)फेसबुकवर ब्राम्हण/ब्राम्हणेतर वादाला नुस्तं उधाण आलय.प्रत्येक जण अगदी आपापली पेजेस करण्यापासून ते ग्रुप्स तयार करण्यापर्यंत अगदी पेटलाय. मी जेंव्हा स्वतःला ब्राम्हण समाजातला घटक म्हणुन पाहातो,आणी आपल्या ऐतिहासिक चुका/घोडचुका तसेच आपल्या समाजबांधवाचे/भगिनिंचे त्याच चुकांची पुनरावृत्ती करणारे वर्तन पाहतो.तेंव्हा मला मोठी गंमत वाटते.आपल्या धर्मातल्या अन्यायी भुमिका/वर्ण श्रेष्ठत्वाचे अहंकार...इत्यादी अनेक गोष्टी आहेत.त्या पाहायच्या नाहीत.समजुनही घ्यायच्या नाहीत. केवळ विरोधकांना नामोहरम करणारी आत्मप्रौढीकडे झुकणारी खंडन/मंडन प्रक्रीया चालु ठेवायची. जातिचे अंधाभिमान/दुराभिमानही बाळगायचे आणी वर पुन्हा हिंन्दूसमाजाच्या/भारतीयत्वाच्या ऐक्याच्या गप्पाही मारायच्या.या दोन्ही भुमिका परस्पर विरोधी/परस्पर विसंगत आहेत हे तर समजुनच घ्यायचं नाही. पुरोगामी विचार मांडणार्‍यांचा द्वेष करायचा,आणी घेतल्याच काही पुरोगामी भुमिका मनावर तर त्या फक्त प्रतिपक्षाला नामोहरम करण्यासाठी एक धोरण/स्टॅटॅजी म्हणुन घ्यायच्या. असा हा सर्व आपल्या समाजजीवनाचा थक्क करणारा पसारा आहे.मी अनेकदा या जातवादी विद्वानांना निरनिराळ्या भुमिकांवरून छेडलं आहे. उदाहरणादाखल यातली ब्राम्हणश्रेष्ठत्वाची भुमिका काय म्हणते हे आपण पाहू... ब्राम्हण हे श्रेष्ठ/ज्ञानी असतात... यावर आपण असं विचारलं की,''आपल्यातच जे मूर्ख/मंद/कमी बुद्धीमत्तेचे आहेत त्याचं काय?'' तर ही वस्तुस्थिती आहे,असं न मानता आरोप आहे असं समजुन.''आंम्ही कधी असं म्हटलं की ''फक्त'' ब्राम्हण(च) श्रेष्ठ/ज्ञानी असतात म्हणून!?'' अशी पलटी मारली जाते...मग आपण विचारवं,''आपलं नक्की म्हणणं काय मग?...'' तर , ''अहो जो विद्वान असेल तो(च) ब्राम्हण'' असं दुसरं अजुन पलटी खाणारं उत्तर मिळतं(यातुनच पुढे गुणाधिष्ठित चातुर्वर्ण्याचं सर्मथनंही ऐकायला मिळतं..)...मग आपण त्याच अनुषंगानी शेवटचा प्रश्न टाकावा..की, ''असं जर का आहे,तर मग ब्राम्हणांनी किंवा त्यांनी मागणी केल्यामुळे त्यांच्या धर्म अध्वर्यूंनी,समाजाच्या गुणात्मक विभागणीची आणी पुनर्रचनेची चळवळ का हाती घेतली नाही?'' किंवा येत्या काहि दिवसात ती तुंम्ही हाती घेणार काय?'' तर यावर एकतर उत्तर मिळत नाही..किंवा परिपूर्ण कांगावेखोर पणानी,,,''हेच तुंम्ही दुसर्‍या जातिंना सांगा...'' वगैरे स्वरुपाची उडवाउडवीची उत्तरं मिळतात. आणी तत्वात जिंकायला येणारी ही माणसं व्यवहारात जरा सुद्धा मनमिळाऊ आणी माणुसकी दाखवणारी नसतात,,,याचा माझ्यासारख्याला पुनःप्रत्यय येतो. ब्राम्हण ब्राम्हण म्हणुनी माझे पेव फुटलेले आहे धुळीत बसलेले ते वादळ पुन्हा उठले आहे. जिथे पहावे तेथे आमचे बोर्ड टांगले आहेत. ज्याला हवे त्या तागडीत सोइने तोलले आहेत. जय परशुराम,जय वामन ह्याच घोषणा आहेत नक्की कुणाचा ''बळी'' द्यायच्या हे लोक तयारीत आहेत? इतिहास/वर्त-मान तपासायची गरजच संपली आहे भयगंडाच्या आत धिटाई हिंसक झाली आहे. संघटनांच्या बळा'साठी घटना हव्या आहेत तोंडात तत्व नैतिकतेची मनात(मात्र)शिव्या आहेत. आपले चेहेरे डागाळलेले कधि दिसणार आहेत? आणी ते पहायला कुणाच्या हतात आरसे... असणार आहेत? ''ते'' काहिही म्हणोत परंतू चिखल माझ्या घरात आहे. मी मात्र सामाजिक स्वच्छतेच्या ऐन...मोसमा/भरात आहे. ===================================================================

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 27936 views

💬 प्रतिसाद
प
प्रसाद गोडबोले Wed, 05/22/2013 - 15:13 नवीन
हास्यास्पद लेख . सध्या इतकेच बोलतो . बाकी पॉपकॉर्न घेवुन बसलोय ....पुढे सविस्तर प्रतिसाद लिहावा काय ह्याचा विचार करत ...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 05/22/2013 - 15:20 नवीन
हास्यास्पद काय काय आहे? ते नोंदवा!
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 05/22/2013 - 16:48 नवीन
समाजमन हे सगळं किती लवकर स्विकारतं हेच बघायचं. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 05/22/2013 - 17:18 नवीन
गेल्या वीकेंडचा प्रसंगः अ ब आणि क मित्र स्टेशनावर उभे आहोत. अ: अरे हीच ना ती आपल्याला शिकवायला होती. किती मेकअप थापून यायची. बः सीकेप्यांची असणार्...त्यांना भारी हौस असते आपण ब्राम्हणांसारखे सुंदर दिसतो हे दाखवायची. क: सुंदर दिसण्याचा आणि ब्राम्हण असण्याचा संबंध काय? बः तुला माहित नाही रे, गप बस. म्हणूनच त्यांच्यात मुंज करतात. आपण ब्राम्हणांसारखे आहोत हे दाखवायला. कः मुळात मुंज ब्राम्हणांतच करतात हा गैरसमज आहे. अ: सोनारांच्यातही करतात. कः अर्थातच!! माझी पण झालीये. बः हो, पण तुम्ही आमचं सगळं ब्राम्हणांसारखं असतं असं दाखवायचा अट्टाहास करत नाही. जात, जी आपल्याला बाय डिफॉल्ट मिळालीये तिचा किती अभिमान असावा एखाद्याला. बरं अशा लोकांना किती आणि कसं समजवावं तेच कळत नाही. टीपः वरील प्रसंग उदाहरणादाखल दिला असला तरी खरोखर घडलेला आहे. यात काही विवादास्पद वाटल्यास संपादकांनी प्रतिसाद उडवल्यास हरकत नाही.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Wed, 05/22/2013 - 18:09 नवीन
घाग्यात लई म्हंजे लैच पोटेंशीयल हाये.. (जाणव्याने पाठ खाजवायची स्मायली कल्पावी)
  • Log in or register to post comments
अ
अशोक पतिल Wed, 05/22/2013 - 18:48 नवीन
प्रामाणिक व परखड लेख !
  • Log in or register to post comments
स
संचित Wed, 05/22/2013 - 19:02 नवीन
अगदि खरे बोललात तुम्हि. आज्कल ऊत आल आहे अशा संघटनांना. बिनापुराव्याचे विनाकारण आणि बिन तर्काचे post करत असतात बरेच. याना आवारा कोणी.
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Wed, 05/22/2013 - 19:14 नवीन
जातींवर आधारीत संघटना, संमेलने याबाबत आपले काय मत आहे ? आत्माजी
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 05/22/2013 - 20:37 नवीन
@याबाबत आपले काय मत आहे ? आत्माजी>>> खरं म्हणजे हे मत माझं नसून मला पटलेलं असं स्वा.सावरकरांचं आहे... ते सारांश रूपानी देतो. जी लोकं जातिच्या बाबतीत हळवी किंवा प्रामाणिक आहेत अश्यांसाठी सावरकर म्हणतात,की सांप्रत काळात जातीय संघ काढावे लागणं हे आमच्या हिंन्दूसमाजाचं वास्तव आहे.परंतू त्या जातसंघांचा/संम्मेलनांचा उपयोग पोटजाती मोडून एकजाती बनणं...जसे की ब्राम्हणातल्या सर्व पोटजाती मोडून एकच ब्राम्हण जाती बनणं,हा पहिला टप्पा नंतर सर्व जाती मोडून एक हिंन्दूजाती बनणं हा दुसरा वा अंतिम टप्पा. म्हणूनच सावरकर सहासन/सहभोजनाच्या चळवळी चालवत होते. त्यांना जाती मोडायच्या कार्यक्रमातील हा(ही) एक उपाय वाटत होता. तो उपकारक की कसा...ते आपण सोडून देऊ.पण मला आजही तो आवश्यक वाटतो. या मार्गानी तर या मार्गानी...माणसांना शेवट हिंन्दू ही तरी एक जात अस्मितादर्शक म्हणून मिळते आहेच ना! शिवाय सावरकरांचाही हिंन्दूजाती होण्यातला अभिमान हा धर्माभिमानाच्या विरोधी पण संस्कृतीच्या चांगल्या मुल्यांच्या बाजूनी आहे. त्यांची सात प्रकारच्या बंदी मोडायची योजना ही अंतिमतः हिन्दूजातीच्या व्यापक एकिकरणाचीच भुमिका आहे. हे ही लक्षात ठेवलेले बरे! जातींवर आधारीत संघटना, आणी संमेलने या मार्गानी व याच हेतूनी चालणार असतील तर आमचा त्याला पाठिंबा! पण दुर्दैव असं की तिथेही धर्ममतांचच प्राबल्य आणी जान्वी घाला वगैरे विषमतावादाचाच प्रसार अढळतो आहे. :(
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग गुरुवार, 05/23/2013 - 05:51 नवीन
मोठमोठी जातीय संमेलने होतात पण त्यामधून काही जोडणी होत असेल तर व्हावी मात्र आपण एकत्र येऊन इतर जातींना शिव्या हा कार्यक्रम असेल तर ते टाळले पाहीजे.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प गुरुवार, 05/23/2013 - 10:24 नवीन
हिन्दु हि जात नसुन हा धर्म अथवा जीवन पद्धती आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 05/22/2013 - 19:32 नवीन
ह्म्म... एकमेकांचा द्वेष करुन काय मिळते ते ज्याचे त्यालाच ठावुक ! आजकाल(म्हणजे अगदी गेली ५ वर्ष सुद्धा)फेसबुकवर ब्राम्हण/ब्राम्हणेतर वादाला नुस्तं उधाण आलय. फेसबुक म्हणण्या पेक्षा जालावर म्हंटल्यास जास्त योग्य होईल असे वाटते. असो.... खालील वाक्य गुगलुन पाहिले तरीही द्वेषच पाहिला मिळेल... शिवचरित्राला डसलेला विषारी नाग ईथेही द्वेष :- http://2.bp.blogspot.com/-K-3bIUZ46CQ/T5Pz3LfEuXI/AAAAAAAAAOY/m9sYYfaMR8Y/s1600/khedekar2.jpg http://4.bp.blogspot.com/-qzK9WZTtH24/T5P16Ci4NuI/AAAAAAAAAOg/vNJBRl33btg/s1600/khedekar3.jpg याच विषया सारखा मिपावरील धागा :- "शिवरायांच्या बदनामीची केंद्रे" *** संपादक मंडळींनी हा प्रतिसाद अयोग्य वाटल्यास, तो उडवल्यास किंवा संपादित केल्यास माझी हरकत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अँग्री बर्ड Wed, 05/22/2013 - 19:35 नवीन
असहमत ! गेले तीन वर्षे संभाजी ब्रिगेड बरोबर येनकेनप्रकरेण नडतोय, आमचा अनुभव वेगळा आहे.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Wed, 05/22/2013 - 20:13 नवीन
काय आहे तुमचा अनुभव?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 05/22/2013 - 20:45 नवीन
@ गेले तीन वर्षे संभाजी ब्रिगेड बरोबर येनकेनप्रकरेण नडतोय, आमचा अनुभव वेगळा आहे. >>> तो नक्कीच वेगळा असणार.कारण संभाजी ब्रिगेडही मराठाजातिच्या हितासाठीच झटणारी संघटना आहे.मग शिवधर्मात किति का लोकशाहीवादी/मानवतावादी तत्व असेनात! धर्माच्या पोथ्या बरं/वाइट काहिही म्हणोत,माणसं स्वार्थप्रेरित हेतूनीच वागणार यात शंका नाही. अँग्री बर्ड >>> तुंम्ही माझ्या भुमिकेशी सहमत आहात काय? ते बोला... फॉर एक्झँपल--- संभाजी ब्रिगेड आणी सर्व ब्राम्हण विरोधी चळवळी संपल्या किंवा त्या आता नाहीत असं क्षणभर गृहित धरा आणी मला सांगा की आपल्या हिंन्दू/वैदिक धर्मातील वर्णवर्चस्वाच्या/विषमतावादाच्या/स्त्री-अन्यायाच्या वाइट्/अनैतिक गोष्टी धर्मातून काढून टाकायला तुंम्ही आमच्या सह येणार का? हे सांगा!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 05/22/2013 - 20:46 नवीन
आपला लेख हास्यास्पद का वाटला ह्या बद्दल हा सविस्तर प्रतिसाद
जय परशुराम...जय वामन!!!
गेली कित्येक वर्ष मि कित्येक ब्राह्मण लोकांना ओळखत आहे , तेही चांगले कट्टर . पण जय परशुराम जय वामन असे बोलताना कोनालाच पाहिले नाहीये . जास्तकरुन कट्टर ब्राह्मण लोक लोक "मोरया" किंव्वा "जय हो " किंव्वा "हरि ॐ" किंव्वा "जय जय रघुवीर समर्थ" असा घोष करुन गप्पा सुरु करतात . परशुराम , वामन ही नावे ब्राह्मणांपेक्षा ब्रिगेडी लोक जास्त वापरतात For obvious reasons . मी आजवर कोणाही ब्राह्मणाच्या घरात परशुरामाची मुर्ती देवघरात पाहिले नाहीये . आणि वामनाची तर मुर्तीच पाहिली नाहीये . ( अवांतर १ : इथे आमच्या आवडीच्या लेखकाने नुकतीच कविता टाकलीये , त्यात वामनाचा उल्लेख केलाय उगाचच . अर्धे मुर्धे पुराणातले संबंध उचलायचे अन वाट्टेल तसे त्याचे अर्थ लावायचे ही एक खुप सर्वसामान्य मानसिकता झाली आहे आजकाल आणो तो जास्त मोठ्ठा प्रश्ण आहे .)
आजकाल(म्हणजे अगदी गेली ५ वर्ष सुद्धा)फेसबुकवर ब्राम्हण/ब्राम्हणेतर वादाला नुस्तं उधाण आलय.
आजकाल ? काय बोलता राव ? ब्राह्मण ब्राह्मणेतर १८व्ता शतका पासुन चालु आहे , आजकाल फक्त हत्यारं बदलली आहेत.
आपल्या धर्मातल्या अन्यायी भुमिका/वर्ण श्रेष्ठत्वाचे अहंकार...इत्यादी अनेक गोष्टी आहेत.त्या पाहायच्या नाहीत.समजुनही घ्यायच्या नाहीत.
बरं . ब्राह्मणांनी आपल्या धर्मातील अन्यायी भुमिका सोडली आहे असे माझे ठाम मत आहे . जाणत्या वयात आल्यापासुन मी जितके काही प्राह्मण लोक पाहिलेत त्यातला एकही जातीयता पाळणारा मला भेटलेला नाहीये. कित्येक मित्रमैत्रिणींनी आणि बहिणींनीही अंतर्जातीय विवाहही केलेत जे घरी अ‍ॅक्सेप्टही झालेत . मात्र वर्ण श्रेष्ठत्वाच्या अहंकाराबद्दल मी ठाम आहे . तो असायला काहीच हरकत नाही . ४८ ला घरें जळाली , नंतर कुलकायद्यात जमीनी गेल्या . नंतर आरक्षनाच्या समान संधी मुले नोकर्‍या गेल्या . उरला सुरला जो अभिमान आहे तो पोकळ आहे त्याने आरक्षण मिळणार नाही नोकर्‍या मिळणार नाहीत मग तो ठेवणे न ठेवने हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. (अवांतर२ : लहानपणी आजोबांनी एक घड्याळ दिलं होतं . ते बंदपडुन कित्येक वर्षं झाली . दुरुस्त व्हायची शक्यताही नाही . कोनी भंगारातही घेणार नाही ....म्हणुन काय टाकुन देवु ?? )
केवळ विरोधकांना नामोहरम करणारी आत्मप्रौढीकडे झुकणारी खंडन/मंडन प्रक्रीया चालु ठेवायची.
असेलही , पण त्यातली मतेरीयलाईझ काहीतरी झालय का ? उलट ब्राह्मण द्वेषाने ओतप्रोत भरलीली १७६० पुस्तकं तुम्हाला दाखवतो , अन ती किती मटेरीयलाईझ होत आहेत हे तुम्हाला दादोजी कोंददेव सांगतील . (अवांतर ३: श्री पुरुषोत्तम खेडकर ह्यांचे एक अप्रतिम पुस्तक आहे माझ्याकडे .पत्ता द्या पाठवुन देतो तुम्हाला . माईनकाम्फ ची आठवण नाही आली तर बोला )
जातिचे अंधाभिमान/दुराभिमानही बाळगायचे
वर म्हणल्याप्रमाणे पोकळ अहंकार बाळगायला हरकत नसावी . का त्याबद्दल सुध्दा अ‍ॅटॉसिटी लावणार आता ?
आणी वर पुन्हा हिंन्दूसमाजाच्या/भारतीयत्वाच्या ऐक्याच्या गप्पाही मारायच्या.या दोन्ही भुमिका परस्पर विरोधी/परस्पर विसंगत आहेत हे तर समजुनच घ्यायचं नाही.
जाट लोक स्वतःला अभिमानाने जाट म्हणवुन घेतात ...तसेच राजपुत ...तसेच भैया बिहारी लोक ...तसे बंगाली ...तसेच मारवाडी ...तसेच सरदार...तसेच मल्लु मल्लु !! ह्याने आजवर तरी भारतीयत्वाच्या हिंदुत्वाच्या ऐक्याला बाधा पोचली नाहीये . ब्राह्मणांनी अभिमान बाळगला तर असे काय आकाश कोसणार आहे देव जाणे ? डायवर्सीटी ही होतीच , वर्णाभिमानही होतेच अन ते असुनही आपण एकत्र होतो एकसंध होतो कदाचित हिंदु धर्माची ताकत होती .
आणी तत्वात जिंकायला येणारी ही माणसं व्यवहारात जरा सुद्धा मनमिळाऊ आणी माणुसकी दाखवणारी नसतात,,,याचा माझ्यासारख्याला पुनःप्रत्यय येतो.
तुम्ही किती ब्राह्मणांशी बोलुन हा निष्कर्ष काढयात ? त्यातले किती जण उच्चशिक्षित होते ? किती जणांना सध्याच्या सामाजिक न्यायाचे चटके बसले होते ? किती जण त्या चटक्यातुन सावरलेले होते ? काही मोजक्या अत्यल्प माहीती वरुन जनरलायझेशन करण फार डेंजरस सिंप्टम आहे . आता १) तुम्ही कदाचित पुण्या मुंबईचे ( क्वचित नाशिकचे) दिसताहात. एकडाव सातार्‍यात कोल्हापुरात येवुन विद्रोही साहित्य संमेलन अटेंड कराच . २) तुमचा लेख आग सोमेश्वरी अन बंब रामेश्वरी ह्या प्रकारातला वाटला . ३.५ % लोकांनी पोकळ अहंकार बाळगला तर तर त्यावर चर्चा करायची की राज्यामधल्या सर्वात पावरफुल जातीचे प्रतिनिधी ओपनली हिंसेची भाषा करतात , अन संधी मिळाल्यावर ते करुनही दाखवतात ह्यावर चर्चा करायची ? ३) राहता राहिला प्रश्न हिंदुत्वाचा : ब्राह्मणो वर्णानाम गुरु : अर्थात ब्राह्मण सर्व वर्णांचा गुरु आहे अशा अर्थाचा श्लोक लहानपणी शिकवला जातो म्हणुन बरेचशे ब्राह्मण हिंदुत्ववादाचे समर्थक दिसतात . त्यांना सामाजिक न्याय मिळाला की ते भानावर येतात ... येतील हळु हळु भानावर ... (अवांतर ३ :हिंदु नावाचा धर्मच नाही असा एक शोध नुकताच वाचनात आला आहे तो मी जमात के लोकांकु फारवर्ड करत आहेच ) असो. खालील स्वाक्षरी नीट पहावी ही अतिनम्र विनंती .
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 05/23/2013 - 07:53 नवीन
गिरिजाभाव, तुमच्या प्रतिसादाच्या निमित्ताने कायम पडत असलेला एक प्रश्न विचारतो.
ज्या गोष्टीच्या असण्यानसण्यात आपलं कोणतंच कर्तृत्व नाही त्या गोष्टीचा अभिमान कसा काय वाटू शकतो बुवा?
(हे म्हणजे "मला दाढी उगवते याचा मला अभिमान आहे" असं म्हणण्यासारखं आहे) आणि हा प्रश्न तुमच्याइतकाच खेडेकर प्रभृति* मंडळींनाही लागू आहे. *पुरुषोत्तम खेडेकर आणि ह मो मराठे हे दोघेही श्रेष्ठ दर्जाचं विनोदी साहित्य लिहितात "असं माझं मत आहे".
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/23/2013 - 08:03 नवीन
वाह , मोठ्ठा फिलॉसॉफिकल प्रश्न विचारलात , बरें वाटलें .
ज्या गोष्टीच्या असण्यानसण्यात आपलं कोणतंच कर्तृत्व नाही त्या गोष्टीचा अभिमान कसा काय वाटू शकतो बुवा?
ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी अध्याय २ मध्ये म्हणतात की ह्या सगळ्या मनाच्या भावना संस्कारांमुळे निर्माण होतात . सुख दु:ख , कडु गोड तसेच मग ह्यात अभिमान गर्व हेही आलेच की . एकुणच मनाला जे जे काही भासते ते सारे संस्कारामुळे भासते .( इथे संस्कार ह्या श्ब्दाचा अर्थ पुर्वानुभवातुन (स्वतःच्या वा इतरांच्या ) मिळालेली माहीती . आजच्या भाशेत ट्रेनिंग सेटचे मॉडेल .) अवांतर १ : ही चर्चा फिलॉसॉफिकल आहे अन ह्या धाग्यावर अवांतर आहे , पुढील गप्पा खरडवहीतुन ! अवांतर २ : मी सध्या एका मुस्लिम देशात आहे आणि इथे बरेच लोक अभिमानाने दाढी ठेवताहेत . मीही ठेवली आहे अन मला त्याचा अभिमान वाटतोय ...संस्कारांमुळे !!
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 05/23/2013 - 08:12 नवीन
पुरुषोत्तम खेडेकर आणि ह मो मराठे हे दोघेही श्रेष्ठ दर्जाचं विनोदी साहित्य लिहितात
पुरुषोत्तम खेडेकर मी कधी वाचले नाहीत. पण तुमचं एकूण वाचन चांगलं आहे म्हणून सांगते, ब्राह्मण घरातही दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा, स्त्रियांवरचे अन्याय आणि शोषण काय कोटीचं असू शकतं हे माहिती करून घ्यायचं असेल तर ह.मो. मराठे यांचं "बालकांड" वाचा.
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 05/23/2013 - 10:17 नवीन
>>ब्राह्मण घरातही दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा, स्त्रियांवरचे अन्याय आणि शोषण काय कोटीचं असू शकतं हे माहिती करून घ्यायचं असेल तर ह.मो. मराठे यांचं "बालकांड" वाचा. सहमत !!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 05/23/2013 - 11:25 नवीन
त्याचा उत्तरार्ध 'पोहरा' पण सुरेख आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प गुरुवार, 05/23/2013 - 11:38 नवीन
अहो वाचायला वेळ आहे का ईथे आणि ते सुद्धा पुस्तक ? त्यापेक्षा z marathi वरिल उमाझो कार्यक्रम बघितला तरि पुरे.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 05/23/2013 - 18:06 नवीन
पैसाताई - बालकांड आणि पोहरा वाचलंय. तुम्ही म्हणता त्याच्याशी सहमत आहे. मी हमोंच्या "ब्राह्मणांना कुठवर झोडपणार" या पुस्तकाविषयी बोलत होतो.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/23/2013 - 21:22 नवीन
@आपला लेख हास्यास्पद का वाटला ह्या बद्दल हा सविस्तर प्रतिसाद --- सर्वात अधी सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद :) @गेली कित्येक वर्ष मि कित्येक ब्राह्मण लोकांना ओळखत आहे , तेही चांगले कट्टर . पण जय परशुराम जय वामन असे बोलताना कोनालाच पाहिले नाहीये . जास्तकरुन कट्टर ब्राह्मण लोक लोक "मोरया" किंव्वा "जय हो " किंव्वा "हरि ॐ" किंव्वा "जय जय रघुवीर समर्थ" असा घोष करुन गप्पा सुरु करतात . परशुराम , वामन ही नावे ब्राह्मणांपेक्षा ब्रिगेडी लोक जास्त वापरतात For obvious reasons . मी आजवर कोणाही ब्राह्मणाच्या घरात परशुरामाची मुर्ती देवघरात पाहिले नाहीये . आणि वामनाची तर मुर्तीच पाहिली नाहीये --- मी या घोषणांचा ''आधार'' गेली पाच वर्ष(किंवा दहा वर्ष असं आगे/मागे काहिही असू शकेल कदाचित) चाललेल्या सामाजिक घडामोंडीवरुन घेतलेला आहे. तो ब्राम्हणांच्या घरात किंवा तोंडात असतो असं कुठेही म्हटलेलं नाही.त्यापूर्वी ब्राम्हण समाजात हे काहिही मला पाहायला मिळालेलं नाही. हल्ली चालणार्‍या ब्राम्हण संम्मेलनांमधे परशुरामाचा फोटो असतो,आणी त्याची हार घलुन पुजा होते. हे आपणास ठाऊक नाही काय? तसेच घरामधेही परशुरामाचे फोटो दिसायला लागले आहेत. फेसबुकवर तर परशुराम जयंती फोटो...आणी ''जय परशुराम'' ही घोषणा देऊनच साजरी केली जाते आहे, हे तरी सत्य आहे ना? आणी लेखाला/कवितेला दिलेलं नाव हे घोषणा म्हणून नव्हे,तर लेखाच्या विषयाच्या अनुषंगानी दिलं आहे,हे तरी समजुन घ्या. अता परशुराम/वामन ही नाव ब्रिगेडी लोकं वापरतात याचं कारण काय आहे? हे सांगा बरं ! मोठ्या चर्चेचा विषय आहे हा... माहितीये तुंम्हाला? सांगा मग! @( अवांतर १ : इथे आमच्या आवडीच्या लेखकाने नुकतीच कविता टाकलीये , त्यात वामनाचा उल्लेख केलाय उगाचच . अर्धे मुर्धे पुराणातले संबंध उचलायचे अन वाट्टेल तसे त्याचे अर्थ लावायचे ही एक खुप सर्वसामान्य मानसिकता झाली आहे आजकाल आणो तो जास्त मोठ्ठा प्रश्ण आहे .) ---- अहो माझ्या लेखन प्रीय वाचक:श्री... अर्धे/मुर्धे संबंध उचलुन मी काहि मांडत नाही हो! या परशुराम/वामन सिंड्रोमचा अभ्यास मी गेली ८ वर्ष करतो आहे. मी त्याच्या बाजूनी आणी विरोधात लिहिलं गेलेलं असं बरच वाचलं आहे,शिवाय मी ही ति कथा वाचली आहे. @आजकाल ? काय बोलता राव ? ब्राह्मण ब्राह्मणेतर १८व्ता शतका पासुन चालु आहे , आजकाल फक्त हत्यारं बदलली आहेत --- हे मलाही ठाऊक आहे,पण मी गेल्या काहि वर्षात जे ''उधाण'' आलय,त्यामुळे तसं म्हटलय हो! तुंम्ही माझी विधानं शांतपणे आणी समजुन/उमजुन वाचा हो...! @बरं . ब्राह्मणांनी आपल्या धर्मातील अन्यायी भुमिका सोडली आहे असे माझे ठाम मत आहे . --- बाप रे...! कमाल आहे तुमची..असो! आधी तुंम्ही अन्यायी भुमिका आहेत हे जाता जाता मान्य केलतं त्या बद्दल धन्यवाद. अता मला सांगा... '' ब्राम्हणच श्रेष्ठ असतो'' हे विधान बरेचदा निरनिराळ्या अनुषंगानी ऐकायला मिळतं,हे काय अन्यायी भुमिका सोडल्याचं लक्षण मानायचं का? @जाणत्या वयात आल्यापासुन मी जितके काही प्राह्मण लोक पाहिलेत त्यातला एकही जातीयता पाळणारा मला भेटलेला नाहीये. --- एकही??? एकही भेटलेला नाही...??? खरच, फार धाडसी विधान करता ब्वा तुंम्ही .. असो. वादासाठी हा मुद्दा मी मान्य करतो,पण तरिही मला सांगा ,ब्राम्हणातल्या ब्राम्हणात पोटजातिंच्या भ्रामक अहंता हा काय प्रकार आहे हो? आमच्या कोकणस्थांनी सर्व ब्राम्हणात स्वत:ला श्रेष्ठ समजणं/देशस्थांनी आपणच खरे धर्माचार पाळणारे ब्राम्हण असा गंड बाळगण/कर्‍हाड्यांनी अजुन काही आणी बाकिच्या पोटजातिंनी आणखि असच काही.. ही सगळी जातीयता ''पाळल्याचीच'' लक्षणं आहेत. यावर आमच्या एका कोकणस्थ मित्रानी टाकलेला टाँट मला कायम अठवतो...तो म्हणाला, ''जगात जाती दोनच,कोकणस्थ आणी इतर'' हा टाँट त्यानी नेहमीच्या देशस्थ कोकणस्थ चिडवा चिडवीच्या पार्श्वभूमीवर टाकलेला असला, तरी ही मानसिकता काय दाखवते??? @कित्येक मित्रमैत्रिणींनी आणि बहिणींनीही अंतर्जातीय विवाहही केलेत जे घरी अ‍ॅक्सेप्टही झालेत --- काहि सन्माननीय अपवाद जमेला धरले,तर ही गोष्ट सत्य आहे की आज/काल अंतर जातीय विवाह होतात याच कारण, आर्थिक ''गणितं'' जमली आणी ''क्लास'' एकच असला तर जात असली नसली काय? काहिहि फरक पडत नाही...म्हणून अंतरजातीय विवाह होतात, मी अंतरजातीय लग्न ''लावताना'' अनेकदा वधू/वरांना काहि प्रश्ण विचारत असतो..पण मी वर नोंदवलेले सन्माननीय अपवाद सोडले तर अंतर जातीय विवाहांपैकी शेकडा ९५ टक्के मुला मुलिंना आपण अंतर जातीय विवाह का करतो आहोत याच उत्तर ठाऊकच नसलेलं मला अढळलं आहे. केवळ आर्थिक आणी क्लासचं(वर्गाचं)गणित जमलं म्हणूनच हे विवाह होतात हेच मला निदर्शनाला आलेलं आहे. @मात्र वर्ण श्रेष्ठत्वाच्या अहंकाराबद्दल मी ठाम आहे . तो असायला काहीच हरकत नाही . --- हे घ्या..! आपण स्वतःच वरती जातीयता पाळणारा ''एकही'' पाहिला नाही असं म्हणता, आणी ''वर्ण श्रेष्ठत्वाच्या अहंकाराबद्दल आपण ठाम आहात'' ,असंही म्हणता--या दोन विधानांचा अर्थ काय घ्यायचा हो??? तुंम्हाला जर खरच असं वाटत असेल की तुंम्ही ''वर्ण श्रेष्ठ आहात'' तर माझ्या लेखनाचा उद्देश आणी कारण बरोबर आहे हेच सिद्ध करून देताय तुम्ही... @४८ ला घरें जळाली , --- हा एकच मुद्दा या चर्चेच्या बाहेरचा आहे,कारण हा सामाजिक मुद्दा नाही,हा राजकीय मुद्दा आहे... (माझ्या अंदाजा नुसार, तो 'गांधिवध/हत्या---गोडसे प्रकरण' असा आहे...बरोबर ना?) त्यामुळे हा मुद्दा वरिल चर्चेत लागू पडत नाही...तरिही माझं मत ''ब्राम्हणांवर या बाबतीत सरसकट अन्याय झाला'' असच आहे...हा दुसर्‍या चर्चेचा विषय आहे...असो @नंतर कुलकायद्यात जमीनी गेल्या .नंतर आरक्षनाच्या समान संधी मुले नोकर्‍या गेल्या .---ही दोन्ही प्रकरणं वकिली आणी कायद्याच्या संदर्भातली असल्यामुळे मी त्या प्रांतातलं काहि नोंदवत नाही,पण मला सांगा हे होण्याची ''वेळ'' का आली हो!? खरच तुंम्हाला ब्राम्हणांचा सामाजिक इतिहास माहित आहे काय? वैदिक धर्म म्हणजे अत्ताचा आपला हिंन्दू धर्म एक समाज व्यवस्था म्हणून जितक्या पूर्वी लागु झाला,,,तेंव्हा पासून ते भारत स्वतंत्र होई पर्यंत वैदिक धर्मानी ब्राम्हण/क्षत्रियांची विषमतावादी अन्याय्य मुल्य हताशी धरून,त्यांच्या आर्थिक उद्धाराची सोय पाहिलि होती का नाही हे सांगा? अगदी त्या काळात ब्राम्हण आणी क्षत्रीयांमधल्या सर्वच्या सर्व लोकांचं हित त्यातुन साधलं गेलेलं नव्हतं हे मलाही मान्य आहे. (जसं अत्ताच्या काळात आरक्षणाचे लाभ त्या त्या वर्गातल्या राजकारणामुळे ठराविकांच्याच पदरी पडतात,तसच आपल्यातही होतं असं माझं मत आहे)... मग सामाजिक न्यायाच्या भुमिकेतून कुळ कायदा आणी आरक्षण हे त्या त्या अन्याय सोसलेल्या/समान संधी न मिळालेल्या वर्गाच्या दृष्टिनी न्याय्य नाही का? की तुमचं यावर म्हणणं,''आंम्ही अन्याय केलेच नाहीत'' असं आहे... असं असेल तर विषयच संपला. @उरला सुरला जो अभिमान आहे तो पोकळ आहे त्याने आरक्षण मिळणार नाही नोकर्‍या मिळणार नाहीत मग तो ठेवणे न ठेवने हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. --- हा प्रश्न वैयक्तिक नाही... जातीय प्रश्न कुठल्याही पातळिवरचा असो,तो सामाजिकच असतो...म्हणून ''पोकळ'' वाटला न वाटला तरी तो अभिमान जातीय आहे,सबब तो सोडला पाहिजे. @(अवांतर२ : लहानपणी आजोबांनी एक घड्याळ दिलं होतं ते बंदपडुन कित्येक वर्षं झाली . दुरुस्त व्हायची शक्यताही नाही . कोनी भंगारातही घेणार नाही ....म्हणुन काय टाकुन देवु ?? ) --- हे,,,घड्याळाचं उदाहरण ''पोकळ'' जातियतेसाठी देणं हास्यास्पद आणी विसंगत आहे. कसं त तुलना करून पहा--- १)लहानपणी आजोबांनी एक घड्याळ दिलं होतं .--- हे भेट म्हणून दिलं किंवा कसही दिलं असलं,तरी जात ही आपल्याला अशी'च कुणिही ''भेट'' दिलेली नाही. तो आपल्या सामाजिक अव्यवस्थेचा भाग आहे त्यामुळे हा मुद्दा फोल. २)ते बंदपडुन कित्येक वर्षं झाली . दुरुस्त व्हायची शक्यताही नाही . कोनी भंगारातही घेणार नाही .... --- पण जात अजुन बंद पडलेली नाही ती ''चालु'च'' आहे... पुढचे दोन मुद्दे तर त्यामुळे चुकतातच चुकतात..पण तिन्हींचा एकत्र अनुषंग लावायचा झाला तरी घड्याळा सारखं मोलाचं काम जात करत नाही, उलट सगळा ''काळ'' तिनी खराब केलाय त्या मुळे हा मुद्दा तर पूर्ण फोल ३)म्हणुन काय टाकुन देवु ?? --- खरच नका टाकू.आपल्याला आपल्या सुहृदांनी अत्यंत प्रेमानी दिलेल्या वस्तु आपण टाकत नाहीच...जतन करतो,कारण ती वस्तू आपल्या आणी त्यांच्यातल्या प्रेमाचं प्रतिक असते. एका अर्थी आपण ती वस्त्तू एक स्नेहपूर्ण अठवण म्हणूनच जपत असतो... हे आपल्या मनाच्या जिवंत पणाचंही लक्षण आहे. पण... जातिचं मात्र असं होत नाही, आपण म्हणता त्या मतानुसार जात निरुपयोगी आणी पोकळ झालेली आहे, आणी मुळात ती काही घड्याळा सारखी चांगली ''भेट'' नाही तर मग ती टाकणं/विसर्जन करणं हेच योग्य आणी आवश्यकही आहे. (मी नेहमी असं म्हणतो,की ''एकाही धार्मिक मुल्याला ऐहिक मुल्यांचे मुद्दे उदाहरणादाखल देखिल लागू पडत नाहीत,किंबनुना ते विसंगतच ठरतात'' याचा आज पुनःप्रत्यय आला..असो ) @असेलही , पण त्यातली मतेरीयलाईझ काहीतरी झालय का ? --- असेलही नाही हो, आहेच! आणी आपण सकारात्मक खंडन/मंडनाकडे येत नाही तोपर्यंत मटेरियलाइझ काय आणी कसं होणार? त्याशिवाय हे शक्य तरी आहे का? @ उलट ब्राह्मण द्वेषाने ओतप्रोत भरलीली १७६० पुस्तकं तुम्हाला दाखवतो , अन ती किती मटेरीयलाईझ होत आहेत हे तुम्हाला दादोजी कोंददेव सांगतील . --- हे खरं आहे की ब्रिगेडी जे काहि करत आहेत हा ब्राम्हणांचा नुस्ता विरोध नसून द्वेषच आहे.आणी मी सर्व ब्रिगेडी पुस्तकं वाचली आहेत/वाचत असतो/वाचत रहाणरही... @(अवांतर ३: श्री पुरुषोत्तम खेडकर ह्यांचे एक अप्रतिम पुस्तक आहे माझ्याकडे .पत्ता द्या पाठवुन देतो तुम्हाला . माईनकाम्फ ची आठवण नाही आली तर बोला ) --- अगदी बरोबर... माईनकाम्फच! पुस्तकाचं नाव सांगा.माझ्याकडे ते नसेल, तर घेइन मी. इथे पुण्यात ब्रिगेडी सर्व काही मिळते. @वर म्हणल्याप्रमाणे पोकळ अहंकार बाळगायला हरकत नसावी . का त्याबद्दल सुध्दा अ‍ॅटॉसिटी लावणार आता ? --- पोकळ अहंकाराचं विवेचन झालय...त्यामुळे परत काहि सांगत नाही... आणी अ‍ॅट्रोसिटी जातिचा अहंकार बाळगल्या बद्दल नाही हो लागत... असो! @जाट लोक स्वतःला अभिमानाने जाट म्हणवुन घेतात ...तसेच राजपुत ...तसेच भैया बिहारी लोक ...तसे बंगाली ...तसेच मारवाडी ...तसेच सरदार...तसेच मल्लु मल्लु !! --- हां... हा तर नेहमीचा मुद्दा आहे... 'इतर जाती जातियता पाळतात,मग आंम्ही का पाळू नये?' असा तो मुद्दा! आमच्या मित्राचं वसंत व्याख्यान मालेतलं भाषणातलं वाक्य अठवलं या निमित्तानी.ते भाषण हिंन्दू/मुस्लिम प्रश्णावर होतं,पण दोन्ही विषयातला प्रवृत्त्ती धर्म एकच असल्यामुळे इथेही ते लागू पडतं---ते वाक्य असं, की--- ''ते कट्टर पणा करतात/सनातनी रहातात/जातीयता पाळतात, मग आंम्हीही तेच सर्व केलं तर बिघडलं काय? त्यामुळे ते चिखलात खेळतात..म्हणून आंम्हीही चिखलात खेळणार!...चिखलात खेळायचा हक्क दोघांचा'' यावर माझी टिप्पणी अशी की,''सामाजिक खरूज/रोग होऊन सामाजिक आरोग्याचा बळी गेला तरी चालेल...पण,मी चिखलात खेळणारच!!!'' @ह्याने आजवर तरी भारतीयत्वाच्या हिंदुत्वाच्या ऐक्याला बाधा पोचली नाहीये. --- पुन्हा ते...च! अहो,विषमतेमुळे ऐक्य कसं राहु शकतं हो? मजा आहे बाबा... आपल्या या भ्रामक ऐक्याच्या कल्पनेला बाबासाहेब अंबेडकरांनी अतिशय समर्पक उपमा दिलि आहे,ते हिंन्दू समाजाला ''कांद्या/बटाट्याचं'' पोतं म्हणतात. विषमतेच्या पोत्यात एकत्व आणी पोत्यातून ''जमिनिवर'' सोडलं की व्यापक अनेकत्व... एका अर्थी अपंगत्वच! असो.. @ब्राह्मणांनी अभिमान बाळगला तर असे काय आकाश कोसणार आहे देव जाणे? >>> अहो महाराज,ब्राम्हणांनी नव्हे,,,तर कुणीच हा अभिमान बाळगू नये तेच सर्वांच्या हिताचं आहे,पण मी जो स्वजातिनिर्मूलनाचा पक्ष घेतला आहे,त्याच्या मर्यादेत मला हे फक्त आपल्या ब्राम्हणांबद्दल म्हणावं लागतं...असो! @डायवर्सीटी ही होतीच , वर्णाभिमानही होतेच अन ते असुनही आपण एकत्र होतो एकसंध होतो कदाचित हिंदु धर्माची ताकत होती . --- हे असूनही आपण एकत्र(?) एकसंध(?????) होतो,तर मग खर्‍या अर्थानी हिंन्दू ताकद दिसायला शिवाजी पर्यंत थांबावं का लागलं हो??? त्या आधी सगळा अंधःकारच आहे....शिवाजीच्या आधीचा सारा इतिहास पहिला तर त्याला तुमचा हा मुद्दा लागू पडतो? असं खरच तुंम्हाला वाटतं? शिवाजीनी धर्म समाजकारणातून/राजकारणातून बाजुला केला म्हणून हिंन्दू एक झाले, हे कसं विसरता येइल? आजच्या सार्‍या हिंन्दुत्वाचा ''आधार'' शिवाजी आहे, हिंन्दूधर्म नव्हे..हे तरी लक्षात येतय का तुमच्या??? @तुम्ही किती ब्राह्मणांशी बोलुन हा निष्कर्ष काढयात ? त्यातले किती जण उच्चशिक्षित होते ? किती जणांना सध्याच्या सामाजिक न्यायाचे चटके बसले होते ? किती जण त्या चटक्यातुन सावरलेले होते ? काही मोजक्या अत्यल्प माहीती वरुन जनरलायझेशन करण फार डेंजरस सिंप्टम आहे . --- हा सगळा निष्कर्ष मी ज्यांच्याशी बोलुन काढला ते सर्व ब्राम्हणच होते हो. आणी दुसरे जातवाले कसे घेऊ मी यात? मला दुसर्‍या जातिशी या विषयावर कसं बोलता येइल? ते स्वजातिनिर्मूलनाच्या विसंगत नाही का होणार सांगा बरं? आणी या विषयात बोलून मत जाणून घेतली, ती लोकं उच्चशिक्षित/सामाजिक न्यायाचे चटके बसलेली/चटक्यातून सावरलेली... अशी सगळी होती... जी माझ्या मताची अगदी अपवादात्मक/तोंडदेखली भेटतात त्यांना मी संपर्कात ठेवायचा प्रयत्न करतो...त्यांना पुरोगामी विचारांची पुस्तकं सांगतो/देतो... बास... सध्या यापेक्षा आणखि काय करणार? @आता १) तुम्ही कदाचित पुण्या मुंबईचे ( क्वचित नाशिकचे) दिसताहात. एकडाव सातार्‍यात कोल्हापुरात येवुन विद्रोही साहित्य संमेलन अटेंड कराच . --- मी पुण्याचा आहे. आणी विद्रोही संमेलनांचे सगळे रिपोर्ट मला मिळत असतात.तसेच मी विद्रोह्यांची भाषणं ऐकायला वेळ मिळेल तसा सगळीकडे जात असतोच @ २) तुमचा लेख आग सोमेश्वरी अन बंब रामेश्वरी ह्या प्रकारातला वाटला . ३.५ % लोकांनी पोकळ अहंकार बाळगला तर तर त्यावर चर्चा करायची की राज्यामधल्या सर्वात पावरफुल जातीचे प्रतिनिधी ओपनली हिंसेची भाषा करतात , अन संधी मिळाल्यावर ते करुनही दाखवतात ह्यावर चर्चा करायची ? --- आगही रामेश्वरी आहे,आणी मी बंबही रामेश्वरीच नेतो आहे,हे वरिल चर्चेवरून आपल्याला पटावं ही अपेक्षा. बाकि पोकळ अहंकाराविषयी आणी ''ते जात पाळतात,मग आंम्ही का नाही?'' या विषयीही वर बोललोच आहे. @३) राहता राहिला प्रश्न हिंदुत्वाचा : ब्राह्मणो वर्णानाम गुरु : अर्थात ब्राह्मण सर्व वर्णांचा गुरु आहे अशा अर्थाचा श्लोक लहानपणी शिकवला जातो म्हणुन बरेचशे ब्राह्मण हिंदुत्ववादाचे समर्थक दिसतात . --- बघा..बघा कसा प्रोब्लेम होतो जातीय भुमिका ठेऊन चांगलं करायला गेल्यामुळे.तुंम्म्ही म्हणता ब्राम्हण हा सर्व वर्णाचा गुरु आहे...हे वचन लहानपणी शिकलं जातं,''म्हणून'' ब्राम्हण हिंदुत्ववादाचे समर्थक दिसतात... म्हणजे हे शिकवलं गेलं नाही,आणी पर्यायानी ब्राम्हणाला, आपण सर्व वर्णांचे गुरु असल्यामुळे त्यां वर्णांचं हिंन्दुत्वाच्या माध्यमातून हितं साधलं पाहिजे...अशी शिकवण मिळाली नाही तर बरेचशे ब्राम्हण या बाकि समाजाचं हित साधायच्या चांगल्या कार्यक्रमात येणारच नाहीत. त्यापेक्षा हे अस्लं काहितरी खोटं/अहंकारी आणी आपल्याच नैसर्गिक मर्यादेला कमिपणा आणणारं ''ब्राह्मणो वर्णानाम गुरु'' नावाचं मुल्य देण्यापेक्षा सरळ ''जिथे जखम तिथे मलम'' देणारा सावरकरी-प्रेरणेतून तयार झालेला आमचा स्वजातिनिर्मूलनाचा उपाय किति उपकारक आहे....? सांगा बरं ? :) @त्यांना सामाजिक न्याय मिळाला की ते भानावर येतात ... --- सामाजिक न्याय मिळण्यासाठी मी केलेलं किंवा माझ्या माथि असलेलं सामाजिक पाप मी कबुल करून ते धुवुन काढायला नको का? त्याशिवाय कसा मिळणार ''सामाजिक न्याय?'' @येतील हळु हळु भानावर ... --- जेंव्हा मी ब्राम्हण वर्णाला(मला)-- धर्मानी दिलेल्या सोई-सवलती/ जातिचे अधिकार/हक्क्/फायदे, हे विषमता वादी/अन्याय्य आहेत हे समजून घेऊन स्वतःला सांगू लागलो,तेंव्हाच मला हळू हळू भान येऊ लागलं ही माझी वस्तुस्थिति आहे. असं खरं आणी सजग भान आल्यानंतरच सामाजिक न्याय मिळत असतो...आणी तो मिळाला न मिळाला तरी एक कर्तव्य म्हणून मी ''माझा कार्यक्रम'' चालू ठेवणार! @(अवांतर ३ :हिंदु नावाचा धर्मच नाही असा एक शोध नुकताच वाचनात आला आहे तो मी जमात के लोकांकु फारवर्ड करत आहेच ) --- हा ज्यांचा कुणाचा शोध आहे,तो ''त्यांचा'' शोध नसून एक मूलभूत वास्तव आहे. हिंन्दू हा धर्म असं आपण सोईखातर म्हणतो,पण मूळ धर्म वैदिक आहे...हिंन्दू हे वैदिक धर्माच्या कक्षेत येणार्‍या सर्व सांस्कृतिक परंपरांचं एकत्रित नाव असं म्हणता येइल. :)
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/23/2013 - 22:29 नवीन
सविस्तर प्रतिसादाबद्दल आभारी आहे . बहुतांश म्हणणे पटलेले नाही ( कन्व्हिन्सिंग वाटले नाही ) ह्यावर अजुन प्रतिवाद घालता येईल पण एकुणच आपली मते कन्व्हर्ज होतील अशी काही चिन्हे नाहीत . I agree to disagree here . :) अवांतर : लास्टली , डार्विन म्हणतो त्या प्रमाणे "सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट" ह्या निसर्गनियमा नुसार , जो परिस्थितीशी जुळवुन घेईल तो जगेल ... आता आपण म्हणता तसे सगळा स्वाभिमान/वर्णाभिमान विसरुन जाणे हे परीस्थितीशी जुळवुन घेणे असेल (भारतीय परिस्थितीत) किंव्वा मी म्हणतो त्याप्रमाणे स्वाभिमान/वर्णाभिमान जागृत ठेवुन , शार्प ठेवुन स्वतःचे वेगळे अस्तित्व जपणे हे परिस्थितीशी जुळवुन घेणे असेल (जागतिक परीस्थितित... एकुणच जागतिक घडामोडी अन पोलरायझेशन पाहता मला तरी हे वाटत आहे ) एनीवेज , निसर्ग कोणाला कौल देतो हे पाहण्यापर्यंत आपण जगु अशी परशुराम चरणी प्रार्थना करतो , का वामन चरणी करु ? ;) || जय हो ||
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/23/2013 - 22:54 नवीन
@सविस्तर प्रतिसादाबद्दल आभारी आहे . >>> :) @बहुतांश म्हणणे पटलेले नाही ( कन्व्हिन्सिंग वाटले नाही ) >>> ठीक आहे. @ह्यावर अजुन प्रतिवाद घालता येईल पण एकुणच आपली मते कन्व्हर्ज होतील अशी काही चिन्हे नाहीत . I agree to disagree here . smiley >>> अगदी बरोब्बर ओळखलत तुंम्ही :) @अवांतर : लास्टली , डार्विन म्हणतो त्या प्रमाणे "सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट" ह्या निसर्गनियमा नुसार , जो परिस्थितीशी जुळवुन घेईल तो जगेल ... >>> खरं आहे. :) @आता आपण म्हणता तसे सगळा स्वाभिमान/वर्णाभिमान विसरुन जाणे हे परीस्थितीशी जुळवुन घेणे असेल (भारतीय परिस्थितीत) >>>परिस्थितीशी जुळवुन घेणे म्हणून मी हे म्हणत नाही... असो!!! @किंव्वा मी म्हणतो त्याप्रमाणे स्वाभिमान/वर्णाभिमान जागृत ठेवुन , शार्प ठेवुन स्वतःचे वेगळे अस्तित्व जपणे हे परिस्थितीशी जुळवुन घेणे असेल (जागतिक परीस्थितित... एकुणच जागतिक घडामोडी अन पोलरायझेशन पाहता मला तरी हे वाटत आहे ) >>> वेगळं अस्तित्व जपायचय ना...जपा...जपा,फक्त ते भ्रामक असल्यामुळे विरोध संपल्यानंतर/किंवा बोथट झाल्यानंतर कोलमडून पडेल याची जाणिव ठेवा. :) @एनीवेज , निसर्ग कोणाला कौल देतो हे पाहण्यापर्यंत आपण जगु अशी परशुराम चरणी प्रार्थना करतो , का वामन चरणी करु ? smiley >>> हवी त्याच्या चरणी करा,पण जगा मात्र नक्की! :-p @|| जय हो || >>> ॥मंगलमय हो॥ Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/23/2013 - 23:12 नवीन
ओके . लेट्स सी !! कालोह्यं निरवधिर्विपुला च पृथ्वी! :) --------------------------------------- लेखनसीमा
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Fri, 05/24/2013 - 22:02 नवीन
मी पुण्याचा आहे.
मग बरोबर आहे. हुशार ना तुम्ही! बाकी प्रतिसादावर अतिशय डिटेल मध्ये लिहायची इच्छा आहे. पाहूया.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 05/22/2013 - 20:47 नवीन
स्तुत्य प्रयत्न आहे.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Wed, 05/22/2013 - 22:25 नवीन
आत्ता पर्यंत तरी परशुरामाची मुर्ती पाहीली सुद्धा नव्हती पण आता घ्यावीच म्हणतो. कुठे मिळेल?
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प गुरुवार, 05/23/2013 - 11:43 नवीन
चिपळुण येथे श्रीपर्शुराम मन्दिर आहे तिथे मिळण्याची दाट शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 05/23/2013 - 01:49 नवीन
मस्त हो आत्माजी! तुमच्या सारखे आरसा पाहणारे आणि चार जरी लोक जमले तरी बराच फरक पडेल. तुम्ही दिलेला सावरकरांचा उल्लेख अतिशय स्पृहणीय. परवाच मिपावर;ज्या शेतकर्‍यांच्या जोरावर रोज ताटात अन्न दिसतय त्यांच्यासाठी लिहिलेल्या कवितेवर हा असला हास्यास्पद अन घाणेरडा वाद घातला गेला त्याच अतिशय वाईट वाटल. एखादा पुराणाचा दाखला देउन नवी काही संक्ल्पना मांडायला गेल की "भावना" दुखावण्याची ही प्रवृत्ती जातियवादाला खतपाणी घालणारी आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठे गुरुवार, 05/23/2013 - 02:08 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग गुरुवार, 05/23/2013 - 06:08 नवीन
अपर्णाताई मागे साधारण असाच एक प्रतिसाद दिला होता तोच इथे उधृत करतो
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/23/2013 - 07:49 नवीन
एखादा पुराणाचा दाखला देउन नवी काही संक्ल्पना मांडायला गेल की "भावना" दुखावण्याची ही प्रवृत्ती जातियवादाला खतपाणी घालणारी आहे.
पुराणातले अर्धे मुर्धे संदर्भ उचलुन त्याला व्वाट्टेल तसे अर्थ लावणे आणि एका विशिष्ठ जाती विरुध्द पोलरायझेशन करणे ह्याला काय अर्थय ? शिवाय हे म्हणजे मऊ लागतय म्हणुन कोपरानं खणण्यातला प्रकार झाला ... हिंदु(आणि ब्राह्मणही) ऐकुन घेतात म्हणुन वट्टेल ते बोला , कौन क्या उखाडलेगा ही मेन्टॅलिटी झालीये ... पुराणवाल्यांनीही फतवा डिक्लीयर करण्याची धर्मसुधारणा (अमेंडमेन्ट) करुन घेतली की सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली तुम्ही वाट्टेल ते खपवुन घ्यायला तयार व्हाल नै !!
  • Log in or register to post comments
फ
फारएन्ड गुरुवार, 05/23/2013 - 04:08 नवीन
असे नग सर्व जातींमधे पाहिलेले आहेत. कोणाला आपल्या बुद्धीचा, तर कोणाला आपण(च फक्त) "वाघ" असण्याचा किंवा मर्द असण्याचा, तर कोणाला खास आपल्या जातीचे समजले गेलेले एखादे कौशल्य इतरांना न जमण्याचा अभिमान/गर्व असतो. तुम्हाला ब्राह्मणांकडून हे ऐकू आले म्हणून येथे लिहीले हे समजते, पण त्यात 'सिलीनेस' सोडला तर बाकी काही नाही. जोपर्यंत जातीवरून लोकांचे मूलभूत अधिकार नाकारले जात नाहीत, एखाद्या जातीला घाऊकरीत्या गुन्हेगार ठरवले जात नाही व त्या जातीत जन्मलेला प्रत्येक माणूस वाईटच कसा होता हे ठसवायचे प्रयत्न केले जात नाहीत तोपर्यंत ते क्षुल्लक वाटते. माझ्या मते 'ब्राह्मणांनी' ने सुरू होणारी सर्वच्या सर्व वाक्ये चुकीची आहेत (आणि हे या लेखासंबंधी नाही, एकूणच) - दोष वा गुण काहीही दाखवणारी. इतर जातींबद्दलही हे खरे आहेच, पण इतर जातींबद्दल असे घाऊक लिहीलेले फारसे दिसले नाही.
  • Log in or register to post comments
अ
अवतार गुरुवार, 05/23/2013 - 06:32 नवीन
ह्या एकाच वाक्यावर जातिव्यवस्थेचा डोलारा आजतागायत टिकून आहे. जेव्हा समाजातील काही गट इतरांना जन्मापासूनच तुच्छ ठरवतात तेव्हा त्यापाठी केवळ पोकळ अभिमान नसून समाजाचे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय नियंत्रण स्वत:च्या हाती ठेवणे हा प्रमुख उद्देश असतो. ह्या विषमतावादी विचारसरणीला धर्माचे समर्थन नसेल तर काळाच्या ओघात तिची धार बोथट होत जाते. मात्र जिथे धर्मच विषमतेचे समर्थन करतो तिथे समतावादी विचारांचा प्रसार करणे अवघड होऊन बसते. महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत प्रचंड संख्येने पुरोगामी विचारवंत आणि कार्यकर्ते होऊन गेले तरीही आज महाराष्ट्र जातीयवादात तसूभरही मागे नाही. स्वजातीच्या हितसंबंधांना धक्का लागत नसेल तेव्हा एकत्र राहायला समाज तयार असतो. पण एकत्र राहणे आणि एकत्र येणे यात फरक आहे. तुरळक प्रमाणात आंतरजातीय विवाह होत असले तरी मुख्यत: सत्तेची लढाई लढतांना प्रत्येक जात इतर जातींवर कुरघोडीचे राजकारण करतच असते. याचे मुख्य कारण म्हणजे आपण खऱ्या अर्थाने एक समाज म्हणून जगत नसून केवळ सोयीची शय्यासोबत करत आहोत. जेव्हा स्वत:च्या कर्तृत्वाविषयी शंका निर्माण होऊ लागतात तेव्हा, "माझे रक्त इतरांच्या रक्ताहून श्रेष्ठ आहे" या विचारसरणीचा आधार घेणे भाग पडते. "माझे कर्तृत्व इतरांहून श्रेष्ठ असले पाहिजे" असे ज्यांना वाटते त्यांना स्वत:च्या रक्ताचा दर्जा तपासण्याची गरज पडत नाही.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा गुरुवार, 05/23/2013 - 07:06 नवीन
काल-परवाच चेपुवर पर्वतीवरच्या 'मराठी साम्राज्याचे संस्थापक श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे' या नावाच्या पाटीवर अत्यंत अर्वाच्य शब्दात गरळ ओकलेले दिसले. आणि तो मान छत्रपती शिवाजी आणि संभाजी यांना मिळाला पाहीजे म्हणे. स्वराज्य आणि साम्राज्य मध्ये फरक असतो सांगितले पाहीजे कोणीतरी यांना. मराठी 'स्वराज्याचे' संस्थापक हे निर्विवाद्पणे छत्रपती शिवाजी असले तरी 'साम्राज्याचे' संस्थापक पहिले बाजीराव पेशवेच.
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव गुरुवार, 05/23/2013 - 07:39 नवीन
'साम्राज्याचे' संस्थापक पहिले बाजीराव पेशवेच.
पुण्यश्लोक शाहू छत्रपती
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा गुरुवार, 05/23/2013 - 13:58 नवीन
(छत्रपती शाहूबद्दल आदर असुनही) पुर्णपणे असहमत. पुण्यश्लोक शाहू छत्रपती यांना मी संस्थापक म्हणण्यापेक्षा मालक म्हणेन.
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Fri, 05/24/2013 - 16:49 नवीन
सौंदळा.आपल्या बुद्धीला कोपरापासुन साष्टांग दंडवत.....एक लक्षात घ्या बाप बाप असतो,मराठा स्वराज्य आणी साम्राज्याचे स्वामी फक्त छ्त्रपती शिवरायच.........
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 05/24/2013 - 16:55 नवीन
>>> मराठा स्वराज्य आणी साम्राज्याचे स्वामी फक्त छ्त्रपती शिवरायच......... पूर्णपणे सहमत! फक्त एक बदल सुचवू इच्छितो. वरील वाक्यात मराठा शब्दाऐवजी मराठी हा शब्द जास्त योग्य ठरेल.
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Fri, 05/24/2013 - 17:22 नवीन
मराठा हा शब्द प्रातिनिधीक आहे,जो या महाराष्ट्राच्या मातीत राहतो तो मराठा/मराठी,जो संतांच्या ओव्या गातो तो मराठा,भागवत धर्म पुजतो तो मराठा,आया बहिणींच्या अब्रुसाठी आणी देशासाथी प्राण वेचतो तो मराठा या अर्थाने तो शब्द घेतला होता.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 05/24/2013 - 17:28 नवीन
या अर्थाने मराठा हा शब्द वापरला असेल तर तोच शब्द योग्य ठरेल.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Sat, 05/25/2013 - 15:38 नवीन
बाबा, स्वराज्य आणी साम्राज्य मधील फरक तुमच्या बुद्धीला समजला की मग वाद-विवाद करायला या. स्वरज्याचा नकाशा आणि पहिल्या बाजीरावाच्या काळात वाढलेल्या साम्राज्याचा नकाशा बघा समजत असेल तर. सातार्‍याची गादीच जिथे पेशव्यानी (बाळाजी विश्वनाथ) स्थापन केली तिकडे कसले आलेत बाकिचे संस्थापक.
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Sat, 05/25/2013 - 16:37 नवीन
का इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडताय. बाळाजी विश्वनाथ याने रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडे कोठीवर कारकून म्हणून काम केले. त्यांची हुशारी धनाजी जाधव यांच्या नजरेस आली. धनाजीरावांनी आपले दिवाण म्हणुन आपल्या सेवेस घेतले. याचवेळी ते त्या भागाचे महसूल अधिकारी झाले.२० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यु झाला. हि बातमी मिळताच माळव्याच्या सुभेदारीवर असलेल्या त्याचा मुलगा - आज्जमशहा त्वरेने अहमदनगरला आला. इदच्या मुहुर्तावर १४ मार्च १७०७ रोजी त्याने स्वत:ला बादशहा म्हणून जाहिर केले. व आपला भाऊ शहा आलमचा काटा काढायला तो उत्तरेत निघाला. याच वेळी झुल्फिकारखान व इतरांच्या सल्ल्याने त्याने ८ मे १७०७ रोजी शाहुंची सुटका केली. मात्र येसुबाईंना त्याने कैदेतच ठेवले. ऑगस्ट १७०७ मध्ये शाहु महाराष्ट्रात आले. ताराराणींनी सात वर्षे औरंगजेबाशी लढा देऊन आपले कर्तृत्व सिध्द केले होते, शाहुने गादिवर आपला हक्क सांगताच संघर्ष होणार हे अटळ झाले. शाहुने सुरुवातीला समजुतदारपणे घेतले मात्र ताराराणींनी लढाईची तयारी करताच शाहुंचा नाईलाज झाला. धनाजी जाधव व परशुराम त्रिंबक सैन्य घेऊन निघाले. शाहुंनी धनाजीस बोलणी करावयास बोलावुन घेतले. धनाजी जाधवांच्या पदरी असलेल्या खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ आनि नारो राम यांनी शाहुंचा पक्ष बरोबर असुन त्यांचा पक्ष घेण्याची गळ धनाजीरावांना घातली. धनाजी ससैन्य शाहुंच्या बाजुएन गेले. परशुराम त्रिंबकाने याला विरोध केला मात्र अखेर खेड येथील लढाईत शाहुंनी आपले वर्चस्व सिध्द केले. शाहुंनी धनाजीरावांना सेनापतीपद, नारो शंकरांना सचिवपद व बाळाजी विश्वनाथास मुतालिक म्हणुन नेमले आणि सेनाकर्ते असा किताबहि दिला. राज्य रयतेच्,त्याचे रक्षणकर्ते छत्रपती,त्यांनी सरसेनापती जाधवांच्या आणी इतर सहकार्‍यांच्या मदतीने महाराणी ताराराणीबरोबर लढाईनंतर सातारची दुसरी गादी स्थापन केली. आणी सायबा तुमच्या इतिहासात पेशवे सातारच्या गादीचे संस्थापक....लय म्हणजे लयच भारी....जय महाराष्ट्र..... र
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Sat, 05/25/2013 - 16:50 नवीन
विकीपिडिया चोप्य-पस्ते केल्याबद्दल आभारी आहे. http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5 पुढील इतिहास 'संशोधनाला' शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Sat, 05/25/2013 - 17:05 नवीन
टंकायचा कंटाळा...आणी तुम्ही किंवा मी कितीही स्वतःच्या मनाने काहीही म्हटलो तरी सत्य किंवा जे घडुन गेलय ते बदलणार आहे का ?
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Sat, 05/25/2013 - 17:09 नवीन
सत्य किंवा जे घडुन गेलय ते बदलणार आहे का ?
नाही. जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments
न
निश गुरुवार, 05/23/2013 - 10:44 नवीन
मुळात सगळ्याच जाती ह्या जाती भेद पाळतात त्यामुळे त्या मुळे ब्राम्हण समाजाला दोष देऊन काहीही उपयोग नाही. अगदी मराठा ते हरिजन लोकातही ही जातीभेद अगदी निष्ठुरतेने पाळले जातात मग ब्राम्हण समाजाला दोष देऊन काय उपयोग. मुळात आपल्या समाजाच्या म्हंजे सगळ्याच जातींच्या मानसिकतेत बदल घडायला हवा तरच हे वाईट दोष दुर होतील. मी स्वता ब्राम्हण असुनही माझे मित्र हे सगळ्या जातीतील आहेत व आम्ही ऐकमेकांकडे जेवायला जात असतोच त्याच वेळी मला जर मदत लागली तर ते धाउन येतात व त्यांच्या अडचणीला मी मदत करतो. मुळात प्रत्येकानेच आपापले दोष दुर केले तर जाती भेद हा प्रकार राहणारच नाही.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 42 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा