Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

जय परशुराम...जय वामन!!!

अ — अत्रुप्त आत्मा, Wed, 05/22/2013 - 14:42
आजकाल(म्हणजे अगदी गेली ५ वर्ष सुद्धा)फेसबुकवर ब्राम्हण/ब्राम्हणेतर वादाला नुस्तं उधाण आलय.प्रत्येक जण अगदी आपापली पेजेस करण्यापासून ते ग्रुप्स तयार करण्यापर्यंत अगदी पेटलाय. मी जेंव्हा स्वतःला ब्राम्हण समाजातला घटक म्हणुन पाहातो,आणी आपल्या ऐतिहासिक चुका/घोडचुका तसेच आपल्या समाजबांधवाचे/भगिनिंचे त्याच चुकांची पुनरावृत्ती करणारे वर्तन पाहतो.तेंव्हा मला मोठी गंमत वाटते.आपल्या धर्मातल्या अन्यायी भुमिका/वर्ण श्रेष्ठत्वाचे अहंकार...इत्यादी अनेक गोष्टी आहेत.त्या पाहायच्या नाहीत.समजुनही घ्यायच्या नाहीत. केवळ विरोधकांना नामोहरम करणारी आत्मप्रौढीकडे झुकणारी खंडन/मंडन प्रक्रीया चालु ठेवायची. जातिचे अंधाभिमान/दुराभिमानही बाळगायचे आणी वर पुन्हा हिंन्दूसमाजाच्या/भारतीयत्वाच्या ऐक्याच्या गप्पाही मारायच्या.या दोन्ही भुमिका परस्पर विरोधी/परस्पर विसंगत आहेत हे तर समजुनच घ्यायचं नाही. पुरोगामी विचार मांडणार्‍यांचा द्वेष करायचा,आणी घेतल्याच काही पुरोगामी भुमिका मनावर तर त्या फक्त प्रतिपक्षाला नामोहरम करण्यासाठी एक धोरण/स्टॅटॅजी म्हणुन घ्यायच्या. असा हा सर्व आपल्या समाजजीवनाचा थक्क करणारा पसारा आहे.मी अनेकदा या जातवादी विद्वानांना निरनिराळ्या भुमिकांवरून छेडलं आहे. उदाहरणादाखल यातली ब्राम्हणश्रेष्ठत्वाची भुमिका काय म्हणते हे आपण पाहू... ब्राम्हण हे श्रेष्ठ/ज्ञानी असतात... यावर आपण असं विचारलं की,''आपल्यातच जे मूर्ख/मंद/कमी बुद्धीमत्तेचे आहेत त्याचं काय?'' तर ही वस्तुस्थिती आहे,असं न मानता आरोप आहे असं समजुन.''आंम्ही कधी असं म्हटलं की ''फक्त'' ब्राम्हण(च) श्रेष्ठ/ज्ञानी असतात म्हणून!?'' अशी पलटी मारली जाते...मग आपण विचारवं,''आपलं नक्की म्हणणं काय मग?...'' तर , ''अहो जो विद्वान असेल तो(च) ब्राम्हण'' असं दुसरं अजुन पलटी खाणारं उत्तर मिळतं(यातुनच पुढे गुणाधिष्ठित चातुर्वर्ण्याचं सर्मथनंही ऐकायला मिळतं..)...मग आपण त्याच अनुषंगानी शेवटचा प्रश्न टाकावा..की, ''असं जर का आहे,तर मग ब्राम्हणांनी किंवा त्यांनी मागणी केल्यामुळे त्यांच्या धर्म अध्वर्यूंनी,समाजाच्या गुणात्मक विभागणीची आणी पुनर्रचनेची चळवळ का हाती घेतली नाही?'' किंवा येत्या काहि दिवसात ती तुंम्ही हाती घेणार काय?'' तर यावर एकतर उत्तर मिळत नाही..किंवा परिपूर्ण कांगावेखोर पणानी,,,''हेच तुंम्ही दुसर्‍या जातिंना सांगा...'' वगैरे स्वरुपाची उडवाउडवीची उत्तरं मिळतात. आणी तत्वात जिंकायला येणारी ही माणसं व्यवहारात जरा सुद्धा मनमिळाऊ आणी माणुसकी दाखवणारी नसतात,,,याचा माझ्यासारख्याला पुनःप्रत्यय येतो. ब्राम्हण ब्राम्हण म्हणुनी माझे पेव फुटलेले आहे धुळीत बसलेले ते वादळ पुन्हा उठले आहे. जिथे पहावे तेथे आमचे बोर्ड टांगले आहेत. ज्याला हवे त्या तागडीत सोइने तोलले आहेत. जय परशुराम,जय वामन ह्याच घोषणा आहेत नक्की कुणाचा ''बळी'' द्यायच्या हे लोक तयारीत आहेत? इतिहास/वर्त-मान तपासायची गरजच संपली आहे भयगंडाच्या आत धिटाई हिंसक झाली आहे. संघटनांच्या बळा'साठी घटना हव्या आहेत तोंडात तत्व नैतिकतेची मनात(मात्र)शिव्या आहेत. आपले चेहेरे डागाळलेले कधि दिसणार आहेत? आणी ते पहायला कुणाच्या हतात आरसे... असणार आहेत? ''ते'' काहिही म्हणोत परंतू चिखल माझ्या घरात आहे. मी मात्र सामाजिक स्वच्छतेच्या ऐन...मोसमा/भरात आहे. ===================================================================

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 27936 views

💬 प्रतिसाद
ब
बॅटमॅन Fri, 05/24/2013 - 21:03 नवीन
काही अंशी हेच मत.
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Fri, 05/24/2013 - 21:10 नवीन
बामन लेखनी विसरु शकत नाही आणी मराठा तलवार्,मराठ्याच्या पोराला शिवाजी महाराज कोन ? हे कधीच शिकवावे लागत नाही,महाराजांच नाव घेताच त्याची छाती आपसुकच रुंदावते,शिवाजी महाराज की म्हणुन आरोळी आली की त्याच्या तोंडुन आपसुकच "जय" कधी बाहेर पडते हे त्यालाही कळत नाही.या गोष्टी जन्मतःच रक्तातुनच येतात. काही ही करा जिन्स(गुणसुत्रे) बदलु शकत नाहीत
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Fri, 05/24/2013 - 21:20 नवीन
मराठ्याच्या पोराला शिवाजी महाराज कोन ? हे कधीच शिकवावे लागत नाही
शिवाजी महाराज मराठा होते हे कळवल्याबद्दल धन्यवाद. बाकी तुम्ही डॉक्टर आहात असे वाचले. तलवार ठेवलीय की नाही दवाखान्यात? दररोज प्रॅक्टीस सुद्धा असू दे. जर ठेवली नसेल तर निदान दररोज स्वत:चे रक्त तरी चेक करत चला. नाही, बदलायची गुणसुत्रे प्रॅक्टीस च्या अभावाने.
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Fri, 05/24/2013 - 21:25 नवीन
तलवार नाही पन शिवरायांचा पुतळा ठेवलाय... तुम्हाला काही अडचन्,काळा पहाड कशाला वैयक्तीक घेतोय भाउ,तुम्हाला काही टोचल होत का राव.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Fri, 05/24/2013 - 21:48 नवीन
काळा पहाड कशाला वैयक्तीक घेतोय भाउ,तुम्हाला काही टोचल होत का राव
एका डॉक्टरनं अजून अशा विचित्र रक्त बिक्त व जीन्स विचारात अडकून पडावं हे टोचलं होतं. आजकाल चिल्ली पिल्ली पण असा विचार करत नाहीत राव. त्यांनाही जीवशास्त्र माहीती असतं. कुणाचं रक्त आणि कसली छाती घेवून बसलाय! खंडोजी खोपडे, बाजी घोरपडे हे मराठा नव्हते का? आणि बाजी प्रभू देशपांडे, मोरोपंत पिंगळे, शिवा न्हावी हे मराठा होते का? जिवा महाला कोण होता हे माहितिये का?
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Sat, 05/25/2013 - 08:01 नवीन
पण राघोभरारी,आणी दुसरा बाजीराव पन माहिती आहे,आण्णाजी दत्तो बद्दलही बरिच माहिती आहे,इंग्रजांच्या मदतीने स्वतःचच आरमार बुडवणारे नानासाहेब पेशवेही माहिती आहेत्,इतिहास जाउ द्या हो,आताचे पंधरपुरचे बडवे आणी नाशिक (त्र्यंबकेश्वरचे)पुजारीही चांगलेच माहिती आहेत.आणी मागचे ६० वर्ष देशाचे रक्त पिणारे नेहरु गांधी घराणही माहिती आहे.यादी बरिच मोठी आहे साहेब पन आता आवरतो घेतो.
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Sat, 05/25/2013 - 08:06 नवीन
समाजात चांगल्या वाईट दोन्ही प्रवृत्ती असतात्,फक्त आपण कोनाकडुन काय घ्यायच हे ज्याचे त्याने ठरवावे.बाकी या रिकाम्या चर्चेला माझ्याकडुन पुर्णविराम.......
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 05/24/2013 - 21:20 नवीन
या गोष्टी घरादारातून दिल्या जाणार्‍या ट्रेनिंगचा परिणाम आहेत. मी स्वतः मराठ्यांपेक्षा मराठाळलेले ब्राह्मण पाहिलेत, तसेच ब्राह्मण वाटावेत असे मराठेही पाहिलेत. यात ब्लड आणि गुणसूत्रांचा काऽही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 05/24/2013 - 21:43 नवीन
टंकनकष्ट वाचवल्या बद्दल धण्यवाद्स! हेच बोलायला आल्तो.
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Mon, 05/27/2013 - 07:25 नवीन
टंकनकष्ट वाचवल्या बद्दल धण्यवाद्स
खरच धन्यवाद बॅटमॅना…या धाग्यामुळे बुवांची अवस्था वाईट झाली आहे…कालच त्यांच्या १० पैकी ८ बोटांना बँडेज पाहून ड्वोले पाणावले
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 05/27/2013 - 12:59 नवीन
@या धाग्यामुळे बुवांची अवस्था वाईट झाली आहे…कालच त्यांच्या १० पैकी ८ बोटांना बँडेज पाहून ड्वोले पाणावले >>> =)) महाराज....ओ महाराज... मला या मालिजिंची बोटे छाटण्याची आज्ञा द्या पाहू!!! =))
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 05/27/2013 - 13:02 नवीन
अरेरेरेरे....आता तर उरलेली २ बोटेपण बँडेजने मढवावी असे वाटतेय ;)
  • Log in or register to post comments
फ
फारएन्ड Fri, 05/24/2013 - 23:19 नवीन
महाराजांच नाव घेताच त्याची छाती आपसुकच रुंदावते,शिवाजी महाराज की म्हणुन आरोळी आली की त्याच्या तोंडुन आपसुकच "जय" कधी बाहेर पडते हे त्यालाही कळत नाही.>>> मराठा, ब्राह्मणच काय पण कोणत्याही मराठी पोराला यापेक्षा वेगळे काही करताना पाहिलेले नाही. ते ब्रिगेड ई. वाले लोक त्यांच्या राजकारणामुळे यापेक्षा काही वेगळे असल्याचे काल्पनिक चित्र निर्माण करतात.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sat, 05/25/2013 - 15:30 नवीन
बामन लेखनी विसरु शकत नाही आणी मराठा तलवार
इथे तुम्ही मराठा ही जात म्हणुन हा शब्द वापरत आहात...
मराठ्याच्या पोराला शिवाजी महाराज कोन ? हे कधीच शिकवावे लागत नाही,महाराजांच नाव घेताच त्याची छाती आपसुकच रुंदावते,शिवाजी महाराज की म्हणुन आरोळी आली की त्याच्या तोंडुन आपसुकच "जय" कधी बाहेर पडते हे त्यालाही कळत नाही.या गोष्टी जन्मतःच रक्तातुनच येतात. काही ही करा जिन्स(गुणसुत्रे) बदलु शकत नाहीत
इथे सगळी कडे मराठा ऐवजी मराठी (जात नव्हे तर महाराष्ट्रातला माणुस या अर्थी..) टाकलत तरीही ते बरोबरच आहे. ब्राहमण घरातही महाराजां विषयी तेवढाच आदर असतो. राजे मराठा होते की आणखी काही ह्या क्षुल्लक तपशीलाने फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments
म
मोदक Sat, 05/25/2013 - 15:43 नवीन
पुस्तक - प्रश्न आणि प्रश्न लेखक - अनिल अवचट लेखाचे नाव - बलुतेदारी पान नंबर - १७९ व पुढे. जातीव्यवस्था आणि बलुतेदारी यांवर वाचनीय लेख.
  • Log in or register to post comments
म
मैत्र Sat, 05/25/2013 - 18:21 नवीन
पुलंनी मैत्र या पुस्तकात या ब्राह्मणवाद किंवा मराठा वा इतर तथाकथित सवर्णांचे वागणे यावर अतिशय उत्तम लेख लिहिला आहे. त्यात राजर्षी शाहू महाराजांचे गुणवर्णन अप्रतिम आहे आणि अतिशय मार्मिक दाखले आहेत. अतिशय वाचनीय आणि त्याहून जास्त चिंतनीय आहे..
  • Log in or register to post comments
प
पुष्कर जोशी Mon, 05/27/2013 - 12:31 नवीन
ब्राह्मण्य आणि मराठ्य हि दोन समाजातील वैशिठ्ये आहे त्याशीवाय समाज पुढे जायचा नाही... जसे समाजात शिक्षक आवश्यक तसे बलोपासक सुधा आवश्यक .... जसे soft architect aani developer दोन्ही आवश्यक तसेच ... आता ब्राह्मण्य आणि मराठ्य म्हणजे काय ते विचारू नका ... म्हणजे झाले
  • Log in or register to post comments
प
पुष्कर जोशी Mon, 05/27/2013 - 12:36 नवीन
आणि ब्राह्मण्य आणि मराठ्य हे दोन्ही गुण प्रत्येकात असतातच फक्त कौटुंबिक वातावरणाने एकदा गुण जास्त बहरतो... घरी जर आई बाबा दोघेही डॉक्टर असतील तर आपसूकच मुलाना औषधांची नवे पाठ होणारच त्याना आवडू किवा नावाडू ... जसे आजोबांपासून सगळे सांडग स्वयंसेवक असतील तर अपोपाप्च नेतृत्व गुण आणि कार्यकर्ता गुण येतात ....
  • Log in or register to post comments
प
पुष्कर जोशी Mon, 05/27/2013 - 12:38 नवीन
मराठ्य = मारठ्य सांडग = संघ
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 05/28/2013 - 07:18 नवीन
कोकणस्थ पिक्चर आला. त्याची चांगली वाईट परिक्षणं ऐकली, वाचली. एकूणच कोकणस्थांचं नाव घेऊन त्याभोवती हवी ती कथा बांधली गेली आहे, असं जाणवलं. फेसबुकावर कम्युनिटी यायला लागल्या कोकणस्थांचं नाव खराब करणा-या. एकूणच कोकणस्थ चर्चेत आले. तसं आपल्या समाजाला ट्रेंड फॉलो करायचं चांगलं माहिती आहे... सद्ध्या कोकणस्थ ट्रेंड मधे आहेत असं म्हणायचं. मग समाजातले बाकी वर्ग कसे मागे रहावेत? तेही उद्योग करायला लागतील, आमचा समाज असा, आमचा समाज तसा. 'मराठा' असं मोठ्ठ्या अक्षरात लिहिलेला टीशर्ट घालून मी बघितलं परवा एकाला. हसू आलं. इंग्रज खूप हुशार होते. त्यांनी समाजाची ही वर्गवार, जातिवार रचना बघितली आणि तेंव्हापासून रुजलेल्या ईर्शा, चढाओढ, दुजाभाव या बीजांना व्यवस्थित खतपाणी घातलं. आजही तो मळा सुपीक आहे. आरक्षणं, आंदोलनं, हक्कांची लढाई अशी रसाळ फळं त्या मळ्यात पिकतायत. अशिक्षित मंडाळी सोडा, शिक्षित लोकांचीही वैचारिक पातळी अजून भुईतच आहे. खरं तर, 'भारतीय समाजाला दोनच गोष्टी येतात. आपली 'लाल' करणं, किंवा दुस-याचं 'काळं' करणं.'
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Wed, 05/29/2013 - 10:09 नवीन
गुर्जींनीच काढला आहे ना धागा? की आयडी हॅक झाला म्हणायचा? असो. जय परशुराम. जय शिवाजी ;) . आता काय करायचे?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 05/29/2013 - 10:40 नवीन
@सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा । कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी ;-)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 49 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    22 hours 2 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    22 hours ago
  • सुंदर !!
    22 hours 5 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा