Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

कॉकटेल लाउंज : स्मूथ मॅन्गो टॅन्गो

स
सोत्रि
Fri, 04/05/2013 - 06:55

Book traversal links for कॉकटेल लाउंज : स्मूथ मॅन्गो टॅन्गो

  • ‹ कॉकटेल लाउंज : बे ऑफ पॅशन (Bay of Passion)
  • Up
  • मॉकटेल काउंटर (कॉकटेल लाउंज) : बे रूज (Baie Rouge) ›
‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “ स्मूथ मॅंन्गो टॅन्गो” पार्श्वभूमी: उन्हाळ्याच्या चाहूलीबरोबरच आंब्याची चाहूलही लागली आहे. बाजारात आंब्यांची आवक हळूहळू सुरू झाली असली तरीही घरोघरी आंब्याचा मोहक दरवळ पसरायला म्हणावी तशी सुरूवात अजून झालेली नाहीयेय. ह्या वर्षीचा उन्हाळा, आंबे स्पेशल कॉकटेल्सनी, 'ग्रीष्म ऋतु लाउंजोत्सव' असा दणाणून सोडायचा विचार आहे. त्यातले हे पहिले कॉकटेल, स्मूथ मॅन्गो टॅन्गो. खर्‍याखुर्‍या आंब्याचे नसले तरीही, आंब्याचे आइसक्रीम आणि आंब्याच्या रस यांचा वोडकाला दिलेला ट्वीस्ट म्हणजे आजचे हे कॉकटेल. हे माझे इंप्रोवायझेशन, 'लेडिज स्पेशल' कॅटेगरीमध्ये बसवायचे होते, त्यामुळे फक्त वोडका एवढाच बेस वापरून हा प्रयत्न केला आहे. त्यात पुढ्च्या कॉकटेल्समध्ये आणखिन प्रयोग करून 'मिक्सॉलॉजी'च्या वेगवेगळ्या खुब्या वापरून चव आणि लज्जत वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे.
प्रकार वोडका बेस्ड कॉकटेल, लेडिज स्पेशल
साहित्य
वोडका 1 औस (30 मिली)
आंब्याचा ज्यूस 2 औस (60 मिली)
आंब्याचे आइसक्रीम 2 स्कूप
बर्फ
ब्लेंडर
ग्लास वाइन ग्लास
कृती: खालच्या चित्रात दाखविल्याप्रमाणे ब्लेंडरमध्ये आइसक्रीम, आंब्याचा रस आणि वोडका ओतून घ्या. ब्लेंडरमध्ये साधारण मध्यम वेगाने हे सर्व मिश्रण व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. खालच्या चित्रात दाखविल्याप्रमाणे ब्लेंडरवर बाहेरून बाष्प जमा झाले की कॉकटेल तयार झाले असे समजावे. आता हळूवारपणे ते मिश्रण ग्लासात ओतून घ्या. आंब्याच्या अफलातून चवीचे स्मूथ अ‍ॅन्ड सिल्की कॉकटेल तयार आहे :)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9543 views

💬 प्रतिसाद
त
तर्री Fri, 04/05/2013 - 07:03 नवीन
आधीच आंबे परवडत नाहित त्यात ही असली चित्रे पाहायची - त्रास ! ग्रीष्म ऋतु लाउंजोत्सव : दे धमाल !
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Fri, 04/05/2013 - 09:04 नवीन
लई भारी...
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 04/05/2013 - 09:06 नवीन
झकास. बाकी आमच्यासारख्या लोकांसाठी एखादे मॅन्गो मॉकटेल पण येऊ द्यात.
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 04/05/2013 - 10:35 नवीन
अगदी अगदी, एखादं मॉकटेल येऊद्याच आता.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Fri, 04/05/2013 - 11:36 नवीन
हुकुम सर आँखों पर ! -(हुकुमाचा ताबेदार) सोकाजी
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 04/05/2013 - 09:34 नवीन
दिल बाग बाग हो गया सोक्या. :)
  • Log in or register to post comments
न
नानबा Fri, 04/05/2013 - 09:37 नवीन
कमाल हो सोत्रि राव. लय भारी कॉकटेल सांगलत बगा.
  • Log in or register to post comments
श
शिद Fri, 04/05/2013 - 09:39 नवीन
बाजारातले आंबे परवडू लागले कि करुन बघण्यात येईल.
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन Fri, 04/05/2013 - 09:59 नवीन
वाह वाह झकास मस्त , मोहक आणि मादक
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 04/05/2013 - 10:12 नवीन
कमाल आहे आंबा + वोडका = खतरनाक चव :) चैत्रातल्या आधुनिक हळदी कुक्न्वासाठी पेशल कैरीच पन्ह + वोडका असाही करता यील :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 04/05/2013 - 10:37 नवीन
@चैत्रातल्या आधुनिक हळदी कुक्न्वासाठी पेशल कैरीच पन्ह + वोडका असाही करता यील>>> =)) कित्ति काळजी रे पांडू...तुला,महिलांची ;-) बाकि नेहमीप्रमाणे...मद्याचार्य सोकू नाना की जय....! :)
  • Log in or register to post comments
प
पक पक पक Fri, 04/05/2013 - 16:37 नवीन
चैत्रातल्या आधुनिक हळदी कुक्न्वासाठी पेशल कैरीच पन्ह + वोडका असाही करता यील वाट्ल्या डाळीत बंटा वगैरे कुस्करुन ..... :tongue:
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Fri, 04/05/2013 - 16:45 नवीन
वाट्ल्या डाळीत बंटा वगैरे कुस्करुन .....
खीक्क... :D :D :D - (बंटाधार झालेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 04/05/2013 - 10:43 नवीन
आता व्होडका आणतोच एकदाची.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Fri, 04/05/2013 - 11:02 नवीन
आम्ही असाच प्रकार मोठ्या पार्ट्यांमध्ये करायचो , वोडका आणि फळांचा रस भन्नाट , आंबा व स्ट्रॉबेरी व कलिंगड अशी अनेक फळे ट्राय करू शकतात. ह्याच धर्तीवर मालिबु हि नारळाच्या चवीची रम व अननसाचा रस व आईस्क्रीम असा जबरी प्रयोग होऊ शकतो. एका मोठ्या उद्योजकाचा उन्हाळी समुद्री पार्टीत आम्ही अश्याच पद्धतीचे कॉकटेल पिंप भरून तयार केले होते , कारण दीडशे लोकांचा जमाव होता , पण त्यात नव्हते , मात्र ताज्या आंब्याचा रस व किती तरी बाटल्या वोडका त्यासाठी लागल्या हो त्या,
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 04/05/2013 - 11:42 नवीन
वा वा... ती बराच काळ वाट पाहात असलेली कोंकण कॉकटेल सीरीज सुरु झाली म्हणायची. उत्तम हो सोकाजीतात्या.. आता कोकमकोला, काजूक्रश आणि करवंद कॉकटेल्स सुरु होऊ देत.. :) बाकी रासबेरी वोडका का बरं दर्शवली आहे फटूत? अशाच रंगाची १०० प्रूफ अ‍ॅबसोल्यूट परवाच अतातुर्कच्या ड्यूटीफ्री मधे पाहिली.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Fri, 04/05/2013 - 16:32 नवीन
Image removed. अं.... १०० प्रूफ अ‍ॅबसोल्यूट तर अश्या रंगाची असते. - (साकिया) सोकाजी
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 04/05/2013 - 14:04 नवीन
ते टेबलक्लॉथवरचे पक्षी किती खुष दिसताहेत. अगदी अंघोळ झाल्या सारखे. मस्त. पण एक विचारु? मधाळ आंब्याच्या रसाला चरचरीत व्होड़का कशी मॅच होणार?
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Fri, 04/05/2013 - 15:07 नवीन
सोत्रि, वाइन ग्लास अन आंबे हे दोन्ही ज्या दिवशी घरी येतील त्या दिवशी हे बनविल्या जाइल... तोपर्यंत, अशीच वोडका घ्यायला काय हर्कत आहे... चियर्स...
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 04/05/2013 - 17:28 नवीन
वप्या, लग्न झालं त्याला किती दिवस झाले?
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 04/05/2013 - 16:06 नवीन
चांगला प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/05/2013 - 17:50 नवीन
झक्कास..
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 35 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा