मॉकटेल काउंटर (कॉकटेल लाउंज) : बे रूज (Baie Rouge)
Book traversal links for मॉकटेल काउंटर (कॉकटेल लाउंज) : बे रूज (Baie Rouge)
‘मॉकटेल काउंटर (कॉकटेल लाउंज)’ मालिकेतील आजचे मॉकटेल आहे 'बे रूज'
पार्श्वभूमी:
बे रूज हा एक फ्रेंच शब्द आहे. त्या अर्थ Red Bay. मोनिन ह्या प्रख्यात फळांचे सिरप बनवणार्या फ्रेंच कंपनीचे सिरप रिलायंस मॉल मधे शोधाशोध करताना मिळाले. हे मॉकटेल 'ब्लॅक करंट' ह्या फळाच्या सिरप पासून बनले आहे. त्या बाटलीवर एक कॉकटेल आणि एक मॉकटेल अशी रेसिपी असते. ही रेसीपी त्या सिरपच्या बाटलीवरच मिळाली :)
फारच सोपी रेसिपी आहे ही, साहित्यही एकदम लिमीटेड.
साहित्य:
कृती:
सर्व साहित्य (सोडा सोडून) शेकर मध्ये बर्फ टाकून व्यवस्थित शेक करून घ्या. शेकरला घाम फुटला की मॉकटेल झाले असे समजावे.
आता ग्लासच्या रीमला लिंबाचा काप लावून मॉकटेल सजवा.
लालसर रंगाचे 'बे रूज' तयार आहे :)

| मोनिन ब्लॅक करंट सिरप | १० मिली |
| क्रॅनबेरी ज्युस | २ औस (६० मिली) |
| सोडा | |
| बर्फ | |
| स्ट्रॉ | |
| लिंबाची चकती सजावटीसाठी | |
| ग्लास | मॉकटेल ग्लास |
कृती:
सर्व साहित्य (सोडा सोडून) शेकर मध्ये बर्फ टाकून व्यवस्थित शेक करून घ्या. शेकरला घाम फुटला की मॉकटेल झाले असे समजावे.
आता ग्लासच्या रीमला लिंबाचा काप लावून मॉकटेल सजवा.
लालसर रंगाचे 'बे रूज' तयार आहे :)

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस
Fri, 04/12/2013 - 11:52
नवीन
वाह!!!!!!
उन्हाळ्यात अगदी गारेग्गार वाटलं, कृती पण एकदम सोपी.
- Log in or register to post comments
म
मी_देव
Fri, 04/12/2013 - 12:01
नवीन
वा! पण सोडा कधी सोडायचा?
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 04/12/2013 - 13:04
नवीन
सोडा कधी सोडाय्चा?
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 04/12/2013 - 14:50
नवीन
मॉकटेल असल्याने बरं वाटलं पण सोड्याचा सदुपयोग कधी करायचा? क्रॅनबेरी ज्यूसमुळे रंग कोकसारखा आलाय. हे जरा बालकांचं पेय वाटलं.
- Log in or register to post comments
प
पक पक पक
Sat, 04/13/2013 - 14:24
नवीन
हे जरा बालकांचं पेय वाटलं.
पालकांसाठी ३० एम एल ,६० एम एल टाकुन शेक करायच हाय काय अन नाय काय.. ;)
- Log in or register to post comments
ग
गणपा
Fri, 04/12/2013 - 15:18
नवीन
सिरप रस बर्फ शेकरमध्ये शेक करून मग सोडा वरून सोडायचा असेलं.
उत्सुक मंडळींनी सोडा टाकून शेकर हलवावा. ;)
- Log in or register to post comments
प
पक पक पक
Sat, 04/13/2013 - 14:26
नवीन
उत्सुक मंडळींनी सोडा टाकून शेकर हलवावा.
अन नंतर... ? ;)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 04/12/2013 - 15:37
नवीन
झक्कास..
- Log in or register to post comments
ग
गणपा
Fri, 04/12/2013 - 15:42
नवीन
यात चिमुटभर काळंमीठ टाकलं तर लज्जत अजुन वाढेल नै का सोत्रि?
- Log in or register to post comments
त
तर्री
Fri, 04/12/2013 - 15:50
नवीन
मस्त -सोपे आहे.
दिसते मात्र कालाखट्टा नावाच्या प्लास्टिक पेप्सी प्रमाणे दिसते आहे.
प्लास्टिक पेप्सी ह गाव-ब्रान्ड आता बंद झाला आहे. अमेरिकेतील पेप्सी ने हे नव चोरले व बाटलीत बंद केले.
- Log in or register to post comments
प
पक पक पक
Sat, 04/13/2013 - 14:22
नवीन
एक्दम मस्त झालय.. :)
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Sat, 04/13/2013 - 19:33
नवीन
झकास मॉकटेल
उन्हाळ्याच्या दिवसात खासच
ह्यात सोड्याच्या ऐवजी रेडबुल टाकले तर
धमाल येईल.
प्रयोग शाळेत जेवढे प्रयोग होत नसतील तेवढे मधुशाळेत होतात.
रेड्बुल हे 'ब्लॅक करंट' सिरप सोबत फर्मास लागते. असा आमचा अनुभव आहे.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Sun, 04/14/2013 - 11:06
नवीन
गाआआआआआर!
- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
Sun, 04/14/2013 - 12:13
नवीन
- Log in or register to post comments