Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

कॉकटेल लाउंज : बे ऑफ पॅशन (Bay of Passion)

स
सोत्रि
Sat, 03/16/2013 - 15:10

Book traversal links for कॉकटेल लाउंज : बे ऑफ पॅशन (Bay of Passion)

  • ‹ कॉकटेल लाउंज : ब्लु गोवन हेवन
  • Up
  • कॉकटेल लाउंज : स्मूथ मॅन्गो टॅन्गो ›
‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “बे ऑफ पॅशन" पार्श्वभूमी: गोव्यावरून आणलेल्या पॅशन फ्रूट लिक्युअर (भ्रष्ट भारतीय नक्कल) वापरून बरेच दिवस झाले होते. आज त्या लिक्युअरच्या गुलाबी रंगाची पुन्हा एकदा भुरळ पडली. अ‍ॅबसोल्युट वोडकाचे संस्थळ चाळता चाळता पॅशन फ्रूट लिक्युअर वापरून केलेल्या कॉकटेल्स्ची खाणच मिळाली. मग एक मस्त आकर्षक रंगाचे बे ऑफ पॅशन आवडले. महत्वाचे म्हणजे सर्व  साहित्य मिनीबार मध्ये दाखल होते. :) प्रकार: वोडका बेस्ड, कंटेम्पररी कॉकटेल, लेडीज स्पेशल साहित्य:
वोडका 1.5 औस (45 मिली)
पॅशन फ्रूट लिक्युअर 1 औस (30 मिली)
क्रॅनबेरी ज्युस 4 औस (120 मिली)
पायनॅपल ज्युस 2 औस (60 मिली)
बर्फ
लिंबचा 1 काप सजावटीसाठी
1 स्ट्रॉ
ग्लास: – हाय बॉल Cocktail कृती: ग्लासमधे बर्फ भरून घ्या. बर्फाच्या खड्यांवर वोडका ओतून घ्या आता लिक्युअर आणि क्रॅनबेरी ज्युस वोडकावर ओतून घ्या मस्त लाल रंग आला आहे ना! :)  आता त्यात पायनॅपल ज्युस घाला. कॉकटेला वरच्या भागात मस्त पिवळसर रंग येइल. लिंबाचा काप घालून सजवा आणि स्ट्रॉ टाकून सर्व्ह  करा किंवा पिऊन टाका. वर पिवळसर आणि खाली लाल अशा मस्त रंगाचे बे ऑफ पॅशन तयार आहे. :)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4307 views

💬 प्रतिसाद
र
रेवती Sat, 03/16/2013 - 15:27 नवीन
नेहमीप्रमाणेच आकर्षक चित्र!
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Sat, 03/16/2013 - 16:22 नवीन
काय रंग दिसतोय :). ह्या पॅशन नी पॅशनेट व्हायला झालय. सोत्रिजी एक लेखमाला मॉकटेल्स वर लिहा कि...काय आहे ईकडे वारुणी बॅन असल्याने निदान दुधाची तहान ताकावर त्याप्रमाणे कॉकटेल्स ची तहान मॉकटेल्सवर भागउ
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Sat, 03/16/2013 - 17:29 नवीन
बे ऑफ पॅशन सॉल्लिड दिसतय :)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Sun, 03/17/2013 - 23:55 नवीन
माझा टेबलक्लॉथ कुठाय?
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Mon, 03/18/2013 - 10:14 नवीन
हा हा हा, धुवायला टाकला होता. :) -(स्वच्छता पाळणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 03/18/2013 - 15:36 नवीन
हा 'पंचे'करी दिसतोय! :P अ‍ॅब्सोल्युट किती फ्लेवर्स मध्ये मिळते रे सोत्रिबुवा?
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Mon, 03/18/2013 - 20:58 नवीन
वत्सा प्यारे, तुजप्रत कल्याण असो. Image removed. - (साकिया) सोकाजी
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 15 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 16 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा